"हॅलो, हॅ हॅ हॅ परा आहे का ? नाना बोलतोय."
"बोल रे नॅन्स, आज एकदम फोन वगैरे ??"
"अरे बाबा परा, तुझी मंडईत ओळख आहे ना ? स्वस्त दरात भरपुर बटाटे खरेदी करायचे आहेत. कधी भेटतोस ?"
"तेज्यायला... नान्या, काय 'बटाट्याची भाजी' वाचुन अंमळ पेटलास का काय ?"
"आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन"
"*ट काही कळले नाही बे नान्या, निट समजावुन सांग जरा मला !"
"ते विचारवंताना विचार" इती नाना.
"अरे पण नान्या हे विचारवंत कुठे असतात ? त्यांना ओळखायचे कसे ? मिपावर विचारवंतांचा वावर आहे काय?"
"हॅ हॅ हॅ...."
आम्ही रागारागानी फोन ठेवला आणी विप्र गुर्जीचा फोन लावला.
"गुर्जी टार्या विचारवंत आहे का?"
" तो हिणवंत आहे"
"गुर्जी मग बिका विचारवंत आहे का?"
"तो काकावंत आहे"
"गुर्जी मग आमचा नंदन??"
" तो हळवंत आहे"
"गुर्जी मग तुम्ही तरी विचारवंत आहात का ??"
"नो कॉमेंटस, बाय !"
मिपावर एकही विचारवंत नाही का काय ? ह्या साध्याश्या घटनेनी आम्हाला अंतर्बाह्य हेलावुन सोडले, आम्हाला अंमळ हळवे केले. साधे 'विचारवंत म्हणजे काय ?' हे आम्हास माहित नसावे ? शेवटी ठरवले की मिपावरील मिपावासीयांची मदत घ्यायची व आपल्या ज्ञानात भर घालायची.
तर मिपाकरहो मला सांगा, विचारवंत म्हणजे काय ? ते कसे ओळखायचे? मिपावर विचारवंताचा वावर आहे काय ? असल्यास ते कोण ??
प्रतिक्रिया
12 Nov 2009 - 1:37 pm | निखिल देशपांडे
जो कर भरतो तो विचारवंत
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
12 Nov 2009 - 1:53 pm | प्रसन्न केसकर
अगदी जमावानं काहीही केलेलं नसलं तरी, अन जो फुटलेल्या काचांचे तुकडे रस्त्यात पाहुन माझ्या पैशातनं निर्माण झालेल्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं असा विचार करुन हळहळतो (ते काचा फोडणारे कोण आहेत, ते असं नक्की का करताहेत, ती त्यांची अगतिक अपरिहार्यता आहे का याचा विचार नाही केला तरी चालेल) तो विचारवंत.
पक्का राडेबाज
पुणेरी
12 Nov 2009 - 1:53 pm | बकुळफुले
खर्या नावाने लिहिणारे आणि वेगळ्या आयडीने लिहिणारे विचारवंत हे वेगवेगळे असतात का? असतील तर ते कशामुळे?
12 Nov 2009 - 1:56 pm | विनायक प्रभू
विचारजंत झाला आहे का रे परा तुला?
12 Nov 2009 - 1:56 pm | अवलिया
फारच विचार प्रवर्तक धागा !
आम्ही मागे विचारवंत होण्यासाठी काय करावे लागेल याची विचारणा केली होती, त्यावेळेस मिळालेले उत्तर इथे सापडेल.
सध्या विचारवंतांची काही कमी नाही, पण आमच्या मते..
१) दगड किंवा बटाटे न फेकणारे
२) कधीही राग न येणारे
३) काय केले पाहीजे हे न सांगता काय नाही केले पाहिजे हे सांगणारे
४) स्वतः काही न करता दुस-याच्या चुका काढणारे
५) कर भरणारे
६) हापिसात काम करणारे
७) जमावाला घाबरणारे
वगैरे वगैरे विचारवंत होवु शकतात.
अधिक टिपण्णी आणि माहिती विचारवंतच देतील, त्यांच्या वाचनात हा लेख आला, तो त्यांना आवडला, प्रतिसाद द्यावा वाटला तर...
