ये हमारी चोरी किया हुवा पैसा वापिस आना चाहिये कि नही आना चाहिये ?... ये काला धन वापिस आना चाहिये?... ये चोर लुटेरोंसे एक एक रुपया वापिस लेना चाहिये?... इस रुपयोंपर जनता का अधिकार है कि नही है?... ये रुपया जनता के काम आना चाहिये? अरे एक बार...ये जो चोर लुटेरोंके पैसे विदेशी बँकोमे जमा है ना उतने भी रुपये हम ले आये ना.. तो भी हिन्दुस्थान के एक एक गरीब अदमीको मुफतमे १५ -२० लाख रुपया यू ही मिल जायेगा.. इतने रुपये है ये हमारे एमपी साहब कह रहे थे रेल्वे लाईन..ये काला धन वापीस आ जाय जहा चाहे वहा रेल्वे कर सकते हो.. ये लूट चलाई है..और बेशरम होकर कहते है.. सरकार आप चलाते हो और पुछते मोदी को... ये कैसे लाये? जिस दिन भारतीय जनता पार्टी को मौका मिलेगा.. एक एक पाई हिन्दुस्थान की वापीस लाई जाएगी और हिन्दुस्थान के गरीबोंके लिये काम लायी जायेगी... ये जनता के पैसे है, गरिब के पैसे है... हमारा किसान खेत मे मजदूरी करता है, उससे निकला हुआ धन है.. उस धन पर हिन्दुस्थान का अधिकार है ,हिन्दुस्थान के कोटी कोटी गरिबोंका अधिकार है, और उनको वो धन मिलना चाहिये.....
तुमच्यावर विश्वास ठेवून जनतेने तुम्हाला निवडून दिले.. तेही प्रचंड बहुमताने.. सत्तेचा गाडा सुरळीत चालवण्यासठी कुठलेही कडबोळ्याचे लोढने तुमच्या गळ्यात अडकवले नाही. विदेशातला भारतीय काळा पैसा आणणे तुम्हाला जमले नाही.. एकतर त्या विषयाचा अभ्यास नाही.. पक्षातील जाणकारांचे ऐकायचे नाही.. बिनडोक दोन चार लोकांना बरोबर घेवून असा काळा पैसा परत येत असतो काय? सत्तेत येऊन दोन वर्ष उलटली... एक फुटी कवडीही विदेशातून तुम्हाला आणता आली नाही..(आणता येणार नाही हे पहिल्यापासूनच सांगत होतो) थोड्याच दिवसात जनतेला कळून चुकले ... अरे ह्याला देशाचा गाडा काय , साधी बैलगाडीही हाकलता येत नाही. तुम्हाला टेंशन आलं... आणि मग साक्षात्कार झाला ,अरे देशातील काळा पैसाच येथील अर्थव्यवस्थेला कमकुवत बनवत आहे...मग तुमच्या डोक्यात एका बिनडोकाने (अशी लोकं तुम्हालाच सापडू शकतात) त्याच्या डोक्यातील अर्थक्रांतीचा कीडा तुमच्या डोक्यात हळूच सोडला...विदेशातील काळा पैसा आणण्यात आलेल्या अपयशामुळे तुमच्या डोक्यात किडे पडायची वेळ आली होती..अर्थक्रांतीचा हा कीडा तुमच्या डोक्यात फिट्ट बसला.. पुन्हा एकदा बिनडोक निर्णय घ्यायला तुम्ही सज्ज झालात.
कुठलाही मागचा पुढचा विचार न करता(कधी करता?) ८ नोव्हें. २०१६ ला नोटाबंदीची घोषणा केली. काळा पैसा,खोट्या नोटा, दहशतवाद नष्ट करण्याचं ब्रम्हास्त्र सोडल्याचे तुम्ही घोषित केले. दोन दिवसात तुम्हाला कळाले, की ते ब्रम्हास्त्र नसून बुमरँग आहे. नोटा बदलायला लोकांना बँकांसमोर रांगा लावाव्या लागल्या, त्यात अनेक जणांचे प्राण गेले. लोकांचा विरोध वाढत गेला... ३१ डिसेंबरपर्यंत सगळे सुरळीत झाले नाही तर तुम्ही सांगाल त्या चौकात मी शिक्षा भोगायला तयार आहे असे जनतेला भावनीक आवाहन केले. (मी तर पोकळ बांबू घेवून तयारच होतो). पण कसचं काय , ३१ तारखेनंतरही गोंधळ चालूच होता आणि तुम्ही जनतेपासून तोड लपवत होता.
