"या जय भीमवाल्यांचं काहितरी आहे", "उगाच दंगे करतात, काम करा म्हणावं त्यापेक्षा", " काहि नाही, फडणविसाची खुर्ची यांच्या डोळ्यात खुपतेय"
अश्याच सुरातल्या पण संभावित प्रतिक्रिया इथे बघायला मिळत आहेत. आपल्याला कोणत्याही प्रश्नाचा विचार फक्त आपल्या जागेवरूनच करायचा आहे हे खास आहे.
(१) भिमा कोरेगाव हा अभिमानाचा विषयच नाही. : मुळात चारपाच वर्षांपूर्वी हे स्मारक आणि त्याबद्द्ल कोणालाही जास्त महित नव्हते परंतू महार रेजिमेंट याला आपल्या अभिमानाचा विषय मानत होती. कोणत्याही समूहाला मग तो रेजिमेंट सारखा ऑफिशियल लढवय्या समूह असो वा जात, सार्वजनिक अभिमानाचा विषय शोधणं हे आपल्या सु-संस्कृतीचा भाग आहे, नाही का? तसंही भावनिक कढ काढण्याखेरीज काही करावं हे आपल्या सुसंस्कृत मनांना नको वाटतं. गेल्या काही वर्षात प्रत्येक समूहाने आपलं असं सार्वजनिक अभिमानस्थळ शोधून त्याचा उदो उदो करणं हे सुरू केलेलं आहे. आधुनिक विचारसरणीशी तुलना करायला गेल्यास प्रत्येक अभिमान स्थळावर प्रश्नचिन्ह उठवता येतील, पण तसं कोणी करत नाही कारण प्रत्येकामागे आंधळी झुंड असते. त्यामुळे प्रत्येक समूह, जातीगट आपल्या अभिमानस्थळाला जास्तीत जास्त ’टीआरपी" मिळ्वण्याच्या प्रयत्नात असतो, त्यातूनच मग त्या त्या गटाचं नेतृत्व उदयाला येतं. आपण एकंदरीतच समाज म्हणून विवेकी असण्यापेक्षा भावनेच्या लाटेवर हेलकावे खाणं स्वाकारतो.
(१ अ) मुळात भिमा कोरेगावचं युद्ध इंग्रजांनी जिंकलंच नव्हतं: नसेलही. पण महारांना ते आपल्या पूर्वजांच्या लढवय्येपणाचचं प्रतिक वाटतंय तर वाटू द्या नं. तिथे ते शांतपणे इतके वर्षं जातायत तर काय बिघडलं? या संदर्भात तिथे जमलेल्या लोकांना विरोध म्हणून दुकानं बंद केली गेली, त्यांच्यावर दगडफेक झाली अश्या प्रकारच्या बातम्या आहेत, त्याचं काय? जमलेले लोकं काही आता जाऊन इंग्रजांना आवताण देणार नव्हते. मग अश्या प्रकारे त्यांच्या विरूद्ध जनमत तयार करणं कोणत्या संस्कृतीत बसतं?
ब्राम्हण-मराठा सारख्या प्रस्थापित आणि गावपातळीवर मान असणार्या जातींना आपापली प्रतिकं लख्ख कराविशी वाटतात, तिथे झुंडीनं जावं वाटतं तर अजूनही मागास असलेल्या गावकुसाबाहेरच्या लोकांनी एवढा विचार करावा ही सक्ती का?
(२) राजकिय अपरिहार्यता: प्रत्येक गोष्टीत राजकारण्यांना दोष देणं ही फॅशन बनली आहे. कारण ते सोप्पय. आपणही आपल्या व्यक्तीगत पातळीवर हे राजकारण पुरेपूर खेळत असतो. अश्या जाती विभागणीला, उतरंडीला समाजात मान्यता असते, प्रत्येक व्यक्तीच्या मनात ती उतरंड जागी असते म्हणूनच त्याचा फायदा राजकारणी उठवू शकतात. प्रत्येकाने व्यक्ती म्हणून आपण ही उतरंड पाळतो की नाही (मानतो की नाही असं मी म्हटलेलं नाही. कारण ’मी मानत नाही पण नाती तोडून चालत नाहीत, सवय ’, वैगेरे सुटकेचे मार्ग असतात ) हे मनाला विचारावं. खालच्याला वर येण्यासाठी व्यक्तीगत पातळीवर आपण किती आधार दिलाय हे शोधून पहावं. तसं होत नाही. मागासांच्या वागण्यातल्या विसंगती शोधून, त्यांची आधुनिकता किती बेगडी आहे ह्याकडे बोट दाखवणारे आणि त्यांना वेगळे पाडणारेच मोठ्या संख्येने असतात. (इथे या विषयावर ज्या हिरीरीने लिहीलं गेलंय त्यावरून सिद्धच होत.) "जातीने महापुरुष वाटून घेतले आहेत", असं तोंडाने म्हणायचं आणि फक्त आपल्याच जातीतल्या महापुरुषाचा उदो उदो करायचा ही दांभिकता बहुसंख्यांमध्ये असते, म्हणून तर असे अभिमानी गट तयार होतात आणि राजकारण्यांना आयतं खाद्य मिळतं.
जातींनी महापुरुष वाटून घेतलेत म्हणणार्यांपैकी किती जणं आंबेडकर जयंती साजरी करतात? नाहीपेक्षा ती आपल्या सोसायटीत साजरी व्हावी असं किती जणांना वाटतं? उलटपक्षी कोणी करत असेल तर "ते जय भीम वाले" म्हणत आपण त्यातले नाही हे प्रकर्षाने दाखवलं जातं. मग वरील तक्रार करताना आपण दांभिकपणे वागत नाही का? किती जणांनी मुलांना राम-कृष्णासोबत बुद्धाच्या गोष्टी सांगीतल्या? किमान स्वत:तरी जाणून घेतल्या? "ही कसली मिरवणूक आहे?" असं विचारणार्या पहिलीतल्या मुलाला आंबेडकर- जयंतीच्या मिरवणुकीबद्द्ल "ज्यांच्यामुळे मला प्रमोशन मिळत नाहीय ना त्यांची मिरवणूक आहे" असं उत्तर माझ्या एका कलीगनं दिलं होतं. अर्धवट माहिती देऊन पुढील पिढीच्या मनात अशी विषाची पेरणी केली जाते.
(३) पेशवाईत महारांना कमरेला झाडू आणि गळ्यात मडकं बांधून वावरावं लागत होतं हे खरं नाही तसा कागदोपत्री पुरावा नाही:- पलीकडल्या संस्थळावरच्या विद्वान (हे उपहासाने म्हटलेलं नाही, आदर खरा आहे) इतिहाससंशोधकांनी तिथे "याला कागदोपत्री पुरावा कुठेय?" असं विचारलं आणि अर्धवट शहाणे पैलवान इथेही ते विचारत सुटलेत. महार इतके महत्वाचे होते का की त्यासाठी एक कागदी फर्मान सुटेल? कोतवालाला तोंडी आदेश दिले असणं ही शक्य आहे ना? हे ही शक्य आहे की सैन्यात मानाच्या ठिकाणी असलेल्यांना यातून सूट असेल पण सर्वसामान्य महारांना हे लागू असेल. मग ते फक्त सामान्य महारांना लागू होतं म्हणत त्याचं समर्थन करता का? झाडू-गाडगं नसेलही पण "बाजू हो शिवशील, सावली पडली तर विटाळ होईल" हे उद्गार तरी महारांसाठी निघत होतेच ना? मग त्याचं समर्थन करताय का? किती वर्षं हे ऐकावं लागत होतं? अजूनही कुठेतरी लागत असेल. कोपर्यातल्या कपात वरून पडलेला चा पिणारी म्हारीण तर आता आतापर्यंत साहित्याचा भाग होतीच ना. ती काय सर्वस्वी काल्पनिक होती?
बरं धरून चालू की हे झाडू-गाडगं प्रकरण खोटं होतं. पण महारांना किती गावात मानाचं स्थान होतं? इथे आपण किती गावच्या मातीतले आहोत हे दाखवण्याची होड लागलेली असते, त्यांना हे गावाचं वास्तव माहित नाही का? आताही त्यांना दिला जाणारा मान किती मनापासून येतो? वेळ येताच "गेले आपल्या जातीवर", "हे असंच अन्कल्चर्ड वागणार", "माजलेत" अशी मुक्ताफळं उधळली जात नाहीत का? आणि "माजलेत, पायरी सोडताय" म्हणत हत्याही घडवल्या जातातच ना?
(४) आरक्षण म्हणजे फुकटचंबूपणा : आरक्षण लागू केल्यावर द्णादण सगळ्या महारांनी आरक्षणाचा लाभ घ्यावा एवढं शिक्षण त्यांच्याकडे होतं का? आरक्षण घेतलेली पहिली पिढी आता कुठे रिटायर होतेय. पिढ्यापिढ्या शिक्षण, मानाचं जगणं नाकारलं गेलेली, स्वत:ची जमीन नसलेली अशी जमात आता कुठे प्रवाहात येऊ लागलीय तर फुकटचंबूपणा दिसतो. मग ब्राम्हणांनाही आरक्षण हवं म्हणत ब्राम्हण मेळावे का भरवता? आमचे पूर्वज कसे वेदशास्त्रसंपन्न होते म्हणत अभिमान मिरवता त्याच पूर्वजांचा (त्यावेळची जनरीत म्हणून का होईना) काहीजणांना जन्मावर आधारीत उपेक्षेची वागणूक देण्यात सहभाग होताच म्हणून लाजही वाटून घ्यावी का वाटत नाही? यालाच दांभिकपणा म्हणतात.
(५) दलितांच्या आंदोलनात नासधूस जाळपोळ होतेच:- इतर आंदोलनात होत नाही का?. स्वघोषित सैनिक काय पुष्पवृष्टी करत आंदोलनं करतात का? जाळपोळीचं समर्थन नाही पण ठराविक समाजाला दोष का देता? रिकामटेकडे आणि समाजकंटक ही नासधूस करतात आणि प्रत्येक आंदोलनात थोडफार होतंच. ते होऊ नये तर ठाम कायद्याचं राज्य हवं (मग त्या राज्यात झुंडीने प्रार्थनास्थळ पाडता येईल का हो? ती सूट द्यायला हवी नाही का? किमान गोमाताचोरांना देहदंड देण्याची गोमातेच्या सुपुत्रांची गुंडगिरी क्षम्य मानायला हवी नाही का? )
(६) प्रकाश आंबेडकरांनी याचा राजकीय लाभ उठवला / त्यांनी चिघळवलं: इथे एवढ्या लिंका फेकल्या गेल्या आहेत. त्यात ही एक ही वाचून पहावी. प्रकाश आंबेडकरांचा ३१ डिसेंबरला प्रकाशित झालेला लेख आहे. त्यात त्यांनी ह्या विजयस्तंभाबद्द्लची मांडणी भावनिक आहे असं म्हटलय. त्यांची मांडणी पोलोटिकली करेक्ट असण्यापेक्शा लॉजिकली करेक्ट असते म्हणूनच निवडणुकीच्या राजकारणात त्यांना स्थान निर्माण करता येत नाही.
प्रकाश आंबेडकरांची राजकीय ताकद ती काय आणि अशी आंदोलनं ते करतातच कशी काय? असा एक सुज्ञ प्रश्न आहे. म्हणजे? जे निवडून येऊ शकतात त्यांना अशी हिंसक आंदोलनं करण्याचा फुकट परवाना मिळतो? जे निवडून येत नाहीत त्यांची अशी काही बाजू नसतेच? आंबेडकरांनी हिंसक आंदोलन करा असं म्हटलं होतं का? कोणाला जमवलेल्या जमावावर नियंत्रण ठेवता येतं? (ठेवता आलं असतं तर बाबरी मशीद पाडली गेली नसती. का ती नियंत्रणाखाली जाणून बुजून घडवलेली घटना होती?)
(७) दरवर्षी एवढे लोक येत नाहीत यावेळेला मुदाम जमवून दंगल माजवली : एवढी माणसं काय एकदम आकाशातून अवतरली का? ही माणसं एवढ्या मोठ्या संख्येनं येणार याची गृहखात्याला खबर लागत नाही का?
[२०० वर्षापूर्वीच्या लढाई बद्द्ल : (१) पेशवे हरले नाहीत त्यांनी गनिमी कावा वापरला
(२) इंग्रज हरले पण त्यांनी स्तंभ उभारला
(३) इंग्रज जिंकले पण त्यांचं खूप नुकसान झालं
इतके किमान पर्याय संभवतात
तेवढ्याच जुन्या झाडू गाडगं प्रथेबद्द्ल (१) ती होती
(२) नव्ह्ती
इतके किमान पर्याय संभवतात
मात्र राम होताच आणि तो अयोध्येत विवक्षित ठिकाणीच जन्मला हे ठामपणे सांगीतलं जातं, जणू रामजन्मानंतर घुगर्या वाटायचं काम कौसल्यामातेनं यांच्याकडेच सोपवलेलं होतं. ]
एखादं उभ असलेलं स्ट्र्क्चर झुंडशाहीने पाडून आर्थिक विकासाकडे वाटचाल करणार्या भारतीय समाजाला थेट पुराणकाळात नेऊन दोन दंगलखोर बनविणार्या, "खतरेमें" ची हूल देत हिंदू समाजाला गेल्या दशकांपर्यंत आणि अजूनही वेठीला धरणार्यांबद्द्ल प्रेम असणार्यांनी दोन दिवसातल्या आर्थिक नुकसानीबद्द्ल गळे काढावे हा शुद्ध दांभिकपणा नाही का?
हे सर्व या संस्थळावर आलेल्या प्रतिक्रियांबद्द्ल आहे. त्या प्रतिक्रिया बघताना एक लक्षात आलं की मुळात एखाद्या ठिकाणी जमाव मोठ्या संख्येनं येतो त्यावर दगडफेक होते, दुकानं बंद ठेवली जातात, त्यांच्याविरोधात वातावरण तयार केलं जातं, या मूळ मुद्द्यावर कोणीही बोलत नाहीय. जणू काही ते चुकीचं स्मारक पुजताहेत म्हणोन त्यांनी दगड खायलाच हवेत. खरंतर "याच लोकांनी दगड आणून आजूबाजूच्या घरातून साठवून ठेवले असतील आम्हाला मारा म्ह्णून", एवढंच सरळसोट म्हणायचं बाकी राहिलं आहे. हे असतं आपल्याला हवं तेच बघण्याचं आणि सांगण्याचं टेक्निक. पिढ्यानपिढ्याच्या सुसंस्कृतपणाचा अभिमान आणि नव्या युगाचं शिक्षण हे यासाठी छानपैकी वापरता येतं.
’बाबासाहेबांना आम्ही मानतो पण हे आहेत का कोणी तसे?" असं सर्रास म्हणणार्या किती जणांमध्ये त्यांच्या त्यांच्या जातीच्या महापुरुषाचे गुण १०% तरी आहेत?
अरे ही गावकुसाबाहेर ठेवलेली माणसं आता प्रवाहात येतायत. आता जगणं शिकलेली ही नवीन पिढी ही आधीच्या पिढीचा अशिक्षित वा अर्धशिक्षितपणा, एकंदरीत जगण्यात वाढलेली स्पर्धा, स्त्री-पुरूष समानता, गावाकड्ची आपली माणसं आणि नवीन सुशिक्षित समाजात वावरताना आजूबाजूला गोळा केलेली माणसं यांच्यात वावरण्याचा तोल सावरणे, आपल्या पूर्वज-काळात फारसं अभिमानास्पद काही नाही किंवा जे आहे असं आपण मानतो त्याला समाज मान देत नाही अश्या अनेक पातळ्यांवर लढत असते. संपन्नतेची सुखं उपभोगतानाही स्वप्निल सोनावणे, नितीन आगे सारखी प्रकरण त्यांना आपण आजूनही गावकुसाबाहेरच आहोत याचं वेदनादायक भान आणून देतात, सैरभैर करून सोडतात. व्यक्तिगत पातळीवर छोटे मोठे संभावित अपमान आणि "तुम्ही ते काय!" च्या नजरा असतातच. मास्लोच्या पहिल्या पायरीवरून आताच वर चढलेल्या या लोकांनी थेट चौथ्यापातळीवरचा विचार करावा अशी अपेक्षा बाळगत समाज यांच्याकडे
(१) आरक्षणाच्या कुबड्या घेतलेले हे लोक (२) संस्कार आहेत का यांच्याकडे (३) मी म्हटलं बाकी कोणीही आण नवरा/नवरी म्हणून पण जय भीमवाला/वाली नको बाई (४) अच्छा तू *** आहेस? वाटत नाही हे असे अनेक खडे येता जाता फेकत असतो आणि त्यांचेच दगड होऊन अश्या आंदोलनातून समाजाकडे भिरकावले जातात. तेव्हा हे असे खडे आपल्याकडून भिरकावले जाणार नाही याची प्रत्येकाने वैयक्तिकरित्या दक्षता घेतली तरी हे असे भडके उडण्याला थोडाबहुत आळा बसेल. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापटांनी या स्मारकाला भेट देऊन तिथल्या व्यवस्थेसाठी बैठक घेतली एवढंच फेबुवर पोस्ट केलं. त्या पोस्टवर एवढ्या विखारी प्रतिक्रिया आल्यात की हेच का ते सामान्य मध्यमवर्गीय आणि हाच काय तो ब्राम्हणी सुसंकृतपणा, अशी शंका येते. ( कुंभमेळ्यासाठी दुष्काळातही गोदावरीत पाणी ओतलं तेव्हा ते नाही खटकलं या लोकांना.) हाच मानभावी सुसंस्कृतपणा या मागासवर्गीय शहरी लोकांना पदोपदी भेटत असतो (गावच्यांचे प्रश्न आजून वेगळे.) आणि त्या घाणीत पाय बरबटू न देता त्यांना स्वतःचं जगणं अजून चांगलं करायचं असतं. इथे दणादण प्रतिक्रिया देण्याएवढं सोपे नसतं ते एवढ भान तरी ठेवावं. आपल्याला समाजात मान आहे, आपलया प्रतिकांना ही अखील समाजाची प्रतिकं म्हणून मान मिळतो पर्यायाने आपल्याला मान मिळतो तरिही लहानपणी आपल्याला "बामण भट कढी आंबट" म्हणून चिडवत होते हे शल्य जाणवतं तर आपल्याला मानच नाही आपले आई वडील केवळ जन्माने वरच्या जातीतला म्हणून छोट्या वयाच्या व्यक्तीलाही मान देतात, हात जोडतात (हे आता आता पर्यंत उत्तर, मध्यप्रदेशात होतं की नाही? अजूनही असेल) हे बघताना त्या जातीच्या मुलांना वेदना होत नसतील का? जिथे तिथे आपली लायकी काढली जाते आपल्याला कमी लेखलं जातं हे स्वीकारून आत्मसन्मान कसा जपत असतील ते? पूर्वंजांच्या चार कथा उचलून निरूपणं करत बसण्याएवढं साधं नाही ते.
सफाईकामात अजूनही ठराविक जातीला अघोषित आरक्षण आहे, जाता का हिरीरीने तिथे आरक्षण नको म्हणत? सवर्णांना चांगलं बोलण, वाचणं बाळकडू घरात मिळालेलं असतं. ५० च्या दशकातल्या बहुसंख्य आरक्षितांना ते मिळालं होतं का? पण उच्चारावरून लिहीण्यावरून , वागण्या बोलण्यातल्या रांगडेपणावरून त्यांना खुसूखुसू हसताना ते हे कुठून शिकतील हे भान असतं का? कुणी उच्च्पदस्थ वा परदेशस्थ नातेवाईक, उच्चविद्याविभुषित परिचितांचं मार्ग दर्शन, आईवडिलांनी साठवलेला पैसा, मिळवलेलं ज्ञान या कुठल्याच कुबड्या आपण नाही वापरल्या का? मग ज्यांच्या अगदी एखादया पिढीपलीकडल्या पूर्वजांनी भिका मागत पोटं भरली (ज्याला जोदार असं गोंडस नाव दिलं गेलं होतं.) त्यांनी एखादी कुबडी वापरली तर त्यांना चोर म्हणावं वाटतं? त्या कुबड्याच आहेत हे वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाला माहित असतं पण "ते जय-भीमवाले " असं म्हणत त्यांना आपण "घेट्टोत" ढकलतो. त्या कुबड्या पुढच्या पिढीला वापराव्याश्या वाटू नयेत असं समाज म्हणून आपण काय करतो? आरक्षणाविरूद्ध इथे गळे काढले जातात मग मेडिकलच्या सीटस जातीची खोटी प्रमाणपत्र देऊन मिळवल्याचं प्रकरण उघडकीला आलं होतं त्याचा निषेध किती जणांनी केला या संस्थळावर? मनोमन तरी किती जणांना वाटलं हे चुकीचं झालं म्हणून? एखादा मागासवर्गीय जनरल जागेसाठी अर्ज करू लागला की "आले हे. स्वत:च्या राखीव जागेतूनच करायचा ना अर्ज, इथेपण यांना हवं" अशी बरोबर उलटी भुमिका घेतली जात नाही का? अश्यावेळी तो माणूस स्वत:ला आजमावण्याचं धाडस कसं करेल याचा विचार अश्या पिंका टाकताना केला जातो का? समाज म्हणून ते नाही तर सवर्ण किती मागासलेले आहेत हेच यातून दिसतंय.
आता खरंतर भिमा-कोरेगाव प्रकरणीत ग्रामस्थांनी परस्पर सहकार्याची भुमिका घेतल्याच्या बातम्या आहेत. चूक कोणाचीही असो असं पुन्हा होणार नाही अशी भाषा दोन्ही बाजूकडून झाली आणि ते ही कोणत्याही प्रस्थापित राजकारण्यांच्या नाक खुपसण्याला वाव न देता. ही खूप आशेची गोष्ट आहे. कदाचित इथल्या मंडळीसारखी जानवं या खांद्यावरून त्या खांद्यावर करत सव्यापसव्याला कसरत म्हणण्याची कला त्यांना अवगत नसावी. दोन गटात फूट पडणे हे आपल्या जगणं कठीण होण्याशी थेट निगडीत आहे, याचं गावकर्यांना लवकर भान आलं असावं. पण ते झालं हे खरच चांगलं, समुद्रमंथनातून विषाबरोबर अमृतही निघतं हा दिलासा देणारं आहे. या संस्थळावर मात्र शहाण्यांनी विषाचा प्यालाच दाखवत जो काही एकांगी हैदोस घातलाय तो बघता या समाजातलं असल्याची लाज वाटावी. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही एवढे विष ओकू शकता तर खाजगीत किती विषमय असाल? असो, अश्या बाबतीत यापुढे तरी विवेकाने विचार मांडावा (जमल्यास करावा) एवढीच अपेक्षा. राजकारणी, ब्रिटीश, संघटना या कोणालाही नावं ठेवण्याआधी प्रत्येकाने माझ्याकडून जे मांडलं जातय त्यात तथ्य किती आणि कांगावा किती याचा डोकं स्थिर ठेवून विचार केला तरी अश्या घटना टळायला मदतच होईल. शेवटी समाज म्हणून सगळ्यांनाच पुढे जायचय.
