ये अच्छी बात नही है! आवाज दाबू नका...

मार्मिक गोडसे's picture
मार्मिक गोडसे in राजकारण
22 Sep 2017 - 9:34 pm

ये हमारी चोरी किया हुवा पैसा वापिस आना चाहिये कि नही आना चाहिये ?... ये काला धन वापिस आना चाहिये?... ये चोर लुटेरोंसे एक एक रुपया वापिस लेना चाहिये?... इस रुपयोंपर जनता का अधिकार है कि नही है?... ये रुपया जनता के काम आना चाहिये? अरे एक बार...ये जो चोर लुटेरोंके पैसे विदेशी बँकोमे जमा है ना उतने भी रुपये हम ले आये ना.. तो भी हिन्दुस्थान के एक एक गरीब अदमीको मुफतमे १५ -२० लाख रुपया यू ही मिल जायेगा.. इतने रुपये है ये हमारे एमपी साहब कह रहे थे रेल्वे लाईन..ये काला धन वापीस आ जाय जहा चाहे वहा रेल्वे कर सकते हो.. ये लूट चलाई है..और बेशरम होकर कहते है.. सरकार आप चलाते हो और पुछते मोदी को... ये कैसे लाये? जिस दिन भारतीय जनता पार्टी को मौका मिलेगा.. एक एक पाई हिन्दुस्थान की वापीस लाई जाएगी और हिन्दुस्थान के गरीबोंके लिये काम लायी जायेगी... ये जनता के पैसे है, गरिब के पैसे है... हमारा किसान खेत मे मजदूरी करता है, उससे निकला हुआ धन है.. उस धन पर हिन्दुस्थान का अधिकार है ,हिन्दुस्थान के कोटी कोटी गरिबोंका अधिकार है, और उनको वो धन मिलना चाहिये.....

तुमच्यावर विश्वास ठेवून जनतेने तुम्हाला निवडून दिले.. तेही प्रचंड बहुमताने.. सत्तेचा गाडा सुरळीत चालवण्यासठी कुठलेही कडबोळ्याचे लोढने तुमच्या गळ्यात अडकवले नाही. विदेशातला भारतीय काळा पैसा आणणे तुम्हाला जमले नाही.. एकतर त्या विषयाचा अभ्यास नाही.. पक्षातील जाणकारांचे ऐकायचे नाही.. बिनडोक दोन चार लोकांना बरोबर घेवून असा काळा पैसा परत येत असतो काय? सत्तेत येऊन दोन वर्ष उलटली... एक फुटी कवडीही विदेशातून तुम्हाला आणता आली नाही..(आणता येणार नाही हे पहिल्यापासूनच सांगत होतो) थोड्याच दिवसात जनतेला कळून चुकले ... अरे ह्याला देशाचा गाडा काय , साधी बैलगाडीही हाकलता येत नाही. तुम्हाला टेंशन आलं... आणि मग साक्षात्कार झाला ,अरे देशातील काळा पैसाच येथील अर्थव्यवस्थेला कमकुवत बनवत आहे...मग तुमच्या डोक्यात एका बिनडोकाने (अशी लोकं तुम्हालाच सापडू शकतात) त्याच्या डोक्यातील अर्थक्रांतीचा कीडा तुमच्या डोक्यात हळूच सोडला...विदेशातील काळा पैसा आणण्यात आलेल्या अपयशामुळे तुमच्या डोक्यात किडे पडायची वेळ आली होती..अर्थक्रांतीचा हा कीडा तुमच्या डोक्यात फिट्ट बसला.. पुन्हा एकदा बिनडोक निर्णय घ्यायला तुम्ही सज्ज झालात.

