महापालिका, जिल्हा परीषद निवडणूक निकाल

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
21 Feb 2017 - 11:16 pm
गाभा: 

महापालिका व जिल्हा परीषद निवडणूक निकालांसाठी धागा.

http://www.loksatta.com/bmc-elections-2017/bmc-election-2017-exit-polls-...

इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून, भाजपच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार, शिवसेनेला मुंबईत ८६ ते ९२ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्या खालोखाल भाजपला ८० ते ८८ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. २०१२ मधील निकालांचा विचार केल्यास भाजपच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीचा परिणाम एक्झिट पोलमध्येही दिसून येतो आहे. काँग्रेसला ३० ते ३४ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ३ ते ६ जागांवरच यश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भाजप व शिवसेना या दोघांनाही ३२% मते मिळतील असा अंदाज आहे.

पुणे महापालिकेत सत्तांतर होण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. पुण्यात गेल्या १० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आहे. पण या निवडणुकीत भाजपला पुण्यात स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. एकूण १६२ जागांपैकी ७७ ते ८५ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला ६० ते ६६ जागा मिळण्याची शक्यता आहे.

ठाण्यामध्ये शिवसेना सत्ता राखण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. या महापालिकेत विशेष म्हणजे भाजप तिसऱ्या क्रमांकावर घसरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस २९ ते ३४ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

नागपूर महापालिकेत भाजपच पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, भाजपला ९१ ते १०० जागा मिळण्याची शक्यता आहे. या महापालिकेत एकूण १५१ जागा आहेत.

मुंबई -
शिवसेना – ८६ ते ९२
भाजप – ८० ते ८८
काँग्रेस – ३० ते ३४
मनसे – ५ ते ७
राष्ट्रवादी – ३ ते ६

पुणे -
भाजप – ७७ ते ८५
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस – ६० ते ६६
शिवसेना – १० ते १३

ठाणे -
शिवसेना – ६२ ते ७०
राष्ट्रवादी काँग्रेस – २९ ते ३४
भाजप – २६ ते ३३

नागपूर -
भाजप – ९१ ते ११०
काँग्रेस – ३५ ते ४१
शिवसेना – २ ते ४

_________________________

एबीपी माझा च्या अंदाजानुसार पिंचि मध्ये राष्ट्रवादी, नाशिकमध्ये सेना आणि अकोला, अमरावती व सोलापूर मध्ये भाजप प्रथम क्रमांकावर असेल.

_________________

दिल्ली व बिहार च्या कटु अनुभवापासून मी कोणत्याही सर्वेक्षणावर विश्वास ठेवणे बंद केले आहे.

प्रतिक्रिया

अप्पा जोगळेकर's picture

24 Feb 2017 - 12:49 pm | अप्पा जोगळेकर

राष्ट्रवादी निवडून आले असते तर सर्वसमावेशकतेला मत असते. कमळ आले म्हणून त्यांनी स्थानिक पातळीवर जातीचे राजकारण केले असे असते बहुतेक.

अप्पा जोगळेकर's picture

24 Feb 2017 - 12:01 pm | अप्पा जोगळेकर
अप्पा जोगळेकर's picture

24 Feb 2017 - 12:06 pm | अप्पा जोगळेकर

अत्यंत चांगली बातमी. जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता विकासाला कौल दिला. मराठा समाजाचे अभिनंदन.
आज फडणवीस विकासाच्या बाता आणि उत्तम काम करत आहेत.
उद्या जर ते उन्मत्त झाले तर जसे राष्ट्रवादीला लोळवले तसे भाजप ला सुद्धा धूळ चारण्यास जनतेने मागेपुढे पाहू नये.

विशुमित's picture

24 Feb 2017 - 12:15 pm | विशुमित

<<<जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता विकासाला कौल दिला. मराठा समाजाचे अभिनंदन>>
-- अहो जाती-पातीलाच त्यांनी थारा दिला म्हणून तर त्यात गोम आहे.

शाम भागवत's picture

24 Feb 2017 - 2:16 pm | शाम भागवत

जलयुक्त शिवार ही कल्पना जुनी असली (पृथ्विराजबाबांची) तरी अतिशय प्रभावी अंमलबजावणी ही बाब यात महत्वाची होती. त्यातून खूप मोठे नाव व विश्वास मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्यभरातून मिळवला. त्यामुळे विदर्भातील माणूस अशी त्यांची प्रतिमा जाऊन ती सर्वव्यापी झाली.
१) राज्यभर पसरलेली ग्रामीण भागातील योजना
२) प्रत्यक्ष दिसणारी व जाणवणारी योजना
३) ग्रामीण स्त्रियांचे त्रास कमी करणारी योजना
४) शेती वगैरे नेहमीचे मुद्दे सर्वांना माहित असल्याने ते देत बसत नाही.

१) १० टक्के सहभाग हा सक्तिचा केल्याने भ्रष्टाचाराला आळा बसला. पूर्वी योजना, मंजूरी, पूर्ती अहवाल वगैरे सगळेच कागदावर असे. कोणी त्याबाबत बोलले तर साम दाम दंड वगैरेने तो आवाज दाबला जात असे. मात्र १० टक्के सहभागामुळे कोणीतरी चुगली करेल या भितीने योजनेत गडबड करणे अवघड बनले.
२) कामाच्या सुरवातीचा फोटो व काम पूर्ण झाल्यावर काढलेला फोटो आंतरजालावर पाहाता येऊ लागल्यामुळे पारदर्शकता वाढली. भ्रष्टाचार करणे आणखीनच अवघड होऊन बसले. हे फोटो अपलोड करण्यासाठी खास मोबाईल अ‍ॅप बनवून ते अधिकार्‍यांच्या मोबाइलवर कार्यरत केले.
३) साधारणतः योजना मंजूरी प्रथम, व ती सुध्दा मंत्रालयात आणि नंतर पैशाची तरतूद हा प्रकार थांबवून प्रथम १००० कोटी मंजूर करवून घेऊन मग योजनांप्रमाणे खर्च करायची पध्दत खूपच परिणामकारक ठरली. कालापव्यय खूपच कमी झाला. (अर्थमंत्र्यांच्या लूडबूड क्षमतेला चाप बसवला. ही तर मुत्सद्दीपणाची कमाल होती. याबाबत जास्त लिहिणार नाहीये.)
४) योजना मंजूरी मंत्र्यालयाऐवजी जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्द केल्याने मंत्र्यालयातील हस्तक्षेप थांबला. व एकंदरीत कामाचा वेग इतका वाढला की जणू ही योजना सरकारी नसून एखादी खाजगी कंपनी चालवत आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी ६ महिने अगोदरच कामे सुरू व्हायला लागली. (पूर्वी पावसाळा सुरू होईपर्यंत मंजूरीच आलेली नसे. टक्केवारी व कोणत्या ठेकेदाराला काम द्यायचे यामधे मांडवली करण्यात वेळ जायचा.)
५) योजनांची अंमलबजावणीचे हक्क व अधिकार दोन्हीही जिल्हाधिकार्‍यांना दिल्यामुळे व बाह्य हस्तक्षेप टाळले गेल्यामुळे जिल्हाधिकारी सर्वस्वी जबाबदार धरले गेले व बहुतांश जिल्हाधिकार्‍यांकडून सर्वोत्तम काम करवून घेता आले. वेळप्रसंगी जिल्हाधिकारी बदलले गेले किंवा त्यांना समजही दिली गेली.
६) या योजनेच्या निमीत्ताने मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत राहिले व त्यामुळे लालफितीचा दोष आणखीनच कमी झाला. शिवाय मुख्यमंत्री स्वतः जातीने लक्ष घालत असल्याचा संदेश जाऊन तसेच त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे भ्रष्टाचार करणे अशक्य होऊन बसले.
एकंदरीत पारदर्शकता हा शब्दप्रयोग तेव्हापासून जास्त वापरला जायला लागला.

हीच पारदर्शकतेची मुख्यमंत्र्यांची हाक या निवडणुकीत खूप प्रभावी ठरली.

जलयुक्त शिवाराचे बरेच जण खूप गोडवे गात असतात पण पाठोपाठ येणाऱ्या राज्य सरकारांनी खरंच त्याचा शास्त्रीय अभ्यास करून तो कार्यान्वित केला आहे का?
http://www.hindustantimes.com/mumbai-news/hc-to-maha-govt-reconstitute-e...
http://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-high-court-comment-on-jalyukt...

शाम भागवत's picture

24 Feb 2017 - 6:42 pm | शाम भागवत

न्यायालयाने सांगितले आहे त्याप्रमाणे अभ्यास केला जाईलच हो. नव्हे करायलाच पाहिजे. पृथ्विराजबाबांनी तज्ञांच्याकडून तपासून न घेता परस्परच ही स्कीम सुरू केली हे मलाही आत्ताच कळतय. पण मुद्दा तो नाहीच आहे.

एखादी योजना उत्तमरित्या कशी राबवता येऊ शकते ते मी मांडले आहे. त्यातून लोकांचा विश्वास कसा मिळवता येतो ते मी मांडले आहे व या विश्वासाच्या आधारे मते कशी मिळवली जाऊ शकतात ते मी लिहिले आहे. असो.

विशुमित's picture

25 Feb 2017 - 2:48 pm | विशुमित

योजनेमध्ये च जर फोलपणा असेल तर ती उत्तमपणे राबवण्यात काय हाशील?

लोकांनी विश्वास ठेवला, जनमताचा आदर आहे.

"पाणी आडवा पाणी जिरवा" आणि 'जलयुक्त शिवारा'मध्ये काय फरक आहे कोणी सांगू शकेल का ?

वरुण मोहिते's picture

25 Feb 2017 - 2:53 pm | वरुण मोहिते

आता संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि स्वच्छ भारत अभियान . फरक आहे ना .जाहिरात किती करतात त्यावर आहे .

मनिमौ's picture

24 Feb 2017 - 12:19 pm | मनिमौ

अहो काय बोलताय. ड्वाळे पाणावले बाबा आपले तर.

कोणास ठाऊक कशी पण कोमात गेली सेना.
सेनेने पेटवले रान, घेतली सुंदर धाव.
जनता म्हणाली, व्वा व्वा !
सेना म्हणाली, माझीच हवा.

कोणास ठाऊक कशी पण कोमात गेली सेना.
भाजपने मारली उडी, भरभर चढला शिडी.
सेना म्हणाली, थान्ब थान्ब !
भाजप म्हणाला, नानाची टान्ग.

कोणास ठाऊक कसा पण कोमात गेली सेना.
सेनेने म्हटले पाढे, पण भाजप आला पुढे.
जनता म्हणाली, शाबास !
सेना म्हणाली, करा बास.

कोणास ठाऊक कसा पण कोमात गेली सेना.
सेनेला चारले खडे आणि गेले आता टक्के.
जनता म्हणाली, छान छान !
सेना म्हणाली होतोय त्रास.

वरुण मोहिते's picture

24 Feb 2017 - 1:25 pm | वरुण मोहिते

मराठा मतदार सुद्न्य वैग्रे अश्या टाईपच्या प्रतिक्रिया पहिल्या . बाकी जाऊदे पण ह्या ३ वर्षात फडणवीस ह्यांची कामगिरी बोलणार्यांनी ह्यावर धागा काढा .आवाहन आहे सगळ्यांना कारण कमळ ला मत दिल म्हणजे भारी विकास अश्या प्रतिक्रिया आहेत . तर फडणवीस ह्यांनी सत्ता वाचवणं सोडून काय काम केलं??
दरवेळी छोट्या छोट्या निवडणुका पाहून जीवाचे रान करून प्रचार केला ?
आजवर उल्लेखनीय एखादी गोष्ट काय केली ?
आजही महानगरपालिकेत मत आलं तरी मोदींचे आभार बोलण्याव्यतिरिक्त महाराष्ट्रात काय केलं ?
सत्ता आहे थोडी मतं मिळणारच ५ वर्षेनंतर काय करणार ?
फडणवीसांची कामगिरी काय ह्यावर कोणी मतं द्या

मोदक's picture

24 Feb 2017 - 1:42 pm | मोदक

नीट वाचा हो.

विषुमीत यांच्या विधानावर मी म्हणतोय "मराठा मतदार सूज्ञ आहे" त्यावर ते म्हणत आहेत आत्मरंजनात मश्गुल राहू नका. आता काय बोलणार यावर.. सत्तेसाठी विखुरलेला मराठा जातीसाठी एकत्र येईल असे ऐकले होते. तेथे पण अनेकांचा भ्रमनिरास झाल्याचे दिसून येत आहे. असो..

बाकी फडणवीसांनी ३ वर्षात कांहीच काम केलं नाही असे तुमचे मत असेल तर तुम्ही धागा काढा. थोडी अभ्यासपूर्ण बैठक हवी असेल तर पहिल्या तीन वर्षात मागच्या चार पाच सरकारांनी काय काय कामे केली ते लिहा म्हणजे तुलनेला सोपे जाईल.

फडणवीसांच्या कामगिरीवर मिपाकरांची मते मागण्यापेक्षा आश्वासने विरूद्ध कामगिरी असा अभ्यासपूर्ण लेख लिहिलात तर सगळेच उद्देश साध्य होतील.

