मार्केट मुळे मी बरबाद झालो... काहींचे काम गेले तर काहीचे ते काम गेले, काहीचीं नोकरी गेली काहींची लंगोटी पण गेली.. मिपावर वेळोवेळी होणा-या अर्थ चर्चे मध्ये हे झालं की हिमालयात जाउ ते झालं की जाऊ चा जो गजर होतं असे ते सर्व झाले, सगळ्यांनी मला बकरा केला व म्हणाले तु दिल्लीचा तुला हिमालय जवळच तुच बघ जमीन आश्रमासाठि.. मी त्यांना हिमालयातील एका अनोळखी जागी आश्रम बांधणे व राहणे ह्यासाठी घेऊ गेलो... त्यानंतर काय घडलं त्याचा हा वृंतांत.
***
च्यामायला ह्या जैनाच्या कार्ट्याला हीच जागा मिळाली होती आश्रमासाठी - पिडा आजोबा एका दगडाला लात मारत म्हणाले.
पिडाआ, असे काय करताय राव, लै भारी जागा हाय ही आश्रमसाठी - मी साळसुद पणे म्हणालो.
हट तुझ्या, ह्या डोंगर कपारीच्या हिमालयावर गावठी पण नाही मिळणार - पिडाआ रागाने माझ्या कडे बघत म्हणाले.
तुम्ही सन्यांसी होण्यासाठी आला आहात ना हिमालयात, सर्व भैतिक सुखांचा त्याग करुन. - सहज आपले *भोगा कडून समाधीकडे वाचत म्हणाले.
राजे खुप छान आहे जागा आवडली, ती नदिच्या बाजुला दगडाची जागा माझी पक्की - प्रभुका आपला चष्मा संभाळत म्हणाले.
बरोबर, तुम्हाला पाणी व बसण्याची सोय दोन्ही झाली - नाना नसलेली दाढी कुरवाळत म्हणाला.
काय म्हणायचं आहे ह्यांना कळाले नाही मला - परा गुडग्याला खाजवत म्हणाला.
प-या लेका ह्याला क्रिप्टिक म्हणतात तुला नाय समजणार - मी हसत म्हणालो.
कळाले हो राजे मी उगाच विचारले हो - परा खजिल होतं म्हणाला .
चला काय प्लान आहे पुढे - शेखर दात कोरत म्हणाला.
तु काय खल्ले बे ? - मी म्हणालो
अरे कोंब... गवताचा कोंब खल्ला.. आता आपण सन्यांसी आहोत ना - शेखर जिभ चावत म्हणाला.
सगळ्यांच्याच माना शेखर कडे वळल्या. कुणालाच पटले नाही पण उगाच पहिल्या दिवशी लोकसभा का करा ह्यासाठि गप्प बसले.
ए, जा जरा बघा झोपडी बांधायला काय लाकुडफाटा मिळतो का ते , फोकलीचे गप्पा मारत उभे आहेत. - आद्यपुरुष डोळे वटारुन म्हणाले.
ए राजा चल निघ, वर जाऊ लाखड घेऊन येऊ - नाना मला म्हणाला.
**
आम्ही चालत चालत नदि काठच्या जंगलात आलो.
राजा, लेका आलो खरं करणार काय बे आपण येथे ? - नाना वैतागून म्हणाला
अरे नाना, निसर्गाचा आस्वाद घे, ही खळखळ वाहत असलेल्या नदीचा नाद बघ.. हिरवळ बघ - मी म्हणालो
कुठ आहे पोरगी - नाना एकदम उत्साहाने म्हणाला.
ये.. ती कॉलेज वाली हिरवळ नव्हे, जंगलातली बघ. बघल तेव्हा पोरीचा इशय - मी वैतागून म्हणालो.
ह्म्म. ठिक. चल लाकडं गोळा कर - तो मला म्हणाला.
**
आम्ही लाकडं गोळा करुन आलो खाली सगळ्यांच्या जवळ. कोणि मासे मारत होता तर कोणी माश्या. कोणी जवळ असलेली ती पुस्तके वाचत होता कोणी दगडावर समाधी लावून बसलेला, कोणी बिडि कुठं मिळते का ते शोधत होतं तर कुणाचा घसा कोरडा पडला हुता त्यामुळे संत्री / देशी काही दिसतं का शोधत होता.
अरे हो, आपण हिमालयात आहोत, जंगलामध्ये तुम्हाला काय इथे संत्रा व देशी नाय मिळणार - मी वराडलो.
