कडाडणार्या कडकलक्ष्मीची
खमाजातली ख्यालीखुशाली ...
गाता गळा गजरी गातो गरीब गावाच्या गजाली
घर घर घोरे घाट घन घामेजलेली
चकचकीत चमके समचा चांदीचा
छननन छमके छंद छुपा छत्रीचा
जपतच जातो जीव जुन्या जरीचा
झुणझुण झांझर झपताल झंकारी
तकक्डान्धा..तत्कारे तबला तिहाई
थुई थुई थंडीत थोडासा थरार...
दर्या दुंदुभी ...दीनवाणा दमलेला दुकानदार....
धगधगीत धवल धरेला धीर ना धरवला
नाकारीत नन्नाचा नखरा....
टकमक टवळी ....टपोरी टोपली.....
ठायी ठेगणी ठुशी ठेवली...
डमडम डमरु डोकी डावी...
ढसा ढसा ढोसूनी.... ढोली ढेरी...
ण ण ण ण ण ण गुण गुण गुण गुण...
पावसाची परी प्रियतमा
पाणवठ्यावर पदर पारुचा पडे पैलतीरी...
पाहून पल्याड प्रियतमा पावसाची परी
फार फार फसगत होई ... फुलती फुल फैरी
बनवा बनवी बत्तेस बाता...
भैरवी भुंगेरा भरजरी भाता....
मनी म्हणे मी मंदाक्रांता...
येता येथली याद...या इथे
रवंथत राहतो रानी राहुनी
लावण्यखणी लाखात... लुगडे लाल लेक .ल्याली ...
वसंतातला वारा वाहे....वस्त्रे वाजती ....वरखाली वरखाली...
शक येता शक्यतेचा शहारते शरीर शेलाटे....
संग्राम सारा सोनेरी सुवर्ण सौख्याचा..
हलके हलके हळूच हसतो.
ळळ ळळ ळळ लाळ गाळतो.
क्षज्ञांच्या यज्ञात अज्ञ बोलतो........
अवांतरः वरीलबडबडगीत मराठी वर्णमाले साठे एक उपयुक्त गमक असून ते बालभारती च्या पहिलीच्या पुस्तकासाठी वापरण्या साठी साठी तज्ञांच्या मार्गदर्शना खाली प्रयत्न करण्यात येत आहेत. ;)
नव मराठी तज्ञांसाठी मराठी वर्णमाला
क ख ग घ ङ
च छ ज झ ञ
त थ द ध न
ट ठ ड ढ ण
प फ ब भ म
य र ल व श
स ह ळ क्ष ज्ञ
;) ;) ;)
प्रतिक्रिया
22 Dec 2009 - 2:38 pm | विजुभाऊ
अर्र्...आमची प्रेरणा कोणती ते लिहायचेच राहिले की.
अर्थात तुम्ही जो अंदाज केलात तीच...***नी तैंची समग्र कविता.. ;)
22 Dec 2009 - 3:26 pm | अवलिया
श्री रा रा विजी जुजी भाजी उजी साहेब
तद्दन भिकार कविता विडंबन किंवा जे काही समजता ते.
सध्या तुम्हाला जास्त वेळ असेल आणि तो जाता जात नसेल तर कृपया संपादकपदासाठी मालकांकडे अर्ज करा. पण असले भिकार धागे काढु नका. अतिशय तळमळीने मनापासुन दिलेला हा प्रतिसाद अजिबात अवांतर नाही याची कृपया नोंद घ्यावी.
धन्यवाद.
--अवलिया
22 Dec 2009 - 3:40 pm | अवलिया
आणि हो,
ही वर्णमाला चुकली आहे. मराठीचे प्राध्यापक जास्त प्रकाश टाकतील (त्यांना माहित असेल तर )
--अवलिया
22 Dec 2009 - 3:36 pm | परिकथेतील राजकुमार
माननीय श्री. विजुभाऊ-जी,
सध्या रटाल, टूकार आणी भिषण लेखनाचा जो प्रकार मिपावर सुरु आहे त्यात आपण आपल्या परीने भर घतलीत.