वरुण मोहिते's picture

24 Feb 2017 - 2:21 pm | वरुण मोहिते

कोणी काम केला याचा . म्हणणं इतकाच कि विकासाला मत म्हणजे कमळाला तर भाजप ने काय विकास केला हे कोणीतरी दाखवावे हि अपेक्षा .महाराष्ट्रात काय निर्णय घेतला फडणवीसांनी ,काय कामगिरी केली ? ह्या वर कोणीतरी प्रकाश टाकावा
अवांतर - लेखाला आश्वासने विरुद्ध कामगिरी हे नाव द्यावे .
बाकी आम्ही तर काहीच बोलो नाही लोकं विकास विकास म्हणून बोलत आहेत म्हणून विचारलं काय फरक पडला यावर कोणी लिहील का कारण ३ वर्ष होत आली . धावता आढावा घेऊ.त्यामुळे विकास ह्या मुद्यावर कोणी तरी लिहावे .

अप्पा जोगळेकर's picture

24 Feb 2017 - 2:56 pm | अप्पा जोगळेकर

२८ वर्ष सत्ता भोगून, खंडण्या घेऊन मुंबई सडवली आणि मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला ते लोक ३ वर्षाचा लेखाजोखा मागतात हीच कमाल आहे.
तरीपण देऊ लेखाजोखा. डोन्ट वरी.

वरुण मोहिते's picture

24 Feb 2017 - 5:25 pm | वरुण मोहिते

मुंबई सडली सडली हे कशावरून ?? कारणं काय आहेत अतिरिक्त ताण , वेगवेगळ्या संस्थांचे अधिकार इ. ते सोडून सडली बोलत राहायचं . विकास विकास बोलत राहायचं का?आम्ही तर साधं विचारलं कि विकासाचं काय ?त्यात २८ वर्ष वेग्रे ...असो .म्हणजे काहीही विचारलं तरी २८ वर्ष वैग्रे मोघम स्टेटमेंट करायचं का ?

अप्पा जोगळेकर's picture

24 Feb 2017 - 5:55 pm | अप्पा जोगळेकर

कसल मोघम. पॉईंट वाइज यादी दिली की खाली. ढेरे शास्त्रींनी पण दिली. आणखीन आठवेल तशी देत जाईन.
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव वगैरे मोघम फेकाफेकी चालते का.

वरुण मोहिते's picture

24 Feb 2017 - 6:15 pm | वरुण मोहिते

फेकाफेकी नाही आवडत मी संघाचा आहे . कोणीच फेकलेले नाही आवडत . संघाला पण सांगणारे फेकू नका ...

तुमच्या शंका आहेत ना..? मग तुम्ही लेख लिहा. थोडे तरी अभ्यासाचे कष्ट घ्यायला लागणार की.

अभ्या..'s picture

24 Feb 2017 - 1:43 pm | अभ्या..

परफेक्ट.
दुसरे काय नाय. राष्ट्रवादीच्या सहकारातील आर्थिक नाड्या आवळल्यात. सत्तेशिवाय जगणे न जमणार्‍यांनी घड्याळे टाकून कमळ हुंगणार्‍यांची संख्या वाढवलीय. हि सूज आहे. मागच्या दाराने घुसलेत पण ह्यांच्याच करतूतीने भाजपा गाळात नाही गेला म्हणजे मिळवली. (परिचारकांनी मासला दाखवलाच आहे)

विशुमित's picture

24 Feb 2017 - 2:28 pm | विशुमित

<<< सत्तेशिवाय जगणे न जमणार्‍यांनी घड्याळे टाकून कमळ हुंगणार्‍यांची संख्या वाढवलीय.>>>
-- तुमच्या परफेक्शनला मानलं अभ्या शेठ.

अप्पा जोगळेकर's picture

24 Feb 2017 - 2:51 pm | अप्पा जोगळेकर

चला. शिवसैनिक सुद्धा कामगिरी बद्दल विचारु लागले हा एक स्वागतार्ह बदल आहे.
मला दिसलेले काही मुद्दे -
१. जलयुक्त शिवार बद्दल शाम भागवत साहेबांनी लिहिले आहेच डिट्टेलवार
२. दुष्काळ प्रश्न उत्तम प्रकारे हाताळला. लातूरकरांना ट्रेनने पाणी पुरवण्याचे इम्प्लिमेंटेशन तर फारच चांगले.
३. मुंबईत १ लाख कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची कामे हाती घेतली
४. नविन उद्योगांसाठी लाल फितीचा कारभार ६७ परवानग्या ते २० परवानग्या असा स्मूथ केला
५. लोड शेडिंग संपले
६. मुंबईत ६ नविन एलिव्हेटेड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा. पैकी ४ चे काम चालू झाले. बहुधा २०२० पर्यंत संपेल.
७. मुंबईत प्रत्येक सिग्नलला सीसीटीव्ही बसवला

आणखीन आठवत नाही. बरेच असतील.

अनुप ढेरे's picture

24 Feb 2017 - 4:47 pm | अनुप ढेरे

८. अनेक टोल गेले.
९. फळभाज्यांची नियमन मुक्ती.
१०. मागपुर मेट्रो मान्यता + काम सुरू
११. पुणे मेट्रोला मान्यता + काम सुरू. आधी रा.कॉ + कॉ इकडे १५ वर्षे आणि केंद्रात १० वर्षे सत्तेत असून सुरू केलं नाही. यांनी दोन वर्षात सुरू केली.
१२. नासिक रोड कोणाचा आहे माहिती नाही.

अप्पा जोगळेकर's picture

24 Feb 2017 - 5:30 pm | अप्पा जोगळेकर

इरिगेशन खात्या मधे काय काम झाले हे कोणाला माहिती आहे का ?
अजित दादांनी ७०००० कोटीचा स्कॅम केल्यानंतर हे खाते फार संवेदनशील झाले होते. ते खाते बहुधा गिरीश महाज यांच्याकडे आहे. जलयुक्त शिवार चे काम बहुधा पंकजा मुंडे यांच्या ग्राम विकास खात्याच्या अखत्यारीत येते, इरिगेशन मधे येत नसावे.

आम्ही तर सैनिक नाही तरी . दुष्काळ उत्तम हाताळला कसा हाताळला ? शेती करणार्यांना विचारा.बाकी मुद्दा २-७ सगळ्या मुख्यमंत्रांच्या कामात लागू होतो.सगळ्याच कालावधीत नवीन योजना पॅकेज चालू असतं. त्यात नवीन काय ?? कित्येक गोष्टी मागच्या पानावरुन पुढे . जे स्तुती करत आहेत त्यांनी बाकी १७ मुख्यमंत्र्यांची अशी स्तुती केली आहे का कधी ?? त्यांनी काय केलं यावर प्रतिसाद दिले आहेत का?? का फडणवीस बेस्ट

अप्पा जोगळेकर's picture

24 Feb 2017 - 6:03 pm | अप्पा जोगळेकर

प्रूथ्वीराज चव्हाण चांगले होते. त्यांच्या पायात पाय घालायला राष्ट्रवादी नसत तर बरच काम झाल असत.
कसल नवीन योजना पॅकेज. पॅकेज घोषणेबद्दल नाही हो, झालेल्या किंवा सुरु झालेल्या कामांची यादी आहे.

विशुमित's picture

25 Feb 2017 - 2:54 pm | विशुमित

चव्हाण कशे चांगले होते जरा उदाहरणांसह स्पष्टीकरण देता का?

(बारामतीपेक्षा कराड अजून धुळखाऊच दिसतं म्हणून एक भाबडा प्रश्न. का ३ वर्ष पुरेसे नव्हते कराड सुधारायला?)

(बारामतीपेक्षा कराड अजून धुळखाऊच दिसतं म्हणून एक भाबडा प्रश्न. का ३ वर्ष पुरेसे नव्हते कराड सुधारायला?)

मुख्यमंत्री अख्ख्या महाराष्ट्राचा असतो बर्र का..

वरुण मोहिते's picture

25 Feb 2017 - 3:27 pm | वरुण मोहिते

निधी पळवला वैग्रे कोणी बोलू नये . कारण मुख्यमंत्री पूर्ण महाराष्ट्राचा असतो .१८ मुख्यमंत्री झाले आजवर सगळ्यांनी उत्तम विकास करायला हवा होता .गावाकडेच लक्ष द्यायचं असतं तर सगळ्या मुख्यमंत्र्यांना १०% पण साध्य का झालं नाही .??लातूर नागपूर सोलापूर नांदेड मुंबई सिंधुदुर्ग रायगड यवतमाळ सातारा सगळीकडून मुख्यमंत्री झालेत .

मग बारामतीचा का विकास झाला ?

विकासाच्या व्याख्या बोला. तसे म्हणाल तर मी पण घराच्या बाल्कनीत मला आठवड्याला पुरून शेजारच्यांच्या घरी निर्यात करता येईल इतकी भाजी पिकवतो. करूया का तुलना..? ;)

गावाकडेच लक्ष द्यायचं असतं तर सगळ्या मुख्यमंत्र्यांना १०% पण साध्य का झालं नाही .?

ते संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करणारे मुख्यमंत्री असतील. आपल्या गावाचा विकास करूया बाकी लोकांना वार्‍यावर सोडूया असा अ‍ॅप्रोच नसेल त्यांचा.

१८ मुख्यमंत्री झाले आजवर सगळ्यांनी उत्तम विकास करायला हवा होता

मग केला नाही का विकास..? १ मे १९६० पासून पक्ष आणि मुख्यमंत्र्यांचा कार्यकाल काढला तर

काँग्रेस - ८७% (१८,०२१ दिवस)
शिवसेना - ८% (१,६७८ दिवस)
भाजपा - ४% (८४५ दिवस)
राष्ट्रपती राजवट १% (१४५ दिवस)

कुणाला जास्त संधी होती म्हणे..? का तुमच्या अपेक्षेप्रमाणे विकास न झाल्याचे खापर राष्ट्रपतींवर फोडूया..? (नै, भाजपावर खापर फोडून तुम्हालाही कंटाळा आला असेल म्हणून राष्ट्रपतींचे नाव सुचवले - तेवढाच बदल.)

वरुण मोहिते's picture

25 Feb 2017 - 4:07 pm | वरुण मोहिते

ते माहित आहे . आपण मुख्यामंत्री अक्ख्या महाराष्ट्राचा असतो हे सांगितलंत .म्हणून सांगितलं महाराष्ट्रात किती मुख्यमंत्री झाले .म्हणजे आपण जर म्हणत असाल कि विकास फक्त तिथेच लक्ष देऊन झाला हे चूक आहे .नेहमीच म्हणतो लोक आणि नेते यावरही विकास अवलंबून असतो. आपण व्यक्तिसापेक्ष म्हणालात आणि आता पक्षनिहाय आकडेवारी देताय .
काय आहे भाजप खापर वैग्रे मला बोलून काय मिळणारे ?? पण नेहमी चुकीचा प्रचार होतो हे घातक आहे .भाजप च्या झालेल्या चुका ह्यावर कोणी हिरीरीने बोलाय का इकडे ..मोदी काय बोले ह्यावर कोणी मत मांडलाय का?
बाकी मला काय मी राष्ट्रपती काय भाजप काय सगळ्यांवर बोलेन समोरचा माणूस निष्पक्ष असला तर निश्चित .

म्हणजे आपण जर म्हणत असाल कि विकास फक्त तिथेच लक्ष देऊन झाला

दाखवून द्या बरं मी असे कुठे म्हणालो आहे ते..

(बारामतीपेक्षा कराड अजून धुळखाऊच दिसतं म्हणून एक भाबडा प्रश्न. का ३ वर्ष पुरेसे नव्हते कराड सुधारायला?)
या वाक्याच्या संदर्भाने बोलत असाल तर ते विशुमीत. उदो उदो करणारे तेच ते.

पण नेहमी चुकीचा प्रचार होतो हे घातक आहे .

मोघम बोलू नका हो. कुणी चुकीचा प्रचार केला. कसा केला ते सांगा.

भाजप च्या झालेल्या चुका ह्यावर कोणी हिरीरीने बोलाय का इकडे ..मोदी काय बोले ह्यावर कोणी मत मांडलाय का?

तेच सांगतोय, तुम्ही अभ्यास करा आणि लेख लिहा.

बाकी मला काय मी राष्ट्रपती काय भाजप काय सगळ्यांवर बोलेन समोरचा माणूस निष्पक्ष असला तर निश्चित .

नुसते बोलायला कांही श्रम लागत नाहीत. अभ्यास करा आणि बोला. धागा काढायला कांही मदत लागली तर जरूर सांगा.

वरुण मोहिते's picture

25 Feb 2017 - 10:46 pm | वरुण मोहिते

आज मनसे बेस्ट ,आज भाजप बेस्ट , जो नवीन काही करेल तो बेस्ट हा झाला चुकीचा प्रचार
भाजप चूक आहे कधीतरी हे
मान्य करणारा प्रतिसाद आला कि लेख काढतो कि .एखाद्य पक्षाचं समर्थन होणार असेल तर बाकीच्या पक्षांची कामे वाचावीत हा बेसिक मुद्दा आहे . पण भाजप साठीच सगळे प्रतिसाद येणार असतील तर मी काय करू
बाकी मुद्दा ३ _४ साठी जुने झाले प्रतिसाद अभ्यास करा आणि बोला वैग्रे

विशुमित's picture

25 Feb 2017 - 4:27 pm | विशुमित

ओके
चव्हाण यांचे एवढे कवतुक का चालू आहे ते आता कळाले.

शरद पवारांचे उदोउदो आणि भाजपला विरोध केला म्हणून एवढे तावा-तावाने चालू आहे प्रतिसाद देणे.

आयत्या पिटावर रेघोट्या मारणाऱ्या बिचाऱ्यांना यश सुद्धा पचवता येत नाही, याची खंत वाटते.

(जिव्हाळ्याचा विषय: बारामती मात्र बेस्ट तालुका जलने वालो को जलने दो..!!)

मोदक's picture

25 Feb 2017 - 10:12 pm | मोदक

चव्हाणांचे कौतुक..?? तावातावाने दिलेले प्रतिसाद..??

