"ओ मंडळी.. आपल्याला गोव्याला जायचंय, पण इतर पब्लिक जातं तसं नाही, जरा हटके. चला आपण DC मध्ये भाग घेऊ."
असे डॉ श्रीहास (तेच ते 'मला भेटलेले रूग्ण' वाले) एका कट्ट्यादरम्यान बोलले आणि ग्रुपमध्ये चैतन्य वगैरे वगैरे बरेच कांही सळसळले. खूप दिवसात नवीन कांही न केल्याची खुमखुमी होतीच.. आता या आव्हानाला तोंड देण्यासाठी सर्वजण उत्साहाने सज्ज झाले.
द डेक्कन क्लिफहँगर (DC). पुण्यातून निघून महाबळेश्वर आणि पुढे कर्नाटकातून गोवा. अशी ६५० किमीची सायकल रेस. विशेष म्हणजे सोलो रेसिंग करणार्यांसाठी ही रॅम क्वालिफायर रेस आहे (रॅम म्हणजे रेस अॅक्रॉस अमेरिका - अमेरिकेच्या पश्चिम टोकाकडून पूर्वेकडे तब्बल ५००० किमी सायकलने पार करायचे)
तर.. बरीच बरीच चर्चा करून.. देशपांडेमामा, डॉ श्रीहास, सुमीत आणि sagarpdy उर्फ पाध्ये हे चार मिपाकर रेस रायडर्स..
शैलेंद्र, प्रशांत, आनंदराव, स्थितप्रज्ञ आणि मोदक हा सर्पोर्टिंग क्रू..
अशी एक जबरदस्त टीम तयार झाली. 4 Horsemen असे नामकरणही झाले.
या रेसचा वृत्तांत थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडतो आहोत. प्रत्येकाने लिहिलेले भरपूर किस्से आणि फोटोंमधून हळूहळू रेस उलगडत नेऊ.. त्या त्या लेखकाचे नांव ठळक शब्दात हायलाईट करतो आहोतच.
******************************************************
डॉ श्रीहास
६ जुलै :
डॉकच्या पुणे भेटीदरम्यान प्रशांत म्हणाला शैलेंद्र जवळच राहतो. मग शैलेंद्रच्या घरी मोदक, प्रशांत आणि डॉक येऊन धडकलेच!! हो धडकलेच कारण बोलणे झाल्यापासून पाचव्या मिनीटाला सगळेजण शैलेंद्रच्या घरी पोहोचले होते. फक्त कायप्पा गृप मध्ये ओळख असलेले हे लोकं पूर्वी कधीच भेटलेले नव्हते. घरी पोहोचल्यावर कळालं की नुकतीच लडाखवारी करून आलेले शैलेंद्र उजवा गुडघ्याचं एक कार्टिलेज तिकडेच अर्पण करून आलेत आणि इथं पुण्यात ऑपरेशनचा आनंद घेऊन घरी आराम करत होते.
"तुमची एंडेव्हर सपोर्ट व्हेईकल म्हणून द्याल का DC साठी?" असं विचारले, "हो घेऊन जा आणि हवं तर मी पण येतो" असं म्हणणारे शैलेंद्र टीमचा अविभाज्य भाग झाले.
३१ ऑगस्ट :
"मी रेसचे पैसे भरतोय..!!" मामांचा मेसेज आला आणि DC ला टिमचं रजिस्ट्रेशन झालं. आता रेस स्पिरीट की काय जागं झालं होतं. पुढच्या काही दिवसात कमी पण झालं. मोदक, प्रशांत, शैलेंद्र यांनी चुचकारून, ओंजारून ,अगदी सरकॅझम वापरून सायकलींग + ट्रेनिंग चालू ठेवायला मदत केली. मामा आणि सागर पुण्यातून तर डॉक, सुमीत औरंगाबादेतून अशी (कदाचीत DC मधली दोन शहरातील मिळून तयार झालेली एकमेव) टीम सज्ज झालेली होती.
*****
सागर पाध्ये
दिवाळी नुकतीच संपलेली. DC च्या परीक्षेला जेमतेम 2 आठवडे राहिले. कृ अध्यक्ष मोदकाने रूट रेकी आणि कृ प्रॅक्टिस साठी जायचंच असा फतवा काढला. त्याप्रमाणे मामा आणि सागर गुमान तयार झाले. रेकीचा मुख्य उद्देश पसरणी आणि खंबाटकी हे दोन घाट चढायचा वेळ पाहणे आणि त्याप्रमाणे रायडर बदल लागेल का ते पाहणे होता. शिवाय प्रशांत मालक आणि मोदक याना सायकल स्टॅन्ड ला लावणे काढणे याची प्रॅक्टिस व्हावी हादेखील.
