स्पर्धा
शशक'२०२२ - समाजप्रबोधनात अंधश्रद्धा
समाजप्रबोधन करणार्या साहेबांचं जोरात भाषण चालू होतं. आज साहेब धर्मावर बोलू लागले. रूढी, परंपरा, पूजा-अर्चा, देव सगळं खोटं आहे, आपण या अंधश्रद्धांमधून बाहेर पडलं पाहिजे. साहेबांच्या प्रत्येक वाक्याला टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडत होता. बसलेले श्रोते आणि मंचावरचे सर्व लोक आज साहेबांच्या या नव्या अवताराकडे आश्चर्याने बघत होते. साहेब जोषात होते. तेवढ्यात एक बाई मंचापाशी येऊन उभी राहिली.
शशक'२०२२ - उल्का
मंगळावरील वसाहतीत प्रचंड धावपळ सुरु होती. तातडीने ग्रह सोडण्याचे आदेश आले होते.
एक मोठी उल्का काही तासात मंगळावर आदळणार होती.
काउंटडाऊन शून्य झाल्या क्षणी तिने बटन दाबले, तेव्हाच तिच्या आईचा फोन आला.
तिच्या बाळला घेऊन आई स्पेसस्टेशनवरच भेटणार होती.
“लवकर नीघ बाई...शेवटचे स्पेसशटल सुटण्याची वेळ झाली, बाहेर बघ उल्का चंद्रापेक्षा मोठी दिसते आहे.” आईचा आठवा फोन आला.
- ‹ previous
- 7 of 7