चष्म्याचा ट्रक पोचला वाटतं तुमच्याकडे पण. असो वस्तुस्थिती दाखवल्याने जळजळ झाली असेल तर काळजी घ्या.

बाकी तुम्ही शरद पवारांचा उदोउदो करत आहात हे तुम्हीच कबुल केले या धाडसाचे कौतुक वाटते. मिपावर भक्तभाट असतात या डांगेंच्या वाक्याला आता मी आक्षेप घेणार नाही. ;)

वरुण मोहिते's picture

25 Feb 2017 - 10:57 pm | वरुण मोहिते

जे आहे ते आहे बोलण्याचं .का चांगलं बोलू नये पवारांना ???ठरवलंय का कोणी संघीय विचार चांगले वैग्रे ...स्वतः मोदी कौतुक करतात मग काय प्रॉब्लेम आहे ??उगाच हिणवल्यासारखं करायचं ??टुकार विचारांना मोदींनेच तोंडावर आपटलाय .बर मोदी पण क्रायटेरिया नाही पण उगाच पवार आले कि खिल्ली . संघाची १०० वेळा खिल्ली उडवायला हवी होती .ज्या विकासावर बोलता त्या विकासावर जेटली म्हणाले १०० बारामती झाले पाहिजे .मोदी म्हणाले विकास क्या है शरदराव से सीखो . हे मान्य असेल तर पुढील प्रतिसाद देतो .

एका आयडीने प्रतिसाद द्या. डुआयडी आहेत म्हणून सर्वांना सहज समजेल असे तरी वेगवेगळे आयडी वापरू नका.

वरुण मोहिते's picture

26 Feb 2017 - 10:40 am | वरुण मोहिते

म्हणजे ?

वरुण मोहिते's picture

26 Feb 2017 - 12:30 pm | वरुण मोहिते

डू आयडी वैग्रे काहींच्या काही बोलून विषय कशाला भरकटवायचा ??दरवेळी शेती चा अनुभव असता नसताना सगळेच मुद्दे मांडतात मिपा वर .सोपं असतं ऑफिस मध्ये बसून लिहिणं.मी बोलो त्याला आधार होता / आहे .नुसतं मुंबई पुणे म्हणजे महाराष्ट्र नाहीये . मुद्दा भरकटवायला डू आयडी वैग्रे विषय .....चालायचं

संदीप डांगे's picture

26 Feb 2017 - 12:59 pm | संदीप डांगे

सोपं असतं ऑफिस मध्ये बसून लिहिणं.

>>

म्हणजे जिथे तुम्ही नोकरी करता, जिथे तुमचा वेळ कंपनी पैसे देऊन विकत घेते, त्यावेळेत ऑफिसचे इण्णरनेट आपल्या टैमपाससाठी वापरुन लिहायचे?

छे छे! अब्रह्मण्यम्!!!! असे काहीही नसते हो, मोहितेसाहेब! जगाला शाणपण शिकवणारे असे करत नसतात... संघाचे असून तुम्हाला एवढं तरी माहित असायला हवं... मोठे व्हा! वाढदिवसाच्या शुभेच्छा! वगैरे वगैरे!!!

मी विशुमीत यांच्या धाडसाचे कौतुक केले, त्याला चवताळुन उत्तर देताय तुम्ही. मग तो तुमचा डुआयडी नसेल तर तुम्हाला का जळजळ झाली म्हणे..?

बाकी वैयक्तीक गोष्टी आणि तुमच्या सुरात "जी जी रं.. जी जी रं.. जी.. जी.." करणारे, दोघांनाही फाट्यावर मारले आहे. मुद्दे असले तर बोला. मी कुठे बसून काय लिहितो याची नोंद घ्यायला तुम्हाला नेमले नाहीये.

इतक्या वेळा सांगितले तेच अजुन एकदा सांगतो - तुम्ही बोलताय त्याला आधार आहे असे म्हणत असाल तर अभ्यास करून धागा काढण्याचे धाडस दाखवा. खोटे लॉजिक लावून ट्रक फिरवणे किंवा एखाद्या नेत्याची हांजी हांजी / उदो उदो करणे सोपे असते. मुद्दे असले तर इथे बोला. चार दिवसांत लेख लिहितो / प्रतिसाद देतो असे खोटे वायदे करून दिशाभूल करणार्‍या लोकांचे मला पण लै 'फर्स्ट हँड अनुभव' आहेत. तुम्ही त्यांपैकी नसाल अशी अपेक्षा आहे.

(बाकी मला शेतीचा अनुभव नाही म्हणून बोलण्याला तुमचा आक्षेप असेल तर तुम्ही राजकारणावर बोलताना किमान ग्रामपंचायत, नगरपालिका वगैरे निवडणूक लढवली असेल अशी अपेक्षा आहे. शाळेतली मॉनीटरची निवडणूक लढवली असेल तर तसे सांगा, मग ठरवतो प्रतिसाद कितपत गंभीरपणे घ्यायचे ते..!)

मिपा च्या धोरणात बसतं का ?नाही म्हणजे मी पण आरोप करू शकेन .
फाट्यावर मारणं वैग्रे पण आहे का धोरणात . म्हणजे समजेल तरी . प्रतिसाद नाही भरकटवणार पण माहिती असलेली बरी.
बोलायला मुद्दा होता कि त्यावरच तर बोलत होतो .आपणच डू आयडी वैग्रे मुद्दा काढला .
लास्ट मुद्दा नगरसेवक तर एका फटक्यात झालो असतो .. आता मूड नाही आणि रिहॅब च्या धाग्यात मान्य केलाय कि संधी गेली म्हणून .आता मूड नाहीये इतकंच.गंभीर पणे उत्तर अपेक्षित

भाजपाने केलेल्या / न केलेल्या विकासावर तुम्ही लेख लिहा, तेथे बोलूया.

विशुमित's picture

27 Feb 2017 - 10:58 am | विशुमित

डू आयडी ची कोणती टूम काढलीत मोदक साहेब?

मी वार केला तर पुढून करतो. चुकलो तर १० वेळ माफी मागतो. विचार किती ही पटले नाही तरी सभ्यपणा सोडत नाही. मागे तुम्ही वैयक्तिक होऊन माझ्या आदराच्या पात्रतेविषयी पण बोललात. त्यावेळीस पण मी आपणाला समज दिली होती. मुद्यावर बोला. मुद्दा सोडून दुसऱ्या उखाळ्या पाखाळ्या काढून चर्चेतील मज्जा घालवू नका, ही विनंती...!!

तुम्ही दोघेही माझा प्रतिसाद नीट वाचण्याचे कष्ट घ्याल का..?

श्रीगुरुजी's picture

26 Feb 2017 - 3:21 pm | श्रीगुरुजी

जे आहे ते आहे बोलण्याचं .का चांगलं बोलू नये पवारांना ???ठरवलंय का कोणी संघीय विचार चांगले वैग्रे ...स्वतः मोदी कौतुक करतात मग काय प्रॉब्लेम आहे ??उगाच हिणवल्यासारखं करायचं ??टुकार विचारांना मोदींनेच तोंडावर आपटलाय .बर मोदी पण क्रायटेरिया नाही पण उगाच पवार आले कि खिल्ली . संघाची १०० वेळा खिल्ली उडवायला हवी होती .ज्या विकासावर बोलता त्या विकासावर जेटली म्हणाले १०० बारामती झाले पाहिजे .मोदी म्हणाले विकास क्या है शरदराव से सीखो . हे मान्य असेल तर पुढील प्रतिसाद देतो .

मोदी किंवा जेटली पवारांबद्दल जे बोलले ते कौतुक होते का उपरोध होता?

राष्ट्रीय नेत्यांना बारामतीला भेट देण्याचे आमंत्रण देऊन त्यांचे आतिथ्य व पाहुणचार करणे व त्यांच्याकडून आपले कौतुक ऐकून घेणे हा पवारांचा जुना छंद आहे. त्यांनी यापूर्वी माजी पंतप्रधान चंद्रशेखर, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, मोदी, जेटली इ. नेत्यांना बारामतीला बोलावून त्यांचा पाहुणचार करून त्यांच्याकडून आपले कोडकौतुक करून घेतले आहे. आपण एखाद्याकडे पाहुणा म्हणून गेलो तर आपण तोंडदेखलं यजनामाबद्दल चार बरे शब्द बोलतो. त्यात फारसे तथ्य असतेच असे नाही. मोदी, जेटली, मुखर्जी, चंद्रशेखर इ. नी बारामतीला येऊन, पवारांचे आदरातिथ्य स्वीकारून त्यांच्याबद्दल कौतुकाचे चार शब्द उच्चारून त्यांना हरबर्‍याच्या झाडावर चढविणे यातून फार काही अर्थ काढण्याची गरज नाही कारण त्यातून तसा काहीही राजकीय अर्थ निघत नाही.

वरुण मोहिते's picture

26 Feb 2017 - 3:29 pm | वरुण मोहिते

यायची फालतू माणसाचा छंद म्हणून फाट्यावर मारायचं (मिपा भाषेत ).राजकीय वैग्रे अर्थ नाही तर उगाच का यावं ? वेळ थोडी असतो फुकट सगळ्यांकडे

श्रीगुरुजी's picture

26 Feb 2017 - 9:17 pm | श्रीगुरुजी

राजकारणात कोणीही एकमेकांचा वैयक्तिक शत्रू नसतो. ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतात. पवार हे तसे राष्ट्रीय राजकारणातले लिंबूटिंबू नेते. त्यांचा पक्ष राज्याच्या व देशाच्या राजकारणातला लाईटवेट पक्ष. पवारांच्या पक्षाला लोकसभेत कधीही २ आकडी खासदार निवडून आणता आले नाहीत तर राज्यात त्यांच्या आमदारांची संख्या कायम एक चतुर्थांशापेक्षा कमीच राहिली. केंद्रात सुद्धा पवारांना गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री अशी महत्त्त्वाची खाती कधीही मिळाली नव्हती (नाही म्हणायला संरक्षणमंत्री पद हे त्यातल्या त्यात महत्त्वाचे पद २० महिने मिळाले होते). त्यांच्या पदरात कृषी मंत्री हे तुलनेने दुय्यम खातेच बहुसंख्य काळ पडले.

महाराष्ट्रात त्यांच्या समर्थकांनी आणि मराठी माध्यमांनी पवार म्हणजे एकदम हिमालयाच्या उंचीचे देशातील नेते अशी प्रतिमा करून ठेवली आहे. त्यात तथ्य नाही. पवारांच्या तुलनेत करूणानिधी, जयललिता, मुलायम, मायावती, ममता इ. प्रादेशिक नेते व त्यांचे पक्ष जास्त हेवी समजले जातात. पवार व त्यांच्या पक्षाचे देशाच्या व राज्याच्या राजकारणातील महत्त्व पूर्णपणे संपले आहे. आपण दुर्लक्षित झालो आहोत हे जेव्हा जेव्हा पवारांच्या लक्षात येते तेव्हा तेव्हा काहीतरी वादग्रस्त विधाने करणे, अनपेक्षितरित्या एखाद्या वेगळ्याचे नेत्याची भेट घेऊन खळबळ माजवून देणे व त्यामार्गे स्वतः प्रकाशात येऊन काहीतरी गूढ निर्माण करून संशय वाढविणे असले प्रकार पवार सातत्याने करीत असतात. पूर्वी सुद्धा अचानक मातोश्रीवर जाऊन बाळ ठाकरेंची भेट घेणे किंवा तिसर्‍या आघाडीतील नेत्यांना भेटणे किंवा मोदींची भेट घेणे हा त्यातलाच प्रकार आहे. राष्ट्रीय नेत्यांना बारामतीला बोलावून संभ्रम निर्माण करून चर्चेच्या झोतात राहणे हा देखील त्यातलाच प्रकार.

पवारांच्या आमंत्रणावरून काही नेते बारामतीला भेट देतात व पवारांविषयी चार बरे शब्द बोलतात त्यामागे केवळ शिष्टाचार व सौजन्य एवढाच भाग असतो. त्यात काहीही राजकीय अर्थ नसतो. अर्थात पवारांनी स्वतःविषयी इतका संशय व गूढ निर्माण करून ठेवले आहे की अशा प्रत्येक भेटीनंतर माध्यमे काहीतरी राजकीय अर्थ काढतात. प्रत्यक्षात त्यात काहीही नसते.

वरुण मोहिते's picture

26 Feb 2017 - 9:42 pm | वरुण मोहिते

लक्ष का द्या ??मोदींकडे थोडी वेळ रिकामा आहे पवारांनी बोलावलं कि जायला .असे थोडी कोण मोठे नेते जातात कुठे ?लोक वेळ का देतात भेटायला??

