लुटा लुफ्त सज्जनगड (सातारा) सफरीची....

दशानन's picture
दशानन in कलादालन
22 Dec 2009 - 12:48 pm

तुम्ही फोटोवर क्लिक करुन मोठा फोटो पाहू शकता. त्याआधी तुमचा पॉप-अप ब्लॉकर बंद करा. धन्यवाद.

प्रवास

प्रतिक्रिया

पांथस्थ's picture

22 Dec 2009 - 12:56 pm | पांथस्थ

राजे तुम्ही एकदम पायाला भिंगरी लागल्यागत सुटलात की...जोरदार भटकंती चालु आहे....

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

विनायक प्रभू's picture

22 Dec 2009 - 12:59 pm | विनायक प्रभू

असेच म्हणतो.
अवांतरः पोटापाण्याचे काय?

दशानन's picture

22 Dec 2009 - 1:03 pm | दशानन

सोमवार ते शुक्रवार काम.

बाकी शनीवार्-रवीवार भटकंती.

मार्केट स्टेबल आहे तो पर्यंत ;)

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

विनायक प्रभू's picture

22 Dec 2009 - 1:00 pm | विनायक प्रभू

असेच म्हणतो.
अवांतरः पोटापाण्याचे काय?

sneharani's picture

22 Dec 2009 - 1:05 pm | sneharani

फोटो एकदम अप्रतिम!

jaypal's picture

22 Dec 2009 - 1:08 pm | jaypal

राजेजी सा.न.वि.वि.
सर्व फोटो अप्रतिम आहेत. विश्वास बसत नाही की हे सर्व फोटो मोबाईल कॅमे-यातुन काढले आहेत.
एका उद्विग्न प्रतीसादात आपण म्हणाला होतात की, मिपा वर लिहावे की नको विचार करत आहे. म्हणुनच साज्जनगडचे प्रवास वर्णन टाळले नाहित ना?
असा त्रागा करु नका. सदर धाग्यावर थोड वर्णन देखिल येउद्या.
सज्जनगडावर चिंतन,मनन केलत की नाही? ते देखिल कळवा.
आपणास मनःशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

अमोल केळकर's picture

22 Dec 2009 - 1:22 pm | अमोल केळकर

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

टारझन's picture

22 Dec 2009 - 1:08 pm | टारझन

राजे ... टायटल आवडले ... फोटो ही आवडले ..
पण बाकी मॅटर मात्र एकदम तद्दन फालतु !! एक नंबर फालतु !

- बसा चोळत

माधुरी दिक्षित's picture

22 Dec 2009 - 1:28 pm | माधुरी दिक्षित

मोबाईल कोणता आहे हो राजे :?

विजुभाऊ's picture

22 Dec 2009 - 1:28 pm | विजुभाऊ

राजे सज्जन गडाच्या पायथ्याला ( पायर्‍याच्या रस्त्याने) परळी गावातून थोडेसे पुढे गेले की एक शिव मंदीर आहे.तेथील मैथून शिल्पे पाहण्यासारखी आहेत. तेथे गेला होतात का? की नुस्तेच फटफटीवरून गडावर गेलात?
सज्जन गडाच्या रस्त्यावरून पुढे गेलो की ठोसेघर धबदबा आहे.
चाळकेवाडी ला पवनचक्क्या पाहण्यासारखे आहेत

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Dec 2009 - 3:25 pm | llपुण्याचे पेशवेll

ये हुवी ना बातवाली बात! ओषो महर्षी म्हणायचे नेहमी बातवाली बात करो. राजे प्रकाशचित्रांसोबत माहीती मिळाली असती तर अजून मझा आला असता. असो.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

दशानन's picture

22 Dec 2009 - 2:47 pm | दशानन

अहो मी जरा चुकीच्यावेळी पोहचलो गडावर त्यामुळे गड फिरुन बाहेर येउ पर्यंत अंधार पडला होता त्यामुळे नॉनस्टॉप सातारा गाठले... तरी रात्रीचे ८-९ वाजलेच पोहचायला.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

परिकथेतील राजकुमार's picture

22 Dec 2009 - 2:00 pm | परिकथेतील राजकुमार

माननीय श्री. राजे-जी आपण आश्वासन दिल्याप्रमाणे लेखणी म्यान केलीत त्याबद्दल धन्यवाद. आता मिपाकरांवरील अत्याचार काहि प्रमाणात कमी होतील.

नुसते फोटो न टाकता त्याखाली फोटोंची माहिती लिहिली असती तर ज्ञानात अजुन भर पडली असती. परंतु एकुणच आपल्या लेखणीचा आवाका बघता चुकीचीच माहिती जास्ती मिळाली असती असे वाटुन गेले.

