नमस्कार, मी आत्ताच यामाहा FZ नवी गाडी घेतली आहे, आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पुणे-रामेश्वरम-कन्याकुमारी असा फिरण्याचा मानस आहे,, पण मी एकटाच आहे, त्यामुळे मला काय काय खबरदारी घ्यायला लागेल? काय अडचणी येऊ शकतात? आपल्यापैकी जर कुणी जाऊन आले असेल तर सांगा...
मला चांगला प्लॅन करता येईल..
प्रतिक्रिया
7 Jul 2017 - 3:51 pm | मुक्त विहारि
असो,
भारतात शक्यतो स्वतः गाडी चालवू नये, अगदीच गरज असेल तर गोष्ट वेगळी, असे आमचे मत.
भटकंतीला शुभेच्छा.
7 Jul 2017 - 4:35 pm | मोदक
मुविकाका, नकारात्मक मत स्वत:जवळ ठेवणे जमत असेल तर तसा प्रयत्न करून बघायला हरकत नाही असे सुचवतो.
नै म्हणजे काय आहे.. जिथेतिथे तुमच्या मागच्या जन्मीच्या पापांचा उद्धार वाचून कंटाळा आला आहे. बाकी काही नाही.
7 Jul 2017 - 4:45 pm | मुक्त विहारि
काळजी युक्त आहे....
लांबच्या प्रवासाला सुयोग्य रस्ते आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करणारे वाहनचालक, ह्या कुठल्याही प्रवासाला अत्यावश्यक गोष्टी....त्या जर नसतील तर प्रवास आनंददायी होत नाही.
परवाच नाशिक रोडवर खड्ड्यांच्या मुळे अपघात झाला.
असो,
सत्य स्वीकारा, धोके टाळा.
8 Jul 2017 - 12:37 pm | जेम्स वांड
हे सगळे सापडेल असे एक ठिकाण ह्या पूर्ण धरातलावर दाखवून देता का एखादं? अन असेलच असली जागा तर तिचा पत्ता द्या, शिवाय जिथे हे सगळे म्हणजे गुळगुळीत रस्ते, आज्ञाधारी अन नियमपालक वाहनचालक आहेत, तिथे अकॅसिडेंट्स अजिबात होत नसतील नाही का? होत असले तर का होतात म्हणे?
8 Jul 2017 - 2:12 pm | मुक्त विहारि
साधा मुंबई-पुणे हायवे घ्या.
रस्ता खरोकरच उत्तम आहे.सुयोग्य स्पीडने म्हणजे ८० किमी प्रति तासने जरी आपण गाडी चालवत असलो तर अपघात व्हायला नको.
पण कारच्या लेन मध्ये ट्रक वाला येणे, डाव्या-उजव्या साईअडचा इंडीकेटर न दाखवता सरळ लेनची शिस्त मोडणे, ह्या ड्रायव्हर लोकांच्या कायदे मोडण्याच्या प्रवृत्तीमुळे अपघात होणारच.
अर्थात,
पुण्या बाहेरचे जगच जर माहीत नसेल तर.....(आखाती देशातील नियमांचा तुम्हाला अंदाज नसेलच आणि मग नॉर्वे, स्वीडन, हॉलंड, ह्या देशांबाबत तर बोलायलाच नको.) त्याला आम्ही तरी काय करणार?
असो,
ह्या धाग्यावरच न्हवे तर इतर धाग्यांवर पण तुम्हाला प्रतिसाद देणार नाही. कारण तुमचे आणि आमचे संबंध फार जूने दिसतात. तुम्हाला माझ्या बरोबर हकनाक वाद घालायला वेळ आहे, मला तुमच्या बरोबर वाद घालायला वेळ नाही....
8 Jul 2017 - 3:32 pm | जेम्स वांड
भटकंती जाहिराती नंतर बघू, अगोदर मुद्द्याचे बोला, ते आखात फाकात अन स्वीडन फीडन आवरा अन त्याच ठिकाणी अपघात होत नाहीत का ते सांगा पाहू महामहिम? होत असले तर पूर्ण जगात कुठंही अकॅसिडेंट होतातच म्हणून गाडी चालवूच नये असं म्हणाल का?
असो,
..
तुम्ही आम्हाला कोण समजता हे मनीचे खेळ तुमचे तुम्हाला लखलाभ, तुम्ही स्वतःला जास्तच महत्वाचं समजू नये इतःपर मी काही बोलूही इच्छित नाही, बाकी तुमच्याकडे वेळ आहेच हो, मुद्दे नाहीत हे कबूल करायची इच्छा नसावी फक्त.
15 Jul 2017 - 8:16 am | स्थितप्रज्ञ
जसे
-कुठलाशा कारणाने झोपमोड होते म्हणून झोपूच नये
-मेस वाला स्वयंपाकी भाज्या आळणी बनवतो म्हणून जेवूच नये
-पावसाळ्यात पाणी गढूळ येते म्हणून पाणी पिऊच नये
-पोहायला शिकताना बुडायची भीती असल्यामुळे पोहूच नये
तसेच नियमांचे काटेकोरपणे पालन करणारे चालक नसल्यामुळे प्रवास करूच नये.
7 Jul 2017 - 5:31 pm | मुक्त विहारि
जिथेतिथे तुमच्या मागच्या जन्मीच्या पापांचा उद्धार वाचून कंटाळा आला आहे. बाकी काही नाही.
ह्या लेखावरील, माझ्या प्रतिसादात तर मी कुठेच हा उल्लेख केलेला नाही.
तुमचा प्रतिसाद, "कोहणहकहर मधल्या लेटर लायटर सारखा करमणूक प्रधान आहे.त्यांनी सशे गुरुजींना दंडवत घातले आणि तुम्ही पण...."
