असे सखे तू रुसू नको ना.....

सागरलहरी's picture
सागरलहरी in जे न देखे रवी...
23 Jan 2010 - 11:54 am

असे सखे तू रुसू नको ना ,
मोती डोळां सांडू नको ना ,
फुला फुला रे माझ्यासाठी,
असे उगा तू रुसू नको ना .. |१|

असे कोणते दु:ख तुला गे ,
कुणी बोलले काय तुला गे,
कटू बोल ते स्मरू नको ना,
असे सखे तू रुसू नको ना.. |२|

चंद्र कोर बघ अर्धी झाली,
कळी उमलता तशी थांबली,
अशी पापणी मिटू नको ना,
असे सखे तू रुसू नको ना..|३|

हसशी जर तू जग हे हासे,
तयासाठी तर हास जरासे,
मला दूर तू करू नको ना,
असे सखे तू रुसू नको ना..|४|
-- सागर लहरी १७.१.२०१०

कविता

प्रतिक्रिया

मीनल's picture

23 Jan 2010 - 6:44 pm | मीनल

कविता आवडली.

मीनल.

प्राजु's picture

24 Jan 2010 - 12:31 am | प्राजु

व्वा!
छान आहे.
अशी आर्जवे केल्यावर कशाला रूसेल ती सखी!! :)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

शेखर's picture

24 Jan 2010 - 12:25 pm | शेखर

मस्त च रे.....
एकदम तरल कविता....
आवडली....

मदनबाण's picture

25 Jan 2010 - 6:52 am | मदनबाण

हसशी जर तू जग हे हासे,
तयासाठी तर हास जरासे,
मला दूर तू करू नको ना,
असे सखे तू रुसू नको ना..|

मस्तच...

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

क्रान्ति's picture

25 Jan 2010 - 9:56 am | क्रान्ति

वा! सुंदर!

क्रान्ति
अग्निसखा

चिऊ's picture

25 Jan 2010 - 10:54 am | चिऊ

इतके प्रेमानी कोणी समजवणार असेल तर सखी सारखी रुसेल... :-)

पाषाणभेद's picture

26 Jan 2010 - 8:12 am | पाषाणभेद

वा सागरलहरी. मस्त आनंद दिला तुम्ही.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
(वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)