आकर्षण, प्रेम आणि जवळीक

मराठी कथालेखक's picture
मराठी कथालेखक in काथ्याकूट
10 Feb 2017 - 7:48 pm
गाभा: 

आज प्रथमच त्याने तिचा हात हातात घेतला आणि दोघांच्या हृदयाचे ठोके वाढले, अंगावर रोमांच उभे राहिले. प्रेमाचे ते काहीच क्षण पण खूप काही देवून गेले. पुढचे कित्येक तास ती हुरहुर मनात पिंगा घालत राहिली. एकमेकांबद्दलच्या प्रेमाने आणि शारिरिक आकर्षणाने दोघे संमोहित झालेत.

हा अनुभव.. खूपच रोमांचक वाटतो , हो ना ?

***********************************************************
पण प्रश्न पुढचा आहे. त्याची ,तिची जवळीक अधिकृतरीत्या समाजमान्य झाली. दोघांचे लग्न झाले. काही वर्षे गेलीत.. चाळीशी जवळ आली..म्हंटलं तर तरुण म्हंटलं तर थोडं वय होत आहे... आता हातात हात घेतल्याने अंगावर रोमांच उभे रहात नाहीत, त्याच्या वा तिच्या स्पर्शाने मनात हुरहुर निर्माण होत नाही... ती एक चांगली व्यक्ती आहे, तो ही चांगला आहे. एकमेकांबद्दलची काळजी आदर, प्रेम अजूनही कायम आहे. पण आधी होतं तसं जबरदस्त शारिरीक आकर्षण आता वाटत नाही (एकतर त्याला किंवा तिला..हे कुणाबद्दलही होवू शकतं पण सध्या जास्त करुन त्याच्याबद्दल लिहित आहे) ..तसं म्हंटलं तर तो अजून तरुण आहे, जवळून सुंदर , तरूण मुलगी गेली की हमखास वळून पहातो, पण पत्नीकडे पुन्हा वळून पाहावे असे वाटत नाही. ती चांगली वागते, त्याची तिच्याबद्दल काही तक्रार नाही पण तरी विशेष आकर्षण वाटत नसल्याने तो शारिरिक जवळीक फारशी करत नाही. असं करुन आपण तिच्यावर अन्याय करतो आहे असंही त्याला वाटतं , पण शरीराने ओढ दिल्याशिवाय जवळीक करण्यात त्याला रस वाटत नाही. तो दुसर्‍या स्त्रीशी जवळीक करतो आहे असंही नाही. पण तरी त्याची-तिची बराच काळ जवळीक होत नाही.

प्रत्येक लग्नात (किंवा तत्सम दीर्घकालीन स्त्री-पुरुष संबंधात) हे असं (एका बाजूने अथवा दोन्ही बाजूने ) होत असावं का ? यावर उपाय काय ? आहे तसं चालू द्यावं का ? की शरीराने ओढ दिली नसतानाही स्वतःच्या शरीराला जवळीक करण्याची आज्ञा देत रहावं का ?

हा विषय तुम्हाला महत्वाचा वाटतो का ? मला वाटतं हा विषय बहूधा कधी मिपावर चर्चिला गेला नसावा. बहूधा कुणाला स्वतःचे अनुभव सांगणे प्रशस्त वाटणार नाही पण जनरिकली चर्चा होवू शकते.

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

10 Feb 2017 - 9:46 pm | संदीप डांगे

कॉलिंग संक्षि...

संजय क्षीरसागर's picture

10 Feb 2017 - 10:26 pm | संजय क्षीरसागर

हा माझा प्रॉब्लम आहे , कुणाकडे उत्तर आहे का? अशी प्रामाणिक विचारणा असेल तर सोल्यूशन मिळण्याची शक्यता जास्त . कारण मानवाचे याविषयातले सगळे प्रश्न थोडयाफार फरकानं सर्वत्र सारखेच आहेत . ते त्या अर्थानं जेनरिक आहेत. पण विचारणा जर ' असा माझा अंदाज आहे ' सगळयांनी स्वतःला सेफ ठेवून ( म्हणजे अमका असं म्हणतो, तमका तसं म्हणतो ) अशा टाईप चर्चा करणं म्हणजे रेनकोट घालून अंघोळ केल्यासारखं आहे ( ही मोदींची फ्रेज नाही. ३० वर्षांपूर्वी आमचा रंगेल ऑफिस बॉय, कंडोमविषयी असं म्हणायचा )

मराठी कथालेखक's picture

11 Feb 2017 - 1:20 pm | मराठी कथालेखक

मानवाचे याविषयातले सगळे प्रश्न थोडयाफार फरकानं सर्वत्र सारखेच आहेत . ते त्या अर्थानं जेनरिक आहेत.

ते जेनरिक आहेत म्हणता तर चर्चा होवूच शकते ना ?
मी जनरिकलीच प्रश्न मांडला होता.
पण तरी 'नेमका कुणाचा प्रॉब्लेम आहे' हा प्रश्न असेलच तर .. हा माझ्या 'क्ष' नावाच्या मित्राचा प्रॉब्लेम आहे...ओह.. हे पण थोडं जनरिकच वाटतं का ? बरं माझा एक मित्र आहे 'अ‍ॅन्थनी गोन्साल्विस' नावाचा. त्याचा प्रॉब्लेम आहे. त्याला मराठी फारसं येत नसल्याने तो मिपावर नाही आणि मिपाबद्दल त्याला माहितीही नाही, म्हणून त्याच्यावतीने मी त्याची समस्या इथे मांडलीये.
आता होवू शकते चर्चा ? आता इतर सदस्यांनी स्वतःचे अनुभव मांडावेत, जनरल विचार मांडावेत की रेनकोट घालून आंघोळ करावी हे ज्याचं ते ठरवतीलच !!

संजय क्षीरसागर's picture

11 Feb 2017 - 8:43 pm | संजय क्षीरसागर

म्हणजे व्यक्तिगत प्रश्न काही नाही मग उगीच काल्पनिक प्रश्नावर चर्चा कशाला ?

त्याच्यावतीने मी त्याची समस्या इथे मांडलीये.

इतक्या रिबाऊंड पद्धतीनं चर्चा निरस होते. आणि जनरल विचार मांडणं म्हणजेच रेनकोट घालून आंघोळ !

संजय क्षीरसागर's picture

11 Feb 2017 - 9:29 pm | संजय क्षीरसागर

`अतिपरिचयात अवज्ञा'

'नवे ते हवे'

चित्रगुप्त's picture

10 Feb 2017 - 10:07 pm | चित्रगुप्त

'अतिपरिचयात अवज्ञा' आणि 'नवे ते हवे' या म्हणी इथे लागू होतात.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Feb 2017 - 11:16 pm | अत्रुप्त आत्मा

=))

शारीरिक आकर्षण कायम राहायला तब्येत ही तशी पाहिजे ना ..

संजय पाटिल's picture

11 Feb 2017 - 6:24 pm | संजय पाटिल

नायकाची बाजु कळली.. नायिकेला काय वाटतय हे पण समजून घ्यायला आवडेल..

मराठी कथालेखक's picture

12 Feb 2017 - 2:54 pm | मराठी कथालेखक

तिला शारिरीक ओढ /आकर्षण आहे आणि नवर्‍याकडून प्रणय हवा आहे

रागिणी९१२'s picture

13 Feb 2017 - 12:36 pm | रागिणी९१२

अरे वा ! मिपाचे पुरुष (काही माननीय अपवाद सोडून) प्रगल्भ झाले वाटत. लेखकाचे अभिनंदन.
अनेक धाग्यात किंबहुना प्रतिसादात स्त्रीला कामभावना नसतात. तिला कामक्रीडेत रस नसतो. ती प्रणय टाळण्यासाठी अनेक कारणे देते. तीच वय होत आलं कि ती या बाबतीत नवऱ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करते. अश्या अनेक प्रतिक्रिया वाचल्या होत्या. त्यामुळे हा धागा म्हणजे 'संस्कृती बुडवा' धागा म्हणायला हवा. चला सुरुवात तर झाली स्त्रीला पुरुषाप्रमाणे कामभावना असतात हे मानायची .

तर तुमच्या मित्राला बायकोबद्दल आकर्षण उरल नाही आणि तिला प्रणय हवा आहे. बरेचदा लग्न झाल्यानंतर एक वर्षाच्या आत घरात नवा पाहून आलेला असतो. मुलांचं करण्यातच तिची उमेदीची वर्ष निघून जातात. दिवस जितका कामात जातो तितकी रात्र पण जाते. हल्लीची मुलं लवकर झोपेतच नाहीत. साधारणपणे चाळीशीत मुलं मोठी झालेली असतात. मग थोडा निवांतपणा येतो. मग स्त्रीच्या राहिलेल्या इच्छा पुन्हा उसळी मारू लागतात. मेनोपॉज पण जवळ येऊन मानसिक अस्वस्थता वाढते. अश्यावेळी नवऱ्याने बाहेरच्या सुंदर मुलीचा विचार अजिबात मनात न आणता इतके वर्ष सुखदुःखात साथ दिलेल्या पत्नीचा विचार करावा. तिच्याशी प्रेयसींप्रमाणे वागावे. निवांतवेळी बाजूला बसून हातात हात घेऊन गप्पा माराव्या, गप्पा रोमँटिक पाहिजेत असं काही नाही. घरगुती, मुलाबाळांच्या असल्या तरी चालतील. जवळ बसून हसून खेळून बोलल्याने सहवासाची गोडी वाढते. मुलांना वेगळं झोपू द्या. मनात विचार आणा, हळूहळू ओढ वाटू लागेल. एकमेकांच्या आवडीचा विचार करा. आवडेल असं बोला.
पुरुषाला स्वतःहून वाटत नसेल तर अश्यावेळी स्त्रीने पुढाकार घेणे गैर नाही. त्यासाठी एकमेकांच्यात सुसंवाद हवा.
आणि तरीही काही होत नसेल तर मानसोपचार तज्ज्ञाची न लाजता भेट घ्या. यासाठी अनेक पुष्पऔषधी उपलब्ध आहेत. हल्ली हा प्रॉब्लेम सार्वत्रिक होऊ लागला आहे. त्याचा त्रास करून घेण्यापेक्षा त्याला सामोरी जा.

