क्रांतीताईंची सुरेख कविता ती आणि रंग्याची (ती) वाचुन आम्हाला आमची झालेली फजि'ती' आठवली
ती समीप माझ्या येते, खुणवुन जाते
ती चक्क, गुलाबी रुमाल टाकुन जाते
ती शिकवुन जाते अर्थ नवे नजरांना
जागवते हृदयी भलत्या अन स्वप्नांना
मग स्वारी अमुची तिच्या मागुन जाते
ती गालांवर ओठांनी काढत रेषा
तनमनी जागवी अशी अनामिक भाषा
अन स्वारी अमुची पुरी मोहरुन जाते
या गालांवरती पडले काहीबाही
ते मणा सारखे मला भासते काही
ती खडबडून मज जागे करुन जाते
ती कुणी,कल्पना वा ना कविता माझी
ती कजाग, फुगरी असे बायको माझी
जी गोड गुलाबी स्वप्ना उधळुन जाते
प्रतिक्रिया
6 Jan 2010 - 12:02 pm | सहज
हे बेस्ट!
6 Jan 2010 - 12:10 pm | बिपिन कार्यकर्ते
सहमत.
बिपिन कार्यकर्ते
6 Jan 2010 - 12:20 pm | sneharani
सहमत
6 Jan 2010 - 7:43 pm | टोळभैरव
सहमत.
मी टोळ. :)
(मला खरडण्याचा /व्यनीचा अधिकार नाही, त्यासाठी काय करावे लागते ? )
6 Jan 2010 - 12:46 pm | मोहन
नेहमी प्र्माणे छानच.
मोहन
6 Jan 2010 - 1:38 pm | श्रावण मोडक
छान...
6 Jan 2010 - 1:54 pm | jaypal
बढकर एक .
वा वा वा !!!!!!!
केसु जी मजा आणलीत
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
6 Jan 2010 - 4:05 pm | चतुरंग
फर्मास विडंबन!
(खडबडून जागा झालेला)चतुरंग
6 Jan 2010 - 6:30 pm | टारझन
आपली बरीच विडंबणं वाचली ! पण सारखा सारखा तोच विषय असतो .. नाविन्याची कमी जाणवते. त्यामुळे "काही खास" असं वाटत नाही.
असो !
- खाजवकुमार
6 Jan 2010 - 6:55 pm | मीनल
शेवट सॉलीड आहे.
अरे रे!!!!
मीनल.
6 Jan 2010 - 10:27 pm | टुकुल
हेच म्हणतो.
6 Jan 2010 - 7:48 pm | अक्षय पुर्णपात्रे
:yawn:
6 Jan 2010 - 8:40 pm | क्रान्ति
"ती"नं भलतंच वेड लावलेलं दिसतंय! "ती"ची ही आवृत्ती पण खासच!
=D> =D> =D> =D>
क्रान्ति
अग्निसखा
8 Jan 2010 - 9:26 am | केशवसुमार
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार.
(आभारी)केशवसुमार