आणि हो, आवडलेल्या धाग्याला प्रतिसाद न देता, केवळ जे आवडले नाही तिथेच लिहीणे हा पण विचारवंत बनण्याचा एक मार्ग आहे. कारण कुणाचे थोडे सुद्धा कौतुक करणे विचारवंताच्या भुमिकेला छेद देणारे असते.
आणिक एक सांगायचेच राहिले, कौतुक केलेच चुकुन माकुन तर आपण ज्या भुभागातील असु तेथीलच लोकांचे कौतुक करायचे. जसे निवासी विचारवंत केवळ निवासीच लोकांचे कौतुक करेल (केलेच तर). इत्यादी.
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
12 Nov 2009 - 2:00 pm | टारझन
१. जो विचार करून लै भारी भारी लेख लिहून (मेंदू ला वात आणून) गुन्हेगारी थांबवणारे लेख लिहीतो .. तो असंख्य विचारवंतांपैकी एक !!
२. जो ४० वर्षांपुर्वीच्या गोष्टी मागतो तो .
३. जो "बालविवाह सुरू करावेत काय ?" म्हणतो तो.
४. ज्याला उरलेल्या गुलाबजाम पाकाचं काय करावं हे समजत नाही होत.
५. जो स्वांतसुखाय मनाच्या कुपीतून युनिकोदापर्यंत लिहितो तो .
तो असंख्य विचारवंतांपैकी एक !!
आणि हो .. ज्याची सही लै भारी ... तो मात्र टारगट :)
-- ऑर्कुट जीमेल गुगल
ORKUT GMAIL GOOGLE
ऊंची : ६'१" बायशेप्स १७"
HEIGHT : 6'1" BICEPS : 17"
जन्म तारीख : ३० ऑगस्ट ८४ जन्म वेळ १०:१० जातः १२-केळी मराठा (शिवाय कंपनी भरपूर काम करून घेते)
B'DATE: 30 AUG 84 B'TIME : 10:10 CASTE: 12-BANANA MARATHA (ALSO COMPANY GETS HELL OF WORK DONE)
अक्षांश :२४°४०'४५" उत्तर. रेखांश : ४४° ३७' १९" पु. समुद्रसपाटीपासूनची उंची : ५१२ मी. वेळापत्रक : पूअवे (म.वे.घ+ ३:००)
LATITUDE :24°40'45" N LONGITUDE : 44° 37' 19" E HIGHT FROM SEA LEVEL : 512 M TIME ZONE : EAT (UTC+3)
फांदी क्र. १२, झाड क्र १२२०२ , नदीकाठ ,
BRANCH # 12, TREE # 12202, RIVERSIDE
चिंपाझीनगर , गोरील्लापुर
CHIMPANZEE NAGAR , GORILLAPUR
बुंगाबुगांगा - ४२० ४२० अफ्रिका
BUNGABUGANGA - 420 420. AFRICA
दूरध्वनी +२५६२२१११८ / +२२५११२१७१९७
Telephone +256221118/+22511217197
भ्रमणध्वणी : +९१ ९९११ ११११ २२२२
mobile : +91 9911 1111 2222
12 Nov 2009 - 2:03 pm | समंजस
हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ...
(अवांतर- आमच्या दृष्टीने, जी लोकं समाजात घडणार्या चांगल्या/वाईट घटनांबद्दल
चिंता व्यक्त करतात, समाजाचं कसं होणार, वाईट घटनेला जबाबदार कोण, लोकांना कश्या प्रकारे चांगल्या मार्गावर आणता येईल, चांगल्या लोकांनी अहिंसेच्या मार्गानी विरोध कसा व्यक्त करावा, वगैरे, वगैरे बद्दल खुप विचार करणारे. पण बरेचदा उत्तर नसणारे, कृती न करता येणारे अश्या लोकांना विचारवंत म्हणतात....चुकभुल घेणे/देणे)
12 Nov 2009 - 2:06 pm | विनायक प्रभू
मला असे जंत झाले की मी 'जर्नी टू सेंटर ऑफ द अर्थ' हा सिनेमा बघतो.
