युफओ असावेत की नसावेत ?

दशानन's picture
दशानन in काथ्याकूट
10 Mar 2009 - 1:36 pm
गाभा: 

मागे दिवाळीच्या आसपास मी, माझे मानलेले मामा, दोन मानलेले भाचे आमच्या मानलेल्या मामांच्याच फार्म हाऊस मध्ये पार्टीसाठी गेलो होतो तेव्हा अचानक लहान वाला भाचा म्हणाला मामा ते बघा काय आयटम आहे कळत नाही आहे.. जेव्हा मी पाहीले तेव्हा मी पण दंग झालो होतो त्रिकोणी वस्तू असावी, तीन्ही टोकांना निळ्या रंगाच्या लाईट्स होत्या व त्या चमकत नव्हत्या चालू होत्या, व त्याचा आकार नेहमीच्या फायटर प्लेन पेक्षा तरी मोठा होता ... आम्ही दर शनिवारी फार्म हाऊस वरच असतो व एयरपोर्ट जवळच आहे म्हणजे .. येणारे जाणारे सर्व प्लेन त्याच रेषेतून जातात त्यामुळे रात्री दिसणारे विमान आम्हाला माहीत आहे व विमाने येवढा जवळून जातात की कुठल्या कंपनीचे आहे ते सुध्दा कळते, प्लस विमान एका रेषेत जाते पण ती वस्तू विचित्र पध्दतीने पुढे मागे होत होती व कमी त कमी पाच एक मिनिटे तरी ती दिसत होती पण अचानक त्या वस्तू ने यु टर्न घेतला जो कुठल्या ही विमानाला शक्यच नाही व ती वस्तू गायब. !

मला वाटलं सेनाचे प्लेन असावे फायटर इत्यादी पण त्यांचा सोनिक बुम टाईमचा आवाज खुप मोठा येतो + त्या वस्तू तून आवाजच येत नव्हता.. ! माझ्या कडे त्यावेळी कॅमेरा नव्हता व मोबाईल कॅमेरातून फोटो घ्यावीत अशी वेळ पण नव्हती + मी फोटो काढणेच विसरलो होतो ;) उगाच कुणाला का सांगा म्हनून मी गप्प बसलो पण आजच जरा शोधाशोध करताना मला ही लिंक मिळाली जी हिस्टरी चॅनेल वाल्यांनी एक कार्यक्रम केला होता त्यामध्ये एयर पायलट व त्यांचे अनुभव + ब्लॅक बॉक्स व बेसचे ट्रान्समीशन रेकॉर्डस आहे.. मी पाहील्यावर जाम फिदा झालो होतो व त्यांचे अनुभव वाचल्यावर तर एकदम विचारांच्या वर पक्का झालो की शक्यतो युफओ नावाची काही ना काही गोष्ट आहे जी आपल्या कडे असलेल्या रडारला सापडत नाही पण दृष्य आहे.. काही अजून लिंक्स आहेत, नासा मान्य करत नाही व नकारात पण नाही असे म्हणतात जरा ह्या बद्दल कुणाला काही माहीत असेल तर सांगा.. नाही तर फुल टाईमपास तरी आहेच हा टॉपिक !

http://www.youtube.com/watch?v=RVWKRUCM9s8 हे बघा १ ते पाच पार्ट आहे.

हे जरा बघ http://www.youtube.com/watch?v=VhBEnzB94QY&feature=related

वरील व्हिडीओ मध्ये त्या ऑबजेक्टची जशी मुव्हमेंट आहे व जसा तो दिसत आहे तसाच सेम टू सेम मी पाहीला होता व कमी त कमी ३-४ मिनिटे दिसत होता व अचानक गायब झाला होता.

टाईम सेट ०.३५ सेकंद ते ०.५९ सेकंद पर्यंतचा व्हिडीओ बघ एकदा.

*********

डोक्याचा विचार करुन करुन भुग्गा झाला आहे पण माझ्या एकट्याचाच का म्हणून तुम्हाला पण जरा त्रास ;)

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

10 Mar 2009 - 1:45 pm | नितिन थत्ते

मामांच्याच फार्म हाऊस मध्ये पार्टीसाठी गेल्यावर त्रिकोणी, चौकोनी, अष्टकोनी यू एफ ओ दिसणे स्वाभाविकच आहे ;)
खराटा
(रंग माझा वेगळा)

दशानन's picture

10 Mar 2009 - 1:51 pm | दशानन

पार्टीच्या आधीची गोष्ट आहे ;)

पार्टी नंतर तर आम्ही स्वतः युफओ मध्ये असतो =))

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

अवलिया's picture

10 Mar 2009 - 1:46 pm | अवलिया

मागे दिवाळीच्या आसपास .....

आणि त्यानंतरच माझे मिपाचे सदस्यत्व सुरु झाले... काही लागतेय का लिंक ? :?

--अवलिया

चिरोटा's picture

10 Mar 2009 - 1:48 pm | चिरोटा

भुते,स्मशानतल्या आर्त किन्काळ्या,काळी जादु आणि यु.एफ्.ओ. सगळे सारखेच!!

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Mar 2009 - 2:06 pm | बिपिन कार्यकर्ते

मागे दिवाळीच्या आसपास मी, माझे मानलेले मामा, दोन मानलेले भाचे आमच्या मानलेल्या मामांच्याच फार्म हाऊस मध्ये पार्टीसाठी गेलो होतो

सगळंच मानलेलं... युएफओ पण मानून घ्या. ;)

बिपिन कार्यकर्ते

अवलिया's picture

10 Mar 2009 - 2:07 pm | अवलिया

=))

--अवलिया

दशानन's picture

10 Mar 2009 - 2:08 pm | दशानन

=))

आता आहेत त्यांचे काय करु :?