ज्यांच्या मनात दारुचे इचार होते त्यांचे चेहरे पडले.. बरोबर माझा पण पडला ही गोष्ट वेगळी.
अरे भुका लागल्या आहेत - एक कोणतरी चिरक्या आवाजात बोलला.
अरे जा रे कोणी तरी जंगलातून शोधा खाण्यासारखं काही तरी - समाधिस्थ विप्र आपला एक डोळा उघडून म्हणाले.
जी प्रभु, ए परा चल रे.. त्या डॉन्याला पण घे.. व टार्याला पण - मी म्हणालो
अबे, आमच्या कडे अस्तीदंताचा विमा करुन मिळतो ही माझी सही विसरलास काय बे जैना - टा-या दात ओठ घाऊन म्हणाला व आपले बलदंड वेडेवाकडे करुन दाखवू लागला.
नको रे भावा आम्ही आणतो की तुझ्यासाठी पण - मला ढकलत परा म्हणाला.
तो तुला चिपाड करुन टाकेल राजे, व्यक्ती बघून पंगा घेत जा राव हॅ हॅ हॅ - मागून धम्या म्हणाला.
**
आम्ही जंगलात आलो, फिरत फिरत व फळे शोधू लागलो.
अबे, हे बघ लै भारी वाटतय राव फळ, तोडू का ? - डॉन्या आनंदाने एका लालसर फळा कडे पाहत म्हणाला.
ए डॉन भाऊ, जे तोडायचं आहे ते तोड ना आपलंच आहे सगळं - परा हसत म्हणाला.
अरे जरा मदत करा रे हे कंदमुळ काढायला - मी जरा जोर लावत म्हणालो.
त्या टार्याचा इथं उपयोग झाला असता राव - जोर लावत डॉन्या म्हणाला.
मी मदत करु का पाटिल - धम्या परत मागून म्हणाला.
तुम्ही निवांत रहा सरकार आम्ही काढतो बाहेर - डॉन्या धम्याला वर पासून खाली पर्यंत पाहत म्हणाला.
**
चांगली टोपली भर फळं व कंदमुळं घेऊन आम्ही परत आमच्या जागी आलो.
सगळेच आनंदले व टोपली भोवती गोळा झाले.
माझ्या कडे येथे किचन चे सामान असतं ना सर्व तर मी, मस्त डिश तयार केली असती - फळाचा अस्वाद घेत पांतस्थ म्हणाले
जळवा, लावा आमची वाट , वाटी भर लाळ गळाली बघा - टार्या अजून महाजालावर प्रतिसाद देत आहोत असे वाटून उदगारला.
ये फोकलीच्या कार्टा.. मला मारायचा प्लान केला हायस काय रे - पिडाआ रागाने माझ्या कडे धावून येत म्हणाले.
क्रमश : - लै दिवसाने क्रमशः हा शब्द लिवला लै भारी वाटलं बघा... :D
**
टिप : हे सर्व फक्त विनोदी अंगाने आहे, वर उल्लेख केलेली नावं फक्त नावं आहेत त्या व्यक्ती नाहीत, महाजालावरील त्यांचे लेखन व प्रतिसाद ह्यातील भाषा बघून मी अंदाज केला आहे, काही मला आदरणिय आहेत, काही माझ्या पेक्षा मोठे आहेत त्यांचा अनादर करण्याची माझी काहीही मनिषा नाही आहे, जे लहान आहेत माझ्या पेक्षा त्यांनी उंकाचू केले तर बघा... आवाज नाय पाहीजे.. काय ;) , हा फक्त व फक्त विनोद आहे कुणाची भावना दुखवण्याचा ह्यात काही ही उद्देश नाही आहे, ज्यांना असं वाटतं की ह्यात माझं नाव नसावे त्यांनी मला खरडावे अथवा व्यनी करावे, मिपा प्रशासनाला ह्यात काही वागवे वाटले तर कृपया योग्य ति सुचना द्यावी. अजून काही आपेक्ष असेल तर व्यनी अथवा खरडा मला. कुणाला काहीच अडचण नसेल तर मग पुढील भाग पटापटा टाकेन व सलग टाकेन ही मी माझ्या विझत असलेल्या शिगरेटाची शपथ घेऊन सांगतो. =))
प्रतिक्रिया
4 Mar 2009 - 4:06 pm | अमोल खरे
पण ह्यात आमच्या ऍडी जोशी ला पण घ्या पुढील वेळेस..........ऍडी जंगलात त्याची नविन रोडकिंग घेऊन आला ......अशी सुरुवात करता येईल.....बाकी लेख मस्तच.