मराठी कथालेखक's picture

13 Feb 2017 - 1:20 pm | मराठी कथालेखक

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
ते दोघेच घरी असतात त्यामुळे प्रायवसी वगैरेची काहीच गैरसोय नाही.
पण दोघे नोकरी करतात , त्यामुळे दोघे दमतात, रात्री झोपेपर्यंत उशीर आणि थकवा या समस्या आहेत. अर्थात सुटीचे दिवस निवांत असतात.
बाकी त्याने तज्ञाचा सल्ला घ्यायला हवा असं मलाहि वाटतं पण मानसोपचार तज्ञ की सेक्स या विषयातले तज्ञ ? तसं त्याने पुर्वी एक आयुर्वेदिक डॉक्टर गाठला होता. डॉक्टरांचे म्हणणे असे की त्याला इतर काही समस्या नाहीत फक्त त्याची पचनशक्ती कमी आहे , म्हणून अन्नातून म्हणावे तेवढे पोषण मिळत नाही. काही महिने त्याच्या पचनशक्तीवर केंद्रित उपचार केलेत, पण तरी (लो लिबिडोच्या) समस्येत फार फरक पडला नाही तेव्हा डॉक्टर म्हणाले की काहीतरी मानसिक कारण दिसते, यानेही कंटाळून मग उपचार बंद केलेत.

पण मग मानसिक आहे म्हणजे पत्नीबद्दलचे आकर्षण कमी झाले असे त्याचे पक्के मत बनले. "जर माझे पत्नीबद्दलचे आकर्षण कमी झाले आहे तर त्यात मी किंवा इतर कुणी तज्ञ काय करु शकणार , आकर्षण कसे निर्माण करणार?" असे त्याला वाटते. त्याचे पुढे असेही म्हणणे आहे की " मी जेव्हा एखादी अतिशय सुंदर तरुणी बघतो तेव्हा तिच्याबद्दल आकर्षण वाटते, तिच्याकडे पुन्हा पुन्हा बघावेसे वाटते, अशा एखाद्या सुंदर तरुणीला स्पर्श करावा, तिच्याशी प्रणय करावा अशी इच्छा मनात निर्माण होते , म्हणजे मग मी 'नॉर्मल'च आहे ना ?" त्याच्या या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नसते. एरवी दोघे (म्हणजे तो व त्याची पत्नी) छान मित्र मैत्रीणी सारखे हसून खेळून राहतात, दोघांचे स्वभाव बर्‍यापैकी जुळतात (वर म्हंटले तसे त्याची तिच्याबद्दल काहीच तक्रार नाही), म्हणजेच दोघांत इतर सर्व बाबतीत 'कंपॅटिबिलिटी' असली तरी 'सेक्स्युअल कंपॅटिबिलिटी' मात्र नाही असे असू शकते का ?

संजय पाटिल's picture

13 Feb 2017 - 10:31 pm | संजय पाटिल

वर कुणीतरी म्हंटल्याप्रमाणे " अतिपरीचयात ... असं झालंय बाकि काय नाय.
तुमच्या मित्राला त्याच्या बयको पासुन महिनाभर वेगळं रहायला सांगा, मग बघा कसं आपोआप आकर्षण वाढायला लागतं ....

सुबोध खरे's picture

14 Feb 2017 - 11:47 am | सुबोध खरे

मकले साहेब
प्रथम या अनाकर्षणाचें कारण काय ते समजून घेणे आवश्यक आहे. पत्नीचे रूप त्याला आकर्षीत करीत नाही कि पत्नी त्याला गृहीत धरत आहे. बऱ्याच वेळेस स्त्रिया लग्न झाले कि स्वतःच्या शरीर, रूप आणि साज शृंगार( मेक अप) याकडे नीट लक्ष देत नाहीत. "स्त्री हि क्षणाची पत्नी आणि अनंत काळ ची माता आहे" या मनोवृत्तीत गेलेली स्त्री जेंव्हा चाळीशी च्या आसपास पोहोचते तेंव्हा आता आपले वय वाढत जाते आहे याची तिला जाणीव होऊ लागते आणि मग येन केन प्रकारें ती आपले तारुण्य टिकवण्याच्या मागे लागते. याच काळात तिला जाणवू लागते कि आपला नवरा आता आपल्याकडे नीट लक्ष देत नाही.
याची सुरुवात तिशीलाच झालेली असते. स्त्री जेंव्हा मातेच्या भूमिकेत पूर्ण बुडून गेलेली असते तेंव्हा आपण प्रेमिका असायला हवे हे ती विसरलेली असते. दुर्दैवाने पुरुष आपल्या बायको मध्ये प्रेमिका शोधत असतो ती त्याला मिळत नाही. बऱ्याच वेळेस स्त्रीपुरुषांचे शरीरसंबंध हे "त्यांना हवंय" म्हणून असतात. या कारणाने मग दोघांमध्ये "सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे , मीही तोच तीच तूही प्रीती" आज ती कुठे अशी परिस्थिती येते.रोज न्याहारी दुपारचे आणि रात्रीचे जेवण जसे नित्यक्रमाचे किंवा चाकोरीबद्ध होते तसेच शृंगाराचे होते. म्हणजे तिचा किंवा त्याचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस जेंव्हा नवऱ्याने गजरा, साडी, दागिना आणायचा एक दिवस माजेल घालवायचा कि दुसऱ्या दिवसापासून परत चाकोरी चालू. या स्थितीला कंटाळून
पुरुष शेवटी नाईलाजाने आपल्या मित्र परिवार करियर यात बुडून जातो. जेंव्हा स्त्री चाळिशीला येते तेंव्हा तिला अचानक जाणवू लागते कि आपला सहचर आता आपल्यात रस दाखवत नाही. (पुरुषाच्या करीयरची ती ऐन उमेदीची वर्षे असतात.) दुर्दैवाने या परिस्थितीशी कसे सामोरे जायचे हे बहुसंख्य स्त्रियांना माहित नसते. त्यातून त्या दोन्ही टोकाच्या भूमिका घेतात.
पहिली म्हणजे तुमचे दुसरीकडे "काही तरी" आहे. असा संशय भेटला कि पुरुष अतिशय दुखावला जातो आणि पुरुषाच्या स्वभावानुसार स्वतःला मिटून घेतो आणि बोलणे बंद करतो. मग बायका हे गप्प राहणे म्हणजे "काहीतरी नक्कीच" आहे या संशयाने अजूनच खोदून काढायला लागतात आणि मग त्या जोडप्यातील सुसंवाद बंद होतो.आपापसातील स्पर्श सुद्धा वेगळेच आयाम धारण करतात. यातून चिंता बेबनाव वाढत जातो.
दुसऱ्या टोकाला स्त्रिया एकदम रंभा उर्वशी सारखे करायला लागतात. वेगवेगळी मादक अंतर्वस्त्रे आणून पुरुषाला रिझवण्यासाठी प्रयत्न करतात. सारखे पुरुषाच्या अवतीभवती नाचायला लागतात अशा परिस्थितीत पुरुष नक्की काय हवे आहे हे न समजल्याने अजूनच गोंधळून जातो. आणि इतकी वर्षे दूर असलेली मुलांची आई (बायको) आता वय व्हायला लागलं तर तरुण व्हायचा प्रयत्न करते आहे असे विचार मनात येतात.
सत्य या दोन्ही टोकांच्या मध्ये आहे.
(partner specific erectile dysfunction)हा एक गहन विषय आहे. पुरुषाला स्त्रीबद्दल शारीरिक आकर्षण वाटणे हे संबंध ठेवण्यासाठी आवश्यक आहे. तरुणपणात माणसाची संप्रेरके इतकी प्रबळ असतात कि स्त्री दिसायला कशीही असली तरी संबंध ठेवणे पुरुषाला सहज शक्य होते. जसे जसे वय वाढू लागते तसे संप्रेरकांची मात्रा कमी होत जाते. शिवाय शारीरिक संबंधात नावीन्य राहत नाही.त्यामुळे संबंध ठेवण्याची वारंवारता कमी होऊ लागते आणि तेवढी गरजही वाटेनाशी होते. तारुण्यात स्त्रीने नाकारले तरी पुरुष तिच्या भोवती गोंडा घोळत असतो. जसे वय वाढते तसा पुरुषाचा "अहं" पण वाढत जातो. त्यामुळे बायकोने दुर्लक्ष केले तर पुरुष सहज परत तिच्याकडे जात नाही. मग बायको त्याच्याकडे परत आली तरी हा " अहं" आड येतो.
माझ्याकडे वंध्यत्वाच्या उपचारासाठी येणाऱ्या अनेक "सुदृढ" बायका याना माझ्यात "रसच" वाटत नाही असे सांगताना आढळतात.आम्ही जेंव्हा त्यांना तीन दिवस सलग संबंध ठेवायला सांगतो तेंव्हा नवरे अवघडून म्हणतात कि डॉक्टर तुम्ही पाहता आहेत ना? तिच्याबद्दल मला आकर्षण तर वाटले पाहिजे. चार दिवस थांबून एकदा किंवा फार तर दोनदा संबंध शक्य वाटतात.
क्रमशः

मराठी कथालेखक's picture

14 Feb 2017 - 12:35 pm | मराठी कथालेखक

डॉक्टर साहेब,

आपल्या सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद
या जोडप्याला मूल नाहीये. त्यामूळे आईच्या भूमिकेत शिरुन पतीकडे दुर्लक्ष वगैरे प्रकार होण्याची शक्यता नाही.
पण मला त्याने जे सांगितले त्यातल्या महत्वाच्या गोष्टी अशा की :
लग्न ठरले तेव्हाच दोघांनी तिशी ओलांडली होती
ती फार सुंदर नसली तरी सुडौल , नाकी डोळी नीटशी अशी होती.
पण लग्न ठरल्यानंतर आणि होण्यापुर्वी तिला टायफाईड झाला , त्याने तिच्या सौंदर्यावर काहीसा परिणाम झाला.
लग्नानंतर अगदी थोड्याच काळात तिच्या माहेरी एक अतिशय दुर्दैवी घटना घडली. त्याचा परिणाम म्हणून ती अनेक महिने दु:खी होती. त्याचाहि परिणाम तिच्या सौंदर्यावर झाला. पण या काळात तिने संबंध नाकारले वा टाळले असं झालं नाही.
अहं चा मुद्दा तितकासा लागू वाटत नाही
बाकी तो स्वतःही लग्नापुर्वी काही वर्षे सततच्या अ‍ॅसिडिटीने त्रस्त होता. नंतर त्यातुन बाहेर पडला पण त्यामुळे त्याच्याही प्रकृतीवर परिणाम झाला असावा असे त्याला वाटते. पण त्याचे म्हणणे की "जर एखाद्या सुंदर तरुणीकडे बघून मी विचलीत होतो, पुन्हा पुन्हा तिच्याकडे बघावेसे वाटते तर याचा अर्थ माझे हार्मोन्स तर नीट काम करत आहेत ना ..कदाचित फार तीव्र नसतील हार्मोन्स पण आहेत हे नक्की ".
तशी त्याला विशिष्ट मैत्रीण वा प्रेयसी नाही पण त्याने एकदा बोलून दाखवलेली गोष्ट म्हणजे त्याने कधीच पत्नीशिवाय कुणाशी संबंध ठेवले नाहीत पण एकदा तरी त्याला एखाद्या अतिशय सुंदर (ठीकठाक नव्हे) स्त्रीशी संबंध ठेवायला आवडेल...नेहमीसाठी नाही , पण किमान एकदा. बाकी त्याचे प्रेम पत्नीवरच आहे, ती त्याची चांगली मैत्रीण आहे.
तुम्ही "partner specific erectile dysfunction" म्हंटले तसेच काहीसे असू शकेल. पण मग त्यावर उपाय काय ?