आजही शेतकरी, कष्टकरी ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे नोटाबंदीमुळे अतोनात हाल होत आहेत. जुन्या बाद केलेल्या जवळ जवळ सगळ्या नोटा परत आल्या हे RBI ने घोषित केले व नोटाबंदी फेल गेली ह्यावर शिक्कामोर्तब झाले.नोटाबंदीमुळे GDP ग्रोथ घटणार(प्रत्यक्षात तसंच झालं) असं बोलणार्यांची तुम्ही खिल्ली उडवत होता. नोटाबंदी विरोधकांना 'नोटाबंदीभक्त' देशद्रोही ठरवू लागले . विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. सत्य स्विकारण्याऐवजी तुम्ही त्याकडे काणाडोळा करत आहात. ये अच्छी बात नही है!
प्रतिक्रिया
6 Oct 2017 - 2:06 am | ट्रेड मार्क
जीडीपी कमी झाला म्हणून काय परिणाम झाला ते सांगायचं सोडून तुम्ही भ्रष्टाचार आणि घोटाळे झाले त्याचा काय परिणाम झाला हे विचारताय. वर म्हणताय माझा प्रतिसाद अर्थहीन आहे? इथेच मिपावर काही लोक जीडीपी कमी झाला म्हणून एवढा कंठशोष करत आहेत म्हणून विचारलं की काय परिणाम झाला? पगार कमी झाला का वस्तू मिळेनाश्या झाल्या का पैसे उपलब्ध नाहीयेत. जीडीपी कसा काढतात हे तरी किती लोकांना माहित आहे? २०१५ मध्ये जीडीपी काढायची पद्धत बदलली म्हणून ओरडतात, पण नक्की काय बदल केला आणि त्याचा परिणाम काय झाला हे माहित आहे का? बाकी लोकांचं जाऊ दे तुम्ही किंवा थॉर माणूस या पैकी कोणीतरी सांगा की जीडीपी कमी झाल्यामुळे तुमच्या आमच्या जीवनावर काय परिणाम झाला. जीडीपी कमीजास्त होणं हे अर्थव्यवस्थेत होतंच असतं, त्यात अनैतिक काही नाही. त्याची अनैतिक गोष्टींशी (घोटाळ्याशी) तुलना करणे हेच चुकीचे आहे. ही चूक तुम्ही मानणार का?
मोदींवर टीका कुठे केली हे म्हणणे म्हणजे ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा प्रकार आहे. तुम्ही फक्त bloomberg चे रिपोर्ट दाखवलेत, मी World बँक आणि मॉर्गन स्टॅनले चे दाखवले. तुम्ही म्हणताय हे मी मानायलाच पाहिजे आणि माझा प्रतिसाद तुम्हाला कळला नाही किंवा पटला नाही म्हणून मी चूक कबूल करावी ही अपेक्षा ठेवणे हे फॅसिस्ट मनोवृत्तीचे लक्षण म्हणावे का? इथे माझा आवाज दाबला जातोय असं नाही वाटत?
"आणि सरकार कोणाचेही असो त्याला जाब विचारण्याचा प्रत्येक सामान्य माणसाला अधिकार आहे. त्यासाठी त्याला तो "देशभक्त" "मोदीभक्त" इत्यादी असल्याची साक्ष देणे गरजेचे नाही."
तो अधिकार कोणीच डावललेला नाहीये. टीका कराच पण नीट अभ्यास करून तर करा. धागाकर्त्याने आवाज दाबला जातोय म्हणून लेख लिहिलाय, तुम्ही पण सरकारवर बरीच टीका केलीये. सोशल मिडीयावर लोक मोदींना काय वाट्टेल ते बोलतात, अगदी विरोधी पक्षाचे लोक मोदींच्या आईवरून व बायकोवरून तर उडवतात. केजरीवाल Coward & Psychopath म्हणले, दिग्विजय सिंग “Mere do achievements 1.) Bhakton ko C** banaya 2.) C*** ko Bhakt banaya.” हे ट्विट करतात. ट्विटरवर उत्तर देण्यापलीकडे आणि टीव्ही वर चर्चा करण्यापलीकडे कोणी कसली कारवाई केलीये हे दाखवून द्या. काही "भक्तांनी" अश्या वक्तव्यांविरुद्ध कोर्टात केसेस दाखल केल्या आहेत. पण मग मोदींना फॅसिस्ट का म्हणतात? कोणाला माहिती आहे का फॅसिस्ट म्हणजे काय? ती राजवट कशी असते?