येव्हडेच लिहितो आणी मी माझा प्रतिसाद संपवतो.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
22 Dec 2009 - 3:44 pm | विजुभाऊ
अवळीयाजींशी सहमत. माझे तुमच्याप्रमाणेच मत होऊ शकले असते.
प्रत्येक रचना ही उत्कृष्ट असलीच पाहिजे असा आग्रह नाही. कदाचित हीच रचना जर " लुटा लुफ्त दशकातील बडबडगेताचा" अशा किंवा संदर्भातल्या बंधनांचा भर्जरी वार" शीर्षकाने आली असती तर त्यावर तुमची प्रतिक्रीया वेगळी आली असती. असो.
आपण न वाचता च्प्रतिक्रीया दिलेली आहे अन्यथा
डमडम डमरु डोकी डावी...
ढसा ढसा ढोसूनी.... ढोली ढेरी...
या ओळी अनदेख्या झाल्या नसत्या. असो.
बरेच दिवस झाले आपण फक्त प्रतिसाद देण्याचा बडा व्यासंग करीत आहात.
22 Dec 2009 - 3:42 pm | llपुण्याचे पेशवेll
बडबडगीते हा एक परोपजीवी काव्यप्रकार आहे त्यातून आद्य मराठी कवी कु.एलिझाबेथ लोखंडी याणी ३०० वर्षापूर्वी "बाळा आवडे बडबडगीत " असे म्हणून ठेवले आहे.
बडबडगीत व्यात विनोद असतोच असे नाही. बडबडगीतकवितेतला विनोद आणि ठासणीच्या बंदुकीची दारु यात बरेच साम्य आहे . बार उडाला तर शिकार होते.अन्यथा शिकार्यावर स्वतःचीच शिकार होऊ नये म्हणून बंदूक टाकून झाडावरचढून बसण्याची पाळी येते .
वास्तावीक पहाता विजीजुजीभाजीउजी हमीच बडबडगीत लिहायचे स्तुत्य असे प्रयत्न करायच्या प्रयत्नात असतात. प्रयत्न करणे आपल्या हातात असते त्या प्रयत्नाचे फळ मिळणे आपल्या हातात नसते. माननीय विजीजुजीभाजीउजी प्रयत्न करणे सोडत नाहीत हे स्तुत्य आहे. त्यांच्या कडून बडबडगीत कसे करावे हे शिकण्यासारखे नसले तरी प्रयत्न कसे करावे हे शिकण्यासारखे आहे .
या वाक्याचे निमित्य साधून विजीजुजीभाजीउजी याणी सदाशिव पेठेच्या आसपास त्याच्या करीयर गायडन्स शिकवण्या सुरु कराव्यात अशी त्याना विनन्तीवजा विनन्ती करायला हरकत नसावी तेवढेच त्याना पुण्यात राहण्याचे भाग्य लाभेल, असो.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
22 Dec 2009 - 3:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
येवढं लांबलचक काव्य(?) वाचायचा कंटाळा आला. होतकरू संगीतकार व गायकांनी गाऊन किंवा बोलून (बडबडून) इथे इस्निप्सची क्लिप चढवल्यास ऐकता येईल (अशी आशा).
अदिती
23 Dec 2009 - 11:05 pm | कुंदन
चाल कोण लावणार?
24 Dec 2009 - 1:10 pm | प्रकाश घाटपांडे
बाप्पा विरसात चाल लावतीन ना! ;)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
22 Dec 2009 - 5:44 pm | ब्रिटिश टिंग्या
बडबडगीतांमध्ये अशा ओळी?
ढसा ढसा ढोसूनी.... ढोली ढेरी...
पाणवठ्यावर पदर पारुचा पडे पैलतीरी...