सुबोध खरे's picture

14 Feb 2017 - 1:32 pm | सुबोध खरे

पण एकदा तरी त्याला एखाद्या अतिशय सुंदर (ठीकठाक नव्हे) स्त्रीशी संबंध ठेवायला आवडेल...नेहमीसाठी नाही , पण किमान एकदा.
अहो,
सनी लियोन( किंवा तत्सम मादक आणि सुंदर) सारख्या स्त्रीशी "संबंध" ठेवायला सर्वच पुरुषांना सदा सर्वकाळ आवडेल. पण या विचार सरणीचा त्याच्या लैंगिक आयुष्यावर (जर) परिणाम होत असेल तर त्याला समुपदेशकाकडे जा असाच मी सल्ला देईन.
बाकी इतर काहीच प्रश्न नसेल( त्यांना असणारे वैद्यकीय प्रश्न जुजबी किंवा किरकोळ असे वाटत आहेत) तर अतिपरिचयात अवज्ञा हि शक्यता जास्त असू शकेल. त्यांचे नाते संबंध अति परिचयामुळे "चाकोरी बद्ध" झाले असावेत. मूल नाही रोज दोघांना एकमेकांसाठी वेळ आहेच ( ALWAYS AVAILABLE) म्हणून नावीन्य कमी झालं असण्याची शक्यता आहे.
मनुष्य स्वभाव हा असाच आहे. पाच पक्वान्नांचे जेवण रोज खाणाऱ्या माणसाला कधी तरी एखादा गरीब खात असलेल्या चटणी भाकरीचे आकर्षण वाटते असा हा प्रकार असावा.
सोने सुद्धा कालांतराने त्यावर डाग पडल्यासारखे होते. त्यावर झिलई (पॉलिश) मारल्यावर आतील मूळ सोने झळाळून उठते तसेच नात्यासाठी करणे आवश्यक आहे. वेळ काढून त्या जोडप्याने मधुचंद्रासाठी अज्ञात अनोळखी ठिकाणी जावे असा सल्ला मी देईन.
वि सू -- हा सर्व सल्ला ऐकीव माहितीवर आधारित असल्याने तो स्वतःच्या जबाबदारीवर पारखून घेणे.

मराठी कथालेखक's picture

14 Feb 2017 - 1:37 pm | मराठी कथालेखक

त्या मित्राने शेअर केलेला अजून एक अनुभव इथे लिहितो. हा अनुभव चक्रावून टाकणारा आहे.
वर मी लिहिले आहे की "आपल्याला जास्त इच्छा होत नाही म्हणजे लिबिडो कमी आहे .. आणि हा आपलाच प्रॉब्लेम आहे" असे मानून त्याने एका आयुर्वेदिक डॉक्टरकडे जायला सुरुवात केली होती. त्यांच्या उपचाराने निदान पित्ताचा त्रास तरी बहूतांशी संपला, पण "लो लिबिडोची" समस्या कायम होती.
त्याच दिवसात एका शुक्रवारी तो एका मुलीला भेटला .. मैत्रीण असंही म्हणता येणार नाही इतका त्यांचा अल्प परिचय होता. काही वेळा ते फोनवर बोलले होते, त्यानंतर तिला काही सल्ला हवा होता म्हणून ती त्याला रेस्टॉरंटमध्ये भेटली. ती काही विशेष सुंदर होती असं नाही, पण त्यावेळी त्याला तिचे डोळे , तिचा आवाज आवडला. बाकी बोलणं बहुतांशी औपचारिकच होतं. साधारण तासाभरात भेट आटोपली. त्यानंतर पुढचे दोन दिवस त्याचा पत्नीशी तीन वेळा संबंध आला कारण त्याचा 'लिबिडो' खूप वाढला होता. त्याच्या म्हणण्यानुसार ती एक बर्‍यापैकी अनोळखी मुलगी त्याच्याशी बोलत होती, त्याला भेटली होती या विचाराने तो 'एक्साईट' झाला होता, भेट संपल्यावर त्याच्या मनात काही फँटसी चालू झाल्यात. जर त्या घटनेने दोन दिवसात तीन वेळा त्याने प्रणय केला तर त्याला शारिरीक प्रॉब्लेम आहे असे म्हणता येईल का ?
एक अनोळखी मुलगी जी खरेतर उपलब्ध नाही ती जिंकण्याच्या /तिला मिळवण्याच्या आव्हानाने 'लिबिडो' वाढू शकतो का ?
प्रणयाकरिता काहीतरी 'विशेष मानसिक एक्साईटमेंटची गरज' असणे ही मानसिक समस्या मानता येईल का ? असल्यास काय उपाय असू शकेल ?
कदाचित त्याची पत्नी त्याला नेहमीच 'सहज उपलब्ध' असल्याची जाणीव त्याची एक्साईटमेंट कमी करतअसेल का ? जर तिने असे सहज उपलब्ध असण्यापेक्षा त्याच्याकरिता काहीतरी आव्हान ठेवले की जे त्याने पुर्ण केल्यानंतरच त्याला ती मिळू शकेल अशी त्याची मानसिक पातळीवर खात्री झाली तर त्या आव्हानाने त्याचा लिबिडो वाढू शकेल काय ?

सुबोध खरे's picture

14 Feb 2017 - 1:45 pm | सुबोध खरे

फँटसी किंवा "कल्पना विलास" नावाची एक "सुरस आणि चमत्कारिक" गोष्ट आहे. यात रमल्यामुळे अनेक संसार सुखाचे होतात हे वैद्यकीय सत्य आहे.
बहुसंख्य समुपदेशक आपल्याला हेच सांगतील.

मराठी कथालेखक's picture

14 Feb 2017 - 1:49 pm | मराठी कथालेखक

हे समुपदेशक म्हणजे नेमके कोण ? marriage counselor की आणखी कुठल्या प्रकारचे counselor असतात ? [म्हणजे कशा प्रकारे शोधावे म्हणून विचारत आहे]

रागिणी९१२'s picture

14 Feb 2017 - 1:08 pm | रागिणी९१२

मुलं लहान असतात तेव्हाही स्त्रियांना तेवढंच लैगिक इच्छा असते. पण मुलं लवकर झोपत नाहीत. त्यांची शी-शू , त्याच्या भुकेच्या वेळा सांभाळणं, आजारपण काढणं यात ती गुरफटून जाते किंबहुना ते तिच्यासाठी प्राधान्य देऊन करायचं काम असत. मुलं शाळेत जाऊ लागली तरी त्याचा अभ्यास, ऍक्टिव्हिटीस, आजारपण आणि सासरच्या लोकांची उस्तवार कोण करत? शिवाय दमछाक करणारी नोकरी आणि घराची कामे-जवाबदारी असतेच. किती नवरे या सगळ्या कामांत आपल्या बायकोला मदत करतात, त्यांना समजून घेतात? मुलांची माया-काळजी आणि नवऱ्यावरचं प्रेम-शारिक ओढ यात तिची होणारी फरफट किती नवऱ्यांना जाणवते. बायको आपल्याकडे लक्ष देत नाही म्हणून फक्त मोकळं व्हायचं. मुलं काय फक्त बायकोचीच असतात काय? मुलांचं नाही नीट केलं तरी हेच नवरे लोक आपल्या बायकोला नाव ठेवायला मोकळे होतात. जेव्हा स्त्रिया जवाबदारीतून थोडासा मोकळा श्वास घेतात, तेव्हा त्यांनी स्वतःसाठी जगायचं ठरवलं, स्वतःच हरवलेलं सुख उपभोगायचा ठरवलं तर त्या चेकाळलेल्या ठरतात का? त्यांना समजून घेणं खरोखर पुरुषासाठी एवढं अवघड आहे का?
चाळीशीत स्त्रिया बेढब, कुरूप दिसतात मग पुरुष काय मदनाचे पुतळे दिसतात काय? सुटलेलं पोट, टक्कल, सिगारेटने काळे पडलेले ओठ-पिवळे दात अशा किती तरी गोष्टी पुरुषाला अनाकर्षक बनवतात. नवरा कसाही दिसो, त्याचा परफॉमन्स कितीही वाईट असो, काही अपवाद वगळता सर्वसाधारणपणे बायका आपल्या नवऱ्यावरचं लट्टू असतात. कारण 'प्रेम' नावाची एक महत्वाची गोष्ट असते. फक्त पुरुषाला चाळीशीत पण नवयौवना अप्सरा हवी असते. ज्या पुरुषांची हि मनोवृत्ती आहे, ते स्वतःही कधी सुखी-समाधानी होत नाहीत आणि आपल्या बायकोलाही सुख-समाधान लाभून देत नाहीत. ज्या यशस्वी वाटेवर तो चालत आहे, त्याच्या मागे कुणीतरी होत, हे सोयीस्करपणे फक्त पुरुषालाच विसरता येत.

मराठी कथालेखक's picture

14 Feb 2017 - 1:41 pm | मराठी कथालेखक

तुमचे म्हणणे बरोबर आहे. पुरुषाने स्त्रीला समजून घेणे गरजेचे आहेच.
अनेक जबाबदार्‍या आणि सतत कामात व्यस्त असल्याने स्त्री प्रणयात रस घेवू शकत नसली तर त्याकरिता तिला दोष देता येणार नाहीच.

