मी माझ्या कुठुंबासह (७ जण मोठे २ जण लहाण) कोकण दर्शन प्लान करतोय पुण्याहून .
कोकणात ही माझी पहिलीच ट्रिप आहे,इथे बरेचजण कोकणातले असल्याने/ कोकणात जाऊन आले असल्याने मदत करु शकतील असे वाटले.
३ दिवसात काय काय पहाता येइल? साधारण टूर प्लान कसा करावा? रहाण्यासाठी/जेवणासाठी शक्यतो घ्ररगुती चांगली ठिकाणे माहिती असतील तर सुचवाल का प्लीज?
प्रतिक्रिया
6 Nov 2017 - 4:43 pm | चौथा कोनाडा
मी पैला !
खालील धाग्यांना भेट द्यावी, बक्कळ महिती सापडेल !
१) http://www.misalpav.com/node/39875
२) http://www.misalpav.com/node/39535
३) http://www.misalpav.com/node/37993़
( कंजूस यांच्या या धाग्यात भटकंतीच्या विविध ठिकाणांचा अक्षरशः खजिना सापडेल)
४) http://www.misalpav.com/node/37602
५) http://www.misalpav.com/node/37475
आता करा हे वाचन, बघा कुठलं जमतंय ते !
6 Nov 2017 - 4:49 pm | आमि तिथे काय कमि
माहीतीबद्द्ल धन्यवाद
6 Nov 2017 - 4:49 pm | आमि तिथे काय कमि
माहीतीबद्द्ल धन्यवाद
6 Nov 2017 - 5:13 pm | आमि तिथे काय कमि
गवि तुम्हाला विशेष आग्रह
6 Nov 2017 - 5:27 pm | गवि
धन्यवाद.
पूर्वी इथे अनेकदा माहिती दिली आहे. आता खूप काळ जाणं झालेलं नसल्याने लेटेस्ट माहिती नाही. इतर अनेकजण माहिती देतीलच. ट्रिपसाठी शुभेच्छा.
6 Nov 2017 - 5:45 pm | आमि तिथे काय कमि
धन्यवाद.
6 Nov 2017 - 6:09 pm | कंजूस
नवीन माहिती काढून तुम्हीच आल्यावर लिहा.अगोदर कुठेच गेला नाहीत तर अलिबागपासून सुरुवात करा. दरवर्षी एकेक भाग करायचा चारचार दिवस.
दहा वर्षांत चित्रात दाखवतात तसे कौलारू घर वरती माड पोफळी, पपनस,सुवासिक फुले आजुबाजूस हे गायब होण्याच्या मार्गावर आहे. धडाधड तीन मजली सोसायट्या उभ्या राहात आहेत.
त्वरा करा.
7 Nov 2017 - 2:26 pm | आमि तिथे काय कमि
धन्यवाद. नक्कि प्रयत्त्न करेन
6 Nov 2017 - 6:27 pm | केडी
पहिल्यांदा जेव्हा फॅमिली सोबत कोंकण वारी केलेली, तेव्हा ह्या पुस्तकांची बरीच मदत झाली. अप्पा बळवंत चौकात मिळतील हि पुस्तके स्वस्तात
ह्यात कुठे काय बघावे, कुठे राहावे, तिथे पत्ते, फोन नंबर इत्यादी दिलेले आहेत
साद सागराची - पराग पिंपळे
बाकी इथे लोकांनी भर भरून लिहिलंय कोकणावर, तसेच बरेच स्थानिक आहेत, त्यामुळे ते मदत करतीलच. तुमच्या कोंकण वारी ला शुभेच्छा!
7 Nov 2017 - 2:27 pm | आमि तिथे काय कमि
माहितिबद्दल धन्यवाद.
6 Nov 2017 - 9:56 pm | टवाळ कार्टा
आयडि आवल्डा
16 Nov 2017 - 2:30 am | विकास...
सकाळी सकाळी Ganpati Pule ला
Aare Ware Beach बघून Ratnadurg Fort, Bhagwati Fort And Light House, Ratnagiri
Ratnagiri ला नाश्ता किंवा दुपारचे जेवण
Pawas devasthan, Ganeshgule (Optional)
Vijaydurg Fort (गडावरून डॉल्फिन खरंच दिसतात)
बोटींग पर माणशी १००/-. इथे दुपारचे जेवण सुद्धा मिळेल (Veg non veg) खरे तर जेवण करून मगच किल्ला पाहावा आणि बोटींग ला जावे
पण non veg खाणार असाल तर .. मंदिरामध्ये जात येणार नाही, बेस्ट वे रात्री खा
आता पुढे काही नवीन ठिकाणे (माझ्यासाठी नवीन)
१. Rameshwar Temple Girye विजयदुर्ग पासून ७. ४ किमी देवगडकडे जाताना उजवीकडे आहे (Google Map वर नक्की सापडेल)
२. Shri Vimaleshvar Temple विजयदुर्ग पासून १९ किमी देवगडकडे जाताना, देवगड च्या अलीकडे १० किमी (Google Map वर नक्की सापडेल)
३. देवगड च्या पुढे Kunkeshwar मध्ये मुक्काम करावा देवस्थान च्या रूम्स आहेत आणि समोर दुकानांमध्ये चौकशी केली असता मस्त नारळाच्या बागेतील home stay मिळू शकतो
Kunkeshwar मंदिर संध्याकाळी ७-८ वाजेपर्यंत चालू असते आणि मुक्काम केला तर सकाळी पण दर्शन घेता येईल
वरील तीन मंदिरे चुकवू नका..
वरील प्लॅन एका दिवसात करता येतो
16 Nov 2017 - 5:40 pm | आमि तिथे काय कमि
धन्यवाद