तुम्हाला किंवा सरकारविरोधी बोलणाऱ्यांवर हे बोलल्याबद्दल सरकारकडून काय कारवाई झाली ते सांगा.
30 Sep 2017 - 7:44 am | मार्मिक गोडसे
पण जर गरिबांना खूपच त्रास झाला असता आणि अजूनही होत असता तर सरकारच्या विरोधात कुठेतरी काहीतरी झालं असतं.
देशभरातील असंघटीत क्षेत्रातील लोकांना एकत्र आणणे व आंदोलन करणे हे फार कठीण काम असते,त्यासाठी विरोधी पक्ष बळकट असावा लागतो.
यशवंतसिंग सारख्या कोणीतरी केलेल्या कमेंटवर विसंबून आहे आणि मागो किंवा तुम्ही इथे मिपावर असले लेख/ प्रतिसाद लिहिताय.
मी असं लिहिलेले तुम्हाला कुठे आढळले ? कोणाचे कमेंट गांभीर्याने घ्यायचं ह्याचं भान आहे म्हटलं.
3 Oct 2017 - 12:44 pm | arunjoshi123
हे सत्य आहे. मात्र त्यातल्या १% लोकांना तरी एकत्र आणून आंदोलन करणे तितके अवघड नसावे.
3 Oct 2017 - 2:57 pm | मार्मिक गोडसे
मात्र त्यातल्या १% लोकांना तरी एकत्र आणून आंदोलन करणे तितके अवघड नसावे.
कमजोर विरोधकांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव.
3 Oct 2017 - 4:16 pm | प्रसाद_१९८२
--
विरोधक आंदोलन करतील यावर अवलंबून राहायची गरज काय होती तुम्हाला, नोटबंदीचा त्रास तुमच्यासहीत इतर अनेक जणांना झाला आहे असे येथील व सोशल मिडीयावरिल काही सदस्यांचे प्रतिसाद वाचून लक्षात येते. तेंव्हा अश्या त्रास झालेल्या लोकांना एकत्र करुन तुम्हीच का नाही उभे केलेत एकादे आंदोलन ? विरोधी नेते आपोआप तुमच्या पाठीशी उभे राहीले असते तसेही सध्या ते निरोद्योगीच आहेत.
11 Oct 2017 - 6:11 pm | आनन्दा
आत्मविश्वासाचा अभाव नव्हे, तर त्या नोटांच्या बळावर ही आंदोलने व्हायची त्या नोटाच त्या काळात मातीमोल झाल्या होत्या.
11 Oct 2017 - 7:20 pm | मार्मिक गोडसे
सध्याचा प्रमुख विरोधीपक्ष गेली ६० वर्षे सत्तेत असल्यामुळे त्याला आंदोलनाचा अनुभव व आत्मविश्वास नाही.तुम्ही इतक्या आत्मविश्वासाने म्हणत आहात ह्याचा अर्थ गेली ६० वर्षे तेव्हाचा विरोधीपक्ष ह्या नोटांच्या बळावरच आंदोलन करत होता असा होतो.
12 Oct 2017 - 11:45 pm | सुखीमाणूस
तरीही मोदीनी नोटाबन्दी केली!!
असा निस्वार्थ नेता होणे नाही.....
13 Oct 2017 - 8:30 am | मार्मिक गोडसे
असा निस्वार्थ नेता होणे नाही.....
नोटाबंदीची घोषणा केल्यावर आपल्या पक्षाच्या आमदार खासदारांचे ८ नोव्हें १६ ते ३१ डिसें. १६ पर्यंतचे बँक व्यवहाराचे तपशील तपासणार होते निस्वार्थी पंतप्रधान , झाले का तपासून ? की नुसती फेकुगीरी?
13 Oct 2017 - 9:46 am | सुबोध खरे
आपण कोण? आपला पगार किती?
पंतप्रधानांनी आपल्याला उत्तर का द्यावे?
