गाभा:
तसे आयटी वर भरपूर धागे आहेत पण हा धागा प्रासंगिक आहे
एक महिन्या आधी विप्रो वगैरे कंपन्या ५६००० हुन जास्त लोकांना काढणार
http://www.livemint.com/Industry/4CXsLIIZXf8uVQLs6uFQvK/Top-7-IT-firms-i....हटमळ
आज मात्र नवीन कंपन्या विकत घेत आहेत
http://www.wipro.com/newsroom/press-releases/Wipro-to-acquire-Appirio-A-...
कायदेशीर दृष्ट्या ,अर्थ शाश्त्र दृष्ट्या चालत असले तरी हा प्रकार दुभती गाय दूध काढून कत्तल खाण्याकडे टाकायची व पोपट पाळायचा असे नाही वाटत ?
प्रतिक्रिया
15 Jun 2017 - 9:49 pm | श्रीरंग_जोशी
कंपनी एक हस्ठी होटी हय, जो सिर्फ अपना फायदा देखती हय!!
10 Jul 2017 - 1:56 pm | एकुलता एक डॉन
लगान
बरोबर ना ?
12 Jul 2017 - 5:06 pm | श्रीरंग_जोशी
मंगल पांडे द रायझिंग.
15 Jun 2017 - 11:00 pm | मुक्त विहारि
घरात पैसे कमी पडायला लागले की, कामवालीला काढतो पण त्याच वेळी एखादी गुंतवणूकीची संधी आली तर ती पण घेण्याचा प्रयत्न करतोच.
तस्मात ही आर्थिक मंदीची मुळे आलेली आपत्ती आहे. काही वर्षांनी ही मंदी दूर होईल अशी आशा,
16 Jun 2017 - 12:04 am | साहना
धंदा चालत नाही तरी कामावरून नाही काढायचे तर आणखीन काय करायचे ? मल्ल्या प्रमाणे कंपनी अचानक तोंडघशी पाडून लंडन मध्ये जाऊन बसायचे काय ?
16 Jun 2017 - 2:41 pm | आदूबाळ
मनुष्यबळ कपात आणि नव्या कंपन्या घेणे (मर्जर्स अॅण्ड अॅक्विझिशन्स) या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत हे सांगून खाली बसतो.
16 Jun 2017 - 3:04 pm | योगेश लक्ष्मण बोरोले
तरुन, तगुन राहण्यासाठी हे करावेच लागेल. गाय दुभती जरी असली तरी तिला पोसायचा खर्च तिच्याकडुन मिळणार्या आजच्या किंवा भविष्यातील फायद्यापेक्षा जास्त असल्यास विकलेलीच बरी.
16 Jun 2017 - 3:14 pm | एकुलता एक डॉन
पैसे नाही म्हणून लोकांना काढायचे ,तर विकत घेयला पैसे कसे आले ?
17 Jun 2017 - 8:01 am | माहितगार
पैसे नाहीत हे कोणत्या बातमीच्या कोणत्या वाक्यात लिहिलेले आहे ?
16 Jun 2017 - 3:16 pm | अमर विश्वास
मुळात मग्रुरी हा शब्दच येथे गैरलागू आहे ...
ज्या कर्मचाऱ्यांना काढत आहेत ते प्रामुख्याने "Low Performer" तरी आहेत किंवा ते ज्या टेक्नॉलॉजीवर काम करतात तिची मागणी कमी झाली आहे व त्या लोकांनी स्वतःला "re-skill" केलेले नाही. आणि हे दरवर्षीच होत असते. मला तरी यात नवीन काहीच दिसत नाही
दुसरी जी बातमी आहे ती विप्रोने क्लाऊड सर्विसेस मधली कंपनी विकत घेतली .. खरे तर एक भारतीय म्हणून आपल्याला याचा अभिमानाच वाटायला हवा
"क्लाऊड" हा सध्या IT चा बझ वर्ड आहे. यात अमर्याद संधी आहेत. व अशी कंपनी भारतीय कंपनीच्या व्यवस्थापनात आली तर त्याचा आपल्याला फायदाच होईल.
16 Jun 2017 - 7:44 pm | एकुलता एक डॉन
ते दर वेळी होते पण पैसे नाही हे कारण देऊन ह्या वेळी केले आहे व मोठ्या प्रमाणावर केले आहे
16 Jun 2017 - 3:39 pm | सिरुसेरि
गाय जर दुभती असेल तर तीला इतर कुठल्याही गोठ्यात आरामात जागा मिळेल . गायीने नवीन गोठा निवडताना सावधगिरी बाळगावी . पुर्ण चौकशी आणी आपल्या बाजुने शक्य तेवढी खात्री करुन मगच नवीन गोठा धरावा .
16 Jun 2017 - 3:45 pm | गॅरी ट्रुमन
विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातील एक गोष्टः
डिट्रॉईट, मिशिगन मध्ये "डिअरबॉर्न बग्गी कंपनी" नावाची एक बग्गी-टांगा कंपनी होती. डिट्रॉईटमध्ये टांग्यातून लोकांची ने-आण करणे हा या कंपनीचा व्यवसाय होता. नुकत्याच सुरू झालेल्या फोर्ड मोटर कंपनीमुळे लोक टांग्यांऐवजी गाड्यांनी जाण्याला प्राधान्य देऊ लागले. त्यानंतर "डिअरबॉर्न बग्गी कंपनीने" बग्ग्या कमी करून गाड्या घेतल्या आणि ज्यांना नुसत्या बग्ग्यांचे घोडेच दामटता येतात पण गाड्या चालवता येत नाहीत त्या सर्व कर्मचार्यांना नोकर्यांवरून कमी केले. इतकेच नव्हे तर या कंपनीने आपले नाव "डिअरबॉर्न बग्गी कंपनी" वरून "डिअरबॉर्न कॅब कंपनी" असे बदलले आणि ही कंपनी बग्गीसेवा बंद करून टॅक्सीसेवा पुरवू लागली.
काय भयंकर मग्रुरी ही. एकीकडे पैसे नाहीत म्हणून कर्मचार्यांना काढायचे आणि दुसरीकडे मोठ्यामोठ्या खार्चिक गाड्या घ्यायच्या.
16 Jun 2017 - 8:25 pm | मुक्त विहारि
मस्त....
16 Jun 2017 - 8:25 pm | डॉ सुहास म्हात्रे
१. आपल्या निवेशकांचा फायदा पाहणे हे कंपनीचे मूळ कर्तव्य असते... सगळ्या कंपन्या हेच करतात.
२. कर्मचार्यांने आपला फायदा पाहणे हे कर्मचार्याचे मूळ कर्तव्य असते. कर्मचारी (अ) कंपनीत उत्तम काम करून, (आ) दुसर्या कंपनीत जाऊन किंवा (इ) कंपनी सोडून स्वतंत्र व्यवसाय करून, इत्यादींपैकी सर्वात जास्त योग्य पर्याय निवडून करू शकतो... सगळे कर्मचारी हेच करतात.
३. या वरच्या कंपनी आणि कर्माचार्यामधील रस्सीखेचीत, जी पार्टी गमावण्याची विरुद्ध पार्टीला जास्त भिती वाटते, ती पार्टी जिंकते. कोणी कोणावर उपकार करण्यासाठी काही करत नसतात.
थोडक्यात, कंपनी आवडत असेल आणि ती सोडायची नसेल, आपल्याला काढून टाकण्याने कंपनीचेच जास्त नुकसान होईल इतक्या उंचीवर कर्मचार्याने स्वतःची पात्रता नेऊन ठेवावी... अन्यथा तशी परिस्थिती असू शकेल अशी दुसरी कंपनी शोधावी.
जग हे असेच असते. आजचा कर्मचारी उद्या उद्योजक झाला तरी असेच करेल :)
16 Jun 2017 - 9:12 pm | एकुलता एक डॉन
लेबर कमिशन मात्र असे समजत नाही
तसेच मुद्दा काढणे हा नसून पैसे नाही म्हणून काढायचे आणि वर अव्वा च्या सव्वा दारात कंपनी विकत घेणे आहे
16 Jun 2017 - 9:14 pm | दशानन
मग लेबर कमिशनने "त्या" कंपनीवर काय उपचार केला???
आणि किंमत आवाच्या सस्वा हे तुम्ही आम्ही ठरवणारे कोण?
16 Jun 2017 - 9:19 pm | एकुलता एक डॉन
बातम्यां मध्ये आले आहे
16 Jun 2017 - 9:23 pm | दशानन
बातम्या फक्त वाचायच्या नसतात, त्याच्या दोन ओळीमध्ये दिसत नसलेला प्याराग्राफ देखील वाचायचा असतो, संदर्भ जोडून.
मी अनेकवेळा बीबीसी हिंदी च्या लिक्स देत असतो, पण त्यातील अर्थ आणि राज'कारण जर समजले असेल तेच.
बीबीसींची बातमी म्हणजे 100% खरंच आणि लोकमतची म्हणजे 100% चुकीची असे काही नसते.
आणि आजच्या जगात तर मुळीच नाही.
16 Jun 2017 - 9:26 pm | एकुलता एक डॉन
आधी बातमी तर वाचा
17 Jun 2017 - 11:55 pm | डॉ सुहास म्हात्रे
कामगार कपात करणे, एखादा विभाग बंद करणे किंवा संपूर्ण कंपनी बंद करणे/विकणे; या गोष्टी त्या संसाधनांनी याआधी किती फायदा कमवून दिला (आणि पर्यायाने आतापर्यंत कंपनीच्या गंगाजळीत किती पैसे जमले) यावर अवलंबून नसते; तर...
ही वरची संसाधने (कामगार / विभाग / संपूर्ण कंपनी) भविष्यात फायदेशीर असणार की नाही यावर अवलंबून असते. व्यवसाय यशस्वीरित्या चालविण्यासाठी ही कळीची आवश्यकता आहे. नाहीतर सर्वच कंपनी बुडीत जाऊन १००% कर्मचार्यांना घरी बसावे लागेल.
दुसर्या शब्दांत, ज्या कामगार / विभाग / संपूर्ण कंपनीवरचा अपेक्षित खर्च, भविष्यात त्यांच्यापासून मिळाणार्या अपेक्षित फायद्यापेक्षा जास्त होतो, तेव्हा कंपनीच्या मते ते कामगार / विभाग / संपूर्ण कंपनी तोट्याचा व्यवहार ठरतो; व तो बंद केला जातो. अर्थातच त्यामुळे मोकळे झालेले कामगार, कंपनीच्या फायदेशीर असणार्या इतर जुन्या किंवा नवीन विभागांत सामावून घेता आले नाही, तर त्यांना कोणत्याही वैध प्रकाराने (गोल्डन हॅडशेक, वेळेआधिची निवृत्ती किंवा सरळ कमी करणे, इ) कमी केले जाते.
