हे खाली वर जाणं...

गुंडोपंत's picture
गुंडोपंत in काथ्याकूट
24 Sep 2007 - 8:59 am
गाभा: 

नमस्कार मित्र व मैत्रिणींनो,

मिसळपावावर चर्चा किंवा एकुण सदस्यांनी पाठवलेले साहित्य प्रतिसादावर आधारीत खाली आणी वर जातात.
हे एक वेगळेपण आहे.
याचे काही फायदे जरूर आहेत जसे, कोणता विषय 'सध्या चर्चेत' हे लगेच कळते.
प्रतिसाद चटकन देता येतात. एकुण सगळ्या सदस्यांना अपडेट राहणे होते!

पण त्याच वेळी या सोईने काही त्रास आहेत.
जसे नको ते विषय(?) काही लोक उगाच चूड लावल्यासारखे काढतच राहतात. इतर सर्व स्थळंवर जसे काही काळा नंतर विषय पडद्या आड जातात म्हणजे दुसर्‍या पानावर जातात. इथे तसे जाणे शक्य होत नाही. त्याचा ज्यांना इंट्रेस्ट नाही त्यांना त्रास होतो.

शिवाय अनेकदा चांगले विषय, चर्चा काही प्रतिसाद मिळायच्या आताच उगाच खाली निघुन जातात.

तेंव्हा हे खाली वर जाणे बंद करता येणार नाही का?
किवा तसे ते बंद करावे व सर्व साहित्य प्रतिसादबद्ध नसून कालबद्ध असावे का ?
आपल्याला काय वाटते?

आपला
गुंडोपंत

प्रतिक्रिया

आजानुकर्ण's picture

24 Sep 2007 - 9:02 am | आजानुकर्ण

गटारात काठी ढवळत राहिली की कचरा वर तरंगतो.
त्याला स्थिर होण्यासाठी थोडा वेळ दिला की घाण खाली बसते.

या वैज्ञानिक तत्त्वावर हे खालीवर येणे अवलंबून आहे. त्यामुळे जो विषय खाली जावा असे वाटते त्याला प्रतिसाद देऊ नये. व चांगले लिखाण वर रहावे म्हणून त्याला प्रतिसाद देणे.

प्रकाश घाटपांडे's picture

24 Sep 2007 - 9:16 am | प्रकाश घाटपांडे

गटारात काठी ढवळत राहिली की कचरा वर तरंगतो.
त्याला स्थिर होण्यासाठी थोडा वेळ दिला की घाण खाली बसते.

मग समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर आली. ती मंथन म्हणजे (ढवळण्याच्या/ घुसळण्याच्या) प्रक्रियेतूनच ना? अन्यथा ती गाळ म्हणूनच राहिली असती. आपल्याला फक्त चौदावे रत्न माहित आहे. अन्य तेरा रत्नांचा चिकित्सकांनी खुलासा करावा.

प्रकाश घाटपांडे

गुंडोपंत's picture

24 Sep 2007 - 9:17 am | गुंडोपंत

तुमच्या म्हणण्यात तथ्य असले तरी

गटारात काठी ढवळत राहिली की कचरा वर तरंगतो.
त्याला स्थिर होण्यासाठी थोडा वेळ दिला की घाण खाली बसते.

आमच्या मिसळपावाला गटार म्हणणे आम्हाला आजिबात आवडलेले नाही!
सबब हा प्रतिसाद संपादकांचा असला तरी तो लगेच काढून टाकला जावा अशी मी मागणे करतो!

आपला
गुंडोपंत

आजानुकर्ण's picture

24 Sep 2007 - 9:54 am | आजानुकर्ण

काय वर रहावे व काय खाली हे सदस्यांवरच अवलंबून आहे हा मथितार्थ ध्यानात घ्यावा. एखाद्या गोष्टीचे गटार करणे जसे शक्य आहे तसेच त्या गोष्टीला सुंदर तलाव करणेही शक्य आहे.

नंदन's picture

24 Sep 2007 - 9:05 am | नंदन

साहित्य प्रतिसादबद्ध नसून कालबद्ध असावे, असे मला वाटते. अर्थात, जर सेवादात्यावर फार ताण पडणार नसेल तर जसे सध्या स्वगृह/चर्चा/काव्य/साहित्य असे वेगवेगळे टॅब्ज आहेत; तसा प्रतिसादबद्ध साहित्यासाठी एक वेगळा टॅब तयार करता येईल. डिफॉल्ट मुखपृष्ठ कालबद्ध ठेवता येईल. अन्यथा, गुंडोपंतांनी म्हटल्याप्रमाणे चांगल्या लेख-चर्चांचे 'विसरशील खास मला, दृष्टिआड होता...' होण्याची भीती वाटते.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

गुंडोपंत's picture

24 Sep 2007 - 9:19 am | गुंडोपंत

काही लोक खरंच चांगलं लिहुन काही
चांगले विषय आणायचा प्रयत्न करत आहेत.
पण ते खाली निघुन जातात.

साहित्य कालबद्ध असले तर बरे!

आपला
गुंडोपंत

प्रमोद देव's picture

24 Sep 2007 - 9:06 am | प्रमोद देव

आजानुकर्णाशी मी सहमत आहे. वर काय यावे आणि तळाशी काय जावे हे आपल्यावरच अवलंबून आहे.