13 Oct 2017 - 9:47 am | सुबोध खरे
त्यांना फेकू म्हणण्याची आपली लायकी काय आहे? याचाही विचार करा
13 Oct 2017 - 10:32 am | मार्मिक गोडसे
त्यांना फेकू म्हणण्याची आपली लायकी काय आहे? याचाही विचार करा
असं एखाद्या मिपा सदस्याची लायकी काढणे मिपा धोरणात बसतं का ?
13 Oct 2017 - 1:15 pm | सुबोध खरे
अशी भाषा आपण देशाच्या लोकनियुक्त पंतप्रधानांबद्दल परत परत वापरत आहात ते सुद्धा "आवाज दाबू नका' असा धागा काढून. आपण आम्हाला भक्त म्हणता येथ पर्यंत ठीक आहे. आम्ही कस्पटासमान आहोत हे हि मान्य.
असेच अनुदार उद्गार डॉ आंबेडकरांबद्दल किंवा प्रेषित महंमदाबद्दल काढण्याची हिम्मत दाखवा आणि मग व्यक्तिस्वातंत्र्य आवाज दाबू नका इ म्हणा. तेंव्हा भावना दुखावल्याबद्दल आपली काय स्थिती होईल ते पहा .
तसेच श्री मोदींना बोलल्याबद्दल आमच्या सारख्यांच्या भावना दुखावतात याबद्दल आपले काय म्हणणे आहे? श्री मोदींना फेकू म्हणण्याची आपली "लायकी आहे" हे पहिल्यांदा आपण सिद्ध करा.
अशा तर्हेचे अनुदार उद्गार यापूर्वी मी फक्त मोगा उर्फ जामोप्या उर्फ चंपाबाई यांच्या बद्दल काढले होते.( त्याबद्दल मला खेदही नाही)
13 Oct 2017 - 3:45 pm | मार्मिक गोडसे
आंबेडकरांबद्दल किंवा प्रेषित महंमदाबद्दल काढण्याची हिम्मत दाखवा आणि मग व्यक्तिस्वातंत्र्य आवाज दाबू नका इ म्हणा.
काय काढण्याची हिम्मत दाखवू म्हणता? तुम्हाला त्रास होत असेल तर करा की तुम्ही हिम्मत. कायदा - सुव्यवस्था बघायला तुमचे लाडके सरकार समर्थ आहे . सरकारवर भरोसा नाय का?
13 Oct 2017 - 1:21 pm | तर्राट जोकर
गोडसे,
मोदींना फेकू असे संबोधणे अल्पसंख्याक नागरिकांच्या भावनांस क्षती पोचवणरे आहे. अल्पसंख्यांकांच्या भावनांचा आदर ठेवत जा. भारतात ते सर्वात महत्त्वाचे आहे. खरेंचे ऐका. त्यांच्या भावना दुखावतात. मोदींना फेकू म्हणू नका, फेकू फेकू असे म्हणून मोदींचा अपमान करायचा नाही. साक्षात मोदींना फेकू म्हणणे मान्य नाही होणार. अजिबात कोणीही मोदींना फेकू म्हणून त्यांची खिल्ली उडवायची नाही. तुमच्यावर खटला दाखल होऊ शकतो. सावधान, मोदींना फेकू म्हणाल तर.
13 Oct 2017 - 1:29 pm | सुबोध खरे
असेच अनुदार उद्गार डॉ आंबेडकरांबद्दल किंवा प्रेषित महंमदाबद्दल काढण्याची हिम्मत दाखवा
जोकर बुवा
तुम्हाला हि हेच आव्हान आहे बोला घेता का?
13 Oct 2017 - 2:06 pm | तर्राट जोकर
"मला का मालतो, त्याला पण माल ना.....!"
उगी उगी हां. आपण मोदींना फेकू म्हणणार्यांचे घर उन्हात बांधू...
13 Oct 2017 - 2:19 pm | सुबोध खरे
कुठे रेल्वेच्या अतिक्रमित जागेत का? जास्त नाही फक्त हजार बाराशे स्क्वेअर फुटाचे?
13 Oct 2017 - 2:32 pm | मार्मिक गोडसे
हायला
तुम्ही कोण, कधी, केंव्हा, काय बोललं हे लक्षात ठेवता ?आणी ते उकरून काढता
धन्य आहे !
इतकी हतबलता (DESPARATION) कामाची नाही.
आडनावाप्रमाने 'खरे' कधी बोलणार? स्मृतीभ्रंश झाला का?