प्रतिक्रिया
6 Jan 2018 - 12:26 pm | अविनाशकुलकर्णी
21- मुझे विश्वास है कि मैं फिर से जन्म ले रहा हूँ (इस धर्म परिवर्तन के द्वारा).
मग गतजन्मीच्या जाती च कौतुक कशाला?
6 Jan 2018 - 6:10 pm | पगला गजोधर
अविनाशजी....
निदान या जन्मी...
एखाद्या महाराने शंकराचार्य व्हावं, आणि शेकडो ब्राह्मणांनी त्या शंकराचर्याच्या पाया पडावं....
6 Jan 2018 - 8:45 pm | सुबोध खरे
एखाद्या महाराने शंकराचार्य व्हावं, आणि शेकडो ब्राह्मणांनी त्या शंकराचर्याच्या पाया पडावॅ
गजोधर बुवा
आमच्यासारखे असंख्य ब्राम्हण भक्तिभावाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पाया पडतात.
माणूस कर्तृत्वाने मोठा व्हावा. कोणी " चढवल्याने" नव्हे
6 Jan 2018 - 10:41 pm | सुखीमाणूस
कुठलाही बहुजन शंकराचार्य का नको?
अणि पाय फक्त ब्राम्हणानी का धरावेत सगळ्यानी का नको?
उलट कुठल्याही जातीच्या माणसाने शंकराचार्य व्हावे व सर्व जातीतल्या लोकानी त्याना वन्दावे
7 Jan 2018 - 7:11 am | एमी
ते शंकराचार्य आणि पाय वगैरे राहुदेत!
आपण जातपात न मानणारे आहोत अशा समजुतीत असलेल्यां प्रत्येकाने एक प्रयत्न करा. तुमचा एखाद दलित मित्र/मैत्रीण आहे? त्याला/तिला आणा मिपावर आणि एक वर्ष एक्टिव ठेवा.
बघा जमतय का!
इथे साध्या RTE मुळे 'त्यांची' मुलं 'आपल्या'सोबत शिकायला लागली हे सहन होत नाहीय लोकांना. विषवल्ली वगैरे म्हणत सुटलेत आणि शंकराचार्य बनायच्या बाता करतायत......
7 Jan 2018 - 7:59 am | सुखीमाणूस
आजकाल काही चांगल सांगायला गेल की तुमच बामणी शहाणपण शिकवू नका आस ऐकायला लागत.
दलित मैत्रिणीलां मिपावर आणून काय बर सिद्ध होईल सामाजिक एकता?
शाळेत नक्की सगळ्या प्रकारची मुले असावीत. त्याचा फायदा मुलांनाच होतो. आम्ही तर मुलाना मुद्दाम अशा शाळेत घातले जिथे मिक्स क्राउड असेल. अगदी दोघांच्या शाळाही बदलल्या कारण आधीची शाळा फारच साजूक तुपातली वाटली.
सगळ्या मुलांनी आपल्याहून गरीब/श्रीमंत लोकांच्यात सहजतेने वावरले पाहीजे. कुठलाही गंड न बाळगता.
आता एकीकडे समानता हवी असे म्हणायचे आणि दुसरीकडे मराठ्यांना वेगळ करायचा प्रयत्न करायचा. अवघड आहे बुवा.
7 Jan 2018 - 8:19 am | पगला गजोधर
ओ पंत, टेस्टमोनि आहे प्रत्यक्ष दर्शी कडून ...
शाळेत नावात "दक्षिण" अर्थी शब्द असलेल्या शैक्षणिक संस्थेत, ऍडमिशन च्या वेळेस, एका विशिष्ट जातीच्या मुलांनाच निवडा/पुढे आणा, आणि मुस्लिम मुले अजिबात नको, पुढे शैक्षणिक वर्षात शाळेच्या प्रतिनिधीतवात भलेही ते ओलांपियाड असो किंवा अजून काही... फक्त बुद्धीवान आडनावाची जमातच निवडा, असे स्पष्ट व्हर्बल ऑर्डर्स आहेत...
लवकरच स्टिंग करून पुढे आणूच मॅटर....
7 Jan 2018 - 8:25 am | एमी
आजकाल काही चांगल सांगायला गेल की तुमच बामणी शहाणपण शिकवू नका आस ऐकायला लागत. >> सांगणार्याच्या बोलण्यातला आणि वागण्यातला फरक जाणवत असेल त्याना लगेच; म्हणून असं काहीतरी ऐकावं लागतं...
10 Jan 2018 - 7:41 am | अंतरा आनंद
+१
10 Jan 2018 - 10:59 pm | अंतरा आनंद
खर आहे अॅमी.
9 Jan 2018 - 12:57 pm | अविनाशकुलकर्णी
जे महार धर्मान्तर करून इसाई मुसलमान झाले ते का येत नाहीत समारंभाला?
त्यांना अभिमान नाही का आपल्या पूर्वाश्रमीच्या जातीचा
9 Jan 2018 - 2:10 pm | पगला गजोधर
अविनाशजी,
या कार्यक्रमाला येणाऱ्या जनतेची "जातीनिहाय व धर्मनिहाय",
माहिती/डेटा/संदर्भ आपल्याला देता येईल काय इथे ?
म्हणजे ती माहिती अभ्यासून आपल्याला उत्तर देता येईल, मिपावरील सभासदांपैकी कोणालाही....
6 Jan 2018 - 1:24 pm | एमी
नसेलही. पण महारांना ते आपल्या पूर्वजांच्या लढवय्येपणाचचं प्रतिक वाटतंय तर वाटू द्या नं. तिथे ते शांतपणे इतके वर्षं जातायत तर काय बिघडलं? >> +१.
===
इतिहाससंशोधकांनी तिथे "याला कागदोपत्री पुरावा कुठेय?" असं विचारलं आणि अर्धवट शहाणे पैलवान इथेही ते विचारत सुटलेत. महार इतके महत्वाचे होते का की त्यासाठी एक कागदी फर्मान सुटेल? >> जोपर्यंत टाईम मशीनचा शोध लागत नाही तोपर्यंतत 'खरा' इतिहास कळणार नाही. कागद, कलम उपलब्ध असलेले+ लिहिता येणारे जे थोडेफार असतील त्यांनी जे लिहिलं त्यावर विसम्बुन राहायचं. ब्रिटिश काहीतरी लिहिणार, ब्राह्मण काहीतरी लिहिणार, अर्थ लावणारं काहीतरी अर्थ लावणार.... आणि सत्य काहीतरी तिसरेच असणार....
===
बाकीचे नंतर वाचते :)
6 Jan 2018 - 1:51 pm | शलभ
इकडच्या प्रतिक्रिया वाचुन 2 दिवस असलेच विचार येत होते.. बाकी वेळा चांगली असणारी माणसं अशावेळी ईतकी विखारी कशी होतात. तुम्ही खूप पोटतिडकीने लिहिलंय पण त्यातही चुका काढणारे येतील पण त्यातला आशय किती जण समजून घेतील?
असे खडे फेकणारे तर रोजच दिसतात.
6 Jan 2018 - 3:50 pm | संजय पाटिल
जर तुम्ही मुस्लीम असाल आणि तुम्हाला या देशात असुरक्षित वाटायला लागलं असेल,
जर तुम्ही दलित असाल आणि अचानक तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आपला अपमान केला जातो असं वाटत असेल,
जर तुम्ही हिंदू असाल आणि अचानक तुम्हाला वाटायला लागलं की हिंदु धर्म धोक्यात आलाय,
जर तुम्ही जैन असाल आणि तुम्हाला अचानक वाटतंय की आपल्या परंपरा बंद केल्या जात आहेत,
तुम्ही कुठल्याही जातीधर्माचे असाल आणि अचानक तुम्हाला जातीधर्माच्या वादांमुळे असुरक्षित वाटायला लागेल
तेव्हा
—सोशल मिडियापासुन दूर रहा...
— न्युज चॅनलवरची भांडणं पाहु नका
आणि एकच काम करा
एकदा तुमच्या सभोवताली असलेल्या तुमच्या वेगवेगळ्या जातीधर्माच्या पण जीवाला जीव देणार्या मिञांना आठवून पहा...
तुम्ही एका सुंदर देशात राहता याचा तुम्हाला अभिमान वाटेल
कायप्पा फॉरवर्ड!
6 Jan 2018 - 4:51 pm | अर्धवटराव
लॉजीकल म्हणा किंवा पोटतिडकिने म्हणा, जे काहि टंकलय ते प्रामाणिकपणे अवतरलय म्हणुन हा प्रतिसाद प्रपंच.
जातीच्या उतरंडीत दलीत-पददलीतांना अनंत यातना भोगाव्या लागल्या यात कोणाचं दुमत नसावं. ऐकुन खरं वाटणार नाहि, पण जातीव्यवस्थेमुळे जे दु:ख दलीतांनी भोगलं तेच आणि तसच दु:ख प्रामुख्याने ब्राह्मण समाजाने भोगलं. अर्थव्यवस्थेत नगण्य स्थान, आपल्या वाटेला आलेल्या कामाचा घरबंध नसण्याचा मानसीक जाच, सामाजीक अवहेलना (केवळ इतर जातींमधुन नाहि तर अगदी स्वजातीय, किंबहुना स्वजातीय जास्तच), स्त्रीयांची पिळवणुन (केवळ एक स्त्री म्हणुन नव्हे तर ब्राह्मणाच्या घरी जन्माला आलली स्त्री म्हणुन) हे केवळ वानगीदाखल उदाहरणं. जातीय श्रेठत्वाचा अहंकार, थोडीफार सामाजीक जबाबदारीची जाणिव आणि काहि पदं, कधिमधी चार दमड्या गाठीशी, एव्हढ्या भांडवलावर भटांचं दु:ख झाकल्या गेलं. अर्थात, त्याची दलीतांच्या दु:खाशी तुलना होणार नाहि, पण पिढीजात दु:ख भोगल्यामुळे दलीत समाजाचा दंगल सदृश उद्रेक एकवेळ स्वाभावीक म्हणता येईल, पण तो जस्टीफाय होत नाहि.
भूकमरीने मरणासन्न झालेल्या माणसाने अन्नाची नासाडी करण्याबाबत जो आक्षेप आहे त्याच पद्धतीचा आक्षेप दलीत समाजाबाबत, मुख्यतः त्यांच्या नेतृत्वाबद्दल ऐकायला मिळतो. भारताचे राजकीय स्वातंत्र्य आणि आंबेडकरांचा उदय असे दोन सुदैवयोग एकाच कालखंडात भारतात अवतरले. त्यापैकी भारतीय स्वातंत्र्य दोन पाऊल पुढे, एक पाऊल मागे करता करता लोकशाहीच्या मार्गाने उन्नत होत गेलं. त्याच वेगाने बाबासाहेबांनी चेतवलेला ज्ञानप्रकाश दलीत समाजात मॅच्युअर झाला असता तर आज दलीत समाजाने आपल्या विद्वत्तेच्या आणि कर्तुत्वाच्या जोरावर उभा भारत पादाक्रांत केला असता. त्याच्या नेमकी उलट स्थिती आज बघायला मिळते. ज्ञानलालसेने पेटुन उठलेल्या दलीत विद्यापीठांमधे अॅडमिशन घेताना जीव मेटाकुटीला येणारे सर्व वर्गाचे विद्यार्थी बघण्याऐवजी आरक्षणाची ढाल मिरवण्यात आनंद मानणारा दलीत समाज बघुन खेद वाटतो (हे सार्वत्रीकरण नाहि. खरोखर विद्वत्ता गाजवणार्या दलीतांची संख्या अजीबात कमि नाहि. पण समाज म्हणुन हे वास्तव आहेच). शिवाय आता हा ट्रेंड वेगळच रुप घेताना दिसतो. ज्यांना ठेचा लागल्या, ज्यांचे मार्ग अवरुद्ध करण्यात आले, त्यांच्या वाटा मोकळ्या झाल्याबरोबर त्यांनी आपले राजमार्ग बनवण्यात व्यग्र होण्याऐवजी ते रस्ता रोको करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवताहेत. अभिमानाची उदाहरणं तयार करण्याऐवजी अत्यंत तकलादु अशा अभिमानाच्या जागा इतिहासातुन उकरुन काढायला बघताहेत. यात इतर कुणाचं नाहि, स्वतः दलितांचं नुकसान आहे.
राहिला मुद्दा भिमा-कोरेगाव प्रकरणातल्या राजकारणाचा. हि सर्व भानगड राजकारणच नाहि तर सत्ताकारण प्रेरीत आहे असं मानायला भरपूर वाव आहे. गुजरातमधे तद्दन जातीय भांडवलावर एक तरुण आमदार होतो. दिल्लीस्थीत राजकारण्यांच्या साथीने देशपातळीवर जातीय खेळी मांडायला महाराष्ट्रातुन सुरुवात करतो. त्याला प्रकाश आंबेडकरांसारखे जुने-जाणते लिडर्स बळी पडतात याचं जास्त दु:ख वाटतं.
असो. हा केवळ दलीत समाजाचा प्रॉब्लेम आहे असं नव्हे. कमि-अधीक प्रमाणात/प्रकारात सर्वत्र हे असच चालु आहे. पिकल्या पानांनी काय करायचे ते उपद्व्याप केले आहेतच. नवीन पिढीने डोळे उघडे ठेऊन मार्गक्रमण करावे आशी इच्छा आहे. बाकी आपला मेरा भारत महान आहेच.
7 Jan 2018 - 11:49 pm | अंतरा आनंद
ऐकुन खरं वाटणार नाहि, पण जातीव्यवस्थेमुळे जे दु:ख दलीतांनी भोगलं तेच आणि तसच दु:ख प्रामुख्याने ब्राह्मण समाजाने भोगलं. >> राजकारण, समाज आणि एकूणच परिस्थिती बदलताना प्रत्येक जातीने दु:ख भोगलय. ब्राम्हण म्हणून त्यांना किमान मान मिळत होता हे तुम्ही नाकारू शकतच नाही. हा मान दलितांना नव्हता किंबहूना तो असावा ही जाणीवही नव्हती. आंबेडकरांनी ही जाणीव निर्माण करण्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न केले. ही अशी मानचिन्ह शोधणं, हिंदू संस्कृतीमधले, धर्मातले विपर्यास दाखवणं हे सर्व समाजाचा आत्मसन्मान जागृत करण्यासाठी आवश्यक वाटलं असावं. जेणेकरून आपली परिस्थिती ही आपल्या गतजन्माच्या कर्माचे फळ किंवा धर्माने आपल्याला जे दिलय तेच स्वाकारायला हवं असे विचार सोडून त्यांनी आपली परिस्थिती बदलण्यासाठी प्रवृत्त व्हावं.
स्त्रियांच्या बाबतीत तुम्ही बरोबर बोलताय. किंबहूना ब्राम्हणांच्या स्त्रियांना जिथे पोचायला शतकं लागली तिथे या स्त्रिया काही दशकातच पोहोचू लागल्या. कारण परिस्थितीने आधीपासून त्यांना घराबाहेर पडायची सवय होती. म्हणूनच ब्राम्हण बायका जेव्हा जातीच्या अभिमानाबद्दल बोलत असतात तेव्हा सांगावं वाटतं की बायांनो या जातीनं कित्येक वर्षं तुम्हाला काय दिलय त्याची मोजदाद करा आणि मग अभिमानाच्या गोष्टी करा. केशवपवन, सतीसारख्या टोकाच्या स्त्रीद्वेष्ट्या सवर्ण सामाजातल्या प्रथा या समाजात नव्हत्या. अर्थात घरातलं स्त्रियांचं स्थान दुय्यमच होतं पण तोंड दाबून बुक्क्याचा मार नसावा.
त्याच वेगाने बाबासाहेबांनी चेतवलेला ज्ञानप्रकाश दलीत समाजात मॅच्युअर झाला असता तर आज दलीत समाजाने आपल्या विद्वत्तेच्या आणि कर्तुत्वाच्या जोरावर उभा भारत पादाक्रांत केला असता. त्याच्या नेमकी उलट स्थिती आज बघायला मिळते. >> विद्वता आणि कर्तृत्वाला अचूकपणे पुढे येण्यासाठी आपल्या भारतीय व्यवस्थेत जागा आहे का हो? कोणत्याही व्यवस्था ठाम नियमांनी बांधलेल्या नाहीत. आरक्षित जागां खोट्या प्रमाणपत्राने मिळ्वणे हे त्यातलंच एक, बरेचदा उमेदवार मिळत नाही म्हणून जागा ठाराविक वर्ष रिकाम्या ठेवून मग जनरल उमेदवार नेमला जाणं हे सर्रास होत होतं कालपरवापर्यंत. समाजाने टाकलेले आरक्षणाचे चार तुकडे त्यांनी निमूटपणे चघळावे आणि उपकार मानावे अश्या प्रकारच्या मानसिकतेचं वारंवार घडणारं दर्शन . जिथे आरक्षित आहे तिथे हा प्रकार मग परफॉर्मन्स बेस्ड जागांवर/ व्यवसायांसंदर्भात विचारूच नका. इथेच कित्येक वेळेला आरक्षित कोट्यातून प्रवेश मिळवलेल्या डॉक्टरकडे मी का जाव? असा प्रश्न विचारला गेलाय. डॉक्टर होण्याची पात्रता नसलेली पण वडिलांच्या पाठिंब्यावर पुढे जात राहणारी मुले, पेड सीट्सवर प्रवेश मिळवलेली मुले यांच्या बाबतीत असं विधान मी ऐकलेलं नाही. फक्त आरक्षित म्हणजे गुणहीन, नि:सत्व, आणि पैश्याच्या वा वशिल्याच्या जोरावर पुढे जाणारी?
बरेचदा योग्य व्यक्तींना पुढे आणण्यात मिडियाची भुमिका निर्णायक ठरते. मिडीयात अर्थातच चांगलं लिहीता- बोलता येण्याला प्राधान्य असल्याने सवर्णांचं वर्चस्व असतं त्या मुळे कौतुकही सिलेक्टीव्हांचच होतान दिसतं. (हे आता त्वरेने भूतकाळात जमा होत आहे याची मला कल्पना आहे.) दलित साहित्य म्हणजे दु:खांचं भांडवल करणारं असं म्हणताना शिल्पा कांबळेची "निळ्या डोळ्यांची मुलगी" मिडीयानं कितीसं उचलून धरलं? या पुस्तकात ज्या अलिप्तपणे दलितत्व, शिक्षणाची आस, भोवतालची दारू, झगड्यातली संस्कृती, आपल्या आपल्याच सुस्थितीत पोचलेल्याकडून नाकारलं जाणं अश्या अनेक सत्यांची गुंफण आहे ती निव्वळ अमेझिंग आहे. किती ठिकाणी या पुस्तकांची परिक्षण लिहीली गेलीत? अनुल्लेखानं मारलं जाणं हे कित्येक गुणी दलित कलाकारांनी सोसलय, सोसत आहेत. त्यांचं पॉलिश्ड नसणं हे त्यांच्या गुणांना मारत आलेलं आहे. अर्थात ही परिस्थिती आता झपाट्याने बदलते आहे.
ज्यांना ठेचा लागल्या, ज्यांचे मार्ग अवरुद्ध करण्यात आले, त्यांच्या वाटा मोकळ्या झाल्याबरोबर त्यांनी आपले राजमार्ग बनवण्यात व्यग्र होण्याऐवजी ते रस्ता रोको करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवताहेत. अभिमानाची उदाहरणं तयार करण्याऐवजी अत्यंत तकलादु अशा अभिमानाच्या जागा इतिहासातुन उकरुन काढायला बघताहेत. >>
हे करायला सामाजिक वातावरणही कारणीभूत असतं. आपले पूर्वज, आपली संस्कृती याबद्दल नको तेवढा अभिमान आजूबाजूला ओसंडून वाहत असताना प्रत्येक जातीगटाला आपापल्या अभिमानाच्या जागा शोधायच्या असतात. त्या "तकलादू" आहे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्या गटाच्या अस्मितेला ठेच पोहोचते आणि सामाजिक ऐक्यात मुळातच असलेल्या भेगा रुंदावायला लागतात. मला नेमकं हेच म्हणायचं आहे. कोणत्या गटाचा अभ्भिमानविषय कसा चुकीचाय ते दाखवत बसायची इतरांनाही गरज का भासावी? वाद त्यांच्या अभिमानाच्या जागेवरून झालेला नाही आणि ते आता उकरून काढलेलं ही नाही. पण सध्याच्या राष्ट्र्भक्त-द्रोही या खेळात इंग्रजांना पाठिंबा देणारे अशी त्यांची संभावना करणारे ढ्कलसंदेश पाठ्वले गेले. हे चुकीचं होतंच असं कोणीतरी म्हणतय का? त्याऐवजी तेच चुकले असा सार्वत्रिक समज पसरवला गेलाय.
मी मेवाणीची भाषणं ऐकलेली नाहीत. उना प्रकरणातून त्याचा उदय झाला आहे. आणि ते प्रकरण निषेधार्हच होतं. त्याची कोणत्याही प्रश्नाबद्द्ची कोणतीही मांडणी मी ऐकली नाही. त्यामुळे मी भाष्य करणार नाही पण तुम्ही हे जे ठामपणे सांगताय एवध्या ठामपणे फक्त चर्चेतल्या भाजपा प्रवक्त्यांनी सांगीतलं आहे. बातम्याही तश्या नव्हत्या. या प्रकरणात दलित जमावाकडून दगडफेक झाली नव्ह्ती त्यामुळे त्याचा हात वैगेरे कल्पनाविलास असावा. अर्थात मला सत्ताकारण वा राजकारण यावर कोणतंही भाष्य करायचं नाही. मुळात समाजात सामंजस्य असलं तर अश्या प्रकारच्या राजकारणाला वाव मिळणारच नाही.
मी कोणताही उद्रेक जस्टीफाय केलेला नाही. पण उद्रेक का होतो हे डोळे उघडून नीट बघा तरी. ह्या बद्दल द्वेषमूलक विधानं तरी करू नका. (दलित आंदोलनात नेहमी असं होतंच, हे कोणाचंततरी विधान होतं ना आधीच्या चर्चेत. )
नव्या पिढीच्या डोक्यात आधीच बायस्ड मतं भरायची, मग कसे राहणार त्यांचे डोळे उघडे?
8 Jan 2018 - 10:16 am | अर्धवटराव
केवळ एक घटनाविशेष म्हणुन नाहि तर थोडा लार्जर पर्स्पेक्टीव्ह विचारात घ्या.
