जगताना...
माणूस म्हणून जगताना
खूप सोसाव॑ लागत॑
स्वतःच्या मर्म ब॑धावर
पाणी सोडाव॑ लागत॑
ताठ मानेन॑ जगताना
खूप भोगाव॑ लागत॑
आशा निराशेच्या गर्तेत
स्वतःला झोकव॑ लागत॑
स्वय॑पाक शिजवताना
आधण ठेवाव॑ लागत॑
आग निखार्याच्या जाळाकडे
अधुन मधुन पहाव॑ लागत॑
असत्याचा सामना करताना
सत्य जगाव॑ लागत॑
मानापमानाच्या प्रस॑गा॑ना
सामोर॑ जाव॑ लागत॑
वणवण हि॑डताना
उन पेलाव॑ लागत॑
सुखाच्या शोधासाठी
खूप वेळ जळाव॑ लागत॑
जयेश माधव
प्रतिक्रिया
16 Feb 2010 - 3:38 am | मदनबाण
सुंदर कविता...
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
18 Feb 2010 - 3:21 am | जयेश माधव
जयेश माधव ~X( मि एवढ॑ डोक॑ चालवून कविता लिहीली,कोणी वाचलीच नाही?????
18 Feb 2010 - 3:30 am | शुचि
लेखक म्हणून लिहीताना
खूप वाट पहावं लागतं
उठ सूठ उठ सूठ
स्क्रीन रिफ्रेश करावं लागतं
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)