असो,
तुम्ही स्वतः सायकलने प्रवास करता, तुम्हाला पण खराब रस्त्यांचा आणि नियम न पाळणार्या वाहनचालकांचा तुम्हाला अनुभव आलाच असेल.
नसेल आला तर तुम्ही खरोखरच भाग्यवान. आम्ही एस.टी. तून साधे आरवली ते चिपळूणला जरी गेलो तरी एक २-४ अपघात जराशा अंदाजाने वाचलेले रोजच अनुभवले आहेत.
एस.टी.चे चालक फारच कुशलतेने ड्रायव्हिंग करतात असा माझा अनुभव आहे.
7 Jul 2017 - 8:09 pm | मोदक
असो..!
7 Jul 2017 - 9:08 pm | मुक्त विहारि
अर्थात, मुद्दे संपले किंवा मूद्दे खोडल्या गेले की किंवा अज्ञान उघडकीस आले की, पुणेकर असेच प्रतिसाद देतात....
त्यामुळे....असोच......
7 Jul 2017 - 10:59 pm | मोदक
हरकत नाही. भारतात मूलभूत ज्ञानाचा दुष्काळ आहे असे समजा. :)
8 Jul 2017 - 7:22 am | मुक्त विहारि
असो,
8 Jul 2017 - 4:46 pm | उपेक्षित
मुवि काका आता खरच बास करा आणि स्वतः चे हसे करून घेऊ नका ( तुमच्याबद्दल आणि तुमच्या वयाबद्दल आदर आहे म्हणून मनापासून सांगतोय हे)
तुमचे बालिशपणे सगळीकडे पुणे-मुंबई वादाचे टूमणे आता खरच इरीटेट व्हायला लागले आहे तुमच्या नवीन निरर्थक धाग्यान्सारखे
जाता जाता - कुठे नेऊन ठेवलेत ते पूर्वीचे (थोडे) परिपक्व मूवी ;)
8 Jul 2017 - 9:49 pm | मुक्त विहारि
प्रवृत्तीचा आहे....
मुळात जे लिहिलेच नाही त्याला मोदकाने सुरुवात केली.....
अनावश्यक वाद सुरु करणे आणि उगाचच एखाद्याला टार्गेट करणे. ह्याला आम्ही तरी पुणेकरी प्रवृत्ती समजतो.
असो,
10 Jul 2017 - 1:03 pm | मोदक
माझा आक्षेप कळाला नाही..? का मी पुण्यात राहतो म्हणून तुम्हाला आक्षेप कळवून घ्यायचा नाहीये..?
11 Jul 2017 - 11:59 am | उपेक्षित
अनावश्यक वाद सुरु करणे आणि उगाचच एखाद्याला टार्गेट करणे. ह्याला आम्ही तरी पुणेकरी प्रवृत्ती समजतो. >>>>>>>>>>>>>
याला स्वतः ची लाल (विशालभाऊ कुलकर्णी यांच्या भाषेत स्वतः ची इस्टमन कलरची करून घेणे ) असे म्हणतात.
या वाक्यातून तुमची वृत्ती समजली आहे पूर्णपणे त्यामुळे उरलासुरला आदरसुद्धा निघून गेला असो होते ते चांगल्यासाठीच होते.
keep it up काका
21 Jul 2017 - 3:49 pm | विजुभाऊ
बाईकवरचे बिर्हाड हे पुस्तक वाचा. पुण्यातल्याच एका पठ्ठ्याने बुलेट वरुन एकट्याने पुणे ते लड्डाख अशी ट्रीप केली त्याचे अनुभव लिहीलेत. त्या अगोदर त्याने ट्रायल म्हणून पुणे ते गोवा अशी एक ट्रायल ट्रीप केली होती.
बाय द वे तुम्ही कोणती बाईक नेणार आहात.
21 Jul 2017 - 6:11 pm | राहुल करंजे
Yamaha FZ१50
7 Jul 2017 - 5:36 pm | मोदक
आत्ताच म्हणजे जुन महिन्यात गाडी घेतली आहे म्हणजे किमान दोनदा सर्विसिंग होईल असे गृहीत धरत आहे - हे होणार नसेल तर तुमचे गणित चुकत आहे असे समजा.
तुम्ही एकटेच शक्यतो जाऊ नये असा पहिला सल्ला असेल. सोबत कोणीतरी असावे आणि तुमच्या गाडीच्या मागच्या सीटकडे बघता; सोबती दुसर्या गाडीवरच असेल याची काळजी घ्या.
तुम्हाला सोबत लागणार आहेतच अशा वस्तू
१) आर्मर जॅकेट
२) चांगल्या प्रतीचे हेल्मेट
३) ग्लोव्हज, चांगला फेस मास्क, गॉगल वगैरे
४) तुमची गाडी ट्युबलेस असली तरीही त्याचे पंक्चर कीट
५) एका बाटलीत १ लिटर पेट्रोल
६) गुडघा कव्हर करणारे गार्ड.
दिवाळीची सुट्टी किती दिवस आहे..? त्यानुसार तीन प्लॅन सांगेन. हे सर्वसाधारण प्लॅन आहेत. (मी सध्या यावरच काम करत आहे)
तसेच पहिल्या दिवशी हाफिस संपवून संध्याकाळी ४ ला निघून कोल्हापूर गाठणे असा प्लॅन आहे.