समाजमनाचं जे काहि थोडंफार ऑब्सर्वेशन मी केलय त्यावरुन मला एव्हढं नक्की वाटतं कि अगदी ८०-९० च्या दशकापर्यंत सामाजीक अभिसरणाची पुढे जाणारी गाडी आता यु टर्न घ्यायला लागली आहे अशी शंका येते. दलीतांसाठी, फोर दॅट मॅटर कुठल्याही पर-जातीय व्यक्तीसाठी घरचे आणि मनाचे दरवाजे एकदम बंद असणं, मग थोडं किलकिले होणं, दारं सताड उघडी होणं आणि शेवटी जात हा फॅक्टर अजीबात विचारात न येणं, हे सगळं स्थित्यंतर मी बघितलं आहे. केवळ प्रातिनीधीक म्हणुन नाहि तर समाजजीवनाचा ट्रेण्ड तसा होतोय याची शाश्वती येण्याइतपत ते जाणवलं. अगदी मागच्या पिढीचे लोक २१व्या शतकाच्या दुसर्या-तिसर्या दशकापर्यंत जातीभेद नामशेष जरी नाहि तरि अगदी डायल्युट होण्याच्या मार्गावर होण्याबद्दल बरेच सकारात्मक दिसायचे.
आंबेडकरांनी शक्य त्या सर्व मार्गांनी दलीत समाजाची अस्मीता जागृत केली हे स्वाभावीक होतं, योग्य देखील होतं. आंबेडकरांनी दाखवलेला मार्ग इतका स्वच्छ होता कि त्यात अंध-पोथीवादासारखा धोका निर्माण व्हायचे चान्सेस जवळपास शुण्य होते. शिवाय त्यावर मार्गक्रमणाची अनिवार्यता देखील वादातीत होती/आहे. हा रोग, हे औषध इतका सरळ कारभार होता. समाजधुरीणांचा पराभव त्यांचेच वैचारीक अनुयायी करतात असं म्हणतात. कधि त्यात नेत्याच्या वैचारीक बैठकीची अँबिग्युटी असते, कधि ते काळानुरुप नसतात, कधि मूळ समस्या आपोआप डायल्युट होते, तर कधि समाज/अनुयायी आळशी बनतात, शिवाय राजकीय/आर्थीक फायदे मिळवण्याची धडपड. आंबेडकरी चळवळीला यापैकी कुठल्याच कारणाचा धोका नव्हता. दबलेला, पिचलेला, अधिकारांपासुन वंचीत असा समाज ते आधुनीक काल सुसंगत, व्यवस्थीत एस्टेब्लीश्ड समाज हा प्रवास तसा सोपा नाहि. पण दलीत चळवळीला आंबेडकरांसारखा नेता आणि नुकताच स्वतंत्र झालेला भारत अशी युनीक बैठक मिळाली. जगाच्या इतीहासात फार थोडी अशी उदाहरणं सापडतील. या पार्श्वभूमीवर गाडी कुठे जायला हवी होती आणि आता ति कुठे जातेय हे बघायला हवं.
इतर समाज घटकांप्रमाणे दलीत समाजाला देखील आपल्या अस्मीतांचं कौतुक असणे, अभिमान असणे वगैरे अगदी योग्य आहे. किंबहुना कर्तुत्व गाजवणे, त्यातुन जाज्वल्य अस्मीता निर्माण करणे, व त्यातुल पुढील कर्तुत्वाला पोषक खाद्य पुरवणे हे सहज-स्वाभावीक समाजशास्त्र आहे. पण इतर समाजांचं जाऊ दे, स्वतः दलीत समाजाला आपल्या अस्मीतांमधुन कुठले पोषक मुल्य मिळताहेत याचं भान हवं. आजुबाजुला अंध-अस्मीतांचा बाजार भरला असताना दलितांनी तसं केलं तर काय बिघडलं असा युक्तीवाद करता येईल, पण इतरांच्यात चुकीच्या अस्मीतामुळे होणारं नुकसान सहन करायला बरीच राखीव चरबी आहे. दलितांना सध्या तरी ते प्रिव्हिलेज नाहि. २-३ पिढ्यांच्या चुका त्यांना मूळ मार्गावरुन बर्याच लांब घेऊन जातील.
इतर समाज घटकांनी दलितोद्धाराकडे किती सकारात्मक दृष्टीने बघितलं हा हमखास वादाचा विषय असेल. मला वाटतं या बाबतीत भारत देश अगदी डिस्टींक्शनने नाहि तरि काठावर नक्कीच पास झाला असावा. ५-१० मार्क जास्तच पडले असावे. दलीत समाज स्वतः देखील अंतर्गत आणि बाह्य मर्यादांवर मात करत पुढे नक्कीच गेला आहे. पण हा प्रवास उत्तोरोत्तर पोझीटीव्ह वळणं घेण्याऐवजी नकारात्मकतेकडे का झुकायला लागला आहे हे कळायला मार्ग नाहि. तसा तो होत नसेल देखील, नसल्यास आनंदच आहे. पण ताक घुसळुन लोणि वर यावं आणि त्यावरुन मूळ मटेरिअलची क्वालिटी कळावी या न्यायाने जर दलीत लिडरशीप अजमावतो म्हटलं तर चित्रं फार काहि बरं नाहि.
उना व तत्सम प्रकरणांमधे नेमकं काय झालं याचं चर्वीतचर्वण बाजुला ठेवलेलं बरं. एक नवीन नेतृत्व उदयाला आलं एव्हढच सध्या महत्वाचं. त्याबद्दल काहि वावगं वाटत नाहि. पण हे तरुण तुर्क महाराष्ट्रात येतात. आधुनीक पेशवाई, आर.एस.एस ला नागपुरात जाऊन संपवणे, संवीधान कि मनुस्मृती वगैरे अत्यंत बाष्कळ मुद्यांवर इथे गर्दी खेचतात. मराठी दलीत सारस्वत त्याची री ओढतात. हे केवळ सोईचं राजकारण म्हणुन सोडुन द्यायचं कि खरच आपल्याकडे विचारांची वानवा आहे हा प्रश्न छळतो.
अवांतरः
दलीत हि केवळ एक जात नाहि. ति एक अवस्था आहे. माणुस म्हणुन जगण्याचा हक्क नाकारणारी. या अवस्थेला कारणीभूत व्यवस्था जशी जुन्या काळात कळत-नकळत निर्माण झाली असेल तशीच व्यवस्था आज पाय रोऊन घट्ट होत चालली आहे. स्वच्छ पाणि, शुद्ध हवा, पोषक आहार, मनाला आवडेल त्या विषयाची स्वच्छंद बौद्धीक भटकंती, एक सजीव प्राणि म्हणुन व्हायला हवा तो विकास... हे सगळं मला नाकारण्यात येत आहे. ते तसच स्विकारायला माझ्या नकळत मला भाग पाडण्यात येत आहे. इथे तसं करणारा कुठलाच दृष्य धर्मग्रंथ नाहि कि राजसिंहासन नाहि. मागच्या शतकातलं आव्हान परतुन लावण्या अगोदरच एक नवीन आव्हान समोर उभं ठाकलं आहे. मी आधुनीक दलीत आहे. ( कसलं भारी लिवलय... वाह :) )
10 Jan 2018 - 10:57 pm | अंतरा आनंद
पण इतर समाजांचं जाऊ दे, स्वतः दलीत समाजाला आपल्या अस्मीतांमधुन कुठले पोषक मुल्य मिळताहेत याचं भान हवं. आजुबाजुला अंध-अस्मीतांचा बाजार भरला असताना दलितांनी तसं केलं तर काय बिघडलं असा युक्तीवाद करता येईल, पण इतरांच्यात चुकीच्या अस्मीतामुळे होणारं नुकसान सहन करायला बरीच राखीव चरबी आहे. दलितांना सध्या तरी ते प्रिव्हिलेज नाहि. २-३ पिढ्यांच्या चुका त्यांना मूळ मार्गावरुन बर्याच लांब घेऊन जातील. >> मान्यय. पण त्यांच्या अस्मिता जोपर्यंत कोणाच्या मार्गात येत नाहीत तोपर्यंत त्यांना विरोध का करावा? तो ही हिंसक? (त्यांच्यावर दगडफेक झाली, गाड्या जाळल्या गेल्या, दुकानं आदी बंद ठेवून त्यांची गैरसोय केली गेली याबद्द्ल मी बोलतेय. ते नक्की चुकीचच होतं असं कोणीही इथे स्पष्ट बोलायला तयार नाहीय. )
दलीत समाज स्वतः देखील अंतर्गत आणि बाह्य मर्यादांवर मात करत पुढे नक्कीच गेला आहे. पण हा प्रवास उत्तोरोत्तर पोझीटीव्ह वळणं घेण्याऐवजी नकारात्मकतेकडे का झुकायला लागला आहे हे कळायला मार्ग नाहि. >> तुम्ही नेत्यांवरून समाजाचं आकलन करू बघता आहात. तसं नाहीय. दुसरं म्हणजे सगळीकडेच भरलेला अस्मितांचा बाजार, वाढता धार्मिक आंधळेपणा/एकारलेपणा, संधी आणि संपत्तीच्या वाटपातली वाढ्ती असमानता यामुळे प्रत्येक समाजगट नकारात्मकतेकडेच वळतोय.
हे तरुण तुर्क महाराष्ट्रात येतात. आधुनीक पेशवाई, आर.एस.एस ला नागपुरात जाऊन संपवणे, संवीधान कि मनुस्मृती वगैरे अत्यंत बाष्कळ मुद्यांवर इथे गर्दी खेचतात. मराठी दलीत सारस्वत त्याची री ओढतात. >> राममंदिर , गोमाता, लव-जिहाद, राष्ट्रगीताला उभे रहाणे असे एकाहून एक बांष्कळ मुद्दे गेली कित्येक वर्षे देशभर, मिडीयात चर्चेत आहेतच की. उना प्रकरणात काय झालं याचं चवीतर्वण नाही पण ती घटना दलितांना भान आणून देणारी ठरली. या हिंदूराष्ट्रात आपले स्थान काय असेल याचं भान. त्यामुळे तो बाष्कळ (सौम्य शब्दय) प्रकार झाला नसता तर हे मेवानी वैगेरे उदयाला आले नसते.
अवांतराबद्द्ल : मी/ तुम्ही वा इतरही नागरीक म्हणून दलित आहोत, हे सत्य.
10 Jan 2018 - 11:58 pm | एमी
राममंदिर , गोमाता, लव-जिहाद, राष्ट्रगीताला उभे रहाणे असे एकाहून एक बांष्कळ मुद्दे गेली कित्येक वर्षे देशभर, मिडीयात चर्चेत आहेतच की. उना प्रकरणात काय झालं याचं चवीतर्वण नाही पण ती घटना दलितांना भान आणून देणारी ठरली. या हिंदूराष्ट्रात आपले स्थान काय असेल याचं भान. त्यामुळे तो बाष्कळ (सौम्य शब्दय) प्रकार झाला नसता तर हे मेवानी वैगेरे उदयाला आले नसते. >> राममंदिर तसं जुनं झालं. २०१४ पासून चालू झालेला दादरी उना वगैरे ठिकाणचा गोराक्षसांचा धुमाकूळ, आता परवाचा लवजिहादचा विडिओ, तीन वर्ष सलग दुष्काळ पडूनही शेतकऱ्यांकडे केलेले साफ दुर्लक्ष....मेवानी, हार्दिक, मराठा मोर्चा वगैरे यातून, यामुळे आलेत. आताही या नेत्यांवर टीका करताना मुळ प्रोब्लेमबद्दल कोणीच बोलत नाही. त्यांना लोकांचा पाठिंबा का मिळतोय? कारण यांना पीडितांबद्दल सहानुभुती नाही कि मदत करायची नाही! फुकटचम्बू, विषवल्ली, कॅन्सर वगैरे उपहासच चालुय....
11 Jan 2018 - 8:57 am | अर्धवटराव
केवळ दलीतांच्या अस्मीता डोळ्यात खुपल्या म्हणुन हा तंटा उभा झाला हे मनाला पटत नाहि. या शंकेला सबळ पुरावा असा काहि नाहि. पण हल्ली जसे वारे वाहताहेत त्यात सर्वकाहि आलबेल वाटत नाहि. पहिला दगड कुणी व का मारला हे कदाचीत त्या दगडालाच ठाऊक. अर्थात, सामाजीक दुभंगलेपणा आहेच. त्यात आपल्या उच्चनीचतेच्या कल्पनांचं बारुद देखील ठासुन भरलय. किंबहुना म्हणुनच ठिणगी पेटवायचा प्रयत्न झाला असावा.
मी नेत्यांवरुन समाजाचं आकलन नाहि करत आहे. काहि दशकांचा ग्राफ डोळ्यासमोर धरला तर सामाजीक परिस्थिती ज्या स्टेजला यायला हवी होती त्यापासुन बरीच भरकटलेली दिसतेय. व या भरकटलेपणात अंगभूत सामाजीक मर्यादा आणि बाह्य परिस्थितीपेक्षा नेतृत्वाचा वाटा जास्त वाटतोय. जास्त वाईट याचं वाटतं कि नेतृत्वाची नवी फळी त्याच कर्दमात रुतायला बघतेय. इतर समाजगट फक्त सामाजीक नकारात्मकडे झुकतोय, पण त्यांच्या तिजोरीला आणि सर्वंकष हितसंबंधांना बाधा येईल असं दिसत नाहि. त्यामानाने दलितांचे सर्वंकष हितसंबंध मजबूत व्हायला एव्हाना जो पाया डेव्हलप व्हायला हवा होता तसा होताना दिसत नाहिए. दलितांच्या संघर्षातुन आग तर निर्माण होतेय लेकीन हंडी नहि पक रही. असो.
दलीत समाजाला गेल्या १ वर्षात जर सो कॉल्ड हिंदुराष्ट्रातल्या स्वतःच्या स्थानाबद्द्ल अचानक भान निर्माण होत असेल तर दलीत समाजाने एका फटक्यात आजवरच्या समस्त आंबेडकरी कर्तुत्वाचा शुण्याने गुणाकार केला असं म्हणावं लागेल. राममंदीर, गोमाता, लव जिहाद हे मुद्दे हे मुद्दे अगोदर देखील तेव्हढेच तीव्र होते. त्याला मिडीया कव्हरेज गेल्या २-३ वर्षात मिळायला लागलय एव्हढच. मेवानी आणि तत्सम नेतृत्वाचा उदय होणारच होता. दलितांना अचानक आलेल्या भानाची हि परिणीती नाहि. शुद्ध राजकीय सारीपटावरची विशुद्ध चाल एव्हढच त्यामागचं सत्य. भगव्याच्या जोडीला निळा रंग यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणात गेला नव्हता. या रंगसंगतीचा परिणाम म्हणजे मेवानी आणि मित्रपरिवार. (मेवानी हे नाव केवळ प्रातिनीधीक म्हणुन वापरलं आहे. प्रत्यक्ष्य मेवानी कसा उदय पावला याबद्दल पूर्ण खात्री नाहि).
असो.
14 Jan 2018 - 9:11 am | अंतरा आनंद
केवळ दलीतांच्या अस्मीता डोळ्यात खुपल्या म्हणुन हा तंटा उभा झाला>> असं मी म्ह्टलेलंच नाही.
त्यात आपल्या उच्चनीचतेच्या कल्पनांचं बारुद देखील ठासुन भरलय. किंबहुना म्हणुनच ठिणगी पेटवायचा प्रयत्न झाला असावा. >> हे खरं आहे. म्हणूनच आपल्या पातळीवर या कल्पना मोडीत काढायला हव्यात असं म्हणतेय मी. जे तसं करत असतील त्यांना हे लागायचं कारणच नाही. तसं न करता "दलित समाज असाच" असं म्हणं चुकीचं आहे.
इतर समाजगट फक्त सामाजीक नकारात्मकडे झुकतोय, पण त्यांच्या तिजोरीला आणि सर्वंकष हितसंबंधांना बाधा येईल असं दिसत नाहि. त्यामानाने दलितांचे सर्वंकष हितसंबंध मजबूत व्हायला एव्हाना जो पाया डेव्हलप व्हायला हवा होता तसा होताना दिसत नाहिए. दलितांच्या संघर्षातुन आग तर निर्माण होतेय लेकीन हंडी नहि पक रही. >>खरं आहे. इतर समाजाच्या तिजोर्६या आहेत. दलित (त्याच बरोबर भटक्या , विमुक्त वैगेरे) समाजाच्य नाहीत म्हणून त्यांची बाजू माध्यमांमध्येही लंगडी असते.
11 Jan 2018 - 10:02 pm | ट्रेड मार्क
तेजस यांनी या प्रतिसादात "ज्यांनी कोणी त्यांच्यावर दगडफेक केली त्यांना शोधून शिक्षा झालीच पाहिजे असं म्हणलंय.". मी या प्रतिसादात असं म्हणलंय की "दगडफेक ई. करणारे (मग ते कुठल्याही गटाचे असोत) हे समाजकंटक होते/ आहेत.". आता यात प्रॉब्लेम असा आहे की ही दगडफेक ब्राम्हण लोकांनी केली सरळसरळ आरोप केलाय. पण याचे काही पुरावे आहेत का? नुसतीच भिडे गुरुजींना आणि एकबोट्यांना अटक करा म्हणून मागणी करत आहेत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती दगडफेक या दोघांनी किंवा ब्राम्हणांनी केली याचे पुरावे कोणी देत नाही आणि मागतही नाही!
आता मी म्हणतोय दगडफेक करणारे समाजकंटक आहेत. लक्षात घ्या मी कुठल्याही जातीधर्माकडे बोट दाखवत नाहीये. जर खरंच ब्राम्हणांनी केली असेल तर ते पण समाजकंटकच आहेत, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण सिद्ध तर करा. व्यक्तीकडे बघून समजतं का त्याची जात कुठली आहे ते?
वाढता धार्मिक आंधळेपणा/एकारलेपणा, संधी आणि संपत्तीच्या वाटपातली वाढ्ती असमानता यामुळे प्रत्येक समाजगट नकारात्मकतेकडेच वळतोय.
यातून बाहेर पडायला आपले आपणच प्रयत्न केले पाहिजेत. संधी तर सगळ्यांनाच उपलब्ध आहेत, का अजूनही तुम्हाला म्हणायचंय की दलितांना मुद्दाम काही संधी नाकारल्या जात आहेत? म्हणजे पात्रता असूनही केवळ दलित आहेत म्हणून संधी दिली जात नाही अशी उदाहरणं द्या.
उना प्रकरणात काय झालं याचं चवीतर्वण नाही पण ती घटना दलितांना भान आणून देणारी ठरली.
भान यायला ही घटना घडायची काय गरज होती? यात सुद्धा मारणारे ब्राम्हण होते का? इंडियन एक्सप्रेस मधली ही बातमी वाचा. प्रत्येक घटनेला जातीय रंग द्यायची काय गरज आहे? उद्या मी एखाद्या निरुद्योगी माणसाला पैसे दिले आणि सांगितलं की एका चौकात जा आणि सांग मी xxx संस्थेचा कार्यकर्ता आहे आणि दगडफेक कर. मला त्या माणसाची जात/ धर्म माहित नाही आणि त्या माणसाला फक्त पैसे मिळण्याची कारण. कशाला दगड फेकायचेत, कोणावर फेकायचेत याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही. मग बघणारे म्हणतात xxx संस्था जातीय आहे. पण सत्य काय आहे याचा शोध किती जण घेतात?
माझं वैयक्तिक मत सांगतो - एखाद्या स्पर्धेत जो स्पर्धक मागे असतो त्याने पुढे जाण्याला महत्व दिलं पाहिजे. बाकी प्रेक्षक काय ओरडत आहेत, आपल्याला स्पर्धेच्या ठिकाणी पोचायला किती त्रास झाला, ऊन आज जरा जास्त आहे ई. ई. मागे ओढणाऱ्या अन्य गोष्टींकडे लक्ष देऊ नये.
13 Jan 2018 - 6:45 pm | भंकस बाबा
बऱ्याच वर्षापुर्वी पाहीलेल्या तमस मालिकेचि आठवण झाली,
मी जेव्हा माझ्या दलित, मुस्लिम, ख्रिस्ती मित्रात असतो तेव्हा जातिभेद दिसुन येत नाहीत, वा मी त्यांच्या घरी जातो किंवा ते माझ्याकडे येतात. किंबहुना आम्हाला जात ,धर्म ,पंथ आहे हेच लक्षात येत नाहि
6 Jan 2018 - 5:30 pm | रांचो
अंतरा आनंद,
उत्तम व संतुलीत लेख. खुप दिवसांनी असा सकस लेख वाचला.
6 Jan 2018 - 5:48 pm | गामा पैलवान
अंतरा आनंद,
माझं भाष्य येणेप्रमाणे :
१.
मी स्वत:स यांतून वगळतो आहे. मी भावनांच्या लाटेवर हेलकावत वगैरे नाही.
२.
मला स्वत:ला कुठल्याही माणसाची जयंती बियंती साजरी करायला आवडंत नाही. भयाण कंटाळवाणा प्रकार असतो. मात्र आंबेडकरांनी दिलेली शिकवण आचरणांत असावी म्हणून माझा जमेल तितका प्रयत्न चाललेला असतो. मी भारतात असतो तर असली जयंती अजिबात साजरी केली नसती. हां, पण त्या दिवशी शुभेच्छा आवर्जून पाठवल्या असत्या. शिवाय त्यांनी भारताचं हित कसं पाहिलं यावर यथोचित भाष्य केलं असतं.
३.
म्हणूनंच आरक्षण रद्द करायला पाहिजे. आंबेडकर फक्त दहा वर्षं ठेवायचं म्हणंत होते ते उगीच नाही.
४.
कोणीही समर्थन करत नाहीये. अस्पृश्यतेवर कायद्याने बंदी आहे. असो. हे उद्गार निघायचे कारण की महार मेलेल्या गुरांचं मांस खायचे. नेमक्या याच कारणासाठी बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मेलं ढोर खाऊ नका आणि मेलं ढोर ओढू नका.
५.
असेलही. पण अस्पृश्यता कायद्याने बंद झाली आहे.
६.
ज्या अर्थी महार वतन दिलं जायचं त्याअर्थी महारांना व्यवस्थित मान होता. फक्त पराक्रम गाजवायला हवा. जो अनेक महारांनी गाजवला होताही.
७.
माझ्या बापाने भले केला असेल अन्याय. म्हणून तुम्ही माझ्यावर केलेला अन्याय मी खपवून घेणार नाही. भले मला कोणी दांभिक म्हंटलं तरी चालेल.
८.
च्यायला, एकतर आगी लावायच्या आणि मग बूड जळू लागलं की पेट्रोलच्या नावाने बोंबा ठोकायच्या.
जर कोणालाच जमावावर नियंत्रण ठेवता येत नाही तर मग पूज्य संभाजी भिडे यांच्या विरोधात प्रकाश आंबेडकर खोटेनाटे आरोप का करताहेत? पूज्य भिडे गुरुजी पुण्यांत कुणाच्या तरी अंत्यविधीस गेले होते. भीमा-कोरेगावाचा संबंध आलाच कुठे? प्रकाश आंबेडकर जनतेस मूर्ख समजतात काय? लोकांना ढोंगं बरोब्बर कळतात.