लावण्यखणी लाखात... लुगडे लाल लेक .ल्याली ...
23 Dec 2009 - 4:06 am | पाषाणभेद
भौ, प्रयत्न स्तुत्य आहे.
नव्या दशकाचे बडबडगीत असतांना बरेचसे शब्द जुन्या शतकातले आहेत. आजकालच्या पिढीला काही शब्द तर माहितही नसतील. पुर्नलेखनास बराच वाव आहे.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
23 Dec 2009 - 7:04 am | सन्जोप राव
बर्याच दिवसांनी वाचनात आलेली एक प्रतिम काव्यरचना. कडकलक्ष्मीचा खमाज ही कल्पना मराठी काव्यविश्वात क्रांतिकारी म्हणता येईल अशी आहे. त्यातून ती कडकलक्ष्मी गरीब असावी का हा प्रश्न कवीने मोठ्या सूचकतेने वाचकांवर सोपवला आहे. 'घन घामेजलेली' आणि 'समचा चांदीचा' यातल्या टंकलेखनाच्या आणि व्याकरणाच्या चुका समाजातल्या शोषित वर्गाच्या वेदनेचे प्रतिक आहेत.
'दीनवाणा दमलेला दुकानदार' हे मर्ढेकरांच्या गणपत वाण्याचे आरशातले रुप आहे, हे सूज्ञ वाचकांना सांगायला नकोच. 'ढसा ढसा ढोसूनी.... ढोली ढेरी...' यातून कवीने ढसढसणारी आत्मवेदनाच मांडली आहे. 'ण ण ण ण ण ण गुण गुण गुण गुण...' हा तर प्रतिभेचा नित्यनूतन आविष्कारच आहे. ('का पण? का पण? का पण?' हे यमक मनात डोकावून जाते) 'पाणवठ्यावर पदर पारुचा पडे पैलतीरी...' यातला मराठमोळा शृंगार मनाला हळव्या भूतकाळात घेऊन जातो. पैलतीरावर जिचा पदर पडतो ती पारु केवढी, तिचा पदर केवढा आणि तिचे... कवीच्या कल्पनाशक्तीने येथे नवी उंची (किंवा खोली) गाठली आहे असे म्हटल्यावाचून राहावत नाही.'वसंतातला वारा वाहे....वस्त्रे वाजती ....वरखाली वरखाली...' यातला धाडसी थेटपणा मनमोहक वाटतो. पारुची पुन्हा आठवण होणे अपरिहार्य वाटते. ' शक येता शक्यतेचा शहारते शरीर शेलाटे....संग्राम सारा सोनेरी सुवर्ण सौख्याचा..' यातला 'शक' हा परभाषिक शब्द लग्नाआधी घेतलेल्या सुरवारीत लग्नानंतर वर्षाभरानंतर सुटलेले पोट बसावे तसा तट्ट किंवा फिट्ट बसला आहे. की हा मराठी शक आहे? असाही शक मनात येतो. येथेही कवीच्या सूचकतेला एक टाळी दिली पाहिजे. 'शेलाटे शरीर' हा उल्लेख जाणूनबुजून गूढ ठेवला आहे. शेलाटे कोण? पारु? मग त्या पदराचे काय? आणि त्या....? कविता अशी असंख्य शक्यतांना जन्म देणारी असावी. 'सुवर्ण सौख्याचा' असला तरीही हा सोहळा नाही, तो संग्राम आहे ही जोरदार शब्दयोजना ध्यानी घ्यावी. पारुच्या कणखर बांध्याला 'संग्राम' हाच शब्द चपखल बसतो. अशा लहानलहान (किंवा मोठमोठ्या) उपमांतून कवितेचे अंतरंग खुलत जाते, फुलत जाते.' ळळ ळळ ळळ लाळ गाळतो' हे मानवी अतृप्तीचे प्रतिक आहे. इतके सगळे होऊनही लाळ गाळणे आहेच. कवीच्या वैयक्तिक आयुष्याची चिन्हे त्याच्या प्रतिभेत उमटतात ती अशी. इथे दोस्तोवस्कीची आठवण येणे अपरिहार्य आहे. 'क्षज्ञांच्या यज्ञात अज्ञ बोलतो........' यातील ऐहिकाचे पारलौकिकाशी बांधलेले सख्य पाहा. आणि त्यापुढील आठ टिंबे? ती आठच का? नऊ का नाहीत? नवरसांपैकी आपण केवळ आठच रस कवितेत आणू शकलो याबाबतची ही कवीची खंत आहे.