आदल्या रात्री फोनाफोनी झाली, बेत नक्की झाला. रात्री १०:३० / ११:०० च्या सुमाराला मामांचा संदेश आला, सायकल बांधायला माझ्याकडे एकच वेलक्रो आहे, दुसऱ्या सायकल साठी कोणीतरी घेऊन या (स्टॅन्ड ला रबरी पट्ट्या असतात, पण त्या नेमक्या गहाळ झालेल्या).
सागर संकटात, रात्री ही व्यवस्था करायची कुठून?? मोदक-प्रशांत म्हणाले, दोरी आणतो - पण तो प्रस्ताव साफ धुडकवला गेला. प्राणप्रिय फेल्ट सायकलला एक ओरखडा पण आलेला सागर ने खपवून घेतला नसता. मग फुकट गेलेल्या रबर ट्युब, नाड्या वगैरे उपाय समोर आले. अखेर शैलेंद्र ने सुचवलेला उपाय सागरला पटला. आणि सकाळी 6:30 ला सायकल आणि फाटक्या बनियान घेऊन सागर हजर झाला.
सकाळी सकाळी मोकळ्या हायवेवर.. सागर.
.
सागर ६० च्या स्पीडने रोडी पळवत असताना प्रशांतने डॉकला दिलेली अधिक माहिती ;)
बाकीचे लोकं पण प्रॅक्टिस करत होते..
.
मामा खंबाटकी घाट चढताना..
.
खंबाटकी घाटातच.. गाडीचा स्पीडोमीटर बघा..!
चारचाकी गाडीसाठी दिलेली स्पीडलिमिट मामांना सायकल चालवताना अनेकदा कमी पडत होती. ;)
मामा.. खंबाटकी घाट उतरताना. (इथेही स्पीड बघा..!!)
..आणि हा व्हिडीओ.
.
सायकलने घाट चढणे हा सागरचा छंद. संधी मिळाली की सायकलने बोपदेव, खंबाटकी, सिंहगड चढायला तयार. त्यामुळे DC रूटची चर्चा पसरणीच्या 10-12 किमीच्या घाटावर आली की सागरचे नांव पुढे. मोदक आणि बाकी लोक म्हणत होते, वेगाने एवढं चढायला नाही जमत, मध्ये मध्ये रायडर बदलू, पण सागर ऐकायला तयार नाही. बदललेल्या रायडर चा वॉर्म-अप नसेल वगैरे थेर्या चिकटवून याने अख्खा घाट नावावर करून घ्यायचा याचा बेत केला होता. कृ अध्यक्ष मोदकराव मात्र अजून राजी झाले नव्हते. त्यांनी अट घातली होती.. एकदम सास-बहू सिरीयल स्टाईल "सागरला माझ्या मनाप्रमाणे पसरणी कापता आला नाही, तर रेस डे ला अर्ध्या घाटात मामांना उतरवणार" रेकी च्या दिवशी पण मामांना अर्ध्या घाटातून उतरवायची रंगीत तालीम ठरली होती.
रंगीत तालमीच्या दिवशी सुरूर गावाजवळ मामा गाडीत, सागर ने राईड सुरू केली. वाईपर्यंत हलक्या गिअर मध्ये स्पिनिंग करून पाय मोकळे करून घेतले आणि पसरणी आला. स्पिनिंग न सोडता तसाच चढायला सुरुवात केली. मोदक-प्रशांत यांना आधीच सूचना दिली होती, 'पाणी भरपूर लागतं - तयार ठेवा'. त्याप्रमाणे मोदक दर किलोमीटरला पाणी घेऊन उभा राहत होता आणि सागर 'एवढ्यात नकोय' सांगून त्याला निराश करत होता. अर्धा घाट संपला, मोदकाने मामांना उतरवलं. सागर मागोमाग होताच. ट्रॅफिक मुळे अधूनमधून थांबायची वेळ येत होती. नव्याने वापरायला सुरू केलेले क्लिट पॅडल सोडवायची मस्त प्रॅक्टिस. दत्त मंदिर मागे सोडलं, पाऊण तासात घाट संपला. अक्षरी पंचेचाळीस मिनीटात..!!!