९.
बाबरी नामे कोणती मशीद तिथे नव्हती. जे पडलं ते जुनं राममंदिर होतं. हिंदूंनी हिंदूंचं देऊळ पाडलं तर कोणासही कसलीही अडचण व्हायला नको. शिवाय प्रस्तुत भीमा-कोरेगाव प्रकरणाचा रामजन्मभूमीशी कसलाही संबंध नाही.
१०.
अगदी बरोबर बोललात पहा. श्रीराम हा राष्ट्रीय पुरुष आहे. त्याच्या जन्मस्थानाबद्दल कुठलीही तडजोड केली जाणार नाही. प्रस्तुत भीमा-कोरेगाव प्रकरणाचा रामजन्मभूमीशी कसलाही संबंध नाही.
११.
बोलताहेत की. पूज्य संभाजी भिडे यांनी शासनाकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे.
१२.
मी महापुरुषांना जातीच्या दृष्टीकोनातून पहात नाही. बाकी गुणांचं म्हणालात तर हिंदूंना धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. पूज्य संभाजी भिडे हेच काम निरलसपणे करताहेत.
१३.
म्हणूनंच बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे वागायचं असतं. वागतो का कोणी नेता त्यांच्यासारखा?
१४.
साफ चूक. पूज्य संभाजी भिडे कोणाच्याही अध्यातमध्यात नसतांना जितेंद्र आव्हाड आणि प्रकाश आंबेडकर हे गणंग त्यांचा द्वेष करतातच की नाही?
१५.
मग तुम्ही शिकवला की नाही सुसंस्कृतपणा? का नुसतेच शंका प्रदर्शित करताहात?
१६.
का म्हणून खटकावं?
१७.
अशा वेदना होऊ नयेत म्हणूनंच ब्राह्मण सुधारला पाहिजे.
१८.
ब्राह्मण भिक्षुक नाही का भिका मागून जगतात ते? तरी त्यांच्या आत्मसन्मानास धक्का पोहोचंत नाही. कसा काय बरं? काय मत आहे यावर तुमचं?
१९.
म्हणूनंच आंबेडकरांनी दलितांना सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.
२०.
आंबेडकरांनी फक्त दहा वर्षंच आरक्षण ठेवायला सांगितलेलं होतं म्हणून. स्वार्थी नेत्यांनी आंबेडकरांच्या शिकवणुकीस धाब्यावर बसवलं, त्याचा दोष बाकी समाजावर का म्हणून ढकलता?
२१.
बरोबर आहे. आहेच मुळी ही आशेची गोष्ट. मात्र इथे जानव्याचा संबंध काय आहे ते कळलं नाही.
जानवेधारी लबाड असतात असं सूचित होतं आहे. एकीकडे आशेची गोष्ट म्हणायचं आणि लगेच पुढच्या वाक्यात बकवास ओकायचा. अशाला थोतांड म्हणतात.
२२.
या समाजात असल्याची लाज वाटंत असेल तर तुम्ही खुशाल वानप्रस्थ स्वीकारा. माझं अनुमोदन आहे.
२३.
तुम्ही कारण नसतांना राममंदिर आणि जानवं ओढून आणलंत. तुम्हीसुद्धा खाजगीत भरपूर विष ओकंत असणार.
२४.
राममंदिर व जानवं अशा असंबंधित गोष्टी चर्चेस आणल्याने तुम्हाला पुढे जाण्यात रस नाही, असं माझं मत आहे.
आ.न.,
-गा.पै.
7 Jan 2018 - 7:13 am | एमी
आंबेडकर फक्त दहा वर्षं ठेवायचं म्हणंत होते ते उगीच नाही. >> फेकू नका! पाप लागतं! 'तो' बघतोय सगळं, हिशेब ठेवतोय! पुढल्या जन्मी ते हे बनाल!
7 Jan 2018 - 11:05 am | सुखीमाणूस
देव आहे नक्की आहे
8 Jan 2018 - 7:50 am | एमी
टॉन्ट पण कळेना का आता लोकांना :D
7 Jan 2018 - 3:43 pm | गामा पैलवान
अॅमी,
प्रत्यक्ष वाल्मिकी ऋषींच्या कुटुंबियांनी पापाचा वाटा उचलायला नकार दिला होता. पण इथे तर तुमच्यासारखी साक्षात कम्युनिस्ट हिंदूंच्या पापाची काळजी वाहते आहे हे पाहून मला गहिवरून आलं. लगेच खिडकीतून सूर्य पश्चिमेला तर उगवला नाही ना याची खातरजमा केली.
असो.
प्रकाश आंबेडकरांची मुलाखत आहे. तीत थोरल्या आंबेडकरांना फक्त दहा वर्षं आरक्षण अभिप्रेत होतं हे स्पष्टपणे सूचित होत आहे. : https://www.outlookindia.com/magazine/story/what-if-reservations-had-com...
आ.न.,
-गा.पै.
8 Jan 2018 - 1:55 am | एमी
स्वतःच ज्या लिंका चिटकवताय त्यातरी नीट वाचत जा हो... जमलं तर...
political reservation आणि reluctantly agreed या शब्दांचा अर्थ काय आहे?
===
बाकी कॉम्युनिस्ट या (अजूनेका) शिक्कयासाठी आभार _/\_
8 Jan 2018 - 4:11 am | गामा पैलवान
अॅमी,
तो दुवा तुमच्यासाठी दिला आहे. मी अजिबात वाचणार नाहीये. कारण की थोरले आंबेडकर आरक्षणाच्या विरोधात होते आणि ठेवलंच तर फक्त दहा वर्षांसाठी असावं असं त्यांना अभिप्रेत होतं. हे तथ्य तुम्हाला मान्य का नाही?
आ.न.,
-गा.पै.
8 Jan 2018 - 7:43 am | एमी
धन्य आहात _/\_
===
बाकीच्यांसाठी,
राखीव मतदारसंघ ठेवणे आणि शिक्षण, नोकरीत आरक्षण ठेवणे या दोन भिन्न बाबी आहेत.
गापैनी दिलेल्या लिंक मधूनच:
In fact, while he advocated a 10-year period for the reservation of constituencies, he wanted reservation in service and colleges to be permanent.
---
If those reservations were not put in plave, there would have been a People's War Group in ever Indian state. The oppressed classes would have never found a channel to come into mainstream. What would have been deni to them, they would have taken by force. In fact, I foresee the future generations taking up violence if this madness of privatisation continues. Job opportunities for Dalits are shrinking because of privatisation. Sso 'what-if-there-were-no-reservations-after-independence' is close to becoming a reality. And the way the poor Dalit youths will respond will answer the question what would have happened if there were no reservations in free India. >> याची चुणूक दिसलीच असेल गेल्या काही दिवसात...
8 Jan 2018 - 1:43 pm | गामा पैलवान
अॅमी,
थोरल्या आंबेडकरांना नोकऱ्या व शिक्षणात कायमस्वरूपी आरक्षण हवं होतं ही प्रकाश आंबेडकरांची लोणकढी थाप आहे.
आ.न.,
-गा.पै.
8 Jan 2018 - 3:08 pm | शलभ
अभ्यास वाढवा..
8 Jan 2018 - 11:03 pm | गामा पैलवान
शलभ,
अभ्यास वाढवायच्या सूचनेबद्दल धन्यवाद. त्यानुसार अभ्यास वाढवला आहे. वाढीव अभ्यासानुसार असं कळलं की थोरले आंबेडकर हयात असतांना सरकारी नोकरी व शिक्षणात आरक्षण नव्हतं. जे काही आरक्षण होतं ते केवळ राजकीय (म्हणजे लोकप्रतिनिधी निवडण्यापुरतं) होतं. सहजिकंच आंबेडकरांनी जे काही भाष्य केलंय त्याचा संबंध केवळ राजकीय आरक्षणाशीच आहे.
शैक्षणिक व शासकीय नोकरी क्षेत्रांत आरक्षण १९८२ नंतर सुरू झालं. तेव्हा बाबासाहेब हयात नव्हते.
आ.न.,
-गा.पै.
9 Jan 2018 - 12:54 am | एमी
१९०२ शाहू महाराज, कोल्हापूर
https://en.m.wikipedia.org/wiki/Reservation_in_India
http://indianexpress.com/article/explained/a-short-history-of-quota-stor...
9 Jan 2018 - 6:34 pm | गामा पैलवान
अॅमी,
शाहू महाराज घटनापूर्व काळांतले होते. स्वतंत्र भारतात नोकऱ्या व शिक्षणात आरक्षण १९८२ नंतर सुरू झालं.
आ.न.,
-गा.पै.
10 Jan 2018 - 3:34 am | एमी
म्हणजे घटनापूर्व काळात इंग्रजांनी/काही राजांनी आपापल्या राज्यात शिक्षण, नोकरीत आरक्षण दिलं होतं, मग १९४७ ते १९८२ शून्य आरक्षण होतं आणि १९८२ ला परत ते आरक्षण चालू झालं असं का?
तुम्हाला ही माहिती कुठून मिळाली?
===
तुम्ही मअंजावर बरेच जुने आहात, आरक्षणावरच्या बऱ्याच चर्चा वाचल्या असणार, सहभाग घेतला असणार तरी असे काहीतरी बोलताय याचं आश्चर्य वाटतंय....
10 Jan 2018 - 10:58 am | शलभ
+१
15 Jan 2018 - 10:12 pm | नितिन थत्ते
आम्ही १९८० मध्ये इंजिनिअरिंगला अॅडमिशन घेतली तेव्हा ३४ टक्के आरक्षण होते. त्यामुळे १९८२ मध्ये शैक्षणिक आरक्षण सुरू झाले हे अगदीच कैतरी आहे.
16 Jan 2018 - 2:57 am | एमी
त्यामुळे १९८२ मध्ये शैक्षणिक आरक्षण सुरू झाले हे अगदीच कैतरी आहे. >> +१
6 Jan 2018 - 5:50 pm | पगला गजोधर
अंतरा आनंद,
उत्तम लेख 1+
=====
Patriotism is the last refuge of a scoundrel.
- Samual Johnson
What he's calling attention to is that scoundrels, when challenged, will often use false patriotism in order to shut up their opponents.
≠=======
नवपेशवाई /
पेशवाई 2.0
2017’s Top Fake News Stories Circulated by the Indian Media
https://thewire.in/210115/2017s-top-fake-news-stories-circulated-by-the-...
6 Jan 2018 - 7:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाकी, चांगले हात धुवून घेतले. छान.
-दिलीप बिरुटे
6 Jan 2018 - 8:31 pm | अँड. हरिदास उंबरकर
एकविसाव्या शतकातील दोन दशकं पूर्ण होत असताना एकूणच राज्याच्या पारंपरिक राजकारणाचे स्वरूप बदलत चालले असून त्यामुळे जातीय, सांप्रदायिक, वांशिक समीकरणे कालबाह्य होत असल्याचा जो समज करून घेतला जात होता, त्या धारणे ला भीमा कोरेगाव घटनेने तडा दिला आहे.
6 Jan 2018 - 9:03 pm | आनन्दा
+१. काही मूर्ख लोकांमुळे संपूर्ण दलित समाज आज दुर्दैवाने इतरांपासून खूप दूर गेला.
6 Jan 2018 - 9:12 pm | पगला गजोधर
खरंय आणि
या मूर्ख लोकांनाच मनुस्मृती समर्थक म्हणतात...
ज्यांनी दलितांना इतरांपासून खूsssssप दूर, अगदी गावकुसाबाहेर नेऊन ठेवलं.
7 Jan 2018 - 11:14 am | सुखीमाणूस
त्या भूतकाळातून
आता कोणी गावकुसाबाहेर नाहीये आणि कायद्याने दलिताना पुर्ण रक्षण पुरवले आहे.
8 Jan 2018 - 11:14 pm | गामा पैलवान
प.ग.,
तथ्यांमध्ये किटाळ शोधायचं तुमचं कसब अपरंपार आहे. इंग्रजीत यांस assuming evidence in fact म्हणतात. गूगल करू नका. काही सापडणार नाही.
आ.न.,
-गा.पै.
6 Jan 2018 - 9:02 pm | आनन्दा
बहुधा इथे झलेल्या बर्याचश्या चर्चा या "दलित समाज कसा वाईट आहे" यावर नसून दलित समाजाला त्याचे नेते कसे वापरून घेतायत यावर बरीचशी चर्चा झाली.
तसेच मूळ इतिहास नेमका काय आहे यावर देखील बरीचशी चर्चा झाली होती.
त्यातून तुम्ही नेमके सेलेक्टिव्ह रीडिंग करून मोती वेचलेत. असो. अम्ही काय समजवणार? परंतु दलितांचे मुसलमानांसारखे होऊ नये अशी इच्छा आहे म्हणून बोलावे लागतेय. सो कोल्ड दलित असलेले माझे अनेक मित्र आहेत, पण ते आत्ता काय विचार करत असतील हे त्यांना विचारायची पण हिंमत होत नाहीये. जातीयवादाचे भूत, विशेषतः जाती जातींमध्ये भांडणे लावण्याचे प्रयत्न भारतात बरेच होत आहेत, यामागे एक मोठा राजकीय अजेंडा आहे, ते प्रयत्न दुर्दैवाने यशस्वी होऊ नयेत एव्हढीच इच्छा.
मोदी विरोधक असण्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण सामाजिक एकता विरोधक असण्याचा आणि एखाद्या जातीविरुद्ध गरळ ओकण्याचा अधिकार नाही (म्हणजे नसावा, बाकी बोलायचेच असेल अभिव्यक्तीस्वतंत्र्य आहेच.).
किमान एकांगी विचार टाळावेत एव्हढीच इच्छा...
6 Jan 2018 - 9:09 pm | पगला गजोधर
कंसय नं, जेंव्हा अटकेपार झेंडा लावला जातो, तेव्हा रघुनाथ'पंत' लावतात....
जेव्हा कोरेगाव-भीमाला शिकस्त मिळते, तेव्हा ती 'मराठा' सैन्याला शिकस्त मिळते.....
6 Jan 2018 - 9:55 pm | सुखीमाणूस
साडे तीन की पाच टक्के वाले बोलतात तिकडे कुठे लक्ष देता? तरी बर बिचारा शेवटचा बाजीराव हरला आणि त्याच्या पराभवाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या. किंवा पेशव्यांचे वन्शज साधे आयुष्य जगत आहेत.
8 Jan 2018 - 11:24 am | मृत्युन्जय
आणि पानिपत हारले तेव्हा ते पेशवे हारले / सदाशिवरावभाऊ हारले. सेनापती जर बलाढ्य असेल तर हारजीतीचे श्रेय त्यालाच मिळते. इथे जातीचा संबंध नाही. दिल्लीचे तख्त हलवणारे म्हणुन महादजी शिंदे लक्षात राहतात. वडगाव च्या लढाईचे शिलेदार म्हणुन शिंदे / होळकर लक्शात राहतात. तसेच भीमा कोरेगाव मध्ये इंग्रज जिंकले म्हणुन लक्षात राहतात आणि हारणारे मराठे असतात.
याऊप्पर जातीवाचक उल्लेखानेच लढवय्यांची अवहेलना करायची असल्यास काय बोलु शकतो?
9 Jan 2018 - 4:15 pm | तेजस आठवले
मराठा सैन्यात अठरापगड जातीची माणसे होती.
कुठल्याही सैन्याचा जो सेनापती असतो, त्यालाच हार अथवा जीत ह्यांचे श्रेय मिळते हे तुम्हाला माहित नसणे शक्यच नाही.काड्या लावण्यात तुमचा मिपावर सद्यस्थितीला कोणीही हात धरू शकत नाही.
9 Jan 2018 - 4:37 pm | पगला गजोधर
शिवाजीराजे यांच्या काळात अठरापगड जातीची माणसे होती....
परंतु उत्तरं पेंशवाईंतं तसें नव्हतें....
9 Jan 2018 - 6:44 pm | ट्रेड मार्क
इतकं ठामपणे म्हणताय तर या प्रतिसादाच्या सारखंच तुम्ही पण शिवाजी महाराजांच्या सैनिकांचा आणि पेशवाईतील सैनिकांचा "जातीनिहाय व धर्मनिहाय", माहिती/डेटा/संदर्भ आपल्याला देता येईल काय इथे ?
म्हणजे ती माहिती अभ्यासून आपल्याला उत्तर देता येईल, मिपावरील सभासदांपैकी कोणालाही....
9 Jan 2018 - 7:22 pm | पगला गजोधर
सर,
एखाद्याने संदर्भ मागितला, तर मागितलेला संदर्भ न देता, उलट त्यालाच प्रतिप्रश्न विचारण्याची, आपली भूमिका मला अनाकलनीय वाटते.
असो मी माझ्या वाचनात आलेली माहिती खाली देत आहे की ज्या द्वारे मी वरील प्रतिक्रिया दिली. निदान ती वाचून झाल्यावर, आपणही मी मागत असलेली संदर्भ माहिती, देण्याचं सौजन्य दाखवाल अशी अपेक्षा बाळगतो.
.
.
शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील लक्षणीय उपस्थिती बाबत:
प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार ने अपनी पुस्तक “Shivaji and his Times” के पेज 363 पर उल्लेख किया है कि शिवाजी की सेना में बड़ी संख्या में महार भी थे | इतना ही नहीं तो शिवन्नक महार को तो उनके जीवट और बहाद्दुरी के लिए पुरष्कृत करते हुए शिवाजी के पुत्र राजाराम ने कलमबी गांव भेंट किया था।
=========
पेशवाईत महार सैनिकांबाबत दुजाभाव होण्याचा उल्लेख :
केव्ही कोटवाले ने अपनी पुस्तक “politics of the Dalits – 1974” के पेज 142-145 में उल्लेख किया है कि कुछ लोगों ने जाति के आधार पर महारोकी मराठा शिविर में उपस्थितिपर पेशवा के ब्राह्मण सलाहकारके पास तीव्र आपत्ति जताई |
====≠=================
उत्तरपेशवाईत त्या दुजाभावात वाढ झाली असण्याची शक्यता चा रेफ:
' मराठ्यांविरुद्धची नव्हे तर ब्राह्मणांविरुद्धची लढाई '
साहित्यिक आणि समीक्षक प्राध्यापक ऋषीकेश कांबळे लढाईची दुसरी बाजू मांडतात. कांबळे यांच्या म्हणण्यानुसार, महार समाजाचा समावेश असलेल्या तुकडीनं मराठ्यांना नाही तर ब्राह्मणांना नमवलं होतं.
"
ही अनिष्ट पद्धत बंद करण्याबाबत महार समाजानं ब्राह्मणांना सांगितलं. मात्र त्यांनी ऐकलं नाही. या कारणामुळेच महार समाजानं ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीत सामील होण्याचा निर्णय घेतला," असं कांबळे सांगतात.
ते पुढे म्हणाले, "ब्रिटिश सैन्यानं महार समाजातील व्यक्तींना लष्करी प्रशिक्षण दिलं आणि पेशव्यांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. मराठा शक्तीच्या नावावर ब्राह्मणांची पेशवाई होती, त्याविरुद्धची ही लढाई होती. महारांनी या लढाईत ब्राह्मणांना हरवलं. ही लढाई महार समाजाची मराठ्यांविरुद्धची लढाई कधीच नव्हती."
"महार आणि मराठा यांच्यादरम्यान मतभेद किंवा संघर्ष कधीच नव्हता. इतिहासात अशा वादावादाची उदाहरणंही नाहीत. ब्राह्मणांनी अस्पृश्यतेची प्रथा बंद केली असती तर ही लढाई कदाचित झालीच नसती," असं कांबळे आवर्जून नमूद करतात.
"मराठ्यांचं नाव घेतलं जातं कारण मराठ्यांचं राज्य पेशवाईत ब्राह्मणांच्या हाती होतं. ही लढाई म्हणजे पेशव्यांची शेवटची मोठी लढाई होती. ब्रिटिशांना त्यांना नमवायचं होतं. म्हणूनच ब्रिटिशांनी महार समाजातील व्यक्तींना हाताशी घेतलं आणि पेशवाई संपुष्टात आणली."
(बीबीसी मराठी)
9 Jan 2018 - 11:53 pm | ट्रेड मार्क
तुम्ही संदर्भ मला मागितला नव्हता, त्यामुळे मी त्याचं उत्तर आधी दिलं नाही. पण जर एखाद्याने केलेल्या विधानावर जर तुम्ही संदर्भ मागताय तर त्याच आधारे मी पण तुम्ही केलेल्या विधानावर संदर्भ (खरं तर आकडेवारी) मागितली.
तर... तुम्ही दिलेलं सगळं बहुतांशी २-३ लेखकांनी त्यांच्या इतिहासाच्या आकलनाप्रमाणे लिहिलेल्या पुस्तकातले उतारे आहेत. यात कुठलीही आकडेवारी वा इतर पुरावे उपलब्ध नाहीत.
आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाबाबत - प्रत्यक्षदर्शींकडून मिळवलेल्या माहितीवरून तिथे जमलेले बहुतांशी लोक कामधंदा नसलेले आणि डोक्यात चुकीच्या कल्पना भरलेले होते. गेले काही दशके राजकारण्यांनी त्यांना मतांसाठी वापरून घेतलं आणि आता सुद्धा काही राजकारण्यांनी त्यांना फूस लावली आणि ते तिथे गोळा झाले. दगडफेक ई. करणारे (मग ते कुठल्याही गटाचे असोत) हे समाजकंटक होते/ आहेत. त्यांनी पैसे घेऊन हे काम घडवून आणले.
संजय सोनवणींनी लिहिलेला हा लेख वाचा.
साहित्यिक आणि समीक्षक प्राध्यापक ऋषीकेश कांबळे यांनी मांडलेली बाजू म्हणजे तर कहर आहे. अस्पृश्यता काय फक्त पेशवाई आल्यावर आली होती का? पेशवे हा हुद्दा तर स्वतः शिवाजी महाराज असताना पण होता. पेशवा म्हणजे अष्टप्रधान मंडळाचा प्रमुख आणि तुमच्याच म्हणण्याप्रमाणे शिवाजी महाराज असताना मराठा सैन्यात सर्व जातीच्या लोकांचा समावेश होता.अष्टप्रधान मंडळाने दलितांवर अन्याय होईल अश्या काही गोष्टी केल्या होत्या का? स्वराज्याचे पहिले पेशवे म्हणून शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांची नेमणूक सन १६७४ मध्ये केली. पुढे बाजीराव पेशवांच्या काळात फक्त पेशवे प्रबळ होते पण तरी ते छत्रपतींना बांधील होते. मग प्रा. कांबळे यांच्या मते समस्त मराठ्यांनी काय ब्राम्हण असलेल्या पेशवांकडे सगळं राज्यकारभार देऊन सन्यास घेतला होता काय?