4 Mar 2009 - 4:23 pm | झेल्या
ही कल्पना भन्नाट आहे. सर्व मिपाकर हिमालयात.
मी काय म्हणतो, हिमालयापेक्षा डायरेक्ट स्वर्गात घेऊन चला ना सगळ्यांना. इंद्राच्या दरबारात्...अप्सरांच्या घोळक्यात्...मदिरेच्या धबधब्यात
पुढे त्यांना मनोगती व उपक्रमी भेटतात असे कथानक गुंफून धमाल उडवता येईल...!
असो.
पुढच्या लिखाणास शुभेच्छा..!
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
4 Mar 2009 - 4:25 pm | ब्रिटिश टिंग्या
स्वर्गात मनोगती किंवा उपक्रमी कसे भेटु शकतील बॉ :?
4 Mar 2009 - 4:29 pm | झेल्या
कल्पनाविश्वात होऊ शकतं हो काहीही... :)
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
4 Mar 2009 - 9:19 pm | विजुभाऊ
एक बरे आहे राजे ना हिमालयात बदडायला कोणी येणार नाही.
अवांतरः महावीराने हिंसेला नाकारले आहे ...मग होस्टेल मधले अण्णा त्यावर विश्वास कसे ठेवायचे
आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
4 Mar 2009 - 4:25 pm | निखिल देशपांडे
राजे लै भारी...... असेच चालु द्या....
4 Mar 2009 - 4:42 pm | टारझन
झकास ... णिबार यार ... आता ह्यावर एक णिच, हिण आणि हिडिस विडंबण पाडू म्हणतोय :)
केवळ ज्यांच्या व्याख्या प्रॉब्लेमॅटिक आहेत त्यांच्या साठी ... काय म्हणतोस ?
(हिण आणि हिडिस) टारझण
4 Mar 2009 - 4:47 pm | दशानन
=))
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
4 Mar 2009 - 4:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्ही निवांत रहा सरकार आम्ही काढतो बाहेर - डॉन्या धम्याला वर पासून खाली पर्यंत पाहत म्हणाला.
=)) =))
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
4 Mar 2009 - 4:32 pm | ब्रिटिश टिंग्या
फुटलो!
4 Mar 2009 - 4:28 pm | निखिल देशपांडे
राजे तुम्हि परत क्रमशः चालु केले.... ह्यचे किति भाग टाकणार आहेत ते आधिच सांगा हो....
4 Mar 2009 - 4:35 pm | लिखाळ
चांगले आहे. मजेदार... :)
मंदीच्या काळात आश्रम वगैरे चालवणे हा उद्योग नंतर फार फायदेशीर होऊ शकतो.
राजे, खरे उद्योगी आहात. :)
-- लिखाळ.
4 Mar 2009 - 4:42 pm | दशानन
सहमत. अजून वर्गणी ठरवली नाही आहे पण श्री श्री १०००८ रामनेव महाराजांना बोलवून एक शिबिर घतो.. चार पैका गोळा हॉइल च ;)
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
4 Mar 2009 - 4:42 pm | प्रकाश घाटपांडे
आर काठी नी कापड घेउं द्या की र मला बी हिमालयात येउं द्या कि.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
4 Mar 2009 - 4:48 pm | दशानन
काका तुम्हाला कसं इसरणार आम्ही :?
तुम्ही मागच्या बस मध्ये बसला आहातच की... !
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
4 Mar 2009 - 4:49 pm | मिंटी
तुम्ही मागच्या बस मध्ये बसला आहातच की... !
राजे मागच्या बसनी कोणाकोणाला घेऊन जाणार आहात ?
4 Mar 2009 - 4:50 pm | दशानन
तु बि हायस की व ती चिऊ पण =))
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
4 Mar 2009 - 4:45 pm | सहज
राजे फक्त बक्कळ चालणारेच धंदे करतात तर.
:-) पुढचा भाग लवकर येउ दे.
4 Mar 2009 - 4:46 pm | पाषाणभेद
चांगली कल्पना आहे. केसरी ची बुकिंग करायला नको आता.
