जुन्या चावडीत चर्चा केल्याप्रमाणे धाग्याचा Final Draft इथे देतोय. धागा कधी टाकावा याविषयी आपले मत कळवा.
नमस्कार मिपाकरांनो.
नुकतेच भरगच्च उपक्रम पार पडलेले असल्याने थोडासा विसावा घेऊन मिपाकरांना जरा हलक्या फुलक्या लिखाणासाठी आता मस्त संधी आहे. १ मे रोजी होणार्या महाराष्ट्रदिनानिमित्त मिपाकरांनी चारोळ्यांची बरसात करावी अशी इच्छा आहे. शीघ्रकवी, चारोळी स्पेशालिस्ट, विडंबन, सुडंबन स्पेशालिस्ट, विनोदी कवी, प्रेमकविता अन निसर्गकवितांची झडी लावणार्या कवी/कवयत्रींची मिपाला कधीच कमी पडली नाही. आता विषय सोपा, जिव्हाळ्याचा अन स्पेशल आहे. तेंव्हा किबोर्डावर नाचू देत आपली बोटे. येऊ देत काही चारोळ्या. नव्हे...... चार ओळी आपल्या महाराष्ट्रासाठी.
विषय : महाराष्ट्र
अट एकदम सोपी: चार ओळी असाव्यात. एका ओळीत जास्तीत जास्त आठ शब्द असावेत.
मिपाकरांनी आपल्या चारोळ्या या धाग्याच्या खाली प्रतिसादात लिहाव्यात.
एका लेखकाने एकच चारोळी स्पर्धेसाठी द्यावी. प्रतिसादात 'स्पर्धेसाठी' असे स्पष्ट नमूद केलेले असावे.
स्पर्धेसाठी नसणाऱ्या चारोळ्या याच धाग्यात देण्यास हरकत नाही.
चारोळ्या देण्याचा अंतिम दिवस दि. २८-०४-२०१७ रात्री १२.०० (भा.प्र.वे.) असेल.
परिक्षक ह्या चारोळीतून ३ विजेत्या चारोळी निवडतील.
निकाल १ मे रोजी महाराष्ट्रदिनाला जाहीर केला जाईल.
चला तर मग
महाराष्ट्राची महती, मिपाकर गाती.
----
प्रतिक्रिया
25 Apr 2017 - 7:41 pm | अभ्या..
सहमत आहे. होउन जाउ द्या
25 Apr 2017 - 7:42 pm | जव्हेरगंज
जुनी चावडी आणि whatsapp वरील चर्चेनुसार हा धागा मेनबोर्डावर टाकत आहे.
25 Apr 2017 - 7:50 pm | पद्मावति
+१
25 Apr 2017 - 9:37 pm | पद्मावति
हा धागा लोकांच्या नजरेत यायला हवाय...कारण वेळ नाही अजिबात. मेन बोर्डावर एखादी सूचना ठळक अक्षरात टाकता येईल का की चारोळी स्पर्धा आहे त्याचा धागा आहे म्हणून..
25 Apr 2017 - 9:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
होउन जाउ द्या.
25 Apr 2017 - 10:45 pm | एस
धागा मेन बोर्डावर टाका. @नीलकांत व प्रशांत, आपली परवानगी आहे असे गृहित धरावे काय? आता अजिबात वेळ उरलेला नाहीये. उपक्रम छोटासा आणि हलकाफुलका आहे. करायचा असेल तर लवकरात लवकर सुरू केलेला बरा.
25 Apr 2017 - 10:50 pm | एस
मेन बोर्डावर धागा आलेला पाहिला नव्हता. क्षमस्व.
27 Apr 2017 - 4:39 pm | पद्मावति
चारोळ्या द्यायची मुदत 29 किंवा 30 पर्यंत वाढवायची का? का उद्यापर्यंतच ठीक आहे. वाढवायची असेल तर धाग्यात सांगता येईल ठळक अक्षरात.
27 Apr 2017 - 6:24 pm | अभ्या..
२९ रात्री १२.०० (भा.प्र.वे.) सांगावी असे वाटते.
उद्या जाहीर करावे दुपारी.
28 Apr 2017 - 1:15 pm | एस
अनुमोदन.
27 Apr 2017 - 7:56 pm | पद्मावति
२९ ला अनुमोदन.
28 Apr 2017 - 1:10 pm | जव्हेरगंज
@एस, @आदूबाळ
what you think?
30 Apr 2017 - 8:11 pm | तुषार काळभोर
२२-२३ ला चर्चा करून , २४ ला draft करून स्पर्धा आयोजित करून, केवळ पाच दिवस स्पर्धेला देऊन, ३०ला निकाल तयार!!!
Whatsapp व चावडीत आयोजनाची चर्चा करून इतक्या अल्पकालीन तयारीने स्पर्धा 'विचार ते निकाल (विजेत्या चारोळीचे बॅनरसहित!)' अशा टप्प्यातून सुनियोजित पद्धतीने पार पाडणाऱ्या साहित्य संपादकांचं व परीक्षकांचं अभिनंदन!
30 Apr 2017 - 9:08 pm | जव्हेरगंज
+1
T-20 मॅचसारखी झाली स्पर्धा
सुपरफास्ट!!!
30 Apr 2017 - 10:55 pm | पद्मावति
+१
1 May 2017 - 1:54 am | अभ्या..
हे बॅनर उद्यासाठी.
1 May 2017 - 7:51 am | तुषार काळभोर
हे बॅनर उद्यासाठी.
1 May 2017 - 1:54 am | अभ्या..
:D
महाराष्ट्र दिनाचे बॅनर खुलून दिसतंय!
चारोळी स्पर्धा सुफळ संपन्न झाली!!
1 May 2017 - 3:49 am | पद्मावति
खूप खूप सुरेख बॅनर. विनिंग चारोळी पण खुलून दिसतेय.
अजुन एक म्हणजे, निकालाच्या घोषणे साठी वेगळा धागा काढू या का? लेट्स डू इट इन स्टाइल :)
स्पर्धकांना थॅंक यू आणि विजेत्यांचे अभिनंदन असा.
1 May 2017 - 7:48 am | तुषार काळभोर
धाग्यात फक्त तीन चारोळ्या... Calligraphy स्टाईलने देता येतील का?
1 May 2017 - 9:42 am | जव्हेरगंज
+151
1 May 2017 - 10:29 am | अभ्या..
कलीग्राफिक फ़ॉन्ट्स वापरता येईल. एक्चुअल कालीग्राफिला वेळ लागतो आणि कविता वगैरे ला जास्तच. शीर्षक वगैरे होउ शकते पटकन.
1 May 2017 - 11:47 am | जव्हेरगंज
Online कुठे मिळेल का?
1 May 2017 - 11:47 am | पद्मावति
महाराष्ट्र दिन चारोळी स्पर्धा २०१७ _ निकाल
नमस्कार मंडळी
महाराष्ट दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
या खास दिवसाच्या निमित्ताने घेतलेल्या चारोळी स्पर्धेचा निकाल जाहीर करीत आहोत.
इतक्या कमी मुदतीत सुद्धा आमच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आणि उत्तमोत्तम रचना पाठवल्याबद्दल सगळ्या स्पर्धकांचे मन:पूर्वक आभार.
सर्वच प्रवेशिका खरोखर सुरेख होत्या. स्पर्धेतल्या तीन विजेते खालील प्रमाणे
प्रथम स्थान
ऊल्का
महाराष्ट्राचा परिचय
संस्कृतीने घडावा
मराठीचा पडघम
कर्तृत्वाने वाजावा
द्वितिय स्थान
राघव
कर्मभूमी अन् ज्ञानभूमी ही अजोड इथली नाती!
फुलवायाला माती इथली अगणित तुटली पाती..
"महा"न इतिहासाने नटते "राष्ट्र"भिमानी छाती!!
समृद्धतेच्या आकांक्षांच्या लक्ष उजळती वाती!!
तृतीय स्थान
माम्लेदारचा पन्खा
"हर हर महादेव" नाद गुंजता
सह्याद्री बाहूंना स्फुरण चढे . . . .
माऊलीहूनही मृदू होती ते
महाराष्ट्राचे या उत्तुंग कडे !
यामधे काही पण चेंजस करायचे असतील तर जरूर करा. किंवा वेगळ्या प्रकारे काही करायचं असेल तर तसही करा.
1 May 2017 - 11:48 am | पद्मावति
धाग्यात फक्त तीन चारोळ्या... Calligraphy स्टाईलने देता येतील का?आर्र्र हे वाचलेच नाही मी =)) सॉरी.पण ही खूप खूप मस्तं कल्पना आहे.
1 May 2017 - 1:33 pm | आदूबाळ
हां - आत्ता दिसलं! होऊन जाऊ देत धागा!
1 May 2017 - 2:08 pm | जव्हेरगंज
नमस्कार मंडळी,
महाराष्ट दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
या खास दिवसाच्या निमित्ताने घेतलेल्या चारोळी स्पर्धेचा निकाल आज जाहीर करीत आहोत.
इतक्या कमी मुदतीत सुद्धा आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आणि उत्तमोत्तम रचना पाठवल्याबद्दल सगळ्या स्पर्धकांचे मन:पूर्वक आभार.
सर्वच प्रवेशिका खरोखर सुरेख होत्या. स्पर्धेतल्या तीन विजेते खालील प्रमाणे
~~~~~
प्रथम स्थान : उल्का
महाराष्ट्राचा परिचय
संस्कृतीने घडावा
मराठीचा पडघम
कर्तृत्वाने वाजावा
(टिप : आधीच जाहीर केल्याप्रमाणे या चारोळीला आजच्या बॅनरमध्ये स्थान देण्यात आले आहे)
~~~~~
द्वितीय स्थान : राघव
कर्मभूमी अन् ज्ञानभूमी ही अजोड इथली नाती!
फुलवायाला माती इथली अगणित तुटली पाती..
"महा"न इतिहासाने नटते "राष्ट्र"भिमानी छाती!!
समृद्धतेच्या आकांक्षांच्या लक्ष उजळती वाती!!
~~~~~
तृतीय स्थान : माम्लेदारचा पन्खा
"हर हर महादेव" नाद गुंजता
सह्याद्री बाहूंना स्फुरण चढे . . . .
माऊलीहूनही मृदू होती ते
महाराष्ट्राचे या उत्तुंग कडे !
~~~~~
विजेत्यांचे अभिनंदन आणि स्पर्धकांचे आभार! यापुढेही वेगवेगळ्या उपक्रमांना आपण अशीच उत्स्फूर्त साथ द्याल अशी अपेक्षा ठेवून स्पर्धेची सांगता होत आहे हे जाहीर करतो.
1 May 2017 - 4:10 pm | आदूबाळ
परीक्षण पद्धती:
निकषः
परीक्षण शक्य तितकं ऑब्जेक्टिव्ह असावं असं वाटतं. म्हणून प्रत्येक चारोळीला खालील निकषांवर मोजलं जावं असं वाटतं:
१. विषय ("महाराष्ट्र" या विषयाशी कितपत इमान राखून आहे?)
२. शब्दसंख्या (ओळीत आठापेक्षा जास्त शब्द तर नाहीत ना?)
३. प्रमाणलेखन ('शुद्ध'लेखन नव्हे)
४. गेयता
५. अर्थ
(आणखी काही निकष यात घालावे असं वाटत असल्यास जरूर सांगणे.)
गुणांकन पद्धती:
१. प्रत्येक निकष समान मूल्याचा आहे. (इक्वल वेटेज)
२. प्रत्येक निकषाला आपण प्रत्येकाने दहापैकी गुण द्यावेत.
३. म्हणजे प्रत्येक चारोळीला ५०*३ = १५० पैकी गुण मिळतील.
४. ज्या चारोळ्यांना प्रत्येकाने दिलेल्या गुणांत १० गुणांपेक्षा (२०%पेक्षा) जास्त तफावत आहे त्याबद्दल व्यनिमधून चर्चा करू. (उदा० समजा एका चारोळीला एसभाऊंनी ३० गुण दिले, पद्माक्कांनी ३५ गुण दिले, आणि मी २ गुण दिले, तर मी दिलेले गुण मला जस्टिफाय करता आले पाहिजेत.)
५. सर्वात जास्त गुण मिळवणारी चारोळी जिंकेल.
लॉजिस्टिकः
शनिवारी भाप्रवे रात्रीचे १२:०० वाजता आलेल्या सगळ्या चारोळ्या मी एकत्र करून एका गूगल फॉर्ममध्ये घालेन आणि तुम्हाला पाठवेन. (मला कृपया तुमचे ईमेल पत्ते द्या.) गूगल फॉर्म चालणार नसेल तर एक्सेल शीटही पाठवू शकतो.
मग आपण रविवारच्या दिवसात त्यावर काम करू शकतो. रविवारी संध्याकाळी ६:०० भाप्रवेपर्यंत (दुपारी २:३० बीएसटी) आपण सर्वांनी चारोळ्या वाचून फॉर्म पूर्ण करू.
मग व्यनिच्या चर्चा वगैरे आटोपून आपण सोमवारी कधीही निकाल लावू शकतो.
1 May 2017 - 4:35 pm | जव्हेरगंज
वा!!
खूप कामाची procedure आहे..
जबरा planning
1 May 2017 - 5:33 pm | नीलमोहर
मला तोच प्रश्न पडला होता, डायरेक्ट निकालाचा धागा आला, पण त्यासाठीची निर्णय प्रक्रिया, निकाल पद्धत, त्यासंबंधी चर्चा काहीच इथे दिसून आले नाही, परीक्षक, निकाल इ.बाबत काही म्हणणे नाही, फक्त उपक्रमाची पूर्ण प्रोसेस इथे दिसायला हवी असं वाटतं, या वेळेस जरा घाई झाली ते आहेच, यापुढे,
सा सं चा मिपावर एखादा उपक्रम असेल तर त्याबाबत चर्चा व्हाट्सअप वर होऊ दे, पण इथेही व्हायला हवी, बंदिस्त सा सं चावडी करण्यामागे मालकांचे प्रयोजनच ते आहे ना,
बाकी महाराष्ट्र दिन चारोळी उपक्रम घाईत घेऊनही व्यवस्थित पार पडला, त्यासाठी तुम्हा सर्वांचे अभिनंदन.
1 May 2017 - 5:38 pm | नीलमोहर
आदूबाळ यांच्या प्रतिसादावर,
(कुणी केलं रे मला सा सं :)
1 May 2017 - 6:21 pm | अभ्या..
अहो थोड्या दिवसापूर्वी चावडी बदलली जरा. पण आधीच्या चावडीत ह्यावर चर्चा झालेली होती. सूतोवाच तेथेच झालेले होते. दुर्दैवाने ते धागे उडाले आता.
चावडी बदलण्याच्या ह्या कार्यक्रमामुळे व्हाटसपवर चर्चा जास्त झाली.
येनीवे नवीन चावडीचा पत्ता माहीत झालाच आहे. तुमची खुर्चि पण इथे आहे तेंव्हा ऑलवेज वेल्कम.
सर्वानुमते ठरेल तेच केले जाते, केले जाईल.
कामाबद्दल काही अडचण असेल तर वेल्ला, जॅक स्पॅरो, आदुबाळ ह्यांना त्यांच्या सवडीनुसार विचारणा करा. ;) ते आन्भवी आहेत, सांगतील.
पद्माक्का सोबत आहेच.
2 May 2017 - 12:49 pm | जव्हेरगंज
:)
;)
=))
:P
:(
3 May 2017 - 10:16 pm | एस
एक सूचना. इथून पुढे अशा प्रत्येक स्पर्धेच्या धाग्यात 'परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल. स्पर्धेच्या सर्व अटी व नियम स्पर्धकांवर बंधनकारक राहतील.' असा एक डिस्क्लेमर टाकत जावे. हे परीक्षक कोणीही असोत. संमं, सा-सं वा आमंत्रित मान्यवर मिपाकर.
4 Jun 2017 - 7:51 pm | पद्मावति
चारोळी स्पर्धेमधल्या चारोळ्या एका धाग्यात कंपाइल कराव्या का? आणि मग तो धागा मिपा विशेषांकामधे जोडता येईल.
चारोळी स्पर्धेत सगळ्या स्पर्धकांनीच मनापासून भाग घेतलाय त्यांची मेहेनत नजरेआड नको व्हायला. नाहीतर त्या चारोळ्या प्रत्येक लेखकाच्या ' माझे लेखन' मधे तरी यायला हव्यात पण सगळ्या चारोळ्यांची नोंद असावी.
8 Jun 2017 - 5:19 pm | पद्मावति
येस? नो? काही इनपुट्स?
9 Jun 2017 - 1:34 pm | जव्हेरगंज
i feel there is no necessity to do this.