अस्पृश्यता ही काय फक्त ब्राम्हण आणि इतर जातीचे यांच्यात नव्हती, तर मराठा समाजात पण होती आणि अगदी दलित समाजात जी उतरंड होती त्यांच्यातही आपापसात होती. मग कोणी कोणाशी भांडायचं आणि किती काळ? काही शे वर्षांपूर्वी झालेल्या अन्यायाबद्दल आता द्वेष बाळगून काय साध्य होणार आहे? सध्याच्या काळात अस्पृश्यता आहे का? ब्राह्मणांकडून दलितांवर कोणते अत्याचार होत आहेत?
ब्राह्मणांनी जबरदस्तीनं अस्पृश्यता लादल्यानं महार समाज नाराज होता हे एकीकडे म्हणताय आणि फक्त ३०० का ५०० महार सैनिकांनी मिळून २५०००-३०००० "ब्राह्मण" सैन्याचा पराभव केला हे पण म्हणताय. तर साधा प्रश्न आहे की मग एवढे अत्याचार महारांनी का सोसले? सरळ सत्ता उलथून टाकून स्वतःच राज्य स्थापन का केलं नाही?
6 Jan 2018 - 9:28 pm | गामा पैलवान
अर्धवटराव,
तुमच्या मतांचा आदर आहे. मात्र प्रस्तुत प्रसंग उत्स्फूर्त व स्वाभाविक नसून मुद्दाम पेटवलेला आहे. प्रकाश आंबेडकर, जिग्नेश मेवाणी हे लोकं पूज्य संभाजी भिड्यांच्या मागे लागलेले आहेत. या दोन गणंगांचा दलितांच्या हिताशी फुटक्या कवडीइतुकाही संबंध नाही. त्यांना फक्त भिडे व एकबोटे यांना अटक झालेली बघायचीय.
सगळे सलोख्याच्या गप्पा मारताहेत. मारू द्या. काही हरकत नाही. पण प्रकाश आंबेडकरांचा कोणी निषेध करतांना दिसतो का? भिडे गुरुजींसारख्या ऋषितुल्य व्यक्तीवर अट्रोसिटीचा गुन्हा कशाच्या आधारे प्रविष्ट केला? प्रकाश आंबेडकरांच्या सल्ल्यानेच ना?
सांगायचा मुद्दा काये की दंगलीमागचा हेतू स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर स्वत:कडे बघायला हवं ना?
आ.न.,
-गा.पै.
6 Jan 2018 - 9:32 pm | तेजस आठवले
तुम्ही वरतीच म्हणालात ना कि असे खडे फेकणारे रोजच दिसतात, इकडे मिपावर पण पगला गजोधर नियमितपणे खडे फेकण्याचे आणि काड्या घालण्याचे काम करतच असतात.
6 Jan 2018 - 10:19 pm | सुखीमाणूस
पग तर केवढ मोठ समाज कार्य करत आहेत.
ते अतिशय आधुनिक असल्यामुळे सगळ्या प्रोब्लेम ना एकच उत्तर आहे त्यान्च्याकडे की ब्राम्हण हटाव.
मग तेव्हा त्यान्ची ठाम खात्री असते की अख्खा पाकिस्तान मानवतावादी होईल पण ब्राम्हण राज्यावर आले की आलेच मनुस्म्रुतीचे राज्य.
बाकी सगळ्यांना समान न्याय आणि संधी पण ब्राम्हण आले राज्यावर की आगपाखड
7 Jan 2018 - 7:26 am | पगला गजोधर
शेणाचे पो मारणार्या तुमच्यासारख्यापेक्षा, माझे खडे बरे !
6 Jan 2018 - 10:44 pm | तेजस आठवले
+१
महारांना त्या प्रतीकांचा अभिमान असला तर त्यात वावगे काहीच नाही.प्रश्न हा आहे कि आत्ताच का दंगल झाली? ज्यांनी कोणी त्यांच्यावर दगडफेक केली त्यांना शोधून शिक्षा झालीच पाहिजे. कोरेगाव-भीमा गावातल्या ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन हिंसाचार करणारे, दगडफेक करणारे लोक बाहेरून आले होते अशी माहिती सांगितली आहे.त्या अनुषंगाने पोलीस आणि शासकीय, न्यायालयीन यंत्रणा यांनी तपास करून दोषींना शोधून काढणे अपेक्षित आहे.
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/bhima-kore...
तपास यंत्रणांनी काम सुरु करण्यापूर्वीच प्रकाश आंबेडकरांनी भिडे गुरुजी आणि एकबोटे यांच्यावर आरोप केला. त्यासाठी त्यांनी काहीही पुरावे दिले नाहीत. वरती ह्या दोघांना अटक झाल्याशिवाय शांतता प्रस्थापित होणार नाही असे सुद्धा सांगितले.याकूब मेमनवर ज्या प्रकारे गुन्हे दाखल करण्यात आले, तसेच गुन्हे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर दाखल करा, अशी मागणी केली. हे तर काही च्या काही होतं. याकूब ला शिक्षा न्यायालयाने सगळे साक्षीपुरावे बघितल्यानंतर कायद्याच्या चौकटीत दिलेली होती. तेव्हापण लोकसत्तासकट अनेक पुरोगाम्यांनी अश्रू ढाळले होते.
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/prakash-....सिम्स
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/prakash-...
हे तर सरळ सरळ घडवून आणलेलं आहे.मागील साधारण वर्षभरातल्या घटना बघितल्या तर नितीन आगे प्रकरण, कोपर्डी प्रकरण, मराठा आरक्षणाची मागणी आणि त्याच्या समर्थनार्थ निघालेले लाखोंचे मोर्चे आणि त्या निमित्ताने झालेले शक्तिप्रदर्शन हे सगळे विचारात घेऊ. मराठा समाज एका झेंड्याखाली एकत्र आला आणि ह्या निमित्ताने झालेले शक्तिप्रदर्शन आणि एकजूट काहीजणांच्या छातीत धडकी भरवणारी ठरली असू शकते.त्यातच कोपर्डीचा निकाल लागला आणि नितीन आगे प्रकरणात साक्षीदार फिरल्याने न्याय झाला नाही त्यामुळे पण काही प्रमाणात असंतोषाची बीजे पेरली गेली असावीत. ह्या घटनेनंतर रामदास आठवले यांनी सरळसरळ मराठा लोकांनी हा हल्ला केल्याचे सांगितले होते.
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/i-feel-that-those-who...
ह्या पूर्ण पॅराग्राफशी सहमत.
जर आपल्याच जातीचा उदो उदो करत आहेत असं म्हणावं तर संभाजी भिडे गुरुजी हे ब्राह्मण असावेत आणि ते तर शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या वैचारिक प्रभावाखाली आपले काम करतायत.शिवाजी महाराज तर काही ब्राह्मण नव्हते, ते तर मराठा होते.आपल्या पैकी किती जणांना शिवाजी महाराज आणि त्यांची कुणबी/ मराठा जात ह्याबद्दल बरेच वर्षांपूर्वी(२० वर्षांपूर्वी वगैरे.) वाद झडलेले आठवतायत ?संभाजी ब्रिगेडला जे बाबासाहेब पुरंदरे जळी स्थळी दिसतात ते तर ब्राह्मण आहेत आणि त्यांनी आयुष्य शिवाजी महाराजांच्या सेवेसाठी वाहून घेतले आहे.त्यांच्या लेखनाविषयी मतमतांतरे असतील, पण ब्रिगेड त्यांचा दुस्वास करते हे कोणीही नाकारू शकणार नाही.
हे फक्त दलितांच्याच बाबतीत होतं असं नाही, सर्वच जातींच्या बाबतीत होतं.प्रत्येक समूहाचं, जातीचं, धर्माचं स्टिरीओटायपिंग करणं ह्याला आपण इतके अधीन झालो आहोत की ह्यातून कोणीच सुटत नाही.दलितांच्या / मराठ्यांच्या / ब्राह्मणांच्या /दुसऱ्या जातींतल्या पुढील पिढीत अशी विषपेरणी केलीच जात नाही असे काही आहे का ?
दलितांना हीन वागणूक दिली जात होती, त्यांना अस्पृश्य मानून त्यांचा स्पर्श टाळला जात होता हे कोणीही अमान्य करणार नाही. पण हे करणारे काय फक्त ब्राह्मणच होते ? सगळेच सवर्ण त्यांना अशी वागणूक देत असणार.तसेच दलितांमधला ज्या काही जाती असतील, त्यांच्या पण एकमेकांत काही उतरंड असणारच की,का सगळे दलित एकमेकांना समान समजत होते आणि समानतेने सगळे व्यवहार करत होते ?मग दोष कोणाकोणाला द्यायचा ?
कोण उधळतो ही मुक्ताफळे ? आणि अशी मुक्ताफळे दलित, मराठे आणि ब्राह्मण एकमेकांबद्दल उगाळतात का फक्त सवर्ण दलितांबद्दल उधळतात ?
पिढयानपिढया शिक्षण कोणी नाकारलं होतं हो ?शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी शिक्षण असे तुम्ही गृहीत धरताय. प्रत्येक जाती त्यांचे त्यांचे व्यवसाय करत होती. न्हावी, चांभार, सुतार, लोहार, वाणी, सोनार, मूर्तिकार, शिल्पकार हे सगळे त्यांचे पिढयानपिढया चालत आलेले व्यवसाय सांभाळत होती. पुस्तकी शिक्षण हे इंग्रजांच्या काळात चालू झाले. पूर्वीच्या काळी ब्राह्मणांना सोडून इतरांना अध्यायन करण्याचा अधिकार नव्हता, पण मग इतर जाती पण आपापल्या व्यवसायाचे ज्ञान इतरांना सहज देत होती ?ज्यांच्या जमिनी होत्या ते लोक त्या कसायला माणसे ठेवत, त्यांना कुळे म्हणत, ह्याच कुळकायद्यात ब्राह्मणांकडच्या जमीनी गेल्या. तुम्ही आम्ही जसे एखाद्या कंपनीत नोकरी करतो तसे.डोंगरावरचे आदिवासी पण प्रवाहाबाहेरचे पण त्यांना दारात नागली वारी उगवून खायला कुणाची ना नव्हती.जमीनी नव्हत्या तर मग महार वतन दिल्याचे उल्लेख आहेतच की. म्हणजे महारांकडे शौर्य होते, ताकद होती आणि त्यांच्या पराक्रमाचे कौतुकही होत होते. बरं पूर्वीचे सगळे सरदार, जमीनदार, वतनदार, अंमलदार, मामलेदार, जमादार, तसेच गावाची व्यवस्था पाहण्यासाठी असलेले देशमुख, चौगुला, खोत, इनामदार हे झाडून सगळे ब्राह्मण होते ? एक पेशवाई सोडली तर ब्राह्मणांकडे कधीही सरदारकी नव्हती.प्रचंड गरिबी आणि अंतर्गत प्रश्न ब्राह्मणांना पण होतेच की.
ब्राह्मणांच्या पूर्वजांनी त्या काळी केलेल्या वाईट वर्तणुकीची जर आजच्या काळातील ब्राह्मणांना लाज वाटायला हवी तर मग पूर्वीच्या दलितांना दिलेल्या वागणुकीचा प्रभाव आत्ताच्या दलितांवर पडला पाहिजे हा दांभिकपणा नाही का ? ब्राह्मण जर पूर्वजांचा अभिमान मिरवत असतील तर मग आत्ता तुम्ही दलित पूर्वजांवरील अत्याचारांचे भांडवल करून त्याचा वापर करून घेत घेता हा दांभिकपणा नाही ?
हे १००% खरे आहे.फक्त दलितांच्या आंदोलनात नासधूस होते असे कोणी म्हणत असेल तर ते साफ चुकीचे आहे.
ह्याबद्दल खरं खोटं माहित नाही, पण ज्याप्रकारे ते अचानक प्रकाशझोतात आले त्यावरून अशी शंका घेतली जाऊ शकते.
रामाच्या जन्माबद्दल माहित नाही, पण सर्वोच न्यायालयाने व्यवस्थित आढावा घेऊन आणि सगळे पुरावे नीट तपासून त्या जागेवर पूर्वी राम मंदिरच होतं असं स्पष्टपणे म्हटलंय.
हा निष्कर्ष कसा काढलात ?कोणाला त्या गोष्टीचे प्रेम आहे ? पूर्वी आर्थिक नुकसान झाले असेल म्हणून आत्ता झाले तर काहीच बोलायचे नाही ?
हे होत असणार हे मला मान्य आहे आणि त्याची जाणीव पण आहे.
सोशल मीडिया वरच्या ह्या बातम्या मध्यमवर्गीयांनी आणि ब्राह्मणी विचारधारा असल्यानी दिल्या आहेत ह्याचा काय पुरावा ? कोणीही आपली ओळख लपवून प्रतिक्रिया देऊ शकतो. इकडे मिपावर पण काही लोक पगलेपण घेऊन काड्यासारु प्रतिक्रिया देत असतातच की.
6 Jan 2018 - 11:05 pm | सुखीमाणूस
मूळ लेख काही अंशी पटला. तेजसजी छान समीक्षा केली आहे.
7 Jan 2018 - 7:39 am | पगला गजोधर
तेजससी/गामाजी,
तुमचंच बरोबर हो, तुमच्या मता प्रमाणे कोरेगावच्या लढाईत पेशवाई विजयी झाली, पुढची शे दोनशे वर्षे , अखंड हिंदुस्तानवर त्यांनी एकछत्री अंमल केला, राज्य करूकरू ते शेवटी कंटाळले, शेवटी जवाहलाल नेहरूंच्या हाती भारताच्या चाव्या ठेवून ते परत आपल्या कोकेशस पर्वतराजीत आपल्या बरखट्सगार्डन या स्वगृही परतले....
पेशवाई विजयी झाल्यामुळे त्यानंतर 2 वर्षांनी विजयस्तंभ कोरेगाव येथे उभारला जाऊच शकत नाही... तो नक्कीच २०१४ नंतर गुपचूप एका रात्रीत उभारला गेला असणार....
आसेतुहिमाचल पेशवाईचा एक छत्री अंमल असल्याने, १८५७ चा उठाव हा नक्की कोणाविरुद्ध?, त्यामुळे १८५७ चा उठाव ही फेक-इतिहास असणारच तुमच्या मते , कारण पेशवाईचा एकछत्री राज्य होते नं....
7 Jan 2018 - 8:07 am | सुखीमाणूस
ब्रिगेडी नवा इतिहास वाचला होताच. पण तुमच हे व्हर्जन त्याहुन भारी आहे.
7 Jan 2018 - 9:37 am | nanaba
अस्लेला इतिहास नाकारून ,मोड् तोड करू नका प्लीज - इतक झाल तरी बरच.
7 Jan 2018 - 2:22 pm | सुबोध खरे
ब्राह्मण द्वेषाचे मूळ :
(आभार :श्री धम्मदीप कसबे )
एका ब्राह्मणेतराचे मत
................
भटाळलेले व्हा…
माझ्या अनुभवानुसार मी हे लिहितोय. कदाचित इतरांचा अनुभव वेगळा असू शकतो. पण ब्राह्मणेतर समाजाच्या मनात ब्राह्मणांबद्दल न्यूनगंडInferiority complex आहे. हे मी बर्याचदा पाहिलेलं आहे. आम्ही थिएटर करायचो त्या ग्रूपमध्ये असे अनेक नट होते जे ब्राह्मणांना पाहून बोटे मोडायचे. त्यांचं म्हणणं असं की ब्राह्मणांचे उच्चार चांगले असतात. मराठी शुद्ध बोलतात, म्हणून अनेक लोक स्टेजवर अभिनय करतात. पण केवळ उच्चार आणि शुद्ध मराठी म्हणजे अभिनय नव्हे. हे काही अंशी खरं सुद्धा आहे. मी अनेक असे नट (व्यावसायिक नव्हे, हौशी नट) पाहिलेत जे उच्चार चांगले आहेत म्हणून नट झालेत. पण अभिनयाच्या नावाने बोंब. पण ब्राह्मणांविषयी या गोष्टी ब्राह्मणेत्तर समाजाकडून द्वेष म्हणून बोलल्या जातात.
द्वेष हा बर्याचदा न्यूनगंडातून निर्माण होतो. या न्यूनगंडाला सुद्धा भली मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातच हा द्वेष निर्माण करण्यात आला होता. आज भारताला स्वतंत्र होऊन ७० वर्षे होऊन गेली आहेत. तरीही आज सुद्धा जाणीवपूर्वक ब्राह्मणद्वेष पोसला जात आहे. ब्राह्मणद्वेष हा व्रत म्हणून जोपासला जात आहे.
मी स्वतः ब्राह्मणेतर समाजातला आहे. मला कुणी ब्राह्मणांविरोधात बोलताना दिसलं तर मी त्याला भटाळलेले व्हायला सांगतो. जसं लोक म्हणतात की ब्राह्मणांवर लहानपणापासूनच चांगले संस्कार होतात. त्यांना स्तोत्र वगैरे माहित असतात, त्यांचं मराठी चांगलं असतं. पण ते संस्कार आम्हाला मिळत नाही.
आमच्या आई-वडीलांवर असे संस्कार कधी झाले नव्हते तर ते आमच्यावर कुठून करणार? अशी तक्रार लोक करतात.
म्हणून मी त्यांना म्हणतो, अरे लहानपणी तसे संस्कार झाले नाहीत हे मान्य. पण मग आता तुम्हाला कोणी थांबवलंय? आता तुम्ही तुमच्यावर संस्कार करुन घ्या आणि आपल्या मुलांवरही करा.
आपल्याला जर शुद्ध बोलता येत नसेल तर आपण आता शिकू शकतो. आता संस्कार वर्ग वगैरेंच्या माध्यमातून या गोष्टी शिकता येतात.
पण मला वाटतं की ब्राह्मणेतर समाजातील मुले, जे कला-क्षेत्रात येऊ पाहत आहेत, त्यांनी शुद्ध मराठीपेक्षा स्पष्ट मराठीवर अधिक लक्ष दिलं पाहिजे. उदा.अनेक लोक असतात, त्यांना कसली घाई असते कळत नाही. ते काय बोलतात हे ब्रह्मदेवालाही कळत नाही. इतकं वेगात आणि अस्पष्ट बोलतात. आम्हाला थिएटरमध्ये शिकवलं गेलंय की संवाद म्हणताना आपले शेवटची अक्षरं सुद्धा ऐकू आली पाहिजे. म्हणजे समजा असं वाक्य असेल, “मी आता बाजारात जाऊन फुलं आणणार”. तर बरेच नट शेवटचा “र” तोंडातल्या तोंडात उच्चारतात. म्हणजे “मी आता बाजारात जाऊन फुलं अण्णा” असं काहीतरी ऐकू येतं. मग या वाक्याचा अर्थच बदलतो. ही समस्या आहे अनेक हौशी ब्राह्मणेत्तर नटांची.
या समस्येतून पळवाट शोधण्यासाठी ते ब्राह्मण समाजावर आसूड ओढताना मी पाहिलंय.
हे एक उदाहरण. एखादा ब्राह्मण समाजातील उत्तम नट असेल तरी सुद्धा त्याच्याकडे पाहून नाक मुरडतात. हे केवळ कलेच्या क्षेत्रातच होतं असं नाही. तर सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यातही होतं.
आपण द्वेषाची परिसीमा इतकी गाठली आहे की आपल्याला ब्राह्मण मुख्यमंत्री सुद्धा आवडत नाही.
प्रत्येक गोष्टीत आपण जात पाहायला लागतो. ते याच Inferiority complex मुळे. म्हणूनच मी माझ्या मित्रांना सांगत असतो, भटाळलेले व्हा. म्हणजे काय तर त्यांच्यासारखे हुशार व्हा. ब्राह्मण समाजाचा द्वेष करु नका. तर त्यांच्याकडून अनेक गोष्टी आपल्याला शिकता येतील.
मला पूर्वी “ष” हा उच्चार करता येत नव्हता. माझ्या एका ब्राह्मण मित्राने मला तो उच्चार शिकवला. आपणही आपल्या मुलांना श्लोक, स्तोत्र पठण करायला बसवलं पाहिजे ज्यामुळे त्यांचे उच्चार आणि भाषा स्पष्ट होईल.. मग इथे काही लोक इतका अतिरेक करताना म्हणतात, संस्कृत ही ब्राह्मणांची भाषा आहे. हा पराकोटीचा द्वेष आहे. म्हणजे आपल्या नाकर्तेपणात सुद्धा समाधान मानून जे कर्ते आहेत त्यांनाच नाकर्ते म्हणायचे. आजही काही लोक मनुस्मृती जाळतात. म्हणे मनुस्मृती हे ब्राह्मणांचं कारस्थान आहे.
मनु हा स्वतः क्षत्रीय होता. मला मनुस्मृतीत काय लिहिलंय यात मुळीच रुची नाही. आज हिंदूंनी संविधान स्वीकारले आहे. म्हणून मनुस्मृती चांगली की वाईट याचे सोयर-सुतक आम्हाला नाही. पण मनुस्मृतीतल्या एखाद्या श्लोकामुळे माझे उच्चार सुधारणार असतील तर मी नक्कीच त्याचे पठण करीन. उच्चारासाठी संस्कृत श्लोक हा उत्तम उपाय आहे.
ब्राम्हणांच्यात अनेक प्रगतिशील लोक कलाकार व्यावसायिक आहेत.ते केवळ ब्राह्मण आहेत म्हणूण त्यांचा इतका द्वेष करणे म्हणजे अक्षरशः मूर्खपणा आह
ब्राह्मण समाज कोणतेही आरक्षण नसताना स्व-बळावर आज जगत आहे. लोक त्यांचा द्वेष करतात. पण ते प्रतिकार न करता कर्तृत्व गाजवत आहेत. या समाजाला मी बुद्धीचा समाज मानतो आणि बौद्धिक पातळीवर मलाही ब्राह्मण व्हायला आवडेल. त्यासाठी मला माझे आडनाव बदलायचे नाही, मला माझी जात, वर्ण बदलायचा नाही. आता कुणी म्हणेल की मी अजूनही जातीला चिकटून आहे. पण ज्या दिवशी आपण अरक्षण वगैरेंच्या चक्रव्यूहातून बाहेर पडू तेव्हा खर्या अर्थाने आपल्याला भारतीय समाज म्हणून जगता येणार आहे. नाहीतर हिंदू, मुस्लिम, दलित, बौद्ध असले भेद राहणारच. त्यामुळे आता ७० वर्षे झाल्यानंतर एक भारतीय समाज म्हणून आपल्याला ७० वर्षे मागे जायचे आहे की अद्ययावत व्हायचे आहे? हे आपल्यालाच ठरवले पाहिजे. त्याची सुरुवात साहित्याला दलित किंवा मुस्लिम न म्हणता करता येईल. साहित्य हे साहित्यच असावे. ते मराठीत लिहिले गेले असेल तर ते मराठी साहित्य, हिंदीत लिहिले गेले असेल तर ते हिंदी साहित्य. एवढीच काय ती वर्गवारी असावी. जाती, पंथाच्या आधारावर साहित्याची वर्गवारी ठरु नये.