श्रीगुरुजी's picture

27 Feb 2017 - 2:42 pm | श्रीगुरुजी

मोदी अनेक राज्यांना भेटी देतात. महाराष्ट्राप्रमाणे बिहार, केरळ अशा अनेक राज्यात निवडणुक नसताना सुद्धा जातात. सगळेच पंतप्रधान दिल्ली सोडून इतर शहरांना/राज्यांना भेट देत असतात. एखाद्या प्रकल्पाचे उद्घाटन, एखाद्या पुतळ्याचा अनावरण समारंभ, एखाद्या विद्यापीठाचा पदवीदान समारंभ, एखाद्या नवीन प्रकल्पाचा शुभारंभ, कोणाचा तरी सत्कार अशी भेटीची अनेक कारणे असू शकतात. पवारांनी भेटीचे आमंत्रण दिल्यानंतर भेटीला नाही म्हणण्यासारखे काहीही नाही. त्यानिमित्ताने महाराष्ट्रात भेट देता येते. सौजन्य व शिष्टाचाराचा हा भाग असतो. ज्या ज्या राज्यात पंतप्रधान भेट देतात त्या त्या राज्यात प्रोटोकॉल म्हणून त्या राज्याचे मुख्यमंत्री पंतप्रधानांबरोबर अधिकृत सरकारी कार्यक्रमात असतात. मोदी व नितीशकुमार बिहारमध्ये एका व्यासपीठावर एकत्र दिसले किंवा केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन व मोदी केरळमधील एका कार्यक्रमात एकमेकांशी बोलताना दिसले तर त्यात काही राजकीय अर्थ नसतो. मोदी किंवा जेटली किंवा प्रणव मुखर्जी बारामतीला जाणे व पवारांचे कौतुक करणे यात कोणतीही राजकीय कृती नसून तो एक सर्वसामान्य शिष्टाचार आहे. पवारांच्या ६१ व्या व ७ व्या वाढदिवसाला सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण होते. त्या सर्वांनी पवारांचे कौतुक केले. त्यात फक्त औपचारिकताच होती व कोणताही राजकीय डाव नव्हता.

संदीप डांगे's picture

27 Feb 2017 - 3:00 pm | संदीप डांगे

बरं बरं! ;-) =))

पवारांना क्षुद्र दाखवण्यासाठी आपण घेत आहात ती मेहनत, चिकाटी खरंच कबिले तारीफ आहे!

श्रीगुरुजी's picture

27 Feb 2017 - 3:09 pm | श्रीगुरुजी

मनःपूर्वक धन्यवाद!

जातीय मळमळ बोलून दाखविणार्‍यांना मी महान म्हणू शकत नाही.

वरुण मोहिते's picture

27 Feb 2017 - 3:07 pm | वरुण मोहिते

पण नितीशकुमार से सीखो ,मायावती से सीखो, करुणानिधी से सीखो ,ममता बॅनर्जी से सीखो अशी काही उदाहरण आहेत का ..असलीस तर शेयर करा वाचायला आवडेलतेवढीच माहितीत भर पडेल. प्रोटोकॉल असताना ठरलेलं असत कि कितपत बोलायचं . बाकी पंतप्रधानाच्या मर्जीवर .म्हणजे मोदी बोलतायत त्यावर लिंबू टीम्बू वैग्रे लोकांना मोदी भाव का देत आहेत .
परत एकदा सांगतो मोदी काही निकष नाही ५-१० वर्ष सत्तेवर असतील जातील पण परत परत बाकीचे लोक का येत आहेत ?? स्तुती का करत आहेत ?

वरुण मोहिते's picture

27 Feb 2017 - 3:15 pm | वरुण मोहिते

पाळणार असाल तर अजून एक सांगा अख्ख्या दिल्लीत चर्चा चालू असते कि स्वार्थाशिवाय मोदी कोणाशी काहीच बोलत नाहीत .दुर्लक्ष करणं,स्वार्थ असेल तिथेच बोलणं हे त्यांना बरोबर जमत . आज कोणाला पटलं नाही तरी चालेल पण हे सत्य आहे कार्यशैलीचा अनुभव घेतलेली लोकं तरी बोलतात बाबा असं दिल्लीत . खरा खोटं देव जाणे. बाकी मोदी असोत नसोत ४० वर्षांपासून लोकं बारामतीत येत आहेत लिंबू टीम्बू माणसाकडे .केवळ विकासाचा मुद्दा आणि प्रकल्प पाहायला हा. बाकी राजकीय चर्चा जाऊदे .

श्रीगुरुजी's picture

27 Feb 2017 - 3:36 pm | श्रीगुरुजी

आपण दिल्लीत कधीपासून आहात?

श्रीगुरुजी's picture

27 Feb 2017 - 3:26 pm | श्रीगुरुजी

पवारजीसे सिखो असे पण उदाहरण नाही. जानेवारीत मोदी बिहारमध्ये गेले होते. तिथे त्यांनी नितीशकुमारांची स्तुती केली. त्यांनी पूर्वी ममता बॅनर्जींचेही कौतुक केले होते. ज्या राज्यात ते किंवा इतर नेते आमत्रणावरून भेट देतात, त्या राज्याच्या भेटीत यजमानांची स्तुती करणे ही औपचारिकता असते. त्यापलिकडे त्यात काहीही नसते.

बारामतीला अधूनमधून काही नेते का भेट देतात हे कारण मी पूर्वी अनेकवेळा सांगितले. ते नेते स्वतःहून तिथे जात नसून पवार स्वतःहून त्यांना आमंत्रण देतात व त्यांच्या भेटीतून ते स्वतः प्रकाशझोतात राहण्याचा प्रयत्न करतात. त्यानिमित्ताने माध्यमे गॉसिप पसरवतात व त्यायोगे पवार काही दिवस प्रकाशझोतात राहतात.

वरुण मोहिते's picture

27 Feb 2017 - 3:55 pm | वरुण मोहिते

म्हणजे मुलायमसिंगची पण करायला हवी .सतत यु पी ला जातात म्हणून . बाकी निवडणुकीच्या वेळी स्तुती आणि बाकी स्तुती यात फरक आहे हो. असो पवारांना स्तुती च सर्टिफिकेट कशाला .. असतील नसतील आपलं तर म्हणणं होत कार्यक्षम मोदी का आले . विकास झाला असता त्याच ६-७ तासात उगाच लिंबू टीम्बू च आमंत्रण कशाला स्वीकारा.कोणपण देईल उद्या आमंत्रण मोदींची हि सवय घातक आहे .
ममता बॅनर्जींचे कौतुक ??
ज्या वाजपेयींना त्यांनी हैराण केलं त्याच कौतुक
चांगलंय म्हणायचं म्हणजे स्वार्थासाठी मोदी कुठेही जातात हा अर्थ होतोय
देशासाठी घातक आहे हे .
ज्या नितीश कुमारांनी लालू यादव यांच्यासोबत युती केली त्या नितीशकुमारांचं कौतुक
देशासाठी घातक आहे हे .
अवांतर_मी दिल्ली ला नसतो अधे मध्ये जातो महिन्यातून आम्ही तर काय इतके मोठे नाही कि बातम्या मिळायला . कानावर आलं दिल्लीत ते बोलो .

श्रीगुरुजी's picture

27 Feb 2017 - 8:35 pm | श्रीगुरुजी

जेव्हा पंतप्रधान किंवा इतर नेते एखाद्या राज्यात जातात त्यामागचे कारण आधी बघायचे असते. जेव्हा एखादा अधिकृत राज्य सरकारचा किंवा केंद्र सरकारचा कार्यक्रम असतो, एखाद्या प्रकल्पाचे उद्घाटन असते, भूमीपूजन, पुतळ्याचे अनावरण इ. असते अशा प्रसंगी राजकीय टीका नसते. उलट एकमेकांचे आभारप्रदर्शन असते. जेव्हा निवडणुक प्रचारासाठी राज्यात भेट दिली जाते तेव्हा अर्थातच एकमेकांची उणीदुणी काढली जातात.

या दोन भेटीमधला फरक लक्षात घेतला तर कधी स्तुती तर कधी टीका असे का ते लक्षात येईल.

मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाले. मुलायमसिंग २००७ पर्यंत पंतप्रधान होते. त्यामुळे मोदींनी उ. प्र. मध्ये जाऊन मुलायमसिगांबरोबर एखाद्या अधिकृत कार्यक्रमात जाणे शक्यच नव्हते.

२०१४ च्या निवडणुक प्रचारात मोदींनी पवार चाचा-भतीजांवर भरपूर टीका केलेली आहे. परंतु बारामतीला पवारांच्या निमंत्रणावरून भेट घेतल्यावर तिथे राजकीय भूमिका न घेता यजमानांविषयी चार बरे शब्द बोलणे हा शिष्टाचाराचा भाग आहे. त्यापलिकडे यात अर्थ नाही. राहुल व केजरीवाल मोदींवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. मोदीही प्रत्त्युत्तर देतात. परंतु तेच मोदी राहुलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. याचा अर्थ राहुल आणि मोदी एकत्र येत आहेत असा नसतो.

वरुण मोहिते's picture

26 Feb 2017 - 9:42 pm | वरुण मोहिते

लक्ष का द्या ??मोदींकडे थोडी वेळ रिकामा आहे पवारांनी बोलावलं कि जायला .असे थोडी कोण मोठे नेते जातात कुठे ?लोक वेळ का देतात भेटायला??

विशुमित's picture

27 Feb 2017 - 11:06 am | विशुमित

पवारांकडे दाखवण्यासाठी काहीतरी आहे म्हणून बोलावतात आपल्या घरी.

आपण नाही का चांगले घर नसले की मित्र मंडळींना टाळतो घरी बोलावण्यासाठी.

त्याच बरोबर आपल्या मतदार संघाची आणखी प्रगती कशी होऊ शकते याचा ध्यास घेणारे नेते उरलेत कुठे भारतात ?

श्रीगुरुजी's picture

27 Feb 2017 - 2:46 pm | श्रीगुरुजी

आपण कोणाला घरी बोलाविले आणि आपले घर त्याला आवडले नाही तरी शिष्टाचार म्हणून तो आपले व आपल्या घराचे तोंडदेखले कौतुक करतो. त्याला दिलेले जेवण आवडले नाही तरी तो मिटक्या मारत स्वयंपाकाचे कौतुक करतो. बारामतीला आलेल्या नेत्यांनी पवारांवर स्तुतीसुमने उधळणे हा त्यातलाच एक भाग आहे.

एक प्रश्न. महाराष्ट्रातील अनेक छोट्या शहरात, छोट्या गावात अजूनही उघडी गटारे आहेत. बारामतीत काय परिस्थिती आहे?

संदीप डांगे's picture

27 Feb 2017 - 3:06 pm | संदीप डांगे

गुरुजी, एखाद्यवेळेस मोदींना तुमच्या घरी बोलावणं पाठवा ना जरा... शरद पवारांपेक्षा तुमचे महाराष्ट्रातले महत्त्व कैक पटीने जास्तच आहे, तुम्ही एकदा बोलावणं धाडा आणि जेवायला घालाच समारंभ करून,

म्हणजे पवार कसे क्षुद्र ह्यावर नेहमी नेहमी तेच तेच मेगबायटीचे पुरण पाडत बसायची गरज पडणार नाही... =))

श्रीगुरुजी's picture

27 Feb 2017 - 3:12 pm | श्रीगुरुजी

पवार कसे महान असे कौतुक सातत्याने यायला लागल्यावर वस्तुस्थिती मांडणे आवश्यकच असते. त्यात तुम्हाला काय त्रास होतोय ते समजले नाही. पवार दाखविले जातात तितके महान नाहीत ही वस्तुस्थिती समोर मांडल्याने अस्वस्थ झालेले दिसता.

संदीप डांगे's picture

27 Feb 2017 - 4:04 pm | संदीप डांगे

पवारांना महान म्हणत असंल कोणी तर तुम्हीच सतत अस्वस्थ होऊन मेगाबायटी सडा घालता बॉ! कोणी कोणाला महान म्हणावे हा ज्याचा त्याचा प्रश्न... तुमची अस्वस्थता बघून स्पेशयल पहिल्या धारेचा पवारद्वेष दिसतो...

भारतात बरेच महान म्हणवले जाणारे लोक आहेत. कोणी महान आहे की नाही हे वस्तुस्थिती नव्हे तर मानणाऱ्याची मानसिकता ठरवते, 'वस्तुस्थिती' सारख्या शब्दामागे आपले विखारी द्वेष लपवायची गरज नाही! :-)

श्रीगुरुजी's picture

27 Feb 2017 - 8:42 pm | श्रीगुरुजी

कमाल आहे. पवारा दाखविले जातात तितके मोठे नेते नाहीत हे दाखविले की तुम्ही का अस्वस्थ होता? कोणी कोणाला महान म्हणावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असेल तर कोणी कोणाला महान म्हणू नये हासुद्धा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. तुम्ही कशाला उगाच अस्वस्थ होताय?

वस्तुस्थिती म्हणजे विखारी द्वेष हा जावईशोध कधी लावला तुम्ही? पवारांनी पूर्वी अनेकदा केलेल्या जातीयवादी वक्तव्यांचा संदर्भ मी एका धाग्यात दिला होता. अगदी परवाच्या महापालिका निवडणुकीत सुद्धा पवारांनी "देवेंद्र फडणवीस म्हणजे घाशीराम कोतवालमधील नाना फडणवीस" असे जाहीर वक्तव्य केले होते. यापूर्वी राजू शेट्टींची जात काढणे, माधव गोडबोलेंची जात काढणे, भाजप-सेना युतीबद्दल बोलताना पेशवाईचा संदर्भ देणे, छत्रपती विरूद्ध पेशवे अशी काडी घालणे अशी वक्तव्ये म्हणजे जातीयवादी वक्तव्ये आहेत हे सांगणे हा विखारी द्वेष कधीपासून झाला?

तुमची अस्वस्थता बघून स्पेशयल पहिल्या धारेचा पवारद्वेष दिसतो...

तुमची अस्वस्थता बघून स्पेशयल पहिल्या धारेचा श्रीगुरूजीद्वेष दिसतो.

विशुमित's picture

27 Feb 2017 - 3:08 pm | विशुमित

म्हणजे बारामती नाही आवडले दिल्लीतील लोकांना ? एवढे घाण घर असताना मिटक्या मारत हादडणाऱ्यांना बोलावणे शोभते का पवारांना? तुच्छ लेकाचे..!!

बारामती अस्वच्छतेचा महामेरू आहे, सुधारणा करण्यात भरपूर वाव आहे.