असो..

हा प्रतिसाद आपल्याला 'नामोहरम' करण्यास लिहिला आहे असे समजु नये. तसेच पुढील प्रवासाच्या वेळेस स्वतःच्या मोबाईलची सोय करावी, दरवेळेस माझा मोबाईल ताबडु नये.

कळावे...

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

दशानन's picture

22 Dec 2009 - 2:05 pm | दशानन

माननीय श्री. राजे-जी आपण आश्वासन दिल्याप्रमाणे लेखणी म्यान केलीत त्याबद्दल धन्यवाद. आता मिपाकरांवरील अत्याचार काहि प्रमाणात कमी होतील.

वाटलेच होते तुमचा खवट प्रतिसाद कसा नाही आला अजून.

नुसते फोटो न टाकता त्याखाली फोटोंची माहिती लिहिली असती तर ज्ञानात अजुन भर पडली असती. परंतु एकुणच आपल्या लेखणीचा आवाका बघता चुकीचीच माहिती जास्ती मिळाली असती असे वाटुन गेले.

तुमच्या सारख्या नतद्रष्ट व्यक्तीमुळे मिपावर एका चांगल्या प्रवास वर्णनाला मुकले आहेत ह्याची तुम्ही काहीच तमा बाळगत नाही असे पुन्हा स्पष्ट झाले.

असो..

हा प्रतिसाद आपल्याला 'नामोहरम' करण्यास लिहिला आहे असे समजु नये. तसेच पुढील प्रवासाच्या वेळेस स्वतःच्या मोबाईलची सोय करावी, दरवेळेस माझा मोबाईल ताबडु नये.

कळावे...

तुमचा मोबाईल ???
तुम्ही आजपर्यंत मोबाईल विकत घेतला आहे का कधी ?
आमच्याच कार्डवरुन महागडे मोबाईल घेता व मित्रांना आपलाच म्हणून दाखवता वर मला म्हणता... वाह वाह !

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

अवलिया's picture

22 Dec 2009 - 2:04 pm | अवलिया

श्री रा रा राजेजीसाहेबजी

तद्दन बकवास आणि फालतु. फोटो कुठले आहेत कशाचे आहेत याची नीट माहिती द्यायला नको ? सगळे जर हुशार असते आणि समंजस असते तर संपादक झाले नसते का ? संपादकांची गरजच पडली नसती. आपल्याला येवढं साधं समजु नये याचे आश्चर्य वाटते. असो.

आजकाल आंतरजालावर कोण कोण कुठुन येते आणि लोकांच्या चांगल्याच प्रतिक्रिया याव्यात अशी अपेक्षा करते त्यांच्याच मंडळात तुम्ही दाखल झाले हे पाहुन मनाला यातना झाल्या.

अजुनही वेळ गेलेली नाही, सु ध रा !!!

धन्यवाद.

--अवलिया

दशानन's picture

22 Dec 2009 - 2:07 pm | दशानन

हे तुमचे चाम्गले आहे...
लिहले तरी बोंबलता..
नाही लिहले तरी बोंबलता...

:|

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

अवलिया's picture

22 Dec 2009 - 2:20 pm | अवलिया

श्री रा रा राजेजीसाहेब

तुम्ही कधी मोठे होणार ? मी फार चिंतेत आहे.
छ्या ! तुम्ही फारच बालिश आहात ब्वा !

--अवलिया

विजुभाऊ's picture

22 Dec 2009 - 3:18 pm | विजुभाऊ

अवांतर प्रतिक्रीयांसाठी पैशे खर्च करून खरडफळ्याची व्यानी ची खरडवहीची सोय केलेली आहे याची नोंद घ्यावी. अशी विनन्ती. मिपाच्या सर्वसामान्य सदस्यांकडून येत आहे .

प्रसन्न केसकर's picture

22 Dec 2009 - 3:21 pm | प्रसन्न केसकर

एकतर अश्या मराठी इतिहासातल्या महत्वाच्या स्थळाबद्दल तुम्ही काहीच लिहिले नाही. किमान ब्लॉगवर लेख लिहुन लिंक तरी डकवायची होती.

दशानन's picture

22 Dec 2009 - 3:47 pm | दशानन

बरं,

लिहतो.
मला देखील ह्यावर लिहणे आवडेल.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

टारझन's picture

22 Dec 2009 - 4:20 pm | टारझन

गुगले मॅप कुठाय ?

- जीमेल ऑर्कुट गुगले

दशानन's picture

22 Dec 2009 - 11:18 pm | दशानन

दुनिया घेऊन येते आपला धागावर.... ह्याना त्या कारणाने आम्हीच स्वतःच धागावर रहावा ह्या इच्छेने हा प्रतिसाद टाकतो.
उगाच ताकाला जायचे तर भांडे का लपवा ;)

असो,

प्रतिसाद द्या.

