मराठी जुनी पुस्तकं 'डिजीटल ग्रंथालयात'

सागरलहरी's picture
सागरलहरी in जनातलं, मनातलं
2 Feb 2010 - 7:09 pm

मराठी भाषेत जुन्यातील जुनी पुस्तकं मिळणे दुर्मिळ झालेली आहेत. वेगवेगळ्या भारतीय भाषेतील जुनी पुस्तकं वाचकांना उपलब्द्ध व्हावीत म्हणून भारत सरकारने अशी जुनी पुस्तके स्कॅन करुन ती 'डिजीटल ग्रंथालयात' ठेवलेली आहेत. या कार्यात भारतातील नावाजलेल्या आणि दर्जेदार शैक्षणिक संस्थानी देखील मोलाची मदत केलेली आहे. जसे की Indian Institute of Technologies, Indian Institute of Science. पुस्तकांची संख्या इतकी आहे की एका वेळी कुठले वाचू.. हे की ते असे होते. तुम्हाला हे दुवे पाहून नक्कीच आनंद होईल. बाकी इतर भाषेतील पुस्तकांपेक्षा मराठी पुस्तकं सर्वाधिक आहेत.

१) http://www.new.dli.ernet.in/
2) http://sanskritdocuments.org/scannedbooks/MarathiIISc.html
३) http://sanskritdocuments.org/scannedbooks/MarathiIIIT.html
४) http://sanskritdocuments.org/scannedbooks/

वरील माहिती एका मित्रा कडुन आलेल्या इ-मेल मधून साभार

सागरलहरी

वाङ्मय

प्रतिक्रिया

शुचि's picture

2 Feb 2010 - 7:17 pm | शुचि

धन्यवाद! =D> =D> =D>
फार छान माहीती पुरवलीत आपण.

मला मुक्तानंद्स्वामींचं "चित् शक्ती विलास" हे फार दुर्मीळ पुस्तक हवं होतं कित्येक वर्षांपासून.
त्याचं इन्ग्रजी भाषांतर "द प्ले ऑफ कॉन्शसनेस" मिळतं पण त्याला मराठीची सर कुठून येणार?
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Feb 2010 - 7:21 pm | बिपिन कार्यकर्ते

जबरी... बघतो काही मिळतंय का... खूप मस्त माहिती दिलीत. धन्यवाद.

बिपिन कार्यकर्ते

पांथस्थ's picture

13 Apr 2010 - 7:10 pm | पांथस्थ

माझ्या मते "चित् शक्ती विलास" पुण्यामधे मिळायला हरकत नाहि. मी ४-५ वर्षापुर्वी विकत घेतले होते...अप्पा बळवंत मधुन....

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

बट्ट्याबोळ's picture

2 Feb 2010 - 7:38 pm | बट्ट्याबोळ

फक्त Indian Institute of Technologies नव्हे तर Indian Institute of information Technology (म्हणजे माझं कॉलेज.) पण मी होतो तेव्हा हे प्रोजेक्ट नुकतच चालू झालं होतं.

वाचून आनंद झाला !!!

मेघवेडा's picture

2 Feb 2010 - 7:45 pm | मेघवेडा

अगदी जहबहरदहस्तह माहिती दिल्याबद्दल धन्यु! खरंच =D>

सरकारचा अतिशय स्तुत्य उपक्रम! बरीच पुस्तके आहेत!! हे वाचू का ते वाचू? :-/

-- मेघवेडा.

आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O

अक्षय पुर्णपात्रे's picture

2 Feb 2010 - 8:20 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री लहरी, उत्तम माहिती. अनेक धन्यवाद.
.............................
मला सदोष वस्तु मिळाल्यास मी (उत्पादकास दोष न देता) समाजाच्या नैतिक अधोगतीकडे पाहून शांत बसतो. ----एक जालीय मत

चतुरंग's picture

2 Feb 2010 - 11:11 pm | चतुरंग

अतिशय स्तुत्य आणि उपयोगी उपक्रमाची माहिती दिल्याबद्दल तुला दुवे! :)

चतुरंग

ऋषिकेश's picture

3 Feb 2010 - 12:57 am | ऋषिकेश

फारच छान माहिती. अनेक आभार

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

गणपा's picture

3 Feb 2010 - 5:54 am | गणपा

कधी कधी ढकल पत्रातुन पण चांगली माहिती मिळते.
सागरलहरी चांगले दुवे दिलेत. धन्यु.

Nile's picture

3 Feb 2010 - 6:31 am | Nile

सुंदर माहिती, धन्यवाद!

प्रकाश घाटपांडे's picture

3 Feb 2010 - 9:01 am | प्रकाश घाटपांडे

आमच्या जालनिशीतील ई ग्रंथालयाला जरुर विजीट मारा
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

शाहरुख's picture

3 Feb 2010 - 12:32 pm | शाहरुख

हा प्रोजेक्ट चालवणार्‍यांचेही धन्यवाद.

मीनल's picture

3 Feb 2010 - 10:33 pm | मीनल

वाचन खुण म्हणून साठवून ठेवली आहे माहिती .वाचत राहेन .
मीनल.

टुकुल's picture

3 Feb 2010 - 11:14 pm | टुकुल

खुपच मस्त माहीती.
वाचनखुण साठवली आहे.

--टुकुल

अभिरत भिरभि-या's picture

13 Apr 2010 - 3:41 pm | अभिरत भिरभि-या

जालभ्रमण करता सापडलेला आणखी एक चांगला दुवा ..

मराठी

इंग्रजी

Manoj Katwe's picture

14 Apr 2010 - 7:20 am | Manoj Katwe

धन्यवाद

Manoj Katwe's picture

15 Apr 2010 - 5:48 am | Manoj Katwe

आणखी एक चांगला दुवा
http://ebooks.netbhet.com/