प्रेरणा अन माफी- मुळकविंची!
कामांना घरातल्या पटापट उरकत जा ना
बैलोबा नुसता; म्हणे नवऱ्याचा दर्जा द्या ना..!!
सवलती मला दे की, चालते भुणभूण रोज ती
तीच ती कारणे अन त्याच त्या फुसक्या गर्जना..
निस्तरतांना थकते मी चुका तुझ्या पुन्हा पुन्हा
करते का हे सहन मी हेच मला समजेना..
काय रे ते निर्वाणाचे बोललास काय नेमके
होणार नाही दुःख मला, तुला बाहेर काढतांना...
बोच दुखरी आहे तरी मनाला माझ्याही
ठोंब्या असला तरी नवराच माझा आहेसना..
एऽऽ, दुपारी थोडीशी विश्रांती तू घेशील ना
कामाला त्या नंतरच्या ताकद तर हवीना..
सुटकेची ती स्वप्ने पाहतोसच तू कशाला
व्यर्थ आहेत ती बरे, गाठ माझ्याशी आहेना..!
प्रतिक्रिया
25 Nov 2009 - 12:42 pm | पर्नल नेने मराठे
बोच मनाला आहे तरी मनाला माझ्याही
ठोंब्या असला तरी नवराच माझा आहेसना..
=))
चुचु
25 Nov 2009 - 5:18 pm | अमृतांजन
बोच मनाला आहे तरी मनाला माझ्याही
वरील ओळीतील टंकदोष काढला आहे- दोनदा "मनाला" येत होते.
बोच दुखरी आहे....
25 Nov 2009 - 12:50 pm | लवंगी
सुटकेची ती स्वप्ने पाहतोसच तू कशाला
व्यर्थ आहेत ती बरे, गाठ माझ्याशी आहेना..!
:>
25 Nov 2009 - 1:12 pm | jaypal
****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
25 Nov 2009 - 1:26 pm | अमृतांजन
जैपालजी, तुमचे इतरही प्रतिसाद पाहिले. तुम्ही चित्रांचा वापर केल्यामुळे, तुमचे प्रतिसाद फारच बोलके होतात. [आणि कोणाला टिकाही करता येत नाही]
25 Nov 2009 - 1:34 pm | गणपा
जयप्या लेका सही चित्रं शोधतोस रे पटकन..
- एक गाढव
25 Nov 2009 - 5:59 pm | धमाल मुलगा
लै वेळा सहमत आहे.
-दुसरा गाढव.
:T :T :T
अहो, हापिसातही भिती वाटायला लागली ना.... :(
-(एक बिच्चारा नवरा) ध.
25 Nov 2009 - 1:37 pm | गणपा
बायकोला आश्या कवितांपासुन दुर ठेवाव म्हणतो.
-एक बैल
25 Nov 2009 - 1:50 pm | अमृतांजन
आलरेडा (डी) बैल असल्यावं काम्हून लपविता ह्या कवितेला बायकोपासून? :-)
25 Nov 2009 - 4:43 pm | सूहास (not verified)
लपवाछपवी खेळायला मजा येते !!
सू हा स...
3 Jan 2010 - 12:41 pm | अमृतांजन
>>लपवाछपवी खेळायला मजा येते !!>>>
डोस्क्यात शिरलं न्हाय! काय सागायचं हाये तुम्हास्नी.
3 Jan 2010 - 1:01 pm | विनायक प्रभू
झाला ब्वॉ एकदाचा.
3 Jan 2010 - 1:27 pm | अमृतांजन
कशाचा?