जे Inferiority complex मुळे ब्राह्मणांचा द्वेष करतात. त्यांनी ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ कसे होता येईल याचा विचार करायला पाहिजे. ब्राह्मणांची मुले कोणत्या कोणत्या कलेत पारंगत असातत. कुणी गाणे म्हणतो, कुणी तबला वाजवतो तर कुणी चांगले लेखन करतो. ही सवय तुम्ही स्वतः आणि तुमच्या मुलांना लावा. ब्राह्मणेत्तर उच्चभ्रू समाज सोडला तर इतर लोक आपल्या मुलांना या सवयी लावत नाहीत.
ब्राम्हण समाजाचे पुढारी नाहीत किंवा त्यांचा असा कोणताही नेता नाही ज्याच्या एका हाकेवर समाज रस्त्यावर उतरेल. कारण प्रत्येक ब्राम्हण हा स्वतंत्रपणे विचार करू शकतो. मराठा काय इतर मागासवर्गीय काय किंवा दलित काय नेत्याच्या हाकेला मेंढरांसारखे मागे जातात. ७० वर्षे झाली पण मराठा समाजातील 60-65 घराणी सोडली तर बाकी मराठा समाज मागासलेलाच राहिला आहे. सगळे पुढारी मंत्री इ याच काही घरण्यातून येतात आणि त्यांसाजे आपापसातच रोटी बेटी व्यवहार होतात. बाकी मराठा समाजाला कोणीही शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांच्या नावावर चिथावू शकतो.
हीच स्थिती आमच्या दलित समाजाची आहे. पूज्य डॉ. बाबासाहेबांच्या नावाने आमच्या नेत्यांनी आमच्या समाजाचा वापर करून घेतला आणि स्वतः सरकारी जावई झाले आहेत. आमचा समाज मात्र आज आहे तिथेच आहे.
1 जानेवारीला ज्या तरुणांनी बंद मध्ये भाग घेऊन हिंसाचार केला त्यांना आता सरकारी संघटना "वेचून वेचून" आत टाकतील. त्यांना जामीन द्यायला किंवा सोडवायला आमचे नेते काही येणार नाहीत. नेत्यांच्या चिथावणीने चार दगड फेकताना आपण विद्रोही म्हणून यशस्वी झाल्याचे वाटते पण "आत टाकल्यावर बाहेर" येण्यासाठी पदरमोड करावी लागली की भ्रमनिरास होतो. नंतर
खटला भरला की या तरुणांना सरकारी नोकरीतून बाद केले जाईल. याची ना आमच्या नेत्यांना ना खंत ना खेद.
आपण नेत्यांच्या चिथावणीला बळी न पडता किंवा मेंढरांसारखे त्यांच्या मागे विचार न करता जाण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीचा विचार करायला शिकू या. अन्यथा अजून 70 वर्षांनी पण आपण आहोत तेथेच राहू.
ब्राह्मणांचा द्वेष करण्यापेक्षा त्यांच्यासारखेच व्हा
लेखक: धम्मदीप कसबे.
व्हॉटस अँप वरून साभार
7 Jan 2018 - 4:28 pm | गामा पैलवान
खरे डॉक्टर,
धम्मदीप कसबे यांचा संदेश उद्धृत केल्याबद्दल आभार. दलित नेत्यांविषयी केलेलं हे विधान विशेषकरून पटलं :
मलाही हेच सांगायचं होतं पण नीट शब्द सापडंत नव्हते. प्रकाश आंबेडकर नक्षलवादी आहे. या माणसाचा दलितांच्या हिताशी काडीमात्र संबंध नाही. काही संबंध असलाच तर तो हितशत्रू म्हणून आहे. प्रकाश आंबेडकरांपासून सावध राहायला हवं.
मराठा समाजातही थोडीफार अशीच परिस्थिती असल्याचं लेखकाचं निरीक्षण आहे.
आ.न.,
-गा.पै.
7 Jan 2018 - 8:32 pm | रामपुरी
दुसर्याची रेष छोटी करून आपली मोठी होत नाही एवढंच समजलं तरी पुष्कळ आहे. असो
चालू द्या...
7 Jan 2018 - 9:01 pm | पगला गजोधर
टिपिकल मोडस ऑपरेनडी .... ट्रोजन हॉर्स...
पाठशाला प्रशिक्षित ब्लॉगर्स आता गॅब्रिअल, सलीम, बुद्धभूषण, धम्मदीप, फिलॉसॉफर अश्या विविध नावाने आपल्याला हवं ते पोस्ट करतात....
.
.
प्रतिपक्षात आपलेच उंट सोडण्याची रणनिती आम्हाला परिचित आहे....
छत्रपती शिवाजीराजे यांनी आम्हाला शत्रूच्या चाली ओळखायला शिकवलं आहे....
त्यामुळे धम्मदीप किंवा अजून काही नावांनी काहीही पोस्ट करा,
प्रशिक्षित ट्रोजन हे ट्रोजनच....
7 Jan 2018 - 9:33 pm | गामा पैलवान
प.ग.,
ट्रोजन म्हणजे काय रे भाऊ? तो प्रकाश आंबेडकर बघा कसा नक्षल्यांनी सोडलेला ट्रोजन आहे. तुमच्या कुठे लक्षात आला?
आ.न.,
-गा.पै.
7 Jan 2018 - 9:41 pm | अभ्या..
परफेक्ट.
शेवटाच्या दोन चार ओळी वाचल्या की लगेच अजेंडा लक्षात येतो.
8 Jan 2018 - 1:58 am | एमी
अगदी अगदी!
कसली भोंदू पोस्ट आहे ती....
8 Jan 2018 - 9:33 am | सुबोध खरे
1 जानेवारीला ज्या तरुणांनी बंद मध्ये भाग घेऊन हिंसाचार केला त्यांना आता सरकारी संघटना "वेचून वेचून" आत टाकतील. त्यांना जामीन द्यायला किंवा सोडवायला आमचे नेते काही येणार नाहीत. नेत्यांच्या चिथावणीने चार दगड फेकताना आपण विद्रोही म्हणून यशस्वी झाल्याचे वाटते पण "आत टाकल्यावर बाहेर" येण्यासाठी पदरमोड करावी लागली की भ्रमनिरास होतो. नंतर
खटला भरला की या तरुणांना सरकारी नोकरीतून बाद केले जाईल. याची ना आमच्या नेत्यांना ना खंत ना खेद.
ज्या कुणी हि पोस्ट टाकली असेल ट्रॉल असेल किंवा भोंदू असेल. (धम्मदीप कसबे किंवा जो कोणी). त्यातील वरील वस्तुस्थिती बदलत नाही ना?
या तरुणांचा उद्रेक बाहेर पडला हे मान्य पण यात श्री प्रकाश आंबेडकर यांनि शक्तिप्रदर्शन करून आपली पोळी भाजून घेतली(आपले गाळात जाणारी राजकीय कारकीर्द वर खेचण्याचा प्रयत्न समजा) हि वस्तुस्थिती तर बदलत नाही.
दलितांना खरी गरज आहे ती चांगल्या सक्षम नेतृत्वाची. पण त्यांना मिळाले कोण तर मायावती किंवा चार पाच सवतासुभा उभे करणारे रिपब्लिकन पक्षाचे गट. काँग्रेसने तर त्यांना दशकानुदशके व्यवस्थित "वापरून" घेतले.
8 Jan 2018 - 12:49 am | मराठी कथालेखक
संपुर्णपणे पटला नाही .. पण लेखनातला एकूण आशय आवडला त्यामुळे एकेका मुद्द्याची वेगळी चिकित्सा करण्याची गरज वाटत नाही.
ह्या सगळ्या मंथनातून आता काही निर्णायक आणि विधायक वळण समाजाला मिळावं ,समाजातील जाती/धर्मभेदाची दरी कायमची कमी होण्यास सुरुवात व्हावी ही अपेक्षा.
आ पार्श्वभूमीवर एक नमूद करावेसे वाटते मुंबईत १९९२ की ९३ साली जीवघेण्या दंगली झाल्या होत्या (हिंदू मुस्लिम), मी बारा-तेरा वर्षांचा होतो, पण त्या वयातही पेपरमधल्या दंगलीच्या बातम्या सुन्न करणार्या होत्या. सगळं वातावरण ढवळून निघालं. पण माझ्या माहितीप्रमाणे त्यानंतर पुन्हा अशा भयंकर (हिंदू मुस्लिम) दंगली मुंबईत घडल्या नाहीत (काही वेळा, नाजूक परिस्थिती निर्माण झाली पण लगेच आटोक्यातही आली) निदान मुंबईतील समाजतरी याबाबत अधिक समंजस झाला असं मानता येईल. तसंच आता या घटनेनंतरही महाराष्ट्रातील समाज विचार करायला प्रवृत्त होईल आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत अशी आशा करुयात.
8 Jan 2018 - 6:44 am | पगला गजोधर
९२-९३ च्या दंगलीत राजाच्या राजकीय नेतृत्वाने प्रगल्भता दाखवत, मुस्लिम भागात ही बॉम्बस्फोट झालाय अश्या बातम्या पसरवल्या, व त्यामुळे फक्त हिंदूंवर हल्ला ही हिंदुवाद्यांची जहरी खेळी आधीच प्री एम्प्ट केली...
याउलट 2002 मध्ये गुजरातमधे कारसेवकांना काही समाज कंटकानी जाळलं, 2 दिवस ... लक्षात घ्या पूर्ण ४८ तास अहमदाबाद शांत होतं, तत्कालीन राज्याच्या नेतृत्वाखाली टाळूवरच लोणी खाण्यासाठी, मृतदेहांची ओपन कास्केट ट्रक मधून गावभर मिरवणूक व अभाविप च्या कार्यालय दर्शनासाठी ठेवून, जाणून बुजून हिंदूंच्या भावना एका धर्माविरुद्ध चेतावल्या, आणि ऍनाकोंडासारखं मानभावी पणे व्हर्बल ऑर्डर्स दिल्या गेल्या, की हिंदुओ की भावना व्यक्त हो रही है, उसे होने दो....
(*शेखर कपूर चा "पंतप्रधान" सीरिअल- अटलबिहारी कार्यकाळ 2002)
13 Jan 2018 - 10:19 pm | भंकस बाबा
म्हणे मुस्लिम भागात बोम्बस्फोट झाल्याच्या बातम्या पसरवल्या, बाबरी मशिद आणि मुंबई स्फोटाचि बातमी एकाच काळात आणली तुम्ही! त्या दंगलीत देखील राधाबाई चाळ प्रकरण झाले आणि हिंदुनि ताकत दाखवली ,
8 Jan 2018 - 8:14 am | पगला गजोधर
ढोराचं कातडं कमावून उदरनिर्वाह करणाऱ्या दलितांवर अमानुष मारहाण व हिंसेचे अत्याचार करणारे "अनचेक्ड गौरक्षक" , यांच्याविरुद्ध च्या अहिंसक लोकमोहिमेतून कायदापदवीधर-जिग्नेश चे नेतृत्व पुढे आलं....
या अश्या युवामुळे आता देशाचे तुकडे पडणार, असं मनुवादी, काहीही बरळतील....
पण अनौरस "अनचेक्ड गौरक्षक" बाबत शेपूट घालतील ....
"पुण्यात गुजरातच्या जिग्नेशचे काय काम ?-"असे बरळणारे मात्र, जीग्नेशच्या विधानसभा मतरदारसंघात, उप्र च्या आदित्य नाथ का ? याबाबतीत चकार शब्द बोलणार नाहीत....
..
पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष शहा, उ प्र मुख्यमंत्री आदित्यनाथ, देशातील इ अनेक बीजेपी मुख्यमंत्री खासदार प्रचारात खुद्द येऊनही, जिग्नेश निवडून आला... मग आता भक्त लगेच आता जिग्नेशला देशद्रोही/ किंवा देशद्रोही इन वेटिंग, बनवतीलच....
कारण
"Patriotism is the last refuge of a scoundrel."....
कळलं ??? स्काऊड्रल भक्ताणो ???
8 Jan 2018 - 9:45 am | सुबोध खरे
पुण्यात गुजरातच्या जिग्नेशचे काय काम ?-"असे बरळणारे मात्र, जीग्नेशच्या विधानसभा मतरदारसंघात, उप्र च्या आदित्य नाथ का ? याबाबतीत चकार शब्द बोलणार नाहीत....
आदित्यनाथ हे निवडणूक प्रचारासाठी गुजरातमध्ये गेले होते (जसे ते आता बंगलोर मध्ये आहेत). राहुल गांधी सुद्धा गुजरात मध्ये होतेच.
जिग्नेशजी कोणाच्या प्रचारासाठी पुण्याला आले होते? निवडणूका अजून जाहीरही झाल्या नाहीत. म्हणजे तीन महिने कुठेच गेले नाहीत.
बाकी १ जानेवारीचे रणकंदन आणि जिग्नेशजींची भेट या "योगायोग" असू शकेल.
द्वेषाने आपण इतके आंधळे झाले असाल असे वाटले नव्हते.
असो
8 Jan 2018 - 12:29 pm | पगला गजोधर
दलित संघटना समितीने आपल्या प्लॅटफॉर्मवर कोणाला आमंत्रण द्यावे व कोणास देऊ नये, याबाबतीत काय
नागपूरच्या रेशीमबागेतून आदेश घ्यावे काय ?? असो भारतभरातील दलित ज्यात मेवानी सुद्धा येतात, जर परिषदेसाठी जमले असेल तर त्यात काय वावगे ?
बाकी जाताजाता, गुजरातच्या जनेतला त्यांच्या राज्यात काय विकास झालाय हे सांगायला, दुसऱ्या राज्यातील (उत्तरप्रदेशातील) मुख्यमंत्री येतो .. हे पाहून करमणूक झाली...
8 Jan 2018 - 12:38 pm | सुबोध खरे
ब्वॉर्र
आता तुम्ही चष्माच घातलाय म्हटल्यावर काय बोलावे?
जाऊ द्या
8 Jan 2018 - 1:39 pm | प्रसाद_१९८२
बाकी जाताजाता, गुजरातच्या जनेतला त्यांच्या राज्यात काय विकास झालाय हे सांगायला, दुसऱ्या राज्यातील (उत्तरप्रदेशातील) मुख्यमंत्री येतो .. हे पाहून करमणूक झाली...
<<
<<
कॉंग्रेसी पप्पूचा कोणत्याच राज्याशी काहिच संबध नसताना देखिल तो सगळीकडे जातोच ना.(आता पप्पू ज्या-ज्या राज्यात जातो तिथे कॉंग्रेसचा दारुण पराभव होतो तो भाग वेगळा) मग योगी आदित्यनाथ गुजरातमध्ये गेले तर काय फरक पडतो. तसेही महाराष्ट्र व इतर राज्यात कॉंग्रेसचे दिल्लीतील ज्यांचा महाराष्ट्र व इतर राज्यांशी कसलाही संबध नाही ते निवडणुक प्रचाराला जातातच ना त्यांच्या बद्दल कोणी बोलल्याचे आजवर ऐकले नाही.
8 Jan 2018 - 1:46 pm | पगला गजोधर
तुम्हाला मुळ मुद्दा लक्षांत नाही आलाय...
"जिग्नेश चे पुण्यात काय काम ? "
ह्या आक्षेपविरुद्ध दिलेलं उदाहरण आहे ते...
8 Jan 2018 - 9:44 am | पगला गजोधर
दलितांच्यामधून सुशिक्षित-कायदा पदवीधर, अहिंसक चळवळ उभी करणारे, जिग्नेश सारखे नव व युवा नेतृत्व अजून मोठ्या प्रमाणात पुढे येणे, हे भारतीय लोकशाहीला आवश्यक आहे..
...
त्याला आताच दाबून टाकायला पाहणारे राजकीय संघी,
हे दलितांना काय न्याय देणार ???
8 Jan 2018 - 9:50 am | सुबोध खरे
द्वेषाने आंधळा झालेला माणूस काय करू शकतो ते हि पाहून घ्या. हा दलितांचा पुढारी होणार असेल तर झालंच "चांगभलं"
http://www.firstpost.com/politics/gujarat-assembly-elections-jignesh-mev...
The Popular Front of India is an extremist and militant Islamic fundamentalist organisation in India
https://en.wikipedia.org/wiki/Popular_Front_of_India
8 Jan 2018 - 9:53 am | सुबोध खरे
केवळ "मोदी द्वेषा" साठी इस्लामिक मूलतत्त्ववादी संघटनेकडून देणगी घेणारा हा माणूस आहे एवढेच नमूद करू इच्छितो.
जाता जाता-- पंचतंत्रातील एक गोष्ट.
एका सापाच्या डोक्यावर गांधील माशी बसली आणि त्याला चावली. साप द्वेषाने आंधळा झाला आणि त्याने माशीला शिक्षा म्हणून एका चालणाऱ्या बैलगाडीच्या खाली आपले डोके घातले. माशी मात्र उडून गेली अनिसपच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला.
याचा वरील राजकारणाशी संबंध नाही.
8 Jan 2018 - 12:42 pm | पगला गजोधर
साहेब,
आपण कसला डोंबलाच्या इस्लामीमूलतत्त्ववाद विषयी बोलत आहोत, अहो
अफजल गुरूला शाहिद मानणाऱ्या व विधान सभेत तसा ठराव पास करणाऱ्या बरोबर बीजेपी वाले मांडीलामांडी लावून सत्ता उपभोगत आहेत....
आणि याला जस्टीफाय करण्यासाठी जो तर्क दिला जातो,
(त्यांना नियंत्रणात ठेवणे वैगरे)...
तीच तर्काची उदात्तता इथं दाखवा बरे...
8 Jan 2018 - 1:00 pm | पुंबा
अंतराजी, लेख आवडला. काही मुद्दे पटले नाहीत परंतू बर्याचशा मुद्द्यांशी सहमत आहे.
दलितांवर कसलाही अत्याचार होत नव्हता असे म्हणणार्या लोकांची संख्या मला वाटते वाढली आहे. होलोकॉस्ट डिनाय करणारेही लोक आहेत. मात्र गावगाड्यात दलितांचे स्थान किती अपमानाचे होते आणि जगताना त्यांना कोणत्या अमानुष व्यवहाराला तोंड द्यावे लागे हे कोणत्याही वयस्कर खेडेगावात राहिलेल्या व्यक्तिस विचारून पहावे.
त्रिंबक आत्रे यांचे 'गावगाडा' हे पुस्तक देखिल बर्याच प्रमाणात अन्याय्य जातीव्यवस्थेचे यथास्थीत वर्णन करते. आताची काही दलितांची सुधारलेली परिस्थीती बघून गेलेल्या काळाचे आकलन करणे सर्वथा गैर आहे. आजदेखिल भटके विमुक्त, महादलित यांची परिस्थिती दलितांमधील पुढारलेल्या पोटजातींपेक्षा वाईटच आहे.
जाती, धर्म निहाय अस्मिता वरचेवर टोकदारच होत चालल्या आहेत. आर्थिक प्रगती होऊनदेखिल सामाजिक एकोपा आलेलाच नाही. देश, संविधान या आपल्याला एका सूत्रात बांधून ठेऊ शकणार्या गोष्टींपेक्षा आपल्याला अजूनही भेदाभेदांच्या भिंती भक्कम करण्यातच रस आहे. खरेतर जातींचे पुर्वी असणारे फायदे आता मुळीच नाहीत तरीही जाती हव्याच वाटतात आपल्याला. हे चित्र भविष्याच्या दृष्टीने भयावह आहे.
8 Jan 2018 - 3:07 pm | arunjoshi123
शांत गदाधारी भीम शांत.
==============================
शेवटी इथे चर्चा करणारे आपण तरी एकमेकांशी प्रेमाने नि आदराने (वाटल्यास थोड्या खवचटपणे) वागू शकत नाही का? समाजासाठी वा देशासाठी काय इष्ट आहे याबद्दल मतांतर आहे मंजे चर्चेचा टोन चढवावाच असं जरूरी नाही. शेवटी आपण आपल्या सर्वांसाठीच काय भलं आहे हेच शोधायला भांडत (किंवा जे काय ते) आहोत ना?
===========================
वादग्रस्त विषयावर समूहाने लिखित चर्चा कशी करावी यावर कोणी मार्गदर्शनपर लिहिल काय? मंजे प्रमेय (किंवा जे काय ते) कसे मांडावे, पुरावे कसे द्यावे, किती अवांतर करावे. कोणता तर्क व्हॅलिड मानावा, इ इ इ. संसदेत बहुमत नावाच्या शक्तीने उचित नि अग्राह्य काय हे ठरते.
============================
मला असं वाटतं कि श्रीमान आमदार मेवानी, वा प्रकाश आंबेडकर वा (काही लोकांचे पूज्य) भिडे गुरुजी, वा अन्य कोणी जर कोणताही दखलपात्र गुन्हा केलेला आहे आणि त्याचा कोणताही पुरावा सरकारकडे आहे तर त्यांच्यावर सरकार योग्य ती कारवाई करेलच. ती सरकारला करावीच लागते. ज्याअर्थी असं काही होत नाहिये, त्याअर्थी त्यांच्यात केवळ वैचारिक, तात्विक इ मतभेद आहेत. त्यांच्या अनुयायांनी देखील ते त्याच पातळीवर मर्यादित ठेवायला हवेत.
8 Jan 2018 - 3:16 pm | अमर विश्वास
ते जिग्नेश आणि उमर गेले आग लावून
त्यावर पवार - आंबेडकर आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत
बाकी दलितांवर पूर्वी अन्याय झाला ... खरी गोष्ट आहे ...
फक्त हे अजून किती वर्षे उगाळणार हे पण सांगा
8 Jan 2018 - 3:36 pm | पगला गजोधर
व्वा साहेब...
मटा ची बातमी आहे, एका ख्रिस्ताव कलाकारांचा स्टुडिओ (की जिथे बाबासाहेबांची अनेक भित्तिचित्रे म्युरल होते), ते कोरेगाव भीमा दंगलीत जाळून खाक केले गेले....
त्या आगी लावण्यामागे तुमच्या प्रातस्मरणीय ऋषितुल्य गुर्जी व बाराबोटेच्या सारख्या विचारसरणी चा लोकांचा उल्लेख वगळून,
तुम्हाला पवार मेवाणी आंबेडकरच बरे दिसले....
बाबासाहेबांची अनेक भित्तिचित्रे म्युरल घडलेल्या/ असलेल्या स्टुडिओला जाळून हे बाराबोट्याचें काय बोडक्याची हिंदूएकता घडवून आणणार होते ????
8 Jan 2018 - 3:53 pm | अमर विश्वास
ज्यांनी आपला राजकीय स्वार्थ साधला त्यांचा उल्लेख करणे गैर नाही ...
तो स्टुडिओ कोणी जाळला ते चौकशीत समोर येईलच ... त्याचा गुरुजींशी काहीही संबंध नाही
त्याचबरोबर बंद मध्ये कोणी काय नुकसान केले तेही सांगून टाका
8 Jan 2018 - 3:20 pm | प्रसाद_१९८२
बाकी दलितांवर पूर्वी अन्याय झाला ... खरी गोष्ट आहे ...