प्रतिभेचे धुमारे हे आपापल्या वयानुसार फुटत जातात. तरुणांना तरुणांची प्रणयगीते सुचतात, वृद्धांना 'लागले नेत्र रे पैलतिरी' असे सुचते. प्रस्तुत कविता हेच अधोरेखित करते, असे वाटते.
अशा लखलखीत काव्याचे साहित्यिक मूल्य मिसळपाववरील तथाकथित रसिकांना समजू नये, हे या कवितेचे, कवीचे, मिसळपावचे आणि आमचे दुर्दैव!
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
23 Dec 2009 - 7:52 am | पाषाणभेद
बर्याच दिवसांनी वाचनात आलेली एक अप्रतिम प्रतिक्रीया. प्रतिक्रियेबाबतच बोलायचे झाल्यास : अतिशय संयमीत पण एका मुक्त चौकटीत बंदिस्त असणारी प्रतिक्रीया. विस्त्र्रृत सामयोजीत शब्दभांडार. योग्य अर्थमुलक गाभा उकलून दाखवण्याची हातोटी. कवितेचे परिक्षण करणार्या समिक्षकास म्हणजेच सन्जोप रावांना प्रस्तुत कविचे मन चांगलेच उमगलेले आहे. कविता समजून घेतांना समिक्षकाने दाखवलेले धैर्य कौतुकास्पद आहे. आम्हास तर ते खिंडीत लढणारे बाजी सारखेच भासतात. या कारणे त्यांवर, त्यांच्या मनावर कितीक वार पडले असतील तेच जाणो. कविता वाचून मनात अनेक उद्भवलेले प्रश्नांना त्यांनी या प्रतिक्रीयेद्वारे वाचा फोडली आहे. कविचा सन्मान हा आपलाच सन्मान आहे असे या कालात समजणारे कितीक असतात? अगदी थोडे किंबहूना नव्हेच. असे असतांना सन्जोप राव म्हणजे एका अज्ञानाच्या गुहेत तेवणारा दिवाच आहे. असे म्हणतात की कवि/ लेखक समिक्षक होवू शकतो पण समिक्षक कवि / लेखक होवू शकत नाही. परमेश्वर आपणास कविसारखा कवि होवू देवो ही सदिच्छा व त्या सदिच्छेसाठी आपणास सुभेच्छा व आपणास ह्या सुभेच्छा मिळाल्याबद्दल अभिनंदन. आपण आमचे आभार मानणारच आहात म्हणून आधीच धन्यवाद. आमच्या लेखनात काही उणीव भासल्यास माफी असावी व त्या साठी आमची बुद्धी कारणीभुत असावी.
कळावे, कुशल, क्षेम वर्तमान कळविण्याची तोशीश जारी करावी. लगोलग टपालाने उत्तराची आपेक्षा ठेवीत आहे.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
23 Dec 2009 - 10:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हा हा हा हा ... या अशा परीक्षणांसाठीतरी विजुभाऊंनी आणखी दोन-चार कविता(!) लगे हाथ पाडाव्यात अशी त्यांना नम्र विनंती.
अदिती
23 Dec 2009 - 10:12 pm | धमाल मुलगा
लाजवाब प्रतिसाद!!!