मॅप्रो गार्डन मध्ये नाश्त्याचा फडशा पाडताना मोदक सागरला ते 3 जादुई शब्द बोलला - 'पसरणी घाट तुझा'
.
सागर.. पसरणी घाटाच्या सुरूवातीला.
.
पसरणी घाट संपला.. पाध्ये सायकलवर आणि प्रशांत फोनवर..
******
औरंगाबादकरांनीही प्रॅक्टिस पार पाडली.. त्याचे फार फोटो नाहीत मात्र हा एक धमाल व्हिडीओ आहे. या व्हिडीओ मध्ये शेवटी तो माणूस सोटा घेऊन नक्की कुणाला टोले द्यायला उभा होता ते शेवटपर्यंत कळाले नाही. ;)
.
डॉ श्रीहास
२ नोव्हेंबर:
प्रचंड ट्रॅफिकमधला नगर रोड. दोन रोडी सायकल लटकवलेली पोलो आणि आत डॉक व सुमीत हे सायकलवीर..
मागे स्टँडवर सायकली लागलेल्या गाडीत गाणी चालू होती आणि हे दोघंही बेसुर + भेसूर आवाजात गाणं म्हणत एन्जाॅय करत होते. पुण्याच्या ट्रॅफिक मध्ये कावलेले आजूबाजूचे लोक विस्मयकारी चेहेऱ्यांनी बघत होते. सुमीत आणि डॉक पुण्यात शिरलेच चुकीच्या वेळेस. संध्याकाळचे ६:३० वाजलेले.. इनॉर्बिट माॅल येरवड्याचा रस्त्यावर मस्त ट्रॅफिक होतं. ३-४ किमी अंतर तब्बल ४५ मिनीटांनी पार पडलं. सुमीत म्हणाला की "बरं झालं पुणं सोडलं नाहीतर रोजच हे सगळं झेलावं लागलं असतं" डॉकच्या चेहेऱ्यावर हलकसं हसू आलं, त्याला घरातून बाहेर पडल्यावर रस्ता ओलांडला की मोजून दिड मिनीटाच्या अंतरावर क्लिनीक आहे ना !!
Deccan Cliffhanger पुणे गोवा ६४३ किमीची ultra cycling race होती ४ नोव्हेंबरला.. तोच डॉकचा वाढदिवस..!! काय तो योग जुळून आला होता वा..!!
पुण्यात पोहोचलोच ८:३० ला , अगदी आरामात रमत गमत.... मोदक , आनंदराव आणि स्थितप्रज्ञ यांनी रेश्मा भुर्जी सेंटरवर स्वागत केलं (सुमीतची फर्माईश होती ) लाल रंगाची तेलकट भुर्जी पावासोबत पोटात ढकलली.
मोदक पुढचा प्लॅन घेऊन तयारच होता, DC ची तयारी ह्या माणसाशिवाय होणं शक्यच नव्हतं __/\__
औरंगाबादहून खचाखच सामान भरून आलेली पोलो. (व त्यात मोदकाने भर टाकलेली चितळेंकडची खादाडीची खरेदी)
.
मोदकाने केलेली तयारी... रेस रूट, मॅन्युअल, टीम स्ट्रॅटेजी आणि गाड्यांच्या टेंपररी नंबरप्लेट.
.
टीम स्ट्रॅटेजी आणि कोण नक्की काय रोल पार पाडणार याची चर्चा..
(डावीकडून - आनंदराव, मोदक, स्थितप्रज्ञ आणि डॉ श्रीहास)
.
३ नोव्हेंबर:
DC च्या आदल्या दिवशी रेस ब्रिफींग साठी सगळेजण परांजपे स्किम भूगांव येथे जमले. तेथे गेल्यावर सायकलला चिकटवलेले रिफलेक्टर, पुढचा व मागचा लाईट, हेल्मेट, अंगावरचं रिफ्लेक्टीव्ह जॅकेट असं सगळं सगळं चेक करवून घेतलं. काय अफलातून सायकल्स होत्या तिथं.. व्वा..!! ५० हजारांपासून ते ८ लाखांच्या रेंजच्या सायकल्स..!! सुमीत आणि सागर दोघंही थोडेसे हिरमुसले होते कारण ह्या सायकल्सपुढे आपला काय निभाव लागणार असं त्यांचं म्हणणं होतं आणि एका दृष्टीनी बरोबर पण होतं. डाॅक आणि शैलेंद्र नी समजुत काढण्यासाठी म्हणून सांगितलं की "आपल्याकडच्या रस्त्यांवर ह्या महागड्या सायकली कामाच्या नाहीत" पण बराच वेळ ते दोघं डिप्रेस्ड होते...