हा दूर्रदर्शीपणा न दाखवल्याने एका काळी त्यांच्या व्यवसायात जगात प्रथमस्थानी असलेल्या कंपन्या बुडीत/घाट्यात गेल्याची काही प्रसिद्ध उदाहरणे वानगीदाखल खाली दिली आहेत...
१. इस्टमॅन कोडॅक :
या कंपनीला फोटोफिल्म व फोटो छापण्याचा कागद या व्यवसायात १९९४ पर्यंत सुमारे ७० वर्षे जागतिक स्तरावर जवळपास येईल असा उत्पादनाची प्रत व प्रमाण (क्वालिटी अँड व्हॉल्युम) कोणीही प्रतिस्पर्धी नव्हता (कोडॅकचा ७० ते ७६% मार्केटशेअर आणि बाकी सगळ्यांचा मिळून २४ ते ३०% मार्केटशेअर).
१९७५ मध्ये पहिला डिजिटल कॅमेरा कोडॅकमधील एका इंजिनियरने बनवला. पण, ९०च्या दशकात, डिजिटल फोटोग्राफी बाजारात येऊन तिचा वेगाने वाढणारा खप आणि वेगान कमी होणार्या किंमतीकडे कोडॅक व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले. त्यांच्या मते फिल्म व पेपर फोटो व्यवसाय कधीच मागे पडाणार नव्हता. पण २०१० पर्यंत डिजिटल तंत्रज्ञानाने इतकी मजल मारली की कोडॅक डबघाईला आली आणि नंतर डिजिटल व्यवसायात उतरूनही कोडॅकला अपेक्षित यश मिळाले नाही. अखेर अमेरिकन बाजारातील S&P 500 या इंडेक्समधून तिचे नाव बाहेर काढले गेले.
आज चुटकीसरशी सेल्फी आणि इतर फोटो काढणार्या नवीन पिढीला, कधी काळी कोडॅक हा कोलगेट आणि मॅगी प्रमाणे घरोघरी पोचलेला ब्रँड होता, यावर विश्वास बसणार नाही !
२. नोकिया :
१९८०च्या दशकापर्यंत उचभ्रू आणि अत्यंत महागडा असलेल्या मोबाईल फोनला सर्वसामान्य जनतेच्या उपयोगाची वस्तू (लक्झरी टू कंझ्युमर प्रोडक्ट) बनवण्याचे श्रेय या फिनिश कंपनीला दिले जाते. नोकियाने सर्वसामान्य जनतेला परवडेल अश्या किंमती आणि वैशिष्ट्यांसह अनेक मोबाईल फोन मॉडेल्स बाजारात आणून जगभरच्या सुमारे १५० देशातला मुख्य मार्केटशेअर काबीज केला. मात्र, त्यानंतर मोबाईल तंत्रज्ञानामधील पुढची महत्वाची पायरी म्हणून आलेल्या स्मार्टफोन तंत्रज्ञानाकडे या कंपनीचे दुर्लक्ष केले आणि २०१० पासून कंपनीची घसरण सुरू झाली. नंतर अनेक कसोशीचे प्रयत्न करूनही स्मार्टफोन व्यवसायात या कंपनीला पूर्वीइतका तर सोडाच पण हव्या तितक्या फायद्याचाही व्यवसाय करता आलेला नाही. आता ही कंपनी नेटवर्किंग इक्विपमेंट व्यवसायात आपले अशीब आजमावून पाहत आहे.
३. डिजिटल एक्विपमेंट कंपनी (DEC) :
आठवते का ही कंपनी ? एके काळी मिडी काँप्युटर सेगमेंटमध्ये दादा असलेल्या या कंपनीने मायक्रोकाँप्युटरची वाढत असलेली ताकद जोखण्यात मोठी चूक केली. मायक्रोकाँप्युटर (ज्या काँप्युटरची मिडी आणि मेनफ्रेमचे दादालोक "पोरासोरांचे खेळणे" असे म्हणून टर उडवत असत) व्यवसायात असलेल्या कॉम्पॅक या कंपनीने २००१ मध्ये डिजिट विकत घेतली. मायक्रो कंपनीने मिडी कंपनी विकत घेणे (पक्षी : मुलाने बापाला विकत घेणे) हा त्याकाळच्या संगणक क्षेत्रातला भूकंप होता. तेव्हापर्यंत मायक्रो खूप ताकदवर झाला होता व मिडी कालबाह्य झाला होता. त्यामुळे, कॉम्पॅकलाही डिजिटलच्या पांढर्या हत्तीचे काय करावे हे सुचले नाही. शेवटी, सन २००७ मध्ये तिने डिजिटल विभाग HP ला विकला. HP सर्वसामान्यांना मुख्यतः डिव्हायसेस (प्रिंटर, स्कॅनर, इ) आणि काही प्रमाणात मायक्रोकाँप्युटर कंपनी म्हणुन माहिती होती. HP लाही आपला बिझनेस फोकस नीट ठेवता आला नाही आणि तिचे २०१५ मध्ये HP Inc (HPQ) आणि Hewlett Packard Enterprise (HPE) असे दोन तुकडे झाले.
या वरच्या उदाहरणांतील कंपन्यांनी भविष्यातली आव्हाने व संधी जोखून आपल्या व्यवसायाची दिशा बदलली नाही. त्या चुकांची त्या कंपन्यांनी जितकी किंमत चुकवली, त्यापेक्षा जास्त किंमत त्यांचा जगभर पसरलेल्या बहुसंख्य कर्मचार्यांना चुकवावी लागली आहे.
***************
जे या कंपन्यांच्या संबंधात झाले तेच आज भारतिय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या बाबतीत होत आहे.
(अ) जागतिक मंदी आणि त्यामुळे कमी झालेले काम आणि / किंवा कमी झालेले कामाचे मोबदले व त्यामुळे घटलेला फायदा;
(आ) बदलती जागतिक राजकारणी समीकरणे. (उदा : ट्रंपचे परकिय कंपन्या/कर्मचार्यांबद्दलचे अनुदार धोरण, इ.);
(इ) विकसित होणारे नवीन तंत्रज्ञान. (उदा : पुनरावृत्त व सोपी (simple and repetitive) कामे स्वयंचलितरित्या (automatic) करणारे संगणकिय प्रोग्रॅम्स, इ.)
इत्यादी...
...या सगळ्यांमुळे, जुजुबी/कमी संगणकिय प्राविण्य असणार्या कर्मचार्यांना पूर्वीप्रमाणे सहजपणे काम मिळणार नाही व ते प्रमाण दिवसेदिवस अजून कमी होत जाणार आहे हे नक्की. मात्र, जे कर्मचारी नवनवीन उपयोगी तंत्रज्ञानात प्राविण्य मिळवून स्वतःची प्रोडक्टिव्हिटी आणि पर्यायाने "कंपनीच्या दृष्टीने असलेली आपली किंमत" उच्च स्तरावर नेत राहतील, त्यांना काढून टाकणे कंपनीला तोट्याचे वाटेल. अर्थातच, अश्या कर्मचार्यांचे भवितव्य उजळ असेल.
संगणक क्षेत्रात आज जे काही होत आहे ते जगावेगळे अजिबात नाही.
१. सायकल जाऊन स्कूटर आली तेव्हा त्यांचे उत्पादन करणार्या व्यवसायात असेच झाले होते.
२. मेकॅनिकल इंजिनियरिंग व्यवसायात हाताने होणारी कामे करणारी अधिकाधिक विकसित यंत्रे येत गेली तेव्हा तसेच झाले होते.
३. मेकॅनिकल इंजिनियरिंग व्यवसायातील मंदी आणि संगणकीय व्यवसायातील चलती असलेल्या नव्वदीच्या दशकात असेच झाले होते... तेव्हा आपला मेकॅनिकल/सिविल/इलेक्ट्रिकल/केमिकल/इ मूळ व्यवसायविषय बदलून अनेक इंजिनियर्सनी संगणक क्षेत्रातिल प्रशिक्षण घेऊन त्या क्षेत्रात उड्या घेतल्या आणि नवीन करियरचे सोने केलेले पाहिले आहे.
तर... अश्या वेळी डार्विनकाकांच्या वचनाची आठवण करा... "सर्वाव्हल ऑफ द फिटेस्ट ! "... याचा डार्विनकाकांना अपेक्षित असलेला अर्थ; "ज्या प्राण्यात आपल्या भोवतालच्या परिस्थितीवर मात करण्याची आणि / अथवा तिच्याशी जुळवून घेण्याची क्षमता असते, तोच तगून राहतो"... हा नियम, जीवांच्या कोट्यवधी वर्षांच्या उत्क्रांतीला जितका लागू होतो, तितकाच तो एका जीवाच्या वैयक्तिक जीवनात तगून राहण्यासाठीही उपयोगी आहे.
18 Jun 2017 - 2:43 am | फारएन्ड
डॉ - उत्तम माहिती. फक्त कॉम्पॅक बद्दल त्या तारखेची गडबड आहे. एचपी आणि कॉम्पॅक चे मर्जर २००१-२००२ मधेच झाले होते. बे एरिया तील पेपर्स मधे सुमारे वर्षभर त्याची चर्चा पहिल्या पानावर असे. एचपी ची जुनी मॅनेजमेण्ट, त्यांचा "एच पी वे" वगैरे याच्या विरोधात होते, तर (२०१६ ची एक रिपब्लिकन उमेदवार) कार्ली फिओरिना तेव्हा एचपी ची सीईओ होती, ती याच्या बाजूने. आता अॅपल ची नवीन इमारत होत आहे तेथे त्यावेळेस एचपी चे हेडक्वार्टर्स होते, तेथे याचा सगळा ड्रामा चाले.
18 Jun 2017 - 3:05 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
मी ती तारिख DECच्या विकीपानावरून घेतली होती (https://en.wikipedia.org/wiki/Digital_Equipment_Corporation) ... तिथे चूकिची तारिख (जून १९९८) दिलेली आहे. इतर स्त्रोतात मर्जर जाहीर करण्याची तारिख ३ सप्टेंबर २००१ अशी दिसते आहे. प्रतिसादात जरूर तो बदल केला आहे.