फक्त हे अजून किती वर्षे उगाळणार हे पण सांगा
==
==
देवेंद्र फडणविसांची मुख्यमंत्रीपदावरुन जोपर्यंत उचलबांगडी होत नाही, तोपर्यंत.
तथाकथित पुरोगामी महाराष्ट्रात एक ब्राम्हण मुख्यमंत्री होऊच कसा काय शकतो ?
8 Jan 2018 - 3:29 pm | arunjoshi123
असं कोणी म्हटलं? एन सी पी (यांना ब्रिगेडी लोकांचे मित्र मानतात) ने पाठिंबा देऊ केला होता. आठवले गटाचा आहेच. मग हा आरोप किमान पवारांवर करता येणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या जातीचा (साधा) उल्लेख करणं त्यात इतकं गैर काय?
तथाकथित पुरोगामी लोक ब्राह्मण चालेल, ब्राह्मण्य नको; हिंदू ओके, हिंदुत्ववाद नको असलं कायतरी ऑफिशियली म्हणत असतात. तुमचं विधान ऑफिशियल वर्जनच्या विरुद्ध आहे.
8 Jan 2018 - 3:26 pm | अमर विश्वास
खरं आहे ..
रमाबाई नगर मध्ये दंगल उसळली होती तेंव्हा मनोहर जोशी मुखमंत्री होते
8 Jan 2018 - 3:31 pm | arunjoshi123
नामांतराची दंगल उसळली होती तेव्हा ना जोशी ना फडणवीस मुख्यमंत्री होते. तेव्हा कोणाला कोणत्या जातीचा मुख्यमंत्री होऊच कसा शकतो असे वाटत होते?
8 Jan 2018 - 3:37 pm | आनन्दा
ते दोन वेगळे विषय आहेत.
एखाद्या विद्यापीठाला अंबेडकरांचे नाव देणे आणि एखाद्या पुतळ्याच्या गळ्यात चपलांचा हार घालणे याची तुलना होऊ शकत नाही.
पण बाकी आशयाशी सहमत.
8 Jan 2018 - 7:54 pm | प्रकाश घाटपांडे
जात ही अंधश्रद्धा आहे ही अंनिसची अधिकृत भूमिका आहे.तिचे निर्मूलन व्हायचे असेल तर प्रथम ती किमान शासकीय कागदपत्रावरुन तरी हटवली पाहिजे. बघा जमतय का?
8 Jan 2018 - 9:49 pm | विशुमित
ज्यांनी कोणी भीमा कोरेगाव दंगल पेटवून महाराष्ट्राची राख रांगोळी करण्याचा कट आखला होता त्यांचे मनसुबे समाजातील सर्व स्तरातील लोकांनी निषेद व्यक्त करून उधळून लावले आहेत.
काही प्रातिनिधिक उदाहरणे:
https://www.loksatta.com/maharashtra-news/sadbhavna-rally-of-dalit-and-m...
...
मला सर्वात महत्वाचा पडलेला प्रश्न: अशा नाजूक प्रसंगी मुख्यमंत्र्यानी घटनास्थळी लगेच धाव का घेतली नाही ? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एवढे घाबरायचे काही कारण नसावे.
----
8 Jan 2018 - 10:55 pm | इरसाल
२८ जानेवारी पुन्हा १ जानेवारी नाही झाली म्हणजे मिळवली.
9 Jan 2018 - 11:56 am | पगला गजोधर
प्लॉउजिबल डिनायेबिलिटी
Plausible deniability is the ability of people (typically senior officials in a formal or informal chain of command) to deny knowledge of or responsibility for any damnable actions committed by others in an organizational hierarchy because of a lack of evidence that can confirm their participation, even if they were personally involved in or at least willfully ignorant of the actions. In the case that illegal or otherwise disreputable and unpopular activities become public, high-ranking officials may deny any awareness of such acts to insulate themselves and shift blame onto the agents who carried out the acts, as they are confident that their doubters will be unable to prove otherwise. The lack of evidence to the contrary ostensibly makes the denial plausible, that is, credible, although sometimes it merely makes it unactionable. The term typically implies forethought, such as intentionally setting up the conditions to plausibly avoid responsibility for one's (future) actions or knowledge. In some organizations, legal doctrines such as command responsibility exist to hold major parties responsible for the actions of subordinates involved in heinous acts and nullify any legal protection that their denial of involvement would carry.
तर लोकहो "प्लॉउजिबल डिनायेबिलिटी " यामधे एका संघटनेचा हातखंडा आहे.
उदा. १
महात्मा गांधी हत्या ... हत्यारा आमची संघटना सोडून गेलेला, त्याचा आमचा संबंध नाही.
. .
.
लेटेस्ट उदा..
राजस्थानात एका व्यक्तीने मुस्लिम मजुरांची हत्या करून जाळलं , स्वतः रेक्कॉर्ड केलं .. धमक्या दिल्या रेकॉर्डिंग मध्ये ......
तो माथेफिरू आहे त्याचा आमचा संबंध नाही.
.
त्याच प्रमाणे कोरेगाव भीमा प्रकरणातले एक पुज्यनीय व्यक्तिमत्व, ज्यांच्या आदेशाने पंप्र त्यांना भेटायला याय्चे....
त्या व्यक्ती संधर्भात कदाचित असे ऐकू येईल "आमची संघटना सोडून गेले, त्यांचा आमचा संबंध नाही"
9 Jan 2018 - 12:37 pm | प्रसाद_१९८२
त्याच प्रमाणे कोरेगाव भीमा प्रकरणातले एक पुज्यनीय व्यक्तिमत्व, ज्यांच्या आदेशाने पंप्र त्यांना भेटायला याय्चे....
त्या व्यक्ती संधर्भात कदाचित असे ऐकू येईल "आमची संघटना सोडून गेले, त्यांचा आमचा संबंध नाही"
<<
कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी संभाजी भिडे गुरुजींवर तुम्ही हे जे बेधडक आरोप करताय ,
त्याचे पुरावे असतीलच तुमच्याकडे ?
9 Jan 2018 - 12:54 pm | आनन्दा
ते म्हणतायत एव्हढा पुरावा पुरेसा नाही का?
9 Jan 2018 - 2:33 pm | पगला गजोधर
वरील प्रतिसाद plausible deniability वर आहे...
जमल्यास खालील लेख वाचा
"भीमा-कोरेगावचे खरे गुन्हेगार" -निखिल वागले
http://www.aksharnama.com/client/article_detail/1669
9 Jan 2018 - 3:46 pm | शलभ
:D
9 Jan 2018 - 4:11 pm | प्रसाद_१९८२
"भीमा-कोरेगावचे खरे गुन्हेगार" -निखिल वागले
==
==
वागळ्याचे ब्राह्मण प्रेम तर सर्वशृत आहे.
त्याने तर तुमच्या पुढे जाऊन संभाजी भिडे गुरुजींना दहशतवादी म्हटलेय लेखात.
9 Jan 2018 - 4:17 pm | विशुमित
पुरावे मागण्यापेक्षा हडपसर, फुरसुंगी, मांजरी बुद्रुक, वाघोली, सनसवाडी, लोणी या भागातील कथीत हिंदू रक्षक यांच लोण
कोणी आणि कसे पसरवले आहे याची माहिती मिळवू शकत असाल पहा. त्यांच्या कामाचा देखील आढावा घ्या.
रच्याक मनोहर भिडे (साॅरी ऋषीतुल्य संभाजी? भिडे गुरुजी) यांच्या मोहिमेत कधी सहभागी झाले आहात का?
99% सांगतो तुमचे उत्तर नाही असणार जे तुम्ही कधी कबूल करणार नाही.
9 Jan 2018 - 4:40 pm | पगला गजोधर
मनोहर भिडे (सबनीस), यांचे 'संभाजी' नामांतर कसे झाले बुवा ? कोणास काही आयडिया ?
9 Jan 2018 - 5:07 pm | mayu4u
... मी सहभागी झालेलो नाही, त्यामुळे तिथं नक्की काय चालतं ठाऊक नाही. विशुमित, तुम्ही याविषयी लिहाच!
9 Jan 2018 - 5:23 pm | विशुमित
तुम्हाला सगळे रेडीमेडच पाहिजे असतं असं माझं निरिक्षण आहे.
पुढची मोहीम कधी आहे याची माहिती करून घ्या.
आज शक्य नाही पण उद्या लिहण्याचा प्रयत्न करतो. पण लगेच मागे लागू नका उद्या मला इतर ही कामे असतात. (कृपया हा घ्या)
10 Jan 2018 - 10:07 am | mayu4u
तुमचं निरीक्षण बरोबर आहे, पण त्यातून तुम्ही काढलेला निष्कर्ष चुकीचा आहे. मला तुमचा अनुभव वाचायचा होता/आहे. मोहिमेत स्वतः सहभागी होणं शक्य नाहीये. कामं मलाही असतात ना.
तुमच्या मागे लागत नाहीये, पण तुम्हाला बरीच कामं असल्याने ते पुरावे देणं पण बाकी राहिलंय ना, तस हे पण राहून जाऊ नये असं वाटतं. भिड्यांविषयी आणि त्यांच्या मोहिमे विषयी तरी तुमच्याकडे काही माहिती असेल असं वाटतंय, जमलं तर शेअर करा.
9 Jan 2018 - 9:16 pm | अनुप ढेरे
बाकी भिडे गुरुजींनी संभाजी नाव घेतलेलं पाहून अनेकांना अपचन झालेलं दिस्तय :)
9 Jan 2018 - 5:15 pm | विशुमित
भिमा कोरेगाव प्रकरणात मिपावरचे आघाडीचे (युती म्हणा हवे तर) संपूर्ण ऊर्जा मनोहर भिडे या ऋषीतुल्य सद्गृहस्थचा(?) बचाव करण्यासाठी खर्च करत आहेत. या मागे कारण कोणते आहे हे फक्त समजत नाही. असो.
पण यापैकी कोणीही स्वतः किंवा आपली अपत्य त्यांच्या मोहिमेत कधीही सहभागी झाले नसणार हे 99% खात्री ने सांगतो.
9 Jan 2018 - 5:55 pm | प्रसाद_१९८२
श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेतर्फे आयोजीत 'धारातीर्थ यात्रा' या मोहिमेत मी दोन वेळा भाग घेतलाय. व मीच काय असे कित्येक लोक आहेत ज्यांनी गुरुजींच्या मोहिमेत भाग घेतला आहे व आज त्यांचा बचाव करत आहेत अगदी सातरच्या तथाकथित महाराजांपर्यंत.
==
आता तुमच्या मते
ह्या मोहिमेत नक्की काय देश विघातक पढवले/शिकवले जाते ?
9 Jan 2018 - 5:33 pm | अमर विश्वास
विशुमित
संभाजी भिडे गुरुजींना मी भेटलो आहे .. त्यांचे विचार ऐकले आहेत
बोला काय म्हणणं आहे तुमचं ?
9 Jan 2018 - 6:40 pm | गामा पैलवान
लोकहो,
हिंदूंचं देऊळ अपवित्र करणारा जर एका विशिष्ट समुदायाचा असेल तर लगेच तो मंदबुद्धी ठरवला जातो, याची आठवण झाली. तर लोकहो "प्लॉउजिबल डिनायेबिलिटी " यामधे एका समुदायाचा हातखंडा आहे. आठवण जागवल्याबद्दल पगला गजोधर यांना धन्यवाद.
अरे हां, यावरून तो दाढी आणि पगडी घालणारा आसामवासी पंतप्रधान पण आठवला. कोळसा, खाणी वगैरेंचा लक्षकोट्यावधी रुपयांचा घोटाळा ह्याच्या नाकाखाली झाला आणि याला म्हणे चाहूल लागलीच नाही. आजूनही स्वच्छ म्हणून मिरवतो. तर लोकहो "प्लॉउजिबल डिनायेबिलिटी " यामधे काँग्रेस नामे एका राजकीय पक्षाचा हातखंडा आहे. आठवण जागवल्याबद्दल पगला गजोधर यांना धन्यवाद.
आ.न.,
-गा.पै.
9 Jan 2018 - 11:04 pm | राही
अंतरा आनंद, लेखातला समजूतदारपणा आवडला. इथले त्याच त्याच ठराविक आय्डींचे आक्रमक, एकारलेले प्रचारात्मक प्रतिसाद तुम्हाला परिचयाचे आणि अपेक्षित असणारच. तरीही तुम्ही लेख इथे प्रकाशित केला आहे. आवडले.
10 Jan 2018 - 2:28 am | गामा पैलवान
राही,
२०० वर्षांपूर्वीचा तथाकथित अन्यायास आज वाचा फोडली गेलेली समर्थनीय असते. मग त्याच धर्तीवर गेले १३००+ वर्षं हिंदूंवर हिंदूद्वेष्ट्यांकडून अत्याचार होताहेत त्यांच्याविरुद्ध आम्ही जरासुद्धा ब्र उच्चारायचा नाही म्हणता? आम्हांस देखील समजून घ्या ना.
आ.न.,
-गा.पै.
10 Jan 2018 - 7:42 am | सुखीमाणूस
की हा लेख सुन्दर लिहिला असला तरी पुर्ण पणे फक्तं ब्राम्हन्णाना दोषी ठरवण्याचा अजेंडा राबविणारा आहे.
पददलित लोकांवर जे अन्याय झाले ते फक्त ब्राम्हणानी केले असे चित्र गेली कित्येक वर्षे उभे केले जाते आहे.
प्रत्यक्षात सर्व जाती व्यवस्थित जातीयता पाळतात.
फक्त जानवे घालणारे जो तथाकथित अन्याय करतात त्यावर बोलणे झाले आहे पण त्याशिवाय ज्या असंख्य दलितेतर जाती आहेत त्याना मात्र लेखिकेने सुट दिली आहे.
जात पंचायत हा प्रकार जातीव्यवस्थेला खतपाणी घालतो.
आपापल्या जातींची नावे गाड्यान्वर लिहून जात मिरवली जाते. पण त्यावर काहीच भाष्य होताना दिसत नाहीय.
उलट या लेखामुळे असे प्रतित होत आहे की फक्त ब्राम्हण जातीयवादी आहेत.
10 Jan 2018 - 8:17 am | पगला गजोधर
अत्यंत विनम्रपणे आपणास कथन करू इच्छितो...
जेव्हा जेव्हा जातीव्यवस्था वर्णद्वेष याबाबत "मनुस्मृती समर्थक" विचारसरणी वर टीका केली जाते किंवा सध्याच्या भारतातील मनुस्मृतीच्या अजेंडा उघड/छुपा राबविणाऱ्या संघटनेविरुद्ध काहीही लिहिले जाते, तेव्हा मनुवादी लोकं अलगदपणे तो रोख/ती टीका, ही जणू ब्रह्मणांवरच केली आहे, असा त्याला स्पिन देतात.
जातीची उतरंड मानणारे कोणीही, हे मनुवादीच....
त्यांच्या विरुद्ध हा लेख आहे....
10 Jan 2018 - 8:33 am | पगला गजोधर
याचे माझ्याबाबतीतील उदाहरण म्हणजे...
१.डी एस कुलकर्णी यांच्या कथित फसवणुकीच्या लेखात, जेव्हा रोख त्यांच्या जातिकडे वळला, तेव्हा मी तिथे "धर्म जात गुन्हेगाराला नसते, त्यामुळे जातीवाचक आरोप होऊ नये " असे आवाहन केलेले..
२.बाजीराव मस्तानी संदर्भातील एका लेखात, बाजीराव हा शूर लिबरल व पुरोगामीच होता अश्या अर्थाचे (च भु दे घे) कथन केलेलं, ( सौन्दर्य व रणातील शौर्य पाहून प्रेम केले, जात पाहून नव्हे, पुढे लग्न ही केले, पुढील उदरनिर्वाहाची तजवीज केली, हे सर्व अत्यंत कठोर मनुवादी विरोध झेलून...)
पण कंसाय मिपा वरील काही मनुवादी चाणक्य (इथे 'चाणक्य' धूर्त या अर्थी, जातीवाचक नव्हे)
मी खडे मारतो, एका विशिष्ठ जाती विरोधात लिहितो, असा अप प्रचार सर्रासपणे करताना आढळेल, त्यांच्या प्रतिक्रियेवर मला मग प्रतिक्रिया द्यावी लागते.
10 Jan 2018 - 9:18 am | पगला गजोधर
आणि माझ्या मिपावरील प्रतिक्रिया जर आपण काळजीपूर्वक पाहिल्या तर्
बहुतांशी मी पंडित नेहरूंना (ते काश्मीरी ब्राह्मण असूनही) त्यांच्या आधुनिक पुरोगामी दृष्टीची, प्रशंसा केलीय...ती ते ब्राम्हण असल्यामुळे नाही. प्रशंसा इतकी की एका लेखावर त्यांना १०० पैकी १०० गुण दिलेत...
तर दुसऱ्या एका पंप्र ची भरपूर टीका केलीये (ते ब्राम्हण नसूनही, कारण त्यांची विचारसरणी मला मनुवादी वाटते म्हणून)
त्यांना तर मी -२० गुण दिलेत,
त्यामुळे त्यांचे भक्त प्रशंसक, नेहमीच माझ्यावर ब्राम्हण विरोधी ठपका ठेवायची संधी सोडत असावेत...
10 Jan 2018 - 10:14 am | अनुप ढेरे
हा लेख छान आहे.
http://mdramteke.blogspot.in/2018/01/blog-post_5.html
मेन प्राब्लेम हे कन्हैय्या, मेवानी, खालिद टाईप 'लाल सलाम वाले' आहेत. हे लोक दलित चळवळ हायजॅक करतायत हा आहे.
10 Jan 2018 - 6:03 pm | राही
जाऊ दे की प्रकाश आंबेडकरांना भारतीय कम्यूनिस्टांबरोबर. कम्यूनिस्ट पक्ष हा अधिकृत राजकीय पक्ष आहे; निवडणुका लढवण्यास, इलेक्शन कमिशनमान्य अशा आपल्या अजेंड्याचा प्रचार करण्यास कायद्याने पात्र आहे. मग काय हरकत आहे? आणि इतर पक्षांच्या अकल्पनीय अश्या युत्या आतापर्यंत झाल्या नाहीत का? भूतकाळात बाळासाहेब ठाकरे आणि मुस्लिम लीगचे बनातवाला यांनी काही उद्दिष्टांसाठी हस्तमिलाप करून एक संयुक्त मिरवणूकही काढली होती. महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या लढ्यात सं. म. समितीत समाजवाद्यांबरोबर कम्यूनिस्ट्स हिरिरीने उतरले होते. तमीळ्नाड्मध्ये अलगतावादी द्रमुकच्या अनेक शकलांशी अनेकांनी युती/समझोता केलेला आहे. उजव्यांच्या आघाड्या उजव्यांबरोबर आणि डाव्यांच्या डाव्यांबरोबर नेहमीच होत असतात. इतकेच नव्हे तर प्रसंगोपात्त डावे-उजवेसुद्धा एकत्र येऊ शकतात. साधनशुचिता सत्तरच्या दशकातच मागे पडली. डॉक्ट्रीनशी बांधिलकी वगैरेही खूपच मागे पडले आहे. कोणतेही तत्त्वज्ञान नसलेल्या किंवा स्वतःचे वेगळेच तत्त्वज्ञान अथवा स्वारस्य असलेल्यांबरोबर समझोता होऊ शकतो. आणि देशाच्या विनाशाची पायाभरणी वगैरे तर फारच ताणलेले वाटतेय. देश असा एव्हढ्यातेव्हढ्याने काही विनाश पावत नाहीय. आणि दलितांमुळे तर नाहीच नाही. आपल्यासारख्याकडून हे वाक्य आलेले पाहून आश्चर्य वाटले. आपण देशभक्तीचा अथवा राष्ट्रवादाचा उन्मादी पुरस्कार करणारे नाहीत हे मला माहीत आहे. (सॅम्युएल जॉन्सनला कोट करण्याचा मोह टाळलाय.)
जर दलितहिताच्या कार्याला बळ मिळत असेल तर आंबेडकरांनी जरूर कम्यूनिस्टांचा पाठिंबा घ्यावा. एक अवांतर उदाहरण द्यावेसे वाटतेय. गावकुसाबहेरच्या लोकांकडे कोणी धुंकूनही पाहात नव्हते तेव्हा मिशनरीज् त्यांच्याकडे गेले. त्यांचे लोकांनी दोन्ही हात पसरून स्वागत केले. आपल्याच समाजाच्या एका हिश्श्याला आपण द्वेषाने आणि उपेक्षेने मारू नये. आरक्षण फेकले म्हणजे सर्व काही झाले, मोठी मेहरबानी केली असे मानू नये. त्यांचे ईथॉस आपण सगळ्यांनी समजून घ्यावेत असे वाटते. त्यांना लेवल प्लेइन्ग फील्ड निव्वळ आरक्षणाने नव्हे तर समाजाच्या (बिनशर्त ) स्वीकृतीने मिळेल.
10 Jan 2018 - 6:19 pm | पगला गजोधर
मनुवाद्यांचा में प्रॉब्लेम हा आहे की खुद्द पंतप्रधान , उप्र मुख्यमंत्री , पक्षाध्यक्ष वैगरे लोकांनी पूर्ण ताकतीने प्रचार करून जिग्नेश गुजरातसारख्या
प्रयोगशाळा राज्यातून निवडून येतो कसा ?
सॅम्युअल जॉन्सन भलेही कोट नका करू ... पण दुखरी नस त्यांची तीच आहे.
लोक चळवळीतून पुढे येऊन, भारतीय निवडणूक लढवूनही जर, जिग्नेश देशविघातक मग त्याला मत देणारे काय देशद्रोही का ?
उमर खालिदवर/कन्हैयावर भरपूर राजद्रोहाचे खटले भरले, न्यायालयात त्याचं पुढं काय झालं ? न्यायालयानं जर त्याला देशद्रोही ठरवलं नाही ,
मग हे मनुवादी स्वतःला काय न्यायालयापेक्षाही मोठे मानतात का ?
10 Jan 2018 - 9:52 pm | अनुप ढेरे
ब्रिगेडी लोक दुसर्यांना मनुवादी मनुवादी चिडवतात हे पाहून मौज वाटते :)
बाकी मेवानीसाठी काँग्रेसने इंकंबंट आमदाराला खाली बसवलं होतं. तरी फार मतांनी निवडून आलेला नाही मेवानी. (१९०००). ही माहिती तुम्हाला नाही, इतरांना आहे.