13 Oct 2017 - 2:40 pm | तर्राट जोकर
ह ह ह.... भारतासारख्या सार्वभौम देशाच्या पंतप्रधान पदासारख्या सर्वोच्च जबाबदार आणि शपथेने बांधील, घटनात्मक पदावर बसून जो माणूस बिन्दास खोटारडी फेकाफेक करतो, त्याला आपल्या खोटं बोलण्याबद्दल अजिबात काहीही वाटत नाही, पण त्याला खोटारडा म्हटला की कुणाच्या बुडाला का आग लागती? गोडसे तुम्हाला माहिती असंल तर सांगा.
13 Oct 2017 - 5:35 pm | सुबोध खरे
अहो नथुराम
त्या डांगे अण्णांच्या 20 लाखाच्या ट्रक सारखं तुमचं स्विस बँकेतले पैसे किंवा ते "फक्त हजार बाराशे स्क्वेअर फुटाचे" रेल्वेच्या अतिक्रमित जमिनीवरील घर हे "लक्षात ठेवावे" लागते नाहीत.
13 Oct 2017 - 8:54 pm | थॉर माणूस
आंबेडकरांबद्दल अनुद्गार काढण्याइतके काय केले त्यांनी हे ऐकायला आवडेल तुमच्याकडून. बाकी, इतक्यातच मोदी हे प्रेषित आणि महामानव पदांशी बरोबरी करू लागलेत हे पाहून आनंद झाला.
कुठल्या व्यक्तीला काय बोलावे हे प्रत्येकाला डीक्टेट करण्याइतकी ऑथॉरीटी तुमच्याकडे असते हे सुद्धा आजच कळाले. ते ही आवाज दाबू नका नावाच्या धाग्यावर हे एक विशेष. :)
13 Oct 2017 - 9:13 pm | सुबोध खरे
चुकीच्या दिशेने विचार करताय.
पंतप्रधानांवर अश्लाघ्य टीका केली तरी तुमच्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही आणी आवाज दाबला जातो आहे हा दावा खोटा आहे असे दाखवत आहे.
असहिष्णुता काय आहे/असू शकते हे अशा लोकांना दाखवणे आहे.
यात डॉ आंबेडकर किंवा प्रेषित महंमदाशी तुलना करण्याचा संबंध नाही.
13 Oct 2017 - 9:22 pm | थॉर माणूस
:)
अडीचशेच्या वर प्रतिसाद आहेत ह्या धाग्यावर, तुम्हीच एकदा काळजीपूर्वक रोख बघा धाग्याचा. कार्यवाही होत नाही हे वर्षानुवर्षे गृहीत धरूनच चालले होते लोक. म्हणूनच याआधीच्या पंतप्रधान, मंत्री इत्यादींवर लोक टीका करत आणि कुठलीही टोळधाड झूंडीने त्यांच्या अंगावर येईल का याची चिंता करावी लागत नसे. गेल्या काही वर्षात हे चित्र कणभरही बदललेले नाही असे तुमचे म्हणणे असेल तर मग प्रश्नच मिटला.
आणि हो, त्यांच्या असहिष्णुतेपेक्षा आमची असहिष्णुता चांगली असा दावा करणे तरी योग्य आहे का याचाही विचार करा. कारण ज्या दोन समुदायांवर आपण आत्ता असहिष्णुतेविषयी आरोप केलेत, त्यांनी सुद्धा हे सरकार निवडून आणण्यात हातभार लावलेला आहे.
13 Oct 2017 - 2:18 pm | मार्मिक गोडसे
तजो, का आमच्यासारख्या गरिबाला दम देता? तो गूगलबाबा 'फेकू ' शब्द सर्चला टाकल्याक्षणी लाडक्या पंतप्रधानांना आपल्यासमोर उभे करतो. त्यानेच आम्हाला असं बोलायला शिकवले त्याला का दम देत नाही?
13 Oct 2017 - 2:26 pm | सुबोध खरे
अहो नथुराम
म्हणजे काय आहे "गोडसे" टाकलं तर गुगल बाबा नथुराम गोडसें बद्दलचं सगळं साहित्य दाखवतात.
ते स्विस बँकेतले पैसे आपले नाहीत तर कुणाचे याचं तुम्ही अजून उत्तर दिलं नाहीये. का सापडत नाहिये? गुगल करून पाहा.
