बंदोबस्त

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जे न देखे रवी...
26 Dec 2009 - 8:48 pm

सुपातली पाखड
अंगणात भिरकावून
भुलवतेस चार भुरट्या पाखरांना
भर दुपारी.
गुमसुम गुपचुप.
आतून बंद कडी घालतेस
दुपारच्या अधमुर्‍या अंधाराची.
खिडकी आड भोचक राघू
किंचाळतोच,
माहीत्येय .. ....... माहीत्येय..
दुपारची दंगल
आणि बाहेर बंदोबस्त.

शृंगारधोरण

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

26 Dec 2009 - 9:10 pm | चतुरंग

नाताळच्या जरा जास्तच बैठका जमल्या होत्या की काय एवढ्यात? नाही म्हटलं, दुपारची दंगल वगैरे आठवायला लागलिये म्हणून विचारलं! ;)

(राघू)चतुरंग

रामदास's picture

26 Dec 2009 - 9:10 pm | रामदास

नाताळाची सुट्टी आहे.
स्साला,म्हातार्‍याचा ताळतंत्र सुटलाय.

टारझन's picture

26 Dec 2009 - 11:41 pm | टारझन

काय सांगता ? येशु चा जन्म झाला ? ठाण्यात ? :O

- देवीदास

टारझन's picture

26 Dec 2009 - 9:17 pm | टारझन

शब्द खुंटले !

पाषाणभेद's picture

26 Dec 2009 - 10:04 pm | पाषाणभेद

आजकाल थंडीचा कडाका पडलाय जास्त.
दुपारच्याला पन गोधडी घ्यावी लागतेय.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

श्रावण मोडक's picture

26 Dec 2009 - 11:15 pm | श्रावण मोडक

दडलेली कथा काय असावी? निश्चितच काही तरी आहे!

शाहरुख's picture

27 Dec 2009 - 12:29 am | शाहरुख

धोरण आवडले..

मोडकजी, राघूही 'माहित्येय' म्हणतोय म्हणजे कथा काय निदान कादंबरी तरी असणारच ;-)

श्रावण मोडक's picture

27 Dec 2009 - 10:41 am | श्रावण मोडक

मोडकजी, राघूही 'माहित्येय' म्हणतोय म्हणजे कथा काय निदान कादंबरी तरी असणारच!
हाहाहाहाहा... खरंय. हा स्केल लक्षात आला नाही.

अवलिया's picture

27 Dec 2009 - 12:12 pm | अवलिया

श्री रा रा विनायकजी प्रभुजीसाहेब

आपण अंमळ चळलेले आहात.
काळजी घ्या.
वाढलेला रक्तदाब हृदयावर ताण देईल आणि अचानक आलेली उचकी पंचप्राण कंठाशी आणेल.
आम्हाला (पक्षी - मिपाकरांना या अर्थाने ) तुमच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे, त्याकरता आपले आचरण संयमित असु द्या.

धन्यवाद.

--अवलिया

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Dec 2009 - 11:55 am | बिपिन कार्यकर्ते

मास्तर... एकदम नवकवितेच्या अंगाने व्यक्त व्हायला लागलात? !!! जरा जपून बरं का... नवकवितेला कसलाच धरबंध नसतो आय मीन... मात्रा वृत्त गण वगैरे... तेव्हा वहावत जायचीच शक्यता जास्त. तेव्हा जपून.

बिपिन कार्यकर्ते

मास्तरांना कविता पण मस्त जमते. ;)

वेताळ

ब्रिटिश's picture

28 Dec 2009 - 8:04 pm | ब्रिटिश

भर दुपारी.... (जल्ला नातालची सूट्टी कं ?)

आतून बंद कडी घालतेस (ऊगडी कडी कशी घालाची ?)

किंचाळतोच, (बर बर)

दुपारची दंगल (तूज वय कती तू बोलतो कती ?)

आणि बाहेर बंदोबस्त. ( मंग 'हात' कडी)

खी खी खी

मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

प्रभो's picture

28 Dec 2009 - 8:29 pm | प्रभो

दादूस....__/\__

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

धमाल मुलगा's picture

28 Dec 2009 - 8:41 pm | धमाल मुलगा

मास्तरची कविता ड्येंजर तर ह्या जल्ल्या दादुसचा प्रतिसाद महा ड्येंजर!

धा मिंटं झाली दादुस, नुसता येड्यासारका हासतोय की रं मी!!!

विजुभाऊ's picture

29 Dec 2009 - 12:56 pm | विजुभाऊ

मास्तर बारामती वाल्याना कळ्ळी तुमची कविता पण जरा आमच्या सारख्य आल्पमतीवाल्याना कळेल अशी ल्ह्या की नायतर ही तुमची कविता एक्षप्लेण कर्रा तुमच्या ष्टायलीत

jaypal's picture

29 Dec 2009 - 6:55 pm | jaypal


आमस्नी येकच बंदोबस्त ठावा हाय. तुमचा कंचा बर?
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/