प्राजूताईच्या सुंदर कवितेचे विडंबन तितकेच च्यालेंजिंग म्हणूनच ते आव्हान घ्यायला आवडते.
खरे म्हणजे हे विडंबन नव्हे -
अवघड सुत्रे, यम्म थ्रीतील
सांगती हे प्रोफेसर काळे
इंटीग्रेशन अन कॅल्कुलस
जाती डोक्यावर सगळे
एक्झामच्या गं बिकट दिवसा
अभ्यासाचे वाजले दिवाळे
बेंचवरच आता लिहून ठेवीन
येत नसे ते जे सगळे
जात पस्तिशी पुढे मजला
प्रवेश तिसऱ्या वर्षात मिळे
आई म्हणते, ’छान हो बाळा’
बाबांना मात्र कळते सगळे
बद्द वाजलेले नाणे माझे मग
खणखणीत वाजे गं साजणे
राहिले दोनच वर्षे आता गं
होतील क्लियर विषय सगळे
पहा जमतो का तुलाही
डिप्लोमा तरी कमीतकमी
आई नाहीतर हरकत घेईन
उधळेल स्वप्न आपले सगळे