-( सणकी )पाषाणभेद
4 Mar 2009 - 4:51 pm | खालिद
आमी बी येणार दादा
फक्त त्यासाठी नुकसान, नोकरी जाणे, शेअरबाजारात मोठा तंबोरा हातात मिळणे अशा प्री-रीक्विसिट्स आहेत का?
कारण ज्याच्याकडे काहीच नाही तो गमवणार तरी काय?
4 Mar 2009 - 4:54 pm | दशानन
अरे भावा, हा फक्त कल्पना विलास आहे... उगाच काही तरी मज्जा !
* देव न करो कुणाच्या ही बाबतीत असे घडो... माझी देवा कडे हीच मागणी असेल की सर्वांना सुख मिळावे चुकुन पण दुखःची छाया मिपा करांच्या वर येऊ नये. !
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
4 Mar 2009 - 5:36 pm | मृगनयनी
राजे!! =)) =)) =))
मस्त आहे हो तुमचा कल्पना विलास! मार्केट येवढं डाऊन असुन पण कसं काय बुवा तुम्हाला "हे " "असं" सुचतं ? ;)
बाकी वरच्या वाक्यातून खरोखर तुमची दयाबुद्धी आणि भूतदया देन्ही ओथम्बून वाहत आहे....
अजुन येऊ देत... क्रिप्टीक! ;)
(मूलत:च क्रिप्टीक असलेल्या) काही जणांची नावे विसरलेली दिसतात!
-------------------------------------------
आम्हाला ही हिमालय पहायचा आहे.... याच्या मागच्या बसमध्ये आमचं पण "आरक्षण" असू द्या..... (मूलत:च क्रिप्टीक असलेले "काही जण" आमच्या मागच्याच्या मागच्या बसमध्ये असू देत.) ;)
:)
:)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
4 Mar 2009 - 5:49 pm | दशानन
>>>मस्त आहे हो तुमचा कल्पना विलास! मार्केट येवढं डाऊन असुन पण कसं काय बुवा तुम्हाला "हे " "असं" सुचतं ?
हे सर्व डोक्याला झटके बसल्यामुळेच =))
>>याच्या मागच्या बसमध्ये आमचं पण "आरक्षण" असू द्या.....
नक्कीच.
सगळ्यांना सोडेन पण तुम्हाला जरुर घेऊन जाऊ चिऊ =))
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
4 Mar 2009 - 7:23 pm | विनायक पाचलग
आमीबी येणार
कोणत्या बसेत घेतले आहे
नसेल तर घ्या टपावर बे चालेल
छानसे वाचलेले
विनायक पाचलग
4 Mar 2009 - 7:44 pm | ब्रिटिश टिंग्या
मीपन येनर....मला मार्केतची प्रचन्द किळस आहे.
5 Mar 2009 - 10:35 am | घाशीराम कोतवाल १.२
आमीबी येणार
कोणत्या बसेत घेतले आहे
नसेल तर घ्या टपावर बे चालेल
आणी टप नसल तर मी मागण लटकत येणार पण मी पन येणार
पण मला सांगा कोण कशी घेणार मिपाकरांना पार्टी मी देणार
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
4 Mar 2009 - 5:01 pm | अवलिया
हम्म... लेका मी दोन तास मार्केटमधे बिझी होतो तर तेवढ्यात माझे हिमालयाचे तिकीट फाडुन मोकळा!?????
चालु दे... :)
--अवलिया
4 Mar 2009 - 5:06 pm | प्रकाश घाटपांडे
मपली मागच्या बसनी यवस्था केलीय. पन बर्फानी गारठायच धंद. म्हनुन म्हन्ल कि तिथ अवशिदपानी हाय का नाई?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
4 Mar 2009 - 5:11 pm | दशानन
बाटली साठी पैका राहिला असता तर हिमालयात गेलोच कश्याला असतो मरायला... इकड नाय का आपला टांगा पलटी केला असता =))
4 Mar 2009 - 5:16 pm | अनिल हटेला
राजे पळून पळून दमले आणी हिमालया निघाले .....;-)
आंदे और भी.................
------>>>>तुम्ही निवांत रहा सरकार आम्ही काढतो बाहेर - डॉन्या धम्याला वर पासून खाली पर्यंत पाहत म्हणाला. =))
एकदम वंटास......
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
4 Mar 2009 - 5:19 pm | आनंदयात्री
सही .. मस्त कल्पनाविलास.
आम्हाला एक यतिण देणार असताल तर यतीचा रोल द्या बुवा.