सुबोध खरे's picture

14 Feb 2017 - 1:42 pm | सुबोध खरे

रागिणी ताई
तुम्ही एकदम असा आक्रमक पवित्रा घेऊ नका. मी फक्त नाण्याची एक बाजू मांडली आहे. तुम्ही म्हणता ते सर्व सत्य आहेच.
केवळ महिन्याला पगार बायकोच्या तोंडावर फेकला कि उनाडक्या करायला मोकळे असणारे पुरुष शेकड्या हजारांनी सापडतील. बायकोला "समजून घ्यायचे" म्हटले तर याना घरात काम करावे लागेल त्या ऐवजी टर्रेबाजी केली कि त्यातून सुटका मिळते.
बायकांना झोपेची गोळी समजणारे केवळ आपला कार्यभाग उरकला कि घोरायला लागणारे पुरुष कमी आहेत का?
येथे मी उत्तर दिले आहे ते विविक्षित प्रश्नाचे. मी कोणाचीही बाजू घेत नाही कि समर्थनही करीत नाही.
बाकी
पुरुष काय मदनाचे पुतळे दिसतात काय?
संबंध ठेवण्यासाठी स्त्रीला पुरुष सारखे "सक्रिय" असावे लागत नाही. निष्क्रिय राहून चालते. बायको थंड गार ठोकळ्यासारखी पडून राहते अशी तक्रार करणारी माणसे कमी नाहीत. पण अशा बायकांना हा मुले होतातच.
MAN GIVES LOVE TO GET SEX
AND
WOMAN GIVES SEX TO GET LOVE
हे बऱ्याच अंशी सत्य आहे. स्त्रियाना "काम" पेक्षा "प्रेम" जास्त भावते. पुरुष कोणत्याही स्त्रीबरोबर कोरडे पणे "रत" होऊ शकतो पण स्त्री प्रेम नसलेल्या पुरुषाबरोबर सहजासहजी संबंध ठेवणार नाही.

चित्रगुप्त's picture

14 Feb 2017 - 7:06 pm | चित्रगुप्त

इथे मी या प्रकरणाबाबदची आणखी एक शक्यता मांडू इच्छितो.
हल्ली नवीन तंत्रज्ञानामुळे पूर्वीच्या पिढ्यांना बहुशः अनुपलब्ध असलेल्या रति-चित्रफिती आदि साहित्य सहजी उपलब्ध झालेले आहे. सदर व्यक्तीला ते बघण्याची जर सवय लागलेली असेल तर त्यातील नित्य नव्या अष्टांगपुष्टांग ( खास प्राचीन मराठी साहित्यातील शब्द ) मदालसांच्या बहुरंगी बहुढंगी कामक्रिडा बघण्यात-- 'रतिरंगी रंगले'लेल्या चित्तवृत्तींना, त्या मदालसांच्या तुलनेत सामान्य भासणारी तीच ती पत्नी नीरस वाटू लगली असेल. वरील एक प्रतिसादात सांगितल्याप्रमाणे एका नवीन तरुणीशी ओळख झाल्यावर त्याच्या कामावेगाला आलेला बहर (त्या प्रसंगी बहुधा त्याच्या मनःचक्षूंसमोर ती नवतरूणी असावी) हे याचेच द्योतक आहे, असे वाटते.

सुबोध खरे's picture

14 Feb 2017 - 7:45 pm | सुबोध खरे

रति-चित्रफिती किंवा उत्तान साहित्य पाहिल्याने नाते संबंधात दरी निर्माण होऊ शकते हे सिद्ध झालेले आहे.
अशा साहित्यात दाखविलेल्या स्त्रिया आणि पुरुष हे तारुण्याने मुसमुसलेले आणि रती / मदनाचे अवतार असतात. ते पाहिल्यामुळे स्त्रीला आपण सौंदर्यात/ रतिक्रीडेत अपुरे आहोत याची सतत जाणीव होत राहते आणि यामुळे चिंताग्रस्तता (anxiety) निर्माण होते.
अशा उत्तान साहित्यात दाखवल्याप्रमाणे विवाहबाह्य संबंध यात काही गैर नाही असे स्त्रियांना (३०%) आणि पुरुषांना (७० %) वाटू लागते. त्यामुळे बाहेरच्या स्त्रीकडे चोरून पाहणारे पुरुष राजरोसपणे पाहू लागतात आणि त्यात काही गैर नाही असे वाटू लागते.
आपला नवरा असे उत्तान साहित्य पाहत असेल असे बायकोला समजते त्यातून त्या स्त्रीला अपुरेपणा, न्यूनगंड आणि नवर्याबद्दल दुरावा निर्माण होतो. आपल्या नात्यात जो एक संपूर्ण खाजगीपणा ( exclusiveness) असतो (म्हणजे माझा नवरा हा "फक्त" माझाच आहे) तो नष्ट झाल्याची भावना निर्माण होते आणि हि भावना नवऱ्यावर असणाऱ्या प्रेमाचा पाया आहे. हा पायाच हादरतो.
यामुळे अगोदर जी स्त्री नवऱ्याला किंवा स्वतःला आवडेल असे सजणे, नटणे वा तयार होणे करीत होती. तिला त्यात फोलपणा वाटू लागतो आणि मग यातून संबंधात अजूनच दरी वाढू लागते.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

14 Feb 2017 - 8:45 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

मी या आधी बर्याचदा आंतरजालावर लिहीले आहे की पुरुषाचा सेक्स ड्राईव्ह इमोशनल असतो तर स्त्रीचा इंन्स्ट्रुमेंटल असतो.

संजय क्षीरसागर's picture

14 Feb 2017 - 8:50 pm | संजय क्षीरसागर

.

संजय पाटिल's picture

15 Feb 2017 - 12:50 pm | संजय पाटिल

होय.....

पिलीयन रायडर's picture

15 Feb 2017 - 2:02 am | पिलीयन रायडर

मला नाही वाटतं हा काही फार मोठा किंवा जगावेगळा प्रश्न आहे. नवरा बायकोचं एकमेकांवर कितीही प्रेम असलं तरी रोजचं रहाटगाडगं संथपणे तसंच वर्षानुवर्ष चालु असेल तर त्याचा कंटाळा येणारच. शिवाय शरीराचं आकर्षण असं कितीवेळ टिकणार? नवरा बायको म्हणुनच नाही तर कोणत्याही व्यक्तीशी संबंध ठेवले तरी कधी ना कधी ते सुद्धा जुने होणारच. पहिल्या स्पर्शाच्या वगैरे रोमँटिक भावना २५ वर्ष नाही येऊ शकत हे सत्य आहे.

शिवाय प्रश्न जर "बायको सोबतचे नाते" हा असेल तर "एकदा तरी दुसर्‍या मुलीसोबत संबंध ठेवणे" हे त्याचं भलतंच सोयीस्कर उत्तर आहे! एकदा मूळ प्रश्न तपासुन बघायला हवाय ह्या मनुष्याने! कोणत्याही वयातल्या स्त्री अथवा पुरुषाला कुणी तरी आपल्याला अजुनही भाव देतंय ही भावनाच हवीहवीशी वाटते. ते अत्यंत स्वाभाविक आहे. पण ते तेवढ्यापुरतंच असतं. तुमचा मित्र "ओपन मॅरेज" मध्ये नाही असं गृहीत धरुन लिहीतेय.

मूळात ज्या व्यक्तिवर आपलं मनापासुन प्रेम असतं, त्याच्या सोबत असणं हीच आनंदाची गोष्ट असते. वयासोबत प्रेम सुद्धा मुरत जायला हवं. शरीराच्या आकर्षणाच्या पलीकडे जाऊनही पुष्कळ गोष्टी असतात आयुष्यात. तीशी-चाळीशी नंतर त्याच्या पलीकडे जाऊन नातं आपोआपच घट्ट होत जातं. साध्या रोजच्या रुटीनमध्ये १० मिनिटं गप्पा मारण्यापासुन ते अगदी वर्षानुवर्ष ठरवुन एखादी ट्रिप दोघांनीच करण्यापर्यंत अनेक गोष्टींमधुन आपण जोडीदाराशी जोडले जात असतो. शरीराचा संबंध हा काही एकमेव निकष नाही प्रेमाचा. समजा ते नाही घडलं काही दिवस तरी हबकुन जाण्यासारखं काही नसतं. आयुष्यातले काही इतर स्ट्रेस कदाचित इथे परिणाम करत असतील. कदाचित करियर मध्ये काही महत्वाचे टप्पे चालु असतील. तो तो काळ गेला की येतीलही गोष्टी नॉर्मलवर.

खरं तर एका पॉईंटनंतर समोरच्याचं शरीर आणि त्यातल्या तॄटी दिशेनाशा व्हायला हव्यात. प्रेम हे निव्वळ शरीरावर केलं असेल आणि त्यापलीकडे जाऊन "कनेक्शन" तयारच झालं नसेल तर कदाचित असं होऊ शकतं. पण मी माझ्या आई-वडीलांच्या वयातल्या अनेक जोडप्यांना एकमेकांवर बेहद्द खुशही पाहीलय. त्यांच्या लक्षातही येत नसावं की बाबा आपल्या नवर्‍याला टक्कल पडलंय किंवा बायकोचं पोट सुटलंय. किंवा येतही असेल, पण ते कशाच्या आड येत नाही. आता कदाचित नवर्‍याच्या हातात हात घेतल्यावर पोटात खड्डा पडत नसेल, गुदगुल्या वगैरे होत नसतील, पण नात्याच्या ह्या टप्प्यावर तो जगातला सर्वात आश्वासक स्पर्श झालेला असतो...

तूमच्या मित्राचं त्याच्या बायकोवर अगदी मनापासून प्रेम असेल ना, तर त्याला म्हणावं काही दिवसं शाररिक आकर्षण वगैरे राहु दे. दोघं मिळुन काही तरी वेगळं करा रुटीनपेक्षा.. आपोआप बरंच काही ताळ्यावर येण्याची शक्यता आहे. किंवा असंही असेल की एकमेकांशिवाय दुसरं माणुस नाही आयुष्यात. तसं असेल तर थोडं दूर राहुन काही तरी करा. आपापल्या छंदाला वेळ द्या. आपल्यात शाररिक आकर्षण नाही ह्याचा विचार करत बसण्यापेक्षा दुसरं काहीही करा. नक्की फरक पडेल.