आता सपोर्ट व्हेईकलच्या तपासणी साठी मोदक, शैलेंद्र आणि सुमीत बाहेर पार्कींग मध्ये गेलेले असतांना सागर, डाॅक आणि मामा गप्पा मारत होते. तेवढ्यात फुसऽऽऽऽऽऽ आवाज आला आणि सागरच्या सायकलचं मागचं चाक उभ्या उभ्या पंक्चर झालं होतं. नेमकं मामांच्या सायकलचं पण समोरचं चाक २० मिनीटांपुर्वीच हवा सोडून बसलेलं होतं !! सागर बिचारा केलिलवाणा चेहेरा करून बसला.
सपोर्ट व्हिईकल १ - फोर्ड एंडेव्हर
.
सपोर्ट व्हिईकल २ - पोलो.
.
ब्रिफिंग आणि रेस पूर्वीची तयारी.. या फोटोत डावीकडे निळ्या जर्सीमध्ये बसला आहे तो अमित समर्थ. भारताचा दुसरा सोलो रॅम फिनिशर.
.
मार्च इनसाईड.. रजिस्ट्रेशन काऊंटरजवळ.. मोदक, शैलेंद्र, सागर आणि डॉक
.
आयत्यावेळी सायकलला रिफ्लेक्टर चिकटवण्याची गडबड.. पाध्येंना प्राणप्रिय फेल्टला मॅचिंग रिफ्लेक्टर चिकटवताना खूप यातना झाल्या होत्या. ;)
...आणि मामा चक्क हेल्मेट विसरून आले होते. :D
.
बाकीचे स्पर्धकही तयार होत होते..
.
रेस जर्सी घालून टीम तयार झाली..!!!!
डावीकडून - सागर पाध्ये, डॉक, देशपांडे मामा आणि सुमीत
.
सायकलसह..!!
.
टारगेट.. द डेक्कन क्लिफहँगर..!!!!
(क्रमशः)
************
भाग २ - द डेक्कन क्लिफहँगर - रेस डे..!!
************
प्रतिक्रिया
10 Dec 2017 - 2:40 am | किल्लेदार
ऑगस्ट महिन्यात सायकल वरून पडून दात पडल्याने आता हे होणे नाही....
10 Dec 2017 - 2:58 am | मोदक
ओ राजे... नक्की किती दात पडले..?? :D
एका अपघाताने लगेच काय ठरवताय.. जमेल आरामात.
आत्ता आपण वयाने कितीही मोठे झालो असलो तरी लहानपणी सायकल शिकताना "पडल्याशिवाय सायकल नीट चालवता येत नाही" अशी ऐकलेली वाक्ये बदलत नाहीत याचा आमच्या ग्रुपमधील अनेकांनी (नव्याने) स्वानुभव घेतला आहे. ;)
10 Dec 2017 - 9:45 am | गवि
डु. कमेंटा डिलिटवून काही दात वाचवले आहेत.
10 Dec 2017 - 9:34 pm | किल्लेदार
धन्यवाद
10 Dec 2017 - 3:16 am | किल्लेदार
चार दात घशात गेलेत. लडाखला जे जमले नाही ते चांदणी चौकाने करून दाखवले. नवीन साहसासाठी लवकरच सज्ज होईन ही आशा बाळगून आहे.
(एकच पोस्ट तीनदा झाल्यामुळे आता बारा दात पडल्याचा फील येतो आहे)
10 Dec 2017 - 5:45 am | अभिजीत अवलिया
बापरे.
:)
10 Dec 2017 - 5:06 am | कंजूस
धमाल!
एवढंच लिहितो. पाडायला दातच नाहीत.
10 Dec 2017 - 6:30 am | भ ट क्या खे ड वा ला
मस्तच , सर्व वर्णन फोटु व व्हिडिओ ही ..
10 Dec 2017 - 6:50 am | शैलेन्द्र
जोरदार,
चला, रेस सुरू झाली
10 Dec 2017 - 8:08 am | एस
भन्नाट, अफाट वगैरे वगैरे...!