12 Nov 2009 - 2:06 pm | बकुळफुले
अर्रे काय ही विचारवंताची सही.
सहीचे सही सही इडम्बन.
विचारवंत व्हायला
१) धागा कुठेही वळवण्याचे कसब असणारे अवांतर प्रतिसाद लिहीता आले पाहिजेत
२) दोन ओळींचे / दोन शब्दांची धागे निर्मान करण्याचे कसब
३) किमान पाच जणांच्या खरडवहीत " आपन म्झ्यशी मयत्री कर्नार क...कल्जी घ्ने" असे लिहिण्याचे कसब
४) पु लंच्या कोणत्याही पात्राच्या जवल जाणारे व्यक्तीमत्व दाखवण्याचे कसब
असले प्पाहिजे
12 Nov 2009 - 2:25 pm | llपुण्याचे पेशवेll
हॅ हॅ हॅ. पर्या हो बरे विचारवंत आणि मग आम्हालाही विचार करायला शिकव.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
12 Nov 2009 - 3:23 pm | छोटा डॉन
विचारवंत म्हणजे कोण ???
थांबा विचार करुन सांगतो.
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
12 Nov 2009 - 3:34 pm | राधा१
विचारवंत म्हणजे असा माणुस..जो हजार पानच्या बुकात लिहुन ठेवतो की झाड कशी वाचवायला हवी आहेत आणि ती कशी वाचवायची?
राधा१
12 Nov 2009 - 4:22 pm | बिपिन कार्यकर्ते
परा-जी, आज पर्यंत आम्ही तुम्हाला विचारवंत समजत होतो. आज तुम्हीच हा प्रश्न विचारावा? हा हंत हंत !!! असो. आमच्या बालपणी (म्हणजे सध्याच) ऐकलेली एक कथा सांगतो तुम्हाला. त्याप्रमाणे वागणारा/री कोणी आढळला/ली तर खुशाल समजा की हा / ही विचारवंत आहे म्हणून. तर गोष्ट अशी...
एकदा एक खूप विद्वान, खूप शिकलेले, खूप ग्रंथ वाचलेले पंडित होते. चहू दिशेला त्यांच्या नावाचा डंका. कुठे खुट्ट झाले की लोक त्यांना सल्ला विचारत. तर असे हे विद्वान पंडितजी.
ते एकदा निघाले तीर्थयात्रेला. त्या काळी, काय सांगू महाराजा, यात्रेला वगैरे जायचे म्हणजे काही विचारू नका. सगळा पायी प्रवास. वाटेत लुटालुटीचे भय फार. जीवाची निश्चिती नाही. तरी पंडितजी निघाले. वाटेत निरनिराळी गावं बघत, सृष्टीची विविधता बघत, नवनविन अनुभव घेत ते निघाले. वाटेत पर्जन्यकाल आला. बघता बघता नदी नाले ओढे भरून गेले. प्रत्येक ठिकाणी होडीत बसून जावे लागे.
एकदा एक नदी ओलांडत असताना त्यांनी त्या होडीवाल्याशी गप्पा सुरू केल्या.
'रे भल्या गृहस्था!!! नाव काय तुझे?'
'गुर्जी, माजं नाव नामा.'
'अरे, नामा नाही, नामदेव म्हणावं.'
'आवो पन ल्हानपनापासून सम्दे नामाच म्हन्त्यात मस्नी', नामा जरा गोंधळूनच म्हणता झाला.
'असो. काही शिक्षण वगैरे?' गुर्जी चिकाटीचे होते.
'कुटलं काय? साळाच न्हाय हितं लांब लांब पत्तूर.'
'अरेरे, काय रे तुम्ही लोक. ज्ञानाची किंमत अगदीच नाही तुम्हाला बघ. अरे, जगात किती ज्ञान आहे. या सृष्टिचे किती गुण गावेत तेवढे थोडेच बघ. गणित, विज्ञान, संगित, मूर्तिकला, स्थापत्यकला... अहाहा!!! किती आनंद म्हणून सांगू तुला. तू असे कर माझ्या बरोबर चल. अगदी सगळे शिकवतो बघ तुला.'
