काहि नाटके व आठवणी..
आचार्य.....नावांचे नाटक आचार्य अत्रे यांच्या विरोधात लिहिले गेले आहे अशी कुणकुण लागली होति..नक्कि आठवत नाहि पण पहिला हिंवा दुसराच प्रयोग असेल..भरत नाट्य मंदिरला प्रयोग होता.. मी अत्र्यांचा चहाता होतो..त्या मुळे नाटकात इंटरेस्ट होता..डॉ.लागु नाटक लिहिल्या नंतर अत्र्यांवर खुप टिका झाली होति..नाव घेवुन नाटक लिहिल्याने त्या व्यक्तिचि बदनामी होते असा सुर लागला होता..नाटकास फारशी गर्दी नव्हति..आचार्य नावाचा एक नायक ज्याचि व्यक्तिरेखा अत्रे यांच्यावरच बेतली होति..नाटकात अत्रे याचे झालेले वाद याचि चर्चा होति..त्यांच्या दारु पिण्याची टवाळकी होति..शेवटी लागु,बांदोडकर यांचे चेहेरे आचार्यांच्या अंतकालात त्यांना घाबरवतात.व त्यांना आपल्या पापांचि जाणीव होते असे प्रसंग होते..नाटक अगदी टुकार होते..संवाद व संहिता बेताचि होति..लोकांनी मधे बराच आरडा ओरडा पण केला होता..कदाचित मी अत्र्यांचा चहाता असल्याने मला संवाद टुकार वाटले असतिल....आचार्य ह्या मध्य वर्ति व्यक्तिरेखेच काम दिनानाथ टाकळकरांनी केले होते..गंमत म्हणजे नाटकाचा लेखक व दिग्दर्शक कोण हे कुठेच लिहिले नव्हते..कोणी असेल लिहिले नाटक? खुप जानण्याचा प्रयत्न केला ...पण कळायला मार्ग नव्हता...नाटक २ प्रयोगा नंतर उडाले..मी पण विसरलो...पुढे कामाच्या नादात नाटकांचा नाद हि कमी झाला होता....एक दिवशी असाच बादशाहितली मिसळ खावुन पेरुगेटाकडे जात असताना दिनानाथ टाकळकरांचि गाठ पडली....त्यांचे पण वय झाले होते..त्यांना थांबवले व गप्पा मारायला सुरवात केली....व विषय आचार्य नाटकावर आणला..ते हसले म्हणाले हो २ नच प्रयोग झाले नाटकाचे.....पण कोण होते लेखक नाटकाचे? मी विचारले..लेखक ना? ते विचार करित म्हणाले..त्यातला काहि भाग पु.भा.भावे यांनी व उरलेला ग.वा बेहेरे व दादुमिया यांनि लिहिला होता....बरेच दिवस सतावणा~या प्रश्णाचे उत्तर मिळाले होते...[दादुमिया हे सोबत साप्ताहिकातले स्तंभ लेखक होते..टोपण नाव आहे...]
प्रतिक्रिया
23 Nov 2009 - 9:01 pm | धमाल मुलगा
:O :O :O :O :O :O
क्काय सांगता काय?
च्छ्या:!
24 Nov 2009 - 2:52 am | पाषाणभेद
फारच छान आठवण. अजून काही अत्र्यांबद्दल, त्यांच्या नाटकांबद्दल आठवणी असतील तर सांगा.
--------------------
जगातल्या सगळ्या भाषांचे वर्ण, स्वर, व्यंजनांचे उच्चार मराठीतच आहेत. जसे बघा : 'मराठी आदमी बहूतही होशीयार सहेता है' | या हिंदी वाक्यात प्रत्येक शब्दाचा उच्चार मराठीतच आहे की नाही?
त्याच न्यायाने सगळ्या भाषांमध्ये मराठी असतेच.
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मै सिकीरूटी की आवश्यकता है | रहेना, खाना, पीना मुफ्त रखेगा | साल में दो बार युनिफोर्म | अन्य नौकरीयां भी उपलब्ध | नौकरी पाने के लिए हमे कान्टेक करें |)
(गुडगूडी टाईम्स -छोटा विज्ञापन बडा काम )