***** पहिला प्लॅन ********
1 - Pune to Kolhapur - 250 KM
2 - Kolhapur to Hosur - 659 KM
3 - Hosur to Aurovile - 272 KM
4 - Aurovile to Aurovile - 0 KM
5 - Aurovile to Rameshwaram - 114 KM
6 - Rameshwaram to Kanyakumari - 455 KM
7 - Kanyakumari to Kanyakumari - 309 KM
8 - Kanyakumari to Alleppy - 243 KM
9 - Alleppy to Alleppy - 0 KM
10 - Alleppy to Mangalore - 461 KM
11 - Mangalore to Ganpati Pule - 630 KM
12 - Ganpati Pule to Pune - 287 KM
***** दुसरा प्लॅन ********
1 - Pune to Kolhapur - 250 KM
2 - Kolhapur to Hosur - 659 KM
3 - Hosur to Rameshwaram - 531 KM
4 - Rameshwaram to Kanyakumari - 455 KM
5 - Kanyakumari to Kanyakumari - KM
6 - Kanyakumari to Kanyakumari - KM
7 - Kanyakumari to Alleppy - 243 KM
8 - Alleppy to Alleppy - 0 KM
9 - Alleppy to Alleppy - 0 KM
10 - Alleppy to Mangalore - 461 KM
11 - Mangalore to Ganpati Pule - 630 KM
12 - Ganpati Pule to Pune - 287 KM
***** तिसरा प्लॅन ********
1 - Pune to Munnanur - 656 KM
2 - Munnanur to Srisailam - 75 KM
3 - Srisailam to Aurovile - 622 KM
4 - Aurovile to Aurovile - 0 KM
5 - Aurovile to Rameshwaram - 114 KM
6 - Rameshwaram to Kanyakumari - 455 KM
7 - Kanyakumari to Kanyakumari - 309 KM
8 - Kanyakumari to Alleppy - 243 KM
9 - Alleppy to Alleppy - 0 KM
10 - Alleppy to Mangalore - 461 KM
11 - Mangalore to Ganpati Pule - 630 KM
12 - Ganpati Pule to Pune - 287 KM
यातला कोणता प्लॅन सोयीचा आहे सांगा. हे प्रवासाचे १२ टप्पे दिले आहेत १२ दिवसातच हा प्रवास आखा असे सांगणार नाही. या सगळ्या प्लॅनला किमान १५ ते १८ दिवस लागतील.
तसेच.. या प्रवासात अॅलेप्पीला २ दिवस मुक्काम हा नेहरू ट्रॉफी बोट रेस च्या अनुषंगाने ठेवला होता. पण मला यावर्षी जमणार नाहीये.
रामेश्वरम मदुराई प्रवासाबद्दल पिराची मिपावरच सुंदर लेखमाला आहे.. ती नक्की वाचा.
9 Jul 2017 - 1:32 pm | राहुल करंजे
माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार..
त्यामध्ये जे नवीन जटायू नेचर पार्क झालंय, ते कसे समाविष्ट करता येईल?म
9 Jul 2017 - 2:39 pm | राहुल करंजे
अंदाजे सर्व खर्च किती येऊ शकतो?म
10 Jul 2017 - 11:27 am | मोदक
खर्च तुम्ही कोणत्या ठिकाणी मुक्काम करता यावर अवलंबून आहे.
मी खादाडी आणि वस्तू खरेदी मध्ये कोणतीही तडजोड करत नाही मात्र मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छ ठिकाण आणि गरम पाणी इतकीच सोय बघतो. त्यामुळे खर्चाचा नेमका असा हिशेब सांगता येणार नाही.
सर्वसाधारणपणे गाडीचे ३० च्या माईलेजने पेट्रोल आणि दर दिवशी मुक्कामाचे १००० रू असा ढोबळमानाने खर्च पकडा. खाणे आणि खरेदीचा अंदाज तुमच्या मनानुसार लावा.
10 Jul 2017 - 11:58 am | विशुमित
हाच प्रवास मी NXG स्प्लेंडर ( १०० cc ) करू शकेल का?
ह्या गाडीवर मी बराच वेळा एका दिवसात पुणे ते सांगली आणि रिटर्न असा ४५०-५०० किमी चा प्रवास खूप वेळा केला आहे. पुणे तो धारवाड आणि रिटर्न कोल्हापूर असा पण प्रवास ३-४ वेळा केला आहे. गाडी ने अद्याप तरी धोका दिला नाही.
जो टाईम टेबल तुम्ही दिला आहे त्याच्यात आणखी ३-४ दिवस एक्सट्रा लागले तरी काही हरकत नाही.
विशेष काळजी काय घेतली पाहिजे कृपया त्याचे मार्गदर्शन करा.
10 Jul 2017 - 1:33 pm | मोदक
आरामात करू शकता. उत्तरायणसाठी पुणे बडोदा हा प्रवास मी पॅशन प्लसवर केला होताच.
पॅशनव किंवा स्प्लेंडरचा बुलेटच्या किंवा इतर मोठ्या गाड्यांच्या तुलनेत जाणावणारा तोटा म्हणजे या गाड्या ६० च्या वर पळवता येत नाहीत*. त्यामुळे थोडा अधिक वेळ सोबत असेल तर बिन्धास्त घुमवा.
आपला मनराव आणि त्याचा एक मित्र होंडा शाईनवरून १६ दिवस दक्षिण भारत फिरून आला आहे.
१९८२ साली ५ जणांनी लुनावरून गुजरात ते मेघालय आणि नंतर जम्मू ते कन्याकुमारी असाही प्रवास केला होता.
त्या तुलनेत सध्याचे रस्ते आणि सोयी खूपच भारी आहेत. बिन्धास्त फिरा..!!
(*पळतात पण रडत रडत पळतात आणि ७० / ८० च्या वेगाने सतत चालवल्याने या गाड्यांच्या इंजिनचे नुकसान होईल असे वाटत राहते म्हणून जास्तीत जास्त ६० चा वेग.)