'गुर्जी, अगदी समदं येतं तुमास्नी?'
'होय रे, होय. मी सगळ्यात पारंगत आहे बघ.'
नाही म्हणले तरी नामा जरा नॉनप्लसच झाला बरं का मंडळी. तेवढ्यात जोराचा पाऊस आला आणि बघता बघता पाण्याचा भलामोठा लोंढा आला. होडी डुलायला लागली. तेवढ्यात होडीला भोक पडले. आता पाण्यात उडी मारण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
'गुर्जी, तुमाला अगदी खरंच समदं येतं.'
'अरे होय रे, रां**. सगळं येतं पण ते नंतर. आधी होडी काठाला लाव बघू. कल्पांतच आला जणू. आटप भरभर.'
'गुर्जी, तुमास्नी पवाय बी येतच आसंल की मंग?'
'अरे नाही रे... पोहायला मात्र येत नाही.'
'अर्यार्यार्या, गुर्जी, आता कसं हो... आमी तर चाल्लू उडी मारून काठाकडे. येवडं शिकलासा पण पवाय नाही शिकला. आता काय करता तुमच्या इद्येचं? जीव वाचवायची इद्या शिकलासच नाही जनू... बरं येतू म्या, न्हायतर तुमच्याबरूबर हितंच... येतू...'
धप्प!!!!
बिपिन कार्यकर्ते
12 Nov 2009 - 4:45 pm | निखिलराव
खाऊ की गिळू अशा अवतारात असलेल्या संतप्त लोकांचा घोळका बघितल्यावर मनात चर्र होतो तो विचारवंत...
12 Nov 2009 - 4:48 pm | आनंदयात्री
तुला म्हाईत नाय का रे परा .. विचारवंत म्हणजे सगळ्यांना जे आवडेल ते न आवडणारे .. आपला जन्मच जणु सुधारणा करण्यासाठी झालेलाय अश्या अविर्भावात तोंड फुटेस्तोर टिका आणी विरोध करणारे .. विशेष लक्षण म्हणजे आपले ते कार्टे आणी लोकाचा तो बाब्या असे लक्षण मुख्यपणे दिसुन येते ..
-
आंद्या जांबुवंत
12 Nov 2009 - 4:52 pm | सूहास (not verified)
च्या मारी , लेख एकदम डोक्यावरुन गेला !! थांब जरा विचार करतो आणी लिहावे असे वाटले ..पण साक्षात आमच्या गुरुंच्या धाग्यावर प्रतिसाद नाय द्यायचा तर काय .....,.....,....., (ईथे आपल्या नावडत्या लेखकांची नावे घालावीत) ह्यांच्या धाग्यावर द्यायच्या का ??
पहिली आणी खाजगी ही बाब अशी आहे की विचार म्हणजे काय मनाच्या तरल प्रवाहावर उठणारे तरंग , आता ते तंरग कोणाचे कसे तर कोणाचे कसे ..त्यात आम्ही पुरुष .....८० % तरंग तर ....चा विचार करण्यातच जातात...मग आम्ही विचारवंत कसे नाही ...असो ...
आयला धम्या.. हेच काय ते विचारवंत का रे ?
सू हा स...
12 Nov 2009 - 6:15 pm | धमाल मुलगा
पक्का विचारवंत झालास हो सुहाश्या :) मुळ मुद्द्याला दिलीस बगल आणि बसलास गोल गोल गप्पा करत! घे लेका, तुसुध्दा एक नव-विचारवंत म्हणुन वावरु शकतोस की! ;)
बाकी, वर आद्य जांबुवंत...हे आपलं...आंद्या जांबुवंतानं विचारवंतांची लक्षणं सांगितली आहेतच. त्यात आणखी भर म्हणजे,
स्वतः घंटा एक काडी इकडची तिकडं न करता फुकाची बडबड करुन लोकांच्या नरड्यात(डोस्क्यात) 'ज्ञानामृत'(!) पाजुन त्यांना निष्क्रिय करणे/करण्याचा प्रयत्न करणे.
