गाभा:
फूड प्रोसेसर घेण्याचा निर्णय आत्मघातकी ठरतो का?
१७६० अट्याचमेंट्स असलेला मर्फी रिचर्ड चा फूड प्रोसेसर घेतला..
आटा मळणे..भाज्या कापणे चकत्या करणे ..ज्यूस काढणे..मिल्क शेक.आदी विविध ब्लेड्स व भांडी असलेल्या अट्याचमेंट्स ह्या फूड प्रोसेसर ला आहेत..
मुळात हल्ली परिवार ३-४ माणसांचा..
त्या साठी कापणे मळणे आदी क्रिया हाताने करणे परवडते..
कणीक छान मळली जाते पण ..त्या साठी तो पॉट लावा नंतर विसळा आदी कामे म्हणजे फुकटचा व्याप होऊन बसतो..
ताक दही आदी रवी नी काढले जाते १०-१५ दिवसातून एकदा..
मोठा जार पण वापरात नाही...
एकुण काय तो महागडा प्रोसेसर केवळ दाण्याचा कूट.. वा चटण्या या साठीच वापरला जातो
बाकीच्या सा-या अट्याचमेंट्स धूळ खात कपाटात पडतात...
शेवटा काय?
फूड प्रोसेसर नव्याचे ९ दिवस फूड प्रोसेसर असतो..मात्र तो अनंत काळचा मिक्सर बनून रहातो
प्रतिक्रिया
29 Oct 2017 - 11:17 am | १.५ शहाणा
फूड प्रोसेसर नव्याचे ९ दिवस फूड प्रोसेसर असतो..मात्र तो अनंत काळाची अडचण होऊन जाते. तसेच टोस्टर , रोटि मेकर ,ओवेन चे होते.
29 Oct 2017 - 11:48 am | असंका
सोयी घरात हव्यात. कधीपण वापरता याव्यात म्हणून. सोय आहे म्हणून वापरायलाच हवी असं थोडंच असतं?
पूर्ण वापर आपण कसचाच करत नाही. आजुबाजुला बघितलंत तर अशाच गोष्टी जास्त दिसतील. फोन, टीवी, म्युझिक सिस्टीम, फर्निचर, इ. इ....
30 Oct 2017 - 1:18 am | मराठी कथालेखक
मिक्सर + पीठ मळणे यापलिकडे फूड प्रोसेसरचा वापर होत नाही हे मान्य !!
30 Oct 2017 - 2:22 pm | पाटीलभाऊ
आमच्या सौ.च्या आज्ञेवरून आमच्या घरीदेखील २ महिन्यांपूर्वी मर्फी रिचर्ड च्या फूड प्रोसेसरचे आगमन झाले.
सध्या तरी दाण्याचं कूट, चटणी, भिजवलेली डाळ वाटणे आणि ज्यूस यापलीकडे मजल गेली नाही.
कणिक मळण्यासाठी आपले हाथच योग्य आहेत. बाकी मोसंबीचा ज्यूस मस्त काढता येतो(सुरुवातीला १-२ वेळा ते भांडे लावण्यात तारेवरची कसरत करावी लागली होती...हे वेगळे).
पण निर्णय आत्मघातकी वगैरे काही नाही...एवढंच कि आपली गैरसोय होऊ नये..म्हणून आपण सगळ्या सोयी वापरत नाहीत :P
30 Oct 2017 - 2:27 pm | अनुप ढेरे
वॅक्युम क्लीनरची देखील हीच अवस्था होते.
30 Oct 2017 - 4:20 pm | सूड
खरंच का?
31 Oct 2017 - 9:43 am | II श्रीमंत पेशवे II
मुळात आपल्या वाड वडिलांपासून / पणजी , आजी पासून ज्या गोष्टी पाहत अथवा करत आलोय त्याच मनाला पटतात
छोट्याशा घरातील केर काढायला हवाय कशाला व्ह्याकुम क्लीनर , तसच फूड प्रोसेसर च आहे ..... जाहिरात पाहून खूप वाटत घ्यावस पण
ज्या घरी फावला वेळ खूप आहे शिवाय थोडसं नवीन तंत्रज्ञान शिकण्याची हौस आहे तिथे हा फूड प्रोसेसर खूप मोलाचीन मदत करतो
धावपळी च्या आयुष्यात असली वस्तू पूर्ण वापरात आणायला वेळच नसतो
त्यामुळे मिक्सर + पीठ मळणे यापलिकडे फूड प्रोसेसरचा वापर होत नाही हे खर आहे
एखाद्या दिवशी मूड झाला तर जूस काढायला मजा वाटते , पण ति भांडी व्यवस्थित धुवून ठेवणे हि डोकेदुखी असते.
पण माझे फूड प्रोसेसर बद्दल अडगळी ची वस्तू असे मत अजिबात नाही. त्याचा सुयोग्य नियोजनाने छान वापर करता येवू शकतो
31 Oct 2017 - 10:23 am | सुबोध खरे
मी फूड प्रोसेसर मध्ये ज्या जमतील त्या गोष्टी करतो उदा. कांदा बारीक चिरून हवा आहे पाव भाजी साठी.काकडीचे काप काढून हवे आहेत. फळांचा रस काढायला ती अतिशय बारीक चिरून हवी आहेत. ( मी बहुसंख्य फळांचा रस त्यात फळांचे अगदी तुकडे राहतील अशा रीतीने काढतो) यानंतर तो शांतपणे मोलकरणीला धुवायला टाकतो. स्वयंपाकघरातील पदार्थ करण्यापेक्षा नंतरची साफसफाई हा सर्वात कंटाळवाणा प्रकार असतो तो सरळ बाईच्या गळ्यात टाका. कारण फूड प्रोसेसर न वापरता फुकट जाण्यापेक्षा वापरून बिघडलेला बरा अशी माझी वृत्ती आहे.