पुण्यश्लोकी जे मुनी वाल्मीकी
गदिमा होऊन आले लोकी
लाख मनांना वेड लाविती
बाबुजी रामायण गाती
नित्य उपासक ते प्रतिभेचे
भाविक पूजक स्वर-शब्दांचे
चरित सांगती जगतपित्यचे
तारे हे सूर्या ओवाळिती
बाबुजी रामायण गाती
हे भक्तीचे कोरीव लेणे
कोजागिरीचे धवल चांदणे
ह्रद्यकुपीतून आले गाणे
संगती लाखो जन रंगती
बाबुजी रामायण गाती
फुलापरि ते शब्द उमलती
सुगंध पसरे विश्वाभोवती
इतुके याचे वेड लाविती
नास्तिका भक्ती रस पाजती
बाबुजी रामायण गाती
पूर्णपणाची कृतार्थ चौकट
कसे जगावे पुरुषोत्तमपट
विस्मयकारक अतिव उत्कट
ऐकुनी श्रोतुजन नादती
बाबुजी रामायण गाती
मुग्ध जाहले लाखो जनमन
तृप्त मानसे भरले लोचन
मूर्त पाहिले प्रभूचे जीवन
सवे गाली ओघळ्ती
बाबुजी रामायण गाती
प्रतिक्रिया
27 Dec 2009 - 2:02 pm | llपुण्याचे पेशवेll
छान कविता रे पुष्क्या. मस्तच. शेवटच्या कडव्यात आसवे मधला फक्त सवेच आला आहे.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
27 Dec 2009 - 3:48 pm | सुनील
चांगली जमली आहे. वर पुपेंनी म्हटल्याप्रमाणे सवे ऐवजी आसवे असा बदल करावा.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
28 Dec 2009 - 12:44 pm | विशाल कुलकर्णी
मस्तच झालीये कविता, आवडली !
(बाबुजींचा भक्त )
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"