=))

©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Dec 2009 - 11:11 am | llपुण्याचे पेशवेll

उगाच ताकाला जायचे तर भांडे का लपवा
राजेंच्या मराठीत आणि शुद्धलेखनात अभूतपूर्व सुधारणा दिसून येत आहे.
पण हे स्थान आहे का राजाला मराठी आणि शुद्धलेखनाबद्दल शाबासकी देण्याचं..
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

सुहास's picture

22 Dec 2009 - 11:43 pm | सुहास

छान फोटो..!

अवांतर: आपण पुण्याजवळ मुक्कामी आलात हे वाचून आनंद झाला.. :)

--सुहास

विकास's picture

23 Dec 2009 - 12:12 am | विकास

फोटो चांगले आले आहेत पण "गोडी अपूर्णतेची..." सारखे काहीसे झाले आहे. आठवणीप्रमाणे आवारात अजून पण फोटो काढण्यासारखे बरेच काही आहे त्याचे फोटो पण काढले असते तर छान झाले असते.

बाकी साक्षात राजे गडावर जातात आणि त्याबद्दलचे वर्णन न सांगता केवळ छायाचित्रेच दाखवतात हे पण अपूर्ण वाटायचे कारण आहेच. :-(

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

स्वप्निल..'s picture

23 Dec 2009 - 12:43 am | स्वप्निल..

>>बाकी साक्षात राजे गडावर जातात आणि त्याबद्दलचे वर्णन न सांगता केवळ छायाचित्रेच दाखवतात हे पण अपूर्ण वाटायचे कारण आहेच.

असेच म्हणतो :(

संजय अभ्यंकर's picture

23 Dec 2009 - 9:51 pm | संजय अभ्यंकर

वर्णनही लिहा!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

पर्नल नेने मराठे's picture

24 Dec 2009 - 11:35 am | पर्नल नेने मराठे

8| राजे हे काय आइक्तोय आम्ही......कोण आहे रे तिकडे ,....राजे ह्याना टकमक पोईन्ट वरुन ढकलुन द्या.

चुचु

दशानन's picture

24 Dec 2009 - 11:52 am | दशानन

पुरावे : -

Photo information
१.
माझ्या मोबाईल कॅमेराची खालील प्रमाणे इंन्फो जी प्रत्येक फोटो मध्ये आपोआप स्टोर होते.

Dec 19, 2009
1600×1200 pixels – 288KB
Filename: Photo0707.jpg
Camera: Samsung
Model: GT-S5233W
ISO: 100
Exposure: 1/33 sec
Aperture: 2.8
Focal Length: 3.6mm
Flash Used: No
Latitude: n/a
Longitude: n/a

२. सातारामधील लॉज मालक + गेस्टबुक रजीस्टर.
३. सज्जनगडवरील पंडित / शिक्षक ज्यांच्याकडून माहीती घेतली.
४. सज्जनगडावरील पार्किंगवरील हॉटेल जेथे जेवण केले होते व त्यांच्याकडून गडाची माहीती घेतली होती.
५. माझ्या फोनमध्ये / लॅपटॉपमध्ये असलेले फोटो व फोटो बॅक-अप.
६. सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील बाईक रिपेअरी करणारा व्यक्ती ज्यांने बाईक चे हेड-लाईट सेट करुन दिले अंधार झाला म्हणून.
७. काही मिपा सदस्य ज्यांच्याशी गडासंबधी बोललो होतो फोनवरुन.
८. जास्तच पुराव्याची गरज असेल तर मोबाईल नेटवर्क असेस चा विदा मोबाईल कंपनी कडून मिळवता येतो ( पण आधी मला एक पोलिस केस रजिस्टर करावी लागेल, वादी-प्रतिवादी कोण ते कोण हे सर्वांना माहीत आहेच. )

©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©

शाहरुख's picture

24 Dec 2009 - 12:08 pm | शाहरुख

राजे-जी, आपल्या छायाचित्रण कौशल्याबद्दल किंवा ही छायाचित्रे आपल्या मालकी हक्काची आहेत याबद्दल आम्हास तिळमात्रही शंका नाही पण आपण दिलेल्या पुराव्यांपैकी एकही पुरावा असे सिद्ध करु शकत नाही ही छायाचित्रे आपण काढली आहेत..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Dec 2009 - 12:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

क. शाहरूख यांच्याशी सहमत आहे. सौ. राजे, आतातरी अंमळ बरे पुरावे द्या.*

अदिती

*(क= कवी; सौ हे सौभाग्यवती आणि सौचुहेखाकेबील्लीचलीहजको असे दोघांसाठी वापरतात. कॄ ह्याला शब्दछल म्हणू नये. खुलासा संपला, सहकार्याबद्दल धन्यवाद.)

