नमस्कार मंडळी!
'हिरवाईच्या गप्पा' ह्या सदाहरित धाग्यामध्ये स्वागत आहे. ह्या धाग्याचे प्रयोजन हे बागकाम, परसबागेतील शेती, सेंद्रिय खतनिर्मिती, सेंद्रिय आणि जैविक पद्धतीने कीडनियंत्रण, बर्ड-फीडर बनवणे, झाडांचे संगोपन इत्यादी विषयांवर चर्चा करणे हे आहे. येथे मिपाकरांना वरीलपैकी आणि इतरही हिरवाईशी संबंधित विषयांवर चर्चा करता येईल. प्रश्न विचारता येतील, उत्तरे देता येतील, माहितीची देवाणघेवाण करता येईल, आणि अर्थातच, आपल्या बागेचे फोटो टाकता येतील. साधारणपणे पन्नास प्रतिसाद अथवा दोन पाने भरली की कोणीही सदस्य नवीन धागा सुरू करू शकेल. सुरुवात करून देण्याकरिता पहिला धागा साहित्य-संपादक आयडीने काढत आहोत. (फोटो प्रकाशित करण्यास मदत हवी असल्यास निःसंकोचपणे संपर्क साधावा).
धन्यवाद!
- साहित्य-संपादक
प्रतिक्रिया
8 Sep 2017 - 6:16 pm | कंजूस
हो. फेसबुकवर चढवा>>full story>>view full size>>address bar मध्ये - scontent_fbcdn असलेली लिंक कॅापी करून ती इथे वापरा. फक्त width 480 (उभा फोटोसाठी) अथवा 640 ( आडव्या फोटोसाठी ) देणे. height रकाना रिकामा ठेवणे.

9 Sep 2017 - 12:08 am | एस
आता दुसरा भाग काढा कुणीतरी. माझ्या मोबाईलवर हा धागा लवकर उगवत नाही - आपलं ते, लवकर लोड होत नाही आता! ;-)
9 Sep 2017 - 12:08 am | एस
आता दुसरा भाग काढा कुणीतरी. माझ्या मोबाईलवर हा धागा लवकर उगवत नाही - आपलं ते, लवकर लोड होत नाही आता! ;-)
9 Sep 2017 - 2:53 am | पिलीयन रायडर
तो मान कंजूस काकांचा!!
9 Sep 2017 - 3:23 pm | कंजूस
दुसरा भागही सासं ने काढावा. ओपन सोर्स.
9 Sep 2017 - 4:16 pm | पिलीयन रायडर
ओके. मग तो मान एस भाऊंचा!!
3 Apr 2018 - 12:53 am | एस
पुढील भाग इथे आहे. (धाग्याला अनुक्रमणिका नसल्याने प्रतिसादात देत आहे.)
हिरवाईच्या गप्पा - भाग २
18 Aug 2020 - 4:45 pm | राजेंद्र मेहेंदळे
प्रतिक्रिया वाचताना बरीच माहिती मिळतेय.
सध्या पावसाळा चालु आसल्याने गॅलरीतील झाडांना मस्त फुले येताहेत. सवडीने फोटो टाकतो.