4 Mar 2009 - 5:42 pm | विनायक प्रभू
थांब रे फोकलीच्या, आता जरा बिझी आहे. मग बघतो तुला.
4 Mar 2009 - 5:54 pm | परिकथेतील राजकुमार
नशिब तिच्यायला आम्हाला 'गुढघ्यावरच' भागवले =))
हिमालयात गेलेले सगळे 'अवैचारीक', 'मद्यपी' आणी 'तसलेच' लोक होते का आपणा सोबत काहि 'वैचारीक' 'संगीताचा वापर मानसीक आजारांवर करणारे' 'गळ लावणारे' वगैरे पण होते ??
७०% मधला
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
4 Mar 2009 - 6:13 pm | दशानन
=))
ये लै गडबड नको करुस.. पुढच्या भागाची वाट बघ.
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
4 Mar 2009 - 7:37 pm | सुनील
चांगलं लिवलयसं की रे कार्ट्या!!
येउ दे पुढचा भाग लवकर.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
4 Mar 2009 - 7:41 pm | अवलिया
राजे !!!
आपला रोल वाढवा... डब्बल रोल हवा मला... नाना आणि अवलिया.... पटकथा बदला लवकर...
आणि हो प्रत्येक फ्रेम मधे मी असलोच पाहिजे... डायलाक खणखणीत हवे...
ऐंय... समजा क्या?
--अवलिया बच्चन
4 Mar 2009 - 9:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो नाना, तुमची उंची किती, तुम्ही बोलता किती?
राजे, आपण हिमालयन चंद्रा टेलिस्कोपवर फिरायला जाऊ या. मी पण येते (हापिसातून टी.ए.-डी.ए.ची सोय बघून घेते आधी! ;-) )
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
5 Mar 2009 - 10:40 am | अवलिया
ओ बाई... वैयक्तिक हमरीतुमरी नाय पायजेल
राज्जा... बाईंच्या भुमिकेला कात्री लावा...
(हामिरखान) अवलिया
4 Mar 2009 - 7:44 pm | शितल
राजे,
तुम्ही मिपावर पुर आणणार बहुतेक,
मिपाकर हिमालयात गेल्यावर तो पार वितळुन जाईल.. ;)
4 Mar 2009 - 11:05 pm | पिवळा डांबिस
आत्ता जरा कुठे जीवणाचा आणंद घेऊ पहातोय तोच णिघाले आम्हाला हिमालयात घेऊण!!!! (सॉरी, आज आम्हाला टार्याचा ण चावलाय!!!)
:)
(अवांतरः कार्ट्या, अरे "फोकलिच्या" हे आमचं णाही, ते तात्यास्वामींचं!!!! आमचं "शिंच्या"!!!! बदल कर बघू!!!!)
(वाक्यात उपयोगः काय हा शिंचा कार्टा शैलीचा अभ्यास करतो पण!!!!!!)
:)
5 Mar 2009 - 10:03 am | दशानन
करतो करतो आहे.... जरा वाईच दम घ्या आजोबा ;)
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
5 Mar 2009 - 2:57 am | बारक्या
अम्रीकेतुन येक बस घेउन येनार...लई गडी मानसं अशीच बीनकामाची हायेत हीथं...आन तीथं येउन सगळ्या यक्षीनींवर डॉलर उधळ्नार... हां..मंग...
आम्ही बी येनार म्हंजे येनारच....आमच्या साठी एक शिट (बसायची) ठेवा मागच्या गाडीमदी....येताना अजुन एक तुणतुनं बी घेऊन येवु का??
बारक्या...
5 Mar 2009 - 11:38 am | ब्रिटिश
आर तूमच्या ! हिमालयान आलाव न मना नाय भेटलाव ?
पयल्या डोंगराचे मांगच्या बाजुला आपली भट्टी हाय.
सगलीकडशी लोकांची लाईन लागलीय बोल.
चला तर मंग संद्याकाली डायरेक भट्टीवरच भेटू. क बोल्ता?
आपना धंदा तो मंदी मे बी जोरसे चालू हाय.
मंदी जींदाबाद
मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
5 Mar 2009 - 6:44 pm | दशानन
प्रतिसाद देनारे / न देनारे , वाचणारे न वाचणारे सगळ्यांचे आभार.
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
6 Mar 2009 - 1:41 pm | सँडी
एक णंबर!
- सँडी
पायास तेल लावलेला खेकडा.