श्रीगुरुजी's picture

27 Feb 2017 - 3:14 pm | श्रीगुरुजी

अरेरे. इथले बारामती पुराण, बारामतीचा पवारांनी केलेला विकास इ. बद्दल वाचून बारामती म्हणजे पृथ्वीतलावरील स्वर्ग, नंदनवन अशी माझी समजूत झाली होती.

विशुमित's picture

27 Feb 2017 - 3:30 pm | विशुमित

किती 'अ'सुरी आनंद झाला ना हे ऐकून...!!

मोदक राव याला म्हणतात भाट गिरी..

तुमचा प्रतिसादरूपी सुखसंवाद त्यांच्यासोबत सुरू राहुदेत. मला मध्ये ओढू नये ही सूचना.

श्रीगुरुजी's picture

27 Feb 2017 - 8:43 pm | श्रीगुरुजी

यात 'भाटगिरी' कोठून दिसली?

निष्पक्ष सदस्य's picture

27 Feb 2017 - 5:24 pm | निष्पक्ष सदस्य

पवारांचा विषय निघताच ज्याअर्थी श्रीगुरूजी धावून येतात,त्याअर्थी गुरूजींचे कधीकाळी पवारांशी सख्य असावे असे भासते.

जो असे बोलतो त्याच्याकडे विदा मागा. कुणीही अडवले नाहीये.

मी बोललो असेन तर तसे दाखवून द्या.

विशुमित's picture

27 Feb 2017 - 5:52 pm | विशुमित

मनाला येईल ते अर्थ स्वतःच काढू नका.

शेवटी ताव तवाने बोलण्याने स्वतःची भाटगिरी लपत नाही.

बरळणे वगैरे असले शब्द वापरणे बंद वापराने बंद करा

हो का..? मग स्वत:ची भाटगिरी लपवण्यासाठी माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणे टाळा. तुम्ही उदो उदो करून गुलामी मान्य केली असेल तर तो तुमचा प्रश्न आहे.

मी आरोप केलेला विदा देताय ना..? का ते पण हवेतले बाण होते..?

विशुमित's picture

27 Feb 2017 - 12:03 pm | विशुमित

<<<बाकी तुम्ही शरद पवारांचा उदोउदो करत आहात हे तुम्हीच कबुल केले या धाडसाचे कौतुक वाटते.>>>
-- खाली दिलेल्यांचे उदो उदो करण्यापेक्षा शरद पवारांचे उदो उदो करणे नक्कीच चांगले म्हणावे लागेल.

http://www.loksatta.com/desh-videsh-news/kargil-martyr-daughter-gets-rap...

http://www.loksatta.com/mumbai-news/mlc-prashant-paricharak-pandharpur-a...

एकुलता एक डॉन's picture

24 Feb 2017 - 2:08 pm | एकुलता एक डॉन

jar modi yanni prachara kela asta tar?

मराठी_माणूस's picture

24 Feb 2017 - 3:02 pm | मराठी_माणूस

http://www.loksatta.com/thane-news/thane-municipal-election-results-2017...

ह्यास काय म्हणावे ?

तुम्हीच सांगा यास काय म्हणावे ? जनतेचा कौल आहे, हार्दिक अभिनंदन करा त्यांचे, एवढेच सुचवेल.

विशुमित's picture

24 Feb 2017 - 3:38 pm | विशुमित

मुंबईमधील पारदर्शक विकासाला सुरवात पण झाली....

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/bjp-party...

विशुमित's picture

24 Feb 2017 - 3:42 pm | विशुमित

मुंबईमधील पारदर्शक विकासाला सुरवात पण झाली....

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/bjp-party...

मराठी_माणूस's picture

24 Feb 2017 - 3:51 pm | मराठी_माणूस

"In a democracy people get the leaders they deserve."

झोपड्या बांधा आणि निवडून या.

अभिजीत अवलिया's picture

24 Feb 2017 - 4:20 pm | अभिजीत अवलिया

ज्या गतीने ह्या वेळी भाजपामध्ये अन्य पक्षांतील आयाराम येत होते (सर्वच पक्षांकडे येत होते पण भाजपाकडे ओघ खूपच जास्त होता) ते चिंताजनक होते. तिकीट नाही मिळाले, करा पक्षत्याग आणी जो तिकीट देत असेल त्याचा झेंडा घ्या खांद्यावर ही लोकशाहीला अतिशय मारक गोष्ट आहे. त्यामुळे काहीतरी कायदा करून जर एखाद्या व्यक्तीने पक्ष बदलला किंवा एखाद्या अपक्षाने जरी कुठल्यातरी पक्षात प्रवेश केला तरी त्याच्यावर पक्षात प्रवेश केल्यापासून काही काळ (३ वर्षे वगैरे) पक्षातर्फे निवडणूक लढवायला बंदी घालायला हवी. तरच हे आयाराम गयाराम प्रकार कमी होतील.

अप्पा जोगळेकर's picture

24 Feb 2017 - 6:08 pm | अप्पा जोगळेकर

काही प्रमाणात आयाराम गयाराम होणे चांगलेच आहे. जरा वचक राहतो. पक्षनिष्ठा वगैरे निरर्थक गोष्टींशी लोकंना काय करायचे आहे.
काम करणार्‍या पक्षाला निवडून द्यावे.
सर्वोच्च नेते उगाच माजतात पक्षनिष्टेमुळे.
आणि जिकडून तिकीट मिळेल तिथे जाण्यात काहीच चूक नाही.

संदीप डांगे's picture

24 Feb 2017 - 5:38 pm | संदीप डांगे

स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार, कर्तव्य, काम करण्याची पद्धत, व्यवस्था याची माहिती नीटपणे घेऊन नंतर विकास व काम ह्या मुद्द्यावर बोलावे. आम्ही विकास करू, किंवा केला असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा ते त्याच संदर्भात बघावे.

अप्पा जोगळेकर's picture

24 Feb 2017 - 6:12 pm | अप्पा जोगळेकर

स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकारचे निर्णय सभाग्रूहात व्हावेत. वांद्र्याच्या बंगल्यावर सेटिंगच्या गप्पा मारत आणि मद्याचे पेले रिचवत होउ नयेत.
विकास, मराठी माणूस वगैरे सगळ नंतर.

वरुण मोहिते's picture

24 Feb 2017 - 6:20 pm | वरुण मोहिते

जायचं नाही बंगल्यावर मद्य प्यायला . संघाची शिकवण आहे . कि कर्नाटक विधानसभेत बी पी पाहत विकासकामे करावी .

तिमा's picture

24 Feb 2017 - 5:55 pm | तिमा

कुठल्याच पक्षाचा समर्थक नसलो तरी 'सामना' मधली भाषा अत्यंत खुपते. बाकी, अच्छे दिन येतील अशा भ्रमात आता कोणीही मुंबईकर रहात नाही.

पंचवीस वर्षात सेना सडली नाही. सडायला ती अगोदर घडायला तर हवी होती ना ? आज बाळासाहेब काय बोलणार ,,, आज उधूजी काय बोलणार ... आज उद्धट ठाकरे काय बोलणार .... ? दसरा मेळावा ई ई ई ..... सेनेत भाजपापेक्षा एक माझ्या मते चांगले असावे ते म्हणजे मोहला पातळीवरचे संघटन. पण वर संघटना काही नाही मोदींसारखी जादू ही नाही. सबब मराठी मराठी करून जितकी मते मिळतील तितकी मते आजही सेनेला मिळतात तितक्याच मर्यादित जागा. उद्धव ठाकरे यांच्या
अर्थ शास्त्राची समज तर अगदी १ लंबरी अशी आहे. महाराष्ट्र प्रदेशात दूरवर सेना वाढवण्याचे श्रेय मात्र त्यानाच दिले पाहिजे.सेनेचे काही लोक त्या त्या विभागात चांगले काम करतात हे पिन्ची मधेही दिसून आले आहे. मनसेचे ही तसेच थोडेसे आहे. भाउ एकत्र आले व काही आर्थिक सामाजिक अशा प्रकारची वेगळी विचारसरंणी त्यानी मांडली तर आजही महाराष्ट्र त्याना स्वीकारेल पण बोलबच्चन गिरीला त्यानी आवर घालावा तरच पुढे काही घडेल नाहीतर मराठी माणूस या विषयावर महाराष्ट्र पेटविणे हे स्वपन रंजन ठरेल कारण हा मुद्दा मुंबई ठाणे या परिसराशिवाय कुठेही चालत नाही.

वरुण मोहिते's picture

24 Feb 2017 - 9:32 pm | वरुण मोहिते

हा विचारच करत नाही . कोणाला हवी आहे सेना?? काही झालं कि सेना हवी हा गैरसमज आहे .मुंबई बाहेर . त्यांचं ग्रॉऊंड वर्क आहे त्या जीवावर ते येतात . कुठेही घाबरायला काय मराठी माणूस पागल आहे का??का मुंबई ठाण्यात सेना लागायला ??का महाराष्ट्रात मराठी लोक घाबरले असं तर नाहीये ना? ज्या ठिकाणी बाकी लोक आले तिथे मराठी माणूस घाबरत नाही का?? हास्यास्पद मांडणी मुंबई बाहेरच्या लोकांची . असा नसतो विचार लोकांचा .

निष्पक्ष सदस्य's picture

25 Feb 2017 - 11:50 am | निष्पक्ष सदस्य

काही अपवाद वगळता सत्तेमध्ये असणारे चेहरे तेच आहेत,फक्त त्याला आता भाजप असे म्हणतात.
आमच्या इकडे भाजप म्हणजे काय माहित नव्हतं लोकांना,पण आता झेडपी ला पण भरभरून उमेदवार निवडून आलेत,अर्थात पूर्वी ते काँग्रेस अन् राष्ट्रवादी मध्येच होते,आता फक्त पक्षाचं नाव बदललं,पण लोक तेच!

विशुमित's picture

25 Feb 2017 - 4:30 pm | विशुमित

असं कसं...

ते वाल्याचे वालमिकी होणार आता.

श्रीगुरुजी's picture

25 Feb 2017 - 6:00 pm | श्रीगुरुजी

उद्धव ठाकरेंची राजकीय अपरिपक्वता पुन्हा एकदा दृग्गोचर झाली आहे. अर्थात पोकळ फुशारक्या व बढाया मारणार्‍यांकडून परिपक्वतेची अपेक्षा करणे जरा अवघडच आहे. २०१४ मध्ये भाजप बहुमतापासून तब्बल २२ जागांनी दूर असताना व स्वतःच्या हातात तब्बल ६३ आमदार असताना व भाजपला काँग्रेस/राष्ट्रवादीचा पाठिंबा नको असताना उधोजींनी हातातले पत्ते नीट खेळले असते तर उपमुख्यमंत्रीपद, अर्थमंत्रीपद, सभापतीपद, गृहमंत्रीपद, महसूलमंत्रीपद इ. पैकी काही महत्त्वाची पदे नक्कीच मिळविता आली असती. कदाचित अडीच वर्षांकरीता मुख्यमंत्रीपद सुद्धा मिळविता आले असते. दुर्दैवाने हातातले पत्ते नीट न खेळल्याने शिवसेनेला खूप कमी महत्त्वाची हातात येऊन भाजपच्या हातातले खेळणे बनावे लागले. उधोजींच्या जागी मायावती असती तर तिने एकाच वेळी भाजप व काँग्रेस/राष्ट्रवादीशी गुपचूप बोलणी करून सर्वाधिक फायदा करून घेतला असता.

आता पुन्हा एकदा हातातील पाने दाखविण्याची चूक उधोजी करीत आहेत. मुंबईत बहुमतासाठी ११४ जागा हव्या असताना शिवसेना ८४ व भाजप ८२ अशी अटीतटीची परिस्थिती असताना काँग्रेस (३१), राष्ट्रवादी (९), मनसे (७) व इतर (१४) यांना अतोनात महत्त्व आले आहे. अशा वेळी ३ अपक्ष नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे हे जाहीर करून हुरळलेल्या उधोजींनी आपल्या हातातले पत्ते उघड करायला सुरूवात केली आहे. आपली संख्या वाढल्याचे समजल्यावर भाजप दबावाखाली येऊन आपल्या मागण्या मान्य करेल अशा गैरसमजूतीत ते दिसतात. भाजपही बहुमतासाठी जुळवाजुळव करीत असणारच. परंतु भाजपने आपण कोणाचा पाठिंबा मिळविण्याच्या प्रयत्नात आहोत हे अजिबात बाहेर येऊन दिलेले नाही. अगदी आयत्यावेळी ते जाहीर करून सेनेला धक्का देऊन तोंडघशी पाडावे अशी भाजपची योजना असणार. भाजप शिवसेनेला जास्तीत जास्त गाफील ठेवून गुपचूपपणे नगरसेवकांची पळवापळवी करणार हे निश्चित.

श्रीगुरुजी's picture

25 Feb 2017 - 6:05 pm | श्रीगुरुजी

भाजपमधील शिवसेना सहानुभूतीदार नेत्यांनी (गडकरी, मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील इ.) भाजपने शिवसेनेशी पुन्हा जुळवून घ्यावे यासाठी जाहीर विधाने करण्यास सुरूवात केली आहे. गडकरी, मुनगंटीवार व फडणवीस या तिघांचेही कार्यक्षेत्र विदर्भ असल्याने फडणवीस फार मोठे होणे उर्वरीत दोघांना परवडण्यासारखे नाही. त्यामुळे फडणवीसांसमोर अडचणी निर्माण करणे हाच यामागचा हेतू असावा. चंद्रकांत पाटील यांना तर सुरवातीपासूनच सेनेबद्दल मऊ कोपरा आहे. एकीकडे फडणवीस, मोदी व शहा शिवसेनेला पूर्ण नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करीत असताना व त्यांना त्यात यश येत असताना हे इतर नेते मात्र अडथळे आणत आहेत.

