शाळेत यत्ता ८वी ते १० वी च्या मुलांना टेक्निकल/ संगणक/ शेती यापैकी एक ऐछीक विषय शिकवला जाई. संपूर्ण संस्क्रुत आणि टेक्निकल घेतले की 'अ' तुकडीत प्रवेश मिळत असे. माझ्या सर्वच मित्रांना टेक्निकलची प्रचंड क्रेझ आणि आवड.. मला 'अ' तुकडी, टेक्निकल याचे अजिबात सोयरसूतक नव्हते पण संपूर्ण संस्क्रुत आणि जिवाभावाचे मित्र यांच्यासाठी टेक्निकल आणि पर्यायाने 'अ' तुकडी मिळवणे अनिवार्य होते. टेक्निकल 'मिळवण्यासाठी ' ८वी च्या वर्षाच्या सुरुवातीला गणिताची ५० मार्कांची एक परीक्षा द्यावी लागत असे. गणित विषय मला फार्र फार्र आवडत असे, इतका की मी गणिते पाठ करत असे!! परीक्षा झाली आणि 'निकाल' लागला. मला ५० पैकी अवघे ७ मार्क्स मिळाले म्हणजे ना..पा..स.. ७ मार्क?? ५० पैकी ७ मार्क्स पडले कसे?? मला अगदिच २ किंवा ३ ची अपेक्षा होती..
....याआधी ३च वर्षांपूर्वी गणिताने माझा असाच घात केला होता. निमित्त होते ४तून ५वीत प्रवेश, प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत प्रवेश..माध्यमिक शाळेचे प्राचार्य वैयक्तिकरित्या मुलाखत घेउन 'तुकडीवाटप' करत होते. माझा नंबर आला. मी आणि आई सरांच्या केबीन मधे. नाव गाव विचारून झाल्यावर सर म्हणाले, " १४चा पाढा म्हण" आली का पंचाईत..मला १ ते १२, १३ चा अर्धा, १५, २०, २५ आणि ३० एवढे मोजकेच पाढे येत होते (म्हणजे आजही तेवढेच येतात..फक्त आता १३ चा काहिच येत नाही..)मी सुरूवात केली. १४ एके १४, १४ दुणे २८, १४ त्रीक...१४ त्रीक...१४ त्रीक्.."घाबरू नकोस, नीट आठव आणि म्हण"; इति सर. मी पुन्हा १४ एके आणि १४ दुणे चे दळण सुरू केले. आता मात्र प्राचार्यांचा पारा चढला. "कोणी याला ४तून ५वीत ढकलले? जा..तुला 'क' तुकडी..." एखाद्या रूषिंनी शाप द्यावा तद्वत प्राचार्यांनी माझ्या फार्मावर "क" असे मोठया अक्षरात लिहिले..मला अंमळ गम्मत, भीती आणि असेच काहितरी वाटले. बाहेर आल्यावर आई बराच वेळ, म्हणजे घरी येईपर्यंत ओरडत होती, पण मला त्याबद्दल विशेष काही वाटत नव्हते.
असो.. सगळ्या मित्रांना ३०च्या वर मार्क्स मिळाले होते आणि त्यांचा 'अ' तुकडीत प्रवेश सुकर झाला. शाळेत टेक्निकलच्या ४ शाखांचे शिक्षण दिले जाई. टर्निंग, वायरिंग, फिटींग आणि कार्पेट्री.गणित परिक्षेत सर्वाधिक गुण मिळवणार्यांना टर्निंग आणि सर्वात कमी गुण मिळवणार्यांना कार्पेट्री. माझ्या 'यशाने' वडिलांची घोर निराशा झाली. त्याना मी ईंजीनिअर व्हावे असे मनापासून वाटे आणि ८वी ते १० वी टेक्निकल म्हणजे त्या दिशेने एक पाऊल...त्यांच्या सुदैवाने त्यांचे सर टर्निंग सेक्शनचे प्रमुख होते (वडिलांची आणि माझी शाळा एकच). 'ज्याक'प्वाट लागला अन मी ८वी 'अ' मध्ये आलो आणि ते सुधा टर्निंग सेक्शन मध्ये ......(कोण रे तो मनातल्या मनात मला टट्टू टट्टू म्हणत आहे??)..
क्रमश:..
प्रतिक्रिया
21 Feb 2010 - 12:34 am | टारझन
हॅहॅहॅ .. लय भारी :)
चांगलं लिखान आहे ;) म्होटं लिवा बॉ !
- टार्झन्_अफ्रिका
21 Feb 2010 - 4:35 am | शुचि
>>गणित विषय मला फार्र फार्र आवडत असे, इतका की मी गणिते पाठ करत असे!>>
उपरोध आवडला. =))
*********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
22 Feb 2010 - 10:30 am | प्रमोद्_पुणे
टारझन, शुचि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...
22 Feb 2010 - 4:12 pm | छोट्या
छान आहे ... येउ द्या अजुन
22 Feb 2010 - 5:02 pm | गणपा
मस्त रे भौ..
लवकर लवकर टाक पुढचे भाग.
(क्रमशः लेखनाचा पायंडा टाकणार्याच्या बैलाला ****)
22 Feb 2010 - 5:22 pm | सुनील
प्रकाटाआ
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
22 Feb 2010 - 5:20 pm | सुनील
खुद्द मालकांनाच शिव्या?
चपला शोधून ठेवा ;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
22 Feb 2010 - 5:23 pm | II विकास II
>>(क्रमशः लेखनाचा पायंडा टाकणार्याच्या बैलाला ****)
क्रमशः चे सर्व हक्क विजुभाउ किंवा पिडाकाका यांच्याकडे आहेत.
नक्की आठवत नाही.
22 Feb 2010 - 10:49 pm | पक्या
हा हा ...छान लिखाण ,
पुढचे वाचायची उत्सुकता...पण खूपच अपुरे वाटले. जरा मोठे लिहा ना.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
24 Feb 2010 - 5:13 pm | प्रमोद्_पुणे
छोट्या, गणपा, सुनील, विकास, पक्या धन्यवाद...पुढचा भाग नक्की मोठा लिहीन.
छोट्या, मी फत्तेचंदचाच..सही, तू पण फत्तेचंदचा का??