कुठलाही मागचा पुढचा विचार न करता(कधी करता?) ८ नोव्हें. २०१६ ला नोटाबंदीची घोषणा केली. काळा पैसा,खोट्या नोटा, दहशतवाद नष्ट करण्याचं ब्रम्हास्त्र सोडल्याचे तुम्ही घोषित केले. दोन दिवसात तुम्हाला कळाले, की ते ब्रम्हास्त्र नसून बुमरँग आहे. नोटा बदलायला लोकांना बँकांसमोर रांगा लावाव्या लागल्या, त्यात अनेक जणांचे प्राण गेले. लोकांचा विरोध वाढत गेला... ३१ डिसेंबरपर्यंत सगळे सुरळीत झाले नाही तर तुम्ही सांगाल त्या चौकात मी शिक्षा भोगायला तयार आहे असे जनतेला भावनीक आवाहन केले. (मी तर पोकळ बांबू घेवून तयारच होतो). पण कसचं काय , ३१ तारखेनंतरही गोंधळ चालूच होता आणि तुम्ही जनतेपासून तोड लपवत होता.
आजही शेतकरी, कष्टकरी ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे नोटाबंदीमुळे अतोनात हाल होत आहेत. जुन्या बाद केलेल्या जवळ जवळ सगळ्या नोटा परत आल्या हे RBI ने घोषित केले व नोटाबंदी फेल गेली ह्यावर शिक्कामोर्तब झाले.नोटाबंदीमुळे GDP ग्रोथ घटणार(प्रत्यक्षात तसंच झालं) असं बोलणार्‍यांची तुम्ही खिल्ली उडवत होता. नोटाबंदी विरोधकांना 'नोटाबंदीभक्त' देशद्रोही ठरवू लागले . विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. सत्य स्विकारण्याऐवजी तुम्ही त्याकडे काणाडोळा करत आहात. ये अच्छी बात नही है!

प्रतिक्रिया

सहमत, बरोबर आहे तुमचे. ;)

Nitin Palkar's picture

22 Sep 2017 - 9:54 pm | Nitin Palkar

या गुन्ह्याला राजीनाम्याशिवाय प्रायश्चित्त नाही. मोदींनी राजीनामा दिलाच पाहिजे.;)

छ्या.. कर ली ना छोटी बात..? राजीनामा बिजीनामा काये.. डायरेक राजकीय संन्यास आणि भाजपाचे विसर्जन असले मुद्दे बोला.

प्रमोद देर्देकर's picture

22 Sep 2017 - 9:56 pm | प्रमोद देर्देकर

चला शाल आणि श्रीफळ याची तयारी आत्ता करून ठेवावी म्हणतो. उगा उशीर नगं.

कशाच्या आधारावर हे ठरवलं तेही सांगा. स्विस बँकेतला पैसा येणार नाही हे सर्वांनाच माहित होतं. त्यावर विसंबून मतं दिली सांगणाय्रांनी हात वर करा.
बाद झालेल्या नोटा जमा झाल्या म्हणजे मोहिम फसली हे कसे काय?
ज्यांनी ज्याप्रमाणात रिटन भरत आहेत तेवढे रुपये जमा करू शकले.
दरम्यानच्या झालेल्या निवडणुकीत शालश्रीफळ का दिली गेली नाही त्यांना आणि पक्षाला हेसुद्धा सांगा.

पगला गजोधर's picture

23 Sep 2017 - 7:24 am | पगला गजोधर

I Understand ...

चार्ली हार्पर

मार्मिक गोडसे's picture

23 Sep 2017 - 11:50 am | मार्मिक गोडसे

बाद झालेल्या नोटा जमा झाल्या म्हणजे मोहिम फसली हे कसे काय?

८ नोव्हे.२०१६ नंतर ३-४ लाख कोटी कागदाचे तुकडे होणार होते ना? नाही झाले म्हणजे मोहिम फसलीच म्हणायचे.

ज्यांनी ज्याप्रमाणात रिटन भरत आहेत तेवढे रुपये जमा करू शकले
जवळ जवळ बाद झालेल्या सगळ्याच नोटा बँकेत जमा केल्या गेल्या, म्हणजे काळ्या पैशाबाबत सरकारचा अंदाज चुकला असं म्हणायचं आहे का तुम्हाला?

दरम्यानच्या झालेल्या निवडणुकीत शालश्रीफळ का दिली गेली नाही त्यांना आणि पक्षाला हेसुद्धा सांगा
नोटाबंदीनंतर झालेल्या निवडणुका ह्या नोटाबंदी वर सार्वमत म्हणून घेतल्या होत्या का? निवडणुकांतील यश हाच निकष लावणार असाल तर गेली ६० वर्षे मागील सरकाराने कोणतेच अयोग्य काम केले नाही असंच म्हणायचे आहे का तुम्हाला?