19 Jun 2017 - 7:41 pm | जेम्स वांड
भारतातले लेबर लॉ आयटी कंपन्यांना लागू होतात?
होत असले तर इतक्या वर्षात एकही नजरेत न भारण्यासारखी अन माफक 'न्यूसंस व्हॅल्यु' असणारी एकही 'आयटी कर्मचारी संघटना/फ्रंटल/संघ/युनियन' न काढणाऱ्या कर्मचाऱ्यांना काय म्हणावं?
16 Jun 2017 - 9:26 pm | आदूबाळ
डॉनसाहेब माफ करा, पण हा धागा "पोटदुखी" या सदरात येतो. इंग्रजीमध्ये "बटहर्ट"**. हा निर्णय, त्यापाठिमागचं लॉजिक, इकॉनॉमिक्स याचा काहीही विचार न करता तुम्ही फक्त "पैसे नाही म्हणून लोकांना काढलं पण तेच पैसे टाकून दुसरी कंपनी विकत घेतली" हे टुमणं आळवत बसला आहात.
__________
**इंग्रजी बट. मराठी नव्हे. मराठी बट दुखत असल्यास त्वचारोगतज्ञाकडे जाणे.
16 Jun 2017 - 9:29 pm | दशानन
सहमत, भाव तेच दिसत आहेत.
16 Jun 2017 - 9:39 pm | एकुलता एक डॉन
मी layoff मध्ये नाही त्यामुळे पोट दुखी होत नाही
उद्या शेतकऱ्यांना शेती परवडत नाही तर दुसरा व्यवसाय करा असे कोणी का सांगत नाही ? घाम आम्ही पण गेलेलाच आहे
16 Jun 2017 - 9:42 pm | दशानन
=))
=))
अपेक्षित होते हे उत्तर, स्वारी तुमच्या टीपीसाठी देण्यासाठी "वेळ" नाही.
कणेकर आठवले "आपल्याकडे ना, क्रिकेटमधील सर्वाना सर्व म्हणजे सर्व समजते"
:D
Good try ;)
16 Jun 2017 - 9:56 pm | एकुलता एक डॉन
तुम्हाला फक्त antagonize करायचे आहे का ?
16 Jun 2017 - 10:08 pm | दशानन
बरं,
तुमचे समाधान व्हावे म्हणून.
माझ्या संस्थेत 3 व्यक्ती काम करत आहेत, व सोबत मी टोटल 4.
आम्ही ज्या प्रकारचे काम करतो, त्यात "अपडेटेड नॉलेज" ची गरज असते आणि इतर काही गोष्टी गरजेच्या.
समजा, माझी मेक इन इंडिया कंपनीला "कोणी" माझ्या मते योग्य किंमत घेऊन विकत घेणार असेल व त्यात त्यांनतर ही माझा काही "शेअर" राहणार असेल, व अट "फक्त" ही असेल की मी "माझे" पगारी लोक कमी करायचे व डील फायनल.
तर मी काय करावे?
आणि या फुकाच्या गप्पा नाही आहेत. यातील दिसत नसलेल्या गोष्टी वाचा, समजून घ्या, तुमच्यासाठी काही शब्द कोट केले आहेत. नसेल समजले तर व्यनी करा.
किंवा जास्तच माहितीसाठी स्नॅपडील इंडिया / ईबे इंडिया / गेला बाजार बाजी.कॉम डील कश्या झाल्या व कश्या होतात हे एकदा वाचून पहा आणि आधी शोधा.
दार वेळी गळे फाडणे महत्वाचे नसते, दर वेळी आपला फाटका शर्टचा खिसा हात घालून दाखवायची गरज नसते...
बघा समजले तर!
16 Jun 2017 - 10:12 pm | एकुलता एक डॉन
बाजी ची डील कशी गेम करून झाली मला जास्त माहीत आहे ,आतल्या गोटात तुन
16 Jun 2017 - 10:17 pm | दशानन
मला जास्त माहीत आहे ,आतल्या गोटात तुन
मग तरी तुम्ही हा धागा काढावा हे नवल नाही का?
असो!
16 Jun 2017 - 10:06 pm | अमर विश्वास
वर डिटेल प्रतिसाद दिलाच आहे
तसेही विप्रोने "पैसे नाही" म्हणुन लोकांना काढले हे कश्याच्या आधारावर म्हणता आहात ? (आपली पहिली लिंक उघडत नाही , LiveMint ने बातमी उडवली आहे )
विप्रोचे रेव्हेन्यू व PBT पहिले तर "पैसे नाही" हे विधान फारसे खरे वाटत नाही
16 Jun 2017 - 10:11 pm | दशानन
LiveMint
हा जर बातम्यांचा सोर्स आहे तर आमचा सिंहगड परिसर आख्या पुण्याचा पेपर आहे व महाराष्ट्रभर जातो =))
16 Jun 2017 - 10:13 pm | एकुलता एक डॉन
www.livemint.com/Industry/4CXsLIIZXf8uVQLs6uFQvK/Top-7-IT-firms-includin...
17 Jun 2017 - 8:00 am | माहितगार
यात पैसे नाहीत हे कारण नेमक्या कोणत्या वाक्यात लिहिलेले आहे ?
16 Jun 2017 - 10:17 pm | एकुलता एक डॉन
The Pune labour department has directed IT services firms such as Wipro, Tech Mahindra, Cognizant to hold talks with employees who have petitioned the government for help alleging that they were laid off by these firms.
Around 50 former employees, including from US IT services firm Syntel and telecom firm Vodafone had petitioned the labour department in Pune against their employers. The Assistant Labour Commissioner at Pune, Nikhil Walke had called these firms, the engineers who lost their jobs and the Forum for IT employees (FITE) for talks and arrive at a consensus.
http://smartinvestor.business-standard.com/market/story-465295-storydet-...
16 Jun 2017 - 10:41 pm | फारएन्ड
डॉन साहेब जस्ट किडिंग. ती ओळ वापरायचा मोह आवरला नाही.
पण कोणतीही कंपनी कोठेही पैसे गुंतवताना पुढचा रिटर्न बघूनच करणार. वरती डॉ म्हात्रे यांनी 'जग असेच चालते' लिहीले आहे त्याच्याशी पूर्ण सहमत. दुसरी कंपनी विकत घ्यायला पैसे असणे पण त्याच वेळेस लोकांना काढणे यात - त्या काढल्या जाणार्या लोकांच्या प्रॉब्लेम बद्दल पूर्ण सहानुभूती असूनही - कंपनीच्या दृष्टीने काहीच गैर नाही. कंपनीत ज्यांनी पैसे गुंतवले आहेत त्यांना जास्तीत जास्त रिटर्न देणे हेच सर्वात मोठे प्राधान्य. बाकी सगळे मार्केटिंग, किंवा कायदे पाळण्याकरता कराव्या लागणार्या गोष्टी.
दुसरे म्हणजे आपल्याला यात "कंपनी" व्हिलन दिसते. पण प्रत्येकाच्या वर त्याचा कोणीतरी बॉस बसलेला आहे. एच आर चा निर्णय म्हणाल तर त्यावर कॉस्ट कटिंग करायला फायनान्स चा हेड/सीएफओ आहे. त्याच्या डोक्यावर सीईओ.
या सर्वांनी लोकांना काढायचे नाही ठरवले, तरी त्यांच्यावर लोक आहेत. कंपनीच्या बोर्डचे डायरेक्टर सीईओ ला धारेवर धरतील. कारण त्यांनी तसे नाही केले तर त्यांच्या ** खाली मोठ्या इन्वेस्टर कंपन्या जाळ काढतील, नाहीतर शेअरहोल्डर मीटिंग मधे सगळेच इन्वेस्टर्स ते करतील.
या अतिशय लोकप्रिय क्लिप मधे जे राजकारण चालले आहे, ते इतर सर्व गोष्टी ठरवते. बाकी सगळे दुय्यम.
16 Jun 2017 - 10:49 pm | एकुलता एक डॉन
तुमचे म्हणणे अर्थशास्त्रात एकदम बसते साहेब
पण लेबर कंमसीन वाल्यानी सध्या तरी आमची टाळी धरली आहे
टर्मिनेशन illegal आहे
=============================================
फारएन्ड ह्यांचा पहिलाच प्रतिसाद असताना
"डॉन साहेब जस्ट किडिंग. ती ओळ वापरायचा मोह आवरला नाही.
पण कोणतीही कंपनी कोठेही पैसे गुंतवताना पुढचा रिटर्न बघूनच करणार. वरती डॉ म्हात्रे यांनी 'जग असेच चालते' लिहीले आहे त्याच्याशी पूर्ण सहमत. दुसरी कंपनी विकत घ्यायला पैसे असणे पण त्याच वेळेस लोकांना काढणे यात - त्या काढल्या जाणार्या लोकांच्या प्रॉब्लेम बद्दल पूर्ण सहानुभूती असूनही - कंपनीच्या दृष्टीने काहीच गैर नाही. कंपनीत ज्यांनी पैसे गुंतवले आहेत त्यांना जास्तीत जास्त रिटर्न देणे हेच सर्वात मोठे प्राधान्य. बाकी सगळे मार्केटिंग, किंवा कायदे पाळण्याकरता कराव्या लागणार्या गोष्टी.
दुसरे म्हणजे आपल्याला यात "कंपनी" व्हिलन दिसते. पण प्रत्येकाच्या वर त्याचा कोणीतरी बॉस बसलेला आहे. एच आर चा निर्णय म्हणाल तर त्यावर कॉस्ट कटिंग करायला फायनान्स चा हेड/सीएफओ आहे. त्याच्या डोक्यावर सीईओ.
या सर्वांनी लोकांना काढायचे नाही ठरवले, तरी त्यांच्यावर लोक आहेत. कंपनीच्या बोर्डचे डायरेक्टर सीईओ ला धारेवर धरतील. कारण त्यांनी तसे नाही केले तर त्यांच्या ** खाली मोठ्या इन्वेस्टर कंपन्या जाळ काढतील, नाहीतर शेअरहोल्डर मीटिंग मधे सगळेच इन्वेस्टर्स ते करतील.
या अतिशय लोकप्रिय क्लिप मधे जे राजकारण चालले आहे, ते इतर सर्व गोष्टी ठरवते. बाकी सगळे दुय्यम."
ह्यात ती ओळ वापरायचा मोह आवरला नाही
हे कसे ?
हेहहेहेहेहेहेहेहे
16 Jun 2017 - 11:01 pm | फारएन्ड
त्याचा खालच्या मजकुराशी काही संबंध नाही. ते वरचेही तुम्हाला उगाच विरोध करायला लिहीलेले नाही. पण अॅक्विझिशन करणे आणि लोकांना काढणे याचा फारसा संबंध नाही. किंबहुना असलाच तर उलट्या अर्थाने आहे - अनेकदा मर्जर्/अॅक्विझिशन्स झाले तर काही लोकांना फटका बसतो.
लेऑफ्स बेकायदेशीर असतील तर न्यायालय ते रद्द करायला लावेलच. पण "दुसरीकडे तुम्ही कंपनी विकत घेत आहात म्हणून ते बेकायदेशीर आहे" असे म्हंटले आहे का? कोणत्या कायद्याने? त्या लोकांना नोकर्या परत मिळाल्या तर चांगलेच आहे.
17 Jun 2017 - 12:03 am | एकुलता एक डॉन
मी बेकायदेशीर आहे असे केव्हा म्हटले ?
मूळ मुद्दा नीट वाचा हो "कायदेशीर दृष्ट्या ,अर्थ शाश्त्र दृष्ट्या चालत असले"
असेच तर लिहिले
17 Jun 2017 - 1:24 am | फारएन्ड
पण लेबर कंमसीन वाल्यानी सध्या तरी आमची टाळी धरली आहे
टर्मिनेशन illegal आहे >>> हे तुम्हीच लिहीले ना? म्हणून बेकायदेशी म्हंटलो ते याबद्दल.
तुमचे - "टर्मिनेशन illegal आहे " आणि माझे "लेऑफ्स बेकायदेशीर..." सेमच की.
17 Jun 2017 - 2:34 am | एकुलता एक डॉन
लेऑफ्स वाले टर्मिनेशन illegal आहे हो ,असो
17 Jun 2017 - 7:54 am | माहितगार
नेमकी कोणत्या कायद्यांंची कोणती कलमे लागू होतात ?
17 Jun 2017 - 8:11 am | माहितगार
दुधाची मागणी कमी झाली म्हणून गोठ्यातल्या खायला काळ आणि भूईला भार गाईंची संख्या का कमी करु नये ? आणि पोपटाच्या अंड्यांची मागणी अधीक झाली तर तसे का करू नये ?
शेतकर्याकडे काम नसतानाही मजुरांना जबरदस्तीने ठेऊन घेऊन त्यांना मजूरी देत रहावी असे म्हणता का ? शेतकर्यास शेती परवडत नसेल तर त्यांनी व्यवसायाची पुर्नरचना अथवा नवा व्यवसाय का करु नये ?
17 Jun 2017 - 8:15 am | माहितगार
उद्या शेतकऱ्यांकडे शेतीत काम कमी आहे म्हणून अधिकच्या मजूरांना कामावरुन कमी केले तर त्या शेतकर्यांना मग्रूर म्हणणार का ?
17 Jun 2017 - 5:42 pm | एकुलता एक डॉन
शेतीत पैसे नाही म्हणून अधिकच्या मजूरांना कामावरुन कमी केले आणि इंडिका गाडी घेतली
17 Jun 2017 - 6:23 pm | माहितगार
गंमत आहे, गोल फिरुन तेथेच येत आहात ! हाताला काम देण्यासाठी काम नसणे म्हणजे पैसा नसणे असे नसावे. हाताला देण्यासाठी काम नसताना पैसे देत रहाणे म्हणजे अप्रत्यक्ष भीक देण्या सारखे नाही का ? एखाद्या पैसे वाल्या शेतकर्यास भिक देण्या पेक्षा कार विकत घ्यावी वाटली तर बिघडले कुठे ? कार कारखान्यात काम करणार्या कामगाराच्या हाताला तरी काम मिळते ! शिवाय कार भाड्याने देण्याचा व्यवसायात एखाद्या ड्रायव्हर ला काम देता येते. त्याच कारनी जवळच्या शहरात नेऊन भाजी विकता येते. गावातल्या बाळांतईणीला शहरातल्या दवाखान्यात भरती करता येते.
18 Jun 2017 - 12:44 am | डॉ सुहास म्हात्रे
शेतीत पैसे नाही म्हणून अधिकच्या मजूरांना कामावरुन कमी केले आणि इंडिका गाडी घेतली
१. शेतीत पैसे नसूनही अधिकच्या मजूरांना कामावर ठेवण्याला फारतर "धर्मदाय काम" म्हणता येईल, पण तो व्यवसायिकदृष्ट्या चुकीचा निर्णय असेल !
आपण त्या शेतव्यवसायातिल भागिदार अथवा गुंतवणूकदार असल्याची कल्पना केल्यास मुद्दा स्पष्ट होईल.
२. ती इंडिका गाडी (उबर / ओला / खाजगी) प्रवासी वाहतूकीला लावून जर जास्त फायदा मिळत असेल तर तो निर्णय वैध आणि व्यावसायिकरित्या जास्त चांगला असेल.
आपण त्या व्यवसायातिल भागिदार अथवा गुंतवणूकदार असल्याची कल्पना केल्यास मुद्दा स्पष्ट होईल.
३. शेतीत पैसे नाही म्हणून अधिकच्या मजूरांना कामावरुन कमी केल्यानंतरही... स्वतःच्याकडे असलेल्या शेती/गैरशेती स्त्रोतातील वैध फायद्यातून शेतकर्याने स्वतःच्या वापरासाठी इंडिका गाडी घेतली तरीही ते वैध असेल.
स्वतःचे वैध उत्पन्न कोणत्या वैध मार्गांनी खर्चावे हे ठरवण्याचा पुरेपूर हक्क त्या उत्पन्नाच्या मालकाकडे असतो... एकल शेतकर्याच्या संबंधात तो वैयक्तिकरित्या त्याच्याकडे असतो, तर कंपनीसंबंधात तो गुंतवणुकदारांकडे असतो. इतर कोणालाही (पक्षी : कामावरून वैध मार्गाने, म्हणजेच नोकरीच्या करारात असलेल्या सर्व अटींची पूर्तता करून, काढलेल्या कर्मचार्याला) त्यावर आक्षेप घेण्याचा अधिकार नसतो.
जेव्हा मोठ्या प्रमाणात कामगार कपात होते, तेव्हा कंपनीची बाजू कायदेशीर असूनही, कामगार कपातिचे सामाजिक (आणि त्यामुळे पर्यायाने होणारे राजकिय (पक्षी : पुढच्या निवडणूकीतिल मते)) परिणाम पाहून सरकार कंपनीवर दबाव आणण्याचा प्रयत्न करते. कंपनीने सर्व वैध सोपस्कार पार पाडून कामगार कपात केली असेल तर सरकारी दबावाला बळी पडणे किंवा न पडणे हे सर्वस्वी (अ) कंपनीच्या व्यवस्थापनाचा खमकीपणा आणि (आ) कंपनीच्या व्यवसायाचे सरकारवरचे अवलंबित्व यावर अवलंबून असते.
18 Jun 2017 - 12:47 am | एकुलता एक डॉन
क्या बात हैं म्हात्रे साहेब
एक मुद्दा फक्त
labour commision नुसार layoff बेकायदा आहे
18 Jun 2017 - 12:57 am | डॉ सुहास म्हात्रे
लेबर कमिशन आता काय म्हणते आहे त्यापेक्षा शेवटचा निकाल नक्की काय येतो, हे पाहणे मनोरंजक असेल ! (इंडिया जैसे बडे देश मे ऐसी बहुत छोटी छोटी बाते होती रहती है ;) )
मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर कामगार कपात करण्याचा निर्णय घेताना, इतक्या मोठ्या कंपन्यांच्या, मोठमोठ्या कायदेशीर सल्लागारांनी (लीगल डिपार्टमेट + जानेमाने एक्स्टर्नल लीगल अॅडव्हायझर्स) काहीच विचार केला नसेल असे समजणे धाडसाचे वाटते आहे. अर्थात, वर लिहिल्याप्रमाणे कंपनीचा खमकेपणा आणि कंपनीचे सरकारवरचे अवलंबित्व हे वास्तवातले मुद्दे लागू आहेतच :)
19 Jun 2017 - 5:59 pm | अप्पा जोगळेकर
आस्थापना कोणतेही कारण न देता नोकरीतून कमी करु शकते असा आशयाचे कागदपत्र सही करुन घेतात.
काही होत नाही. उगाच कामगार कायद्याच्या मागे लागण्यापेक्षा नविन नोकरी किंवा पर्यायी उत्पन्न शोधणे अशिक श्रेयस्कर असते.
21 Jun 2017 - 10:10 am | सुबोध खरे
labour commision नुसार layoff बेकायदा आहे
पहिली गोष्ट लेबर म्हणजे कामगार अशिक्षित किंवा अर्धशिक्षित.
इंजिनियर (डिग्री किंवा डिप्लोमा) हा कामगार या व्याख्येत बसत नाही तर अधिकारी या व्याख्येत बसतो तेंव्हा लेबर कमिशनरच्या अखत्यारीत हि गोष्ट येत नाही.तुमच्या इंजिनियर लोकांना कामगार विमा योजना लागू होते काय? (ती तशी नसेल तर ते कामगार नाहीत सरकारी व्याख्येप्रमाणे)
त्यांनी केवळ सरकार काहीतरी करत आहे हे दाखवण्यासाठी केलेला हा एक दिखाऊ उपाय आहे. त्यावर खुश होण्यात काहीच फायदा नाही.
शिवाय असिस्टंट लेबर कमिशनरला कुत्रं हि विचारत नाही. त्याने नोटीस दिली तर एक कंपनीचा अधिकारी त्याला उत्तर देतो ते सुद्धा कामगारांबाबत असेल तर अन्यथा त्याने पाठवलेल्या नोटिशीला केराची टोपली दाखविली जाते.आजकाल कायदे हे कामगाराभिमुख राहिलेले नाहीत विशेषतः खाजगी क्षेत्रात. सरकारी नोकरी असेल तर गोष्ट वेगळी.
( माझे वडील लेबर लॉ ची प्रॅक्टिस करत होते आणि कामगार विषयात अनेक वर्षे काम केले आहे त्यांच्याशी केलेल्या वार्तालापाचा हा सारांश आहे)
21 Jun 2017 - 10:55 am | अनुप ढेरे
आयटी कमगार व्हाईट कॉलर असतात. त्यांना कायद्याने युनियन फॉर्म करता येत नाही. तमिळनाडुने गेल्या वर्षी आयटीवाल्यांना युनिअन बनवता येईल असा कायद्यात बदल करू असं आश्वासन दिलेलं. त्याचं पुढं काय झालं नाही माहिती.
18 Jun 2017 - 2:26 am | एकुलता एक डॉन
सध्या social मीडिया मध्ये खूप चर्चा होत आहे ,माझे दुर्दव्य MNC मध्ये असायला पाहिजे होते
18 Jun 2017 - 2:19 pm | चिकित्सक
विप्रो आणि तत्सम अन्य सॉफ्टवेर सर्विस बेस्ड कंपनीज़ ला अनेक वर्ष कामात असल्या मुळे मला जे वाटत ते शेयर करतोय ,
१. रोबोटीक प्रोसेस औटोमेशन मुळे रिपिटिटिव वर्क दिवसेंदिवस कमी होत जाणार , त्या मुळे सर्विस ऑपरेशन्स किवा प्रोडक्षन सपोर्ट च्या ओपनिंग्स कमी होत होत नाहीसे होणार
२. कंपनीज़ चे मार्जिन कमीत होत आहे , आजकाल प्रत्येक कंपनीज़ चे स्वतंत्र आईटी डिपार्टमेण्ट असत , क्रीम वर्क ते स्वत: जवळ ठेवतात आणि रिपिटिटिव आणि त्यातल्या त्यात नको असलेल काम टीसीएस विप्रो सारख्या वेंडरना देण्यात येत
३. कॅप्टिव कंपनी चे आईटी मॅनेजर हे आपल्याच रिपोर्टीस ना फटकून वागवतात पण वेंडर्स वर ह्यांच्या फार विश्वास असतो , पुढे हेच वेंडर कधी डेलिवरी खराब करतात किवा ह्यांच्या मुळे एस्कलेशन होत , बहुधा वेंडेर्स ह्या क्लाइंट मॅनेजर्स ना त्यांना बिज़्नेस देण्या साठी अप्रोच करतात |
४. सॉफ्टवेर सर्वीसज़ आणि वेंडर्स नि बेंच बराच कमी केला , आजकाल त्यांना ह्व्या असलेल्या स्किल्स चा माणूस बिनधास्त थर्ड पार्टी कांट्रॅक्ट वर घेतात ह्याचे क्लाइंट , वेंडर आणि कॉंट्रॅक्टर ला फायदा होतो , पण ह्या मुळे पार्मानॅंट ओपनिंग्स कमीच निघतात |
५. स्वत: ला रिस्कील करणे म्हणण्या इतक सोप नसत , समजा तुमची टेक्नॉलॉजी डॉट नेट किवा जावा आहे आणि तुम्ही सॅॅप चा कोर्स करण्याच ठरवल तर त्याचे ट्रेनिंग सुद्धा फार महाग आहे आणि कंपन्या त्यांना हवे असलेल्या स्किल सेट वरच तुम्हाला ट्रेनिंग देणार , मग कुठल्या ईटीएल वाल्या डिव्लपर ला कोबॉल किंवा मेन-फ्रेम सारख्या जुनाट टेक्नालजी वर ट्रेन करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही , तुम्हाला पायथॉन , हदूप शिकायचे असेल किवा तसल्या प्रॉजेक्ट वर काम हवे असेल त्या साठी सुद्धा तुम्हाला शब्द टाकावा लागतो , नव्या टेक्नॉलॉजी चे ट्रेनिंग असेल तर पहिल्यांदा मॅनेजर च्या फेवरेट लोकांचा नंबर लागतो|
६. आईटी मध्ये रीसॉरसिंग आणि वर्कफोर्स मॅनेज्मेंट नावाचा काही हरामखोर लोकांचा ग्रूप असतो ज्यात विशेषत: असे लोक असतात ज्यांच्या टेक्निकल अनुभव काही नसतो , कुठल्या प्रॉजेक्ट मधून डिमांड आली आणि त्यास पूर्ण करायला कुठला ही रीसोर्स त्याचे स्पेशलिज़ेशन किंवा स्किल सेट न बघता अलोकेत करतात , फ्रेशर्स ना त्रास देतात आणि अनुभवी माणसा ला चक्क कोलकाता , चेन्नई ला जाण्यास भाग पाडतात
७. अन्य सेक्टर्स च्या कंपनीज़ सारखेच इथे सुद्धा पॉलिटिक्स आहे शिवाय रीजनलिज़म तर खूपच दिल्ली , कनपुरिये , लखनावीए , जयपूरिये ह्या लोकांचा एक ग्रूप असतो तर बांगला-बिहारी लोकांचा दुसरा , ओरिया लोकांचा एक तर गल्ट-हैदराबादी आणि तामिलियन्स चा वेगळा , ही लोक स्वत: च्या लोकांना खूप फेवर करतात , कुठल्याश्या फालतू कामा बाबत त्याना अवॉर्ड साठी तर कधी प्रमोशन साठी नॉमिनेट करतात ह्या उलट आपले मराठी लोक हे एकदुसर्या वर कुरघोडी करतात आणि कोवापरेट क्वचित करतात |
८. विप्रो इंफॉस्यस किवा टीसीएस चा काळ सॉफ्टवेर सर्वीसज़ कडे जास्त आहे स्वत: चे प्रॉडक्ट डेवेलपमेंट वर त्यानी हव तेवढ लक्ष दिले नाही , नाही म्हणायला इन्फोसिस चे फिनॅकल नावाचे प्रॉडक्ट आहे पण ते तेवढ्या पुरताच , कंपन्या आपले उत्पन्न बॉडी शॉपिंग किवा सपोर्ट वले प्रॉजेक्ट करून कमावतात आणि वर सांगितल्याप्रमाणे तश्या ऑपर्चुनिटीस कंपन्या ना कमी मिळणार
नारायण मूर्ती , शिव नादर किवा अझिम प्रेमजी असोत ह्यांचे पोटे भरल्या मुळे मग लोकांना फिलोसॉफि झाडतात कि मिडील लेवेल मॅनेज्मेंट कशी वाया गेलेली आहे आणि लोक कसे स्वत: ला अपडेट करत नाहीत , आणि ह्यांनी स्व खुषीने . पगारात कपात करावी म्हणून , पॅयन ही लोक आपल्या शेयर चा कमी भाव स्वीकारणार नाहीत , जेव्हा जेव्हा भाव चढले तेव्हा आपला हिस्सा विकून ह्या लोकांनी . . .
जबर पैसा कमावले सुद्धा , बोर्ड मेंबर्ज़ नि सुद्धा त्या फाउंडर मेंबेर्सना आपले शेयर्स विकून बाहेर पडायला सुचवले आहे त्या कडे हे लोक जाणीव पणे दुर्लक्ष करतात |
19 Jun 2017 - 1:28 am | एकुलता एक डॉन
तुम्ही कॅपजेमिनी ला आहात ?
21 Jun 2017 - 9:24 am | चिकित्सक
फार पुर्वी म्हणजे २००६ साली कॅनबे ला होतो पुढे तिला कॅपजी ने टेक ओवर केल त्या नंतर बर्याच स्विच केल्या , सध्या एका योरोपियन इनवेस्टमेंट बॅंक च्या आईटी सर्विस डिविषन ला कामाला आहे |
19 Jun 2017 - 2:35 pm | दीपक११७७
टेक महिन्द्रा... बद्दल काही सांगुशकाल!
धन्यवाद.
19 Jun 2017 - 6:06 pm | अप्पा जोगळेकर
सगळे काही ऑटोमेट होणार आणि एकदम नोकर्या कमी होणार हा एक बागुलबुवा आहे.
सगळे ऑटोमेट व्हायला २०५० साल उजाडेल आणि तोवर आत्ता जे नविन आले आहे ते पुन्हा जुने झाले असेल.
दरवर्षी तंत्रज्ञान बदलते वगैरे म्हणणे सोपे आहे. प्रत्यक्षात २००५ सालचे तंत्रज्ञान आजही वापरले जात आहे.
आत्ता जे नविन येत आहे किंवा आले आहे ते सर्विस बेस्ड कंपन्यांमधे कदाचित २०२५ पर्यांत सुद्धा वापरले जाईल.
दरवर्षी नविन तंत्रज्ञान आले तरी ते दरवर्षी विकत घेणे परवडत नाही.
टप्प्याटप्प्याने बदलावे लागतेच हे खरे आहे.
19 Jun 2017 - 8:32 pm | फारएन्ड
एकदम नोकर्या कमी होणार हे जरी खरे नसले, तरी २०५० इतके ते लांब नाही. अनेक क्षेत्रात पुढच्या ४-५ वर्षांत सुद्धा व्यक्तीऐवजी सॉफ्टवेअर ते काम करेल, किंवा डिझाइन्/आर्किटेक्चर असे बनवले जाईल की इतक्या लोकांची गरज नसेल. त्यातून नोकर्या कमी होतीला? हे इतके क्लिअर नाही. होपफुली सध्याच्या कौशल्या ऐवजी दुसर्या नवीन कौशल्याचे लोक लागतील.
वरती रोबॉटिक्स/ऑटोमेशन चा उल्लेख आहे - ते सगळे वेगात येत असले, तरी सध्या सर्विस कंपन्यांच्या नोकर्यांची गरज कमी होण्याचे कारण ते नाही. ऑटोमेशन येउ घातलेली कामे व या कंपन्या करतात ती कामे यात अजूनतरी फारसा ओव्हरलॅप नाही. पुढचे माहीत नाही. प्रॉडक्शन सपोर्ट वगैरे गोष्टी कस्टमर्स आपल्या सिस्टीम्स क्लाउड बेस्ड - अॅमेझॉन किंवा मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांकडे देत असल्याने मूळ स्वतःच्या कंपनीत विकत घेतलेले हार्डवेअर, त्यावर बनवलेल्या सिस्टीम्स, त्यांचे बॅक अप्स व इतर तत्सम कामे करायला आधी जितके लोक लागत तितके आता लागत नाहीत. पण हा "क्लाउड" चा परिणाम आहे. अजून रोबॉटिक्स्/ऑटोमेशन चा तितका नाही.
21 Jun 2017 - 10:12 am | चिकित्सक
तस नाहीए , रोबोटीक प्रोसेस अटोमेशन ची अवदसा खरी आहे आणि ह्या बाबतीत काळजी करण्या सारखे आहे कारण डेली ऑपरेशन्स /सपोर्ट मेंटेनेन्स साठी जी काही आईटी रिसोर्सस ची टीम बीलिंग घ्यायची , ते काम खरच ऑटोमेट होणार उदाहरणार्थ जे हेल्थ चेक इवेंट आणि आलएर्ट मॉनिटरिंग आणि मिटिगेशन आक्षन , रिपोर्ट प्रेपरेशन , स्टेटस अपडेट , टिकेटिंग ची काम करायला स्वतंत्र लोक नेमले जायचे ते एका झटक्यात होणार , अर्थात सुरुवाती ला बर्याच ट्यूनिंग करव्यला लागतील पण एकदा सेटअप झाल कि ते मॉडेल ऑपरेट करायला फार सोप जाणार १० लोकांचे काम औटोमेशन नि सहज शक्य होईल , ह्या औटोमेशन टूल करिता दोन तीन रिसोर्सस कंपन्या नेमतील |
डेव ऑप्स , एजाईल मुळे डेप्लाय्मेंट टीम च्या पोटा वर जणू लातच पडली आहे , प्रॉडक्षण , डेव एसआयटी क्यु / युएटी एन्वाइरन्मेंट बिल्ड ऑपरेट आणि मेनटेन करण प्रचंड खर्चिक असत , मिडियम किवा स्माल बिज़्नेस ना ते शक्य नसत , सॉफ्टवेर लाइसेन्स आणि इतर किचकट गोष्टी असतात त्या मुळे ह्यांच्या साठी क्लाउड किंवा शेर्ड इनफ्रास्ट्रक्चर सर्विस असतात , ते सुद्धा औटोमेट होतय |
पुर्वी इनहाउस डेवेलपमेंट व्हयायच किंवा वेंडर ला प्रॉजेक्ट डेवलप , टेस्ट आणि डिप्लाय , सपोर्ट करायला दिला जायचा साधारण ४० ते १२० लोक ह्या कामा साठी ठेवले जायचे आता टूल बेस्ड डेवेलपमेंट आल , टूल बेस्ड टेस्टिंग आल जॉब शेड्युलर टूल आणि अप्लिकेशन मॉनिटरिंग सिस्टम सुद्धा आलेत आणखी काय हव ? राहता राहील कॉनफिगरेशन जे कि मॅन्यूयल आहे , पण ती वन टाइम प्रोसेस असते त्या साठी फूल पगारी कामगार ठेवण ह्या कंपनीज़ ना परवडत नाहीत त्या साठीच त्यांनी बेंच संपवला , आजकाल कांट्रॅक्ट टू हायर प्रकार सर्रास चालतात कारण कंपनीज़ चा भर क्वालिटी ला कमी प्राइयारिटी देऊन कमी वेळेत काम संपवण्या कडे भर असतो |
21 Jun 2017 - 12:26 pm | चिनार
या वाक्याला सहमत. मोठा भाऊ एका बड्या आय टी कंपनीत होता. त्याच्या कंपनीतला एक अलोकेशन मॅनेजर ह्या गोष्टीला वैतागून सोडून गेला. त्याच्या गुड बाय मेल मध्ये पुढील वाक्य होतं,
Freshers and 2-3 years experienced resources are used like toilet papers in this company !
19 Jun 2017 - 7:30 pm | राघवेंद्र
माझे २ पैसे, मलाही जास्त अनुभव नाही आहे पण थोडी आकडेमोड.
भारतात जे मुख्यत्वे काम येते ते $२० ते $२५ प्रति तास या दराने म्हणजे वर्षाचे २००० तासाचे $४०,०००.
याचे भारतीय रुपयात २६ लाख ४० हजार. यातील ५०% जरी काम करण्याला द्यायचे म्हणले तरी १३ लाख रुपये होतात. म्हणजे वर्षाचा पगार १३ लाखाच्या पुढे गेला म्हणजे ती व्यक्ती कंपनीला नुकसानीची आहे. मार्केट मध्ये स्पर्धा खूप आहे त्यामुळे नफा खूप कमी होत आहे.
यात आपले काम niche (स्पेशल ) स्किल असेल तरच मार्केट मध्ये राहू शकतो.
19 Jun 2017 - 8:55 pm | माहितगार
एवढी माहिती दिली आहेत, बाकी ओव्हरहेड्स बद्दल सुद्धा माहिती द्यावी म्हणजे व्यवसायाचे स्वरुप अधिक नेमकेपणाने स्पष्ट होईल.
19 Jun 2017 - 10:03 pm | राघवेंद्र
आय टी सर्विसेस मध्ये दोन प्रकारचे लोक असतात.
१. Billable - ज्यांचे कामाचे तास client ने मान्य करून त्या कामाच्या तासाच्या बदल्यात रक्क्म मिळते. Fixed Price कामामध्ये पण 'क्ष ' लोकांच्या कामाचा मोबदला असे billing मान्य झाले असते. थोडक्यात आय टी मध्ये जेवढे Billable तेवढे उत्पन्न.
२. Non - Billable - यात उरलेले सर्व जण म्हणजे CEO पासून ते सेक्युरिटी गार्ड पर्यंत तसेच कंपनीच्या शेअर होल्डर सुद्धा. आजकाल काही प्रमाणात IT मॅनेजर हा सुद्धा Non - Billable असतो.
यामुळे HR लवकरात लवकर प्रत्येकाला Billable करण्याच्या बदल्यात स्किल-सेट कडे फार न बघता प्रोजेक्ट देतात.
आधी नवीन कोड लिहावे लागत होते पण आता automated tools मुले खूप नवीन काम फक्त configuration होते त्यामुळे development टीम लहान आणि त्यामुळे टेस्टिंग टीम पण लहान होत आहेत.
20 Jun 2017 - 10:58 am | मुक्त विहारि
ही "अमेरिकन पद्धत" आहे का?
कारण वकीलांच्या फर्म मध्ये पण असेच असते ना?........ माहितीचा स्त्रोत जॉन ग्रिशॅम ह्यांच्या कादंबर्या.
मुलाला योग्य ते इंजिनियरिंगचे शिक्षण देण्यापुर्वी, श्री.अच्युत गोडबोले, ह्यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनी जे सांगीतले त्यात पण "आय.टी. क्षेत्र हे सेवा-भावी किंवा सेवा देणारे क्षेत्र आहे. जो अद्ययावत सेवा, तत्परतेने आणि कमी पैशात देईल, तोच टिकेल." ह्या वाक्याचाही समावेश होता. आज ६=७ वर्षांनी, त्यांच्या वाक्याची सत्यता पटत आहे.
20 Jun 2017 - 8:12 pm | एकुलता एक डॉन
श्री.अच्युत गोडबोले, ह्यांच्या मते चांगले क्षेत्र कोणते
20 Jun 2017 - 8:32 pm | मुक्त विहारि
ते मी त्यांना विचारले नाही.
कारण चांगले क्षेत्र नक्की कुठले? ह्यावर पंचतंत्रात फार उत्तम कथा आहे.
21 Jun 2017 - 10:29 am | चिकित्सक
हिला पूर्णपणे अमेरिकन पद्धत नाही म्हणता येणार प्रॉजेक्ट बीलिंग आणि इन्वाइस च्या खूपश्या पद्धती असतात त्यायत फिक्स्ड बीड , टाइम एण्ड मटेरियल आहेत , टी एण्ड एम हे अन्य सॉफ्टवेर सर्विस कंपनीज़ नी इन्फोसिस कडून उचलल आहे |
21 Jun 2017 - 3:17 pm | श्रीगुरुजी
Fixed Price आणि Time and Material प्रमाणे Capped Time and Material नावाचा एक भयंकर बिलिंग प्रकार आहे. या प्रकारात प्रोजेक्टच्या टोटल बिलिंग ची रक्कम फिक्स्ड असते, परंतु एकूण कामाचे तास ठरलेले नसते.
इन्फोसिस मध्ये असताना यूबीएस या बँकेचे काम मिळविण्यासाठी आमच्या स्वित्झर्लॅड मधील मार्केटिंगच्या माणसाने सुरवातीच्या पायलट प्रोजेक्ट साठी Capped Time and Material बिलिंग असलेले काँट्रॅक्ट केले होते. जेमतेम १२ पर्सन मंथ्सचे बिलिंग मिळणार होते. परंतु ६ माणसांनी २ महिने काम केल्यानंतर सुद्धा क्लाएंट काम देणे थांबवेना. शेवटी तब्बल ५ महिने उलटून गेले. तोपर्यंत आम्ही ३० महिन्यांचे काम केले होते, परंतु करारानुसार १२ महिन्यांचेच बिलिंग करता आले. वरीष्ठ व्यवस्थापक संतापून सर्वांना शिव्या हासडत होते. शेवटी मी स्वतः स्वित्झरलँडला जाऊन मार्केटिंगच्या माणसाबरोबर यूबीएसच्या मॅनेजरला भेटून, अक्षरशः त्याचे पाय धरून प्रोजेक्टचे काम संपवायची विनंती केली. This project is bleeding us from all directions. We're chasing a moving target. Seems there is no end to this project. या शब्दात त्याला आमची व्यथा सांगितली. शेवटी त्याने प्रोजेक्टमध्ये नवीन काम न देता पुढील काही दिवसात प्रोजेक्ट संपविण्याचे आश्वासन देऊन आमची सुटका केली.
21 Jun 2017 - 10:23 am | चिकित्सक
हे बरचस एक्सचेंज रेट वर सुद्धा डिपेंड असत , रुपया मजबूत होतोय ह्या कारणा मुळे , सर्विस बेस्ड कंपन्याचे मार्जिन वर विपरीत प्रभाव पडलाय , ओवरसीस क्लाइंट ना भारतातल्या कंपनी ला काम देण्याहून विएतनम , फिलिपिन्स , स्पेन , बांगलादेश , श्रीलंका रश्या सारख्या देशांत काम देण परवडत् | दुसर म्हणजे १३-१४ लाख आजच्या महागाई च्या काळात काहीच नाहीत वर्षाला ५-६ लाख लोक घर गाडीचा हफ्ता भरतात वर २-३ लाख सरकार ला टॅक्स द्यावा लागतो उरल्या ३-४ लाखात इन्षुरेन्स , इनवेस्टमेंट, बायको-मुलांचे आजारपण , मुलांचे शिक्षण त्यांचेकपडे , व्ह्या पुस्तके ह्यात जातात | साधारण ३०-३२ वयाच्या आईटी प्रोफेशनल्स चा पगार त्यांचा स्किल सेट आणि एक्सपीरियन्स अनुसार १३-१४ लाख सहज असतो आणि एकदा तुम्हाला १० वर्षांच्या पुढे एक्सपीरियेन्स झाला कि नव्या ऑपर्चुनिटीस कमी होतात , तुमची प्रॉफीतीबीलेटी कमी होते |
21 Jun 2017 - 9:15 am | कलंत्री
स्वेच्छानिवृतीचा मार्ग उपलब्ध असताना कंपन्या इतका घोळ का घालतात हेच समजत नाही. गोल्डन शेकहॅड करुन कामगार आणि कंपन्या एकमेकांना रामराम करु शकतात ना?
21 Jun 2017 - 10:14 am | गॅरी ट्रुमन
हे वयाची पन्नाशी ओलांडलेल्यांना शक्य आहे. पण तिशीतल्या कर्मचार्यांना हे कसे शक्य आहे? कुटुंबाची जबाबदारी असते, होमलोन घेतलेले असले तर त्याचे हप्ते असतात. मग अशावेळी असा रामराम करता येणार नाही ना.
21 Jun 2017 - 11:53 am | मुक्त विहारि
जितका-जितका मी पुढचा विचार किंवा पुढील आयुष्याचा विचार करतो, तितका-तितका मी स्वयंरोजगाराकडे वळत आहे.
माझ्या मुलांना तरी मी एकच सल्ला दिला आहे, "एक वेळ विडी-सिगारेटची टपरी टाका किंवा वडा-पाव विका, पण गुलामगिरी कधीच करू नका.गुलामगिरी कधीचपूर्ण वेळ फायदेशीर नसते.(अर्थात ह्याला पण अपवाद आहेतच.) व्यसने आधारीत धंद्यांना कधीच मरण नसते आणि ते धंदे जमत नसतील तर, खाण्या-पिण्या आधारीत धंदे उत्तम."
जाताजाता,
बाजारात कितीही मंदी असू दे, राजश्री लॉटरी. बियरबार, पान-तंबाखूच्या टपर्या ह्यांची गिर्हाईके काही कमी होत नाहीत.लोकसंख्या वाढीच्या प्रमाणा पेक्षाही, ह्या व्यसनी लोकांचे प्रमाण जास्त वाढत आहे.
21 Jun 2017 - 12:56 pm | विशुमित
मी स्वयंरोजगार आणि कोणत्याही कामाला/धंदा/ व्यवसायाला बिलकुल कमी लेखात नाही पण ...
धंदा टिकून ठेवण्यासाठी करावी लागणारी गुलामगिरी नोकरी करण्याच्या गुलामगिरी पेक्षा खूप भयावय आहे.
मोक्याच्या ठिकाणी टपरी आणि वडापावची गाडी टाकण्यासाठी आणि त्या टिकवण्यासाठी कितीजणांचे तळवे चाटावे लागतात हे फर्स्ट हॅन्ड अनुभव असणाऱ्या धन्देवायिकांना विचारून बघा.
दारूचे दुकान चालवणाऱ्यांचा पैसा दिसतो पण समाजात किंमत शून्य..!!
(विनंती: काका भावनेच्या भरात स्वतःच्या मुलांना असल्या धंद्याचे सल्ले कृपया नका देऊ. फुल्ल टाईम शेती करायचा तर नकोच नको.)
21 Jun 2017 - 1:20 pm | दीपक११७७
एकंदर काय? तर इतरांना गुलाम बनवणे हे मानवी स्वभावातच आहे, मग तुम्ही धंद्यात असा, नोकरीत असा किंवा शेतीत असा
21 Jun 2017 - 2:52 pm | मोदक
विनंती: काका भावनेच्या भरात स्वतःच्या मुलांना असल्या धंद्याचे सल्ले कृपया नका देऊ.
सहमत.
मुवि काका,
तुमचे धागे आणि एकंदर विचार वाचत आहे. तुम्ही जे चाकोरीबाहेरचे प्रयोग करत आहात त्यातून चांगले झाले तर कुणालाच काही अडचण असणार नाही पण असे वेगळे प्रयोग अंगाशी आले तर सगळा दोष तुम्हालाच दिला जाईल. तुम्हाला त्याची टोचणी लागणार नसेल तर प्रश्नच मिटला पण तसे नसेल तर एक "प्लॅन B" हाताशी असूद्यात.
अगदीच रहावले नाही म्हणून सांगितले. राग मानू नये.
23 Jun 2017 - 10:32 am | मुक्त विहारि
प्लॅन "ब" प्लॅन "सी" आणि प्लॅन "डी" हाताशी आहेत.
कारण, आता एकाच आर्थिक स्तोतावर अवलंबून राहणे, कुणालाच परवडत नाही.
किंबहूना आमची सगळी गणितेच उलटी असल्याने, आधी इतर प्लॅन्स झाले, त्यामुळेच प्लॅन "ए" कडे वळत आहे.
देअर इज नथिंग टू लूझ.
21 Jun 2017 - 3:42 pm | अभ्या..
मूविकाका सॉरी टू से पण असले भंकस सल्ले मुलाला देण्यापेक्षा त्याला त्याचे स्वतःला काय येते अन काय करायचे ह्याचा विचार करायला पात्र करायला हवे. आपण यशस्वी पालक असाल, तुमच्यापुढे मि फार छोटा आहे पण असले सल्ले तुमच्याकडून अपेक्षित नाहीत. खान्यापिण्याच धंदे काय कुणीही उठून करावेत इतके सोपे नाहीत. माझ्या डोळ्यासमोर गेल्या वर्षात 10 नवीन हॉटेल बंद पडलेत. ते फार विचारपूर्वक, आवडिने आणि डोक्यानेच करायचा धंदा आहे.
धंदा करणाऱ्याच्या घरात तसे वातावरण ही फार महतत्वाचे असते. निम्मी मराठी व्यावसायिक पीढ़ी याबाबतित कमनाशिबि असते. दारात देनेकरी आला की थरथर कापरे भरणार पालक पोराला काय धंद्यात पडू देणारेत. कुठल्याही परिस्थितिवर डोस्के शांत ठेऊन येता काळ पाहायला वेगळेच संस्कार लागेतात. गुजराती मारवाड्यात ते कैसे येतात ते मि तुम्हाला सांगायला नको.
धंदा सोपा नाही आणि नोकरी म्हणजे गुलामगिरी नाही.
मुद्दा हा की त्याला काय करायचेय.
21 Jun 2017 - 6:59 pm | राघवेंद्र
एक नंबर अभ्या !!!
सल्ला/विचार पटले
22 Jun 2017 - 1:37 pm | अप्पा जोगळेकर
दारात देनेकरी आला की थरथर कापरे भरणार पालक पोराला काय धंद्यात पडू देणारेत. कुठल्याही परिस्थितिवर डोस्के शांत ठेऊन येता काळ पाहायला वेगळेच संस्कार लागेतात.
ही एक विशिष्ट पिढी होती. सरकारी नोकरी सर्वोत्तम, कर्ज कधी काढू नये, कोणाचे उपकार घेऊ नयेत वगैरे विचित्र संस्कार हळू हळू काळाच्या पडद्याआड गेले.
आता खाजगी किंवा बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करुन घरासाठी अवाच्या सवा कर्ज काढणे किंवा धंद्यासाठी कर्ज काढणे यात फारसा फरक नाही.
म्हणजे रिस्क फॅक्टर सारख्याच मापाचा आहे.
आयुष्य चढउतारांचे असते हे बहुतांश जणांनी आता स्वीकारले आहे.
22 Jun 2017 - 8:27 pm | उपेक्षित
अतिशय उत्तम प्रतिसाद अभ्या भाऊ आणि मोदक यांना पण अनुमोदन.
स्वतः सध्या धंदा करत आहे, नशिबाने बरा चालू आहे धंदा पण या आधी ४/५ वेळा तोंडावर सपाटून आपटलो आहे आणि प्रत्येक वेळी परत शून्यातून सुरवात केली आहे, पण सगळ्यांनाच हे जमेल असे नाही अपयश पचवायची ताकत असेल तरच खरे आहे.
23 Jun 2017 - 10:52 am | मुक्त विहारि
ते तर आहेच किंबहूना तेच महत्वाचे पण आहे.
पण, बर्याचदा होते असे की, मुलांना कधीतरी असे वाटते की, बस्स झाली ही नौकरी. पण त्यावेळी वाढलेले वय, वाढलेला आर्थिक खर्च, जोडीदारांची स्थिरते कडून अस्थिरतेकडे न जाणारी मानसिकता. (बर्याचदा ही आर्थिक अस्थितरता १००० दिवसांपेक्षा जास्त नसते. किंबहूना योग्य आर्थिक नियोजन केले तर १००० दिवसात कुठल्याही कामात यश मिळतेच आणि त्याला फक्त २च गोष्टी लागतात. चिकाटी आणि समर्पित भावना...... ह्या २ही गोष्टींवर तर आत्ता पर्यंत जगलोय.), नातेवाईकांचे टोमणे (भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसी.)
शिवाय आजकाल सर्वच्ग क्षेत्रात, विशेषतः नौकरीत, स्पर्धा इतकी वाढली आहे की, अगदी एका ग्लासातले मित्र पण नौकरी टिकवण्यासाठी मित्राचे/मैत्रिणीचे गळे कापायला तयार होतात.
स्वयं-रोजगार जर युनिक असेल आणि गिर्हाइकांना देव मानलेत तर, कुठल्याही स्वयं रोजगाराला यश मिळतेच मिळते.(इथे एम.एल.एम. हा स्वयंरोजगार नाही, मित्रांचे गळे कापणे, हा कसला आलाय स्वयं-रोजगार)
"दारात देणेकरी आले की थरथर कापरे भरणारे पालक पोराला काय धंद्यात पडू देणारेत?"
एक नंबर वाक्य. आपल्याच मुलाला परत विकत घेणारे बाप बघीतले आहेत.त्यामुळे ह्या वाक्याला प्रचंड सहमत.तुला ह्या वाक्याबद्दल आमच्या सौ.च्या हातची चिकन-बिर्याणी किंवा आमच्या हातची पाव-भाजी लागू.कधीही ये.तुमचे गांव ते डोंबोली फार जास्त अंतर नाही.
23 Jun 2017 - 11:16 am | अभ्या..
डोम्बोली पेक्षा तुमच्या वावरावर बोलवा. पळत एईन.
वावर हाय तर पावर हाय ;)
23 Jun 2017 - 5:50 pm | मुक्त विहारि
ओके
नोटेड...
आता ऐनवेळी टांग मारू नकोस म्हणजे मिळवले.
बरेच मिपाकर ऐनवेळी टंग मारतात. (मी पण मारलेली आहे. उगाच आम्ही नाही त्यातले असे म्हणण्यात काही अर्थ नाही. शिवाय सोलापूरातून येत असल्यास "शेंगदाण्याची चटणी" न आणल्यासही हरकत नाही.)
23 Jun 2017 - 5:23 pm | दीपक११७७
विशुमित जी, अभेंद्र जी आणि मुवी जी यांचे विचार समांतर आहेत पण १००% सत्य ही आहेत. शिवाय परिपक्व सुध्दा आहेत.
यातील एक स्विकारुन दुसरा नाकारणे संयुक्तिक होणार नाही.
यास पर्याय म्हणजे संबंधीत व्यक्ती कुठली(नोकरी की व्यवसाय) गुलामगिरी करण्यासाठी तयार आहे हे त्या व्यक्तीलाच ठरवू द्यावे.
जेणे करुन त्याला फार वाईट वाटणार नाही व तो ते काम (नोकरी कींवा व्यवसाय) निमुट पणे करेल.
23 Jun 2017 - 5:24 pm | दीपक११७७
अभेंद्र जी एवजी अभ्या जी असे वाचावे
23 Jun 2017 - 6:21 pm | कपिलमुनी
हे आवडल्या गेल्या आहे
23 Jun 2017 - 7:44 pm | अभ्या..
मला तर उगीचच युपीच्या मंत्रीमंडळात शपथविधी झाल्यागत वाटले क्षणभर.
लगेच कम्मुचा प्रतिसाद दिसला, म्हणलं "हाय, आपल्या लोकातंच हाय"
24 Jun 2017 - 10:18 am | विशुमित
अभेंद्रजी ...!!
भारदस्त वाटतंय नाव हे...
आवडलं गेलाय
24 Jun 2017 - 6:49 pm | दीपक११७७
अनुमती असेल तर अभ्या या आयडीला अभेंद्रजी म्हणत जाईल.
_/\_
15 Jul 2017 - 5:07 pm | ज्ञानोबाचे पैजार
अभेंद्र मिपाचे धर्मेंद्र आहेत
पैजारबुवा,
15 Jul 2017 - 5:10 pm | अभ्या..
पैजारबुवा, अन्याव करु नका हो, धर्मेंद्राची लेकरं पण आता म्हातारी झाली. नातवासाठी पिक्चर काढायले पाजी आता. ;)
मला बसंती सापडेना अजून. :(
15 Jul 2017 - 9:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
सोलापूरात एखादी उंच पाण्याची टाकी पण नाही की काय ?! :) ;)
21 Jun 2017 - 7:21 pm | अभिजीत अवलिया
नोकरी म्हणजे निव्वळ गुलामगिरी ही चुकीची कल्पना वाटते. जवळपास प्रत्येकाला आपण नोकरी न करता धंदा करावा असे वाटते. पण चित्रपटात दाखवतात तसे 'केला धंदा सुरु आणि ६ महिन्यात धंदा यशस्वी होऊन गाडी बंगला घेतला' इतके ते सोपे नाही. असंख्य समस्या असतात.
21 Jun 2017 - 10:16 pm | एकुलता एक डॉन
नोकरी म्हणजे गुलामगिरी फक्त मालक बदला येतो
23 Jun 2017 - 10:54 am | मुक्त विहारि
त्या तर स्गळ्याच ठिकाणी असतात.
पण ह्या मुद्द्यावर आपण सविस्तर चर्चा नंतर करू.आता टंकाळा आला आहे.
22 Jun 2017 - 1:54 pm | आदूबाळ
नोकरी म्हणजे गुलामगिरी हे सरसकट विधान मलाही नाही पटलं. हे म्हणजे लग्न फक्त शरीरसंबंधांची सोय म्हणून करतात, सगळ्या क्रिकेट मॅचेस फिक्स असतात, सगळे राजकारणी चोर असतात, सगळ्या नट्या छिनाल असतात वगैरे सोप्या, सरसकट (आणि त्यामुळेच) लोकप्रिय axioms आहेत त्यातला प्रकार आहे.
23 Jun 2017 - 11:04 am | मुक्त विहारि
हे वाक्य जरी सरकटी करण असले तरी पण ते माझ्या अनुभवानुसार योग्य आहे.
एखादा मनुष्य जर अतिशय स्थिर नौकरीत असेल तर त्याला हे वाक्य लागू होणार नाही.पण आजकाल अशा स्थिर नौकर्या किती आहेत? अगदी आय.ए.अस. अधिकार्यांना पण मारहाणीच्या आणि वेळप्रसंगी जीव गमावण्याच्या घटना ह्याच पवित्र देशांत घडलेल्या आहेत.(त्या अधिकार्याच्या नंतर आलेला अधिकारी मात्र अशा हल्ल्यांचा बळी ठरत नाही, ह्यामागचे कारण मात्र गुलदस्ताच आहे.) लोकसंख्यावाढीच्या प्रमाणात स्थिर नौकर्यांचे प्रमाण नगण्याच आहे, असे माझे अनुभव आहेत.
तुमचे अनुभव माझ्या पेक्षा वेगळे असल्याने, तुमची मते वेगळी असणे पण स्वाभाविकच आहे.
23 Jun 2017 - 11:09 am | आदूबाळ
सहमत आहे. म्हणून तुमच्या अनुभवातून जन्म घेतलेल्या तत्वांबरहुकूम तुमच्या मुलाला वागायला लावणं पटलं नाही.
23 Jun 2017 - 11:14 am | अभ्या..
वई तो कय रिया मई
23 Jun 2017 - 1:38 pm | अप्पा जोगळेकर
कशाकरता स्थिर नोकरी पाहिजे. त्याने शैथिल्य येते उगाच.
22 Jun 2017 - 7:26 pm | मराठी कथालेखक
या विषयात अनेक मुद्दे आहेत. काही वर मांडले गेले आहेत तर काही नाहि.
मी आता एकच मुद्दा मांडू इच्छितो.
ज्या कंपन्या मोठ्याप्रमाणावर कर्मचारी कमी करत आहेत त्य स्वतःचेही नुकसान तर करुन घेत आहेत आणि एका दुष्टचक्रात स्वतःला अडकवत आहेत असे मला वाटते.
म्हणजे असे की एखादी कंपनी (उदा: विप्रो) मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कमी करत असेल तर एखादा अनुभवी व्यक्ती विप्रोत जाण्यापुर्वी दहावेळा विचार करेल , गरजेच्या वेळेला विप्रोला लवकर योग्य गुणवत्ता असणारे कर्मचारी मिळणे कठीण होईल. मग त्यातून मार्ग म्हणजे मार्केटपेक्षा जास्त वेतन द्या.. म्हणजे मग जॉब सिक्युरिटीची रिस्क आहे तर रिस्कसाठी अधिक प्रिमियम म्हणून काही लोक विप्रोत येतील. पण याने विप्रोची ARC (average resource cost) वाढेल. त्यामुळे गिर्हाईकाला ते भाव वाढवणार, परिणामी त्यांची स्पर्धात्मकता कमी होणार, परिणामी त्यांना मिळणारे काम कमी होणार, परिणामी पुन्हा कर्मचारी कपात.... आणि पुन्हा नवीन कर्मचार्यांना आकर्षित करण्याकरता मोठाले पगार.
बघा पटतंय का ?
22 Jun 2017 - 7:54 pm | sagarpdy
उपयुक्तता नसलेले कर्मचारी कमी केल्यास ते वेतन उपयुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांकडे वळवता येईल. वेतन सुधारल्यास नवीन कर्मचाऱ्यांना आकर्षित करणे शक्य होईल. अनुपयुक्त असल्यास नोकरीवरून कमी करण्याची शक्यता असल्याने कर्मचारी reskill होण्याचा किमान प्रयंत्न करतील.
आणि हेच तत्त्व बऱ्याचशा कंपन्यांनी अवलंबल्यास वेतन फुगवटा होणार नाही.
लिन प्रोसेसेस मध्ये अनुपयुक्त गोष्टी काढूनच टाकायच्या असतात.
अर्थात वरील कपात हि केवळ उपयुक्तता या एका मुद्द्यावर असल्यास हे सर्व.
23 Jun 2017 - 6:03 pm | मराठी कथालेखक
उपयुक्तता कशी ठरते ?
एखादा कर्मचारी .Net वर काम करत होता तो प्रोजेक्ट आता संपला , .Net चे आणखी प्रोजेक्ट नाही, त्याला जावा येत नाही म्हणून तो उपयुक्त राहिला नाही असे नसते.
जो कर्मचारी मनापासून काम करत नाही, बेजबाबदारपणे वागतो, नवीन शिकण्याची इच्छा नाही, टीमसोबत नीट मिसळून काम करत नाही ई आणि समज देवूनही त्याच्यात सुधारणा होत नाही अशा कर्मचार्याला जरुर काढावे.
अजून लिहिण्यासारखे आहे या मुद्यावर, नंतर पुन्हा लिहितो.
13 Jul 2017 - 12:59 am | थॉर माणूस
सपोर्टचे वा मेंटेनंसचे काम करणार्या कंपन्यांना कधी कधी हायर एन्ड फायर पॉलिसी सोयीची वाटते. आपल्याकडे नव्या दमाच्या इंजिनीअर्सची कमतरता नसते. मग काही वर्ष जुने आणि स्कील फारसे न बदललेले कर्मचारी काढून तिथे नवे स्वस्त कर्मचारी येतात. प्रॉडक्ट किंवा रीसर्च ओरिएंटेड कंपन्यांना असे करता येत नाही.
13 Jul 2017 - 3:46 pm | मराठी कथालेखक
इंजिनिअर्सची कमी नसते हे जरी खरं असलं तरी जॉब बदलताना कर्मचारी पगारवाढ मिळेल हे बघतातच आणि ज्या कंपनीत जॉब सिक्युरिटी कमी तिथे जॉईन करायचे असेल तर जास्त हाईक मागतात किंवा जॉईन करतच नाही.
22 Jun 2017 - 8:19 pm | दादा कोंडके
'नोकरी म्हणजे गुलामगिरी, स्वतः स्वतःचे मालक व्हा' या आशयाची यलायशीची अतिशय भंपक जाहिरात आहे. वास्तविक ही एजंट लोकं अतिशय लाळघोटे असतात. मागे यलायशी आणि आरटिओ चा एजंट असलेल्या माझ्या मित्राने या क्षेत्रात खूप स्पर्धा आहे
(संपादित)
23 Jun 2017 - 11:14 am | मराठी_माणूस
धन्यवाद संमं.
18 May 2021 - 6:26 pm | एकुलता एक डॉन
धन्य वाद