सुबोध खरे's picture

15 Feb 2017 - 11:13 am | सुबोध खरे

holding-loved-ones-hand-can-calm-jittery-neurons
http://www.nytimes.com/2006/01/31/health/psychology/holding-loved-ones-h...

संजय क्षीरसागर's picture

15 Feb 2017 - 12:26 pm | संजय क्षीरसागर

मूळात ज्या व्यक्तिवर आपलं मनापासुन प्रेम असतं, त्याच्या सोबत असणं हीच आनंदाची गोष्ट असते. वयासोबत प्रेम सुद्धा मुरत जायला हवं. शरीराच्या आकर्षणाच्या पलीकडे जाऊनही पुष्कळ गोष्टी असतात आयुष्यात. तीशी-चाळीशी नंतर त्याच्या पलीकडे जाऊन नातं आपोआपच घट्ट होत जातं. साध्या रोजच्या रुटीनमध्ये १० मिनिटं गप्पा मारण्यापासुन ते अगदी वर्षानुवर्ष ठरवुन एखादी ट्रिप दोघांनीच करण्यापर्यंत अनेक गोष्टींमधुन आपण जोडीदाराशी जोडले जात असतो. शरीराचा संबंध हा काही एकमेव निकष नाही प्रेमाचा.

१०० !

खरं तर एका पॉईंटनंतर समोरच्याचं शरीर आणि त्यातल्या तॄटी दिशेनाशा व्हायला हव्यात. प्रेम हे निव्वळ शरीरावर केलं असेल आणि त्यापलीकडे जाऊन "कनेक्शन" तयारच झालं नसेल तर कदाचित असं होऊ शकतं.

१,००० !

आता कदाचित नवर्‍याच्या हातात हात घेतल्यावर पोटात खड्डा पडत नसेल, गुदगुल्या वगैरे होत नसतील, पण नात्याच्या ह्या टप्प्यावर तो जगातला सर्वात आश्वासक स्पर्श झालेला असतो...

१०,००० !

तूमच्या मित्राचं त्याच्या बायकोवर अगदी मनापासून प्रेम असेल ना,.....

लावली ना वाट नेमका मुद्दा पकडून ! गेली आता जेनरिक मजा, झाला व्यक्तिगत प्रश्न !!

संदीप डांगे's picture

15 Feb 2017 - 11:24 am | संदीप डांगे

लेख आणि प्रतिसाद बरेचदा परत परत येऊन वाचले. तुमच्या मित्राची मनोदशा मलातरी कळत नाहीये. बर्‍याच जणांनी म्हटले तसे अतिपरिचयात अवज्ञा असू शकेल.

मराठी कथालेखक's picture

15 Feb 2017 - 3:55 pm | मराठी कथालेखक

तो ही त्याच गोंधळात आहे. मलाही आता वाटतंय त्याने समुपदेशकाकडे जायला हवं.
वर काही जणांनी 'समुपदेशक' म्हंटले ते marriage counselor की psychiatrist की आणखी कोणते वेगळे counselor असतात ?

मराठी कथालेखक's picture

15 Feb 2017 - 12:06 pm | मराठी कथालेखक

सर्वांना मनापासून धन्यवाद.
सगळ्यांच्या काही मुद्द्यांची उत्तरं इथे लिहितो, काही नवीनही मुद्दे आहेत जे आधी मांडले नव्हते.

शिवाय प्रश्न जर "बायको सोबतचे नाते" हा असेल तर "एकदा तरी दुसर्‍या मुलीसोबत संबंध ठेवणे" हे त्याचं भलतंच सोयीस्कर उत्तर आहे!

पिराजी, हे उत्तर आहे असं त्याचं म्हणणं नाही. खरतर हाही एक प्रश्नच आहे, किंवा प्रश्नातला एक मुद्दा.

शरीराचा संबंध हा काही एकमेव निकष नाही प्रेमाचा. समजा ते नाही घडलं काही दिवस तरी हबकुन जाण्यासारखं काही नसतं.

मान्य आहे, पण इथे तिला अपेक्षा आहे पण त्याच्याकडून होत नाही म्हणून तो चिंतीत आहे. शिवाय दुसर्‍या काही कारणाने ती स्त्रीरोगतज्ञाकडे गेली असता तिने त्यांना सांगितले तेव्हा डॉक्टरने हे काही तरी गंभीर आहे , आठवड्यात किमान दोनदा संबंध यायला हवेत वगैरे असं तिला सांगितलं. आता माझा मित्रही त्याच डॉक्टरकडे गेला, त्यांनी काही औषधे दिलीत , पंधरा-वीस दिवस झाले असतील, पण त्याला अजूनतरी फायदा झालेला नाही. पुन्हा जाईल तेव्हा तो अजून विस्ताराने डॉक्टरांशी बोलेलच.

डॉक्टरसाहेब , चित्रगुप्तजी,
माझ्या मित्राला xxx व्हिडीओ बघायला आवडत नाही. तो म्हणतो त्याने ते फारसे बघितलेले नाहीतच. अजून एक वेगळा मुद्दा आहे की त्याला पुर्ण नग्नता फारशी आवडत नाही. त्याला आवडणारे ग्लॅमरस फोटोज म्हणजे जास्तकरुन मॉडेल्सचे , नायिकांचे झिरझिरीत , चमकदार कपड्यातले किंवा फारतर बॅकलेस वगैरे आहेत.
पुर्ण नग्नतेचा तिटकारा असणे हे पण एक प्रश्नाचे कारण असू शकेल काय ?
मालिका , सिनेमातले रोमॅन्टिक सीन्स अनेकांना आवडतात. पण मागे एकदा एका मालिकेतील रोमॅन्टिक सीन्स फार जास्त आवडतात , थ्रिलिंग आणि एक्साईटिंग वाटतात असे तो म्हणाला होता. त्याने त्यातील एक दृश्य मला दाखवले, खरे तर त्यात फार विशेष असे काहीच नव्हते. फक्त त्याचे वेगळेपण असे होते की ते दीर आणि वहिनी यांच्यातले दॄश्य आहे . पण त्याने ते अनेकदा आवडीने पाहिले, त्याचे म्हणणे की "मी याच भागापासून ही मालिका बघायला सुरु केली होती, मला कथानक काहीच माहित नव्हते, पण तो भाग संपताना जेव्हा नायक आपल्या वहिनीला प्रेमाने स्पर्श करतो तेव्हा एकदम धक्का बसला, थ्रिलिंग वाटले, त्याचे तिला स्पर्श करणे, तिचा मृदू आवाज , हसत हसत अचानक भावूक होणे, सोबतचे हळूवार संगीत ह्या गोष्टी मला फार आवडल्यात. त्यामुळे मी हा सीन अनेकदा पाहिला"
(या भागाची लिंक , तो म्हणतो ते दृश्य शेवटच्या दोन मिनटात आहे..अगदी उघडपणे बघू शकता.. काही रिस्क नाही :) )

टफी म्हणतात " पुरुषाचा सेक्स ड्राईव्ह इमोशनल असतो तर स्त्रीचा इंन्स्ट्रुमेंटल असतो." , संक्षी म्हणताते उलटे आहे. बर्‍याच जणांचे असेच मानणे संक्षी प्रमाणेच असते. पण एखाद्या पुरुषाच्या बाबत अपवाद असू शकतो का ? (म्हणजे ट्फी म्हणतात तसा "सेक्स ड्राईव्ह इमोशनल असणे" )

पिलीयन रायडर's picture

15 Feb 2017 - 7:44 pm | पिलीयन रायडर

वरकरणी नवरा बायकोच्या नात्यात आलेला तोचतोचपणा अशा अर्थाची ही समस्या वाटली होती. पण आता मला वाटतंय की हे बरंच गंतागुंतीचं प्रकरण आहे. इथे तज्ञांची मदत घेतलेली उत्तम.

अवांतरः- प्रश्न तुमचाय की तुमच्या मित्राचा आहे ह्यात मलाही काही इंटरेस्ट नाही. पण एकाच गोष्टीची मजा मलाही वाटली.. you know awfully a lot about your friend!

संदीप डांगे's picture

15 Feb 2017 - 7:59 pm | संदीप डांगे

काही मोठी गोष्ट नाही हो ताई, घनिष्ठ मित्रांमध्ये असे प्रॉब्लेम डिटेलमध्ये डिस्कस होतात, माझाही एक मित्र आहे चार वर्षाने लहान, त्याच्या सेक्सुअल लाईफ बद्दल लग्नाच्यावेळी बरंच डिस्कस करायचा, फक्त खात्री हवी कि आपला मित्र कुठे दुरान्वयेही ह्या गोष्टी ओपन करणार नाही, आपल्याला ऑकवर्ड वाटेल असं काही करणार नाही,

माझ्या तर एका जवळच्या नात्यातल्या स्त्रीने तिचे सेक्सुअल लाईफ च्या अडचणी माझ्याशी डिस्कस केलेल्या,

खात्रीची अशी माणसे फस्ट कौंसलर असणे आवश्यक असते, अगदी तज्ञ सल्ला देऊ शकत नसली तरी आपलं मन मोकळं करू शकणे ह्यासाठी अशी व्यक्ती जवळपास असणे एक मोठी उपलब्धी असते.

पिलीयन रायडर's picture

15 Feb 2017 - 8:47 pm | पिलीयन रायडर

हो आणि असे मित्र-मैत्रिणी असतात हे मान्य आहेच. पण ह्यामुळे मक ह्यांच्याबद्दल गैरसमज होत असावा कदाचित.

पण पुन्हा एकदा.. की फर्क पेंदाए! प्रश्न महत्वाचा, कुणाचाय हे महत्वाचं नाही.

फक्त त्यांनी नक्की समस्या काय आहे हे एका दमात सांगावं. कारण आता त्यांनी एक नवीन मुद्दा आणलाय, प्रूड असण्याचा.

पीके's picture

15 Feb 2017 - 1:04 pm | पीके

लेखक महाशय मित्राचा प्रॉब्लेम म्हणुन स्वतःचीच समस्या मांडत असावेत काय?

संजय क्षीरसागर's picture

15 Feb 2017 - 1:21 pm | संजय क्षीरसागर

आता आली ना उघड्यानं अंघोळ करायची पाळी !

मराठी कथालेखक's picture

15 Feb 2017 - 1:32 pm | मराठी कथालेखक

डॉक्टरसाहेब , पिराजी ई समंजस सदस्य इथे समस्येबद्दल बोलत आहेत, त्यांच्या परीने मदत करत आहेत.