पगला गजोधर's picture

23 Sep 2017 - 7:54 am | पगला गजोधर

लेखक महोदय, तुम्हारा जरा च्युक्याचं बरका .....

तिकडे सीमेवर जवान अहोरात्र खडा पहारा देत आहे, आणि तुम्ही असले लेख कसे काय लिहिता, असे मार्मिकीकरण करणे म्हणजे राष्ट्र द्रोह, तुम्ही लागलीच पाकिस्तानात चालू लागा....किंवा तुमच्या आरोग्यास लाभदायी मॉर्निंग वॉक तरी सुरू करा.

एवढा सैराट विकास झालेला तुम्हाला दिसत नाही का ? विकास नुसता पिसाटलाय....
इकडे भारताला महान राष्ट्र बनवण्याचा यज्ञात सहभागी व्हायचं सोडून, कुठं इंधन दरवाढ, बेरोजगारी, अर्थव्यवस्था अश्या शुल्लक गोष्टी उगळता हो ? देशद्रोही कुठले...

कोणी कोणी जुमलेबाजीला मतं दिलेली ? हात वर करा ....
कोणी कोणी गौरक्षणासाठी मतं दिलेली ? हात वर करा ....

कौटिल्या नंतर प्रथमच भारतवर्षाला एवढा अर्थतज्ञ कम कुटनीतिज्ञ कम राष्ट्रभक्त नेतृत्व मिळालं ... अन अशी टीका तुम्ही करूच कसे शकता ?

एक सर्वसामान्य भारतीय नागरिक जेव्हा चहाविक्रेता ते
देशपातळीवरिल पदावर पोहोचू शकतो, तेव्हाच त्याला खरी लोकशाही म्हणतात, ....पण तुम्ही त्याच व्यक्तीवर अशी टीका करता तेव्हा तीच लोकशाही धोक्यात येते, हे तुमच्या बथ्थड टाळक्यात का येत नाही ?

नाखु's picture

23 Sep 2017 - 8:54 am | नाखु

वाटलं दसरा-दिवाळी निमित्ताने चकली भाजणी असेल मिपा गिरणीत, हे तर दर महिन्याला​ लागणारी ज्वारी आहे!

चला भाकरी "थापा"यला घ्या.
बुवा ,डांगे अण्णा खर्डा तयार ठेवा, ठेचा सुद्धा चालेल

अहो कसली दिवाळी अन कसले काय... पंतप्रधानपद घराण्याबाहेर गेल्याने सुतक आले आहे.

बादवे - तुम्ही एनाराय आहात का..? त्या सगळ्या एनाराय लोकांच्यामुळे स्वातंत्र्य मिळाले म्हणे. मंगल पांडे, चापेकर बंधू वगैरे सोयीची नांवे नव्हती म्हणे. असो.. आपण जरा कांही बोलले की असहिष्णुता वाटते आणि लोकं आयडीवापसीचा गेम सुरू करतात.

पगला गजोधर's picture

23 Sep 2017 - 10:55 am | पगला गजोधर

ओह माय गोडसे.....
सहिष्णू राष्ट्रभक्त स्वातंत्रसेनानी, निवडक व हाताच्या बोटांवर मोजण्याइतके अल्पसंख्य असतानाही,
तुमच्या कडून परमपूज्य गोळवलकर व प्रातःस्मरणीय गोडसे,
यांचा अनुल्लेख व्हावा, यासारखे दुर्दैव ते काय या हिंदुराष्ट्राचे....
हंत हंत

मोदक's picture

23 Sep 2017 - 11:06 am | मोदक

सहिष्णू राष्ट्रभक्त स्वातंत्रसेनानी, निवडक व हाताच्या बोटांवर मोजण्याइतके अल्पसंख्य असतानाही,

व्वा.. कमाल कौतुक वाटते या विचारधारेचे.

मोगलांविरूद्ध....सॉरी हां.. तुमच्या आलमगीर महामहीम औरंगजेब बादशहाशी लढलेले शिवाजी महाराजही या न्यायाने अल्पसंख्याक होते. मग हाच नियम लावणार का तिथेपण..?

