आपण मिपावर अनेक पुस्तकांचे परिचय वाचतो व त्यावर आलेले प्रतिसाद ही वाचतो, मग असे वाटते की यार हे पुस्तक वाचावयास हवे आहे, पण जे माझ्या सारखे आपल्या प्रदेशापासून दुर आहेत त्यांची हेलपाट होते, मग कधी तरी प्रदेशवारी झाल्यावर घेण्याच्या लिस्ट मध्ये ते पुस्तक पण जमा होतं पण काही ना काही कारणाने ते पुस्तक वाचायचं राहून जातं !
असं काही करता येईल का .. की ज्यांच्या कडे ते पुस्तक आहे / वाचून झालेले आहे अथवा दोन दोन प्रती आहेत अथवा जे विश्वासू आहेत (घेतलेले पुस्तक परत देतील असे ;) ) अश्यांना पोस्टाने अथवा कुरियर ने ते पुस्तक पाठवावे व वाचकाने त्यापुस्तकाची किंमत मुळ मालकास द्यावी, ज्यांना परत ते पुस्तक वाचायचं आहे त्यांनी जो दोन नंबरचा वाचक आहे त्याला पुर्ण रक्कम द्यावी व पुस्तक घ्यावे, आजच्या जगात जो महाजालाशी निगडीत आहे तो ऑनलाईन पेंमेंट सुविधा वापरतो, जरी वापरत नसला तरी डीडी सारखे पर्यांय पण उपलब्ध करता येईलच त्यांना व पुस्तकांची किंमत व कुरियर चा खर्चं स्वतः वाचकाने करावा.
ह्या मध्ये मला दोन मुद्दे सांगायचे आहेत.
१. ज्याच्या कडे पुस्तक आहे अथवा जो उपलब्ध करुन देऊ शकतो तो
त्यांने लिस्ट अथवा उपलब्धता येथे सांगावी व त्यांची योग्य किंमत. (कुरियर चा खर्च वाचकाच्या राहत्या जागेवर अवलंबून आहे). ह्याच्या बाबतीत काही धोका होण्याची संभावना नाही आहे कारण पैसे आधीच मिळतील ;)
२. ज्याला पुस्तक हवे आहे तो.
पैसे ऑनलाईन / डिडि ने आधी पाठवावेत, ज्याला पाठवतो आहे तो तुमच्या कमीत कमी दोन मित्रांच्या तरी ओळखीचा असावा, ज्यांना रिक्स घ्यायला आवडते. त्याच्या बद्दल मला काही म्हणायचे नाही आहे पण ज्यांना आपले पैसे योग्य जागी व योग्य वस्तू साठी जात आहेत ह्यां बद्दल शंका आहे त्याची खातरजमा व्हावी की योग्य व्यक्तीच्याच खात्यात पैसे गेले आहेत, व्यनी तून अथवा मेल द्वारे तुम्ही संपर्क करुच शकता.
फायदा - कित्येक वेळा आपल्या कपाटात पुस्तके पडून राहतात व त्याचा काहीच उपयोग होत नाही, अथवा कधी कधी आपण चुकून दोन दोन प्रती घेऊन आलेलो असतो अथवा ती पुस्तके जी आपल्याला आवडली नाहीत पण शक्यतो दुस-याला आवडू शकतात ह्यांचा सदऊपयोग होईल व माझ्या सारख्या वाचकांची वाचन भुक कमी होईल ;)
***
फक्त विचार आहे कसे करावे हे ठरवू.
* मिपा मालक / मिपा संकेतस्थळ ह्यांचा ह्या विचाराशी काहीही देणेघेणे नाही आहे, हे सर्वस्वी माझे विचार आहेत. पटलं तर होय नाय तर नाय :D
प्रतिक्रिया
9 Mar 2009 - 10:23 am | चिरोटा
आपण भारतातच आहात की भारताच्याबाहेर? भारतातच असाल तर आपण पुस्तक प्रकाशकाकडुन मागवु शकता.
9 Mar 2009 - 10:54 am | अवलिया
दिल्ली सोड म्हाराष्ट्रात ये !!!!
--अवलिया
9 Mar 2009 - 10:55 am | दशानन
हा तर लै भारी पर्याय आहे ;)
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
9 Mar 2009 - 10:56 am | अवलिया
कधी येतोस... ?
--अवलिया
9 Mar 2009 - 11:12 am | चिरोटा
झेन्डा राजे लावत आहेत त्याना दिल्लितच राहुद्या की.
9 Mar 2009 - 12:07 pm | रामदास
थोडक्याच वर्षात कळेल की अमुक तमुक पुस्तक वाचलंच पायजे असं काही नसतंय.
मिळालं तर वाचावं नाही मिळालं तर तोपर्यंत दुसरं येतं ते मिळेल.
9 Mar 2009 - 12:27 pm | चिरोटा
स्वामी,पानिपत वगैरे मी सहसा कोणाला देत नाही.प्रत्येक पुस्तक तसे चान्गलेच असते परन्तु काही पुस्तके वाचायचीच असतात.
9 Mar 2009 - 3:29 pm | विंजिनेर
@राजे:
उत्तम विचार आहे पण तडीस नेण्यामधे अंतर/देश आणि मुख्य म्हणजे ज्याला पुस्तक द्यायचे आहे त्या व्यक्तीच्या पुस्तक हाताळण्याविषयीचा विश्वास.
अनेकवेळा पुस्तकांच्या देवाणघेवाणीमधे भरवशाच्या म्हशीला टोणगाच होतो. :) असो.
@रामदासभौः एखाद्या पुस्तकाविषयी ऐकलं आणि जर ते वर्णन आवडलं तर ते पुस्तक मिळेपर्यंत मनाला चुटपूट लागून राहते(मिळाल्यावर हर्षवायु होतो तो भाग
अलहिदा...). आणि खरी गंमत तर त्या पुस्तकाची पारायणं करण्यात येते - आणि ते म्हणजे नुसतं वाचनच नसतं. कित्येक वेळा माडगुळकरांच्या
"माणदेशी माणसं" मधली फक्त रेखाटनं बघायला मी ते पुस्तक वर काढुन वाचलेलं आठवतंय.
(हे बोलणं फारसं येडपटपणाचं वाटत नसावं नाहीतर लोकांनी "शोलेची" सीडी मिळाली नाही म्हणून नंतर आलेला "खुदागवाह"च बघितला नसता का ;) )
9 Mar 2009 - 1:16 pm | पाषाणभेद
विचार चांगले आहेत. यात अनंत अडचणी आहेत. तरीही प्रयत्न करून पहावा.
त्या पेक्षा ऑनलाईन - प्रकाशन कंपनीस भेटावे.
वाचत रहा, काम करत रहा.
अवांतरः एवढ्या कामातून वेळ मिळतो आणि तो आपण चांगल्या कामात घालवता. छान आहे.
-( सणकी )पाषाणभेद
9 Mar 2009 - 3:37 pm | चिरोटा
एक वेब साइट वाचनात आली होती. ५/६ मोठ्या शहरान्मधे ग्रन्थालयातुन पुस्तके घरी मागवु शकता. पुस्तक नसेल तर ते विकत घेतात आणि घरपोच देतात.२/३ आठवडे पुस्तक ठेवता येते बहुतेक.१००/२०० रुपये महिना अशी काहितरि फी होती.