मदनबाण's picture

10 Mar 2009 - 2:07 pm | मदनबाण

मला तरी वाटते की परग्रहवासी असावेत!!!
मध्यंतरी इस्त्रोच्या काही शास्त्रज्ञांनी त्यांना हिमालयात दिसलेल्या एका परग्रहवासीयाची टेप रिलीज केली होती.

ही एक युएफओ वाली लिंक बहुधा चीन मधे चित्रीत केलेली असावी.
http://www.youtube.com/watch?v=YcHHl_m8ocg

मदनबाण.....

Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda

दशानन's picture

10 Mar 2009 - 2:14 pm | दशानन

ती लिंन्क जपानची नाही आहे अमेरिकेची आहे वर्ल्ड ट्रेड सेंटर जवळची !

क्लियर व्हिडोओ http://www.youtube.com/watch?v=y6lkmDYU64Q

अवलिया's picture

10 Mar 2009 - 2:09 pm | अवलिया

युफओ असावेत की नसावेत ?

त्रास देणारे नसतील तर असावेत.
त्रास देणारे असतील तर नसावेत.

व्हाट एन आयडीया सरजी !!!

--अवलिया

दशानन's picture

10 Mar 2009 - 2:19 pm | दशानन

http://www.youtube.com/watch?v=x0BifYPQQJE

हे काय असावे ?

झेल्या's picture

10 Mar 2009 - 2:17 pm | झेल्या

>>युफओ असावेत की नसावेत ?

हे डिसिजन आपण कसंकाय घ्यायचं बॉ!

यू एफ् ओ उडविणार्‍याच्या नावाने बोंबला रे बोंबला...!

राजे, होळीच्या शुभेच्छा.

आजही तुम्हाला यू एफ् ओ दिसण्याचे चान्सेस दिसत आहेत ;)

:)

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

अवलिया's picture

10 Mar 2009 - 2:21 pm | अवलिया

युएफओ म्हणजे काय?

--अवलिया

झेल्या's picture

10 Mar 2009 - 2:25 pm | झेल्या

'अफवा' चा अपभ्रंश. :)

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

परिकथेतील राजकुमार's picture

10 Mar 2009 - 2:35 pm | परिकथेतील राजकुमार

The Surest Sign That Intelligent Life Exists Elsewhere In The Universe Is That It Has Never Tried To Contact Us.
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो..
आमचे राज्य

दशानन's picture

10 Mar 2009 - 4:26 pm | दशानन
विनायक प्रभू's picture

10 Mar 2009 - 4:48 pm | विनायक प्रभू

माहीत असलेले नसावेत असे कधीच म्हणणार नाहीत.

प्राची's picture

10 Mar 2009 - 5:08 pm | प्राची

मार्केट लवकरात लवकर सुधारो आणि राजेंची गाडी रुळावर येवो ही परमेश्वराचरणी प्रार्थना... ;)

(आज लेखांचा कितवा आकडा पार करणार :D ?होळीची भांग आत्ताच चढली वाटतं :)) )

बाकी राजे,तुमची प्रज्ञा,मेधा,प्रतिभा (ह्या पोरी नाहीत काही 8} ,बुद्धीचे प्रकार आहेत) फुल्ल फॉर्मात आहेत,पहिल्याच प्रयत्नात २ विडंबने,तिही एकदम झक्कस.. =D> =D> =D>

दशानन's picture

10 Mar 2009 - 5:11 pm | दशानन

>>मार्केट लवकरात लवकर सुधारो आणि राजेंची गाडी रुळावर येवो ही परमेश्वराचरणी प्रार्थना...

तुम्ही एका महान लेखकाला मुकाल ;)

>>> आज लेखांचा कितवा आकडा पार करणार

तुम्ही म्हणता तर गप्प बसतो ... :(

>>>बाकी राजे,तुमची प्रज्ञा,मेधा,प्रतिभा (ह्या पोरी नाहीत काही ,बुद्धीचे प्रकार आहेत) फुल्ल फॉर्मात आहेत,पहिल्याच प्रयत्नात २ विडंबने,तिही एकदम झक्कस..

धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.

प्राची's picture

10 Mar 2009 - 5:22 pm | प्राची

>>तुम्ही एका महान लेखकाला मुकाल
मी तुमच्या आधीच्या लेखाच्या प्रतिक्रिया पाहून सहज मस्करी केली :SS .हवं तर कान पकडते,पण लेखन बंद करू नका.(आम्ही जातो हिमालया.... पार्ट-३ केव्हा येतोय??? :> )

>>तुम्ही म्हणता तर गप्प बसतो ...
नका हो गप्प बसू राजे :O ,आज गिनिज बुकात(मिपाच असं बुक आहे का?) नोंद झालीच पाहिजे. :)

>>धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.
मंडळ आभारी आहे.

दशानन's picture

10 Mar 2009 - 5:23 pm | दशानन

ठीक ठीक !!!!

लिहतो बरं का !

उद्या पण सुट्टी आहे मला .. काळजी नको !!!!

अवलिया's picture

10 Mar 2009 - 5:25 pm | अवलिया

अरेरे!!!

ऍडीजोशी's picture

11 Mar 2009 - 4:02 pm | ऍडीजोशी (not verified)

१+ :D

टायबेरीअस's picture

17 Mar 2009 - 12:52 am | टायबेरीअस

यु एफ ओ नक्कीच असले पाहिजेत.. मार्स रोवर बघून मंगळवासीय सुद्धा हेच म्हणत असतात.