बाकी तुमचं चालू देत रेनकोट , आंघोळ ई....

मराठी कथालेखक's picture

15 Feb 2017 - 1:29 pm | मराठी कथालेखक

समस्येबद्दल बोलणं जास्त योग्य राहिल असं नाही का वाटत ? मित्र खरच आहे का ? असल्यास कोण ? सिद्ध करणे वगैरे महत्वाचे आहे का ?

नाही तर यथावकाश रेनकोट निघतोच आणि उगीच कडेकडेनं वाट काढण्यात नेमकं उत्तर मिळण्याची शक्यताही शून्य.

ते बोलून दाखवायचं थोडीच आहे. तुम्हाला काही सल्ला देता येत असेल तर द्या नाहीतर शांतपणे वाचत बसा. बाकी करतात तसे..:)
पण त्यांच्या मित्राची समस्या रोचक आहे. वाचतोय.

संदीप डांगे's picture

15 Feb 2017 - 2:11 pm | संदीप डांगे

संक्षि, थोडीतरी तहजीब असली पाहिजे ह्याबद्दल काय मत?

समस्या कोणाला आहे ह्यात रस असावा का समस्या काय आहे ह्यात?
कोणाला आहे हे कळल्याने समस्येच्या चर्चेत नेमके काय मूलभूत बदल घडून येतात जे उपायांवर परिणाम करतात?

संजय क्षीरसागर's picture

15 Feb 2017 - 2:44 pm | संजय क्षीरसागर

`असं नसण्याची शक्यता आहे', `तसं नसेलंच असं सांगता येत नाही', `पुढच्या वेळी तो डॉक्टरकडे गेला की त्याला विचारुन सांगतो'.... असल्या संदिग्धतेमुळे प्रामाणिकपणे उत्तर देणार्‍या सदस्यांचा संभ्रम तर होतोच शिवाय कालापव्यय होतो तो वेगळाच. या उप्पर, कोणत्याही लपवाछपवीच्या खेळात नेमकं उत्तर मिळत नाही हे नक्की.

संजय क्षीरसागर's picture

15 Feb 2017 - 4:50 pm | संजय क्षीरसागर

इथे ३०,००० पैकी स्वतःच्या नांवानं लिहीणारे दहा सुद्धा सदस्य नसावेत. संकेतस्थळाच्या पॉलीसीप्रमाणे टोपणनांवाचा भक्कम रेनकोट घालून बाकीचे इथे वावरतात, म्हणजे कुणाची खरी आयडेंटेटी डिस्क्लोज होण्याची भीतीच नाही. इतक्या सोयी असल्यावर मग सरळ प्रश्न मांडायला काय अडचणे ?

संदीप डांगे's picture

15 Feb 2017 - 5:12 pm | संदीप डांगे

प्रश्न खऱ्या खोट्या आयडेंटीटीचा नाहीच! इथे मांडलेले वैयक्तिक प्रश्न नंतर लोक स्कोरसेटलींग साठी वापरतात, ते एक असो.

तसेही खरं नाव माहित नसलेल्या आयडीने माझा स्वतःचा किंवा माझ्या मित्राचा प्रश्न असं म्हटल्याने काय फरक पडतो?

एखाद्याला त्रयस्थ समस्या जमतच नसेल तर अशा चर्चेत भाग घ्यायची जबरदस्ती नाही, उगा खोदून खोदून, किंवा तिरकस टोमणे मारून 'लेखक आपली समस्या मित्राच्या नावावर लपवतोय: असे विषयाशी असंबंधीत व अनाबश्यक मुद्दे चर्चेत आणणे सुसंस्कृततेच लक्षण वाटत नाही.

सुबोध खरे's picture

15 Feb 2017 - 5:55 pm | सुबोध खरे

माझा स्वतःचा किंवा माझ्या मित्राचा प्रश्न असं म्हटल्याने काय फरक पडतो?
अगदी बरोबर
बहुसंख्य माणसाना आपले लैंगिक किंवा मानसिक प्रश्न सहसा स्वतःची ओळख उघड करून विचारणे कठीण जाते यात संकोच भीती आणि लोकापवाद या पैकी एक किंवा अनेक गोष्टींचा समावेश असतो?
एखादी स्त्री आपली खरी ओळख दाखवून डॉक्टरला उघडपणे मला गर्भाशयात गोळा आहे तर मला मूल होण्यात काही प्रश्न येईल का?
किंवा एकदा पुरुष आपली खरी ओळख दाखवून मी द्विलिंगी (bisexual) आहे त्यामुळे मला लग्नानंतर काही प्रश्न येईल का असा प्रश्न उघडपणे समुपदेशकाला करेल का?
ज्या संस्थळावर किमान काही लोकांना तरी आपली खरी ओळख असेल तर कोण आपले वैयक्तिक लैंगिक किंवा मानसिक प्रश्न विचारेल? आणि तसे ते विचारू सुद्धा नयेत. कारण एखादा आय डी समलिंगी आहे असे समजल्यावर किती लोक त्याच्याशी पूर्वीसारखीच वागणूक ठेवू शकतील याची मला शंकाच आहे.

रागिणी९१२'s picture

15 Feb 2017 - 3:09 pm | रागिणी९१२

अगदी अगदी, पिलियन रायडर म्हणत आहेत तेच म्हणायचं होत. प्रत्येक वाक्याशी सहमत.

खरं प्रेम असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी गौण ठरतात. अगदी " पुरुषाचा सेक्स ड्राईव्ह इंन्स्ट्रुमेंटल असतो तर स्त्रीचा इमोशनल असतो" तरीही. वैद्यकीय कारणांनुसार स्त्री आकर्षक असेल तर पुरुष उद्यपीत होतो, हे खरं असेलही तरी ते नुसते नर-मादी म्हणून जवळ येत नाहीत तर ते एकमेकांत गुंतलेले सहचारी असतात.
ज्या पुरुषांना मुल होण्यासाठी सुद्धा बायकोशी संबंध ठेवणे अवघड जाते-बायकोची शिसारी येते, त्यांनी उगाच बळेबळे संसार करण्यापेक्षा विभक्त व्हावे. कारण या लोकांची एकमेकांत पुरेशी भावनिक गुंतवणूक झालेलीच नाही. अश्या मानसिकतेत पोर जन्माला घालून त्यांची फरफट कशाला हवी?

"दुसर्‍या काही कारणाने ती स्त्रीरोगतज्ञाकडे गेली असता तिने त्यांना सांगितले तेव्हा डॉक्टरने हे काही तरी गंभीर आहे , आठवड्यात किमान दोनदा संबंध यायला हवेत वगैरे असं तिला सांगितलं"
हि समस्या/उपाय मुल होण्यासंबंधी असेल तर त्यासाठी बाकीचेही उपाय आहेत की. त्यासाठी रोज संबंध ठेवण्याची गरज नाही. अधिक माहितीसाठी इंटरनेट आहेच. आणि ते काही फारसे महागडे उपचार नव्हेत. चांगल्या स्त्री रोग तज्ज्ञांची भेट घ्या. अन्यथा दुसरे कारण असल्यास हा फारच मजेशीर उपाय वाटत आहे.

मराठी कथालेखक इतरांच्या प्रतिसादावर एकंदर कल पाहून भर टाकत चालले आहेत, त्यावरून धागा प्रतिसादाने भरभरून वाहत रहावा असे त्यांना वाटते हि एक शंका येत आहे. शिवाय एकतर हा मित्र फार म्हणजे फारच जवळचा आहे की त्याने इतक्या खाजगीतल्या गोष्टी उघड केल्या आहेत. बिचारे हे मराठी कथालेखक वारंवार त्या मित्राला फोन करून अधिकच तपशील विचारत असावेत.

मराठी कथालेखक's picture

15 Feb 2017 - 3:49 pm | मराठी कथालेखक

मराठी कथालेखक इतरांच्या प्रतिसादावर एकंदर कल पाहून भर टाकत चालले आहेत, त्यावरून धागा प्रतिसादाने भरभरून वाहत रहावा असे त्यांना वाटते हि एक शंका येत आहे.

मी 'टीआरपी' साठी धागा काढला आहे असे मानण्याचे आणि तसे व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आपणास आहेच.
पण धागा प्रतिसादाने भरभरुन रहावा असे मला वाटण्याचे काहीही कारण नाही . पण जर नवीन महत्वाचे मुद्दे चर्चेत येत असतील, उपयुक्त माहितीची देवाण घेवाण होत असेल तर चांगलेच.
बाकी ही माझ्या मित्राची समस्या असली तरी तशीच समस्या कमी अधिक फरकाने जगात अनेकांना असू शकते. त्या अर्थाने ही समस्या 'जनरिक' आहे असे मानून आधी मांडला होता. म्हणून सगळे तपशील एकदमच दिले नव्हते. पण जनरिक प्रश्नावर विचार करतानाही एक उदाहरण म्हणून एकाच्या व्यक्तिगत प्रश्नाचा विचार करायला हरकत नाही असा विचार करत पुढे त्या मित्राच्या समस्येतील तपशील, विशिष्ट पैलू मांडत गेलो.

शिवाय एकतर हा मित्र फार म्हणजे फारच जवळचा आहे की त्याने इतक्या खाजगीतल्या गोष्टी उघड केल्या आहेत. बिचारे हे मराठी कथालेखक वारंवार त्या मित्राला फोन करून अधिकच तपशील विचारत असावेत.

मी 'बिचारा' आहे का ? मित्र जवळचा आहे का ? मी त्याला फोन करुन विचारत आहे का ? की मी रेनकोट घालून आंघोळ करत आहे वगैरे वगैरे गोष्टींनी चर्चेला फरक पडण्याचे कारण नाही, यातले अधिक तपशील देण्यात मला रस नाही. असो.

@रागिणी ताई
ज्या पुरुषांना मुल होण्यासाठी सुद्धा बायकोशी संबंध ठेवणे अवघड जाते-बायकोची शिसारी येते, त्यांनी उगाच बळेबळे संसार करण्यापेक्षा विभक्त व्हावे. कारण या लोकांची एकमेकांत पुरेशी भावनिक गुंतवणूक झालेलीच नाही. अश्या मानसिकतेत पोर जन्माला घालून त्यांची फरफट कशाला हवी?