10 Dec 2017 - 9:26 am | mayu4u
पुढले भाग मामांच्या स्पीडने युंद्यात!
10 Dec 2017 - 9:57 am | गवि
क्या बात है.. टीम एकदम उत्साही अन तगडी आहे.
भरपूर मजा आली असणार. घामही खूप गाळलात. आदर आणि कौतुक. लगे रहो.
पण जरा कमी करा रे.. किती चालवाल सायकल?
मी एकदा रत्नागिरी ते पावस हे किरकोळ अंतर सायकलने गेलो. नंतर एकदाच आणि शेवटच्यांदा सांगलीहून वाडीला सायकलने गेलो.
दोन्हीवेळेला परतीच्या वेळेस एकेक पायडल मोजत आलो. लै लै लै मोनोटोनस वाटलं. तुम्ही हा रिपीटीटिव्ह कंटाळा कसा पार करता? की जाणवतच नाही passion मुळे.. ?
10 Dec 2017 - 10:08 am | गवि
तुम्ही हा रिपीटीटिव्ह कंटाळा कसा पार करता? की जाणवतच नाही passion मुळे.. ?
की त्यातच तुम्हाला लय सापडते? ट्रान्स मिळतो? झपूर्झा ..?
10 Dec 2017 - 2:55 pm | मोदक
पॅशनमुळे असेल किंवा आवडीमुळे असेल. मला तरी कंटाळा येत नाही. लय सापडत जाते. नवीन नवीन गोष्टी सापडतात.
मला सायकल चालवताना कंटाळा आला की मी थोड्या वेळाने कंटाळा कन्फर्म करतो व टेंपो पकडतो. कंटाळा येत असताना एखादी गोष्ट रेटण्यात अर्थ वाटत नाही. :)
10 Dec 2017 - 4:59 pm | देशपांडेमामा
सायकलवर एकदा बसल्यावर थांबायची इच्छाच होत नाही. फार सही फीलींग असत :-)
देश
11 Dec 2017 - 8:20 am | डॉ श्रीहास
श्वास घ्यायला कंटाळा येतो का आपल्याला ? ( वा काय तर वाक्य आहे !!)
सायकलींग आणि कंटाळा हे दोन शब्द एकाच वाक्यात म्हणता येणार नाहीत ;कंटाळा आला म्हणून सायकलींग करून आलो असं म्हणू शकतो आम्ही सायकलवेडे ;))
11 Dec 2017 - 8:50 am | डॉ श्रीहास
श्वास घ्यायला कंटाळा येतो का आपल्याला ? ( वा काय तर वाक्य आहे !!)
सायकलींग आणि कंटाळा हे दोन शब्द एकाच वाक्यात म्हणता येणार नाहीत ;कंटाळा आला म्हणून सायकलींग करून आलो असं म्हणू शकतो आम्ही सायकलवेडे ;))
10 Dec 2017 - 10:06 am | धडपड्या
मस्तच जमलाय हा फाॅरमॅट...
10 Dec 2017 - 10:51 am | डॉ सुहास म्हात्रे
भारी !!!
काय काय करतात लोक ! ;) लगे रहो... आमचा आदर, कौतूक आणि स्पर्धेतील यशासाठी शुभेच्छा पाठीशी आहेतच !
प्रत्येक सभासदाच्या शब्दांत वृत्तांत टाकण्याच्या आयडियाची कल्पना मस्तं आहे. वृत्तांत, फोटो आणि क्लिप्स हात न आखडता वेळेवर टाकत जा रे, मोदका !
10 Dec 2017 - 2:56 pm | मोदक
येस्सार..!! :)
10 Dec 2017 - 11:29 am | कपिलमुनी
वाचायला मजा येणार आहे
10 Dec 2017 - 11:36 am | प्रचेतस
भारी रे,
प्रशांतकडून सगळी हकीकत कळतच होती.
10 Dec 2017 - 12:12 pm | Ranapratap
मोदक खूप छान, धमाल येणार वर्णन वाचायला
10 Dec 2017 - 2:57 pm | बाबा योगिराज
मोदक शेठ जमतील तसे अपडेट कायाप्पा समूहावर टाकत होते, त्यामुळे आपण सुद्धा त्या रेस चा एक भाग आहोत हेच फिलिंग येत होत.
डिसी चा सगळा थरार परत एकदा अनुभवायला मिळणार. लेखातील पुढील भाग लवकर येऊ द्या मोदाक्राव. वाट बघत आहोत.