श्रीगुरुजी's picture

25 Feb 2017 - 6:52 pm | श्रीगुरुजी

महाराष्ट्रात एक नवीन राजकीय समीकरण उदयाला येण्याची शक्यता दिसत आहे.

http://beta1.esakal.com/mumbai/shivsena-congress-alliance-mumbai-32396

मुंबई: मुंबई महापालिकेत 84 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेससोबत गुप्त वाटाघाटी सुरू केल्याची माहिती विश्‍वसनीय सुत्रांनी दिली आहे. या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्‍वासू सहकाऱ्यांनी काँग्रेसला एक प्रस्ताव दिला आहे. आज जरी नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत युती आणि महापौरपदाच्या निवडणुकीच्या नियोजनाबाबत चर्चा होणार असली तरी महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसची मदत घेण्याची सेनेची मानसिक तयारी झाल्याचेही सांगितले जात आहे.

आंधळ्याला लंगड्याची साथ अशी ही नवीन भागीदारी ठरेल का हे आगामी काळच ठरवेल. काँग्रेसची मदत घेणे हे शिवसेना व काँग्रेस या दोघांसाठी फायदेशीर ठरेल का ती दोघांची हाराकिरी ठरेल हे भविष्यात कळेलच. भाजपने शांत राहून होणार्‍या घडामोडी पाहत रहाव्यात. काँग्रेसच्या चिथावणीने शिवसेनेने पाठिंबा काढला तर भाजपसाठी ती इष्टापत्तीच ठरेल. काही काळाने काँग्रेस (४२) + राष्ट्रवादी (४१) + शिवसेना (६३) अशी युती झाली तर एकूण १४६ आमदार होतील व तिघे एकत्रित सरकार स्थापन करू शकतील. हीसुद्धा भाजपसाठी इष्टापत्तीच ठरेल.

अनुप ढेरे's picture

25 Feb 2017 - 7:42 pm | अनुप ढेरे

काँग्रेसच्या चिथावणीने शिवसेनेने पाठिंबा काढला तर भाजपसाठी ती इष्टापत्तीच ठरेल.

साधारणतः सहमत. आत्ता सरकार पडलं आणि निवडणुका आल्या तर भाजपासाठी चांगलच आहे. १२०पेक्षा जास्तं देखील येऊ शकतील जागा.

संदीप डांगे's picture

25 Feb 2017 - 9:52 pm | संदीप डांगे

पूर्ण सहमत आहे. आता विधानसभेसाठी मध्यावधी झाल्या तर भाजपसाठी उत्तम आहे...

वाल्मिकी's picture

25 Feb 2017 - 11:45 pm | वाल्मिकी

शिवसेनेने पाठिंबा काढला तरी सरकार पडू शकेल ह्याची १००% नाहीये

राणीबाग विकास आराखडा, तिथले प्राणी ,स्थलांतरित करणे , दीडशे वर्षांची जुनी बिनकामाची झाडे काढून तिथे नर्स्रीतली खजुरीची झाडे लावण्याचा आराखडा ,गेंडा,पाणघोडा यांचे स्थलांतर,आणि शेवटी पेन्ग्विन प्रकरणातून विश्वास फार उडाला. तसं झालं नसतं तर १२० जागा शिवसेनेच्या आल्या असत्या.

सुबोध खरे's picture

27 Feb 2017 - 4:12 pm | सुबोध खरे
सुबोध खरे's picture

27 Feb 2017 - 4:13 pm | सुबोध खरे
संदीप डांगे's picture

27 Feb 2017 - 4:40 pm | संदीप डांगे

कश्मिरमध्ये जे घडलं तेच हो... नवीन काय त्यात?

श्रीगुरुजी's picture

27 Feb 2017 - 8:47 pm | श्रीगुरुजी

हे भारी आहे.


युद्धाची आणि क्रिकेटची तुलना होऊ शकते?

काय वाढून ठेवले आहे हे आजच्या कवळ्या पिढी पुढे?
विचार नाही पटले की हाणामारी, बलात्काराच्या धमक्या आणि याची भलामण करणारे २% चे छछोरी क्रिकेटर आणि नाट्यकंपनी ?

http://beta1.esakal.com/desh/gurmehar-kaur-drops-out-studentsagainstabvp...

मग तुम्ही ज्यांचा उदो उदो करता ते साहेब या २% छछोरी क्रिकेटरांचे नेतृत्व का करत होते म्हणे..?

(तुम्ही पुन्हा पुन्हा अजाणतेपणे शरद पवारांच्याच कर्तृत्वावर शरसंधान करत आहात असे नम्रपणे दाखवून देत आहे.)

विशुमित's picture

28 Feb 2017 - 11:16 am | विशुमित

अखिल भारतीय 'लूडबूडक' आले, ट्रोल करायला. फाट्यावर...!!

खिक्क. उत्तर नांही का..? की काय लिहायचे याचा वरून आदेश आला नाही..?

अडचण समजू शकतो. =))

विशुमित's picture

28 Feb 2017 - 11:40 am | विशुमित

फाट्यावर मारले तरी लूडबूडक भाट चोंबडेपणा काही सोडत नाही.

(आगाऊ सल्ला: तुमच्या सारख्या मिपावरील कथित ६ वर्षा पासूनच्या सदस्याची ट्रोल मध्ये गणना होऊ नये, ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे. सर्व काही तुमच्या हातात आहे. शुभेच्छा..!!)

ती काळजी तुम्ही कशाला करताय..? मी बघून घेतो.

प्रश्नाचे उत्तर नसेल तर तसे सांगा. यांनी केले त्यांनी केले हे कशाला..?

थॉर माणूस's picture

28 Feb 2017 - 11:34 am | थॉर माणूस

सुमार दर्जाचे समालोचन आणि ट्रोलिंग इतकेच याच्या हातात राहीले आहे सध्या प्रसिद्धीच्या झोतात रहाण्याकरीता. विनोद कांबळी दर्जाच्या पिंका टाकून ट्विटर अकाउंट चर्चेत ठेवणे ही गरज झाली आहे या माणसाची. बॅटने कमावलेलं एक दिवस या हव्यासापोटी घालवून बसू नये म्हणजे मिळवली.

कारगिल हुतात्म्यांच्या मुलीचा राजकीय कारणासाठी गैरवापर करणाऱ्या राजकीय पक्षांचा निषेध.
पाकिस्तानने माझ्या वडिलांना मारले नाही तर "युद्धा" ने मारले असे हि २० वर्षाची मुलगी कुणाच्या सांगण्यावरून म्हणते. युद्ध खेळायला आपले लष्कर काय आनंदाने गेले ? पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केली. तेथे जाऊन आपण काय कबुतरे उडवायची होती? का मेणबत्त्या पेटवायचा होत्या? कि उपोषण करायचे होते. हे युद्ध भारताने सुरुवात केली नव्हती तर पाकिस्तानने लादले होते. जे एन यु चीच पिलावळ दिल्ली विशवविद्यालयात येऊन असला निमनस्तरीय धांगडधिंगा करत आहे.
हि पाकिस्तान बद्दल सहानुभूती कुठून आली आहे ? मला या मुलीची "लाज" वाटते. तिच्या वडिलांचा त्याग तिने पाण्यात घालवला असे स्पष्ट मत माझ्या अनेक लष्करी मित्रांनी (ज्यांनी कारगिल युद्धात प्रत्यक्ष भाग घेतला होता) आमच्या ग्रुप वर व्यक्त केले आहे.
कारगिल युद्धाचे राजकीयीकरण करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांचा आणि संघटनांचा परत एकदा निषेध.

वरुण मोहिते's picture

28 Feb 2017 - 12:25 pm | वरुण मोहिते

फार इंटेलेच्युअल असतात हो. आमची एक मैत्रीण होती सेक्रेटरी होती . त्या कॉलेज ची ४-५ वर्षांपूर्वी . ड्रिंक करताना माझ्यासोबत तैवान च्या एका प्रश्नावर तावातावाने बोलत होती . म्हटलं तेरे यहा कॉर्पोरेटर कौन है . मालूम नही बोली .. म्हटलं ओक्के चियर्स .

संदीप डांगे's picture

28 Feb 2017 - 4:43 pm | संदीप डांगे

वरील प्रतिसाद लिहिण्याआधी आपण त्या मुलीचा तो प्लकार्ड असलेला पूर्ण विडिओ बघितला का? नसल्यास अर्धवट माहितीवरुन धडाधड जजमेंट पास करत आहात असे म्हणता येईल.

गुरमेहर ने अभाविप च्या विरोधात एक प्लकार्ड काय धरले, गणंगांनी तिचे २०१४ च्या जुन्या युद्ध-नको-शांतता-हवी हा संदेश देणार्‍या विडिओचे अर्धवट सोयिस्कर उचलुन ती कशी देशद्रोही आहे हे पसरवायला सुरुवात केली.. तिला बलात्काराच्या डिटेल धम्क्या दिल्यात... ह्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही जणू....

लष्करी अधिकार्‍यांच्या तुमच्या गृपने काय म्हटलं ते तुम्हाला माहित, पण इथे तर काही वेगळंच घडतंय...
http://indiatoday.intoday.in/story/army-veterans-vow-to-fight-for-gurmeh...

अभाविप रामजस मध्ये काय करतंय... भाजपच्या आयटीसेलचे सदस्य आयएसआयचे हस्तक म्हणून पकडले गेले, आयएसआय भाजपच्याच लोकांना हेरगीरीसाठी वापरुन उरी सारखे हल्ले बिनचूक करु शकते आहे ह्याबद्दल तुमच्या लषकरी अधिकार्‍यांच्या गृपमध्ये काय मत आहे ते ऐकायला आवडेल.. एका अर्धवट प्लकार्डपेक्षा अख्खी हेरगीरीचे रॅकेट चालवाणारे जास्त घातक असावेत पण त्याबद्दल मात्र मौन...

विशुमित's picture

28 Feb 2017 - 4:51 pm | विशुमित

+१११११११

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Feb 2017 - 5:49 pm | llपुण्याचे पेशवेll

सदर मुलगी ही आपची मोठि प्रचारक व समर्थक आहे. बाकी या आझादी गँगची मनोवृत्ती खालील प्रमाणे आहे.
Disagreement = Attack
Logical counter = Trolling
Truth = Hate Speech
Expose Lies = Abuse
Expose Another Lie = Targeted Harassment
Disagree with a Woman = Sexist, Hariyanvi

संदीप डांगे's picture

28 Feb 2017 - 6:17 pm | संदीप डांगे

सदर मुलगी ही आपची मोठि प्रचारक व समर्थक आहे.

>>> ग्रेट! ही गोष्ट तिला देशद्रोही ठरवायला पुरेशी आहे. नैका?

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Mar 2017 - 5:36 pm | llपुण्याचे पेशवेll

>>> ग्रेट! ही गोष्ट तिला देशद्रोही ठरवायला पुरेशी आहे. नैका?
नाही पण तिला किती सिरीयसली घ्यायचं हे ठरवायला पुरेशी आहे.

सुबोध खरे's picture

28 Feb 2017 - 6:29 pm | सुबोध खरे

कारगिल युद्धाचे राजकीयीकरण करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांचा आणि संघटनांचा परत एकदा निषेध.डांगे अण्णा
माझे पहिले आणि शेवटचे विधान आपण "नीट" न वाचता उगाच बिनबुडाचे आरोप करत आहात.
"भाजपच कशाला लष्करात सुद्धा" पाकिस्तानला मदत करणारे लोक आहेत (आणि असतील). त्यांना शोधून काढण्याचे काम लष्कराचे हेरखाते सतत करत असते. प्रत्येक लष्करी अधिकारी सुटीवर जातो तो कुठल्या प्रान्तातील आहे आणि त्याचे कुणाशी संबंध आहेत यावर लष्करी हेरखाते "लक्ष" ठेवून असते हे बऱ्याच लष्करी अधिकार्यांनाही माहित नाही/नसते. त्यातूनच शत्रूराष्ट्राचे हेरही पकडले जातात. ( हा एक वेगळा विषय आहे.)
तेंव्हा माझ्या विधानाचा आपण केवळ पक्षीय/ राजकीय दृष्टिकोनातून विचार करता आहात याबद्दल आपला निषेध.
हि मुलगी कारगिलमध्ये हुतात्मा झालेल्या अधिकाऱ्याची मुलगी आहे म्हणून तिला एवढी "प्रसिद्धी" मिळाली (दिली गेली). आणि तिच्या विरुद्ध एवढी राळ उडवली गेली आहे.
ती सर्व सामान्य माणसाची मुलगी असती तर असे झाले असते का हा विचार करा ? अन्यथा कबुतरे उडवणारे किंवा मेणबत्त्या जाळणारे लोक भारतात लक्षावधी आहेत. त्यांच्या कडे लक्ष देण्याचे कारण नाही.
"आयएसआय भाजपच्याच लोकांना हेरगीरीसाठी वापरुन उरी सारखे हल्ले बिनचूक करु शकते आहे" पाकिस्तानची आय एस आय संघटना एवढी दळभद्री नाही कि तिला भाजपच्या चार टिनपाट आयटी सेलच्या लोकांची मदत घ्यावी लागेल, उडी सारखा हल्ला करायला. एका "राष्ट्राची" गुप्तहेर संघटना आहे ती किती हरामखोर असली तरी त्यांच्या क्षमतेबद्दल भारतीय लष्कराला पूर्ण कल्पना आहे.
पिवळा चष्मा लावला कि जग कावीळ झाल्यासारखे दिसते म्हणतात ते हेच.