10 Jul 2017 - 2:26 pm | विशुमित
किती हि गडबड असू देत मी ६०-७० च्या वर वेग जाणार नाही याची नेहमी पुरेपूर काळजी घेत असतो. तिकडे दुनियेला आग का लागली असेना पण मी माझे स्पीड बदलत नाही.
बघू कसा प्लॅन बनवता येतो तो.
11 Jul 2017 - 12:02 am | सुबोध खरे
विशुमित जी
100 cc गाड्या या साधारण जास्त मायलेज देण्यासाठी बनवलेल्या असल्यामुळे त्यांचे टायर हे अरुंद असतात त्यामुळे त्यांची रस्त्याची पकड कमी असते आणि 60 च्या वर वेगाने गेल्यास त्यांचे ब्रेकिंग अंतर वाढते. यामुळे 60 च्या वर वेग नेल्यास या गाड्या सहजपणे घसरतात. यामुळेच बुलेट सारख्या अवजड आणि रुंद तयार असणाऱ्या गाड्यावाले सुद्धा सहसा 80 च्या वर वेग नेत नाहीत
आणि पाऊस पडला असेल तर हा वेग 45 पर्यंत खाली आणावा. लांबच्या प्रवासात मधेच अपघात झाला तर संपूर्ण सहलीचा विचका होतो. एवढा वेळ हाताशी ठेवून सहलीचे आयोजन करावे.
11 Jul 2017 - 8:29 pm | आर्बि२३९९
ह्या सर्व प्लॅन्स मध्ये एक कॉमन गोची आहे असे मला वाटत आहे.
केरळ मधली distances दिवसाला मॅक्स २५० च्या वर नाही जाऊ शकत असा माझा स्वतःचा अनुभव आहे (१० तास रायडींग ) . एक तर केरळ राज्य नसून एक मोट्ठे शहर आहे (कन्नूर पर्यंत तरी) अन त्यात ९०% रस्ते २ लेन चे आहेत . दिवसभर रस्त्यावर समस्त जनता असते अन लै वैताग येतो बाईक /कार चालवताना :(
ह्यात मी तुमचे detours धरत नाही आहे (पेरियार किंवा मुन्नार )
अर्थात तुम्ही नशीबवान असाल अन एखादा फ्लॅश strike असेल तर मग मज्जा हाय .समदा रोड तुमच्यासाठी मोकळा :-)
7 Jul 2017 - 10:03 pm | कंजूस
लेख तांत्रिक सल्ला अधिक पर्यटन अधिक एकट्याने (सोलो) अशा तीन अंगांवर बेतलेला आहे.आणखी एक त्यात येऊ दे ते म्हणजे प्रयोजन॥ उदा मोदकने दिलेले अमुक दिवशी बोट रेसला हजर राहाणे.
वारंवार पर्यटन म्हणून प्रवास करायचा तर एकटे जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. मग ते बाइक/साइकल/ट्रेकिंग माध्यम काहीही असो.
मला एक नेहमीच शंका येते की बाइकवर जाणारे कॅम्रा,पैसेसहित कपडे वगैरेची बॅग कुठे ठेवतात? लेह -मनालीला मोठे ग्रुप जाताना एक ट्रक हाइअर करतात. पण बाकीचे मोठा डोलारा मागच्या सीटवर बांधतात. एकट्याला हे सामान संभाळायची जबाबदारीही असते. नवीन प्रतिसाद काय येतात पाहू .रेल्वे बसने जाताना ही काळजी कमी होते.
कन्याकुमारीला २०१० सालचे सूर्यग्रहण पाहायला एकट्याने जावे लागले होते. त्याला जोडून पाच दिवसाचे केरळही झाले.
* दहाबारा आधारकार्ड झेरॅाक्स अगोदरच ठेवा. ओरिजिनल इलेक्ट्रिक बिल/टेलिफोन बिल लागेल.
* हॅाटेल रजिस्टरमध्ये तुमचा हातातला मोबाइल नंबर अधिक पुण्यातला एकाचा घरचा नंबर लिहित जा. हॅाटेलचे कार्ड घेऊन लगेच त्यातल्या एका नंबरला मिस कॅाल देऊन पाहा.
काही कारणाने कुठे परत फिरावे लागले तर लगेच कॅाल करून मदत/रुम मिळवता येते
7 Jul 2017 - 11:36 pm | मोदक
वारंवार पर्यटन म्हणून प्रवास करायचा तर एकटे जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. मग ते बाइक/साइकल/ट्रेकिंग माध्यम काहीही असो.
एकटे जाणे / कंपनी नसणे हा एक तोटा असतो.. यातला फायदा म्हणजे आपण आपल्या मनाचे राजे असतो. आपल्या मनानुसार प्लॅन बनवायचा आणि भटकायचे.
(मी नवीन ठिकाणी भटकताना त्या त्या गावात पुस्तके आणि कुंभारवाडे शोधत फिरतो.. सोबत कोणी असले तर हे शक्य होत नाही)
बाइकवर जाणारे कॅम्रा,पैसेसहित कपडे वगैरेची बॅग कुठे ठेवतात?
सॅडल बॅग असते.. गाडीच्या मागच्या सीटच्या दोन्ही बाजूंना ही बॅग बांधलेली असते. पैसे, कॅमेरा आणि अत्यंत महत्वाच्या वस्तूंसाठी एक छोटी सॅक पाठीवर ठेवायची.