13 Oct 2017 - 2:49 pm | श्रीगुरुजी
गुगलवर "पप्पू" टंकलं तर कोण दिसेल हो? काल कोणीतरी महिलांच्या स्वच्छतागृहात घुसला होता म्हणे.
13 Oct 2017 - 3:16 pm | मार्मिक गोडसे
गुगलवर "पप्पू" टंकलं तर कोण दिसेल हो? काल कोणीतरी महिलांच्या स्वच्छतागृहात घुसला होता म्हणे.
जो कोणी दिसेल त्याबद्दल तुम्ही काहीही लिहिलं तरी माझ्या भावना ह्यापूर्वी कधी दुखावल्या गेल्या नाहीत ,भविष्यातही दुखावल्या जाणार नाही. बिनधास्त लिहा.
13 Oct 2017 - 3:34 pm | सुबोध खरे
जाऊ द्या हो नथुराम
भावना दुखावण्यासाठी माणूस भावनाप्रधान असावा लागतो.
भावनाशून्य माणसाच्या भावना दुखावत नाहीत.
ते स्विस बँकेतले पैसे कुणाचे सापडलं काय?
13 Oct 2017 - 4:03 pm | मार्मिक गोडसे
भावना दुखावण्यासाठी माणूस भावनाप्रधान असावा लागतो.
मी कोणाचा भक्त नाही. आणि अंधभक्तां सारखा रडका स्वभावही नाही. जे खटकते ते थेट बोलतो, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून नेम धरत नाही.
13 Oct 2017 - 6:10 pm | सुबोध खरे
भावनाशून्य माणसाच्या भावना दुखावत नाहीत.
ते स्विस बँकेतले पैसे कुणाचे सापडलं काय?
याचा उत्तर मात्र तुम्ही देत नाही. आणि पंतप्रधानांना फेकू म्हणताय.
13 Oct 2017 - 10:22 am | मार्मिक गोडसे
आपण कोण?
भारतीय नागरिक
आपला पगार किती?
विद्यार्थीदशेत असताना केले होते पगारावर काम. सध्या स्वतःचा व्यवसाय. कष्टाने मिळेल त्यात समाधानी.
चौकशी बद्दल धन्यवाद! परंतू यंदा कर्तव्य नाही...
पंतप्रधानांनी आपल्याला उत्तर का द्यावे?
त्यांनी तशी सार्वजनिक घोषणा केली आहे. जमत नसेल तर कशाला फुकाच्या घोषणा करायच्या?
13 Oct 2017 - 10:35 am | सुबोध खरे
Prime Minister Narendra Modi asked all BJP legislators and parliamentarians on Tuesday to submit their bank transaction details to party president Amit Shah, three weeks after he abruptly recalled high-value banknotes to drain illegal cash from the economy.
त्यांनी आपल्या( भाजपच्या) आमदार खासदारांना हि माहिती पक्षाध्यक्षांना द्यायला सांगितली आहे.
आपण उपटसुंभ कोण?भाजप शी आपला काय संबंध? संबंध असेल तर हि माहिती श्री अमित शाह याना विचारा
मान न मान मै तेरा मेहमान
उगाच सार्वजनिक स्थळावर आपला कडवा द्वेष व्यक्त करायची गरज नाही.
तरीही गरळ ओकायचीच असेल तर आपली मर्जी
13 Oct 2017 - 10:36 am | सुबोध खरे
http://www.hindustantimes.com/india-news/modi-asks-bjp-mps-mlas-to-submi... हा दुवा
13 Oct 2017 - 12:05 pm | मार्मिक गोडसे
आपण उपटसुंभ कोण?भाजप शी आपला काय संबंध?
दुसऱ्या पक्षाच्या अंतर्गत धोरणात नाक खुपसताना तुमचा त्या पक्षाशी जितका संबंध
उपटसुंभ ? सभ्य भाषा वापराल्याबद्दल धन्यवाद!
13 Oct 2017 - 1:06 pm | सुबोध खरे
फेकू म्हणण्याची आपली लायकी
13 Oct 2017 - 10:18 am | प्रसाद_१९८२
नोटाबंदीची घोषणा केल्यावर आपल्या पक्षाच्या आमदार खासदारांचे ८ नोव्हें १६ ते ३१ डिसें. १६ पर्यंतचे बँक व्यवहाराचे तपशील तपासणार होते निस्वार्थी पंतप्रधान , झाले का तपासून ? की नुसती फेकुगीरी?