जे जे सर्वमान्य, आवडीचे ते ते त्याज्य असा आव आणुन वागणे.
केवळ विरोधासाठी विरोध करणे. मग त्यात फुकाचा शब्दांचा किस पाडणे, स्वत:ला सोईस्कर असा समोरच्याच्या विधानांचा अर्थाचा अनर्थ होईल असं पाहुन त्याचा वापर करुन आपले लंगडे मुद्दे ठसवणे वगैरे वगैरे.....यादी तशी बरीच आहे...मोठा असाध्य रोग हो हा!!!
बाकी, काय रे पर्या फोकलीच्या,
तुला रे काय पडलंय विचारवंतांशी? जरा माणसात आहेस तर माणसासारखा जग की!
12 Nov 2009 - 6:16 pm | विशाल कुलकर्णी
बघितलस परा, नाही म्हणता म्हणता किती विचारवंत मिळाले मिपावर ते ! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
12 Nov 2009 - 8:09 pm | प्रकाश घाटपांडे
विचारवंत म्हणल कि एक आठवत. आमी मंबईला असतानी नागपाडा एम्टी ते जेजे रोड या फुटपाथवर काही भिकारी दाढी केस वाढलेले, मेणचट्ट प्यांट, डोळे शुन्यात, जगाचे कसे होणार हे भाव, मधेच असंबद्ध हसणे, मधेच बिडीचा एखादा झुरका असे दृष्य दिसायचे तेव्हा मला ते प्लेटो, अॅरिस्टॉटल अशा ग्रीक विचारवंतासारखे वाटायचे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
12 Nov 2009 - 9:09 pm | jaypal
आचार्य बिसोबा खेचर यांना मी माझे विचारवंत गुरु मानतो आणि एकलव्या प्रमाणे एकटयानेच अभ्यास (सराव) करतो.
इथे गेल्या शीवाय वीचारांना चालनच मिळत नाही राव पण सराव चालु आहे. (एकट्यानेच)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
13 Nov 2009 - 1:43 am | पाषाणभेद
पुण्यात विचारवंत तयार करण्याचे क्लासेस आहेत काय? मला ही विचारवंत बनायचेय. भडकमकर मास्तरांच्या सारखे सर्टीफीकीट कोर्स पण चालेल.
जय मनसे प्रवृत्ती !
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)
13 Nov 2009 - 4:55 am | पिवळा डांबिस
तर मिपाकरहो मला सांगा,
विचारवंत म्हणजे काय ?
जो स्वतः बदक असून आणि बदकांच्या कळपात राहूनही लेखनात शहामृगाची ष्टाईल मारायचा प्रयत्न करतो, तो विचारवंत!!!
ते कसे ओळखायचे?
ज्यांचं लिखाण तर सोडाच पण प्रतिसादही पूर्ण वाचवत नाहीत, वाचतांना आपल्या मस्तकाची शंभर शकले होऊन लेखकाच्या पायावर लोळू लागतील असं वाटायला लागतं, तोचि विचारवंत ओळखावा, संपर्क तयाचा टाळावा!!!
मिपावर विचारवंताचा वावर आहे काय ?
वावर? अरे सुळसुळाट आहे सुळसुळाट!!
असल्यास ते कोण ??
जसा आपला भेळवाला आपणच शोधून काढायचा (इति: तात्याचे भाईकाका) तसा आपला मिपाकर विचारवंतही आपणच शोधून काढावा लागतो...
(आमचा विचारवंत आम्ही शोधून काढलेला आहे, तुम्हाला शुभेच्छा!!!:))
13 Nov 2009 - 10:31 am | अवलिया
(आमचा विचारवंत आम्ही शोधून काढलेला आहे, तुम्हाला शुभेच्छा!!!)
हा हा हा
पिडा आजोबांच्या कृपेने आम्हालाही आमचे विचारवंत (अनेकवचनी) सापडलेले आहेत.
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.