___/\___
तुम्हा सर्वांचा पंखा
बाबा योगीराज
10 Dec 2017 - 4:29 pm | मोदक
मंडळी.. एक मदत हवी आहे.
इथे व्हिडीओ अपलोड करताना प्लेलिस्ट मधून अपलोड झाल्याने लगेच पुढचा व्हिडीओ सुरू होत आहे.
प्लेलिस्ट टाळून एकच व्हिडीओ कसा अपलोड करायचा ते कळत नाहीये.
10 Dec 2017 - 10:48 pm | नाखु
विचारणार होतो
मला वाटलं मलाच काही अडचण असेल
बाकी आपली मोहीम जोरदारपणे राबविण्यात येत आहे
सायकल विसरलेला नाखु
10 Dec 2017 - 10:54 pm | मोदक
काका आता बघा बरं.. आता व्हिडीओचा आकार बदलला आहे पण व्हिडीओ संपला की थांबेल.
10 Dec 2017 - 4:31 pm | मार्गी
जबरदस्त!!!!! पु. भा. प्र. /\
10 Dec 2017 - 4:54 pm | देशपांडेमामा
फायनली धागा आला !!
मोदकरावांचे वेळात वेळ काढून धागा टाकल्याबद्दल आभार्स!
प्रॅक्टिस राईडच्या वेळी महाबळेश्वर ते सातारा (मेढा मार्गे ) भाग गाडीने जाऊन बघून घेतला होता आणि नंतर ४ दिवसांनी कळाले की ऑर्गनायजर्सनी नेमका तेव्हढाच रूट बदलला आहे. बदलेला रूट बघायला रेस डे पर्यंत मग जमलेच नाही
देश
10 Dec 2017 - 8:02 pm | शैलेन्द्र
डिस्क्लेमर टाकताय का?
10 Dec 2017 - 8:03 pm | शैलेन्द्र
म्हणून चक्क स्त्राबेरी व्हायचं?
10 Dec 2017 - 8:11 pm | मोदक
करवंदाच्या झाडावर उगवलेली स्ट्रॉबेरी..!!
=))
11 Dec 2017 - 12:05 pm | देशपांडेमामा
डेडली अडकून पडलो होतो :-) तुमची वाट बघण्याशीवाय काहीच ऑप्शन नव्हत
देश
11 Dec 2017 - 12:18 pm | sagarpdy
हे टीजर्स वाटतं :)
10 Dec 2017 - 8:18 pm | चौकटराजा
हे असं लांबलचक प्रवास करणे फार धाडसाचे आहे. मोदक यानी त्यात भर म्हणजे अशा प्रकारे लोक जातात याचा परिचय करून देण्याचा विडा उचलला आहे. मोदक भाउ व सर्व टीम ला सलाम ! फोटोंची प्रत उत्तम !
10 Dec 2017 - 8:26 pm | चौकटराजा
तो लोखंडी पूल व कच्चा रस्ता असलेला भाग कुठे आहे..? फारच रम्य !
10 Dec 2017 - 8:46 pm | मोदक
तो होय.. तो भाग जलोरी पास हिमाचल प्रदेश येथील आहे. एप्रिल २०१७ च्या सायकलिंग एक्पिडिशनचा व्हिडीओ आहे तो.
मी इथे व्हिडीओ अपलोड करताना चुकून प्लेलिस्ट मधून केल्याने एक व्हिडीओ संपला की दुसरा सुरू होत आहे. स्थितप्रज्ञ यांनी त्यावर योग्य लिंका दिल्या आहेत. अपडेट करतो आहे.
10 Dec 2017 - 8:47 pm | मोदक
सर्व प्रतिसादकांचे आभार्स.. पुढील भाग आणखी चार दिवसांनी टाकतो..!
10 Dec 2017 - 8:52 pm | इरसाल कार्टं
ट्रेलर कायप्पा ग्रुपवर वाचले होते तेव्हापासून डोळे लावून बसलो होतो.
लवकर येउद्या पुढले भाग.
11 Dec 2017 - 8:15 am | डॉ श्रीहास
वा वा वा .....
सुरवात झालीये.... आता रेस दिसते आहे समोर... पायातला जोर वाढतोय आणि पोटात गोळा येण्यास सुरूवात झालीये... I’m going have same thrill twice !!