<<
आमदार, खासदारांचे बँक व्यवहार पंतप्रधानानी तपासले की नाहि याची माहिती, 'माहिती अधिकार कायद्या'च्या माध्यमातून पंतप्रधान किंव्हा पंतप्रधान कार्यालयाकडून तुम्ही मागवू शकता. ते तुम्ही करणार नाही, फक्त मिसळपाव व मायबोलीवर धागारुपी जिलब्या टाकून त्या धाग्यावर पंतप्रधानांनी येऊन तुम्हाला उत्तर द्यावे हि अपेक्षा ठेवणार?
13 Oct 2017 - 11:07 am | शब्दबम्बाळ
पण राजकीय पक्ष आणि त्यांचे आर्थिक व्यवहार अजूनही RTI मध्ये समाविष्ट नाहीत. त्या दृष्टीने कुठल्याच सरकारने फारशी हालचाल केली नाहीये. त्याची कारण सरळ सरळ आहेत. हा पक्ष पण त्याला अपवाद नाही. निवडुणकामध्ये देणग्या कोणाकडून किती येतात हे लोकांनाही समजले तर सत्य बाहेर पडेल याची भीती वाटते.
SC to Centre, EC: Why political parties are not under RTI ambit
हे संपादकीय पण वाचा.
Making parties accountable
13 Oct 2017 - 11:19 am | सुबोध खरे
लोकशाहीचे चारही "आधार स्तंभ" सवता सुभा कसा राखून ठेवता येईल याचा प्रयत्न करीत असतात. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम पासून ते बाबू लोकांच्या शासकीय सेवा नियमावली पर्यंत कोणतीही गोष्ट अपारदर्शक ठेवण्यात सर्वांचा रस आहे. त्याला राजकारणी अपवाद ठरतील हि अपेक्षा ठेवणे हेच चुकीचे आहे. मग तो कोणताही पक्ष असो. सरकारे बुडीत असली तरी आमदार खासदारांचे पगार वाढवून घेताना एकमत होताना सर्व देशभरच दिसून येते. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल गळा काढताना आपली पक्षीय निष्ठा बाजूला ठेवून सगळे पत्रकार रांगेत उभे राहतात.
आपली लोकशाही अजूनही रांगते आहे तिला उभे राहायला आणि चालायला वेळ लागणार आहे धावायची गोष्ट तर दूरच आहे. दुःखात सुखाची एकच किनार आहे ती म्हणजे इस्त्रायल पासून ते दक्षिण कोरिया पर्यंत भारत हा असा एकच देश आहे ज्यात लोकशाही नांदते आहे भले मग ठेचकाळत का असेना?
13 Oct 2017 - 1:13 pm | गंम्बा
लोकशाही आहे कारण नाइलाज आहे आणि त्याचे कारण आहे भारताचा आकार आणि लोकसंख्या.
लोकसंख्या पण अशी की जात, धर्म, भाषा, प्रांत ह्यात पूर्णपणे विभागली गेलेली.
कोणी एक व्यक्ती किंवा सैन्य सुद्धा एकाधीकार शाही आणु शकत ह्या विभाजनामुळे.
13 Oct 2017 - 2:42 pm | सुबोध खरे
भारतात लष्करशाही अली नाही याचे कारण आपण म्हणता ते नसून मूळ लष्करी अधिकारी यांच्या मनात लोकशाही बद्दल असलेली भावना आहे आणि त्यासाठी घटनाकारांनी आखून दिलेल्या सीमारेषा आणि त्यावर सावध मनाने केलेले काम आहे
.https://www.thequint.com/news/world/indian-militarys-architectural-compo...
5 Oct 2017 - 4:31 am | शब्दबम्बाळ
मोदींच नाव कुठेही नव्हतं घेतलं तरीही मोदीविरोध आलाच वाटत! छान! :)
असेही भारतात राजेशाही नाहीये, मी सरकारला दोषी धरतोय त्यात त्या त्या खात्याचे मंत्री देखील असतात. जर मोदी त्यांना काम करून देत असतील तर... नाही म्हणजे समर्थकांच्या मते तेच सगळे निर्णय घेतात ना, मग सगळंच कळत असावं त्यांना! कशाला उगाच मंत्री हवेत... असो!
