दुरावा

जयवी's picture
जयवी in जे न देखे रवी...
16 Dec 2009 - 2:10 pm

देतोस का उजाळा
त्या धुंद आठवांना
होतोस काय हळवा
स्पर्शून आठवांना

ती एकली दुपार
तो प्रश्न कापरासा
ती खूपशी कबुली
इन्कार ही जरासा

झाल्या मग अचानक
सांजा अजून कातर
अवघडले होते जगणे
विरहातले निरंतर

तैसाच चंद्र अर्धा
दोघांत वाटलेला
त्या पौर्णिमेत अजूनी
तू मुक्त सांडलेला

आहे तसा शहाणा
अपुला जरी दुरावा
आतून पेट घेतो
कधी तोच रे दुरावा

जयश्री अंबासकर

शृंगारप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

अवलिया's picture

16 Dec 2009 - 2:12 pm | अवलिया

माननीय जयवीजी

चांगली रचना.

ती एकली दुपार
तो प्रश्न कापरासा
ती खूपशी कबुली
इन्कार ही जरासा

इन्कार या शब्दाऐवजी नकार हा शब्द चालला असता का याचा विचार करत आहे.

धन्यवाद !

--अवलिया

श्रावण मोडक's picture

16 Dec 2009 - 2:25 pm | श्रावण मोडक

आवडली!!!

दशानन's picture

16 Dec 2009 - 2:45 pm | दशानन

श्रावण मोडक -जी,

+ १

मी देखील असेच म्हणतो.

धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

विशाल कुलकर्णी's picture

16 Dec 2009 - 4:09 pm | विशाल कुलकर्णी

श्री श्री श्री अवलिया'जी', श्रामो'जी' आणि राजे'जीं' शी आम्ही पण सहमत 'जी' ! धन्यवाद.

अवांतर : जयुताई सुंदर कविता. :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

फ्रॅक्चर बंड्या's picture

16 Dec 2009 - 7:10 pm | फ्रॅक्चर बंड्या

मस्त कविता

binarybandya™

अनामिक's picture

16 Dec 2009 - 7:35 pm | अनामिक

सुंदर कविता. आवडली!

-अनामिक

भानस's picture

17 Dec 2009 - 1:58 am | भानस

जयश्री कविता आवडली!
विशेषतः
' आतून पेट घेतो
कधी तोच रे दुरावा '.... सहीच.

प्राजु's picture

17 Dec 2009 - 8:18 am | प्राजु

सुंदर!!
तैसाच चंद्र अर्धा
दोघांत वाटलेला

संदर आहे ही कल्पना!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

चतुरंग's picture

17 Dec 2009 - 5:20 pm | चतुरंग

अर्धा चंद्र - छान कल्पना!
(आम्हाला कविता आवडल्याचा पुरावा इथेही आहे! ;) )

चतुरंग

जयवी's picture

13 Jan 2010 - 3:09 pm | जयवी

मनापासून धन्यवाद :)

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Jan 2010 - 3:46 pm | बिपिन कार्यकर्ते

सुंदर. सगळीच कडवी आवडली. अर्थपूर्ण.

बिपिन कार्यकर्ते

प्रशांत उदय मनोहर's picture

13 Jan 2010 - 5:02 pm | प्रशांत उदय मनोहर

तैसाच चंद्र अर्धा
दोघांत वाटलेला
त्या पौर्णिमेत अजूनी
तू मुक्त सांडलेला

क्या बात है! सहीऽऽ!

आपला,
(वाचक) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

शुचि's picture

8 Feb 2010 - 1:05 am | शुचि

काय सुंदर कविता आहे वा!!
खल्लास!!!!!
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)