संदीप डांगे's picture

28 Feb 2017 - 11:50 pm | संदीप डांगे

बाकी सर्व फाफटपसारा सोडाहो, तुम्ही कोलांट्या का मारताय? मी विचारले की तुम्ही तिचा पूर्ण विडियो बघितला काय? नसल्यास तिची तुम्हाला 'लाज वाटते' असं म्हणण्याला काही अर्थ आहे काय? तुम्ही व्हिडियो बघितला असता तर 'लाज' वाटते म्हटलेच नसते.

पाकिस्तानने माझ्या वडिलांना मारले नाही तर "युद्धा" ने मारले असे हि २० वर्षाची मुलगी कुणाच्या सांगण्यावरून म्हणते. युद्ध खेळायला आपले लष्कर काय आनंदाने गेले ? पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केली. तेथे जाऊन आपण काय कबुतरे उडवायची होती? का मेणबत्त्या पेटवायचा होत्या? कि उपोषण करायचे होते. हे युद्ध भारताने सुरुवात केली नव्हती तर पाकिस्तानने लादले होते. जे एन यु चीच पिलावळ दिल्ली विशवविद्यालयात येऊन असला निमनस्तरीय धांगडधिंगा करत आहे.
हि पाकिस्तान बद्दल सहानुभूती कुठून आली आहे ? मला या मुलीची "लाज" वाटते. तिच्या वडिलांचा त्याग तिने पाण्यात घालवला असे स्पष्ट मत माझ्या अनेक लष्करी मित्रांनी (ज्यांनी कारगिल युद्धात प्रत्यक्ष भाग घेतला होता) आमच्या ग्रुप वर व्यक्त केले आहे.

हा तुमचा मूळ प्रतिसाद, ह्यावर वरखाली ज्या दोन वाक्यांच्या तटस्थ टोप्या लावल्यात त्यांना ह्या विधानांमुळे शून्य अर्थ राहतो. तुम्ही ज्यांचा निषेध करत आहात त्यांच्यात तुम्हीही सामील होतच आहात. "लष्करात बाप गमावलेल्या पोरीनी युद्धविहिन जगताची संकल्पना मांडणे" ह्यात लाज वाटण्यासारखे काय आहे ते मला जरा समजवा.

बिना चष्म्याची कावीळ जास्त घातक असते डॉक्टरसाहेब, चष्मा काढता तरी येतो, सबंध शरिरात संचारलेला काविळ काढता येत नाही इतका सहज.

तुम्हाला काय सांगायचं? तुम्ही तर लष्करातले डॉक्टर! जजमेंटल कमेन्ट्स करण्याआधी तेवढे मागचे पुढचे बघून घेत चला, इतकं सुचवू शकतो फारतर.

दहा महिने जुना व्हिडियो आहे, आताच का राळ उडवली गेली? ह्या प्रश्नाचे उत्तर सोयिस्कर नाही म्हणून कोलांट्या मारत दुसर्‍यांवर चष्मा-काविळ असले बालिश आरोप करणे सोपे असते.

--------------------------------------------------------

तुमच्यासाठी खास तिच्या विडियोचा अनुवाद देतोय. (गजू तायडे यांनी केलाय) त्यांच्या फेसबुकवालवरुन.

"
गुरमेहरचा हा व्हिडिओ दहा महिने जुना आहे.

मात्र त्यातला मागचा-पुढचा संदर्भ टाळून फक्त एकच पाटी दाखवून
चारी बाजूनं जी राळ उडवली जातेय ती क्षुब्ध करणारी आहे.
म्हणूनच खाली कमेन्टीत दिलेल्या व्हिडिओतल्या प्रत्येक पाटीचा
इथं मराठीत अनुवाद करून देतोय.

व्हिडिओ पहा, खालचा अनुवाद वाचा आणि मग आपली अक्कल वापरायची
की तथाकथित देशभक्तीच्या खात्यात गहाण टाकायची ते आपलं आपण ठरवा.

अनुवादाच्या बरेवाईटपणाची संपूर्ण जबाबदारी माझी. मुद्द्यांवर प्रतिवाद
शक्य नसल्यास अनुवादातल्या चुका काढू शकता.
------------------------------------------------------------------------------

१) हाय

२) माझं नाव गुरमेहर कौर

३) मी जलंधर, भारत येथे राहते

४) हे माझे वडील कॅप्टन मनदीप सिंह

५) ते १९९९ च्या कारगिल युद्धात मारले गेले

६) ते वारले तेव्हा मी २ वर्षांची होते. माझ्याकडे त्यांच्या फार कमी आठवणी आहेत

७) वडील नसल्यानं कसं वाटतं याच्या माझ्याकडे जास्त आठवणी आहेत

८) मला हेही आठवतं की पाकिस्तान आणि पाकिस्तान्यांचा त्यांनी
माझ्या वडलांना मारल्यामुळे मी किती द्वेष करायचे

९) मी मुसलमानांचाही द्वेष करायचे कारण सर्व मुसलमान
पाकिस्तानी असतात असं मला वाटायचं

१०) मी ६ वर्षांची असताना एका बुरखा घातलेल्या महिलेला
चाकू मारण्याचा प्रयत्न केला होता

११) ती माझ्या वडलांच्या मृत्यूला जबाबदार आहे असं
कुठल्याशा विचित्र कारणानं मला वाटलं होतं

१२) माझ्या आईनं मला आवरलं आणि समजावलं की

१३) माझ्या वडलांना पाकिस्ताननं नव्हे, युद्धानं मारलं

१४) हे कळायला मला जरा वेळ लागला, पण आज मी माझा
द्वेष सोडून द्यायला शिकले आहे

१५) हे सोपं नव्हतं, पण कठीणही नाही

१६) मी हे करू शकते, तर तुम्हीदेखील करू शकता

१७) आज मीदेखील माझ्या वडलांसारखीच एक सैनिक आहे

१८) मी भारत-पाकिस्तानमधल्या शांतीसाठी लढते

१९) कारण आमच्यात युद्ध झालं नसतं तर माझे वडील आजही इथेच असते

२०) मी हा व्हिडिओ बनवते आहे कारण माझी अशी मागणी आहे की
दोन्ही देशांच्या सरकारांनी ढोंगबाजी बंद करावी

२१) आणि समस्या सोडवावी

२२) जर २ महायुद्धांनंतर फ्रान्स आणि जर्मनी एकत्र येऊ शकतात

२३) जर जपान आणि अमेरिका आपला भूतकाळ मागे टाकून
प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकतात

२४) तर आपणही का नाही?

२५) बहुसंख्य सामान्य भारतीयांना आणि पाकिस्तान्यांना
शांती हवी आहे, युद्ध नव्हे

२६) मी दोन्ही राष्ट्रांच्या नेतृत्वाच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह लावते आहे

२७) तिसर्‍या दर्जाच्या नेतृत्वाखाली आपण पहिल्या दर्जाचा देश
बनण्याचं स्वप्न पाहू शकत नाही

२८) कृपा करून कंबर कसा, एकमेकांशी बोला आणि काम तडीला न्या

२९) राष्ट्रपुरस्कृत दहशतवाद आता पुरे

३०) राष्ट्रपुरस्कृत हेरगिरी आता पुरे

३१) राष्ट्रपुरस्कृत द्वेष आता पुरे

३२) सीमेच्या दोन्ही बाजूंना भरपूर लोक मेलेत

३३) आता पुरे म्हणजे पुरे

३४) जिथं आपल्या वडलांना गमावलेल्या गुरमेहर कौर नाहीत
अशा जगात मला राहायचंय

३५) मी एकटी नाही. माझ्यासारख्या खूप आहेत

३६) #ProfileForPeace

"

विशुमित's picture

1 Mar 2017 - 9:41 am | विशुमित

डांगे अण्णा...

simply ग्रेट....

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Mar 2017 - 5:39 pm | llपुण्याचे पेशवेll

ज्यांनी कोणी भाषांतराचे कष्ट घेतलेत त्यांनी फालतू गोष्टी भाषांतरीत करण्यात फारच वेळ घालवला आहे.

या मुलीचे वडील शहीद झाले ते युद्ध पाकने भारतावर लादलेले होते. जरी युद्धामुळे तिच्या वडिलांचा मृत्यू झाला असला तरी युद्धाचे कारण पाकिस्तान पुरस्कृत घुसखोर होते, तद्वत पाकिस्तान्मुळेच तिचे वडिल शहीद झाले. त्यांच्याविषयी पूर्ण आदर बाळगूनदेखील ती जे म्हणतिये त्याचा निषेधच झाला पाहिजे असे वाटते. जसे तिला तिचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तसेच टीका करणार्‍या माझ्यासारख्या सामान्यांनादेखील तिच्या ह्या विधानाची खिल्ली उडवण्याचा, कठोर टीका करण्याचा आणि तिचा निषेध करण्याचा अधिकार आहे. मात्र, हे करत असताना तिला बलात्काराच्या धमक्या आल्या, जे आक्षेपार्ह बोलले गेले त्याचासुद्धा निषेध करावा तेवढा कमीच आहे. विचारांना विचारांना प्रतुत्तर द्यायची शक्ती नसलेले मुर्ख अश्या प्रकारे गलीच्छ भाषेत व्यक्त होतात, अश्यांबद्दल कसलीही सहानुभूती नाही, त्यांना देशभक्त म्हणणे 'देशभक्ती' या म्हान मुल्याचा अपमान आहे.
रच्याकने, सेहवागच्या ट्वीटमध्ये आक्षेपार्ह काहीही नाही. त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.

गॅरी ट्रुमन's picture

1 Mar 2017 - 10:09 am | गॅरी ट्रुमन

या मुलीचे वडील शहीद झाले ते युद्ध पाकने भारतावर लादलेले होते. जरी युद्धामुळे तिच्या वडिलांचा मृत्यू झाला असला तरी युद्धाचे कारण पाकिस्तान पुरस्कृत घुसखोर होते, तद्वत पाकिस्तान्मुळेच तिचे वडिल शहीद झाले. त्यांच्याविषयी पूर्ण आदर बाळगूनदेखील ती जे म्हणतिये त्याचा निषेधच झाला पाहिजे असे वाटते.

पूर्ण सहमत आहे.

जसे तिला तिचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तसेच टीका करणार्‍या माझ्यासारख्या सामान्यांनादेखील तिच्या ह्या विधानाची खिल्ली उडवण्याचा, कठोर टीका करण्याचा आणि तिचा निषेध करण्याचा अधिकार आहे.

छ्या असे कसे. अभिव्यक्तीस्वातंत्र्य फक्त डाव्यांनाच असते काय समजलात. तिच्या विधानाचा निषेध करणारे इतर सगळे लोक असहिष्णु, फॅसिस्ट इत्यादी इत्यादी आहेत.

मात्र, हे करत असताना तिला बलात्काराच्या धमक्या आल्या, जे आक्षेपार्ह बोलले गेले त्याचासुद्धा निषेध करावा तेवढा कमीच आहे.

पूर्ण सहमत. फक्त या धमक्या देणारा कोणी भट्टाचार्य म्हणून एस.एफ.आय चा कार्यकर्ता आहे असेही म्हटले जात आहे. खरेखोटे माहित नाही. ती शक्यता जास्त आहेच कारण गेल्या दोनेक दिवसांपासून तिला बलात्काराच्या धमक्या दिल्या जात होत्या त्याविषयी चिडीचूप शांतता आहे. आणि दुसरे म्हणजे या प्रकरणात केजरीवाल उतरले आहेत. बहुदा दिल्ली महापालिका निवडणुकांपूर्वी असहिष्णुतेचे वातावरण निर्माण करायचा प्रयत्न दिसत आहे. असहिष्णुतेचे वातावरण निर्माण करून बिहारमध्ये फायदा झाला असे गृहित धरून तसेच वातावरण परत निर्माण करायचा प्रयत्न असेल तर ते अशक्य असेल असे वाटत नाही. आणि या मुद्द्यामध्ये केजरीवाल उतरतात तो मुद्दा जेन्युईन असू शकत नाही.

एकेकाळी असल्या लोकांचा फार फार राग यायचा. पण आता अजिबात राग येत नाही. तर उलट असे लोक पुढे येत आहेत याचा आनंदच वाटतो. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील गुड फॉर नथिंग रिकामटेकडे, विविध फॉरेन फंडेड एन,जी.ओ मधील तथाकथित कार्यकर्ते आणि स्वतःला लै शाने समजणारे बुबुडाविपुमाधवि सोडून इतर कोणाही सूज्ञ भारतीयाचे अफझल-आझादी गँगला समर्थन असेल असे वाटत नाही. जितके हे असले ढोंगी लोक पुढे येतील तितके चांगले होईल. मी तर म्हणतो की २०१९ मध्ये कन्हैय्या-गुरमेहर यांची जोडगोळी मोदी सोडून इतर सर्व भाजप नेत्यांपेक्षा मोदींसाठी जास्त मते मिळवून देईल.