23 Dec 2009 - 10:20 pm | चतुरंग
'केतकी पिवळी पिडली' च्या स.त. कुडचेडकरांनंतर एकदम आमचे विजुभाऊच! ;)
(पांढरा फटक्क)चतुरंग
24 Dec 2009 - 10:53 am | श्रावण मोडक
किती हवीत तेवढी अधिक चिन्हे इथं लावतो. असे बरेच साहित्य सध्या येथे आहे. होऊन जाऊ द्या समीक्षा!!!
25 Dec 2009 - 3:30 pm | बिपिन कार्यकर्ते
रावसाहेब, जियो!!! मार डाला. असले प्रतिसाद वाचायला मिळणार असतील तर असे धागे वारंवार यावेत !!!
बिपिन कार्यकर्ते
23 Dec 2009 - 10:50 pm | निमीत्त मात्र
फारच छान प्रतिसाद! तुमच्या ह्या प्रतिसादात मुक्तसुनित दिसले. सध्या इथे ते दिसत नाहीत तुमच्या प्रतिसादात दिसले. जियो..!! *
*सरपंचांकडून साभार
24 Dec 2009 - 10:09 am | सन्जोप राव
विभावरीचा आवाज डोकीवर पदर घेऊन येतो असे चित्त यांनी म्हटल्यावर हे तंतोतंत जी.एंसारखे आहे, असे मी म्हटले होते. त्यावर एका सावधचित्त टीकाकारांने 'चित्त यांचे लिखाण चित्त यांच्या लिखाणासारखे आहे, असे म्हणा, उगीच जीएफिएंशी तुलना नको' असे मला फटकारले होते. ते आठवले.
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
25 Dec 2009 - 10:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'पाणवठ्यावर पदर पारुचा पडे पैलतीरी...' यातला मराठमोळा शृंगार मनाला हळव्या भूतकाळात घेऊन जातो. पैलतीरावर जिचा पदर पडतो ती पारु केवढी, तिचा पदर केवढा आणि तिचे...
आणि
कवीच्या कल्पनाशक्तीने येथे नवी उंची (किंवा खोली) गाठली आहे
मेलो. ! [डोळ्यापुढे चित्र तरळले] =))
अवांतर : नाताळाच्या सुटीचे औचित्य साधून कौतुक करण्याची सूट घेतली आहे.
-दिलीप बिरुटे
24 Dec 2009 - 4:25 pm | ब्रिटिश
गुरुमावली न त्यांचा शीश्य दोगव लय भारी.
कवीसमराट 'सतिश' यांची आटवन झाली
डोल पानावल, डोस्क फुटल, जीब जड जाली, पाय लटाटल आनी काय काय जाल राव.
मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
25 Dec 2009 - 2:03 pm | वेताळ
वरील बडबडगीत जर पोरांना म्हणायला दिले तर पोरं कायमची बोबडी होण्याची अधिक शक्यता वाटते.अन त्याचे आईबाप कायमचे बहिरे होतील.
सदर बडबडगीत अत्यंत धोकादायक आहे.
वेताळ
25 Dec 2009 - 6:10 pm | शशिकांत ओक
विजूभाऊ...
श्री. हैयोहैयैयोंनी तमिळमधील वर्णमालेवरील बालकाव्य मराठी लोकांना सांगून-लिहून वाहवाही मिळवल्यानंतर मराठीत तसाच प्रयत्न करावा असे वाटून प्रेरणेने केलेले काव्य वा बडबडगीत गाऊन कळत न कळत समाजशास्त्राच्या काही शिकवणी त्यातून अंगवळणी पडण्याचा तो स्तुत्य प्रयोग होता. पैकी या बडबडगीताने काहीच न साधलेले काव्य फुकट गेलेले वाटकांना वाटले तर नवल नाही. तथापि विजु भाऊ आपण पुन्हा प्रयत्न करायला हरकत नाही.
नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत
26 Dec 2009 - 8:43 am | विनायक प्रभू
हवे असल्यास उगाच वाळुचे कण रगडण्यात वेळ घालवु नये.