11 Dec 2017 - 11:52 am | स्वच्छंदी_मनोज
मस्तच.. पुढे वाढून ठेवलेल्या मेजवानीची ही झलकच...
कायप्पावरून जरी अपडेट कळत होते तरी इथे वाचण्याची मजा काही औरच...
लवकरच पुढचा भाग येऊदे...
11 Dec 2017 - 12:33 pm | ज्ञानोबाचे पैजार
आणि त्याच्या मुळे इतरांनाही त्या वेडाची लागण होते आहे,
वेडात मराठे वीर दौडले "आठ" अशी कविता लिहावी लागणार यांच्यावर.
(कालच कात्रज ते सिंहगड चालून आलेला) (वेडसर) पैजारबुवा,
11 Dec 2017 - 5:02 pm | डॉ श्रीहास
ॲक्चुअली नऊ
चालून आलात !!! केवळ त्यासाठी ______/\______
11 Dec 2017 - 12:45 pm | sagarpdy
कुल डूड
11 Dec 2017 - 3:36 pm | केडी
मस्त रे...वाचतोय...
11 Dec 2017 - 4:38 pm | नितीन पाठक
सगळ्यांनी झक्कास डीसी ची तयारी केली. मस्तच.
वाचायला मजा येते. काय काय आणि किती किती अनुभवले असेल ह्याची कल्पना आलीय.
येउ द्या पुढचे भाग .......
11 Dec 2017 - 4:41 pm | पाटीलभाऊ
भन्नाट...!
11 Dec 2017 - 9:22 pm | अरिंजय
पुन्हा एकदा डिसी चा थरार अनुभवायला मिळतोय. पुढचे भाग पटापटा येऊ द्या.
12 Dec 2017 - 2:33 am | निनाद
झकास चालले आहे. वृत्तांत वाचून खूप आनंद झाला!
12 Dec 2017 - 3:43 am | निनाद
सायकल समूह -
DC हे खूप मस्त आणि मोठेच काम केले आहे तुम्ही सर्वांनी. खूप अभिमान वाटतो तुमचा.
हा खरंतर समविचारी सायकल प्रेमींचा एक छोटा ग्रुप इतकी साधी कल्पना. पण त्यातूनही, दूरदृष्टी, कल्पकता आणि गोष्टी घडवून आणण्याची धडाडी या बळावर एखाद्या छोट्या बीजातून इतके मोठे सायकल प्रकल्प साकारताना पाहून मनापासून आनंद होतो आहे!
कार्यबाहुल्य आणि इतर घडामोडी यामुळे समूहात नसलो तरी मनाने तुम्हा सर्वांसोबत आहेच.
सर्व प्रकल्प असेच चालू राहावेत आणि त्याला सर्वकालीन पाठबळ मिळत राहावे हीच सदिच्छा!
माझा मोबाईल क्रमांक सेव्ह ठेऊन वेळोवेळी प्रगती कळवत राहिल्याबद्दल डॉ. श्रीहास यांचे अनेकानेक आभार!
12 Dec 2017 - 11:38 am | sagarpdy
__/\__
12 Dec 2017 - 1:33 pm | सिरुसेरि
मस्तच . आता होउन जाउ द्या . घे पंगा कर दंगा .
12 Dec 2017 - 3:48 pm | अभ्या..
श्रीहासडॉक, सागर, मामा आणि सुमीत.
फूल्टू शुभेच्छा बरका.
येतो लौकरच तुमच्या संगं.
13 Dec 2017 - 12:50 am | थॉर माणूस
वाह, अशा धाग्यांवर क्रमशः पाहील्यावर वेगळाच आनंद होतो. :)
पुढील प्रवासास शुभेच्छा.
15 Dec 2017 - 11:41 am | मित्रहो
त्याची तितकीच जबरी माहीती फोटो पण मस्त.
19 Dec 2017 - 2:02 pm | साबु
भयानक आहे हे. दन्डवत घ्या...
19 Dec 2017 - 3:25 pm | इरसाल
भारीच ना.
पुढच्या वेळेस गाडीत बसुन सहाय्य हवे असल्यास तयार आहे ;)
20 Dec 2017 - 12:55 am | बांवरे
दंडवत स्विकारा !!
पुढच्या वेळेस करायची इच्छा आहे.
20 Dec 2017 - 11:36 am | सुमीत भातखंडे
रेस डे वाचून मग हा भाग वाचला.
अशक्य भारी!!