तर तुम्ही उगीचच समर्थन करण्याच्या नादात इतके वाहवत गेलात कि आपण कोणाची लिंक शेअर करतोय तेही लक्षात नाही आलं कि हो तुमच्या. ती सोशल कोस्ट ची लिंक आहे ती अरिंदम चौधरी नावाच्या "भामट्याची" आहे. ज्याने अनेकांना मॅनेजमेंट कोर्सेस मध्ये गंडवले आहे. त्याचे IIPM नावाचे गंडवण्याचे कॉलेज देखील बंद करण्यात आले आहे.
Don’t ‘Dare to think beyond the IIMs’, Arindam Chaudhuri finally shuts down his infamous b-school IIPM
ज्याने स्वतः scam केले आहेत तो त्यांची सोशल कोस्ट काय असते यावर भाष्य करतोय वा रे वा!
आता तो मोदींची तळी उचलण्याचे काम करतोय त्यामुळे प्रसिद्ध पण होईल पुन्हा!
तर पुढच्या वेळी अशा लिंक देताना जरा "बघा" कि कोणाच्या आहेत, समर्थन करा पण जरा डोळसपणे करा.
3 Oct 2017 - 1:40 pm | arunjoshi123
ग्राफवरून २०१५ मधे अर्धि नोटबंदी झाली होती असे वाटते.
4 Oct 2017 - 6:16 am | थॉर माणूस
दरवर्षी नव्या नोटा छापण्याचा खर्च हा वाढता असतो (नवे सिक्युरीटी फिचर्स इत्यादीमुळे). त्या वर्षी किती नोटा बाद ठरवल्या आणि किती नव्या नोटा छापल्या जाणार या निर्णयावर किती खर्च होणार हे ठरते. ग्राफ नीट पाहील्यास लक्षात येते की २०१५ ला दिसणारा आकडा २०१४ पेक्षा फार मोठा नाही २०१५ जवळ सुद्धा तो वाढता असला तरी फरक फार मोठा नाही. पण २०१६ आणी २०१७ मधे फार मोठी तफावत दिसते. कारण नोटबंदीमुळे नोटा बाद ठरवण्यात आल्या आणि पुनर्मुद्रण करण्याचा खर्च वाढला.
29 Sep 2017 - 11:15 pm | गामा पैलवान
मार्मिक गोडसे,
या विधानाशी पार असहमत. इतके भीषण दुष्परिणाम असतील तर लोकांनी एव्हाना एखादं आंदोलन उभारलं असतं. मोदींचे राजकीय विरोधक टपून बसलेलेच आहेत मोदी केव्हा घसरताहेत. त्यांनी अशी काही चळवळ वा आंदोलन करण्यात कसलाही उत्साह दाखवला नाहीये. कारण की जनतेचा फुटक्या कवडीइतकाही पाठींबा मिळणार नाहीये हे त्यांना पक्कं ठाऊक आहे. जनतेला खरंच इतका त्रास झाला का याची शंकाच आहे. आणि झाला असला तरी जनता ते सहन करायला तयार आहे. प्रश्न मिटला.
तुम्ही हकीमाचं औषध तुच्छ म्हणता, पण मात्रा लागू पडंत नसेल तर रोग्याने बोंब तरी ठोकायला हवी ना?
आ.न.,
-गा.पै.
3 Oct 2017 - 6:18 pm | सुनिल साळी
आमच्याकरिता पेट्रोल आधी सुद्धा महाग होते आणि आता सुद्धा. पण याच्या आधी टॅक्स चा पैसा घोटाळ्यामध्ये जात होता. आता विकासासाठी आणि आतंकवाद्यांना ठोकण्यासाठी. ज्यांना बदलायचे त्यांनी विचार बदला.
प्रधानमंत्री तर आम्ही बदलू देणार नाही.
4 Oct 2017 - 6:18 am | थॉर माणूस
>>>प्रधानमंत्री तर आम्ही बदलू देणार नाही.
हे तुमच्या आमच्या हातात असतं तर मग आणखी काय हवं? :)
4 Oct 2017 - 12:03 pm | पुंबा
२०२४ ला योगी आदित्यनाथ पंतप्रधान होणार असं म्हणतात.
5 Oct 2017 - 11:40 am | विशुमित
मग २०२९ च्या तयारीला लागा.
13 Oct 2017 - 2:08 pm | तर्राट जोकर
मोदींना फेकू म्हटले तर भगतलोक्स स्वतःच्या पिताश्रींचा उद्धार केल्यागत पिसाळायला लागलेत.