बाकी एकाच घराण्याची पाद्यपूजा, प्रातःस्मरण कोण करत आहे हे उघड होईल इतकाही पक्षपात दाखवू नका.. नै कसे आहे, उद्या २०१९ च्या वेळी असहिष्णुता आणि हिंदूद्वेषाचा अजेंडा राबवण्यापूर्वीच बुरखा फाटायचा तुमचा.

:)

पगला गजोधर's picture

23 Sep 2017 - 11:13 am | पगला गजोधर

सहमत, बरोबर आहे तुमचे. I understand.

पगला गजोधर's picture

23 Sep 2017 - 11:11 am | पगला गजोधर

कॉकेशस पर्वतराजीतुन आलेले NRI असोत, किंवा ग्रीस समद्रातून आलेले गौरांग निलाक्ष NRI असोत, सर्वांचेच आधुनिक भारताच्या स्वातंत्रात प्र/अप्र योगदान आहेच, तरीही तुम्ही असे मार्मिक लेख का लिहिता ??

मोदक's picture

23 Sep 2017 - 11:17 am | मोदक

सहमत.. बरोबर आहे तुमचे.

सुखीमाणूस's picture

27 Sep 2017 - 6:59 am | सुखीमाणूस

नक्की ना? कारण ते स्वतन्त्रता सन्ग्रामात नव्हते तर ब्रिटिशान्चे हेर/हुजरे होते म्हणे.
आणि जे भाजपा उच्चवर्णिय स्वातन्त्रलढ्यात होते ते काहि देशप्रेमामुळे नव्हे तर त्यान्च्या वैयक्तिक स्वार्थामुळे!!

कस आहे बर का, स्वातन्त्र्य आले फक्त एका पक्शामुळे आणि तो पक्श सुखनैव राज्य करत होता इतकी वर्ष!! सर्व धर्म सुखात नान्दत होते. देश प्रगतिपथावर होता.
ते बाहेरुन आलेले NRI पण हळुहळु देश सोडुन चालले होते. उगिच मोदि आले.

कॉकेशस पर्वतराजीतुन आलेले NRI असोत..........<<<<<
BTW मोदी या category मधले की मुलनिवासी??

पगला गजोधर's picture

27 Sep 2017 - 9:15 am | पगला गजोधर

BTW मोदी या category मधले की मुलनिवासी??

मोदीजीही होते का ? स्वतंत्र लढ्यात योगदान द्यायला ???
वा वा चान चान, मला तर माहीतच नव्हतं.

पगला गजोधर's picture

27 Sep 2017 - 9:27 am | पगला गजोधर

मोदीजी, NRI की मूलनिवासी ? असा प्रश्न एका भारतीय मतदाराला कसा पडू शकेल ? मी वरील एका प्रतिसादात उल्लेखल्या प्रमाणे, परत सांगतो,
मोदीजी घरी आपल्या वृद्ध मातोश्रीना एकटे ठेवून, जगाचा नकाशा पिंजून काढण्याचा वनवास भोगताना, त्यांना जननी जन्मभूमीचा विरह, वर्ष्यातले कित्येक महिने सहन करावा लागतो.
एवढा प्रदीर्घ कालावधी ते परदेशी फक्त देशकल्यानासाठी व्यतीत करत आहेत.....
तर लागले लगेच कुशंका व्यक्त करायला , की म्हणे NRI की मूलनिवासी ....
अशी शंका येतेच कशी ???