असेच असते असे नाही. सरसकटीकरण नको एवढेच म्हणणे आहे.
मी हिरानंदानी रुग्णालयात वंध्यत्व वर काम करीत असताना एक जोडपे आले होते त्यांना मूल होण्यासाठी कृत्रिम शुक्राणूरोपण ( artificial insemination) करून हवे होते. मी त्यांचे सर्व कागद पत्र पहिले तेंव्हा लक्षात आले कि नवर्याच्या शुक्राणू मध्ये कोणतीच कमतरता नव्हती किंवा त्या स्त्री मध्येहि कोणतीही समस्या नव्हती. त्यांना सात वर्षाची एक गोंडस मुलगीही होती. मी त्यांना हसत हसत विचारले कि तुम्ही कृत्रिम शुक्राणूरोपणा साठी का जात आहात. नैसर्गिक पद्धत का वापरात नाहीत? यावर या बाई म्हणाल्या डॉक्टर आमच्या दोघांमध्ये कोणतेच शारीरिक संबंध नाहीत. आणि आम्हाला त्याची कोणतीही समस्या नाही. हि मुलगी सुद्धा आम्हाला लग्नानंतर सहा वर्षांनी कृत्रिम शुक्राणूरोपण ( artificial insemination)नेच झाली आहे. गेली सात वर्षे आमच्यात शारीरिक संबंध नाही आणि आम्हाला त्यात काहीही गैर वाटत नाही. आमच्या मुलीला एखादे भावंडं हवे म्हणून आम्हाला हे दुसरे मूल हवे आहे. इतकेच.डॉक्टर असूनही तेंव्हा मला फार आश्चर्य वाटले.
पुढे सात आठ महिने मी त्यांना पाहत होतो( गरोदरपणाची सोनोग्राफीसाठी)
तेरा वर्षे त्या जोडप्यात कोणताही शारीरिक संबंध नाही तरीही त्यांचे आपसातील संबंध व्यवस्थित होते आणि त्या मुलीच्या पालनपोषणात कोणतीही कमतरता आम्हाला दिसून आली नाही.
असेच अजून एक माझ्या माहितीतील उदाहरण म्हणजे एका स्त्रीला नवर्याच्या शुक्राणूंची ऍलर्जी होती. त्यामुळे त्यांच्यात सुरुवातीला जेमतेम शरीर संबंध झाले.शरीरसंबंधानंतर त्या स्त्रीचे मायांग पूर्ण सुजून येत असे. काही दिवस उपचाराने त्यांना एक मुलगी झाली यानंतर वर्षानुवर्षे त्या जोडप्यात कोणताच शारीरीक संबंध नव्हता. परंतु आई वडील आणि मुलगी यांचे संबंध अतिशय चांगले असलेले मी कित्येक वर्षे पाहत आलो आहे.
हि दोन्ही मीही चक्षुर्वैसत्यं पाहिलेली उदाहरणे आहेत.

रागिणी९१२'s picture

17 Feb 2017 - 1:12 pm | रागिणी९१२

नक्कीच तुम्ही डॉक्टर असल्यामुळे तुम्हाला अश्या प्रकारच्या 'केसेस' भेटणं अवघड मुळीच नाही. तुम्ही या केसेस सांगितल्या आहेत त्यांचं सरासरी प्रमाण किती असेल?
याच धाग्यावरच नाही तर मागे एक 'पॉर्न' या विषयावरचा धागा होता. त्यातले तुमचे प्रतिसाद अजूनही कित्येक जणांच्या लक्षात असतील.
त्यातही तुम्ही असं म्हटलं होतं कि "अनाकर्षक बायकोकडे बघून कितीतरी पुरुषांची इच्छा होत नाही परिणामी शारीरिक संबंध होत नाहीत. कृत्रिमपणे गर्भधारणेसाठी पुरुषाचं वीर्य लागत तेव्हा त्यांना पॉर्न दाखवावं लागत." आणि बरंच काही.
तुम्ही वर सांगितल्या प्रमाणे प्रकृतीच्या दृष्टीने कुठल्याही अडचणी नसतील तर सर्वसामान्यांचा संसार एकमेकांबद्दलची ओढ-प्रेम यावर चालतो. सुखी-समाधानी तरल संसारासाठी निकोप लैगिक संबंध सुद्धा तेवढेच आवश्यक असतात. मुल जन्माला घालण्याआधी मानसिक-शारीरिक-आर्थिक तयारी असावी, आणि जे एकमेकांच्यात भावनिक आणि शारीरिक ओढीनं गुंतले नसतील अश्यानी सुद्धा यावर विचार करावा. पुढे जाऊन नको असलेल्या संसारात केवळ मुल पदरात आहे म्हणून मन मारून जगण्यापेक्षा आधीच विचार करणे योग्य ठरेल.
एकमेकांना नाव ठेवण्यापेक्षा, एकमेकांपासून दूर पळण्यापेक्षा एकमेकांना आपल्या अपेक्षा सांगाव्या. त्रुटी सांगाव्या. पण अपेक्षा अवाजवी असू नयेत. तिच्याकडून स्वच्छतेची, प्रेझेन्टेबल दिसण्याची अपेक्षा करताना स्वतःपण तसेच रहावे. पती-पत्नी दोघांनीही एकमेकांच्या आवडीचा विचार करावा, आदर करावा. जमेल तितकं बदलावं. एकमेकांना समजून घ्यावं. हाताची पाची बोट सारखी नसतात. सुसंवाद हवा. आणि ती का थंड राहते, यात आपलं काही चुकत आहे का याचा पण विचार करावा. कदाचित तिलाही समुपदेशन किंवा इतर उपचाराची गरज असेल.
आणि तरीही मुल जन्माला घालण्याआधी बायको आवडत नसेल, तिच्याकडे बघून तुमचा सेक्स ड्राईव्ह ऍक्टिव्ह होत नसेल तर विचार करा, पुढे जायचं कि नाही. नाहीतर आयुष्यभर फक्त धुमसतच राहणार.
आपण बघतो भिकारी, दारुडे, एकमेकांचा मानसिक-शारीरिक छळ करणारी जोडपी, विकृत लोक पण मुलांना जन्म देतात. अश्या लोकांच्या मुलांची आपण फरफट बघतो. कधी बदलणार हे? कायद्याने प्रत्येकाला मुल जन्माला घालायचा हक्क दिला आहे. म्हणून मुल जन्माला घालायची का?
अर्थात हे माझं मत आहे.

मराठी कथालेखक's picture

15 Feb 2017 - 5:42 pm | मराठी कथालेखक

डॉक्टरसाहेब (आणि इतरही जाणकार सदस्य) ,
prude ह्या संकल्पनेचा कामजीवनावर काही परिणाम होतो का ? मुळात prude असणे ही एक मानसिक स्थिती/समस्या मानली गेली आहे का ? असल्यास त्यावर काही उपाय आहेत काय ?

मराठी कथालेखक's picture

16 Feb 2017 - 1:55 pm | मराठी कथालेखक

फक्त त्यांनी नक्की समस्या काय आहे हे एका दमात सांगावं. कारण आता त्यांनी एक नवीन मुद्दा आणलाय, प्रूड असण्याचा.

पिराजींनी हे वर म्हंटलंय..
वेल, तो मित्र प्रुड आहे की नाही हे तो स्वतःही सांगू शकत नाही त्यामुळे तो मुद्दा उशीरा मांडला. त्याला पुर्ण नग्नता आवडत नाही इतकेच तो सांगू शकतो.
मुळात प्रुड बद्दलची माहिती त्रोटक आहे, आणि ती एक मानसशास्त्राने मानलेली मानसिक स्थिती आहे की नाही हे नीट माहित नाही. आणि असल्यास त्याचे परिणाम काय , उपाय काय वगैरे तर अजिबातच माहित नाही. म्हणून इथे तज्ञांचे मार्गदर्शन अपेक्षित आहे.
उदा: आपण सहजपणे म्हणतो की अमूक एक व्यक्ती खडूस आहे, वा अरसिक आहे वा ई ई. ..पण 'खडूस असणे' ही मानसिक स्थिती मानली आहे का की ते केवळ एक सामाजिक विशेषण आहे ? अमूक व्यक्ती नक्की खडूस आहे का ? खडूसपणा मोजता येईल का ?नेमका किती खडूसपणा ही समस्या आहे ? असल्यास उपाय काय हे मानसशास्त्र विषयातले तज्ञच सांगू शकतील,
आणि याच्या विरुद्ध दूसरं उदाहरण type A / type B personality या मानसशास्त्रीय संज्ञा आहेत , त्या मोजण्याचे निकष आहेत .
प्रुड असणे यापैकी कोणत्या प्रकारात मोडतं (केवळ सामाजिक विशेषण की मानसिक स्थिती ?)

पिलीयन रायडर's picture

16 Feb 2017 - 8:26 pm | पिलीयन रायडर

तुम्ही मुद्दाम करताय असं मी म्हणत नाही. चर्चेच्या ओघात तुम्ही नवी माहिती दिली असं म्हणलं तरी होतंय काय की तुम्ही देताय ती माहिती आता जास्त गुंतागुंतीची वाटत चालली आहे. आधी सर्व साधारण माणसेही सल्ला देऊ शकतील असा प्रश्न वाटला होता. आता मात्र हे मानसशास्त्रीय गर्तेत चाललंय.. ज्याला पब्लिक फोरमवर फार ठोस उत्तर मिळेल असं वाटत नाही.

