द अंडरटेकर रिटायर्स
आज सकाळी एकीकडे किशोरी ताईंच्या निधनाची बातमी वाचली आणि दुसरीकडे अंडरटेकर पुन्हा कधीच रिंगमधे येणार नसल्याची. किशोरी ताई निवर्तल्या, अंडरटेकर निवृत्त झाला. एकीकडे सूर, तर दुसरीकडे WWE मधला असुर. इकडे सम, तर तिकडे दम. दोनही गोष्टी 'आता पुन्हा नाहीत' हे मात्र साम्य होतं.
कदाचित बरेच जण रेस्लिंग किंवा WWE बघणारे नसतील, पण अंडरटेकर हे नाव तरीही त्यांनी ऐकलेलं असेल. कारण त्याचा करिश्माच तसा होता. या निमित्ताने अंडरटेकरच्या काही आठवणी.
एन्ट्री -
द डेडमॅन ! - चर्च च्या बेल्स च्या आवाजासरशी अरेनातले लाइट बंद, सगळीकडे धूर आणि गडद निळे स्पॉटलाइट्स, प्रवेशद्वारावरच्या स्क्रीनवर विजा, पडके वाडे इत्यादींची चित्र फ्लॅश होतायत आणि अंडरटेकर अचानक रिंगमधे ! या एन्ट्रीने जो अंगावर काटा यायचा त्याला तोड नाही. द डेडमॅन !
बिग ईव्हल - पुढे या डेडमॅनचं रूप, ढंग बदलण्याचेही प्रयोग झाले. 'तो' अंडरटेकरही आवडलाच होता. लिम्प बिझकिट च्या कीप रोलिन ! गाण्याच्या जोडीने अंडरटेकर वेगवेगळ्या चॉपर बाईक्स घेऊन एन्ट्री करायचा. लव्हली. कधीकधी डेडमॅन पेक्षाही हा आवडला. बिग ईव्हल!
द फीनॉम - पुढे पुन्हा मूळपदाकडे गाडी आली. त्याचा ताज्यातला ताजा एन्ट्रन्स असा होता.
सिग्नेचर मूव्ह्ज
प्रत्येक डब्ल्यू डब्ल्यू ई स्टार हे एक पात्र असतं, एक व्यक्तिरेखा असते. आणि प्रत्येकाची ओळख त्याच्या एन्ट्रीत, एन्ट्रीनंतरच्या अभिवादनातनं, डायलॉग्स मधून, आणि महत्वाचं म्हणजे सिग्नेचर मूव्हज मधून तयार केलेली. अशाप्रकारे या अंडरटेकरच्या काही एक से एक सिग्नेचर मूव्ह्ज, फिनिशिंग मूव्ह्ज होत्या. त्यांचे काही व्हिडियोज. माझी फेवरेट - टूंब्स्टोन पाईलड्रायव्हर.
१. चोकस्लॅम - हा माझ्यामते अंडरटेकर सारखा भारी कुणीच करत नाही. चोकस्लॅम केन, बिग शो सारखे इतरही रेसलर वापरतात. पण अंडरटेकर एक नंबर.
२. द लास्ट राईड - हे काहीसं पॉवरबाँब सारखंच. पण अंडरटेकर टच.
३. टूंबस्टोन पाईलड्रायव्हर - यानंतर जे तो जीभ बाहेर काढून प्रतिस्पर्ध्याला पिन करायचा, ते लहान असताना लई डेंजर वाटायचं.
४ हेल'स गेट - ही सब्मिशन मूव्ह होती. वर्णनापेक्षा बघाच.
अंडरटेकरबद्दल आणखी काही गोष्टी.
१ - लहान असल्यापासून डब्ल्यू डब्ल्यू एफ (आता ई) चं वेड होतं. आणि तेंव्हा अंडरटेकर हे 'भूत' आहे अशी फार चर्चा होती. आणि ते खरंही वाटायचं. म्हणजे त्याचं ते भयानक प्रकारे येणं, डोळे वर फिरवून पिन करणं इत्यादी गोष्टी जाम थ्रिलिंग आणि खर्या वाटायच्या.
२. पूर्वी त्याच्या बरोबर पॉल बेअरर नावाचा त्याचा मॅनेजर असायचा. तो एक कमंडलूसारखी बाटली सोबत घेऊन असायचा. अंडरटेकर्स अर्न असं त्या गोष्टीचं नाव. त्यात म्हणे अंडरटेकरचा आत्मा आहे. (हे लिहितानाही मजा येतेय) पण असाच आमचा विश्वास होता एकेकाळी.
३. त्याची स्ट्रीक. - रेसलमेनियातला त्याचा रेकॉर्ड २३-२ असा आहे. पंचवीस रेसलमेनियापैकी २ मधे तो हरला. १ ब्रॉक लेसनर आणि २ रोमन रेन्स (शेवटची मॅच)
हां, अंडरटेकर आणखी एक मॅच हरला. वाईट हरला. आणि त्याला हरवणारा एक भारतीय होता याचा सार्थ अभिमान आहे. तो दुसरा तिसरा कुणी नसून; नाही, रजनीकांत नाही. रजनीकांत फक्त ओव्हरटेक करतो, अंडरटेक नाही. तर तो होता आपला अक्षय कुमार !