सुबोध खरे's picture

27 Sep 2017 - 9:41 am | सुबोध खरे

स्वातन्त्र्य आले फक्त एका पक्शामुळे आणि तो पक्श सुखनैव राज्य करत होता इतकी वर्ष
भारतात हा पक्ष होता हो
पण १९४६ मध्ये सीरियाला
१९४७ मध्ये भारताबरोबरच श्रीलंका आणि म्यानमारला
१९४६ मध्ये थायलंड कोरिया भूतान इंडोनेशिया कंबोडिया अल्जेरिया
यांनाही स्वातंत्र्य मिळालं. तिथे हि बहुतेक हेच एन आर आय च असतील स्वातंत्र्य लढा लढायला.
तिथे पण त्या पक्षा चंच राज्य असणार ६५-७० वर्षे.
केवळ "आमच्या" मुळेच स्वातंत्र्य मिळालं असा दुष्प्रचार ७० वर्षे चालवला होता सत्तेसाठी.
जसे काही नेताजी सुभाष बाबू किंवा स्वा . सावरकर क्रांतिसिंह नाना पाटील भुरटे चोरच होते.
स्वतः ला फायद्याचा इतिहास शिकवलं गेला.
छत्रपती श्री शिवाजी महाराजांना "चुकलेला देशभक्त" म्हणणारे लोक हे.

भंकस बाबा's picture

3 Oct 2017 - 1:27 am | भंकस बाबा

यांच्याकडे मणिशंकर अय्यर, डॉग्गीराजा आणि खुद्द पप्पू अशी महान पात्रयोजना आहे , साल्यानी भारतीय राजकारणातील शोले बनवून ठेवला असता .
नेहरूंच्या शिवाजी राजाच्या अशा उल्लेखाबद्दल तर पायताण काढावसं वाटतं

मार्मिक गोडसे's picture

23 Sep 2017 - 12:11 pm | मार्मिक गोडसे

अहो कसली दिवाळी अन कसले काय... पंतप्रधानपद घराण्याबाहेर गेल्याने सुतक आले आहे.

ह्यापूर्वी पंतप्रधानपद घराण्याबाहेर कधीच गेलं नव्हतं का?

दिवाळीबद्दल म्हणत असाल तर बराच 'दारुगोळा' आयताच मिळतोय. कदाचीत येत्या १८ महिन्यात दारुगोळा फॅक्टरीतच फुटण्याची शक्यता आहे.

सरकारसाहेब's picture

23 Sep 2017 - 3:25 pm | सरकारसाहेब

अरे हो, आम्हाला पण शाळेत एवढंच शिकवलं गेलंय की मंगल पांडे, चाफेकर बंधू आणि तत्सम मंडळींनीच स्वातंत्र्य मिळवून दिलंय. बाकी नाना पाटील वगैरे स्वातंत्र्य मिळवण्यात मागच्याच बेंचवर असतील हं.

सुखीमाणूस's picture

27 Sep 2017 - 7:18 am | सुखीमाणूस

कारण आम्हाला शिवाजी महाराजान्चा इतिहास होता आणि स्वातन्त्र्य लढ्याचा इतिहास होता त्यात तर एवढेच शिकलो की स्वातन्त्र्य मिळाले ते फक्त गान्धिजीनमुळे जे महात्मा आणि राष्ट्रपिता होते आणि चाचा नेहरुन्मुळे.
नाना पाटीलानवर आख्खा धडा होता मराठी मधे.....
आणि बघाव तिथे Gandhi/Neharu Road/Institute/airport

दुस्वास करावा पण ........

मार्मिक गोडसे's picture

23 Sep 2017 - 12:01 pm | मार्मिक गोडसे

वाटलं दसरा-दिवाळी निमित्ताने चकली भाजणी असेल मिपा गिरणीत, हे तर दर महिन्याला​ लागणारी ज्वारी आहे!

पुढील १८ महिने भाकरीवर काढा.

बुवा ,डांगे अण्णा खर्डा तयार ठेवा, ठेचा सुद्धा चालेल
सध्या डांगे अण्णांचा 'बिगुल' जोरात वाजतोय, इथे 'नोटाबंदीभक्त' दातखिळीने हैराण झालेत. बिगुलचा आवाज त्यांना सहन होणार नाही, बहीरे होतील ते.

सध्या डांगे अण्णांचा 'बिगुल' जोरात वाजतोय, इथे 'नोटाबंदीभक्त' दातखिळीने हैराण झालेत. बिगुलचा आवाज त्यांना सहन होणार नाही, बहीरे होतील ते.

यात वुमन एम्पॉवरमेंट, ज्युपीटर वेलॉसिटी आणि एनाराय लॉजिक जोडा म्हणजे राहुलबाबा गांधीचे भाषण पूर्ण होईल.

