एकाएकी कुठून कैशी
कल्लोळातुन उमटे ऐशी
हीन स्वरांची शुभ्र रेष ती
अजाणत्या त्या विहरी वेली
क्षत्रपतीच्या कुरणावरुनी
रविकुहरातील बनुनी छाया
सरसावुनी मग येई रावा
मरुभूमीकणघृत रगडाया
जराजीर्ण त्या जरासंध-सम
लचके समस्त एकवटाया
नाद जोडुनी प्रतिपदमात्रे आरंभीचा
ही कविता मग अधर दिशेने बोधे वाचा
शब्दार्थ -
विहरी - विहरण करतात
क्षत्रपती - पृथ्वीपती
घृत - तेल
प्रतिपदमात्रे - (कवितेच्या) प्रत्येक ओळीतील
अधर दिशेने - (वरून) खालच्या दिशेने
बोधे - समजून
(कविता समजल्यास/न समजल्यास निदान शेवटच्या कडव्याचा अर्थ समजून घेऊन त्या प्रमाणे कृती करावी.. मग खरा अर्थ समजेल)
प्रतिक्रिया
22 Mar 2010 - 6:27 pm | विसोबा खेचर
मस्त! :)
22 Mar 2010 - 6:55 pm | मेघवेडा
मस्त!! पण माझ्या मते घृत म्हणजे तूप.. नाही का? :)
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
23 Mar 2010 - 12:05 am | पुष्कर
घृत म्हणजे तूप.. अगदी बरोबर... पण मी तो शब्द ओढून ताणून तेल म्हणून वापरला आहे... त्याचा संदर्भ "प्रयत्ने वाळूचे कण" रगडण्याशी आहे.
22 Mar 2010 - 6:57 pm | शानबा५१२
मराठीपेक्षा चिनी कठीण आहे.....च्यायला मग चिनी कशी असेल?
*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........*****
23 Mar 2010 - 12:11 am | टारझन
छाण !!
-- ( हं आता ..) पुष कर
23 Mar 2010 - 12:18 am | पुष्कर
धन्यवाद.
@ शानबा - चीनी कम (अवघड) आहे.
14 Apr 2010 - 7:18 pm | पुष्कर
काहीशी ओबड-धोबड कविता असल्यामुळे त्याचे निरनिराळे अर्थ निघणे साहजिक आहे. ह्यातील काही शब्द/रचना ओढून-ताणून वापरली गेली आहे हे मी सर्व प्रथम मान्य करतो.
कवितेचा सरळ सरळ अर्थ लक्षात घेतल्यास हे लगेच दिसून येईल की ही एक निसर्ग-कविता आहे. पावसाची चाहूल लागते आणि वातावरणात कसे बदल होतात हे कवितेमधे आलं आहे.
पहिलं कडवं हे आकाशातून पडणार्या विजेबद्दल आहे. "हीन स्वर" म्हणण्याचं कारण त्याची कंपनसंख्या साधारण मानवांच्या संवादाच्या कंपनसंख्येपेक्षा वेगळी आहे.
दुसरं कडवं - सूर्यावरच्या गुहामधली सावली (ही केवळ एक कल्पना आहे) ही ज्याप्रमाणे सूर्यावरच्या तप्तपणाशी अजाण असते, त्याप्रमाणे ह्या वेली वातावरणाच्या बदलांपासून (पावसाची चाहूल लागली आहे ह्या वस्तुस्थितीबाबत) अजाणत्या आहेत, पण त्या बदलांना प्रतिक्रिया म्हणून त्या अजाणतेपणी पृथ्विपतीच्या कुरणांवर विहरू लागतात.
तिसरं कडवं - ह्या तप्त भूमीला, त्याच्या वेगवेगळ्या झालेल्या घटकांना प्रयत्ने (वाळूचे कण रगडिता - मरुभूमिकणघृत रगडाया) एकत्र करण्यासाठी (ज्याप्रमाणे कितीही प्रयत्न करूनही जरासंधाचे धड वेगळे करता येत नसे, इतकी एकरूपता आणण्यासाठी) हिरवा रंग सरसावून येतो.
शेवटच्या कडव्याचा अर्थ सरळ आहे. तो बर्याच जणांना कळला असेल. प्रत्येक वाक्याचं पहिलं अक्षर वाचा.