10 Jan 2018 - 10:35 pm | ट्रेड मार्क
मनुवादी म्हणजे नक्की कोण? मला वाटत होतं की जे अजूनही काही जाती उच्च मानतात (म्हणजे फक्त ब्राम्हण) ते मनुवादी. तुमच्या काही प्रतिसादात तुम्ही म्हणलंय की मनुस्मृती समर्थक लोकांमुळे दलित समाज इतरांपासून दूर गेला. दुसऱ्या एका प्रतिसादात म्हणताय "जातीची उतरंड मानणारे कोणीही, हे मनुवादीच...". याच प्रतिसादात हे सुद्धा म्हणलंय "सध्याच्या भारतातील मनुस्मृतीच्या अजेंडा उघड/छुपा राबविणाऱ्या संघटनेविरुद्ध काहीही लिहिले जाते, तेव्हा मनुवादी लोकं अलगदपणे तो रोख/ती टीका, ही जणू ब्रह्मणांवरच केली आहे, असा त्याला स्पिन देतात.". अशी कोणती मनुवादी संघटना आहे बरे? इथे सुद्धा कोणी ते ब्राह्मणांवर ओढून घेतलंय ? उलट तुमच्या बहुतेक प्रतिसादांचा सूर फक्त ब्राह्मणविरोधी आहे. कोरेगाव भिमाची लढाई फक्त महार आणि ब्राम्हण यांच्यात होती हे कोण म्हणतंय?
इथे तुम्ही असं म्हणलंय "बहुतांशी मी पंडित नेहरूंना (ते काश्मीरी ब्राह्मण असूनही) त्यांच्या आधुनिक पुरोगामी दृष्टीची, प्रशंसा केलीय...ती ते ब्राम्हण असल्यामुळे नाही.". इथे आधुनिक पुरोगामी म्हणजे काय? त्यांनी सुद्धा मुस्लिमांचं लांगुलचालन केलंच. मी त्यांच्यावर टीका करतो कारण ते परधार्जिणे होते. असो, विषय भरकटायला नको.
याच प्रतिसादात तुम्ही म्हणताय "तर दुसऱ्या एका पंप्र ची भरपूर टीका केलीये (ते ब्राम्हण नसूनही, कारण त्यांची विचारसरणी मला मनुवादी वाटते म्हणून)". मनुवादी विचारसरणी सिद्ध करणारं कोणतं काम त्यांनी केलंय? ब्राम्हण नसूनही त्यांचं म्हणणं आहे की आरक्षण द्यायचं तर ते आर्थिक निकषांवर द्यावं. परत आरक्षणाचा मुद्दा नको. तर विषय आहे हिंदूंमधील तथाकथित उच्च आणि खालच्या जातींचा. तर या दुसऱ्या एका पंप्रने हिंदू समाजातील जातीजातींमध्ये तेढ वाढवण्यासाठी काय केलं ते उदाहरणासहित द्या.
लोक चळवळीतून पुढे येऊन, भारतीय निवडणूक लढवूनही जर, जिग्नेश देशविघातक मग त्याला मत देणारे काय देशद्रोही का ?
कसा का होईना निवडून आलाय याचा आनंद आहे. समस्त दलित नेते दलित एकतेसाठी आवाहन करत असताना खालच्या जातीतीलच पंतप्रधानांवर नको ती शेरेबाजी करून दुही कशाला माजवतोय? वेळ आणि वाफ कशाला वाया घालवतोय? दलितांनी रस्त्यावर उतरून लढा दिला पाहिजे अशी भाषणे कशाला करतोय? आता संधी मिळाली आहे तर त्याचा वापर विधायक कार्यासाठी करावा, ज्या लोकांनी त्याला निवडून आणलाय त्यांचा उद्धार करावा. अशी भाषणं देण्यापलीकडे आणि पंतप्रधानांवर टीका करण्यापालिकडे त्याने कुठली विधायक कामं केली आहेत ते सांगा.
उमर खालिदवर/कन्हैयावर भरपूर राजद्रोहाचे खटले भरले, न्यायालयात त्याचं पुढं काय झालं ? न्यायालयानं जर त्याला देशद्रोही ठरवलं नाही
माझ्या माहितीप्रमाणे दोघेही जामिनावर बाहेर आहेत. त्यांना न्यायालयाने निर्दोष सोडलं का?
अजून एक मुद्दा म्हणजे तुम्ही स्वतः खरी मनुस्मृती वाचली आहे का? दुसऱ्या कोणीतरी तिसऱ्याने लिहिलेलं काहीतरी वाचून स्वतःच्या आकलनाप्रमाणे लिहिलेलं नव्हे. ती ओरिजिनल मनुस्मृती वाचली असेल तर त्याची पानं स्कॅन करून ज्यात आक्षेपार्ह मजकूर आहे असे उतारे इथे दाखवा.
10 Jan 2018 - 9:45 pm | अनुप ढेरे
इथे कम्युनिस्ट पक्ष बेकायदेशीर आहेत अस मी म्ह्टलेलं नाही. ( झाले ते बेकायदेशीर तर आनंदच होईल पण ) आणि अभद्र म्हणाव्यात अशा अनेक युत्या झालेल्या आहे हेही मान्य आहे. उदा: भाजपा-द्रमुक, भाजपा-पीडीपी अशा पण म्हणून द्रमुक किंवा पीडीपी सारख्यांच्या फुटीरतावाद्यांबद्दल मत चांगलं होत नाही.
देश दलितांमुळे विनाशाकडे जाईल असं अजिबात म्हटलेले/इम्प्लाय केलेले नसून कम्युनिस्टांमुळे जाईल असा मुद्दा आहे. ज्यात मला भरपूर तथ्य वाटतं. मी जरी उन्मादक राष्ट्रावादाचा पुरस्कर्ता नसलो तरी देश ही संकल्पना मानणारा आहे. कम्युनिस्टांनी दंतेवाडा इथे सत्तर सैनिकांची हत्या केलेली त्यानंतर जे एन यु मध्ये कम्युनिस्ट विद्यार्थी संघटनांनी उत्सव साजरा केलेला हे विसरता येत नाही. आदिवासांच्या अधिकारांसाठी तथाकथीत लढा देणारी पण आदिवास्यांसहीतच हजारो लोकांचं हत्याकांड घडवणारी नक्षल चळवळ ही देखील कम्युनिस्ट चळवळच आहे. कम्युनिस्ट देशांमध्ये सुबत्ता नांदत नाही आणि लोकांवर अनन्वीत अत्याचार होतात हे इतिहासात दिसलेलं आहे. सो कम्युनिस्ट पार्टी असो वा विद्यार्थी संघटना असो मला ते हानिकारकच वाटतात आणि म्हणूनच वरील लेखात कम्युनिस्ट लोकांबद्दल दिलेली वार्निंग अगदी पटते.
जाता जाता: आंबेडकरांनी देखील हिंदू धर्म त्यागताना कयुनिस्टांचा निधर्मी मार्ग स्वीकारला नाही तर बौद्ध धर्म स्वीकारला ही गोष्ट रोचक आणि सूचक आहे.
10 Jan 2018 - 11:26 pm | राही
आंबेडकरांनी-पर्यायाने दलितांनी कम्यूनिस्टांशी युती केली तर बिघडले कोठे? या युतीमुळे देश विनाशाकडे अजिबात जाणार नाही. कम्यूनिस्ट हा भारतीय कायद्याने मान्य केलेला पक्ष आहे. या पक्षाशी अनेकांनी आजवर युती केल्या आहेत. तेव्हा देश विनाशाप्रत गेला नाही मग दलितांनी युती केल्यावर कसा जाईल? द्रवीडी पक्ष तर देश फोडण्याचे कार्यक्रम उघडपणे राबवत होते. शिखांच्या एका पक्षाचेही तसेच. देश फोडण्याचे आदेश देणार्या या पक्षांबरोबर युती करूनही देश फुटला नाही. मग दलितांनी एखाद्या भारतीय पक्षाशी युती केल्यावर त्याचा कसा विनाश होईल? इतर भारतीय पक्षांना टक्कर देण्याइतकी ही युती बलिष्ठ होईल? दलितांना त्यांच्या तुलनात्मक अल्प लोकसंख्येमुळे सदैव माय्नॉरिटीमध्येच राहावे लागणार आहे.. तेव्हा कोणाशी ना कोणाशी युती करणे ही त्यांची अपरिहार्यता आहे. आतापर्यंत केलेल्या युत्यांमुळे जर सन्मान मिळाला नसेल तर दुसरा जोडीदार ते शोधणारच.
मिपावर किंबहुना आंतरजालावर व्यक्त होणारे सगळे तुम्हीआम्ही लोक देशप्रेमीच असतो. इन्डिअन एक्स्प्रेसने त्या काळी दिलेल्या दिवसवार यादीमध्ये सुवर्णमंदिरात सैन्यप्रवेशाआधी खालिस्तान चळवळीत मारल्या गेलेल्या हिंदु-शिखांची संख्या सव्वादोन हजारांहून अधिक होती. शिवाय चळवळीकडे खूप मोठी शस्त्रसज्जता होती. तरीही सामान्य जनतेच्या आणि तिने निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या देशप्रेमामुळे देश अखंड राहिला. आपला देश असा लेचापेचा नाहीय. जो इतक्या मोठ्या तुफानाला तोंड देऊन उरला तो या छोट्याशा वावटळीने उडून जाणार?
बाबासाहेबांना हिंदू धर्म त्यागून दुसरा कोणतातरी धर्म स्वीकारायचा होता. अनुयायांना धर्मरहित ठेवायचे नव्हते. क्रिस्टिअन मिशनरी आणि मुस्लिम नेते आपापला धर्म स्वीकारण्यासाठी बाबासाहेबांचा अनुनय करीत होते. पण त्यांना बाजूला सारून, फार मोठ्या दूरदृष्टीने आणि विचाराने त्यांनी जो भारतीय मूळ असलेला बौद्धधर्म स्वीकारला, तो देश विनाशाप्रत नेण्यासाठी नव्हे.
11 Jan 2018 - 6:19 am | अंतरा आनंद
राही, सगळेच मुद्दे +१
कम्युनिस्ट म्हणजे देशाला मोठाच धोका आहे असा भ्रम निर्माण करण्यात हिंदुत्ववाद्यांनी यश मिळवलं आहे. आणि एखाद्या गटाने पिढ्यान-पिढ्या आपलं मल-मूत्र साफ करावं ही आपली 'हिंदू व्यवस्था' आहे याबद्द्ल कोणतीही लाज न वाटणार्या हिंदू समाजाला ते पटकन पचलं. समानता ही आपल्या रक्तातच नाही त्यामुळे त्याचा पुरस्कार करणारा आपल्याला लगेच चुकीचा वाटतो .
अनुयायांना धर्मरहित ठेवायचे नव्हते. >> निरीश्वरवाद पेलवणं तसं अवघड असतं. त्यातून दैववाद, कर्मवाद अश्या गोष्टींचा भरणा असलेल्या हिंदू विचारसरणीपासून त्यांना दूर ठेवायचं तर दुसरी सशक्त विचारसरणी त्यांना देणं हे जरूरी होतं. आणि ते बाबासाहेबांनी योग्य प्रकारे केलं. मुस्लिम, इसाई तर जाऊच द्या, शीख धर्मासारखा जाती न मानणारा पण प्रत्यक्षात पाळणारा धर्मही त्यांनी निवडला नाही. खरं तर हिंदू समाजावर हे त्यांचे उपकारच आहेत.
11 Jan 2018 - 7:56 am | आनन्दा
या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. आता माझ्या तुमच्याबद्दल असलेल्या कल्पना अधिक स्पष्ट झाल्या.. लेखात तर अनेक त्रुटी होत्याच, पण बौद्ध धर्म स्वीकारताना जातीचा लावलेला निकष वाचून डोळे पाणावले.. बौद्ध असलेल्या चीन आणि जपानमध्ये सगळे अगदी समान आहेत नाही?
11 Jan 2018 - 11:58 am | इरसाल
शीख धर्मासारखा जाती न मानणारा पण प्रत्यक्षात पाळणारा धर्मही त्यांनी निवडला नाही.
ह्या बद्दल तुम्हाला खात्री आहे का?
12 Jan 2018 - 4:51 am | अनन्त अवधुत
हे हिंदुत्ववाद्यांनी केले नाही, तर कम्युनिस्टांनी स्वतःच्या वागण्याने केले. त्यांचा नक्षल्यांना पाठिंबा. हे नक्षली शेतकरी/ आदिवासी/ सरकारी कर्मचारी/ पोलीस/ राजकीय नेते यांची हत्या करतात. राजकीय नेत्यांच्या हत्येचे कारण म्हणजे तेथील जनतेने लोकशाही प्रक्रियेत भाग घेऊ नये म्हणून. असे हे लोकशाही विरोधी/ आपल्या देशावर युद्ध लादणारे नक्षली आणि कम्युनिस्ट. 'भारत तेरे तुकडे होंगे' च्या घोषणेला यांचा पाठिंबा.
कम्युनिस्ट म्हणजे देशाला मोठाच धोका आहे हा भ्रम नाही.
12 Jan 2018 - 7:10 pm | अंतरा आनंद
कोणत्या कम्युनिस्ट पक्षाने नक्षल्यांना उघड पाठिंबा दिला आहे? आणि बाबरी पाडल्यावर कित्येक वर्षे देश धुमसत राहिला ते कृत्य करणारे लोकशाही विरोधी नव्हते का? त्या नंतरच्या दंगलीत फक्त मुस्लिमांचेच बळी गेले का? राजकीय लाभासाठी आपण जे कृत्य करतोय ते कोणत्या थराला न्यावं याचं भान नसणारे नक्षल्यांपेक्षा वेगळे नाहीत. युद्ध फक्त बाहेरून होत नसतं. दंगे धोपे हे ही अंतर्गत युद्धच असतं आणि त्याच्या जखमा जास्त खोल असतात.
. 'भारत तेरे तुकडे होंगे' च्या घोषणेला यांचा पाठिंबा. >> कुणी दिला पाठिंबा? थेट पाठिंबा न देता मुस्लिम वेगळे, दलित वेगळे, हे वेगळे , ते वेगळे हे चालतं वाटतं.
12 Jan 2018 - 9:23 pm | अनुप ढेरे
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) असं नक्षली संघटनेचं नाव आहे एका मोठ्या. जनयुमध्ये दंतेवाडा झाल्यावर उत्सव साजरा झालेला. जनयु हे कम्युनिस्टांचं बॅशन आहे. असो... ही बेसिक माहिती आहे. हे सोडून नक्षली सिंपथायझर भरपूर आहेत.
आणि जाताजात इतरांसाठी एक ट्रिविआ
जनयुमध्ये SFI ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाची विद्यार्थी संघटना आणि AISA ही CPMI-ML या पक्षाची संघटना अशा दोन कम्युनिस्ट संघटना आहेत. तरीही बाप्सा नावाची एक दलित विद्यार्थी संघटना आहे ज्यांनी कम्युनिस्टांहून वेगळी चूल मांडली आहे.
12 Jan 2018 - 9:43 pm | अंतरा आनंद
नावं काहिही घेतली तरी आघाडी संसदीय प्रणालीतल्या पक्षाशीच होते. तसं जोडप्यांना मारहाण करणार्^या पक्षाचं नाव होतंच की हिंदू वरून म्हणून काय तो हिंदूंचा पक्ष होतो काय?
13 Jan 2018 - 4:41 am | अनन्त अवधुत
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या पक्षातील एका गटाने सशस्त्र चळवळ नक्षलबारी गावातून सुरु केली. नक्षलबारी नावावरून त्या चळवळीचे नाव नक्षलवादी असे पडले. त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) विभाजित झाला - भारतीय कम्युनिझम १०१ :)
जनेयु मध्ये घोषणा देणारे तेच होते (कन्हैय्या कुमार , उमर खालिद, आणि मंडळी) रच्याकने त्या घोषणा दिल्या तो प्रसंग म्हणजे भारतीय संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरुच्या स्मरणाचा कार्यक्रम होता.
खाली अनुप ढेरेंनी पण प्रतिसाद दिलाच आहे कि ते कसे देशद्रोही आहेत. मी पुनरुक्ती टाळतो.
अवांतर: वयाच्या ३०व्या वर्षी घरची गरिबी म्हणून जनेयु मध्ये स्कॉलरशिप वर शिकणारे हे विद्यार्थी, पुणे-मुंबई प्रवास मात्र विमानात फर्स्ट क्लासने करतात. त्यांच्याकडे आयफोन वगैरे महागडे गॅझेट्स कसे आले हे विचारायचे नाही.
भांडवलशाहीचे सगळे फायदे घ्यायचे , बाता देश बरबाद करण्याच्या करायच्या आणि आव मात्र असा आणायचा कि जगाच्या कल्याणा अवतार घेतलाय.
13 Jan 2018 - 6:54 am | नितिन थत्ते
>>भांडवलशाहीचे सगळे फायदे घ्यायचे
आधुनिकतेचे सगळे फायदे घेऊन आपण नाही का प्राचीन भारतीय संस्कृतीचे आणि वेदातल्या विमानांचे गोडवे गातो?
13 Jan 2018 - 11:28 am | अर्धवटराव
भारतीय संस्कृती, वेदांमधली विमानं आहेच मुळी कौतुक करण्यासारखे. आता "भारते तेरे तुकडे होंगे" वगैरे सुद्धा कौतुक करण्याच्या लायकीचे आहेत असं म्हणुन आम्हाला कृतकृत्य करा.
11 Jan 2018 - 8:41 am | अनुप ढेरे
काय बिघडतं हे कम्युनिस्टांचा इतिहास पाहिल्यास समजतं. कम्युनिस्ट आयडिऑलोजीने ऑलरेडी भारतात हजारो लोकांच्या हत्या घडवलेल्या आहेत ज्यात भरपूर दलित/आदिवासी देखील आहेत. नक्षली हे कम्युनिस्टच आहेत. सो कम्युनिस्ट आयडीऑलॉजीने काय बिघडतं हा प्रश्न फार भाबडा वाटला.
देश ऑलरेडी एकदा फूटुन झालेला आहे. ४७ ला. पण तो वादग्रस्त मुद्दा बाजुला ठेऊ. देश लेचापेचा नाही तरी वगैरे वगैरे म्हणून हे व्हायलंट लोक दुर्लक्षित कसे ठेवता येतील. हे म्हणजे समाज एवढा लेचापेचा नाही की चार गौ रक्षकांनी तुटेल म्हणण्यासारखं आहे.
दलित हे अल्पसंख्य नाहीत. भारतात २३-२४% दलित/आदिवासी आहेत. एक चतुर्थांश लोकसंख्या असलेले अल्पसंख्यांक नाहीत. दलित हा एक गॄप आहे असं गृहितक आहे तुमच्या प्रतिसादाचं. जे बरोबर आहे असं वाटत नाही मला. त्यात भरपूर उतरंडी आणि मतभिन्नता आहे. जात विरहीत = वर्ग विरहीत हा प्रचार बरोबर नाही. गंडवागंडवीचा आहे. इथेही काही दलित नेते कम्युनिस्टांबरोबर चूल मांडत आहेत त्यावर टीका आहे.
द्रविड पक्ष / खलिस्तानी तरी देश तोडण्याचा प्रयत्न करणारे होते. कम्युनिस्ट लोक देश पोखरणारे वाटतात आणि म्हणून त्यांचा प्रभाव कमीत कमी रहावा असं वाटतं.
विनाशाप्रत नेणारे सरसकट दलित किंवा बौद्ध आहेत हे मी अजिबात म्हटलेलं नाही. इथे दलित कम्युनिस्ट अशी युती नसून प्रकाश आंबेडकर कम्युनिस्ट अशी चूल आहे. जी घातक आहे.
17 Jan 2018 - 5:09 pm | पगला गजोधर
प्रवीण तोगाडिया यांना बहुतेक कम्युनिस्ट /नक्षलवाद्यांकडून जीवाची भीती असावी ...
18 Jan 2018 - 9:05 am | mayu4u
प्रवीण तोगाडिया यांना बहुतेक स्वतःचं महत्व कमी झाल्याची भीती असावी.
2 Feb 2018 - 5:52 pm | पगला गजोधर
,
हा लढा काही दशके किंबहुना शतके मागचा आहे. "चोळीच्या हक्कासाठीचा लढा (मारू मरक्कल समरम)"
https://www.misalpav.com/node/29040
10 Jan 2018 - 1:38 pm | गामा पैलवान
अय्या हो? मग लेखात ही दोन विधानं नक्की कशाला टाकली आहेत?
१.
२
आ.न.,
-गा.पै.
10 Jan 2018 - 2:09 pm | पगला गजोधर
गामाजी,
तुम्हाला, वरील दोन हायलाईट केलेली वाक्ये , माझ्या कुठल्या लेखात/प्रतिक्रियेत आढळली ?? ते जरा सांगा...
10 Jan 2018 - 6:40 pm | गामा पैलवान
प.ग.,
अहो, तुम्ही नाही हो. मूळ लेखातली वाक्यं आहेत ही. त्यामुळे लेखिकेस ब्राह्मणांचा उल्लेख नक्की कशासाठी करायचाय असा प्रश्न पडतो.
असंच भाष्य मी अगोदरही केलं आहे. कृपया इथला मुद्दा क्रमांक २३ व २४ पहाणे.
आ.न.,
-गा.पै.
10 Jan 2018 - 1:49 pm | गामा पैलवान
अॅमी,
तुमचा इथला संदेश वाचला.
१.
इंग्रजांनी दलितांना नोकरी व शिक्षणात कसलंही आरक्षण दिलेलं नव्हतं. शाहू महाराजांनी नोकरी (वा उपजीविका) व शिक्षणांत आरक्षण दिलं होतं, पण तो अखिल भारतीय प्रयोग नव्हे. शिवाय हे आरक्षण सरसकट अब्राह्मणांसाठी होतं (संदर्भ : विकी).
इंग्रजांनी जे आरक्षण दिलं ते केवळ राजकीय स्वरूपाचं आहे. हेच धोरण स्वातंत्र्योत्तर काळात चालू राहिलं. नोकरी आणि शिक्षणांत आरक्षण १९८२ सालीच सुरू झालं. मात्र असं आरक्षण देण्यास शासनास कोणीही प्रतिबंध घालू शकंत नाही अशी तरतूद घटनेत बऱ्याच अगोदरपासून (बहुधा १९५० पासून) अस्तित्वात होती.
२.
शोधा म्हणजे सापडेल. विकिवर एण्ट्री आहे : https://en.wikipedia.org/wiki/Reservation_in_India
३.
मी कसाही असलो तरी वस्तुस्थिती बदलंत नाही.
आ.न.,
-गा.पै.
10 Jan 2018 - 2:12 pm | पगला गजोधर
बाकी अँमीजी, कोरगाव भीमा या विषयाला मनुवाद्यांनी, आरक्षणाचा धागा बनवून टाकलाय हे तुमच्या लक्षात आले असेलंच.
10 Jan 2018 - 10:00 pm | गामा पैलवान
प.ग.,
कोरेगाव-भीमा या विषयात धागाकर्तीने जानवं, निरुपण आणि राममंदिर कसं ओढून ताणून आणलं. तसंच मनुवाद्यांनी आरक्षण खेचडत आणलं.
आ.न.,
-गा.पै.