गुंडोपंत's picture

24 Sep 2007 - 9:21 am | गुंडोपंत

मग आता मी पण आठ आठ आयडी घेऊन
मला हव्या त्या विषयावर सारखे विषारी प्रतिसाद देवू म्हणता?
असं कसं शक्य आहे?

आपण म्हणता तसे कालबद्ध मध्ये ही होतेच ना?
प्रतिसाद कमी येतातच नि विषय मागे पडतो.

आपला
गुंडोपंत

हे खालीवर जाणे ह्या विषयावर प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते. त्यातून आपण सर्व मराठी विद्वान म्हणजे खरेच प्रत्येकाचे वेगळे मत त्यामूळे सार्वमताने निर्णय अशक्य. कोणाला न कोणाला तरी ह्या असल्या प्रकाराचा "उबग"येणारच. (हॉटेलमधे उबग येण्याच्या खूप तक्रारी येत आहे कृपया छान "उबगप्रतीरोधक" औषधाची फवारणी करावी)

असो ह्यावर उपाय म्हणजे ज्याच्या त्याच्या हातात कंट्रोल देणे, म्हणजे नीलकांता कृपया सर्वांना "मूळ अंतीम लेखन" "अंतीम प्रतिसाद" "प्रतिक्रीया" ह्या सर्वांनी लिंक दाबून पाहीजे तसे खाली-वर करून घेता येइल अशी सोय दे. म्हणजे तुम्हाला पाहीजे ते घ्या.

ज्यांना खूप चर्चीला विषय बघायचा त्यांनी "प्रतिक्रीया" कळ दाबावी, ज्यांना आजचे लेख वाचायचे आहेत त्यांनी "मूळ अंतीम लेखन" ज्यांना लेटेस्ट अंतीम प्रतिसाद......

सर्वे सुखिनं संतू!

गुंडोपंत's picture

24 Sep 2007 - 9:23 am | गुंडोपंत

प्रत्येकाला कस्टमाईझ व्ह्यु करता आले तर तर त्यासारखे सुख नाही.
पण तसे शक्य आहे का?
असेल तर मला कृपया साहित्य दिसणे कालबद्ध करून देता का?

आपले अनंत उपकार होतील म्या पामरावर हो!

आपला
गुंडोपंत

सर्किट's picture

24 Sep 2007 - 10:09 pm | सर्किट (not verified)

असो ह्यावर उपाय म्हणजे ज्याच्या त्याच्या हातात कंट्रोल देणे,

सहमत !!!

- सर्किट

धनंजय's picture

25 Sep 2007 - 1:28 am | धनंजय

होय. असा कंट्रोल मिळाला तर चांगले होईल बुवा.

कौटील्य's picture

25 Sep 2007 - 1:28 pm | कौटील्य

माझी सुचना अशी आहे -

१) मुख्यपानावर नुकतेच प्रकाशित, नवीन प्रतिसाद, खुप प्रतिसाद, विशेष लेख अशी वर्गवारी करुन ब्लोक बनवावे.
२) अरकाइव्हर मोड्युल वापरावे जेणेकरुन दिनदर्शिकेप्रमाणे लेखमाला पहाता येईल
३) व्होटींग सिस्टीम चालु करुन जास्त गुणांचा विभाग करावा
अजुन सुचना सुचल्यावर ........

राजे's picture

25 Sep 2007 - 1:47 pm | राजे (not verified)

ह्या पेक्षा जास्त चांगली कल्पना ही आहे की लेखन विभागवारी पाहण्याची सुविधा हवी, जसे मला फक्त जनातलं, मनातलं मधील लेख वाचायचे आहेत तर तसे पाहण्याची सुविधा असावयास हवी.

राजे
(*हेच राज जैन आहेत)

नंदन's picture

25 Sep 2007 - 1:50 pm | नंदन

राजभाई, अशी सुविधा आहे की. पानावर वरच्या उजव्या कोपर्‍यात 'साहित्य' या टॅबवर टिचकी मारली की 'जनातलं मनातलं' मधले सारे लेख दिसतील. अन्यथा हा दुवा आहेच -- http://www.misalpav.com/prose.html

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

राजे's picture

25 Sep 2007 - 1:57 pm | राजे (not verified)

अरे मी तर तीकडे लक्षच दिले नव्हते, मला वाटलं होतं की मनोगत वर जसा डोक्यावरुन जाणारा प्रकार साहित्य ह्या विभागात पाठवत त्यातला काहीसा प्रकार येथे देखील असावा असे आजपर्यंत मी भितीने टिचकी देखील मारली नाही त्या दुव्यावर ;D

राजे
(*हेच राज जैन आहेत)

देवदत्त's picture

22 Oct 2007 - 6:42 pm | देवदत्त

तशी विभागणी आहे. हे चांगले.
परंतु त्यात नवीन लेख/प्रतिसाद किती व कोणते ते दिसत नाही :(

नाहीतर मुख्य पानावर ही माहिती सहज मिळते.

कोंबडी's picture

26 Sep 2007 - 8:34 pm | कोंबडी

... पण "हे ख्खाल्ली व्वर्र ज्जाणं ..." वरून मला सारखी "ये इलु इलु क्या है ..." ची आठवण येतेय! आता गाणं अडकलं डोक्यात :(