वरुण मोहिते's picture

28 Feb 2017 - 11:40 am | वरुण मोहिते

वैग्रे माजी क्रीडापटूंना विचारा कि ... रवी शास्त्री ,गावस्कर , ह्या लोकांना विचारा
माजी खेळाडूंसाठी पेन्शन योजना सुरु करणे , स्टेडियम चा विकास करणे , स्पोर्ट अकादमी उभारणे ,
राजकारण नको विकासावर बोलू.
बाकी सेहवाग उत्कुष्ट खेळाडू असूनही असे फोटो टाकत असेल गरज नसताना तर निश्चित छछोर पणा आहे

विशुमित's picture

28 Feb 2017 - 11:46 am | विशुमित

तुम्ही गुलाम आहेत का शरद पवारांचे? मग इथे मिपावर यायचे नाही, वरून आदेश आला आहे. बिचारे ते तरी काय करणार भाटगिरीचा व्यवसायच वाईट. आहे. ( कृपया हलके घ्या आणि ख्यिक करा)

वरुण मोहिते's picture

28 Feb 2017 - 11:57 am | वरुण मोहिते

हास्यास्पद असतात ना पवार असो... गुजरात क्रिकेट असोशिएशन अमित शहा
विकासात्मक काम सोडून क्रिकेट जमते का
खेळले आहेत का शहा क्रिकेट कधी
सहज विचारलं हे प्रश्न पवारांना लागू होतात म्हणून
भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष अश्या बोर्डावर अध्यक्ष कसे राहतात ???
आधी मोदी पण होते
विकासाचा वारसा घेऊन भाजप जन्माला आलीये ते का राहतात क्रिकेट संघटनेत

फेदरवेट साहेब's picture

28 Feb 2017 - 2:14 pm | फेदरवेट साहेब

मिपावर रायचे तर जय भाजप म्हणावे(च) लागेल असे काहीसे इंस्ट्रकशन 'सदस्य व्हायच्या आधी' मध्ये घातले तर बरे होईल, अशी सुचनावजा विनंती मी मालकांना/संपादकांना नम्रपणे करून स्वतःला लाईन ऑफ़ फायर मध्ये उभा करतोय.

च्यायला उगा एखाद फायरिंग स्क्वाड समोर उभा असल्याची भावना आली एकदम.

संदीप डांगे's picture

28 Feb 2017 - 3:33 pm | संदीप डांगे

आम्ही बी हुभं हाओ तुमच्या संग

lakhu risbud's picture

28 Feb 2017 - 3:56 pm | lakhu risbud

तसंच काय नाय ओ,जरा तारतम्य वापरलं तरी पन चालतंय !

फेदरवेट साहेब's picture

28 Feb 2017 - 4:00 pm | फेदरवेट साहेब

प्लीज बी सिटेड मिस्टर रिसबुद

=))

फेदरवेट साहेब's picture

28 Feb 2017 - 3:59 pm | फेदरवेट साहेब

ओ तुम्ही नका बोलू हो! उद्या लोक म्हणतील फेदूदा अन डांगे एकच आयडी आहेत, आमचं बरंय साहेब, एकंदरीत भाजपला प्रश्न विचारणाऱ्या आमच्यासारख्यांचे. कोणीही प्रश्न विचारले का तो थेट तुमचा डु आयडी होतो म्हणे, कसली क्रेडिबिलिटी कमावली आहे तुम्ही...... =))

तरी बरं आता आलेत काही काही जरा नव्या फळीतले कार्यकर्ते =))

सगळे डु आयडी आहेत, सब मिले हुये है जी.

संदीप डांगे's picture

28 Feb 2017 - 4:20 pm | संदीप डांगे

=)) आमची कसली क्रेडिबिलिटी? सगळी कृपा त्या भगवंताची! भक्तगणंगांना द्वेष म्हणजे विरोध इतकंच शिकवलेलं आहे. त्यामुळं कोणी विरोध करतो, प्रश्न विचारतो म्हणजे द्वेषच करतो असे त्यांच्या संस्कारातून वाटतंय..

बाकी, रिसबूड साहेब, तारतम्याबद्दल बोलतात... ते एक जाम आवडलं... निदान तारतम्याची ओळखतरी आहे हे ऐकून परमानंद जाहला आज मनी!

कपिलमुनी's picture

28 Feb 2017 - 6:10 pm | कपिलमुनी

गुरुमेहेर प्रकरणात चिखलफेक करण्याअगोदर पूर्ण व्हिडीओ बघा. संपूर्ण व्हिडीओ मधली केवळ सोयीस्कर एवढी एकच स्लाईड वापरली आहे.

"दुरीतांचे तिमिर जाओ" अशा भावनेने शांततेचे आवहन करणार असेल तर त्यात गैर काय ??

इथे या मुद्द्याचा काय संबंध ?
आणि महापालिका, जिल्हा परीषद निवडणूक निकालामधे याचे प्रयोजन काय ??

विशुमित's picture

1 Mar 2017 - 9:44 am | विशुमित

भाजपच्या कर्तृत्वाची पाठ थोपटून घ्याची भारी हौस आहे काही भाटाना, म्हणून एवढा आटापिटा.

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Mar 2017 - 5:44 pm | llपुण्याचे पेशवेll

असल्या फडतूस आनि बोगस शांततेचेच आम्ही विरोधक आहोत. हा जर काही प्रचार करायचा असेल तर तो पाकीस्तानात जाऊन कर, इथले लोक तुलनेने कमी पाकीस्तान द्वेष्ते आहेत.
मुळात ज्या देशाशी शांतता स्थापनेबद्दल बोललं जात आहे तो देश त्या लायकीचाच नाही आणि ती लायकी यायची इतक्यात शक्यताही नाही. वाजपेयींसह अनेकांनी प्रयत्न करून झालेले आहेत त्यामुळे असले तुच्छ आशावाद योग्य जागी मारण्यात येतात.

फेदरवेट साहेब's picture

1 Mar 2017 - 7:32 pm | फेदरवेट साहेब

आवेश एकदम दांडपट्ट्याचे लवलवते पान फिरवत असलेल्या बाजींसारखा जमलाय, मोप माणसे चिरून कोथळे काढून वगैरे तुम्ही यमसदनी, जहंन्नुम मध्ये धाडली असतील नाही का पुपे तुम्ही? असंच पाहिजे, बोगस शांतिदूत लेकाचे, ती बेटी शांतीची कबुतरे तंदूरभट्टीतच कोंबून टाकायला हवीत, शिवाय एखाद्या डॉक्टरला रक्तमांस पाहायची असते तशी तुम्हालापण योद्धे असल्यामुळे लोळागोळा झालेली माणसे, रक्त बाहेर आलेली आतडी वगैरे बघायची सवय असेल अशी मला आशा आहे अन तुमच्यावर अभंग विश्वासही. :)

धर्मराजमुटके's picture

1 Mar 2017 - 9:19 pm | धर्मराजमुटके

धर्म ही अफुची गोळी आहे ?? असे म्हणणार्‍याने एकदा राजकारणावरच्या चर्चा / हाणामार्‍या पाहायला पाहिजेत म्हणजे तो आपले मत नक्कीच बदलेल.
राजकारण हे ब्राऊन शुगर / हेरॉईन / कोकेन आहे असे म्हणायला हरकत नसावी.

पुंबा's picture

2 Mar 2017 - 1:31 pm | पुंबा

सखेद सहमत.. :((

श्रीगुरुजी's picture

2 Mar 2017 - 2:27 pm | श्रीगुरुजी

हे फक्त पुण्यातच होऊ शकते.
_________________________________________________________

२१ फेब्रुवारीला मतदानाच्या दिवशी पुण्याचे मावळते महापौर व उपमहापौर यांनी मतदान सुरू होण्यापूर्वी मतदान यंत्राची साग्रसंगीत पूजा केली.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आणि
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

२३ फेब्रवारीला मतमोजणीनंतर काही दिवसांनी पुण्यातच मतदानयंत्राची अंत्ययात्रा निघाली.

पुणे तेथे काय उणे!

श्रीगुरुजी's picture

21 Apr 2017 - 2:11 pm | श्रीगुरुजी

आज लातूर, चंद्रपूर आणि परभणी महापालिका निवडणुक निकालांची मतमोजणी आहे.

लातूरमध्ये भाजपने ७० पैकी ३८ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. भाजपखालोखाल काँग्रेसला ३१ जागी विजय मिळाला आहे. २०१२ मधील निवडणुकीत कॉंग्रेसला ४९, राष्ट्रवादीला १३, शिवसेनेला ६ व रिपाईंला २ जागा होत्या. त्यावेळी भाजपला शून्य जागा होत्या. आता भाजपने ० वरून ३८ वर झेप घेतली आहे, तर काँग्रेस ४९ वरून ३१ वर आली आहे. राष्ट्रवादीचा फक्त १ नगरसेवक निवडून आला असून इतरांना भोपळा मिळाला आहे.

लातूरमध्ये मागील वर्षी पाण्याची भीषण टंचाई होती. नागरिकांना ३० दिवसातून फक्त १ दिवस नळाने पाणीपुरवठा केला जात होता. परंतु राज्य सरकारने रेल्वेच्या सहाय्याने निरजेहून लातूरला पाणी पाठवून पाणीटंचाईवर अंशतः तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. तब्बल एक महिन्याहून अधिक काळ रोज रेल्वेने २५ लाख लिटर पाणी पुरविले जात होते. त्याच बरोबरीने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे केल्यामुळे यावर्षी लातूरला पाणीटंचाई जाणवली नाही. लातूरचे विलासराव देशमुख तब्बल ८ वर्षे मुख्यमंत्री पदावर होते. त्याव्यतिरिक्त ते अनेक वर्षे राज्यात व केंद्रात मंत्री होते. लातूरचे एक दुसरे मातब्बर नेते शिवराज पाटील अनेक वर्षे केंद्रात मंत्री होते. या दोघांना लातूरकरांनी अनेकवेळा निवडून देऊनसुद्धा त्यांनी लातूरकरांकरता फारसे काही केले नाही हे दिसून आले. नागरिकांनी राज्य सरकारने पाणीटंचाई कमी करण्याच्या केलेल्या प्रयत्नांना मतपेटीच्या माध्यमातून दाद दिलेली दिसत आहे.

चंद्रपूरमधील ६६ पैकी ३१ जागांवर भाजप आघाडीवर आहे तर काँग्रेस फक्त ११ जागांवर आघाडीवर आहे. २०१२ मध्ये चंद्रपूरमध्ये काँग्रेसने विजय मिळविला होता.

परभणी महापालिका काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यातून हिसकावून घेण्याची शक्यता आहे. महापालिकेतील ६५ जागांपैकी ३१ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे,. भाजप ८ आणि शिवसेना व राष्ट्रवादी प्रत्येकी ७ जागांवर आघाडीवर आहेत. २०१२ मध्ये परभणीत राष्ट्रवादीला ३० जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला फक्त २ जागा मिळाल्या होत्या.

एकंदरीत दोन महिन्यांपूर्वी झालेल्या १० महापालिकांच्या निवडणुकीतील कल अजूनही कायम आहे. आतापर्यंत झालेल्या १३ महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने ७ महापालिकात स्पष्ट बहुमत मिळविले आहे, एका महापालिकेत बहुमताच्या दिशेने वाटचाल आहे तर २ महापालिकांमध्ये सर्वाधिक जागा मिळविलेल्या आहेत. २०१२ मध्ये भाजप या १३ महापालिकांपैकी फक्त १ महापालिकेत सत्तेवर होता. त्या तुलनेत भाजप आता एकूण १० महापालिकांमध्ये सत्तेवर असणार आहे.

या तीन महापालिकेत मनसेला २०१ पैकी फक्त १ जागा मिळाली आहे. राष्ट्रवादीला १२ व शिवसेनेला फक्त ७ जागा आहेत. एकंदरीत मनसेपाठोपाठ हे दोन पक्षसुद्धा अस्तित्वहीन होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत.

श्रीगुरुजी's picture

21 Apr 2017 - 2:14 pm | श्रीगुरुजी

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी वातानुकुलीत बसमधून काढलेल्या 'संघर्ष यात्रा' नामक नौटंकीचा सुद्धा नागरिकांवर परीणाम झालेला दिसत नाही.

गॅरी ट्रुमन's picture

21 Apr 2017 - 2:21 pm | गॅरी ट्रुमन

लातूर आणि चंद्रपूरमधील ई.व्ही.एम हॅक केलेली होती पण परभणीतील ई.व्ही.एम मात्र एकदम परफेक्ट होती. या महापालिका निकालांचा अर्थ हाच आहे :)

श्रीगुरुजी's picture

21 Apr 2017 - 2:57 pm | श्रीगुरुजी

ळॉळ

प्रसाद_१९८२'s picture

21 Apr 2017 - 4:50 pm | प्रसाद_१९८२

लातूर व चंद्रपुर मधील पराभवाचे खापर, कॉंग्रेजचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ई.व्ही.एम व मुख्यमंत्री फडणविस यांच्यावर फोडायला सुरुवात देखील केलेय. त्यांच्या मते भाजपाने सत्तेचा दुरुपयोग करुन दोन्ही ठिकाणी सत्ता स्थापन केली आहे. मात्र परभणीत, सत्तेचा दुरुपयोग भाजपाने का केला नाही यावर त्यांनी माध्यमांत अजिबात भाष्य केले नाही.

वरुण मोहिते's picture

21 Apr 2017 - 2:30 pm | वरुण मोहिते

ह्यांच्यावर दाखवलेला मुख्यमंत्र्यांनी विश्वास सार्थ झाला . विलासराव गेल्यानंतर हे होणारच होते . त्यात पालकमंत्री संभाजीरावांची उमदी कार्यपद्धती लोकांना आवडली अमित देशमुखांच्या तुलनेत . शिवाय पारंपरिक लिंगायत मतांचा भाजप ला फायदा झालाच अनेक वर्ष हे मतदार भाजप चे होते परंतु विलासराव असेपर्यंत ते साध्य झालं नाही . परभणीत राष्ट्रवादीला धोक्याची घंटा आहे तसाच काँग्रेस ला उभारी देणारा निकाल आहे . मनसेच्या २ जागा आहेत वाटत .