४ इतर रेसलर्ससारखा अंडरटेकर काही जबरदस्त मस्क्युलर नाही. पण ७ फुटी उंची आणि रूंद बांधा यामुळे तो नेहमीच डॉमिनेटिंग वाटला.
५ केन हा त्याचा सावत्र भाऊ आहे, व त्यांचं वैर आहे अशा चर्चा होत्या. पुढे 'ब्रदर्स ऑफ डिस्ट्रक्शन' नावाने त्यांनी पार्टनरशिप केली व अनेक रंजक सामने प्रेक्षकांना बघायला मिळाले.
६ अनेकदा प्रतिस्पर्ध्याला अंडरटेकरने हरवल्यावर रिंगजवळ एक शवपेटी आणली जाई, व अंडरटेकर प्रतिस्पर्ध्याला त्यात ढकलून झाकण बंद करत असे. आणि घोगर्या आवाजात माईकवर 'रेस्ट... इन... पीस....' म्हणून एक्झिट घेत असे. जाम भारी वाटायचं ते.
डब्ल्यू डब्ल्यू ई पूर्वीपासून बघत आलोय. आजही बघतो वेळ मिळाला की. हे ठाऊक आहे की त्या कोरिओग्राफ्ड फाईट्स आहेत आणि प्रत्यक्षात असं कुणी कुणाला खरं मारलं तर मरायचीच लक्षणं आहेत. पण तरीही टीव्हीवर ते बघताना खरं वाटतं. मजा येते. काहीतरी संचारतं. थोडक्यात; मनोरंजन होतं. लहानपणी आमच्या शाळेतल्या, राहत्या भागातल्या काही मुलांनी डब्ल्यू डब्ल्यू ई सारख्या मारामार्या प्रत्यक्षात करायचे प्रयत्न करून आपल्याला व इतर कुणाला दुखापत करून घेतल्याचे किस्सेही झाले. आम्ही इतके सूज्ञ होतो किंवा घाबरट म्हणा, की खरं खुरं तसं मारायचा प्रकार कधी केला नाही. पण ट्रंप कार्ड्स मात्र खूप खेळलो. And with The Undertaker's card, we always knew we had a winner in our hands.
मार्क विलियम कॅलवे. जन्म २४ मार्च १९६५ आजचं वय ५२ वर्ष.
मिनिस्ट्री ऑफ डार्कनेस म्हणा, अमेरिकन बॅड अॅस म्हणा, बिग ईव्हल किंवा द अंडरटेकर. रेसलिंग रिंगमधे जरी हा अवलिया आता कुणाला 'हिट' करणार नसला तरी यूट्यूबवर त्याचे व्हिडियोज मात्र हिट्स मिळवत राहतील.
जाता जाता द अंडरटेकर ची काही अवतरणे. (स्त्रोत आंतरजाल असल्याने सत्यासत्यता पडताळलेली नाही. तरीही बरीचशी ऐकलेली आहेत यातली.)
The fear of death is far greater than the death itself. But the fear of the unknown is the greatest fear of all!
The Undertaker
There is no shame in going out fighting and getting your ass kicked, but there is no honor in not fighting at all.
The Undertaker
You can not kill that which is already dead.
The Undertaker
I may not dress like Satan anymore, but I’m still down with the Devil and I will go medieval on your ass.
The Undertaker
If the eyes are the windows to the soul, you're not going to like the view.
The Undertaker
You better give your soul to the Lord, because the rest of your scrawny ass, will belong to me!
The Undertaker
I don`t make mistakes. I bury them.
The Undertaker
Sometimes it's hell getting to heaven
The Undertaker
Evil comes in all shapes and sizes.
The Undertaker


वर्गीकरण
प्रतिक्रिया
आता खरोखर मोठे झालोय याचा भास
पूर्वी त्याच्या बरोबर पॉल
बरोबर. मिस्टॅक झाली. सुधारतो.
आम्ही त्याला डबलडेकरअंडरटेकर
मला अजुनही कळालेलं नाही की ही
हााहााहा
ग्रेट
लहानपणी
can you smell what the rock is cooking!!!!
can you smell what the rock
रॉकचे तर आपण एक नंबर पंखे हं!
+११११११११ सहमत
वेल्लाभाऊ,
एका अ-मृत युगाचा अस्त
हे सामने स्क्रिप्टेड असतात ना
हो स्क्रिप्टेड असतात ह्या
स्क्रिप्टेडच. कोरिएग्राफ्ड.
तो खरा अंडरटेकर न्हवताच..
तो खरा अंडरटेकर न्हवताच..
खिलाडीओं का खिलाडी मधली
हाहाहहा
येउद्या
चांगलं आहे ट्रिब्युट सॉंग...
हा फॅन व्हिडियो आहे. अनेक
मिस यू अंडरटेकर !
डब्लू डब्लू एफच्या फाईट्स