8 Jul 2017 - 12:22 am | सुबोध खरे
एक अनाहूत सल्ला
एवढी लांबची सहल करण्याअगोदर प्रथम एक एक दिवसाची मग दोन दिवसांची आणि एक चार दिवसांची( दोन दिवस जाणे आणि दोन दिवस येणे) सहल करून पाहा. सतत चार दिवस मोटर सायकल चालवून किती त्रास होतो ( मानसिक आणि शारीरिक) हे अजमावून पहा. त्याने तुमचे आणि मोटार सायकलचे एकमेकांशी सूत जमवण्यासाठी फार मदत होते. जर तुमहो चार दिवसांची सहल उत्तम एन्जॉय केली तर तुम्ही कितीही दिवस एकटे फिरू शकाल.
8 Jul 2017 - 4:51 pm | उपेक्षित
उत्तम सल्ला,
आंबोली / वरंधा घाट वगेरे एकदा (कमीतकमी) जाऊन या सरावासाठी.
8 Jul 2017 - 5:53 am | एस
सर्वच उपयुक्त सल्ले आहेत. एकट्याने शक्यतो फिरू नका. अजून एकजण तरी बघा सोबतीला. आणि एका गाडीवर एकच जण हा नियम कटाक्षाने पाळा. सॅडलबॅग फार उपयुक्त ठरते. आणि मौल्यवान वस्तू व कागदपत्रे ही सदैव चोविस तास स्वतःकडे ठेवायची. सर्व प्रवास दिवसाढवळ्या पूर्ण करायचा.
8 Jul 2017 - 9:42 am | कंजूस
१)भटकायचा किडा चावला की स्वस्थ बसता येत नाही.
२)आपल्या सुट्ट्यंच्या सोयीने सोबती मिळत नाही.
३)त्याची आवडही जपायला हवीच कारण बरोबर जातोय.
४)एकदा सोबतीची सवय झाली की एकटे अशक्य होतं.
लेखकाला गाडी ( बाइक)ची सवय असणारच फक्त आता नवीन बदललेली असेल त्यावरून बिनिचा लांबचा प्रवास करायचा असेल. यासाठी बाइकवाले सल्ले देतीलच.
५)स्मार्टफोन स्क्रिन लॅाक ठेवतोच शिवाय त्याची बॅट्री लवकर उतरते. एक वेगळा बटणवाला फोन मोठी बॅट्रीवाला जवळ असावा त्यातून संपर्क नक्की होतो. दोन लेगळ्या कंपनीची सिम असावीत एक तरी चालू राहील.
8 Jul 2017 - 2:54 pm | दशानन
पण सोबत हेल्मेट नक्की घ्या!
8 Jul 2017 - 8:06 pm | सुबोध खरे
नुसतेच हेल्मेट घ्या असे नव्हे तर अतिशय आरामदायक हेल्मेट हे अतिशय महत्त्वाचे आहे लांबच्या सहलींसाठी.
जास्त वजनदार किंवा जास्त घट्ट असेल तर कानाला आणि डोक्याला वळल्याने डोके दुखू लागेल आणि फार सैल असेल तर उलट्या वाऱ्यात सारखे मागे पुढे होत राहून प्रवास त्रासदायक होतो. हेल्मेट ५०० रुपयापासून मिळतात. चांगल्या कंपनीचे आणि दर्जाचे हेल्मेट महाग पडेल परंतु एकंदर सुरक्षितता आणि त्याच्या दर्जामुळे ते शेवटी जास्त लाभदायक होते.
माणसे ५०-७५ हजार रुपयाची मोटार सायकल घेतात पण हेल्मेट बाबत काटकसर का करतात हे समजत नाही.
( काही लोक केवळ पोलिसाला दाखवण्यापुरते हेल्मेट विकत घेतात आणि ते बराच काळ डोक्याऐवजी डाव्या किंवा उजव्या आरशावरच असते) अशांची गोष्ट सोडून द्या.
8 Jul 2017 - 9:29 pm | दशानन
ह्या हेल्मेट याप्रकाराचा माझ्यापेक्षा जास्त उपयोग झालेला नग मला भेटला नाही आहे, तुमच्यासाठी एक लेख वर काढतो.
8 Jul 2017 - 8:07 pm | सुबोध खरे
कानाला आणि डोक्याला वळल्याने
कानाला आणि डोक्याला आवळल्याने
टायपो बद्दल क्षमस्व
8 Jul 2017 - 10:13 pm | अभिजीत अवलिया
चांगली कल्पना आहे. वरती मोदक आणि खरे साहेबानी चांगला सल्ला दिलेला आहेच.
कितीही चांगली गाडी चालवत असला तरी सकाळी झोप पूर्ण झाल्याशिवाय प्रवासास सुरवात करू नये तसेच रात्री काळोख पडल्यानंतर बाईकने प्रवास करू नका असे सांगेन. कारण अनोळख्या प्रदेशात रस्त्यांचा अंदाज नसतो.
9 Jul 2017 - 2:22 pm | राहुल करंजे
खूप खूप धन्यवाद, उपयुक्त अशी माहिती दिली सर्वांनी, मी हेल्मेट , हॅन्डग्लोज, नि पॅड यलबो गार्ड, जॅकेट, स्वेटर, मास्क ,गॉगल्स हे सर्व चांगल्या प्रतीचे घेऊन जाणार आहे, फ़क्त आता १२ दिवस आहे , हे सर्व बघून झाले पाहिजे असा प्लॅन तयार करावा लागणार आहे..
