एका शेतकर्याच्या पोल्ट्री फार्म मध्ये एक कोंबडा रहात होता.
पोल्ट्री फार्म मध्ये काही शे कोंबड्या होत्या.
हा कोंबडा बरेच महीने तेथे रहात होता. तो म्हातारा झाला होता.
शेतकर्याने विचार केला की कोंबडा आता म्हातारा झालाय. एखादा नवा तरूण कोंबडा आणायला हवा. जुन्याला रीटायर करायला हवे
त्याने ऐटदार तुरा असलेला एक नवा कोंबडा आणला.
नवा कोंबडा खरोखरच ऐटदार होता. इतक्या काही शे कोंबड्यांकध्ये तो फारच खुलून दिसत होता.
नवा कोंबडा जुन्या कोंबड्याला म्हणाला.
गड्या तू आता म्हातारा झालायस. त्यामुळे शतकर्याने मला इथे आणलय. तुझी आता छुट्टी....
जुना कोंबडा म्हणाला. खरे आहे रे तुझे. पण मी तितकासा म्हातारा नाहिय्ये.
नवा कोंबडा म्हणाला कशावरून रे
जुना कोम्बडा म्हणाला. आपण शर्यत लावू या. इथून ते त्या पलीकडच्या कुम्पणापर्यन्त जोरात पळत जायचे....फार नाही पन्नास एक फूट असेल अंतर. चालेल. तसाही मी जाणारच आहे. जिंकलो तर आवडती कोम्बडी सोबत घेऊन जाईन. बाकी सार्या तुझ्याच आहेत. हरलो तर काय काहीच प्रश्न येत नाही. चालेल?
नव्या कोंबड्याला यात नकार द्यायचे काहीच कारण नव्हते. तो एकदम तयार झाला.
पण एक आहे .....माझ्या वयाचा विचार करून मला थोडी सवलत दे.....
शर्यतीत मी प्रथम पुढे जाईन. दहा बारा मीटर पुढे गेल्यानन्तर तू धावायला सुरुवात करायची कबूल
नव्या कोंबड्याला यातही काहीच प्रश्न नव्हता. त्याला खात्री होती की आपल्या जोमापुढे तो म्हातार जुना कोंबडा कुठेच टिकणार नाही.
शर्यत सुरु झाली. अगोदर ठरल्याप्रमाणे जुन्या कोंबड्याने अगोदर धावायला सुरुवात केली. तो दहा बारा मीटर पुढे गेला असेलनसेल तेवढ्यात नव्या तरूण कोंबड्याने सुद्धा धावायला सुरुवात केली. जूना कोंबडा जीव खाऊन धावत होता. त्याच्या मागे नवा कोंबडा होता.
नवा कोंबडा जुन्या कोम्बड्याला टारून पुढे जाणार इतक्यात " ठ्ठ्ठो......" असा बंदुकीचा आवाज झाला.
नव्या कोंबड्याच्या पोटातून गोळी आरपार गेली होती. त्याची पिसे हवेत तरंगत होती.
आणि शेतकर्याचा आवाज आला
" हॅट साल्ला..... काय कळेनासेच झालेय........ या आठवड्यात मारलेला हा पाचवा "गे" कोंबडा. नवे आणलेले सगळे कोंबडे असलेच निघताहेत
प्रतिक्रिया
29 Jan 2010 - 10:59 am | पाषाणभेद
इकडेही ठ्ठ्ठो !
चांगला अनुभव आहे.
अवांतर: आजकाल काय सगळे जण आपापले अनुभव सांगू राहिलेत.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
29 Jan 2010 - 2:49 pm | अनिल हटेला
अवांतर: आजकाल काय सगळे जण आपापले अनुभव सांगू राहिलेत. =))
अवांतरेतरः- ढकल पत्रातुन आलेल्या विनोदाचे भाषांतर आवडले.....
बैलोबा चायनीजकर !!!
© 2006-2010. All rights reserved.
29 Jan 2010 - 3:08 pm | टारझन
१. ह्यातला कोणता अणुभव उपयोगी पडला विजुभाऊ ?
२. तुम्ही यातले नवे कोंबडे की म्हातारे कोंबडे ?
३. म्हातारे कोंबडे असाल तर हॅहॅहॅ.. :)
४. नवे कोंबडे असाल तरे .. हॅहॅहॅ हॅहॅहॅ हॅहॅहॅ =))
- (उपयोगी) अनुभाऊ
29 Jan 2010 - 3:29 pm | विनायक प्रभू
लय भारी
29 Jan 2010 - 6:16 pm | शुचि
तात्पर्य - जुन्या ईरसाल, पाजी, बिलन्दर र्कोम्बड्यचा आधी रस्सा शिजवा आणि तो रिचवून मग नवा कोम्बडा आणा.
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो र्आम अम्हाला देतो
29 Jan 2010 - 8:23 pm | चिरोटा
शेतकर्याच्या घरी मुलांची मजा. आठवड्यातून पाच वेळ जेवायला चिकन मिळाले.
भेंडी
P = NP