सूत्रधार :-
सळसळ नागावानी डौलदार चाल हिची
झळझळ सोन्यावानी झळकते काया हिची ..
खाण रुपाची, नार गुणाची , कुण्या गावची,
कुण्या रावाची, कुण्या नावाची, ही नार कोण ...
गुलाब मोगरा शेवंतीला , तुझा चेहरा हाय भारी
रूप देखणं, चतुर बोलणं , लाखा मधे तू भारी
नटी :
मी नार लई भारी ,
गार होती बघणारी
माझी कीरत ही न्यारी ,
माझी प्रीत तुम्हावरी----
अहो पाव्हनं ...
अहो पाव्हनं ...
अहो पाव्हनं,
अंमळ घ्या विसावा ,
विडा हातून,
माझ्या हा घ्यावा ..
बघा सांज, ही येई दाटून ,
हूर हूर, मनात भरून,
अश्या वेळी, कशाला दुरावा
विडा हातून, माझ्या हा घ्यावा ..
शिणगार,
माझा हा पहावा,
संगतीत ,
शीण घालवावा,
चंद्रापार, मला फिरवून,
ओंजळीत, तारे भरून ,
तुम्ही मला, गजरा माळावा ,
विडा हातून, माझ्या हा घ्यावा ..
आज आला,
जीवाचा हा रावा ,
नित रोज ,
मला हा भेटावा ..
काय करू , प्रीत ही वेडी ,
कशी सरते, ही रात ही थोडी
मावळतीचा , हा चंद्र थांबवावा ..
विडा हातून, माझ्या हा घ्यावा ..
हो .. विडा हातून, माझ्या हा घ्यावा ..
-- सागर लहरी १२.१२.२००९
प्रतिक्रिया
12 Dec 2009 - 8:40 pm | संजा
सुंदर लावणी ! आपले कोतुक करावेसे वाटते.
13 Dec 2009 - 2:53 am | सौरभ.बोंगाळे
अप्रतिम... उत्कॄष्ट
13 Dec 2009 - 7:39 pm | पाषाणभेद
नटः
दे ग दे ग साजणे विडा तुझ्या हातून
हुरळला जीव ह्यो, येळ लावीसी काहून?
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
नटखट पासानभेद बिहारी
13 Dec 2009 - 9:50 pm | jaypal
एक विनंती आहे
प्रमोदकाकांनी चाल लावावी, तात्याने ते गावं आणि हे सर्व तुनळीवर पाहुन मगच मी डोळे मिटावेत. (तल्लीन होउन ऐकण्यासाठी उगाच भलते सलते विचार मनात आणु नका). मग माझ्या आनंदसागराला उधाण आल्या शिवाय राहणार नाही.
13 Dec 2009 - 11:08 pm | प्रमोद देव
भलताच हट्ट दिसतोय.तात्या ऐकतो आहेस काय?
हल्ली कुणाला काय डोहाळे लागतात ते. ;)