(तिखले)

सूड's picture
सूड in जे न देखे रवी...
6 Dec 2017 - 3:23 pm

बंद जाहला वाजून वाजून, गजराचे चुकले
कठीण दिलीसे नेमून कसरत, ट्रेनरचे चुकले
मध्ये उपटला कुठून जन्मदिन, पेस्ट्रीचे चुकले
वामकुक्षीला विसावला त्या, खाटेचे चुकले
बुडून गेला दुलईमध्ये, झोपेचे चुकले
शर्ट दाटला पोटाला अन टेलरचे चुकले
तडफडला पण गेला नाही, ट्रेकिंगचे चुकले
रांजणापरी उदरी ढकले, माशाचे तिखले...

(गजब)

dive aagarkokanअनर्थशास्त्रकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडनागद्वारबालसाहित्यभूछत्रीरतीबाच्या कविताअद्भुतरसव्युत्पत्तीसुभाषितेओली चटणीमत्स्याहारीऔषधोपचारवन डिश मीलस्थिरचित्र

प्रतिक्रिया

अनन्त्_यात्री's picture

6 Dec 2017 - 4:00 pm | अनन्त्_यात्री

काव्यक्षितिजावर ||*******|| च्या अभूतपूर्व यशानंतर उगवत असलेला नवा काव्यप्रकारी तारा = (*****ले)

टवाळ कार्टा's picture

6 Dec 2017 - 5:21 pm | टवाळ कार्टा

खिक्क

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Dec 2017 - 7:03 pm | ज्ञानोबाचे पैजार

आवडली ....आरसा दाखवलास....

पैजारबुवा,

झेन's picture

8 Dec 2017 - 10:05 am | झेन

शिर्षक वाचून वाटले विभाग चुकले
कविता वाचून अंमळ पोट दुखले