मार्मिक गोडसे's picture

25 Sep 2017 - 8:15 am | मार्मिक गोडसे

यात वुमन एम्पॉवरमेंट, ज्युपीटर वेलॉसिटी आणि एनाराय लॉजिक जोडा म्हणजे राहुलबाबा गांधीचे भाषण पूर्ण होईल.
मुद्दे संपले की अंधभक्ताना असा अवांतराचा आजार होतो, तुम्हीही त्याला अपवाद नाही.

अरेरे, दुखरी नस दाबली गेली काय? गेट वेल सून!!

मार्मिक गोडसे's picture

25 Sep 2017 - 8:35 am | मार्मिक गोडसे

अरेरे, दुखरी नस दाबली गेली काय? गेट वेल सून!!
हे आजार बळावल्याचे लक्षण आहे. लवकर उपचार करा.

मोदक's picture

25 Sep 2017 - 10:08 am | मोदक

२०१९ ला पप्पू कृपेने तुमच्यावर इलाज होईल अशी देवाजवळ प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो.

बालदिनाच्या शुभेच्छा. :)

मार्मिक गोडसे's picture

25 Sep 2017 - 10:25 am | मार्मिक गोडसे

आजच्या फार्मासिस्ट दिनाच्या मुहूर्तावर औषधोचार सुरू करा.

पगला गजोधर's picture

23 Sep 2017 - 10:13 am | पगला गजोधर

नवीण राष्ट्रभक्त घराणेशाहीला नजर न लगा देना मुए ...

मोदक's picture

23 Sep 2017 - 10:23 am | मोदक

पोगो कमी खेळा.. किंवा उपाध्यक्षांना जास्ती फॉलो करू नका.

पगला गजोधर's picture

23 Sep 2017 - 10:49 am | पगला गजोधर

I understand...

अभिनंदन..! चुकीचे का असेना पण कुठेतरी सुरूवात होणे महत्वाचे आहे.

पगला गजोधर's picture

23 Sep 2017 - 11:04 am | पगला गजोधर

सहमत, बरोबर आहे तुमचे. I understand.

मार्मिक गोडसे's picture

23 Sep 2017 - 12:14 pm | मार्मिक गोडसे

किंवा उपाध्यक्षांना जास्ती फॉलो करू नका.

हे त्या अंधभक्तांना सांगा. तेच जास्त फॉलो करत आहेत.

काँग्रेसच्या गोटात उपाध्यक्ष हा एकमेव भाजपचा हितचिंतक आहे म्हणून फॉलो करत असतील. ;)

सिंथेटिक जिनियस's picture

23 Sep 2017 - 10:14 am | सिंथेटिक जिनियस

छान लेख .

इरसाल's picture

23 Sep 2017 - 10:56 am | इरसाल

कधी करताय ते १५/२० लाख जमा माझ्या अकाउंट्ला ?????????..........(पण छ्या तसं काही म्हटलेलं दिसत नाहीए, वर लिहीलेल्या भाषणाच्या तुकड्यात ).

पगला गजोधर's picture

23 Sep 2017 - 11:02 am | पगला गजोधर

होय, पण वरील भाषणात म्हटलेल्याची, पुर्ती भाषांकर्त्याने ऑल रेडी केलेली असूनही असे धागे काढून लेखक लोकशाही/राष्ट्रभक्तीवर भुंकतोय.

अभ्या..'s picture

23 Sep 2017 - 12:01 pm | अभ्या..

नोटाबंदी सक्सेस झालीय.
मला सारस्वत बँकेकडून गो कॅशलेस मध्ये १००० रुपये रिवॉर्ड मिळाले.

मालोजीराव's picture

25 Sep 2017 - 11:59 am | मालोजीराव

होय तुफान सक्सेस , मला HSBC ने १००० रुपयांचं अमेझॉन गिफ्ट कार्ड दिलं ... नंतर १० मिनिटांनी PMO मधून SMS आला कि "हा पयला हप्ता १५ लाखापैकी बरंका "

पगला गजोधर's picture

25 Sep 2017 - 12:23 pm | पगला गजोधर

HSBC म्हणजे हाँगकाँग शांघाय बँक ऑफ कॉमर्स, (अश्या चायनीज) संस्थेने नोटबंदी यशस्वी व्हावी म्हणून गिफ्ट कार्ड वाटले....