सोबतीला कुणीतरी पाहिजे-- सोबत येणारे कोणी नाही, एव्हढा मोठा प्लॅनिंग त्यामुळे होकार येत नाही,पण फिरण्याचा किडा मोठा
10 Jul 2017 - 8:36 pm | आर्बि२३९९
पुणे - कन्याकुमारी हा प्रवास बाईक वर लयी वेळा केला असल्याने माझे २ शब्द :-)
पुणे -- बंगलोर --मदुराई --रामेश्वरम --ECR --कन्याकुमारी असा जाताना अन
कन्याकुमारी -- -केरळ -कोस्टल कर्नाटक -- पुणे किंवा कन्याकुमारी --बंगलोर --पुणे असे परत येता येईल...
तयारी म्हणजे :
* उत्तम riding गियर -- नो compromise
* तुमची गाडी यामी आहे त्यामुळे reliability चा issue नाही :-) तरीपण गाडीच्या technicals ची जुजबी माहिती असणे उत्तम !!
* टायर्स tubeless असतील तर puncture रिपेअर किट बरोबर ठेवा
* चेन लुब is मस्ट !!! ओपन चेन असल्याने कितीही भारी मोटुल किंवा यामालूब वापरले तरी चेन ५०० kms मध्येच ड्राय होते अन मग चेन प्लस स्प्रॉकेट चे बूच बसते
* एखादे फ्युएल ऍडिटिव्ह पण असू दे (सिस्टिम-जी किंवा तत्सम). जिथे पेट्रोल ची क्वालिटी माहित नसेल तिथे हे ऍडिटिव्ह उपयोगी पडते
आता दिवसाला किती अंतर कापता येते हे ज्याच्या त्याच्या कॅपॅबिलिटी वर अवलंबून आहे पण
This is more about endurance than anything else !!!
ओव्हरऑल रस्त्याची कंडिशन बघता दिवसाला ६०० kms कापणे लयी सोप्पे आहॆ ,ट्रस्ट मी !
अजून काही माहिती हवी असल्यास जरूर सांगा :-)
10 Jul 2017 - 8:54 pm | मोदक
जरा वाईच फटू बिटू हैत का?
10 Jul 2017 - 9:32 pm | आर्बि२३९९
तिरुनेलवेली जवळ :

कन्याकुमारी :

कन्याकुमारी जवळ:

मरवंथे बीच
11 Jul 2017 - 2:36 pm | राहुल करंजे
१८ ते २९ October असे १२ दिवस आहेत, त्यानुसार
१७ ला संध्याकाळी निघून कोल्हापूर किंवा बेळगावी मुक्काम करणे, पुढे बंगळुरू- मदुराई-धनुष्यकोडी- कन्याकुमारी- अल्लेप्पी - जटायू नेचर पार्क-पेरियार- मुन्नार- उटी - म्हैसूर- बंगळुरू -पुणे असा प्रवास होणार आहे तर कुठे मुक्काम करायचा , कुठे काय बघायचे, कुठे दुपारच्या वेळी मंदिरे बँड असतात प्रवास कसा करायचा आणि शेवटी गाडीची काळजी कशी घ्यायची याची सविस्तर माहिती द्यावी ही नम्र विनंती..
10 Jul 2017 - 8:13 am | प्रविन ९
I am ready to come... Personal msg send please check
11 Jul 2017 - 2:38 pm | राहुल करंजे
९७६७५०३५२४ हा माझा नं आहे, येणार असेल तर फोन करा
10 Jul 2017 - 9:33 pm | खटपट्या
खूप छान धागा. हा धागा वाचून आता असे वाटू लागले आहे की मिपावरील सर्व अनुभवी बाइक स्वारांनी मिळून एक बाइक दौरा आखावा. ज्यांना शक्य असेल ते येतील.
11 Jul 2017 - 6:03 am | कंजूस
चला काम झाले. जाऊन आलेले,जाणारेही मिळाले
11 Jul 2017 - 7:39 am | मी कोण
नमस्कार मंड्ळी, मीही अनेक दिवसांपासुन हाच विचार करतोय्, एकट्याने जाण्याचा याच रुटवर.माझा अनेक राईडचा अनुभव आहे. मी साईट सीन करत जाण्याचा विचार करतोय. जातांना गाडी ट्रेनमध्ये टाकुन केरळच्या पहील्या स्टेशनवर उतरुन काही बीचेसचा आनंद घेत, मंदिर्,जंगले बघत पुर्ण केरळ्,कन्याकुमारी हुन दुसर्या रस्त्याने परत. केरळमधील सर्व ठीकाणे बघितल्यास साधारण २० ते २२ दिवस लागु शकतात.खर्च कमी करण्यास्साठी व जास्त एंजोय करण्यासाठी टेन्ट्मध्ये रहायचे सेफ ठिकाणी. सर्व हाय फाय रहाणे, खरेदी या गोष्टी कटाक्षाने टाळतो. (आपल्या गावात व घरी हेच करत असतो प्रत्येक जण.). प्रत्येक गावातील विविध चवींचा आस्वाद घेणे,लोकल लोकांमध्ये मिसळणे, तेथिल निसर्गाचा आनंद घेणे, खुप फोटोग्राफी करणे म्हणजे खरे पर्यटन हा माझा विचार. व्यक्ती परत्वे हे विचार बदलु शकतात.
11 Jul 2017 - 1:24 pm | अद्द्या
मस्त ट्रिप प्लॅन केलेली आहे.. आणि इतरांचे सल्ले हि मस्तच .. फक्त एकटे जातंय त्यामुळे जरा काळजी घ्या.. आणि गाडी अजून नवीन आहे.. आणि दिवाळी अगदीच जवळ आहे.. माझ्या मते पहिले ५-६ महिने गाडीची तुम्हाला आणि तुमची गाडीला सवय होऊद्या.. fz गाडी अति उत्तम आहे.. झटकन वेग पकडते, आणि तितक्याच लवकर थांबते . तुमच्या उंचीचा मला अंदाज नाही , पण २०-३० किमी चालवल्यावर माझे कोपरे दुखायला लागले होते त्यावर.. त्यामुळे.. डॉक म्हणतात तसं आधी १-२ छोट्या ट्रिप्स करून बघा..
आता राहिला प्रवासाचा भाग.. येत्या आठवड्यात मी बजाज डिस्कव्हर नि बेळगाव पुणे करणार आहेच.. पाऊस कमी असावा एवढीच प्रार्थना करतोय
11 Jul 2017 - 2:29 pm | अभ्या..
हावो, एफझीवर पुणे सोलापुर अशा ४-५ ट्रीपा (नॉनस्टोप कधी वनस्टॉप) केलेल्या आहेत. कोपर आणि मनगटापासला भाग प्रचंड पेन्स जाणवतात. पाठीचा अँगल सुरुवातीला स्पोर्टी वाटतो पण अर्ध्या तासाने अवघडते पाठ. एफझी टोटल सिटी बाईक आहे. लाँग ड्राइव्हसाठी तेच इंजिन असलेली एसझीआर बरी. त्याचा सिटिंग अँगल जास्त आरामदायी आहे. एफझीचे मायलेज मला आयडीयल कंडीशनने (टायमावर सर्व्हिसिंग, एअर प्रेशर, कन्सीस्टंट स्पीड वगैरे पाळून) जवळपास ४२ पडले होते. स्पीड ५५ ते ६५ दर्म्यान.
एसझीआर चे मायलेज ५३ च्या आसपास मिळाले.
11 Jul 2017 - 3:02 pm | अद्द्या
fz वर कदाचित ५.७-५.८ असलेल्या माणसाचे हात दुखणार नाहीत.. हा फक्त अंदाज.. सिटी बाईक नाय रे.. ती बाईक दोघांची आहे.. पण मागे " मित्र " नको. अशी =))
11 Jul 2017 - 7:38 pm | सुबोध खरे
स्पोर्टी मोटार सायकलने लांबचा प्रवास केला तर मनगटावर भलताच ताण येतो. यासाठी एक सोपा उपाय म्हणजे गाडीचे हॅण्डल बदलून घ्यावे. युनिकॉर्न बुलेट सारख्या आरामदायक गाड्यांचे लांब असणारे हॅण्डल लावले कि पुढे वाकून बसायची गरज पडत नाही. क्रोम प्लेटेड किंवा काळे जसे मूळ गाडीत असेल त्याच रंगाचे हॅन्डल ४००-५०० रुपयात मिळते. फक्त क्लच आणि ब्रेक केबलची लांबी पुरेशी आहे ते पाहून घ्या. अन्यथा त्या बदलून घ्याव्या लागतील.
पुढचा ब्रेक आणि क्लच ची स्थिती आपल्या हाताला आरामदायक अशी( म्हणजे मनगटात वाकवायला लागणार नाही) करून घ्यावी म्हणजे बराच वेळ गाडी चालवली तरी मनगटं दुखत नाहीत.
याला खर्च एक हजाराच्या आतच येतो. लांबच्या प्रवासासाठी तुम्हाला सारखा ब्रेक किंवा गियर सारखा बदलावा लागत नाही म्हणून बसण्याची स्थिती आरामदायक करणे हे लाभदायक ठरते.
जाता जाता -- मोटार सायकल ऍव्हरेज चांगली देते कि नाही हे पाहून ती विकत घेणारा माणूस हा तारुण्यातून गृहस्थावस्थेत प्रवेश करता झाला असे समजायला हरकत नाही.
( मोटार सायकलने प्रवास हा आनंदासाठी करायचा असतो. वाऱ्याशी झुंज देत करण्याची गोष्ट आहे ती. गृहस्थाश्रमात शिरलात कि वाऱ्याने केस उडतात मेकअप खराब होतो. साडी नेसून कसं बसता येईल अशा तर्हेच्या तक्रारी चालू होतात आणि मग कारच मोटारसायकल पेक्षा कशी चांगली यावर बौध्दिकेही होतात.)
11 Jul 2017 - 8:13 pm | अभ्या..
हेहेहेहेहे, तसा तर वानप्रस्थाश्रमच स्वीकारावा अशी मनोवस्था आहे खरी. पण पहिल्यापासून कोणतीही बाईक असली की हाय्येस्ट मायलेजवर चालवायचे नाद आधीपासून आहेत. ज्यावेळी बुंगे द्यायचे होते त्यावेळी फक्त टॅकोमीटर ओडोमीटर रेशो पाह्यला.
12 Jul 2017 - 10:28 am | अद्द्या
पण मग गाडी नवीन असेल तर कंपनीच्या ग्यारेंटि वर वगैरे फरक नाही पडत का पार्ट बदलल्याने ?
या बाबत मात्र १०००% सहमत. बाईक चालवणे हि प्रवासाची, आणि त्यातल्या त्यात हि गाडी चालवण्याची मजा घेत जाण्याची गोष्ट आहे :D
सोबत कोणी असेल तर ठीक.. नसेल तरी ठीक
11 Jul 2017 - 4:47 pm | प्रविन ९
Last Year Igatpuri (Nasik) To Ganpatipule return Trip Keli hoti. 40-42 Average bhetale mala... fz वर कदाचित ५.७-५.८ असलेल्या माणसाचे हात दुखणार नाहीत.... might be u r correct...
11 Jul 2017 - 7:04 pm | जेम्स वांड
नवीन यामाहा एफ झेड घेतल्याबद्दल अभिनंदन हो करंजे साहेब
12 Jul 2017 - 10:42 am | कंजूस
ओक्टोबर ते डिसेंबर मदुराई- कन्याकुमारी- तिरुवअनंतपुरम पाउस असतो. कोचीपासून वर जून ते सप्टेंबर. पावसात मजा येइल गार वाटेल.
12 Jul 2017 - 4:16 pm | कपिलमुनी
FZ कोणती घेतलीत ??
13 Jul 2017 - 3:24 pm | राहुल करंजे
FZ १50 cc v2
13 Jul 2017 - 3:24 pm | राहुल करंजे
FZ १50 cc v2
13 Jul 2017 - 3:24 pm | राहुल करंजे
FZ १50 cc v2
15 Jul 2017 - 8:41 am | स्थितप्रज्ञ
"यामाहा एफ झेड" एक अतिशय सुंदर गाडी आहे. खूप मस्त, स्मूथ आणि रिफाईंड (rev ready) इंजिन असल्यामुळे सतत red lining झोन मध्ये चालवली तरी (तुम्ही दमलात तरी) गाडी दमत नाही. ही माझी वन ऑफ द फेव्हरेट गाडी आहे. असो...
बॅक टु दि टॉपिक:
१. याचे सीटिंग पोश्चर थोडे स्पोर्टी आणि सीट कडक असल्यामुळे जुळवून घ्यायला त्रास होतो. कन्याकुमारीला निघायच्या आधी एखादी तीन-चारशे किमीची राईड मारून बघा. काही अडजस्टमेंट्स करायच्या असतील तर आताच करा. Actual ride दरम्यान experimentation ला वाव ठेऊ नका.
२. सतत राईड करायचे असल्यामुळे accelerator ओढून ओढून खांद्याला आणि मनगटाला राग लागते. ते थोडे सोपे करायला खालील लिंकेत दिलेल्या throttle cramp buster सारखे gadgets उपयोगी पडतात.
Throttle Cramp Buster
मला हे जरा रद्दी क्वालिटीचे मिळाले. तुम्ही थोडे चांगले शोधा.
३. बाईक आणि रायडर accessories बद्दल प्रतिसाद आहेतच. वेगळे काही लिहीत नाही.
४. शक्य झाल्यास गाडीला मागे (लाल रंगाचेच) स्ट्रोब लाईट्स लावून घ्या. रात्री हायवेवर गाडी दुरून दिसण्यासाठी हे खूप कामी येतात (दिवसा सुद्धा).
५. सर्वात महत्वाचे म्हणजे आपले गूगल लोकेशन आपल्या घरच्यांबरोबर शेयर करा. म्हणजे तुम्हाला ते लाईव्ह ट्रॅक करू शकतील (अपवाद- सांगू न शकणाऱ्या ठिकाणी जाणार असाल तर ;-) ). याकरिता तुमची आणि ज्यांच्याबरोबर तुम्हाला तुमचे लोकेशन शेयर करायचे आहे त्यांच्या गूगल प्लस प्रोफाईल्स असायला हव्यात. शेयर करताना city आणि pin point location दोन्ही शेयर करायला विसरू नका. राईड दरम्यान डेटा आणि GPS सतत ऑन ठेवा. वाटल्यास एक मोबाईल (गाडीच्या बॅटरीला लावायचा) आणि मोबाईलकरीत (वॉटरप्रूफ) हॅण्डल माऊंट/बॅग घ्या.
बाकी राईडचा निखळ आनंद घ्या आणि नंतर झकास लेख टाका.
तुमच्या प्रावासाठी शुभेच्छा!
आणि हो, ते सिंथेटिक ऑइल टाकायला विसरू नका गाडीत.
15 Jul 2017 - 10:55 am | स्थितप्रज्ञ
वाटल्यास एक मोबाईल चार्जर (गाडीच्या बॅटरीला लावायचा)
15 Jul 2017 - 1:59 pm | राहुल करंजे
खूप खूप धन्यवाद, महत्वाची माहिती दिलीत तुम्ही..
17 Jul 2017 - 6:46 am | मी कोण
आपण दोघे जण बरोबर जाऊ. आतापासुन ठरवायला सुरुवात करु. काय म्हणता?
17 Jul 2017 - 7:26 am | राहुल करंजे
हो चालेल, पण एक गाडीवर दोघे नको... येणार असाल तर माझा नं वरती आहेच, फोन करा, तयारीसाठी वेळ पाहिजे म्हणजे लवकर ठरवा
18 Jul 2017 - 6:13 am | मी कोण
कारण प्रत्येकाला रायडींगची मजा घेता आली पाहीजे. मी वर ११ जुलैला लिहिल्याप्रमाणे मला फक्त रायडींगच करायचे नाही तर साइट सीन ही करायचे आहे. सर्व बघण्यासाठीच फिरायचे आहे. मला नेचरच्या सर्व गोष्टींमध्ये आवड आहे. अड्व्हेंचर व फोटोग्राफी हि मनापासुन आवडते. स्लिपींग बग व तंबु बरोबर घेऊ. तुम्हालाही तुमच्या आवडीप्रमाणे फीरता आले पाहीजे, असा एक छान प्लन बनवु .
18 Jul 2017 - 1:53 pm | राहुल करंजे
हो चालेल,, तुमचा फोन नंबर द्या म्हणजे आपल्याला भेटून बसून प्लॅन करता येईल
18 Jul 2017 - 2:28 pm | मोदक
तुमचा प्लॅन ठरला की इथे टाका.
20 Sep 2017 - 3:44 pm | मोदक
काही ठरले का..??
19 Jul 2017 - 7:47 am | मी कोण
दुपारी
19 Jul 2017 - 12:36 pm | मितान
या प्रवासाचे अनुभव ऐकण्यासाठी उत्सुक आहे. नक्की लिहा.
शुभेच्छा !