हे चित्र पहा आणि ते चित्र पहा"

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
20 Jan 2010 - 12:27 am

"हे चित्र पहा आणि ते चित्र पहा"
चिंतन करताना.शेक्स पीअर च्या नाटकातल
वाक्य आठवल."हे चित्र पहा आणि ते चित्र पहा"

स्विमिंग पुल मधें, लहान मुलीं, कोवळ्या कळ्या
पोहण्याचा ड्रेस घालुन पाण्यात पोहत होत्या..
पाणि एकमेकांच्या अंगावर उडवत होत्या..
निळ्याभोर पाण्यांत मासोळ्या पोहतात
असे वाटत होते....

गावात लहान मुलि डोक्यावर हंडा घेउन
झपाझप चालल्या होत्या.
झोपडीत प्यायला पाण्याचा थेंब नव्हता.
नदिच पाणी आटल होत..
आत पात्राजवळ खोल खड्डा खणुन झीरपलेल
पाणी करवंटीन हंड्यात भरायच होते पीण्यासाठी,
झोपडीत प्यायला पाण्याचा थेंब नव्हता

सोसायटीच्या आवारात मुल उभी होती.
इस्त्रीचा कडक शाळेचा ड्रेस
चकाचक शुज,मोजे, पाठीला स्कुल बॅग
ब्रेक फास्ट साठी छोटा डबा, लंच चा निराळा
पाण्याची बाटली, सेंट ऍन कॉन्व्हेंट शाळा,
रिक्षा वाले काकांची वाट पहणारे.

पोर पाय ओढ्त शाळेंत चालली होति
शाळेचे छप्पर फाट्ले होते, पाणी गळत होते,
मास्तर येतिल कि नाहि याची पण शंका होति..
बरेच अंतर काटायच होत..ऊन डोक्यावर आले होते
पोर पाय ओढ्त शाळेंत चालली होति

बाथ घेतल्यावर नितु ला फ्रेश वाट्ल,
ति MNC मधे कामाला होति..Rs.६ .५ Lac P.A. च पे पॅकेट
आज पब मधे पार्टी होति..शनिवार होता
कालच पे अमेरिकन एक्सप्रेस मधे क्रेडिट झाला होता.
तिन जिन चढ्विली, राहुल कार घेउन येणार होता
श्वेता,शिल्पा पण येणार होति..धमाल...

ति १०.३० पासुन पतपेढी च्या ऑफिस मधे उभी होति.
साहेब आले नव्हते.. १२ वाजायला आले होते.
नोकरी मिळेल की नाहि या विचाराने ति त्रस्त होति.
नगरसेवकाची चिठ्ठी तिच्याकडे होति..
तो म्हणाला होता. २५००/- पर्यंत पगार मिळेल.
चालेल..रिटायर्ड झालेल्या बाबांच चेहेर डोळ्यासमोर आला..
ताईच पण जमत नव्हत..
नोकरी मिळवण गरजेच होत

चिंतन करताना.शेक्स पीअर च्या नाटकातल
वाक्य आठवल."हे चित्र पहा आणि ते चित्र पहा"

Avinash..............................

कविता

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

20 Jan 2010 - 12:14 pm | नितिन थत्ते

हम्म. अविनाशकुलकर्णींना लाल सलाम.

नितिन थत्ते

शुचि's picture

31 Jan 2010 - 8:38 am | शुचि

चालेल..रिटायर्ड झालेल्या बाबांच चेहेर डोळ्यासमोर आला..
ताईच पण जमत नव्हत..
नोकरी मिळवण गरजेच होत

त्या "चालेल" नी काळजात कळ उठली.

कुठेतरी वाचलं होतं - आर्ट इज नॉट आर्ट टिल्ल इट डिस्टर्ब्स यु" काहीसं. ते आठवलं.

***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो