लास-वेगस.... माहिती हवी आहे.

किल्लेदार's picture
किल्लेदार in भटकंती
15 Jan 2018 - 11:11 pm

२६ जानेवारी ला लास-वेगस ला जायचा प्लॅन आहे. हॉटेल आणि फ्लाईट बुकिंग झाले आहे. ग्रँड कॅनियॉन ला भेट द्यायचा विचार आहे.

काही टिप्स ?

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2018 - 4:45 am | टवाळ कार्टा

जाताना घरातले नळ , पंखे, खिडक्या बंद करुन जा, पैशाचे पाकिट आणि तिकिटे (आणि असल्यास उत्तम अर्धा भाग) आठवणीने बरोबर घ्या...आणखी टिप्स इथले जाणकार देतीलच

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2018 - 4:46 am | टवाळ कार्टा

ग्रँड कॅनियॉनला गेल्यावर कठड्यावरून जास्त वाकून बघू नका हे राहिले लिहायचे

किल्लेदार's picture

16 Jan 2018 - 8:04 am | किल्लेदार

थट्टा करू नका हो. फार दिवसांनी योग जुळून आला आहे.

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2018 - 12:14 pm | टवाळ कार्टा

:)

https://www.timeout.com/las-vegas/things-to-do/best-things-to-do-in-las-...

हे घ्या आणि ऐश करा...स्ट्रीप शो चुकवू नका...पु.ल. म्हणूनच गेलेत "कोर्टात भांडण आणि तीर्थात मुंडण याला लाजणे म्हणजे पुर्षार्थ नव्हे" ;)

मुक्त विहारि's picture

16 Jan 2018 - 12:56 pm | मुक्त विहारि

+ १

अनिंद्य's picture

16 Jan 2018 - 1:11 pm | अनिंद्य

"कोर्टात भांडण आणि तीर्थात मुंडण" ... :-) :-) :-)

श्रीरंग_जोशी's picture

16 Jan 2018 - 4:46 am | श्रीरंग_जोशी

आम्ही २०१२ साली लास व्हेगसला विमानाने जाऊन शेजारचे हूवर डॅम व ग्रँड कॅनियनचे नॉर्थ व वेस्ट रिम या ठिकाणांना भेटी दिल्या होत्या.

  • वेस्ट रिमला हेलीकॉप्टर राइडने कॅनियनमध्ये नदीकाठावर उतरण्याचा अनुभव छान होता.
  • वेस्ट रिमला जाताना जवळपास तासभर अतिशय कच्च्या रस्त्यावरुन धूळ उडवत व धक्के खात जाण्याचा अनुभव मात्र छान नव्हता (सबर्बनसारखी फुल साइझ एसयुव्ही असुनही).
  • शाकाहारी असाल तर कॅनियनमध्ये चविष्ट फारसे काही खायला मिळेल असे अनुभवावरुन वाटत नाही.
  • वेस्ट रिमच्या ग्लास बॉटम स्कायवॉकचा अनुभव छान असला तरी फोटोसाठी बरेच पैसे मोजावे लागतात (स्वतःचा कॅमेरा नेण्यास मनाई असते).
  • आम्ही व्हेगसमध्ये स्ट्रॅटोस्फिअर हॉटेलला राहूनही प्रवासाने दमल्यामुळे ऑब्झरवेटरीला गेलो नाही. तसेच स्ट्रीपवर दिड-दोन तास फिरण्याखेरीज फारसे काही केले नाही. बेलाजियोची कारंजी अप्रतिम वाटली.

अनेक मिपाकरांनी किमान एकदा (काहींनी अनेकदा) या ठिकाणांना भेटी दिल्या असणार. माझ्यापेक्षा उत्तम माहिती देणारे प्रतिसाद लौकरच येतील असा विश्वास आहे.

फारएन्ड's picture

16 Jan 2018 - 7:44 am | फारएन्ड

किती दिवस हातात आहेत? वेगास ला किमान दोन रात्री लागतील.

हॉटेल बुकिंग ऑलरेडी केलेले आहेत हे वाचले - पण स्ट्रिप च्या साधारण मध्यावर असेल तर चांगले. बेलाजियो च्या जितके जवळ तितके चांगले असे ढोबळ पणे म्हणता येइल. "चांगले" म्हणजे जाण्यासारखी बरीचशी ठिकाणे तेथून जवळ आहेत.

- बेलाजियो चे कारंजे - १-२ तास
- व्हेनेशियन चा कॅनॉल व आजूबाजूचा भाग - १-२ तास
- स्ट्रिप वरूनच फिरणे. थंडी किती असेल त्यावर अवलंबून आहे. यालाही २-३ तास किमान, कोठे रेंगाळलात तर जास्त ;)
- न्यू यॉर्क, बेलाजियो, सीझर पॅलेस ई मधून फिरणे - केवळ माहौल पाहात
- एखादा शो. सर्क डी सोले (मराठीत अचूक उच्चार माहीत नाही) किंवा त्यांचे इतर शोज आहेत ते. ब्लू मॅन ग्रूप ही चांगला आहे म्हणतात. काही अ‍ॅडल्ट रेटिंग वाले ही आहेत. त्यांची तिकीटे डिस्काउण्ट मधे मिळतात असे अनेक ठिकाणी वाचले आहे. कितपत खरे आहे माहीत नाही.

पूर्वी मिराज मधे कॅलिफोर्निया पिझा किचन होते, अजूनही असेल. प्लॅनेट हॉलीवूड मधे पी एफ चँग आहे. बॅलीज जवळ एक टर्कीश टेक आउट रेस्टॉ आहे, तेथे टर्कीश पदार्थ व तेथील आइसक्रीमही इण्टरेस्टिंग वाटली होती. कॉस्मोपॉलिटन च्या समोर थोडे साउथ कडे चालल्यावर एक देसी रेस्टॉ आहे. एकदाच खाल्ले आहे. बरे होते. बाकी देसी रेस्टॉ बहुधा स्ट्रिप वरून थोडी लांब आहेत. आता उबर ई. मुळे प्रॉब्लेम नाही, पूर्वी टॅक्सी तेथून परत यायल मिळायला एकदा प्रॉब्लेम आला होता.

मुद्देसूद प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. सध्या तरी प्लॅन साऊथ रीम बघायला जायचा आहे.
सर्कस सर्कस नावाचे हॉटेल आहे. स्ट्रीप च्या नॉर्थ ला आहे. थोडे चालावे लागेल पण ठीक आहे.
३ रात्रीचे बुकिंग आहे. एवढे पुरेसे असावे.

फारएन्ड's picture

16 Jan 2018 - 9:55 am | फारएन्ड

हो थोडे चालावे लागेल. एकदा अंदाज घेउन मग उबर चा किंवा स्ट्रिप वर ती एक बस सर्विस आहे तिचा वापर करा व मध्यावर या (कॉस्मोपॉलिटन ते बेलाजियो च्या पट्टयात) म्हणजे चालताना आजूबाजूला प्रेक्षणीय भाग असेल. स्ट्रिप चा मुख्य भाग एरव्ही सेफ आहे पण थंडी मुळे गर्दी कमी असेल तर माहीत नाही, आणि दुसरे म्हणजे व्हेनेशियन वगैरे च्या उत्तरेला गजबजलेला भाग कमी आहे. तेव्हा रात्री जाताना गर्दी नसेल रस्त्यावर तर उबर/बस वापरा.

अजून एक लिहायचे राहिले. लास वेगास डाउनटाउन सुद्धा चांगले आहे. तेथे जुने कॅसिनोज आहेत. स्ट्रिप इतके ते फॅमिली फ्रेण्डली नाही असे ऐकले आहे. मी एक दोन दा गेलो ते तेथे लायटिंग असते ते फक्त बघून परत आलो त्यामुळे जास्त माहिती नाही. स्ट्रिप पासून १०-१५ मिनीटे बस/कार ने आहे उत्तरेला.

तीन रात्री वेगास मधे राहून मग कॅनियन ट्रिप आणखी वेगळी का?

बाय द वे आज सर्च केले तर आता स्ट्रिप वर बरीच भारतीय रेस्टॉ निघालेली दिसतात.

नेत्रेश's picture

17 Jan 2018 - 12:09 am | नेत्रेश

सर्कस सर्कस बरेच लो क्वालिटी हॉटेल आहे, जमल्यास बदला.
> कॉस्मॉपॉलीटीन , मिरा़ज, MGM, वगैरे हॉटेल्स बर्‍याचदा स्वस्त मिळतात.
> बजेट वर असाल तर हँडरसनला हयात, हील्टन, बेस्ट वेस्टर्न, वगैरे मध्ये बुकींग करा - फ्री ब्रेकफास्ट, नो रीसॉर्ट फी, फ्री पार्कींग.

हल्ली बर्‍याच्शा कॅसीनोजनी फ्री पार्कींग बंद केले आहे.
- व्हेनेशीयन, प्लॅनेट हॉलिवुड, ट्रेजर आयलंड वगेरेमध्ये अजुन फ्री पार्कींग आहे. त्यानुसार प्लॅन करा

कॅसीनो टु कॅसीनो फ्री मोनोरेल्स आहेत, मिराज, ballagio, आरीया ते अगदी एक्सकॅलीबर पर्यंत फ्री मोनोरेल आहे.

जेवणाची आवड असेल तर
- सिझर्स कॅसीनोजची फ्री टॉटल रीवॉर्ड मेंबरशीप घेउन $५० प्रत्येकी दराने 'बफे ऑफ बफे' मिळतो तो घेउ शकता - २४ तास, ७ कॅसीनोज मधले बफे पाहीजे तीतके वेळा जाउन खाउ शकता. (डीनर - ब्रेकफास्ट, लंच, डीनर असे २४ तासात चार वेळा तरी नक्कीच).

ग्रँड कॅनियन शेवटच्या दीवशी करा. खुप दमायला होते ड्रायव्हींग मुळे.

हुव्हर डॅम सकाळी लवकर जाउन करा, खुप लहान रस्ता आहे, दुपारनंतर खुप ट्राफीक होते.
- अ‍ॅरीझोना साईडला रस्त्याच्या बाजुला फ्री पार्कींग आहे. नेवाडा साईडला पेड आहे.
- जनरेटर रुमची टुर करण्यासारखी आहे
- पॅट टीलमन ब्रीज (नवीन मोठा ब्रीज) वर चालत जाता येते. तेथे फ्री पार्कींग आहे.

मुद्देसूद प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. सध्या तरी प्लॅन साऊथ रीम बघायला जायचा आहे.
सर्कस सर्कस नावाचे हॉटेल आहे. स्ट्रीप च्या नॉर्थ ला आहे. थोडे चालावे लागेल पण ठीक आहे.
३ रात्रीचे बुकिंग आहे. एवढे पुरेसे असावे.

मुद्देसूद प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. सध्या तरी प्लॅन साऊथ रीम बघायला जायचा आहे.
सर्कस सर्कस नावाचे हॉटेल आहे. स्ट्रीप च्या नॉर्थ ला आहे. थोडे चालावे लागेल पण ठीक आहे.
३ रात्रीचे बुकिंग आहे. एवढे पुरेसे असावे.

मुक्त विहारि's picture

16 Jan 2018 - 9:46 am | मुक्त विहारि

प्रवासवर्णन नक्की लिहा...

पिलीयन रायडर's picture

16 Jan 2018 - 1:26 pm | पिलीयन रायडर

सगळं तर आलं आहेच वर तरी आपलं उगाच..
बलाजीयोचे कारंजे दर 15 मिनिटाला असते. नक्की बघा.
कॅनयन अशी फार ग्रेट वाटली नाही मला. म्हणजे वाईट नाहीये काही पण जायला फार वेळ लागतो. आणि दऱ्या खोरे आपल्याला नवीन नाहीत. माझ्यासारखेच मत असणारे अजून आहेत. त्यातल्या एकाने हेलिकॉप्टर राईड केली ती मात्र अप्रतिम होती असे त्याचे म्हणणे. तेव्हा ते बजेट काढा. खाण्या पिण्याची आबाळ होऊ शकते तिथे.

स्ट्रीप वर नुसतंच फिरणं सुद्धा मजा आहे. एखादी संध्याकाळ राखून ठेवा.

'इतर' काही गोष्टी फेमस आहेत पण आम्ही नुसते ऐकून आहोत, अनुभव नाही ;)

वेगास मस्त आहे, मला तरी आवडलं होतं. ह्याच सुमारास गेले होते मी. चांगलं वातावरण होतं.

हां अजून एक, Antelope Canyon बद्दल ऐकून आहे. फोटो फार सुंदर असतात. पण मला नाही जाता आलं.

आनंदयात्री's picture

17 Jan 2018 - 12:31 am | आनंदयात्री

Antelope Canyon बद्दलच लिहायला आलो होतो. वेगास ते पेज साधारण पाच तासाचा ड्राइव्ह आहे, त्यामुळे पेजला मुक्काम करावा लागू शकतो. Lower & Upper Antelope Canyon , Horseshoe Bend, Monument Valley, हे सगळे पाहण्यासारखे आहे. किल्लेदारांसारख्या फोटोग्राफरने तर हि सगळी ठिकाण अजिबात चुकवू नयेत. हा सगळं भाग नावाहो आणि अनासाझी जमातीच्या मूळ अमेरिकन जमातींच्या वसाहतीचा होता, त्यामुळे त्यांचा इतिहास मांडणारी लहान लहान संग्रहालयंही वाटेत तुम्हाला लागतील. पेजच्या रस्त्यावर glen canyon dam च्या अलीकडे एक छोटेसे डायनॉसॉर्सच्या फॉसिल्सचे संग्रहालय असल्याचे आठवते.

वेगासमध्ये fremont street experience घेण्यासारखा आहे, स्ट्रीपची भव्यता नसली तरी तिथली वेगळी मौज आहे. लहान मुलांना घेऊन जाणार असाल तर टाळले तरी हरकत नाही.

किल्लेदार's picture

17 Jan 2018 - 2:18 am | किल्लेदार

मी एकटाच जातो आहे. कुठला तरी प्लॅन्ड टूर घ्यावा लागेल. अँटिलोप कॅनियॉन किंवा हॉर्स शू ही ठिकाणं बरीच लांब दिसतात. सद्यपरिस्थितीत शक्य वाटत नाही.

अमित खोजे's picture

17 Jan 2018 - 12:44 am | अमित खोजे

जायलाच हवे. फोटोग्राफी चांगली करता येते तेथे. वाळूच्या गुहेतून जाताना मजा येते. तेथपर्यंत जायचा गाडीचा प्रवासही मस्त आहे.

पिलीयन रायडर's picture

16 Jan 2018 - 1:33 pm | पिलीयन रायडर

सर्कस सर्कस मध्येच होतो आम्ही. चांगलं आहे. पण प्रचंड मोठं आहे. रूम पासून काही खायचं प्यायचं सापडायला खूप चालावे लागेल. म्हणून सोबत काही तरी ठेवाच. आम्ही राईस कुकर घेऊन गेलो होतो. तिथे फार कामाला आला. Maggy वगैरे बनवून खाल्लं आम्ही नाश्त्याला. सॅन फ्रान्सिस्को मध्ये आम्ही तांदूळ आणि रेडी तू इत भाज्या घेतल्या होत्या. ह्या उपयोगी पडल्या.

उबरने स्ट्रीप वर जाता येईल. तिथे बहुदा संपूर्ण वेगास फिरवणार्या बस आहेत. दिसल्या होत्या पण सिस्टीम कळली नाही. माहिती काढा.

कपिलमुनी's picture

16 Jan 2018 - 2:19 pm | कपिलमुनी

What happens in Vegas, stays in Vegas. !!

एवढेच ध्यानात ठेवा :)

किल्लेदार's picture

17 Jan 2018 - 12:12 am | किल्लेदार

माहिती उपयुक्त ठरेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकटाच जातो आहे. त्यासाठी काही वेगळ्या टिप्स ?

"वेगास" मराठा वीर दौडला एक !!! नको व्हायला :) तिकडे बहलोल-खान खूप आहेत असे ऐकले.

अनन्त अवधुत's picture

17 Jan 2018 - 12:47 am | अनन्त अवधुत

What happens in Vegas stays in वेगास , हे ध्यानात ठेवा. त्यामुळे कितीही बहलोल खानांनी बहकवले तरी ते काही इतर कोणाला कळणार नाही.
मी २०११ मध्ये गेलो होतो.
भरपूर जुगार खेळा, नुसते मशीन वर खेळू नका प्रत्यक्ष माणसांसोबत खेळा.
चांगले चांगले शोज आहेत, नक्की बघा.
पायरेट्स ऑफ कॅरेबिअन (ट्रेजर आयलंड) चांगला शो आहे, बेलाजिओचे कारंजे (प्रत्यक्ष कारंज्याच्या ठिकाणी आणि आयफेल टॉवर ह्या दोन्ही ठिकाणावरून) छान दिसतात. कितीतरी इतर कॅसिनो मध्ये फ्री शो असतात. माहिती काढून जा.
सर्क द सोलेल चा एक तरी शो बघा, असा बघा जो फक्त वेगास मध्ये पाहता येईल, फॅमिली शो बघायचे प्रसंग आणि संधी नंतर पण भरपूर मिळतील. गाण्यात इंटरेस्ट असेल तर ब्लु मॅन शो बघा.
वेगास ची हेलिकॉप्टर राईड घ्या (रात्रीची). ग्रँड कॅन्यनची राईड घेतली नाही तरी चालेल.
पाणी महाग आहे, कायम २-४ बाटल्या सोबत बाळगा. जवळपास सगळ्या कॅसिनोस मध्ये खायला मिळते (सब वगैरे शाकाहारी पण मिळते) पण प्रत्येक ठिकाणी ती शोधाशोध काही परवडेबल नाही, त्यामुळे थोडेसे कोरडे अन्न सोबत ठेवा उदा दशमी/ बिस्किट्स/ प्रोटीन बार.
दिवस फिरण्यासारखे विशेष नाही, रात्रभर जागरण आणि दिवसा झोप.
टॅक्सी वाले लुबाडतात त्यामुळे लक्ष ठेवा. तिकडे लोकल ट्रेन पण आहे जी बहुतेक कॅसिनोसला कनेक्टेड आहे. त्याने पण फिरू शकता.
रोलर कोस्टर सारख्या गोष्टींपासून दूर राहा. ते तुम्हाला कुठल्याही थीम पार्क मध्ये सापडतील.
मंडल बे मधले प्राणी संग्रहालय छान आहे.
एकटेच जाताय म्हणजे खरेच एकटे जाताय असे समजतो. मित्राची फॅमिली किंवा सासू -सासरे / आई-बाबा असे कोणी असतील तर वेगासला जाऊ नका. सॅन फ्रान्सिस्कोला जा असा पण एक आगाऊ सल्ला देईन.

किल्लेदार's picture

17 Jan 2018 - 1:28 am | किल्लेदार

एकटा म्हणजे पूर्णपणे एकटाच निघालो आहे. माझ्या मूळ स्वभावाला फाटा देऊन एकाट ठिकाणी न जाता एवढ्या गजबजाटात जातो आहे. थोडी धाकधूकच आहे.

समर्पक's picture

17 Jan 2018 - 2:40 am | समर्पक

व्हेगास हे खादंती साठी उत्तम ठिकाण. अनलिमिटेड बफे माफक दरात (आधी कुपन्स शोधून ठेवा) जगभरचे उत्तमोत्तम पदार्थ व बरेच काही नवे ट्राय करण्याची उत्तम संधी

तीन रात्रीत अँटिलोप कॅन्यन शक्य होणार नाही. साऊथ रिम एक पुर्ण दिवस घेईल, सुर्योदय वा सुर्यास्त बघायचे म्हंटले तर रात्रिच्याही काही भागाचा बळी देणे आले. त्यापेक्षा नंतर कधी फक्त ग्रँड कॅन्यन साठी म्हणून जा... असे हात लाऊन परत येण्याने त्या जागेला न्याय देता येणार नाही.
बाकी व्यनिवर देण्यासारखी माहिती पाठवतोच...

समर्पक's picture

17 Jan 2018 - 2:49 am | समर्पक

किंवा याउलट, एक दिवस वेस्ट रिम (इथे काचेचा पूल आहे) + हूवर डॅम अशी सहल करा व दुसरा दिवस साऊथ रिम. बसेस मिळतात व्हेगासमध्येच. एक रात्र साऊथ रिम ला राहिलात तर अजून उत्तम. स्वतः गाडी घेऊन फिरणार असाल तर अधिक बरे. पण अन्यथा बस . तिसरा दिवस पश्चिमेकडे कमी माहिती असलेल्या रेड रॉक कॅन्यन ला जाऊ शकता ( असे तीन दिवस व बाकी व्हेगास रात्रीच पाहायची जागा आहे :-) )

हम्म.. मला यायला आवडले असते सोबत. मस्त भटकंती आणि गप्पा झाल्या असत्या. राईड नसली तरीही. :)
तू कुणाला विचारले नाहीस काय?

LV माझ्या साठी दुसरे घरच आहे जणू. माझ्या टिप्स अर्थांत तुम्ही बायको मुला सोबत जात असाल तर काही टिप्स नजर अंदाज करा :

१. वेगास शहर स्ट्रीप जवळ अत्यंत सुरक्षित असले तरी स्ट्रीप बाहेर आणि विशेषतः स्ट्रॅटोस्फिर च्या मागे विशेष सुरक्षित नाही. (अगदी मेक्सिको एवढे हि असुरक्षित नाही पण रात्रीच्या वेळी विनाकारण पायी भटकू नका)
२. स्लॉट मशीन्स मध्ये ड्रॅगन स्पिन वर जिंकण्याची जास्त संधी आहे जर तुम्ही $१०० पेक्षा जास्त पैसे दवडले तर. पण प्रत्येक कसिनोत हे एकच मशीन असते.
३. ब्लॅकजक सोपा जुगार असून आपण अतिशय हसत खिदळत खेळू शकता पण पोकर मध्ये जिंकण्याची जास्त संधी आहे.
४. ऑक्सिजन बार्स आर फ्रॉड जाऊ नका.
५. वेगास स्ट्रीप वर गर्ल्स to रूम एस्कॉर्ट सर्व्हिस असते त्याच्या नादी अजिबात लागू नका.
६. सरकू दे सोले चे सर्व खेळ जबर असतात माझ्या मते झुमॅनिटी हा सर्वांत चांगला पण अडल्ट शो आहे.
७. हेलिकॉप्टर टूर्स माझ्या मते अतिशय युजलेस आहेत घेऊ नका. (ग्रँड कॅनियन वर चालेल पण खऱ्या कॅन्यन अनुभवासाठी ड्राईव्ह करून जाणे चांगले. हेलिकॉप्टर मूळ कॅन्यन मध्ये उडत नाही)
७. स्ट्रीप क्लब मध्ये स्पियरमिंट ऱ्हायनो मध्ये सर्वांत जास्त चांगले सिलेक्शन आहे. नेहमी लिमो बुक करून जा त्यामुळे कव्हर चार्जेस पडत नाहीत महिला साठी किंवा बरोबर महिला असली तर कव्हर चार्ज लागत नाही. महिलांसाठी सुद्धा थंडर डाऊन अंडर असे क्लब्स आहेत आणि माझ्या मते रेगुलर स्ट्रीप क्लब्स पेक्षा जास्त मजेदार आहेत. त्याशिवाय stripper १०१ नावाचा अतिशय मजेदार कार्यक्रम आहे पण हे सर्वाना जमण्यासारखे नाही.
८. वेगास मधील गन रेंज जरूर पहा आणि मशीन गन वगैरे चालवून पहा.
९. डेव्हिड कॉपरफिल्ड (जादू) अजिबात पाहू नका त्या पेक्षा पेन आणि टेलर शो जास्त चांगला आणि स्वस्त आहे.
१०. Nightclubs मध्ये ताओ, XS आणि हक्कांसाण अत्यत चांगले आहेत. तुम्हाला नृत्य वगैरे करायचे असेल तर ते फार चांगले आहेत पण दारू अतिशय महाग पडेल. एक ड्रिंक साधारण $२७ ला पडते. रिओ मधील वुडू चांगला क्लब आहे आणि स्वस्त सुद्धा आहे. तरुण मुलीं साठी बहुतेकदा प्रवेश फुकट असतो. आपण सुंदर असाल तर एखाद्या बाऊन्सर ला विनंती केली तर तो तुम्हाला विना पैसे विना लाईन आंत प्रवेश देतो. (before १० pm). ग्रुप असेल तर नेहमी बॉटल सर्व्हिस घ्या.
११. हूवर डेम वर जात असाल तर कृपया सनग्लासेस, जाकीट आणि पाणी न्यायला विसरू नका. मला तरी डेम चे विशेष आकर्षण नाही.
१२. गॉर्डन रॅम्सेच्या रेस्टोरंट मधील रिब्स अतिशय छान असतात पण थोड्या महाग पडतील.
१३. माझ्या मते आपण खादाड नसाल तर बफे थोडा महाग पडतो त्या पेक्षा बाहेर स्टेक हाऊस मध्ये जाऊन खा.
१४. कोका कोला शॉप मध्ये जरून जा. तिथे तुम्ही जगांतील सर्व कोक फ्लेवर्स सॅम्पल करू शकता.

वेगास मध्ये काय करू नये :
१. वेस्ट रिम (इथे काचेचा पूल आहे) : अजिबात जाऊ नका. काही हरामखोर रेड इंडियन लोकांनी हा पूल चोरला आहे आणि ते अक्षरशः लुबाडतात. ते तुम्हाला साधा फोटो सुद्धा घ्यायला देत नाही. फोटो सुद्धा त्यांच्याकडून पैसे देऊन आणि तो सुद्धा अतिशय खराब दर्जाचा देतील.
२. वेगास मध्ये लॉग रिलॅक्स असले तरी वेगास मध्ये वेश्यावृत्तीला बंदी आहे आणि स्ट्रीप परिसरांत कॅसिनो आणि पोलीस अत्यंत बारीक नजर ठेवून असतात. त्यामुळे त्या प्रकारापासून दूरच राहावे.
३. संपूर्ण कॅसिनो परिसरांत हजारो केमेरा असून आपल्यावर प्रत्येक क्षणी कुना नाही तरी कुणाची नजर असते त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या नियमाचा भंग करून नका १००% तुम्हाला त्याचा भुर्दंड पडेल. कसिनोची खाजगी सुरक्षा पोलिसा पेक्षा जास्त चांगली असते.
४. मनसोक्त दारू प्या पण कुठेही महिलांशी गैरवर्तन करू नका. भारतीय तरुण वेगास मध्ये येऊन बहुतेकदा असे गैरवर्तन करताना पकडले गेलेले मी पहिले आहेत. अश्या वेळी काही लोक तुम्हाला बदडतील, बाउन्सर लोक सुद्धा धक्के मारून बाहेर घालतील आणि पोलीस सुद्धा तुम्हाला वाचवायला येणार नाहीत. तुमची चूक नसेल तरी सुद्धा केवळ तुम्ही भरतीय आहेत म्हणून सुद्धा लोक तुमचीच चूक ठरवतील. हे nightclubs च्या dancefloor वर सुद्धा लागू होते.
५. दारू जास्त झाली तर एखाद्या सुरक्षा कर्मचाऱ्याला सांगितले तर तो कुना तरी स्टाफला सांगून तुम्हाला तुमच्या रूम वर सोडायची व्यवस्था करू शकतो. (फक्त महिला साठी)
६. Never Get Into cars with स्ट्रेन्जर्स ! uber पूल सुद्धा वापरू नका.
७. Mind your language ! जुगार खेळताना अर्वाच्य भाषा वापरली तर डीलर तुम्हाला हाकलून लावू शकतो.

वेगास अनुभव घ्यायचा असेल तर सर्वप्रथम अनोळखी माणसांशी संवाद साधा. अनेक कॅनेडिअन, युरोपिअन लोक तुम्हाला भेटतील आणि त्यांना सुद्धा संवाद साधायला आवडेल. बहुतेकदा स्त्री म्हणून मला ते नेहमी सोपे पडते पण मित्रांच्या अनुभवानुसार सुद्धा वेगास मध्ये नवीन ओळखी करून भटकंती करायची मजाच वेगळी आहे.

फारएन्ड's picture

27 Jan 2018 - 5:50 am | फारएन्ड

धन्यवाद साहना! मी वर्षातून दोनदा तरी जातो वेगास ला आणि तरीही अजून गन रेंज मधे गेलो नाही, पेन अ‍ॅण्ड टेलर वगैरे बघितलेले नाहीत. झुमॅनिटी पाहिलेला आहे पण तो अ‍ॅडल्ट थीमवर आहे. ते "ओ" वगैरे शोज पाहिलेले नाहीत. ब्लू मॅन ग्रूप वगैरे कसे आहेत? ऑक्सिजन बार काय प्रकार आहे माहीत नाही. वेब वर पाहतो.

आम्ही एकदा वेगास हून त्या ८ सीटर विमानाने कॅनियन ची टूर केली होती. वरून व्ह्यूज खूप मस्त दिसतात पण ही विमाने खूप 'जिटरी' असतात त्यामुळे ज्यांना बस लागणे वगैरे होते त्यांनी चुकूनही जाउ नये. कॅनियन च्या वर असताना पायलट विमान दोन्ही बाजूने अधूनमधून तिरपी करून तुम्हाला चांगले दिसेल असे करतो.

अनिंद्य's picture

28 Jan 2018 - 2:50 pm | अनिंद्य

@ साहना,
A 1 प्रतिसाद !

किल्लेदार's picture

12 Feb 2018 - 5:37 pm | किल्लेदार

थोडा उशिराच.... बघितला प्रतिसाद . सर्व उरकून आल्यावर हा प्रतिसाद बघितला. एनीवे माहितीबद्दल धन्यवाद. पुढच्या ट्रिप ला उपयोग होईलच. ज्ञान वाया जात नाही :)

बाकी ट्रिप हेक्टिक पण मस्त झाली. त्यावर एक धागा काढीनच.

अरविंद कोल्हटकर's picture

27 Jan 2018 - 3:26 am | अरविंद कोल्हटकर

वरच्या नावाचे म्यूझिअम वेगास गावामध्ये आहे. तेथे जायला स्ट्रिपवरून बसहि आहे. उत्सुकता असेल तर भेट देऊन या.

मी पाचसहा वर्षांपूर्वी गेलो होतो.