प्रसन्न केसकर's picture

24 Dec 2009 - 5:29 pm | प्रसन्न केसकर

याबाबत मी साक्ष देऊ शकतो. मी स्वतःच राजेना ट्रिप प्लॅन करण्यात मदत केली होती अन ते सज्जनगडावर असताना आमचे फोनवर बोलणेही झाले होते. म्हसवे हे ठिकाण तर कुणाला माहिती देखिल नाही. त्याचे फोटो जालावर येणे हाच राजेंच्या त्या भागातल्या भटकंतीचा सबळ पुरावा आहे.

खोडसाळ खरड काढुन श्री राजे यांना न्याय दिल्याबद्दल संपादकांचे आभार.

दशानन's picture

24 Dec 2009 - 1:16 pm | दशानन

ओके ओके.

श्री. अदिती -जी,

आम्ही पुढे जे फोटो खेचु त्यात आमचे थोबाड येण्याची व्यवस्था करतो, जेणे करुन पुरावा देणे लागू नये.

धन्यवाद.

©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©

jaypal's picture

24 Dec 2009 - 4:55 pm | jaypal

सबुरीन घ्या. मन शांत ठेवा आणि कॅमेरा घेऊन लढा. आप्ल्याला शुभेच्छा. ;-)

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

विजुभाऊ's picture

24 Dec 2009 - 5:10 pm | विजुभाऊ

जे फोटो खेचु त्यात आमचे थोबाड येण्याची व्यवस्था करतो,
शंका: तुमच्या थोबाडाच्या फोटोत येण्यामुळे तो फोटो तुम्ही काढलेला नाही हे निश्चित होईल हे नक्की.
अवांतरः लोकाना तुम्ही ज्या ठीकाणी गेलात त्या ठीकाणचे फोटो हवे असतात.

jaypal's picture

24 Dec 2009 - 6:18 pm | jaypal


***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
जयेंद्र पाटील. मुळगाव=बेडग, ता. मिरज , जि.सांगली सध्या वास्तव्य श्रीस्थानक (ठाणे)

आता मात्र राजेंनी काढलेली छायाचित्रे त्याची स्वःताचीच आहेत हे अगदी चंद्रप्रकाशा इतके स्वच्छ झाले आहे.त्यामुळे आम्हास राजेंबद्दल असलेला आदर अजुनच व्दिगुणित झाला आहे.राजेंवर आम्ही जे काही खोडसाळ आरोप केले त्याबद्दल आता वैषम्य वाटत आहे.
बाकी छायाचित्रे अगदीच अप्रतिम असले मुळे राजेंवर आरोप झाले असावेत असे राहुन राहुन वाटते. ही खरी तर राजेंच्या छायाचित्रण कलेला मिळालेली दाद आहे.

वेताळ

धमाल मुलगा's picture

24 Dec 2009 - 6:47 pm | धमाल मुलगा

क्या बात है!

वेताळराव,
तुमच्या दिलदारपणाचं आणि मोठ्या मनाचं कौतुक वाटते.

विकास's picture

24 Dec 2009 - 8:09 pm | विकास

हा धागा वास्तवीक "सज्जन"गडा संदर्भात आहे त्यामुळे त्याचे वैशिष्ठ्य हे त्या नावाला साजेसे राहीले तर चांगले वाटेल. पण अचानक मला लहानपणी वाचत असलेल्या चांदोबा या मासिकाची आठवण झाली. त्यात जसा विक्रमादित्य हट्ट सोडत नसल्याच्या गोष्टी प्रत्येक अंकात असायच्या तसेच येथे होताना दिसत आहे. ;) एकदा प्रतिसादकर्ते विक्रमादित्य होत आहेत तर एकदा संपादक :) त्याला आता मर्यादा घालण्याचे दोनच पर्याय आहेत - एक विषयपरत मूळ पदावर (सज्जनगड, छायाचित्रे, सातारा आदी) आणून लिहीणे अथवा हा धागा वाचनमात्र करणे.

माझी अवस्था आता अर्जूनासारखी झाली आहे, किंकर्तव्यमूढ (नुसताच मूढ नाही!): तसा मूळचा परळी-सज्जनगडचा रहीवासी असल्याने हा धागा चालू रहावा असे वाटते पण संपादक असल्याने उलट वाटत आहे. दोन्ही बाजूनी conflict of interest... काय करावे :?

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

आनंदयात्री's picture

30 Dec 2009 - 1:26 am | आनंदयात्री

:)

मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"