आपल्या दोन आयुष्यांचे
क्षण एकमेकांत मिसळून जाती
झालो मी तुझ्या आयुष्याच्या
प्रत्येक क्षणाचा सोबती
------------------
एका क्षणी तुला पाहिले
क्षण तो खास अगदी
त्या क्षणी मिळाला क्षणाला
क्षणाचा सोबती
------------------
तुझ्या प्रेमातला "मी"
------------------
प्रेमात तुझ्या गुंतलो मी
माझाच नाही उरलो मी
प्रेमाच्या खेळात जिंकलो मी
हृदयात तुझ्या व्यापून उरलो मी.....
भेटलीस तेव्हा हरखलो मी
हसलीस तेव्हा हर्षलो मी
रुसलीस तेव्हा हुरहुरलो मी
निघालीस तेव्हा हिरमुसलो मी.....
तू दूर होतीस तेव्हा
तुझ्या हृदयात दिसलो मी
परत कधी आलीच नाहीस तेव्हा
माझ्याच अश्रूंमध्ये विरघळून संपलो मी
-----------------------
"प्रेमाचा" पाऊस
----------------------
पावसाच्या संथ धारांमध्ये
मदनाच्या मंद वाऱ्यामध्ये
मादक गंध तुझ्या शरिराचा
लावी मनाला छंद मिलनाचा.
---
पाऊस बरसला
सुगंध पसरला
सहवास बहरला
श्वास मोहरला
---
पाऊस धारा बरसल्या
मनाच्या तारा जुळाल्या
इंद्रधनुष्य उगवले
त्याने मिलनाचे संकेत दिले
---
जसे, ऊनपावसाच्या खेळात
इंद्रधनुष्याची संगत
तसे, रुसव्या फुगव्याशिवाय
येत नाही प्रेमात रंगत
----
प्रणयाचा प्याला
पावसाच्या पेटलेल्या पाण्यात...
वाऱ्याच्या वेगवान वाटेवर...
बेटावरल्या बहरलेल्या बागेत...
आकाशाच्या अमर्याद आभासात...
सागराच्या संथ सुरावटीत...
सूर्यकिरणांतील सुप्त सप्तरंगांच्या साक्षीने...
इंद्रधनुष्याचा इरसाल इब्लीस इशारा...
"प्रियेसोबत प्यावा प्रणयाचा प्याला..!! "
"प्रियेसोबत प्यावा प्रणयाचा प्याला...!!! "
प्रेमधुंदी
नाही कुणी आस पास
लागला प्रेमाचा ध्यास
मिसळला श्वासात श्वास
लागली मिलनाची आस
हे खरं आहे की आभास
एकेक क्षण बनावा एकेक तास
असे वाटे दोघांच्या एकच मनास
वाटतोय वेगळाच उल्हास
रात्र आजची आहेच तशी खास
मधूर चंद्राच्या सोबतीलाआहे चांदण्यांची आरास...
मधूर चंद्राच्या सोबतीलाआहे चांदण्यांची आरास...
हे मात्र न कळे...!
सौंदर्य असते म्हणतात बघणाऱ्यांच्या डोळ्यात...
प्रेम तर असते म्हणतात मात्र आंधळे!
मग 'सौंदर्याच्या प्रेमात' पडणाऱ्यांच्या डोळ्यात...
नेमके काय असते हे मात्र न कळे!
आणि एकमेकांवर 'आंधळेपणाने प्रेम' करणाऱ्यांच्या डोळ्यात...
नेमके काय असते हे मात्र न कळे!
प्रतिक्रिया
5 Jan 2010 - 3:24 pm | फ्रॅक्चर बंड्या
माझ्याच अश्रूंमध्ये विरघळून संपलो मी
फार छान
binarybandya™
5 Jan 2010 - 3:54 pm | टारझन
एवढं खतरनाक प्रेमकाव्य मी आजतागायत वाचलंच नव्हतं !
"क्षणाचा सोबती" ह्यांचा सारखा महान कवी आपल्या मिपावर आहे .. आणि मला त्यांचे अनेक उत्तमोत्तम लेख वाचायला मिळतात ह्याबद्दल मला स्वतःचाच हेवा वाटत असतो. किती सुरेख लिहीलंय "क्षणाचा सोबती" ह्यांनी !
हल्लीच्या अंतरजालिय मंदीच्या वातावरणात "क्षणाचा सोबती" अगदी तारणहार वाटत आहेत. मी तर फॅन झालोय "क्षणाचा सोबती" ह्यांचा !
खरंच काय सुरेख आणि अप्रतिम काव्य आहे ? शब्द देखील अपुरे पडावेत.
मी फॅनच झालोय गेल्या काही दिवसांपासून "क्षणाचा सोबती" ह्यांचा !
केवळ अप्रतिम ... धन्यवाद "क्षणाचा सोबती "
- बितीस तिरडी
5 Jan 2010 - 4:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>अंतरजालिय मंदीच्या वातावरणात "क्षणाचा सोबती" अगदी तारणहार वाटत आहेत.
सहमत आहे. :)
'प्रेमाच्या पाऊस' मधील काही ओळी बर्या वाटल्या.
-दिलीप बिरुटे
6 Jan 2010 - 7:47 pm | टोळभैरव
एवढं खतरनाक प्रेमकाव्य मी आजतागायत वाचलंच नव्हतं !
सहमत.
(टाळू)
मी टोळ. :)
(मला खरडण्याचा /व्यनीचा अधिकार नाही, त्यासाठी काय करावे लागते ? )
5 Jan 2010 - 4:14 pm | भडकमकर मास्तर
खूप छान काव्य आहे..
मनाला स्पर्श करते थेट...
फार्फारफार आवडले.
6 Jan 2010 - 9:25 am | निमिष सोनार
मी प्रेम काव्य-२ मिपा वरून काढून टाकले आहे आणि त्यातल्या तीन कवीता -
प्रणयाचा प्याला
प्रेमधुंदी
हे मात्र न कळे...!
या प्रेम काव्य संग्रह यात टाकल्या आहेत.
बदलाची नोंद घ्यावी.
1 Feb 2010 - 5:50 am | शुचि
>>इंद्रधनुष्याचा इरसाल इब्लीस इशारा...>>
अहाहा! खूप वर्षांनी हा "इब्लीस" शब्द वाचला. मजा आली वाचून.
"प्रणयाचा प्याला" - छान भट्टी जमलीये.
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो