कधी थांबणार हा क्रूरपणा???????

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
20 Jan 2017 - 12:09 am
गाभा: 

काय वेडेपणा चाललाय! सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली जालिकट्टू नावाची क्रूर प्रथा पुन्हा एकदा सुरू करावी यासाठी तामिळींचा जीव चाललाय. काही ठिकाणी बंदी झुगारून जालिकट्टू आयोजित करण्याचे प्रयत्न झाले. पण पोलिसांनी ते हाणून पाडले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम् यांनी तर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झुगारून जालिकट्टू पुन्हा सुरू करण्याचा अध्यादेश काढावा अशी विनंती करण्यासाठी थेट दिल्ली गाठून पंतप्रधान मोदींची भेट घेतली. सर्वात वाईट भाग म्हणजे संगीतकार रहमान, माजी जागतिक बुद्धीबळ विश्वविजेता विश्वनाथन् आनंद याने सुद्धा जालिकट्टू पुन्हा सुरु करण्यासाठी पाठिंबा दिलाय. ही आमची अत्यंत जुनी परंपरा आहे, आम्ही ती चालू ठेवणारच, आमच्या परंपरेवर बंदी घालण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला कोणी दिला अश्या आविर्भावात निदर्शने सुरू आहेत. जालिकट्टू तामिळींच्या जीवनमरणाचा प्रश्न झाला आहे.

जुनी परंपरा, प्रथा इ. गोष्टी खर्‍या असल्या तरी असल्या प्रथेत मुक्या प्राण्याचा छळ होतोय त्याचं काय? ते बैल काय स्वतः यातना सहन करून तुमची करमणू़क करण्याकरता या जगात आलेत का? एका वाहिनीवर दाखवित होते. एका बैलाभोवती सातआठ लुंगीधारी उभे होते. त्यातला एकजण बैलाची शेपटी ओढून जोरात पिरगाळत होता. दुसरा एकजण शेपटी दाताखाली धरून चावत होता. अरे कशासाठी त्या बैलाला यातना देता? परंपरा आणि प्रथा म्हणून? ही कसली क्रूर परंपरा? मुक्या प्राण्याला यातना देऊन कसली आलीय करमणू़क आणि प्रथा? अंगात एवढी मस्ती असेल तर एकमेकांशी फ्रीस्टाईल कुस्त्या खेळा की. प्राण्यांचा छळ का करता?

स्वतःच्या जिव्हालौल्यासाठी व करमणुकीसाठी मुक्या प्राण्यांना यातना देऊन त्यांचा छळ करण्याची प्रथा व परंपरा खूप जुनी आहे व जगात अनेक देशात ती अजून जिवंत आहे. स्पेनमध्ये बुलफाईट प्रकारात एका बैलाला गल्लीबोळातून पळविले जाते. अनेक जण बैलाच्या मागे पळून त्याला जखमी करायचा प्रयत्न करीत असतात. बैल पळताना बाजूला उभे असलेले बघ्ये बैलाला छोटे बाणाच्या आकाराचे लोखंडी भाले फेकून मारतात. अंगात ठिकठिकाणी भाले घुसलेला तो बैल शेवटी बुलफाईटच्या मैदानात येतो. तिथे तलवारी घेऊन तीनचार जण त्याला तलवारीने जखमी करतात. शेवटी मुख्य मॅटॅडोर येतो व जीवाच्या भीतिने आकांताने धावून थकलेल्या, तलवारीच्या वारांमुळे व अंगात घुसलेल्या भाल्यांच्या जखमांच्या यातनांनी कळवळणार्‍या बैलाचे मस्तक तो तलवारीच्या एका घावात घडावेगळे करतो. जमलेले हजारो प्रेक्षक या मुक्या प्राण्याच्या यातनामय कत्तलीचा आनंद लुटत असतात. मुक्या प्राण्याला इतक्या यातना देताना आनंद कसा मिळू शकतो? वेदनांनी कळवणार्‍या बैलाच्या वेदनांनी करमणूक कशी होऊ शकते?

भारत देखील या घॄणास्पद प्रकारापासून दूर नाही. शेतीसाठी बैल वापरण्याआधी मोठ्या दांडक्याने बैलाचे वृषण चेचून भुगा करून टाकतात जेणेकरून तो गायीबरोबर आपले नैसर्गिक कृत्य करू शकणार नाही. माणूस त्याची नैसर्गिक उर्मीसुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी नष्ट करतो व तीसुद्धा अत्यंत वेदनादायक पद्धतीने. उर्मिला पवार यांच्या 'आयदान' पुस्तकात बैलाच्या खच्चीकरणाचे वर्णन दिले आहे. दांडक्याने वृषण चेचले जात असताना बैलाला किती यातना होत असतील. माणूस त्याला एवढ्या यातना का देतो? बैलाचे वृषण खच्ची करण्याचे काम करणार्‍या नराधमाचे वृषणही असेच चेचून काढले पाहिजेत म्हणजे त्याला त्या यातना कशा असतील ते कळेल. बैलगाडीला जोडण्यासाठी बैलांच्या तळपायात खिळे ठोकून नाल बसवितात. नाल बसविण्यासाठी आधी बैलाला खाली बसवून आडवे पाडतात व त्याचे चारही पाय बांधून मग खिळे ठोकून नाल बसवितात. नाल बसविताना बैलाच्या डोळ्यातून वेदनांनी पाणी वाहत असते. कशासाठी हा क्रूरपणा? मला कधी कधी वाटते की बैलांच्या तळतळाटामुळेच कदाचित शेतकर्‍यांची हलाखीची परिस्थिती असावी. आपल्याला यातना देणार्‍याला बैलांचे शिव्याशाप भोवत असतील.

काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये झालेली'पारंपारिक' मेंढ्यांची टक्कर दाखवित होते. जमलेले प्रेक्षक दोन मेंढ्यांच्या आपापसातील टकरीचा आनंद लुटत होते. दोन्ही मेंढे आपल्या पूर्ण ताकदीनिशी दुसर्‍याच्या कपाळावर जोरदार धडक मारत होते. दोघांनाही वेदना होत असणारच. कदाचित कपाळाची हाडेही मोडत असतील. आणि असल्या क्रूर प्रकाराचा प्रेक्षक आनंद लुटत होते.

काही ठिकाणी कोंबड्यांची झुंज सुद्द्धा लावतात. या झुंजीत कोंबड्याच्या एका पायाला ब्लेडचा अर्धा तुकडा बांधलेला असतो जेणेकरून समोरच्या कोंबड्याचे रक्त निघेल. दोन्ही कोंबडे मूर्खासारखे एकमेकांशी लढाई करून जखमी होतात व माणसे आपली करमणूक करून घेतात.

बैलगाडी शर्यत हा असाच एक क्रूर प्रकार. सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाने या प्रकाराला सुद्धा बंदी घातली आहे. तरीसुद्धा बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करावी यासाठी महाराष्ट्रात जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या शर्यतीतही बैलांना जोरात पळविण्यासाठी शेपटी पिरगाळणे, खिळा लावलेल्या चाबकाचे फटकारे लावणे असे क्रूर प्रकार केले जातात आणि वेदना होत असताना भीतिने बैल जोरात गाडी पळवितात कारण आपली उच्च प्रथा आणि परंपरा!

नवसासाठी व धार्मिक परंपरेसाठी कोंबड्या, बकर्‍या कापणे हा प्राण्यांना यातना देण्याचाच एक प्रकार. हे बळी थांबावेत म्हणून संत गाडगेबाबांनी प्रबोधन करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु अजूनही हा प्रकार सुरूच आहे. मांग जातीत एखाद्याचे लग्न ठरताना किंवा त्याआधी काही वर्षे लग्नासाठी नवर्‍यामुलाच्या नावाने एक डुक्कर सोडले जाते. ऐन लग्नाच्या वेळी हे डुक्कर पकडून त्याला जिवंत जाळून त्याचे मांस खाल्ले जाते. जिवंत जळताना त्या डुकराला किती भयानक वेदना होत असतील. प्रथा व परंपरा या नावाखाली हे क्रूर प्रकार कायमच सुरू राहणार का?

जिव्हालौल्यासाठी जिवंत प्राणी क्रूर पद्धतीने मारणे हे जगभर सर्वत्र केले जाते. कासव, शिंपले, बेडूक, खेकडे इ. प्राण्यांना जिवंतपणीच उकळत्या पाण्यात टाकणे, बदक/हंस इ. प्राण्यांची आत असलेली मान बाहेर काढण्यासाठी त्याच्या तोंडासमोर खाणे धरणे व खाणे खाण्यासाठी त्याने मान सरळ केल्यावर मानेवर घाव घालून त्यांना मारणे अशा क्रूर पद्धतीने हे प्राणी जिभेचे चोचले पुरविण्यासाठी मारले जातात. अरे प्राणी मारायचा असेल तर निदान त्या प्राण्याला भूल देऊन वीजेचा शॉक देऊन वेदनारहीत मरण तरी द्या. हालहाल कशाला करता?

मुक्या प्राण्यांना प्रथा व परंपरेच्या नावाखाली आपल्या करमणुकीसाठी व जिव्हालौल्यासाठी वेदना, यातना देऊन त्यांचा छळ करणे व नंतर मारून टाकणे हे अत्यंत क्रूरकर्म आहे व या प्रकाराचा मला अतिशय संताप येतो. हे सर्व प्रकार तातडीने कायमस्वरूपी बंद व्हायला हवेत. सुदैवाने सर्वोच्च न्यायालय याविषयी सक्रीय असून या प्रकाराला कायद्याने बंदी घालण्यात येत आहे ही समाधानाची गोष्ट आहे.

प्रतिक्रिया

अस्वस्थामा's picture

23 Jan 2017 - 4:32 am | अस्वस्थामा

सॉरी गुरुजी, पण परत एकदा गडबड दर्शवून देतो. दूधासाठी गाईंवर एकामागे एक जबरदस्तीने लादलेली मातृत्वं (आणि त्यासाठीचे जबरदस्तीचे संग इ.इ.) तुम्हाला मान्य आहेत आणि बैलाना चाप लावलेला (आजकाल पशुवैद्यकाद्वारे आयुष्यात एकदाच होणारं अनैच्छिक नसबंदीचं कार्य) मात्र तुम्हाला इतक्या वेदना देतो ?
भूतदयेत पण सोईनुसार होणारे भुमिकाबदल गमतीशीर असतेत इन जनरल ..

त्या लेखातली ही दोन वाक्ये पाहिली असतीलच,

If we truly care about the welfare of the cow, the best way to alleviate their pain is not to milk them, but rather to not continue breeding them.

आणि हे पण,

If one is buying milk with the belief that they need to be milked and this contributes to the cow’s welfare, one must also recognize that they are condemning a male calf to a beef, or more likely, veal farm. As previously stated, all animals in this system are economic commodities. When that cow stops producing milk, it is slaughtered. When the father of the calf stops producing sperm, it is slaughtered.

मोठमोठ्या डेरी फार्मवर गाईंना होणारे गोर्‍हे (खोडं) कुठं जातात आणि फक्त गाई म्हशीच कशा राहतात याचा कधी प्रश्न पडला असेल तर हे वरचं वाक्य त्याचं उत्तर आहे. (अरे हो, गाईंसारखे म्हशी आणि रेड्यांना पशुअधिकार नाहीत नै का. ते फक्त गाई असंच वाचावे मग. ;) )

चिनार's picture

23 Jan 2017 - 10:41 am | चिनार

एक मात्र खरे, 'भूतदया' हा सोयीचा आजार आहे मनुष्याचा... :-)

सहमत ! पण गुर्जी त्यातले नव्हे...लवकरच ते मिल्क पावडर वापरून तयार केलेले दूध वापरतील बहुतेक ..:-)

मी वाट पाहतोय कधी भारताचा सिरीया, इराक अफगानिस्तान होइल अराजक येउन सिस्टीम उलथून पडेल. आर्थिक निकषावर नको तर जातीवर आधारितच आरक्षण यांना हवे आहे. मांसाहाराचे समर्थन करता तर प्राणी कापायला मुसलमान लागतो तुम्हाला, गाय विकणारा हिंदूच असतो कसायाला, दोष देतात मुसलमानांना. सगळे xx दुटप्पी.

शब्दबम्बाळ's picture

22 Jan 2017 - 10:48 pm | शब्दबम्बाळ

च्यामारी! धागा लईच विंटरेस्टींग आहे!
प्राण्यांवर क्रूरता, मांसाहार, जोडप्यांचे पुनरुत्पादन, गोवंश टिकवणे, कीटक नाशक फवारणी, PETA सदस्यत्व, चिंकी ची व्याख्या, पेस्ट कंट्रोल, चाप देणे या सारख्या गोष्टींवर चर्चा होऊन आता पार सीरिया, आरक्षण आणि जातीभेद अशा हक्काच्या गोष्टीपर्यंत आलीये कि!! :D

माझा पण एक प्रश्न,
मेलडी इतनी चॉकलेटी क्यू है??

संदीप डांगे's picture

22 Jan 2017 - 11:22 pm | संदीप डांगे

=)) =))

माझाही एक प्रश्न जोडून घ्या... काहे दिया परदेस...

फेदरवेट साहेब's picture

23 Jan 2017 - 7:43 am | फेदरवेट साहेब

आमचा कसाई हिंदू आहे, मुसलमान कसाई हलाल पद्धतीने कापते, आम्ही ते खात नसतो शीख,हिंदू लोक खटका मटण खातात. ह्या पद्धतीत एका घावात शीर धडावेगळे होते. आता बोला. उगाच अकलेचा पिसारा फुलवू नये, नेमके अवयव उघडे पडतात.

फेदरवेट साहेब's picture

23 Jan 2017 - 9:20 am | फेदरवेट साहेब

ए गुर्जी, दक्षिणेकडे डोक्यावर क्विंटल क्विंटल वजन ठेऊन ज्या मंदिरांच्या अन देवांच्या मिरवणुकी काढल्या जातात हत्तींवरून, त्या बाबतीत तुझं मत काय आहे रे भावसाहेब?

श्रीगुरुजी's picture

23 Jan 2017 - 2:09 pm | श्रीगुरुजी

http://www.loksatta.com/agralekh-news/supreme-court-on-tamil-nadu-jallik...

अत्यंत उत्कॄष्ट अग्रलेख! या अग्रलेखातील शब्दाशब्दाशी पूर्ण सहमत आहे. संस्कृती व परंपरेच्या नावाखाली जालिकट्टूसारख्या अमानुष प्रथेचे समर्थन करणार्‍या आंधळ्या समर्थकांच्या डोळ्यात गिरीष कुबेरांनी झणझणीत अंजन घातले आहे.

_________________________________________________________________________

मोदी आणि त्यांचा भाजप हा समान नागरी कायद्याची भाषा करतो. या कायद्यात विविध धर्म, पंथ आणि जाती यांचे वैयक्तिक कायदे बाजूस सारून एकचएक कायदा सर्वाना लागू होणे अभिप्रेत आहे. जलिकट्टूसारख्या मुद्दय़ावर संस्कृतीनामक अजागळ संकल्पनेसमोर मान तुकवणारे हे सरकार यापुढे कोणत्या तोंडाने समान नागरी कायद्याचा आग्रह धरणार?

क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी जलिकट्टूसारख्या आदिम खेळाच्या पुनरुज्जीवनासाठी शहाणपणास तिलांजली देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाची तुलना राजकीय स्वार्थासाठी शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बाजूस सारणाऱ्या राजीव गांधी यांच्या निर्णयाशीच होऊ शकेल. राजीव गांधी यांनी राजकारणासाठी मानवी प्रतिष्ठा नाकारली. मोदी यांनी याच दळभद्री राजकारणासाठी प्राण्यांच्या जिवास काही किंमत असते हे नाकारले. या दोन निर्णयांची तुलना केल्यास मोदी यांचा निर्णय अधिक पापकारी ठरतो. याचे कारण शहाबानो यांच्या निर्णयाविरोधात बोलण्यासाठी महिलांना आवाज तरी होता. बैलांना तो नसतो. तेव्हा ज्याला आपले मत मांडण्याचा अधिकार नाही त्याचे अधिकार सर्रास तुडवण्याच्या सरंजामी प्रवृत्तीचे मोदी हे प्रतीक ठरतात. त्यामुळे त्यांचा निर्णय अधिक धिक्कारार्ह आणि सुसंस्कृत समाजास मान खाली घालावयास लागणारा आहे. अर्थात विविध कारणांवरील दंगलीच्या निमित्ताने जी राजकीय व्यवस्था मानवी आयुष्यालाच कस्पटासमान मानते त्या व्यवस्थेकडून प्राण्यांच्या अधिकार रक्षणाच्या सुसंस्कृतपणाची अपेक्षादेखील करणे व्यर्थ, हे मान्य. परंतु या निमित्ताने राज्य ते केंद्र अशा सर्वच पातळीवर जे काही विधिनिषेधशून्यतेचे दर्शन झाले ते भीतिदायक म्हणावे लागेल. कोणत्याही सकारात्मक निर्णयासाठी या देशातील व्यवस्था इतक्या कार्यक्षमतेने निर्णय घेऊ शकते याचे एकही उदाहरण स्वतंत्र भारताच्या इतिहासात नाही. परंतु कोणाच्या तरी.. त्यातही मतांचा अधिकार नसलेल्या प्राण्यांच्या.. जिवावर उठणाऱ्या खेळाचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी २४ तासांत चेन्नई ते दिल्ली सर्व यंत्रणा एका सुरात नंदीबैलासारख्या माना डोलावू लागल्या हे निश्चितच व्यवस्थेविषयी घृणा निर्माण करणारे आहे. यातून निर्माण होणारे संभाव्य धोके पाहता या साऱ्याचा सविस्तर समाचार घेणे अगत्याचे ठरते.

त्यासाठी जलिकट्टूच्या समर्थनार्थ जे काही दाखले दिले गेले त्याचा आधी विचार करावा लागेल. जलिकट्टू हा खेळ आहे, त्यात बैलांना क्रूर वागणूक दिली जात नाही, बैलाचे देशी वाण जपण्यासाठी तो खेळला जाणे आवश्यक आहे, तो तामिळ संस्कृतीचे प्रतीक आहे आणि म्हणून तो आमचा हक्क आहे, हे या संदर्भातील प्रमुख युक्तिवाद. ते सर्वथा फोल ठरतात. याचे कारण कोणत्याही खेळात क्रौर्याचा आधार घ्यावा लागत असेल तर मानवी संस्कृतीच्या उत्क्रांतीत त्याचे महत्त्व कमी व्हायला हवे. खेळ हे जीवनशक्तींना आवाहन करणारे आणि आव्हान देणारे असतात. बैलांच्या या खेळाबाबत हे असंभव ठरते. याचे कारण शास्त्रीयदृष्टय़ा हे सिद्ध झाले आहे की जोपर्यंत जगण्यास आव्हान दिले जात नाही तोपर्यंत बैलासारखा शांतताप्रिय प्राणी कधीही संघर्षांचा मार्ग निवडत नाही. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील आपल्या निर्णयात बैलाच्या मानसिकतेचा शास्त्रीय दाखला दिला आहे. हे आव्हान निर्माण झाले की त्यावर मात करणे वा पळून जाणे हे पर्याय बैल निवडतो. म्हणजेच लढणे ही काही त्याची नैसर्गिक प्रवृत्ती नाही. याचाच अर्थ माणूस त्यास अनैसर्गिकपणे लढण्यास भाग पाडतो. त्यासाठी त्याच्या डोळ्यात तिखटाची पूड टाकणे, मद्य पाजणे वा शेपटी पिरगाळणे असे अनेक पर्याय निवडले जातात. तेव्हा यास अहिंसो परमो धर्म हे तत्त्व पाळणाऱ्याचा.. निदान तसा दावा करणाऱ्यचा.. खेळ म्हणावे काय याचे उत्तर मोदी यांनी द्यावे. दुसरा मुद्दा देशी वाणाचा. ते जपण्यासाठी हाच एक मार्ग उपलब्ध आहे काय? या मार्गाने बैलाची प्रजननक्षमता वाढते या युक्तिवादावर फक्त मूर्ख किंवा सरकारी भक्तच विश्वास ठेवू शकतात. तो मान्य केला तर उद्या स्त्री समागमात अत्याचाराचा मार्ग निवडल्यास लैंगिक उद्दीपन अधिक होते हा युक्तिवादही सरकारने मान्य करावा. तिसरा मुद्दा संस्कृतीचा. संस्कृती म्हणजे जगण्याचा उत्सव. हा जीवनाधिकार अमान्य करण्यालाच जर आपण संस्कृती म्हणणार असू तर बामियानचे पुतळे उद्ध्वस्त करणे ही आमची संस्कृती आहे या तालिबानी युक्तिवादाचे काय? अफगाणिस्तान आणि तत्सम मागास प्रदेशांत स्त्रीवर कोणालाही संशय घेण्याचा अधिकार असून तसे झाल्यास भर चौकात तिला दगडांनी ठेचून मारण्याची प्रथा आहे. ती आमची संस्कृतीच आहे, असे संबंधितांचे म्हणणे मोदी सरकार कोणत्या तोंडाने नाकारणार?

यातील शेवटचा मुद्दा संस्कृती आहे म्हणून ती पाळण्याचा आमचा अधिकार आहे हा दावा. या इतका बिनडोक आणि आडमुठा युक्तिवाद दुसरा कोणताच असू शकत नाही. तो तसा आहे हे सिद्ध करण्यासाठी संबंधितांच्या निर्वात विचार पोकळीस हे समजावून द्यावे लागेल की संस्कृती ही प्रवाही असते. ती स्तब्ध नसते. तेव्हा कालानुसार संस्कृती ही उत्क्रांत होत असते आणि या बदलत्या संस्कृतीचा अंगीकार करीत आपली जीवनशैली बदलणे म्हणजे सुसंस्कृतता असते. तेव्हा संस्कृतीला दगड समजून कवटाळत बसण्याचा उद्योग फक्त उभा करीत असतात. पूर्वी याच संस्कृतीत पती निधनानंतर पत्नीने सती जाण्याची प्रथा होती. ही संस्कृती आता यथार्थ ठरते काय? त्यानंतर विधवेस पुनर्विवाह बंदी होती आणि तिला केशवपन करून आलवणात आयुष्य आणि भावभावना गुंडाळून ठेवाव्या लागत असत. ती संस्कृती आपण आताही मान्य करणार काय? संस्कृतीत ज्या वेळी मनोरंजनाची साधनेच नव्हती त्या वेळी राजेरजवाडे प्राण्यांच्या झुंजी लावत. या संस्कृतीचे पालन आपण या काळातही करणार काय? तेव्हा संस्कृती आणि ती पालनाचा हक्क हा दावा निखालस अप्रामाणिकपणाचा ठरतो. मोदी सरकारने या अप्रामाणिकपणाची तळी उचलली आहे. तसेच या संदर्भातील दुसरा मुद्दा न्यायिक आहे. या खेळावर बंदी आणावी अशी मागणी प्राण्यांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने नव्हे तर तामिळनाडू सरकारच्याच पशुकल्याण खात्याने केली होती, या बाबीकडे सध्या सोईस्कर दुर्लक्ष केले जात आहे. त्याचप्रमाणे सर्व क्रूरता वगळून या खेळाची प्रथा पाळली जाईल असे आश्वासन याआधी सर्वोच्च न्यायालयात तामिळनाडू सरकारने दिले होते आणि त्यानंतर नियमाधीन जलिकट्टूस न्यायालयाने मान्यता दिली होती. परंतु या कथित नियमाधीनतेतही नियमांचे सर्रास उल्लंघन झाले असाच निष्कर्ष न्यायालयाच्या समितीने काढला. मूळ जलिकट्टूत तो अभागी बैल आणि त्यास रोखण्याचा प्रयत्न करणारी एकच व्यक्ती अभिप्रेत असते. सध्याच्या जलिकट्टूत त्या अभागी बैलाला अनाडी जमावास तोंड द्यावे लागते. ते पाहून सर्वोच्च न्यायालयाने आपली मर्यादित परवानगी मागे घेतली आणि या ‘खेळा’वर बंदीचा निर्णय जाहीर केला. त्यास बगल देण्याचे पाप मोदी सरकारने केले. यास बिनकण्याच्या तामिळनाडू सरकारपेक्षा मोदी सरकार अधिक जबाबदार आहे. तामिळनाडूत शिरकाव करण्याच्या अतिक्षुद्र इच्छेपोटी त्यांनी हे केले उघड आहे. हाच विचार अन्य राजकीय पक्षांनीही केला. तसेच आपल्याकडील कचकडय़ाचे तृतीयपानी नाचरेही त्याच लायकीचे. त्यामुळे विश्वनाथन आनंद वा रजनीकांत वा कमल हसन यांच्या कृतीचे आश्चर्य नाही. विवेकाच्या आवाजास तोंड फोडणारी मेरिल स्ट्रीप यांच्या गावीही असणार नाही, हे उघड आहे. त्यामुळे हे बिनकण्याचे अन्य राजकीय पक्ष, व्यक्ती आणि मोदी यांचा भाजप यांत काहीही गुणात्मक फरक नाही, हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले. परंतु या त्यांच्या कृत्यामुळे काही अधिक गंभीर प्रश्न निर्माण होतात. ते मांडायला हवेत.

भारतात अठरापगड धर्म आणि जाती आहेत. त्या प्रत्येकाच्या काही प्रथा, परंपरा आहेत आणि विविधतेतील एकता नामक भोंगळ संकल्पनेत त्या बांधल्या जातात. या संकल्पनांत हिंदू अविभक्त कुटुंब ही प्रथादेखील येते. या प्रथेचा आधार घेत या देशातील हिंदूंना प्रचंड प्रमाणावर करबचत करण्याची सोय आहे. या पाश्र्वभूमीवर मोदी आणि त्यांचा भाजप हा समान नागरी कायद्याची भाषा करतो. या समान नागरी कायद्यात विविध धर्म, पंथ आणि जाती यांचे वैयक्तिक कायदे बाजूस सारून एकचएक कायदा सर्वाना लागू होणे अभिप्रेत आहे. जलिकट्टूसारख्या मुद्दय़ावर संस्कृतीनामक अजागळ संकल्पनेसमोर मान तुकवणारे मोदी सरकार यापुढे कोणत्या तोंडाने समान नागरी कायद्याचा आग्रह धरणार? या देशातील मुसलमान, ख्रिश्चन आणि अर्थातच हिंदू हे आपापल्या संस्कृतीचे फणे काढून उभे राहिले तर फालतू खेळासमोर मान तुकवणाऱ्या मोदी सरकारला त्या प्रश्नांवरही माघारच घ्यावी लागेल. हा विचार या सरकारने केला असण्याची शक्यता नाही. क्षणिक राजकीय चमत्कारांसाठी दीर्घकालीन शहाणपणास तिलांजली देण्याचे आपले कसब या सरकारने वारंवार सिद्ध केले आहे. जलिकट्टू हे ताजे उदाहरण. परंतु या निमित्ताने संस्कृती की संविधान हा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो, हे भान सरकारला नाही. जे देश सुसंस्कृत संविधानापेक्षा संस्कृतीसमोर मान तुकवतात त्यांचे काय होते याचे अनेक दाखले आपल्या आसपास दिसतात. हे असेच सुरू राहिले तर आपलाही समावेश त्यांच्यात होण्याचा क्षण फार दूर नाही.

अप्पा जोगळेकर's picture

23 Jan 2017 - 2:46 pm | अप्पा जोगळेकर

महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदीचा कायदा आला तेंव्हा कोणी काय खावे हा वैयक्तिक प्रश्न आहे वगैरे बाता मारत त्याच्यावर टीका केली होती या साहेबांनी.
बैल मारुन खाल्ला तर ती भूतदया, जलिकट्टू मधे पळवला तर कौर्य असे काही असावे.

फेदरवेट साहेब's picture

23 Jan 2017 - 3:35 pm | फेदरवेट साहेब

कुबेरांसारखे दुटप्पी चालून जातात कारण त्यांच्या तथाकथित उच्च विचारांना स्वतःच्या सोयीनुसार डोक्यावर मिरवणारे अस्तित्वात आहेत. सहसा रोज शिव्यादानासाठी प्रातःस्मरणीय असलेले कुबेर मग विचारवंत असल्याचा साक्षात्कार होतो आणि शब्दाशब्दाला सहमती दर्शवली जाते. संधिसाधू पत्रकार संधिसाधू चाहते/विरोधक. हेच सत्य आहे, उगा कुबेरांना शिव्या देऊन काय उपयोग, माल विकला जातोय म्हणुन दुकान सुरु आहे.

संदीप डांगे's picture

23 Jan 2017 - 3:50 pm | संदीप डांगे

अगदी अगदी! हेच लिहिणार होतो...

हतोळकरांचा प्रसाद's picture

23 Jan 2017 - 4:55 pm | हतोळकरांचा प्रसाद

+१. अंजन कसले? जिथे कुठे मोदी ह्या शब्दाचा संबंध असेल तिथे ते नेहमी जे लिहितात तसेच लिहिले आहे. प्राणी भूतदया वगैरे सगळा कांगावा. शाहबानो आणि जलिकट्टू - काहींच्या काही.

अस्वस्थामा's picture

23 Jan 2017 - 4:19 pm | अस्वस्थामा

हा हा हा हा..

आंधळ्या समर्थकांच्या डोळ्यात गिरीष कुबेरांनी झणझणीत अंजन घातले आहे.

हे गुरुजी कुबेरांच्या लोकसत्तेतील अग्रलेखाबद्दल म्हणतायत ?
हहपुवा. स्माइल्या लै मिसतोय राव.. :D

संदीप डांगे's picture

23 Jan 2017 - 4:28 pm | संदीप डांगे

गुरुजी अडचणीचे प्रश्न सतत टाळत आहेत हे दिसतंय. फक्त जल्लीकटू मध्येच (कथित) अत्याचार होतो असे नाही. त्यामुळे खरोखर भूतदया दाखवायची असेल तर माणूस आणि इतर प्राणी यांच्यातले सर्वच्या सर्व संबंध संपुष्टात आणले पाहिजेत व त्याला विरोध केला पाहिजे. सिलेक्टीव विरोधाचे कारण?

आधीही विचारले, परत विचारतो, तुमची भूतदयेची रेषा नक्की कुठे आहे?

फेदरवेट साहेब's picture

23 Jan 2017 - 4:41 pm | फेदरवेट साहेब

जलीकट्टूच्या मागच्या १० किंवा पार ५० वर्षाच्या इतिहासात किती बैल मेलेत ते त्यांनी सांगावे (माणसे काय क्रूर जिव्हालौल्य असलेली खुनशी श्वापदे असतात त्यांच्या मरणाला ठेवा बाजूला) .

खुद्द जलीकट्टू मध्ये मेलेल्या बैलांपेक्षा जास्त बैल रोज भारतीय राज्य/राष्ट्रीय महामार्गांवर किंवा लोहमार्गांवर अनुक्रमे ट्रक लॉरी अन रेल्वेला धडकुन मरत असतील, बरं रस्ते मोटारगाड्या अन लोहमार्ग मानवाने आपल्या मतलबाकरता आविष्कार केलेले आहेत हे ही सर्वमान्य आहे. त्यातही मुक्या जनावराला रस्त्यावर हुंदडू नये किंवा लोहमार्गांवर जाऊ नये अशी काय अक्कल असणार बिचाऱ्याला ? गाड्या थांबवायची अक्कल ट्रक/रेल्वे चालकांना असते तरी ते ती वापरत नाहीत, क्रूर कुठले. तेव्हा अश्या वाहन/लोहरथचालकांना काय शिक्षा करावी हे सुद्धा गुरुजींनी सांगावे.

फेदरवेट साहेब's picture

23 Jan 2017 - 4:43 pm | फेदरवेट साहेब

जलीकट्टूच्या मागच्या १० किंवा पार ५० वर्षाच्या इतिहासात किती बैल मेलेत ते त्यांनी सांगावे (माणसे काय क्रूर जिव्हालौल्य असलेली खुनशी श्वापदे असतात त्यांच्या मरणाला ठेवा बाजूला) .

खुद्द जलीकट्टू मध्ये मेलेल्या बैलांपेक्षा जास्त बैल रोज भारतीय राज्य/राष्ट्रीय महामार्गांवर किंवा लोहमार्गांवर अनुक्रमे ट्रक लॉरी अन रेल्वेला धडकुन मरत असतील, बरं रस्ते मोटारगाड्या अन लोहमार्ग मानवाने आपल्या मतलबाकरता आविष्कार केलेले आहेत हे ही सर्वमान्य आहे. त्यातही मुक्या जनावराला रस्त्यावर हुंदडू नये किंवा लोहमार्गांवर जाऊ नये अशी काय अक्कल असणार बिचाऱ्याला ? गाड्या थांबवायची अक्कल ट्रक/रेल्वे चालकांना असते तरी ते ती वापरत नाहीत, क्रूर कुठले. तेव्हा अश्या वाहन/लोहरथचालकांना काय शिक्षा करावी हे सुद्धा गुरुजींनी सांगावे.

फेदरवेट साहेब's picture

23 Jan 2017 - 4:44 pm | फेदरवेट साहेब

कृपया एक प्रतिसाद उडवून टाकावा हि नम्र विनंती

अप्पा जोगळेकर's picture

23 Jan 2017 - 4:43 pm | अप्पा जोगळेकर

गुरुजी उत्तरे टाळत आहेत हे पटण्यासारखे नाही. त्यांच्याकडे खरोखरच उत्तर नाही असे असू शकते.
ते नेहमी बीजेपीचे समर्थन करत असतात तरीही त्यांनी येथे बीजेपी विरोधाची भूमिका घेतली आहे.
यावरुन तरी ते भूमिकेची भलामण करत आहेत, पक्षाची नाही असे म्हणता येईल.
निदान ते 'गिरीश कुबेर' यांच्यासारखे दुतोंडी नाहीत.
या लेखातील त्यांच्या 'अतिरेकी भूतदये'शी मी सहमत नाही हे पुन्हा नोंदवतो.

फेदरवेट साहेब's picture

23 Jan 2017 - 4:48 pm | फेदरवेट साहेब

सहसा उत्तरे नसल्यावर(च) उत्तरे देणे टाळले जाते, असा माझा आपला एक अदमास आहे. ह्यात काही उणेअधिक वाटल्यास कृपया आम्हाला दुरुस्त करावे ही विनंती.

संदीप डांगे's picture

23 Jan 2017 - 5:12 pm | संदीप डांगे

उगाच चर्चेला नसलेला रंग देऊ नका, इथे भाजप समर्थन किंवा विरोध कुठून आला, आप्पासाहेब? धागालेखकाचे फक्त ह्या धाग्यावर व्यक्त केले जात असेलेले मत मी चर्चेसाठी विचारार्थ घेत आहे. यापूर्वी श्रीगुरुजी कोणाची भलामण करत होते वा नाही याचा काहीही संबंध नाही.

इथे गुरुजी चक्क सिलेक्टीव विरोध करत आहेत. आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ भन्नाट मते प्रकटत आहेत. मात्र इतर प्रश्नांवर त्यांच्याकडे उत्तर नाही हेच न पटण्यासारखे आहे. त्यांच्या याच धाग्यावरच्या सर्व प्रतिसादांतून ते जल्लिकट्टूवर तुफान टिका करत आहेत, तर त्यांच्या याच धाग्यावरच्या सर्व प्रतिसादांतून व्यक्त झालेली मते (प्राण्यांच्या इच्छेशिवाय होणारे व्यवहार) इतर ठिकाणी होणार्‍या प्राण्यांच्या वापर-अत्याचारावर सुद्धा लागू करावीत की नको एवढा प्रश्न आहे ज्याला त्यांनी सोयिस्कर बगल दिली, उदा. गायीचे दूध.

माझा मुद्दा एवढाच आहे की गायीचे दूध तर हवे, म्हणजे गायी गाभण राहायला हव्यात, परत देशी गायीही संवर्धित केल्या पाहिजेत. गायी गाभण राहिल्या म्हणजे त्यांना काहीतरी बाळ होईलच की नाही? आता बाळ झालं म्हणजे ते एकतर गाय असेल वा बैल. तर मग अशा बैलांचे नक्की काय करावे? त्यांना शेतीची कामे देऊ नये, खच्चीकरण करु नये, स्पर्धेत खेळवू नये, कसायालाही विकू नये. मग नेमके काय करणे अपेक्षित आहे?

श्रीगुरुजी's picture

23 Jan 2017 - 8:31 pm | श्रीगुरुजी

हा धागा माझ्यावर नाही. हा धागा संस्कृती, परंपरा इ. च्या नावाखाली चालणार्‍या जालिकट्टू नामक प्रकारात बैलांवर कसा अत्याचार होतो व त्यामुळे त्यावरील बंदी कशी समर्थनीय आहे याविषयी आहे. माझी भूतदयेची रेषा नक्की कोठे आहे किंवा माझा विरोध सिलेक्टिव्ह आहे का अजून कसा हा या धाग्याचा विषय नाही. मी कसा आहे याविषयी आपले महनीय विचार प्रदर्शित करायचे असतील किंवा माझ्या विचारांची चिरफाड करायची असेल तर त्यासाठी एक वेगळा धागा काढण्याचा पर्याय वापरता येईल.

संदीप डांगे's picture

23 Jan 2017 - 5:26 pm | संदीप डांगे

पेटाच्या जल्लिकटूच्या संदर्भातल्या ह्या इन्वेस्टिगेशन रिपोर्टचे एकायुजरने केलेले पोस्टमार्टमः

https://www.youtube.com/watch?v=coZvTRHt2m4&spfreload=10

युजर: I'm From Madurai, Avaniyapuram 0:04. हा युजर अवनियपुरम चा रहिवासी आहे. ज्याबद्दल रिपोर्टमधे दाखवले आहे. पुढे प्रत्येक सेकंदाला विडियोत काय दाखवले आहे व त्याचे स्पष्टिकरण दिले आहे.

This Videos shows that PeTA doesn't has any knowledge about real jallikattu and how Tamil peoples worship their bulls. This 3 mins stupid video is just portraying few stupid human errors.

0:25 He is not participant, He is the owner of that bull and he is trying to guide that bull into playing arena.
.
0:49 WTF, Each and every bulls are undergoes alcoholic test just before enter Vaadi vaasal (Holding Area), These guys trying to give some water.
प्रत्येक बैल हा दारू पाजलेली नाही ह्याचे परिक्षण करुनच पाठवतात. ह्याठिकाणी ती माणसे बैलाला पाणी पाजत आहेत (तर पेटाने दारू पाजत आहेत असे म्हटले आहे.)
.
0:59 They are just forcing bull into playing arena, without touching it physically how the hell your are able to do that.
.
1:25 Dumb F*ck, they are just cutting the controlling rope from the bull and let it play freely.
.
1:56 participant only awarded if he hold one on one against the bull, And if you know Tamil just listen commentary.
.
2:23 These scene are from very rural area without any basic arrangement for jallikattu,

If you just ban jallikattu all formers around South TN just release their decorated bulls in roads. Coz they don't have any other choices. I Know PeTA is just doing these kind of things against jallikattu for Money, I'm posting these for some dumb fu*ks who thinks this stupid video is real and don't know anything about culture of Tamils.

विशुमित's picture

23 Jan 2017 - 5:50 pm | विशुमित

शेतकरी बैलाला आसुडाचा फटका कसे मारतात हे सुद्धा बहुतेक लोकांना माहित नाही. त्यांना वाटते अत्याचारच केला बैलावर.

श्रीगुरुजी's picture

23 Jan 2017 - 8:21 pm | श्रीगुरुजी

एखाद्यावर अत्याचार होताहेत हे समजायला सारासार विवेकबुद्धी पुरेशी आहे. डोळ्यात माती किंवा तिखट फेकणे, शेपटी जोरात पिरगाळणे, शेपटी दातांनी चावणे, पायात खिळे ठोकून नाल ठोकणे, वृषण दांडक्याने ठेचून चेचून टाकणे किंवा वेदनादायी चाप लावणे इ. गोष्टी अत्याचार आहेत हे आसुडाचा फटका मारता येत नसला तरी समजते.

श्रीगुरुजी's picture

23 Jan 2017 - 8:26 pm | श्रीगुरुजी

बैलांवर अत्याचार होतात हे अनेक चित्रफितीतून दिसत आहे. जालिकट्टू प्रकारामध्ये बैलांवर अत्याचार होतात हे सर्वोच्च न्यायालयात सिद्ध झाले आहे व त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी घातली आहे.

फेदरवेट साहेब's picture

24 Jan 2017 - 2:03 pm | फेदरवेट साहेब

सर्वोच्च न्यायालयात सिद्ध झाले आहे व त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी घातली आहे.

सुप्रीम कोर्टने घेतलेले सगळेच निर्णय शिरोधार्य मानायचे का?

गामा पैलवान's picture

23 Jan 2017 - 7:41 pm | गामा पैलवान

लोकहो,

शहाबानो यांच्या निर्णयाविरोधात बोलण्यासाठी महिलांना आवाज तरी होता. बैलांना तो नसतो.

म्हणूनंच जणू गिकु नामक बैलोबाने आपला आवाज देऊ केला आहे. ;-)

एव्हढा विनोदी लेख उद्धृत केल्याबद्दल श्रीगुरुजींचे आभार.

आ.न.,
-गा.पै.

एक पाकिस्तानी आहे हसन निसार तो तिथल्या काही लोकांबद्दल आणि राजकारण्यांबद्दल एक शब्द सतत वापरतो "भानामतीका कुनबा" शप्पथ खरय अगदी आपल्या देशाबद्दलही....

अस्वस्थामा's picture

23 Jan 2017 - 10:30 pm | अस्वस्थामा

स्वार्थासाठी शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बाजूस सारणाऱ्या राजीव गांधी यांच्या निर्णयाशीच होऊ शकेल. राजीव गांधी यांनी राजकारणासाठी मानवी प्रतिष्ठा नाकारली. मोदी यांनी याच दळभद्री राजकारणासाठी प्राण्यांच्या जिवास काही किंमत असते हे नाकारले. या दोन निर्णयांची तुलना केल्यास मोदी यांचा निर्णय अधिक पापकारी ठरतो. याचे कारण शहाबानो यांच्या निर्णयाविरोधात बोलण्यासाठी महिलांना आवाज तरी होता. बैलांना तो नसतो. तेव्हा ज्याला आपले मत मांडण्याचा अधिकार नाही त्याचे अधिकार सर्रास तुडवण्याच्या सरंजामी प्रवृत्तीचे मोदी हे प्रतीक ठरतात.

मुस्लिम महिलांपेक्षा गोवंश श्रेष्ठ हे त्यांनी मान्य केल्याबद्दल खुश व्हा की राव. :))

(काही झालं तरी आपल्या विरोधातला (कोणीपण असु दे) म्हणून तो पापी/चूक अशी ओढून ताणून मांडणी करणार्‍यांचे खरंच कौतुक वाटते.)

जल्लिकट्टू झाला न झाला आम्हाला कै फरक पडत नाही, पण त्यानिमित्ताने लोकांच्या कोलांट उड्या (कुबेरसाहेब धरुन) आणि वरुन 'काही विरोधाभासच नाही' अशी स्वतःचीच भलामण, असा डब्बलबार मनोरंजनाचा आनंद लाभला ब्वा.. :))

गामा पैलवान's picture

23 Jan 2017 - 10:37 pm | गामा पैलवान

लोकहो,

गिरीश कुबेर बैलोबा असूनही अशा कोलांट्या उड्या मारतात की बातच नको. ज्याच्यात हिंमत आहे त्याने कुबेरांचं वशिंड धरून दाखवावं! ;-)

आ.न.,
-गा.पै.

गणामास्तर's picture

24 Jan 2017 - 10:58 am | गणामास्तर

जल्लिकट्टू ला परवानगी मिळाल्यामुळे हापिसातल्या तमिळ सहकाऱ्याने कसलीशी फणस आणि खोबऱ्याची मिठाई
आणली होती बनवून. मस्त होती चवीला, जरा जास्तचं गोड होती.
बीफ बॅन आहे म्हणून नाय तर बैलचं आणणार होतो म्हणाला डब्यात :)

संदीप डांगे's picture

24 Jan 2017 - 11:31 am | संदीप डांगे

=)) =)) =)) लै भारी... बीफ म्हण्जे एक्दमच... :-)

जालीकट्टूबद्दल अधिक वाचताना समजलेले: या खेळात सहभागी होण्याचा अधिकार केवळ तथाकथीत उच्च जातींनाच आहे. दलित कुटुंबांतील तरूण युवक यात सहभागी होऊन आपले शौर्य(?) दाखवू शकत नाहीत.

संदीप डांगे's picture

24 Jan 2017 - 11:46 am | संदीप डांगे

संदर्भ....???

पुंबा's picture

24 Jan 2017 - 11:41 am | पुंबा

रोमन साम्राज्यातील गुलामांच्या झुंजीआणि जालीकट्टू यात साम्य आहे असे वाटते का?

गणामास्तर's picture

24 Jan 2017 - 12:03 pm | गणामास्तर

अज्जीबात साम्य वाटत नाही. जल्लीकट्टू मध्ये सामील होणारे पब्लिक स्वेच्छेने सहभागी होत असते, त्यांची तुलना गुलामाशी होऊ शकत नाही.

श्रीगुरुजी's picture

24 Jan 2017 - 2:16 pm | श्रीगुरुजी

रोमन साम्राज्यातील गुलामांच्या झुंजीआणि जालीकट्टू यात साम्य आहे असे वाटते का?

थोडेसे साम्य आहे. झुंजीत भाग घ्यायचा का नाही हे ठरविण्याचे गुलामांना स्वातंत्र्य नव्हते. तसेच जालिकट्टूत भाग घ्यायचा का नाही हे ठरविण्याचे बैलांना स्वातंत्र्य नाही.

गणामास्तर's picture

24 Jan 2017 - 2:20 pm | गणामास्तर

तुम्ही बैल आणि मनुष्य समान मानता कि काय ?

श्रीगुरुजी's picture

24 Jan 2017 - 2:31 pm | श्रीगुरुजी

वेदनेची जाणीव, यातनेची जाणीव दोघांमध्येही समान आहे. दोघांनाही समान स्वरूपाच्या वेदना होतात.

पैसा's picture

24 Jan 2017 - 12:21 pm | पैसा

काल टाईम्स नाऊ चॅनेलवर एक क्लिप दाखवली. त्यात जलिकट्टु समर्थक दंगेखोर रस्त्यावर दगडफेक आणि जाळपोळ करत होते. त्यांना पोलिस झोडून काढत होते. बातमीखाली कॅप्शन "why sarkari jalikattu" =)) =)) =))

श्रीगुरुजी's picture

24 Jan 2017 - 2:33 pm | श्रीगुरुजी

काल मद्रासमध्ये राडा झाला होता म्हणे. माझा एक मित्र मद्रासमध्ये काम करतो. त्याला घरी परत येताना रस्ते बंद असल्याने खूप त्रास झाला. यावर्षी जयललितांचा मृत्यु, चक्रीवादळ आणि आता जालिकट्टू यामुळे मद्रासमध्ये वाट लागली आहे. जालिकट्टू समर्थकांवर तो भयंकर चिडला होता. त्यांचे वर्णन त्याने culture vultures असे केले.

प्रकाश घाटपांडे's picture

24 Jan 2017 - 12:24 pm | प्रकाश घाटपांडे

समाज जसा सुसंस्कृत होत जातो तशी त्याची क्रौर्याची लेव्हल कमी होत जाते शंभर दोनशे वर्षांपुर्वी असलेली सतीची प्रथा जो धर्माचा भाग होता ती आता निर्विवादपणे क्रूर वाटते

श्रीगुरुजी's picture

24 Jan 2017 - 2:29 pm | श्रीगुरुजी

'Jallikattu can't be played without torturing bulls'

सर्वोच्च न्यायालयाने जालिकट्टूचा अभ्यास करून त्यात बैलांचा छळ होतो का नाही याचा वृत्तांत तयार करण्याची जबाबदारी मनोज ओसवाल यांच्यावर सोपविली होती. २०१०-२०१२ या तीन वर्षात तामिलनाडूतील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देऊन तिथे होत असलेल्या जालिकट्टूत सहभागी होऊन, प्रकाशचित्रे व चित्रफितींच्या सहाय्याने त्यांनी वृत्तांत तयार करून सर्वोच्च न्यायालयात सादर केला. या अमानुष प्रकारात बैलांचा छळ केला जातो असे स्पष्टपणे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी जे पाहिले ते अत्यंत धक्कादायक होते. त्यावरच खालील वृत्त आहे. या वृत्तातील मोजके महत्त्वाचे उतारे चोप्य पस्ते केले आहेत.

'Jallikattu can't be played without torturing bulls'

The Supreme Court passed an interim order stating that certain steps must be taken for the event.

The apex court ordered that bulls must not be beaten, there should be more space on both side of the game arena, before and after the event bulls must get adequate rest, there should be no beating or biting of bulls, no alcohol or drugs must be given to them, etc.

These were the key measures that were introduced by the Supreme Court in 2009 under the TNRJA.

When bulls come for a Jallikattu event, they are put in queues. They are made to stand for long hours.

There is no water for them, and that is cruelty.

When a bull reaches the Vaadivaasal (the entrance to the arena), he sees some 20,000 people shouting and dancing, which is very scary for him.

Now, a bull, which is just two years old, does not want to go into the arena. He will do everything possible not to go in front of the crowd.

This is where the cruelty starts.

The bull does not want to go in front of the crowd and then they have to put chillies on his private parts to make him enter the game arena.

I have photographed this and this is mentioned in the Supreme Court judgment too.

They also make the bull drink alcohol and attack him with a sickle so that he feels that it is worse to stay in the Vadivassal and better to go in front of the crowd.

Jallikattu cannot be played without torturing bulls.

There are two reasons for it. The first reason is that the bull is scared. He is in a catch-22 situation.

He wonders whether to sit quietly in the Vaadivaasal or go into the crowd.

He would prefer to stay in the Vaadivaasal instead of facing 20,000 people. He doesn't want to come out.

To force him to move out, something more painful and torturous needs to be done, to make the bull uncomfortable in the Vaadivaasal.

That is the crux of the cruelty.

In the Vaadivaasal, the bull is constantly tortured and therefore it runs into the game arena.

This arena is a limited space. Everyone here jumps on the bull to take away the prize from the horns of the bull.

These 20,000 people have not come to see the game, but to participate in it. That is the second problem.

In such a situation, a bull can fall into the village well or get injured because someone takes out their knife and injures the bull.

श्रीगुरुजी's picture

7 Apr 2017 - 11:15 pm | श्रीगुरुजी

महाराष्ट्र सरकारने बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेतला आहे. आता पुन्हा एकदा मुक्या जनावरांचा छळ सुरू होणार आणि विक्रुत मानसिकतेचे प्रेक्षक त्याचा आनंद घेणार. कर्जमाफीच्या मागणीची धार कमी करण्यासाठी तर हा निर्णय घेतला असेल का?

श्रीगुरूजी, जालिकट्टू आणि बैलगाडा शर्यत या दोन्ही खेळांत समान छळ होतो का बैलांचा? माझ्यामते, नाही. शिवाय, बैलगाडा शर्यत ही सहभागी तरूणांसाठी धोकादायक नाही. जालीकट्टूत आजपावेतो शेकडो तरूण मृत्युमुखी पडलेत. जालिकट्टू ही मानसाच्या क्रूरतेची परिसीमा आहे. बैलगाडा शर्यतीचे तसे नाही.

सतिश गावडे's picture

8 Apr 2017 - 9:06 am | सतिश गावडे

>> शिवाय, बैलगाडा शर्यत ही सहभागी तरूणांसाठी धोकादायक नाही.

काही वर्षांपूर्वी आमच्या गावी शर्यतीतल्या बैलगाडीतून खाली पडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. तो तरूण पेशाने शिक्षक होता.

विशुमित's picture

8 Apr 2017 - 10:54 am | विशुमित

सरकारचा माझ्यासाठी चांगला निर्णय. कालच माझ्या एक खोंडाला ६५ हजार आणि दुसऱ्याला ४८ हजार रुपयाला मागितले आहेत. १.१५ लाखाचा उद्या सौदा होईल बहुतेक.
बाकी सगळे प्राणी शर्यतीला जुंपलेलीच आहेत. चालायचं..!!

कपिलमुनी's picture

8 Apr 2017 - 1:32 pm | कपिलमुनी

क्रिकेट सुद्धा तरूणांसाठी धोकादाय्क आहे. काही वर्षांपूर्वी फिल ह्यूजचा मृत्यू झाला होता

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2017 - 3:02 pm | श्रीगुरुजी

बैलगाडी शर्यतीत बैलांची शेपूट पिरगाळणे, अणकुचीदार वस्तू लावलेल्या चाबकाने मारणे, दारू पाजणे, कानात मुंग्या सोडणे, गुदद्वारात तिखट घालणे इ. प्रकार होत असल्याचे उघडकीस आले होते. म्हणूनच त्यावर बंदी आली होती. जालिकट्टू असो वा बैलगाडी शर्यत्, दोन्हीत मुक्या जनावरांचा छळ होतो.

पुंबा's picture

10 Apr 2017 - 6:37 pm | पुंबा

जालिकट्टू ही मानसाच्या क्रूरतेची परिसीमा आहे.

हे जरा अतीच झाले असे मलाच परत एकदा प्रतिसाद वाचताना जाणवलं.
बाकी, बैलगाडा शर्यत माणसांसाठी जालीकट्टूपेक्षा कमी धोकादायक निश्चितच कमी धोकादायक आहे. बैलगाडा शर्यतीत झालेले मृत्यू हे aberration आहेत, जालिकट्टू बाय नेचर सहभागी माणसांसाठी धोकादायक आहे.

अप्पा जोगळेकर's picture

10 Apr 2017 - 5:32 pm | अप्पा जोगळेकर

कर्जमाफीच्या मागणीची धार कमी करण्यासाठी तर हा निर्णय घेतला असेल का?
जर या निर्णयाने कर्जमाफीच्या फालतू मागणीची धार कमी होणार असेल तर चांगला निर्णय आहे.
शिवाय जर शेतकरी कर्जाच्या ओझ्याने खरोखरच पिचले असतील तर ते बैलगाडी शर्यती सारख्या खेळात आपला वेळ फुकट घालवणार नाहीत.

वरुण मोहिते's picture

8 Apr 2017 - 2:28 pm | वरुण मोहिते

क्रूर आणि आसूड ओढणारे प्रतिसाद संबंध महाराष्ट्राने वाचले तर हा क्रूर पणा थांबणारे नक्की असं मत नोंदवतो .

कपिलमुनी's picture

8 Apr 2017 - 6:09 pm | कपिलमुनी

बैलगाड्याच्या शर्यतीवर टीका करताना किती जणां नी शर्यती प्रत्यक्षात पाहिल्या आहेत ?
किती प्रकारच्या असतात ? कारण महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या भागात शर्यतीचे प्रकार वेगळे आहेत.

मी मागील १५ वर्षे मावळातील शर्यती बघत आहे. यामधे सहसा कोणीही रायडर नसतो . बैले घाटातून पळवली जातात आणि पुढे घोडा असतो .
१. sharyat1
२.sharyat2

पश्चिम महाराष्ट्रात छकडा वापरतात त्यामधे मागे सारथी असतो.

sharyat3

१५ वर्षात ( किमान १०० शर्यती पाहून) मी स्वःत तरी "कानात मुंग्या सोडणे, गुदद्वारात तिखट घालणे " हे प्रकार कुठेही पाहिले वा ऐकले नाहीत किंवा वाचले नाहीत.

चाबूक वापरणे हे मावळात होत नाही फक्त प.म. मधे होते. मावळातील शर्यतीमध्ये हिंसा नसते कारण बैलांना चालवणारे कोणी नसते. आणि तिखट , दारू याने बैल ट्रॅक सोडतात.

पष्चिम महाराष्ट्रामधे चालवणारा असल्याने चाबूक , छडी , वापरतात पण बैलाला जखमा करत नाहीत कारण मग त्यावरचे उपचार गाडामालकाला करावे लागतात
शर्यतीच्या बैलाला कामाला जुप्मत नाहीत आणि त्यांची वर्षभर काळजी वेगळ्या प्रकारे घेतले जाते.

घोड्याच्या शर्यतीप्रमाणे या खेळामधे सूसूत्रता, नियमावली आणून हिंसेचा वापर कमी करण्यास वाव आहे.
काही गाडामालक चुकीचे वागत असतीलही आणि बैलांना त्रास होत असेल पण सर्वांवर बंदी घालणे योग्य नाही.

वरुण मोहिते's picture

8 Apr 2017 - 6:22 pm | वरुण मोहिते

माहितीये का ??
कानात मुंग्या सोडणे नक्की कुठे होते ?

बैल गाड्याच्या शर्यतीत कोणताही क्रूर प्रकार होत नाही. हवं तर तुमि येऊन पाहू शकता. ग्रामीण जीवनाचे अर्थ कारण या शर्यतीवर अवलंबुन आहे. मागील काही वर्षांपासून यात्रा ओस पडल्या होत्या. ज्या प्रमाणे आपण सर्व जण पट्टीचे धावपट्टू बानू शकत नाही, त्याप्रमाणे सर्व बैलांचा शर्यती मध्ये उतरवत नाहीत, बैलाचे वय, शारीरिक ठेवणं, त्याची क्ष मता तपासली जाते. त्याला विशेष खुराक दिला जातो, त्याच्या कडून योग्य सराव करून घेतला जातो. बैलांची किंमत 1 लाख पेक्षा जास्त असते. अशा बैलांचा छळ कोणी व का करेल?
केवळ ग्रामीण जीवन व शेती विषयक अज्ञानातून आपले वरील लेखातील मत असावे.
आपल्याला वस्तुस्थिती माहीत असावी म्हणून हा लेखन प्रपंच, कृपया गैरसमज नसावा.

वरुण मोहिते's picture

8 Apr 2017 - 6:56 pm | वरुण मोहिते

माझे टंकनश्रम वाचवल्याबद्दल ...हेच सांगणार होतो गुरुजींना .

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2017 - 9:06 pm | श्रीगुरुजी

जर बैलगाडी शर्यतीत बैलांचा छळ होत नसता तर त्यावर न्यायालयाने बंदी का आणली असती?

इथे त्याबद्दल सविस्तर माहिती आहे.

Severe cruelty is inflicted upon the bulls. They are locked in dark rooms with red ants. They are given steroids and made to drink alcohol. They are whipped and poked in their private parts, and their tails are twisted and even bitten by humans. Not only do the bulls suffer and many die, but human spectators have been killed.

खालील तूनळीवरील चित्रफीत पहा. त्यात एकापाठोपाठ एक अशा अनेक चित्रफिती आहेत. पहिली चित्रफीत १:४५ मिनिटानंतर पहा. बैलांना शर्यतीत पळविताना काठीने कसे बडवितात ते पहा. ती चित्रफीत संपल्यासंपल्या दुसरी चित्रफीत सुरू होते. त्यात बैलांच्या छळाचे अनेक प्रकार दाखविले आहेत. शर्यतीसाठी अनुत्सुक असलेल्या बैलाला शेपूट पिरगाळून उठविणे, काठीने मारणे, शर्यत सुरू असताना दाताने बैलाची शेपटी चावणे, शेपटी पिरगाळणे असे अनेक क्रूर प्रकार दिसतात. बैलाचा मानेवर जे जू ठेवले जाते त्याच्या दोन्ही बाजूला आतल्या बाजूने अणकुचीदार खिळे ठोकलेले दिसतात जे बैलांना जोरात पळताना टोचतात.

https://www.youtube.com/watch?v=yyhhVJD0s-4

संस्कृती, परंपरा, ग्रामीण जीवनाचे अर्थकारण असा कितीही मुलामा दिला तर या प्रकारात मुक्या जनावरांना क्रूर पद्धतीने छळले जाते हे उघड सत्य आहे. मुक्या प्राण्यांवर अत्याचार करणारा हा क्रूर प्रकार पुन्हा सुरू केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचा तीव्र निषेध.

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2017 - 9:13 pm | श्रीगुरुजी

श्रीगुरुजी,

तुम्ही दिलेल्या या फितीत https://www.youtube.com/watch?v=yyhhVJD0s-4 फारसं आक्षेपार्ह काही सापडलं नाही. एके ठिकाणी बैलाची शेपूट पिरगळलेली दिसते, पण तो बैल शर्यतीत उधळलेला होता. हाताबाहेर गेला असता तर अपघात होऊन तो स्वत:, त्याचा जोडीदार आणि सारथी तिघांचेही जीव धोक्यात पडले असते.

दुसऱ्या फितीत ( https://www.youtube.com/watch?v=PMPXp5Rqc1A ) बैलाची शेपटी चावणे फक्त आक्षेपार्ह आहे. त्याविरुद्ध कायदा करता येईल. शर्यतींवर सरसकट बंदी घालायची गरज नाही.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

9 Apr 2017 - 8:23 pm | श्रीगुरुजी

बैलाची फक्त शेपटी चावली जात नाही. शर्यतीत पळण्यास उत्सुक नसलेल्या बैलाला शेपटी पिरगाळून उठविले जाते. शेपटी पिरगळूनही बैल उठत नसल्याचे पाहून एक माणूस मोठ्याने "चाव", "चाव","चाव" असे सांगत असल्याचे स्पष्ट ऐकू येते. बैलाच्या पाठीवर जे लाकडी जू ठेवले जाते त्याच्या दोन्ही बाजूच्या उभ्या दांड्यांना अणकुचीदार खिळे ठोकलेले दिसतात. हे दांडे बैलांच्या कानाजवळ येत असल्यामुळे जोरात पळताना बैलांना हे खिळे टोचतात. बैलांना लाकडी दांडक्याने मारहाण केली जात असल्याचेही दिसते. शर्यत सुरू असताना गाडीवान बैलाची शेपटी दातात धरून चावताना दिसतो.

हे सर्व छळाचे प्रकार आहेत. कितीही कायदे केले तरी हे प्रकार थांबणे अशक्य आहे. हा क्रीडाप्रकार वगैरे नाही. क्रीडाप्रकारात नियम असतात, नियमांचे पालन होते का नाही हे काटेकोरपणे बघण्यासाठी पंच असतात व नियमभंग झाल्यास खेळाडूला शिक्षा मिळते. या प्रकारात कोणतेही अधिकृत नियम नाहीत, पंच नाहीत आणि नियमभंग केल्यास शिक्षाही नाही.

या प्रकारावर कायद्याने संपूर्ण बंदी आल्यास हा छळ थांबेल.

संदीप डांगे's picture

9 Apr 2017 - 8:28 pm | संदीप डांगे

गुरुजी, सोप्पंय बघा. दुर्लक्ष करा. जसं गोमाताभक्तांच्या माणसं मारणार्‍या कृतींकडे केले जात आहे तसं.....

श्रीगुरुजी's picture

9 Apr 2017 - 8:39 pm | श्रीगुरुजी

-२०,००,०००

मोदक's picture

9 Apr 2017 - 9:29 pm | मोदक

=))

विशुमित's picture

10 Apr 2017 - 10:34 am | विशुमित

आपला सौदा पक्का झाला. निम्मे पैसे पण मिळाले. त्यामुळे मी पण इग्नोर मारला.

(अवांतर: माणसांच्या खेळांवर आणि शर्यतींवर पण बंदी आणली पाहिजे. मागच्या महिन्यात दंगल पाहिला. किती क्रूरपणा असतो. माणसांना पण उत्तेजित द्रवे दिली जातात. पण खेळ बंद करण्याबाबत कोणी चकार शब्द नाही काढत. असो..)

विशुमीत, लॉजीक चुकतंय तुमचं..
१. कुस्ती, बॉक्सिंग इ. खेळ नियमाने बद्ध आहेत. खेळामध्ये भाग घेणार्‍या दोन्ही व्यक्तिंना हे नियम माहित आणी मान्य आहेत.
२. खेळाच्या दरम्यान असणारे धोके सामान्यतः जीवावर न बेतणारे आहेत तसेच ते माहित(ढोबळ स्वरूपात) आणि मान्य आहेत.
३. आणि सर्वात महत्वाचे दोन्ही खेळाडू मनुष्यप्राणी असल्याने(विचार करू शकणारा, अन्य पशूंप्रमाणे निव्वळ आदीम प्रेरणांवर न जगणारा) त्यांच्यातील स्पर्धेला खेळ असे नाव देता येते. एक पशू व एक माणूस यांमधील चुरशीला खेळ म्हणणे चुकीचे आहे. मानवाच्या जीवाला असणारा हा धोका लक्षात घेता जालिकट्टू हा खेळ गैर ठरतो आणी कुस्ती, बॉक्सिंग वैध.

श्रीगुरुजी's picture

10 Apr 2017 - 3:06 pm | श्रीगुरुजी

अगदी बरोबर.

कुस्ती, बॉक्सिंग इ. प्रकारात भाग घेणार्‍या मनुष्यांना त्यात भाग घ्यायचा का नाही याचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यांना त्या प्रकारात भाग घ्यायचा नसेल तर भाग घेण्याची बळजबरी कोणीही करू शकत नाही. याऊलट जालिकट्टू किंवा बैलगाडी शर्यत यात भाग घ्यायचा का नाही या निर्णयाचे स्वातंत्र्य प्राण्यांना नाही. त्यात त्यांना बळजबरीने भाग घ्यावाच लागतो. शर्यतीसाठी अनुत्सुक असलेल्या बैलाचा छळ करून त्यात बळजबरीने गाड्याला जुंपले जाते.

कुस्ती, बॉक्सिंग हे प्रकार नियमानुसार चालतात. नियमांचे पालन होत आहे का नाही यावर पंच, कॅमेरे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत असतात व नियमभंग झाल्यास नियमभंग करणार्‍याला शिक्षा मिळते. जालिकट्टू, बैलगाडी इ. प्रकारात असे ठरलेले लिखित नियम नाहीत. बैलांचा छळ होतोय का हे बघायला पंच, रेफ्री इ. नसतात. त्यामुळेच या प्रकारात मुक्या जनावरांचा क्रूर पद्धतीने छळ केला जातो व आमची संस्कृती, परंपरा इ. मुलामा चढविणारे बैलांच्या छळाचा आनंद घेतात.

श्रीगुरुजी's picture

10 Apr 2017 - 3:15 pm | श्रीगुरुजी

आपला सौदा पक्का झाला. निम्मे पैसे पण मिळाले. त्यामुळे मी पण इग्नोर मारला.

मुक्या जनावरांचा बैलगाडी शर्यत किंवा शेतीच्या कामासाठी यातना देऊन छळ केला जातो. आम्ही बैलाला कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवतो असे शेतकर्‍यांनी मोठ्या तोंडाने कितीही वेळा सांगितले तरी त्यातील दांभिकपणा लपून राहत नाही. आधी बैलाला यातना देऊन त्याच्या पायात खिळे ठोकून नाल बसवायचे, नंतर कोणत्याही प्रकारची भूल न देता बैलाचे वृषण दांडक्याने चेचून किंवा बैलाच्या वृषणाची रक्तवाहिनी चिमट्याने कापून त्याला कायमस्वरूपी नपुंसक बनवायचे व त्याला जीवघेण्या वेदना देऊन त्याचा नैसर्गिक आनंदही हिरावून घ्यायचा, नंतर आयुष्यभर त्याच्या नाकात वेसण घालून त्याला उन्हात राब राब राबवायचे, त्याला गाडीला जुंपून त्याच्याकडून अवजड मालाची वाहतूक करून घ्यायची, तो थकला की त्याला कसायाला विकून टाकून पैसे कमवायचे . . . आणि आम्ही बैलाला कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवतो अशा दांभिक गफ्फा हाणायच्या. कुटंबातील कोणत्याही सदस्याला इतक्या यातना देऊन त्याचे हालहाल केले जातात का?

मी पूर्वी लिहिल्याप्रमाणे जर शेतकरी विपन्नावस्थेत असतील तर त्यांनी यातना दिलेल्या मुक्या प्राण्यांचे तळतळाट त्यांना भोवताहेत असेच माझे मत आहे.

विशुमित's picture

10 Apr 2017 - 4:15 pm | विशुमित

<<<मुक्या जनावरांचा बैलगाडी शर्यत किंवा शेतीच्या कामासाठी यातना देऊन छळ केला जातो. आधी बैलाला यातना देऊन त्याच्या पायात खिळे ठोकून नाल बसवायचे, नंतर कोणत्याही प्रकारची भूल न देता बैलाचे वृषण दांडक्याने चेचून किंवा बैलाच्या वृषणाची रक्तवाहिनी चिमट्याने कापून त्याला कायमस्वरूपी नपुंसक बनवायचे व त्याला जीवघेण्या वेदना देऊन त्याचा नैसर्गिक आनंदही हिरावून घ्यायचा, नंतर आयुष्यभर त्याच्या नाकात वेसण घालून त्याला उन्हात राब राब राबवायचे, त्याला गाडीला जुंपून त्याच्याकडून अवजड मालाची वाहतूक करून घ्यायची, तो थकला की त्याला कसायाला विकून टाकून पैसे कमवायचे>>>
==> बैलांचा छळ होतो चला मान्य. तुमच्या मते अशा बैलाचं आताच्या घडीला करायचं काय ? त्यांना मुक्त करून जंगलात सोडून द्यायचे की नागपूरला संघाच्या कार्यालयात पिटाळायची? वस्तुस्थिती नुसार उत्तर द्या. उगाच स्वतःची विचारसरणीच आदर्श आणि महान आहे असे उत्तर नकोय.

<<<आम्ही बैलाला कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवतो असे शेतकर्‍यांनी मोठ्या तोंडाने कितीही वेळा सांगितले तरी त्यातील दांभिकपणा लपून राहत नाही.>>
==>> बैल हा बैलच असतो. तो माणूस नाही बनू शकत. वरच्या एका प्रतिसादात तुम्हीच म्हंटले आहे. हे शेतकऱ्याला ही चांगले माहित आहे. इथे कुटुंबातील सखे भाऊ-भाऊ एकमेकांचा काटा काढतात, शहरातली मुलं आई बापाला वृद्धाश्रमात धाडतात तिथे बैलाचं काय घेऊन बसलात? दांभिकपणाच्या फुकाच्या गप्पा संघात चांगल्या शोभतात.

<<<मी पूर्वी लिहिल्याप्रमाणे जर शेतकरी विपन्नावस्थेत असतील तर त्यांनी यातना दिलेल्या मुक्या प्राण्यांचे तळतळाट त्यांना भोवताहेत असेच माझे मत आहे.>>>
==> पाप पुण्याचे भांडवल करून अजून किती दिवस लोकांना गंडवणार आहात.

श्रीगुरुजी's picture

11 Apr 2017 - 2:08 pm | श्रीगुरुजी

बैलांचा छळ होतो चला मान्य.

नशीब छळ होतो हे मान्य तरी करताय. नाहीतर बैलांना आम्ही प्रेमाने वागवतो, बैल आमच्या कुटंबातील सदस्य असल्याप्रमाणे आम्ही त्याला वागणूक देतो, बैलांचा अजिबात छळ होत नाही, बैलांचा छळ होतो हे आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी केलेला अपप्रचार आहे इ. ब्ला ब्ला आतापर्यंत कानावर पडत होते.

तुमच्या मते अशा बैलाचं आताच्या घडीला करायचं काय ? त्यांना मुक्त करून जंगलात सोडून द्यायचे की नागपूरला संघाच्या कार्यालयात पिटाळायची? वस्तुस्थिती नुसार उत्तर द्या. उगाच स्वतःची विचारसरणीच आदर्श आणि महान आहे असे उत्तर नकोय.

बैलांचा छळ करू नका, त्यांना यातना देऊ नका, छळ करून बळजबरी करून शर्यतीत पळवून त्यात आनंद मानू नका.

बैल हा बैलच असतो. तो माणूस नाही बनू शकत. वरच्या एका प्रतिसादात तुम्हीच म्हंटले आहे. हे शेतकऱ्याला ही चांगले माहित आहे. इथे कुटुंबातील सखे भाऊ-भाऊ एकमेकांचा काटा काढतात, शहरातली मुलं आई बापाला वृद्धाश्रमात धाडतात तिथे बैलाचं काय घेऊन बसलात? दांभिकपणाच्या फुकाच्या गप्पा संघात चांगल्या शोभतात.

बैल हा माणूस नसला तरी माणसाला जशा वेदना होतात तशाच त्या बैलालाही होतात. बैलालाही तहान, भूक, शारीरिक प्रेरणा आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी मुक्या जनावरांना यातना देऊ नका. आणि दांभिकपणाचं म्हणाल तर तुमच्या बारामतीच्या पद्मश्री पद्मविभूषण डबल डॉक्टर क्रिकेटतज्ज्ञ जाणता राजा साहेबांइतकं जास्त दांभिक जगात दुसरं कोणीही नाही.

पाप पुण्याचे भांडवल करून अजून किती दिवस लोकांना गंडवणार आहात.

यात काहीही गंडवणूक नाही. गंडवायला मी काही शेतकरी नाही किंवा साहेबांच्या पक्षातही नाही. मुक्या जनावरांना यातना देऊन त्यांचा छळ करू नका हेच मी सुरवातीपासून सांगत आहे.

विशुमित's picture

12 Apr 2017 - 11:03 am | विशुमित

<<<बैलांचा छळ करू नका, त्यांना यातना देऊ नका, छळ करून बळजबरी करून शर्यतीत पळवून त्यात आनंद मानू नका.>>>
==>> तुम्ही सोयीस्करपणे प्रश्नाला बगल दिली आहे.
बैलाला नाल तर ठोकलीच पाहिजे. नाहीतर त्याचे पाय घसरतील, खुरे खराब होतील.
औताला जुंपायच नाही म्हंटलं तर त्या बैलाला दारात बांधून त्याचा बरोबर सेल्फी काढत चेपुवर पोस्ट करण्याने फायदा होणार नाही.
चाप नाही दिला तर काय होईल ते मागे आपण चर्चिले आहेच.
शर्यतीत नाही पळवली तर खिल्लारी जातीच्या बैलांची जपवणूक कशी होईल.
बैले नको असतील तर लोक गाई कशाला पाळतील.
गाई नसतील तर वासू बारसेला अकृषक लोक नैवद्य कोणाला खाऊ घालतील.
गाई नसतील तर संघाच्या कथित महागुरुंची दुकाने कशी चालतील
हे महा गुरु(?) नसतील तर भाबडे गोरक्षकांना काम उरेल काय?
(कथित) गोरक्षक नसतील तर राष्ट्रीय समस्या कशी निर्माण होईल?
राष्ट्रीय समस्या नसतील तर मिपावर लेख/प्रतिसाद कसे झडतील?
मिपा ओस पडेल ओस.
बैलाचं करायचं काय ते सांगा. जंगलात सोडायचे का संघाच्या गोशाळेत. (कथित गोरक्षक गोशाळेत गुरांना किती अदबीने सांभाळतात आम्हाला चांगले माहिती आहे. दांभि(स)क कुठचे..!!)

<<<आणि दांभिकपणाचं म्हणाल तर तुमच्या बारामतीच्या पद्मश्री पद्मविभूषण डबल डॉक्टर क्रिकेटतज्ज्ञ जाणता राजा साहेबांइतकं जास्त दांभिक जगात दुसरं कोणीही नाही.>>
==> ते फक्त संघ विचारसरणी, काही मराठे जे स्वतःला खूप उच्च कोटीचे समजतात, नादान तरुण पिढी आणि अप्पलपोटी नेत्यांना वाटतं. आम्हाला त्यांचे विचार पटतात, कोणाला पटो न पटो.

<<<मुक्या जनावरांना यातना देऊन त्यांचा छळ करू नका हेच मी सुरवातीपासून सांगत आहे.>>>
==> यातना देऊन छळ करणे मान्य पण वर जे काही तुम्हाला यातना वाटतात ते शेतकऱ्यांच्या लेखी बैलांसाठी गरजेचे आहे. आणि ते नकोच असे वाटत असेल तर त्यासाठी उपाय सुचवा. व्यावहारिक असेल तर नक्की स्वीकार करतील शेतकरी. (नाल ठोकणे, वेसण घालणे, चाप देणे, औताला जुंपणे. शर्यतीच्या बाबतीत थोडाफार मी तुमच्या बाजूने आहे, काही गोष्टी मला ही नाही पटत. पण संपूर्ण बंदीला असहमत)

विशुमित's picture

12 Apr 2017 - 12:10 pm | विशुमित

खालील लेख या विषयाशी थोडे सुसंगत वाटलं. बघा विचार पटले तर. (डिकलमेर: पेपर 'लोकसत्ता' आहे. स्व जवाबदारीवर विश्वास ठेवावा).

यातील """" शहरी धर्म (प्राणी प्रेमी) मरतडांनी गोपूजनाच्या (प्राणी प्रेमाच्या) गोष्टी सांगायच्या आणि तिला पोसायचे ओझे मात्र शेतकऱ्यांवर अशी व्यवस्था टिकू शकणार नाही.''' हे वाक्य विशेष आवडलं. (कंसातील शब्द माझे आहेत)

http://www.loksatta.com/vishesh-news/farmer-union-leader-sharad-joshi-ar...

श्रीगुरुजी's picture

12 Apr 2017 - 2:55 pm | श्रीगुरुजी

बैलाला नाल तर ठोकलीच पाहिजे. नाहीतर त्याचे पाय घसरतील, खुरे खराब होतील.

आपले खूर खराब होतील का चांगले राहतील ते बैल बघून घेईल ना. आपल्या प्रचंड वजनाने गच्च भरलेल्या गाड्या बैलाकडून फुकट ओढून घेताना अडथळे येऊ नयेत यासाठी 'पाय घसरतील', "खूर खराब होतील' अशी हास्यास्पद कारणे देणे हा खोटा कळवळा आहे.

औताला जुंपायच नाही म्हंटलं तर त्या बैलाला दारात बांधून त्याचा बरोबर सेल्फी काढत चेपुवर पोस्ट करण्याने फायदा होणार नाही.

बैलांविषयी खोटा कळवळा दाखवूनही फायदा होणार नाही. शेत नांगरायला ट्रॅक्टर वापरा. नाहीतर स्वतः औताला जुंपुन घ्या. त्यासाठी मुक्या जनावरांचा छळ करू नका.

चाप नाही दिला तर काय होईल ते मागे आपण चर्चिले आहेच.

तो प्रतिसाद अत्यंत हास्यास्पद होता. बैलाला चाप देण्यामागे किंवा त्याचे वृषण दांडक्याने चेचून त्याला नपुसंक करण्यामागे (दोन्ही प्रकार भूल न देता) फक्त स्वतःचा स्वार्थ आहे. त्यामागे बैलाचे कोणतेही हित नाही. फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी बैलाला प्राणांतिक यातना देऊन त्याचा नैसर्गिक आनंदसुद्धा कायमस्वरूपी हिरावून घेऊन त्याचे समर्थन करणे हा पराकोटीचा ढोंगीपणा आहे.

शर्यतीत नाही पळवली तर खिल्लारी जातीच्या बैलांची जपवणूक कशी होईल.

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ . . .

बैले नको असतील तर लोक गाई कशाला पाळतील.

दोन्ही पाळू नका

गाई नसतील तर वासू बारसेला अकृषक लोक नैवद्य कोणाला खाऊ घालतील.
गाई नसतील तर संघाच्या कथित महागुरुंची दुकाने कशी चालतील
हे महा गुरु(?) नसतील तर भाबडे गोरक्षकांना काम उरेल काय?
(कथित) गोरक्षक नसतील तर राष्ट्रीय समस्या कशी निर्माण होईल?
राष्ट्रीय समस्या नसतील तर मिपावर लेख/प्रतिसाद कसे झडतील?
मिपा ओस पडेल ओस.

या प्रश्नांची उत्तरे थोरल्या साहेबांना विचारा. ते डबल डॉक्टर, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, क्रिकेटतज्ज्ञ वगैरे वगैरे आहेत. त्यांना शेतीची, महाराष्ट्रातील समस्यांची खडानखडा माहिती आहे. ते 'अपनी शर्तोंपर" काम करतात. जगात अशी कोणतीच समस्या नाही ज्याचे उत्तर त्यांच्याकडे नाही.

बैलाचं करायचं काय ते सांगा. जंगलात सोडायचे का संघाच्या गोशाळेत. (कथित गोरक्षक गोशाळेत गुरांना किती अदबीने सांभाळतात आम्हाला चांगले माहिती आहे. दांभि(स)क कुठचे..!!)

कोठेही सोडा. त्यांना पाहिजे तिथे ते जातील. तुम्ही त्यांची खोटीखोटी काळजी करू नका. स्वतःजवळ ठेवायचे असतील तर त्यांचा जीवघेण्या यातना देऊ नका, त्यांचा छळ करू नका, त्यांच्यावर क्रूर अत्याचार करू नका आणि कसायाकडे पाठवू नका.

==> ते फक्त संघ विचारसरणी, काही मराठे जे स्वतःला खूप उच्च कोटीचे समजतात, नादान तरुण पिढी आणि अप्पलपोटी नेत्यांना वाटतं. आम्हाला त्यांचे विचार पटतात, कोणाला पटो न पटो.

फिदीफिदी फिसफिस फिदीफिदी फिसफिस . . .

==> यातना देऊन छळ करणे मान्य पण वर जे काही तुम्हाला यातना वाटतात ते शेतकऱ्यांच्या लेखी बैलांसाठी गरजेचे आहे. आणि ते नकोच असे वाटत असेल तर त्यासाठी उपाय सुचवा. व्यावहारिक असेल तर नक्की स्वीकार करतील शेतकरी. (नाल ठोकणे, वेसण घालणे, चाप देणे, औताला जुंपणे. शर्यतीच्या बाबतीत थोडाफार मी तुमच्या बाजूने आहे, काही गोष्टी मला ही नाही पटत. पण संपूर्ण बंदीला असहमत)

ती बैलांची गरज नसून तो निव्वळ तुमचा स्वार्थ आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी मुक्या प्राण्यांना यातना देऊन त्यांच्यावर अत्याचार करू नका.

विशुमित's picture

12 Apr 2017 - 3:47 pm | विशुमित

<<<कारणे देणे हा खोटा कळवळा आहे. बैलांविषयी खोटा कळवळा दाखवूनही फायदा होणार नाही.>>
==>> आम्हाला कळवळा बीळवळा काही नाही ओ बैलांचा. तो तुम्हालाच आहे. पण तुमच्याकडे बैले नाहीत. त्यामुळे तुम्ही सेफर साईडला आहात.
कायदा आहे म्हणून नाहीतर कसायाला देणे काहीच हरकत नाही. गाय हा उपयुक्त प्राणी आहे. उपयुक्तता असेपर्यंत तिचा सांभाळ करणे शेतकर्‍याला शक्य असते. पण, उपयुक्तता संपुष्ठात आल्यानंतर ती शेतकर्‍याला ओझं होत असते, असे खुद्द आमचे साहेब आज म्हणाले. संघाचे आदरस्थान सावरकर पण असेच म्हणटलेत. पटलंय मला त्यांचं. तुम्हाला नाही पटणार कारण तुमच्या कडे गाई नाहीत.

<<<शेत नांगरायला ट्रॅक्टर वापरा.>>>
==> तो तर वापरतोच. पण कडा कोपरे ट्रॅक्टर काढू शकतात का?

<<<नाहीतर स्वतः औताला जुंपुन घ्या.>>>
==>> नांगराला जाणार नाही ना शेत. एवढं पण नाही कळत का तुम्हाला गुरुजी?

<<< कोठेही सोडा. त्यांना पाहिजे तिथे ते जातील.>>
==>> ख्यॅ ख्यॅ ख्यॅ . . . सोयीस्कर बगल. उचली जीभ लावली टाळ्याला. बोलायला काय जातंय ? उत्तर नसले की काही बाही फेकून द्यायचा. एका राष्ट्रीय पक्षाचा अजेन्डा च आहे तो.

<<<स्वतःजवळ ठेवायचे असतील तर त्यांचा जीवघेण्या यातना देऊ नका, त्यांचा छळ करू नका, त्यांच्यावर क्रूर अत्याचार करू नका आणि कसायाकडे पाठवू नका.>>>
==>> फिदीफिदी फिसफिस फिदीफिदी फिसफिस . . .

श्रीगुरुजी's picture

12 Apr 2017 - 5:29 pm | श्रीगुरुजी

संपूर्ण हास्यास्पद प्रतिसादावर फिदीफिदी फिसफिस फिदीफिदी फिसफिस . . . . . २० लाख वेळा.

विशुमित's picture

12 Apr 2017 - 5:40 pm | विशुमित

चला 'अभ्या' च्या टी-शर्ट ला आणखी नाव मिळालं.

"फिदीफिदी फिसफिस फिदीफिदी फिसफिस"

श्रीगुरुजी's picture

12 Apr 2017 - 5:46 pm | श्रीगुरुजी

+ २० लाख

या वाक्यांच्या पार्श्वभूमीवर टीशर्टवर एक शेतकरी छापल्यास अजून मजा येईल.

अप्पा जोगळेकर's picture

10 Apr 2017 - 5:41 pm | अप्पा जोगळेकर

या बाबतीत तुमची मते अतिरेकी आहेत. करमणूकीसाठी प्राणी वापरुन नयेत इथवर ठीक आहे.
खाण्यासाठी, आर्थिक उपयोगासाठी जनावरांचा वापर करावाच लागतो. नाहीतर अर्थव्यवस्थेत आणि समाजव्यवस्थेत एक मोठीच पोकळी तयार होईल.
बाकी ते बैलाला कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवतो वगैरे बाता निरर्थक असतात हे खरेच आहे. शेतकरी विपन्नावस्थेत वगैरे प्रमाणेच.

पुंबा's picture

10 Apr 2017 - 6:23 pm | पुंबा

++११
गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या आदी प्राण्यांचे उत्क्रांतीच्या प्रक्रियेत केवळ दूध, मांस देण्याच्या मशीन्स असे रुपांतर झाले आहे. त्यांना स्वतंत्र कसलेच अस्तित्व राहिले नाही. आता, ह्या रस्त्यावरून माघारी जाणे अशक्य आहे. अन्न म्हणून त्यांचा वापर त्याज्य असणे म्हणजे या प्राण्यांचा अर्थव्यवस्थेत उपयोग करून घेण्यात कमी पडणे. केवळ शाकाहारावर अवलंबून राहणे तर मानवाला शक्यच नाही, ह्या प्राण्याच्या मांसावाचून लक्षावधी लोक कुपोषीत राहतील, भूकबळी जातील. तेव्हा निदान जितक्या वेदनारहित तर्हेने त्यांना मारता येईल तितके बरे. तसेच, त्यांच्या जीवनकाळात त्यांना कमीत कमी त्रास होईल एवढे बघणे आपल्या हातात आहे(तेसूद्धा करूणा या मानवी मुल्याची बूज म्हणून). करमणूकीसाठीदेखील मुळीच वापरू नये असे नाही, जर जालिकट्टूत व्हायचे तसे अत्याचार प्राण्यांवर होऊ नयेत, बैलगाडा शर्यत चालेल.

श्रीगुरुजी's picture

11 Apr 2017 - 2:14 pm | श्रीगुरुजी

बाकी ते बैलाला कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवतो वगैरे बाता निरर्थक असतात हे खरेच आहे. शेतकरी विपन्नावस्थेत वगैरे प्रमाणेच.

हहपुवा

<<<शेतकरी विपन्नावस्थेत वगैरे प्रमाणेच.

हहपुवा>>>

ओके.

घ्या हसून. तुमची प्राणी मात्र बद्दलची संवेदनशीलता नेमकी माणसांच्या बाबतीत कोठे जाते हे काही उमगले नाही. असो.

संदीप डांगे's picture

12 Apr 2017 - 11:34 am | संदीप डांगे

=)) =))

श्रीगुरुजी's picture

12 Apr 2017 - 2:58 pm | श्रीगुरुजी

मुक्या प्राण्यांवर स्वतःच्या स्वार्थासाठी अत्याचार करणार्‍यांची मला चीड येते.

हतोळकरांचा प्रसाद's picture

12 Apr 2017 - 1:13 pm | हतोळकरांचा प्रसाद

आधी चर्चिलेलेच मुद्दे परत येत आहेत. पाळीव प्राणी हा माणसाच्या या ना त्या कारणासाठी (मग तो स्वार्थासाठी का असेना) वापरला जातो म्हणूनच तो पाळीव प्राणी आहे आणि हे माणसाला प्राण्यांचा असा उपयोग असतो हे माहित झाल्यापासून असेच आहे. ते मान्य नसेल तर मग बैल, शेळ्या, कुत्रे, मांजरं, कोंबड्या वगैरे प्राण्यांचं करायचं काय यावर थोडं मतप्रदर्शन करा!

आज माणसाला मेंदू आणि विचार आहे म्हणून आणि ते विचार जरा जास्तच प्रगल्भ झाले आहेत म्हणून माणसाच्या अगदी उत्क्रांतीशी निगडित गोष्टींवरही प्रश्नचिन्ह उभे केले जातेय.

गामा पैलवान's picture

10 Apr 2017 - 12:28 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

या प्रकारावर कायद्याने संपूर्ण बंदी आल्यास हा छळ थांबेल.

माझ्या मते शर्यतींवर सरसकट बंदी आणण्याची गरज नाही. त्यांचं यथोचित नियमन पुरेसं ठरावं. बंदी केवळ गैरप्रकारांवर असावी.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

10 Apr 2017 - 3:18 pm | श्रीगुरुजी

बैलगाडी शर्यत हा संपूर्ण गैरप्रकारच आहे. गावाकडच्या लोकांना शर्यतीची एवढी खाज असेल तर त्यांनी मुक्या प्राण्यांना यातना देऊन बळजबरीने गाड्याला जुंपण्यापेक्षा स्वतःला गाड्याला जुंपून घ्यावे व शर्यत लावावी.

गामा पैलवान's picture

11 Apr 2017 - 2:19 am | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

तुमच्या मते शर्यती गैरप्रकार असतील तर त्याविरुद्ध प्रबोधन करणं उचित ठरेल. केवळ कायद्याने रीतीभाती बंद होत नसतात.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

11 Apr 2017 - 11:01 am | श्रीगुरुजी

होतात की. सतीची क्रूर पद्धत कायद्यामुळेच बंद झाली. बैलगाडी शर्यत व जालिकट्टू हा क्रूर प्रकार गेली २-३ वर्षे कायद्यामुळे बंद झाला होताच.

गामा पैलवान's picture

11 Apr 2017 - 12:21 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

हिंदूंमध्ये क्वचितच सती जात. ही वास्तुशांत किंवा सत्यनारायणासारखी सर्वमान्य प्रथा नव्हती.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

11 Apr 2017 - 2:12 pm | श्रीगुरुजी

कायद्यामुळेच हा क्रूर प्रकार बंद झाला ही वस्तुस्थिती आहे.

गामा पैलवान's picture

12 Apr 2017 - 5:56 pm | गामा पैलवान

साफ चूक ! उठसूट सती पाठवायची प्रथा अस्तित्वात नव्हतीच मुळातून. कायद्याने सती बंद केली ही शुद्ध दिशाभूल आहे.

-गा.पै.

सचु कुळकर्णी's picture

12 Apr 2017 - 6:10 pm | सचु कुळकर्णी

कायद्याने सती बंद केली ही शुद्ध दिशाभूल आहे.
बास तुम्हि सांगीतलत ना, आता स्वत: लॉर्ड बेंन्टिंक किंवा राजा राम मोहन रॉय सुध्दा आले तरी आम्हि मिपा कर त्यांना सति प्रथा बंदि कायदा आवश्यकता नसताना का केलात ? आमच्या धर्मात आवश्यकता नसताना लुडबुड का केलीत ह्याबद्दल जाब सुध्दा विचारु.

गामा पैलवान's picture

13 Apr 2017 - 12:08 am | गामा पैलवान

सचु कुळकर्णी,

अगदी बरोबर बोललात पहा. विचारूच मुळी जाब. १८२९ पूर्वी आणि नंतर बंगालमध्ये किती सती प्रकरणे घडली? नगण्य. मग कशाला पाहिजे कायदा?

आ.न.,
-गा.पै.

सचु कुळकर्णी's picture

13 Apr 2017 - 1:35 am | सचु कुळकर्णी

सर आय न्यू दँट आय वॉज राईट, अस आहे आ.न.गा.पै. की तो जो झाकिर नाईक आहे ना तो थोडीही तोशिस स्वत: ला न लागु देता जे विष काहि लोकांमध्ये पसरवायचा किंवा कदाचित अजुनहि पसरवत असेल त्याला त्या करीता सौदि रियाल मिलतात प्लस संरक्षण. तुम्हि सुध्दा सेम करताय पण फरक हा आहे कि तुम्हि शिक्षित आहात आणि कुठल्या पाश्चिमात्य देशात स्थाईक तरी आहात किंवा सध्यातरी तिथे आहात पण तुम्हि स्वखर्चावर स्वत: च हास करून घेता. मर्जि तुमचि बाप्पा. धर्म म्हणुन हिंदु लावत असलो तरी नशिब आम्हि मेंढर नाहि आहोत, आम्हि दाढि बघुन कोणा निष्पाप जिवाला मारत हि नाहि अन जान्हव बघुन कोणा नालायकला सोडत हि नाहि.
आपल्या सारख्या आसारामांशि नित्य संग जडो हि प्रभु चरणि प्रार्थना, ताकी हम भि कुछ सिंखे भाई ;)

गामा पैलवान's picture

13 Apr 2017 - 11:55 am | गामा पैलवान

सचु कुळकर्णी,

१८२९ पूर्वी किती सती प्रकरणे बंगालमध्ये घडली? विदा देता का?

काय तर म्हणे झाकीर नाईक आणि दाढीवरून मारणे आणि आसाराम बापू. कशाचा कशाला संबंध आहे का. तुम्ही मेंढरंच दिसता आहात.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

13 Apr 2017 - 2:54 pm | श्रीगुरुजी

https://en.wikipedia.org/wiki/Sati_(practice)

Between 1815 and 1818, the number of Sati in Bengal province doubled from 378 to 839.

Sati was observed within Sikh aristocracy. For example, when the founder of the Sikh Empire Ranjit Singh died in 1839, four of his proper wives and seven of his concubines committed themselves to sati.[7] Two wives committed sati when Sikh King Kharak Singh died, and five women joined the funeral pyre of Maharaja Basant Singh.[7][72] When Raja Suchet Singh[73] died in 1844, 310 women committed sati.[7] Sikh theology does not support the Sati practice, however, as is evidenced by the criticism of the practice by the 3rd Sikh Guru Guru Amar Das (1479–1554).[74]

http://www.kashgar.com.au/articles/life-in-india-the-practice-of-sati-or...

British East India Company recorded that the total figure of known occurrences for the period 1813 - 1828 was 8,135; another source gives the number of 7,941 from 1815 - 1828, an average of 618 documented incidents per year. However, these numbers are likely to grossly underestimate the real number of satis as in 1823, 575 women performed sati in the state of Bengal alone (Hardgrave 1998).

श्रीगुरुजी's picture

12 Apr 2017 - 7:57 pm | श्रीगुरुजी

साफ चूक ! उठसूट सती पाठवायची प्रथा अस्तित्वात नव्हतीच मुळातून. कायद्याने सती बंद केली ही शुद्ध दिशाभूल आहे.

धन्य आहे!

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Apr 2017 - 3:00 pm | llपुण्याचे पेशवेll

सगळीकडच्या बीफ, पोर्क,चिकन मटनाच्या दुकानांवर पण बंदी असायला पाहीजे. त्यामधेही हे मुके प्राणी असेच हाल हाल (हलाल) करून मारले जातात. गोहत्या बंदी तर न्यायालयाने आणली आहेच. शेती व्यवसायावरही बंदी आणावी कारण त्यात हजारो झाडांची रोजच्या रोज कत्तल केली जाते. माणसाने अन्य माणूस मारून खायलाच परवानगी असावी म्हणजे 'जीवो जीवस्य जीवनम' हे वाक्य राईटली जस्टीफाय होईल.

अमर विश्वास's picture

12 Apr 2017 - 12:15 pm | अमर विश्वास

माणसाने अन्य माणूस मारून खाण्याला 'जीवो जीवस्य जीवनम' म्हणत नाहीत हो पेशवे बुवा ...

सतिश गावडे's picture

12 Apr 2017 - 12:19 pm | सतिश गावडे

ते पेशवे आहेत, त्यामुळे ते काहीही म्हणू शकतात. :)

विशुमित's picture

12 Apr 2017 - 12:30 pm | विशुमित

असय वय.
मला संस्कृत कळत नाही. त्यामुळे गप्प बसून विश्वास ठेवला.

गामा पैलवान's picture

14 Apr 2017 - 1:56 am | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

तुम्ही दिलेला लेख वाचला. त्यातलं एक वाक्य महत्त्वाचं आहे :

The common deciding factor was often ownership of wealth or property, since all possessions of the widow devolved to the husband's family upon her death.

असे मृत्यू आजही होत असतात. त्यांना हुंडाबळी म्हणतात. च्यायला, पैशासाठी बाई जाळायची आणि पावती सतीच्या नावावर फाडायची. बाई जाळण्याचा सतीशी संबंध नाही.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

14 Apr 2017 - 8:09 pm | श्रीगुरुजी

साफ चूक. सती व हुंडाबळी हे पूर्ण वेगळे आहेत.

- हुंड्याची प्रथा भारतात सर्वत्र होती. जर सती हा हुंडाबळीचाच प्रकार असता तर सती प्रकरणे भारताच्या सर्व भागात घडली असती. परंतु सती प्रकरणे मुख्यत्वेकरून बंगाल व राजस्थानातच घडलेली आहेत.

- सती हा हुंडाबळीचा प्रकार असता तर सर्व जातीजमातींमध्ये हे प्रकार घडले असते. परंतु सती प्रकरणे काही विशिष्ट सवर्ण जातीतच घडलेली आहेत.

त्यामुळे सती व हुंडाबळीचा संबंध नाही.

गामा पैलवान's picture

14 Apr 2017 - 10:30 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

सती व हुंडाबळी हे पूर्णपणे वेगळे आहेत हे मान्य. मात्र जशी हुंडाबळीत पैशासाठी बाई जाळली जाते तशाच धर्तीवर सतीच्या नावाखाली विधवा जाळली जातेय. विधवा जाळण्याचा सतीशी प्रत्यक्षात काहीही संबंध नाही.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

14 Apr 2017 - 10:56 pm | श्रीगुरुजी

पुन्हा एकदा चूक. मानापमानाच्या मूर्ख कल्पना, त्याला धार्मिकतेची दिलेली जोड आणि सतीचे केलेले उदात्तीकरण यामुळे सती प्रकरणे घडत होती. केवळ कायदेशीर बंदीमुळेच हा क्रूर प्रकार बंद झाला.

गामा पैलवान's picture

16 Apr 2017 - 3:17 am | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

मानापमानाच्या मूर्ख कल्पना, त्याला धार्मिकतेची दिलेली जोड आणि सतीचे केलेले उदात्तीकरण यामुळे सती प्रकरणे घडत होती.

आजीबात नाही. पैसे व मालमत्तेसाठी विधवा जाळण्यात येत असे. सती केवळ निमित्त होतं.

आ.न.,
-गा.पै.

गापै व श्रीगुरूजी, तुम्ही दोघांनीही सांगितलेले खरे आहे.

मानापमानाच्या मूर्ख कल्पना, त्याला धार्मिकतेची दिलेली जोड आणि सतीचे केलेले उदात्तीकरण + पैसे व मालमत्तेसाठी

हे दोन्हीही सतीच्या प्रथेसाठी कारणीभूत होते. विशेषतः रूपकुंवर प्रकरण हे सतीचे स्वतंत्र भारतातील सगळ्यात भयानक व चर्चीत प्रकरण. तिच्या मृत्यूनंतर जरी सती म्हणून तिचे गौरवीकरण केले गेले(अगदी विजयाराजे सिंधियांनीही या प्रकरणाचे समर्थन केले). तरी नंतरच्या तपासात तिच्या सासरच्या माणसांनी मालमत्तेच्या मोहापायी तिला जाळले असे आढळले. त्यामुळे पुर्वी(सतीवर बंदी घालण्याच्या आधी) 'धार्मिकतेची दिलेली जोड' हे मुख्य कारण होते मात्र नंतरच्या काळात झालेल्या सतीप्रकरणे अधिक गुंतागुंतीची आहेत असे वाटते.

श्रीगुरुजी's picture

17 Apr 2017 - 2:41 pm | श्रीगुरुजी

सतीला धार्मिकतेची जोड देऊन उदात्तीकरण केले गेले होते. सती गेलेल्या जागेवर तुळशीवृंदावन बांधून सतीची स्मृती जिवंत ठेवण्यात येत असे किंवा त्याजागी मंदीर उभे केले जात असे.

मूळ मुद्दा सती हा नाही. मुद्दा हा आहे की कायद्यामुळे अशा क्रूर प्रथा थांबविल्या जाऊ शकतात. समजा सती जाण्यामागे मालमत्ता हे कारण होते हे क्षणभर गृहित धरले तरी सतीविरोधात कायदा केल्यामुळेच ही प्रथा बंद झाली. असाच कायदा जालिकट्टू, बैलगाडी शर्यत इ. क्रूर प्रकारांविरूद्ध करणे आवश्यक आहे.

Ranapratap's picture

16 Apr 2017 - 10:11 am | Ranapratap

सोडा आता हा बंदीचा नाद. बैल माझा पांढरा, काळा शर्यतीचा नाद खुळा. यात्रा सुरु झाल्या , पुन्हा चैतन्य आले. या 19 तारखेला यात्रेला. आता पुन्हा होणार शर्यतीचा थरार.
भिरर र र र र र , आरारा रा रा रा,
आता जुंपला जाणारा खेळ,
घिनाजी भागूजी थोरात,
मु पो मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे,
आंबेगाव तालुक्यातील एक नामांकित बारी आहे ब्र का मंडळी,
अरे झाली s s s s s s ..........
गोंडा उडवत निघाली थोरातांची बारी,
छान, .. छान, छान ..
अरे उचल कि टाक.
सेकंद 17
ह्याचा थरार तुमाला काय कळणार.
द्या सोडून, घ्या मिटवून.

श्रीगुरुजी's picture

16 Apr 2017 - 3:52 pm | श्रीगुरुजी

ख्यँ ख्यँ ख्यँ . . .

पुंबा's picture

17 Apr 2017 - 5:14 pm | पुंबा

जालिकट्टूत आणखी एक बळी
जालीकट्टूचे आयोजन करणारे कोणत्याही प्रकारची दक्षता घेत असल्याचे दिसत नाही.

Ranapratap's picture

18 Apr 2017 - 8:01 pm | Ranapratap

श्री गुरुजी, आजच काही बैलगाडा शौकिनाशी बोलताना समजले की, पुणे शहराच्या आसपास एकाची जमीन शर्यतीचे ठिकाण म्हणून वापरली जाते व गुंडगिरीच्या जोरावर त्याला ती जमीन दिली जात नाही, त्या व्यक्तीने याचिका दाखल करून शर्यतीवर बंदी आणली आहे. खरे, खोटे ती व्यक्तीच जाणे. पण हे खरे असेल तर हे कसले बेगडी प्राणी प्रेम, जरा माहाती घेऊन सांगाल का.

श्रीगुरुजी's picture

16 Aug 2017 - 2:21 pm | श्रीगुरुजी
हतोळकरांचा प्रसाद's picture

16 Aug 2017 - 5:03 pm | हतोळकरांचा प्रसाद

सरकार नियमावली सादर करत नाही तोपर्यंत मनाई आहे, बंदी नव्हे! बाकी कत्तलखान्यांवर का बरे अशीच मनाई आणत नसतील म्हणे?

श्रीगुरुजी's picture

19 May 2023 - 9:41 am | श्रीगुरुजी

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीला मान्यता दिल्याचा आनंद साजरा करू या.

अश्या किरकोळ घटनांकडे पूर्ण दुर्लक्ष करणे उत्तम. आपली संस्कृती, परंपरा जपणे हेच खरे महत्त्वाचे आहे.

इपित्तर इतिहासकार's picture

26 May 2023 - 10:16 am | इपित्तर इतिहासकार

बरीच सुधारणा आहे म्हणायची एकंदरीत !.

प्रसाद गोडबोले's picture

26 May 2023 - 1:47 pm | प्रसाद गोडबोले

आपली संस्कृती, परंपरा जपणे हेच खरे महत्त्वाचे आहे.

आपली म्हणजे नक्की कोणाची?
जैन, भागवत संप्रदायी ब्राह्मण, काही कडक शैव आणि उत्तर भारतातील नामधारी वगैरे मोजके संप्रदाय सोडले इथे कोणीही अहिंसक नाहीये.
तुम्ही उगाचच आपली आपली म्हणून ब्राह्मणी नैतिकतेची व्याख्या ब्राह्मणेतर समाजावर लादू नका.
तुम्ही तुमच्या वरणभात अन् तूप पोळी मध्ये खुष रव्हा अन् पळी पंचपात्रात खेळत बसा.
हिंसा हा क्षात्र वृत्तीचा अविभाज्य घटक आहे, आता कोणी क्षत्रिय नसले म्हणून काय झाले, हिंसा होत राहणारच .

श्रीगुरुजी's picture

26 May 2023 - 3:10 pm | श्रीगुरुजी

आपापसात पाहिजे तितकी हिंसा करा, मुक्या निष्पाप प्राणी पक्षांची हिंसा नको.

आपली म्हणजे नक्की कोणाची?
जैन, भागवत संप्रदायी ब्राह्मण, काही कडक शैव आणि उत्तर भारतातील नामधारी वगैरे मोजके संप्रदाय सोडले इथे कोणीही अहिंसक नाहीये.
तुम्ही उगाचच आपली आपली म्हणून ब्राह्मणी नैतिकतेची व्याख्या ब्राह्मणेतर समाजावर लादू नका.
तुम्ही तुमच्या वरणभात अन् तूप पोळी मध्ये खुष रव्हा अन् पळी पंचपात्रात खेळत बसा.
हिंसा हा क्षात्र वृत्तीचा अविभाज्य घटक आहे, आता कोणी क्षत्रिय नसले म्हणून काय झाले, हिंसा होत राहणारच.

कृपया स्पष्टीकरण द्यावे.

तुम्हाला विचारुन सुध्द्दा तुमचे स्पष्टीकरण आले नाही, त्यामुळे अधिक स्पष्ट्च विचारतो आता.
-

हिंसा हा क्षात्र वृत्तीचा अविभाज्य घटक आहे, आता कोणी क्षत्रिय नसले म्हणून काय झाले, हिंसा होत राहणारच.

हे क्षत्रिय कधी संपले? श्री शिवाजी महाराज क्षत्रिय होते का? त्यांचा राज्याभिषेक तुम्हाला मान्य आहे का?

Ranapratap's picture

25 May 2023 - 10:49 pm | Ranapratap

श्री गुरुजी,
बैल गाड्यांची शर्यत किंवा जलिकाठू हा शेतकऱ्यांचा मनोरंजनाचा भाग आहे. श्रीमंत लोंकाच्य घोडा शर्यती ही होतात त्या वेळी आपण आक्षेप घेत नाही. मग सर्व सामान्य लोकांच्या खेळाला विरोध का?

श्रीगुरुजी's picture

25 May 2023 - 10:55 pm | श्रीगुरुजी

कोणत्याही प्राण्यांच्या शर्यती, टक्कर, झुंजी, नांगर किंवा गाड्याला जुंपून राबविणे, जिव्हारूचीसाठी हत्या या प्रकारांना मी सक्त विरोध केला आहे.

स्वतःच्या मनोरंजनासाठी बैल किंवा इतर कोणत्याही प्राण्यांच्या शर्यती आयोजित करणे आणि त्यासाठी त्यांच्यावर क्रूर अत्याचार करणे अत्यंत निषेधार्ह आहे.

श्रीगुरुजींशी असहमती व्यक्त करत, मालकांना आपल्या बैलाची किती काळजी असते त्याचा हा पुरावाच देतो,

हा घ्या

https://youtu.be/EhmvOu_mtog

पैजारबुवा,

श्रीगुरुजी's picture

27 May 2023 - 9:55 am | श्रीगुरुजी

१) हे मालक आपल्या बैलांचे वृषण दांडक्याने किंवा दगडाने ठेचून आणि हा निर्दयी प्रकार करताना त्यांना मरणांंतिक वेदना देऊन त्यांना नपुंसक करतात का?

२) हे मालक त्यांच्या तळपामात नाल ठोकून त्यांना अपार वेदना देतात का?

३) हे मालक बैलांना मरेपर्यंत नाकात वेसण घालून नांगराला जुंपून भर उन्हात राबवितात का?

४) हे मालक बैलांना गाड्यास जुंपून प्रचंड वजन ओढायला लावतात का?

५) हे मालक स्वतःच्या करमणुकीसाठी बैलांना शर्यतीत पळायला लावतात का?

६) शर्यतीत बैलांनी वेगाने पळावे यासाठी हे मालक बैलांची शेपूट पिरगाळणे, कानात लाल मुंग्या सोडणे, मद्य पाजणे, टोकेरी खिळे लावलेल्या चाबकाने मारणे, टाचणी टोचणे असे क्रूर प्रकार करतात का?

७) बैल वृद्ध झाल्यानंतर चाऱ्याचा खर्च टाळण्यासाठी आणि कमाईसाठी हे मालक बैल खाटकाला विकून टाकतात का?

वरीलपैकी एकाही प्रश्नाचे उत्तर होय असेल तर मालकाची बेलांवर कणभरही माया नसून मालक स्वार्थासाठी बैलांवर फक्त अत्याचार करतात हे सिद्ध होते.

बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना पुरणपोळी देणे, शिंगे रंगविणे, गोंडे बांथणे ही माया नसून केवळ देखावा आहे.

रात्रीचे चांदणे's picture

27 May 2023 - 9:32 am | रात्रीचे चांदणे

श्री गुरुजी, तुमच म्हणण योग्य असल तरीही ह्या काळात प्रॅक्टिकल वाटत नाही. फार फार तर ह्यात आपण जनावरांना कमीत कमी वेदना कशा होतील याबाबतचे नियम बनवले पाहिजे किंवा असतील तर त्याचे पालन केले पाहिजे.
बैलगाडा शर्यत हा खेळ काही वर्षात नामशेष होईल कारण आत्ताच बैल बघायलाही मिळत नाहीत. सध्याला शेतीची बहुतांश कामे ही यंत्र वापरूनच केली जातात.

श्रीगुरुजी's picture

27 May 2023 - 10:00 am | श्रीगुरुजी

धन्यवाद!

बऱ्याच गोष्टी आज प्रॅक्टिकल वाटत नाहीत असे वाटत असले तरी त्या प्रत्यक्षात आल्या आहेत. नियम पूर्वीपासूनच आहेत, परंतु ते पाळले जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे. बैलगाडी शर्यत नामशेष होईल आणि शेतीची कामे फक्त यंत्रानेच होतील तो सुदिन.

इपित्तर इतिहासकार's picture

27 May 2023 - 7:21 pm | इपित्तर इतिहासकार

पण बैलगाडा शर्यती नामशेष वगैरे होतील किंवा येत्या काही वर्षात नामशेष होतील हे म्हणायला बेसिस काय ते कळले तर बरे होईल.

गावाकडे उत्तम सुरू आहेत शर्यती, वेगवेगळ्या पद्धतीने, विदर्भात शंकरपट सुद्धा होतात भरपूर अजूनही (बैलगाडा शर्यतीस तिथे स्थानिक नाव आहे ते)

गुरुजी तुम्ही व्हिगन आहात का ? (प्रश्न शाकाहारी आहेत का असा नाही. ते तर असावेत असा अंदाज आहे.)

.

फोटोमध्ये असलेल्या देवतेस आम्ही हिंदू ब्रह्मांड चालक अन् नाशक बाप मानतो आमचा.

ह्यांचा एक भाऊ तर गरुड पक्ष्यावर बसतो.

बायकोचे एक स्वरूप सिंहावर बसते

थोरल्या पोरग्याने मोर वाहन केले आहे तर

बारक्या पोराने उंदीर (हे बारकं पोरगं महाराष्ट्राचे आराध्य अन् आमचे आवडते आहे ते एक असो)

तर असे हे आमचे हिंदूंचे आराध्य असणारे सगळे देव तुमच्या लेखी निषेधार्ह असणार का ?

अनुक्रमे नंदी, गरुड, सिंह, मोर आणि उंदरावर वाहन म्हणून वापरल्याचा ठपका ठेवून ?

जीवदया असणे इष्ट आहेच पण ते कुठे अन् किती तानायचे अन् कुठं स्वतःचे हसे करून घेण्या अगोदर थांबायचे इतके सेन्स असायला हवे

हे आमचे प्रांजल मत. बाकी इतर तर्क कर्कश्य प्रवादांशी घेणेदेणे नाही.

ले.सी.

- ई. ई.

हे सर्व गरुड, नंदी, मोर, मूषक हे बोलणारे दैवी प्राणी आहेत. गरुड तर सगळ्यात ताकदवान, इंद्र आणि सर्व देवांना सुध्दा न आवरता येणारा. हे सगळे आपापल्या चालकाचे भक्त आहेत आणि त्यांच्याशी बोलून चालून आहेत.

तुम्हाला पण बोलणारा बैल मिळाला तर खुशाल बसा त्याची परवानगी घेऊन त्यावर. :)

इपित्तर इतिहासकार's picture

27 May 2023 - 10:03 pm | इपित्तर इतिहासकार

ऐकावं ते नवलच

I'm confused