अरेरे, भक्तांपेक्षा, चायनीज जास्त सिरीयस प्रयत्न करत आहे की काय ? नोटबंदी यशस्वी व्हावी म्हणून......

सध्याचं PMO व ही चायनीज बँक यांच्यात चांगलंच कोओर्डीनेशन दिसतंय ......
नै लगेच एस एम एस आला म्हणून वाटलं ....

मालोजीराव's picture

25 Sep 2017 - 12:30 pm | मालोजीराव

पुढचा हप्ता संत तांबडेबाबा सहकारी बँकेतून सुद्धा येऊ शकतो

मालोजीराव's picture

25 Sep 2017 - 12:30 pm | मालोजीराव

पुढचा हप्ता संत तांबडेबाबा सहकारी बँकेतून सुद्धा येऊ शकतो

पगला गजोधर's picture

25 Sep 2017 - 1:09 pm | पगला गजोधर

भावा सहकारी बँकेतून कसा येईल ?
.
सहकारी बँकांची तर बुचं लावून ठेवली होती ना ???

आजही शेतकरी, कष्टकरी ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे नोटाबंदीमुळे अतोनात हाल होत आहेत.

. नोटाबंदी कशी फसली हे सांगणार्या प्रत्येक लेखामधले हे पालुपद. जवळपास 1 वर्षानंतर सुद्धा या लोकांचे होणारेअतोनात हाल जर संपलेले नसतील तर आतापर्यंत या लोकांनी ऊठाव,आंदोलन, जाळपोळ, रेलरोको, चक्काजाम या पैकी काहितरी केले असते. पण आता पर्यंत तसे काही घडले नाही. यावरून या दाव्याचे फोलपण लक्षात येते. मी नोटाबंदी चा समर्थक आहे तेंव्ह एवढेच सांगू ईच्छीतो ........समझनेवाले समझ गये है ना समझे वो अनाडी है ‍

गामा पैलवान's picture

23 Sep 2017 - 1:20 pm | गामा पैलवान

मार्मिक गोडसे,

ये जो चोर लुटेरोंके पैसे विदेशी बँकोमे जमा है ना उतने भी रुपये हम ले आये ना.. तो भी हिन्दुस्थान के एक एक गरीब अदमीको मुफतमे १५ -२० लाख रुपया यू ही मिल जायेगा..

मोदी प्रत्येक नागरिकाला १५ लाख रुपये मिळवून देणार आहेत म्हणून कोणी सांगितलं तुम्हाला? त्यांनी फक्त काळ्या पैशाचा दरडोई हिशोब सांगितला. मोदी भीक वाटंत नाहीत.

पप्पू आणि त्याच्या अवलादीला जनतेला भिकेला लावायचे डोहाळे लागलेत. म्हणून मी काँग्रेसला भिकारडी म्हणतो. लोकं भिकारी असतात हा काँग्रेसचा लाडका सिद्धांत आहे. मोदी काय पप्पूसारखी भीक थोडीच देणारेत? तो पक्का बनिया आहे. स्वत:चं स्वत: कमवून खावं असंच म्हणणार ना तो? आणि तेच बरोबर आहे.

आ.न.,
-गा.पै.

मार्मिक गोडसे's picture

23 Sep 2017 - 2:10 pm | मार्मिक गोडसे

मोदी भीक वाटंत नाहीत.

तेच भीक मागत आहेत. कशाला हवे त्यांना ते स्विस बँकेतील पैसे, जे आपले नाहीत त्याच्या मागे कशाला लागायचे आणि मुंगेरीलाल सारखे स्वप्न रंगवत बसायचे . कष्ट करून इथलाच काळा पैसा शोधता आला असता, पण नाही त्यांना विनाकष्ट ३-४ लाख कोटी हवे होते.

सुबोध खरे's picture

25 Sep 2017 - 3:21 pm | सुबोध खरे

स्विस बँकेतील पैसे, जे आपले नाहीत
मग कुणाचे आहेत हो?

द्वेष करायचा ठीक आहे पण म्हणून काहीही?