सुबोध खरे's picture

16 Feb 2017 - 7:46 pm | सुबोध खरे

prude -- याला अतिनम्र किंवा अति "सभ्य"असे म्हणता येईल.
पण हि मानसिक समस्या आहेच असे ठामपणे म्हणता येणार नाही.
याचे एक उदाहरण देतो आहे. मीच स्वतः पाहिलेले.
एक स्त्री ओटीपोटात दुखते म्हणून सोनोग्राफीसाठी त्यांच्या स्त्रीरोगतज्ज्ञाने पाठवली होती. पहिल्यान्दा त्या बाई मला स्त्री रेडियोलॉजिस्ट हव्या म्हणून मागणी करत होत्या.पण त्यांच्या स्त्रीरोगतज्ज्ञाने त्यांना "माझ्याकडेच" सोनोग्राफी करून आणा असे सांगितले
( यात आत्मप्रौढी नाही तर विश्वासाचा भाग आहे) म्हणून त्यांचा नाईलाज झाला. सुरुवातीला त्या आतून सोनोग्राफी करायला तयार होईनात. यावेळेस मी त्यांना त्यांच्या स्त्रीरोगतज्ज्ञाने आतून सोनोग्राफी करण्यास लिहून दिले आहे हे दाखवले. फार बाबापुता करून त्या आतून सोनोग्राफी साठी तयार झाल्या. त्यातून त्या सारख्या आपले "अंग" आक्रसून घेत होत्या. माझ्या सहनशक्तीची मर्यादा झाली कशीतरी सोनोग्राफी केली. त्यानंतर त्या बाथरूम मध्ये गेल्या असता मी त्यांच्या यजमानांना विचारले कि तुमचे शरीर संबंध कसे आहेत. त्यांच्या यजमानाने मला सांगितले कि डॉक्टर ती खेड्यातून आलेली आहे आणि संबंध हे काहीतरी घाणेरडे आहे अशी तिची मानसिकता आहे. आमच्या लग्नाला चार वर्षे झाली आहेत आम्हाला एक तीन वर्षाची मुलगी सुद्धा आहे. पण आजतागायत मी बायकोला संपूर्णपणे पाहिलेली नाही. बरेच दिवस झाले आणि मला राहवले नाही कि रात्रीसुद्धा ती फक्त साडी वर करते आणि मला "उरकून घ्यायला" सांगते. तिला अनेकदा समुपदेशकाकडे जाऊ म्हणून सांगितले तर तुम्हाला फक्त माझा "देहच" हवा आहे म्हणून भांडण करते. सुरुवातीपासून असाच आडमुठेपण आहे. मला वाटले कि खेड्यातील आहे भीती, संकोच असेल. नंतर सुधारेल. गरोदरपणात तर तिने मला ९ महिने आणि नंतर तीन महिने "हात हि" लावू दिला नाही. मला वाटले त्यानंतर तरी ती सुधारेल पण आता तीन वर्षे झाली काहीच फरक नाही.
बाकी पत्नी म्हणून घरचे सर्व पाहणे, स्वयंपाक, मुलीची देखभाल सर्वच गोष्टी उत्तम आहेत.त्याबद्दल तक्रारीला कोणताच वाव नाही. शेवटी तर्हेवाईकपणा/ हेकट स्वभाव म्हणून मी सॊडून देतो. पण मला पण काही भावना आहेतच.
मी त्यांना लहानपणी काही अत्याचार झाला असेल असे सुचवण्याचा प्रयत्न केला पण त्या बाई कोणत्याच समुपदेशक किंवा मनोविकार तज्ञा काय जायला तयार होणारच नाहीत हे यजमानांनी सांगितले.
अशा स्त्रिया त्यांच्या अर्धवट वयामध्ये पाहिलेल्या किंवा अनुभवलेल्या लैंगिक अत्याचारामुळे किंवा विशेषतः संस्कारामुळे जर एक न्यूनगंड/ विचित्र कल्पना धरून बसल्या असतील तर त्याला मनोविकार म्हणता येईल का याची मला साशंकता आहे.

रागिणी९१२'s picture

16 Feb 2017 - 2:50 pm | रागिणी९१२

हे बघा मक, मला अजिबात रस नाही हे जाणून घेण्यात कि हि तुमची समस्या आहे कि मित्राची.
पण मला खरच फार आश्चर्य वाटते आहे कि इतक्या खाजगी गोष्टी छोट्या छोट्या डिटेलसह कस कुणी शेअर करू शकत. मला व्यक्तीश: तसा अजिबातच अनुभव नाही.
तसही मी आधी अगदी प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तुम्ही हा धागा एखाद्या कथेसारखा लिहून सुरुवात केलीत आणि आता एकेक मुद्दा वाढवत चालला आहेत. प्रुड वैगरे प्रकाराबाबतीतली संभ्रमता समजू शकतो पण त्याला मुल नाही, ती सुंदर मुलगी आणि असे बरेच सोप्पे वाटणारे मुद्दे तुम्ही नंतर टाकले आहेत. ते काही पटलं नाही. आमच्यासारख्या प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची तुम्ही दिशाभूल करत आहात आणि आमचे खरडण्याचे कष्टही वाया घालवलेत.
आणि मिपाचे तुम्ही जुने खिलाडी आहेत. तुम्हाला मी अनेक धाग्यांवर प्रतिवाद करताना पहिले आहे. तुमच्या धाग्यावरहि प्रतिवाद होणारच नाही का? आणि व्हायलाच हवेत ना? हे फोरम त्यासाठीच तर आहे. :=)
एकंदर या समस्येची जटिलता पाहता आयुर्वेदिक औषधांच्या नादाला लागण्यापेक्षा मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणे हितकारक आहे. मला नाही वाटत हि लैगिंक समस्या आहे. मानसोपचार तज्ज्ञांकडे सुद्धा लैगिक सल्ले मिळतात.
आणि मित्र म्हणून तुम्ही समजाऊ शकता कि वयानुसार होणाऱ्या बदलाला सामोरे जा, प्रत्येक वयात स्त्री-पुरुष संबंधातले ठोक-ताळे बदलत असतात. चाळीशीत राहून विशीतील हुरहूर अनुभवता येत नाही. हा बदल स्वीकारणे आणि त्याप्रमाणे वागणे हेच निरोगी मनाचे लक्षण आहे.

मराठी कथालेखक's picture

16 Feb 2017 - 3:43 pm | मराठी कथालेखक

तुम्हाला मी अनेक धाग्यांवर प्रतिवाद करताना पहिले आहे. तुमच्या धाग्यावरहि प्रतिवाद होणारच नाही का? आणि व्हायलाच हवेत ना? हे फोरम त्यासाठीच तर आहे. :=)

अगदी मान्य
पण दिशाभूल वगैरे नाही. अगदी स्वतः त्या मित्राने जरी इथे आयडी बनवून समस्या टाकली असती ..किंवा for that matter कुणी पण व्यक्ती एखादी इथे समस्या मांडतो तेव्हा प्रथम समस्येचा मूळ गाभा थोडक्यात मांडतो, नंतर चर्चा पुढे जाते तसे अधिक अधिक मुद्दे त्या व्यक्तीला आठवतात / लक्षात येतात , किंवा 'हे पण मुद्दे सांगितलेत तर कदाचित अधिक मदत मिळू शकेल' असं मनात येतं तसे अधिक मुद्दे तो टाकतो.
उदा एक काल्पनिक पण प्रातिनिधिक उदाहरण सांगतो.
पेशंट डॉक्टरकडे गेला
डॉक्टर : हं ..बोला काय होतंय.
पेशंट : डोकं खूप दुखतंय
डॉक्टर : कधीपासून दुखतंय ?
पेशंट : दोन-तीन दिवस झालेत
डॉक्टर : चष्माचा नंबर शेवटचा कधी चेक केला होतात ?
पेशंट : सहा महिने झाले असतील जास्तीत जास्त
(डॉक्टर आता चष्म्याचा प्रॉब्लेम नाही अस मानतात)
डॉक्टर : अ‍ॅसिडिटी वाढली का ?मळमळ , उलटी वगैरे
पेशंट : नाही हो..
डॉक्टर : झोप नीट होते आहे का ?
पेशंट : मागच्या आठवड्यात नाईट शिफ्ट होती, तर झोप नीट झाली नाही. पहिलीच वेळ होती नाईटची..
डॉक्टर : अहो, मग हे आधी नाही का सांगायचं.. ?
पेशंट : लक्षात नाही आलं..

:)

मराठी कथालेखक's picture

16 Feb 2017 - 3:47 pm | मराठी कथालेखक

परंतु तुम्ही हा धागा एखाद्या कथेसारखा लिहून सुरुवात केलीत आणि आता एकेक मुद्दा वाढवत चालला आहेत

झालंच तर कथेच मी वर लिहिलं त्याच्या विरुद्ध असतं ..सगळी कथा एकतर एकदम किंवा (नियोजित तुकड्यांत असल्यास )क्रमश: देवून टाकावी लागते, प्रतिसादांत जोडत बसता येत नाही. काथ्याकूट मात्र प्रतिसादांतूनच पुढे सरकतो.

सुबोध खरे's picture

16 Feb 2017 - 7:26 pm | सुबोध खरे

रागिणी ताई
पण मला खरच फार आश्चर्य वाटते आहे कि इतक्या खाजगी गोष्टी छोट्या छोट्या डिटेलसह कस कुणी शेअर करू शकत.

माझ्या चुलत भावाचा मित्र याला लग्न झाल्यावर बायकोच्या संकोच आणि भीती मुळे फार त्रास सहन करावा लागला. सात दिवसाच्या मधुचंद्राहून ते जोडपे "कोरडे" परत आले. यानंतर जवळ जवळ एक वर्ष पर्यंत त्यांच्यात शारीरिक संबंध होऊ शकला नव्हता. हे सर्व त्या मित्राने माझ्या चुलत भावाला सांगितले होते. चुलत भावाच्या सांगण्यावरून तो मित्र मला भेटायला आला होता. त्या वेळेस मी लष्करात होतो आणि सुटीवर आलो होतो. या मित्राला मी डॉ. राजन भोसले यांच्या कडे जाण्याचा सल्ला दिला. त्याचा त्याला फायदा झाला असावा कारण पुढे पाच वर्षांनी मी त्या मित्राला ठाण्यात एका लग्नाला भेटलो असता त्याच्या बरोबर एक ३-४ वर्षाची गोंडस मुलगी होती. मी हसून सर्व ठीक का विचारल्यावर तो पण हसून ठीक आहे म्हणाला.
या मित्राने माझ्या चुलत भावाला आपली संबंधाबद्दल "खाजगी" अशी बरीच माहिती सांगितली होती तेंव्हा अशी माहिती मित्रांना देत नाहीत/ दिली जात नाही असे म्हणणे बरोबर नाही.

रागिणी९१२'s picture

17 Feb 2017 - 12:06 pm | रागिणी९१२

अगदी अगदी, मला वाटत तुमच्या प्रतिसादातच उत्तर दडलंय. तरी पण लिहीत आहे.
मी माझ्या नवऱ्याशी सुद्धा या विषयावर बोलले कि तुम्ही मित्र किती प्रमाणात खाजगी बोलू शकता. अर्थातच त्यावरून पूर्ण ठरवता येणार नाही पण सरासरी नक्कीच ठरवता येऊ शकेल.
पुरुष आपल्या मित्रांशी खाजगी गोष्टी बोलतात. लग्न ठरत तेव्हा त्यांच्या मनात सगळं कस निभावता येईल याची भीती असते, संकोच असतो. लग्न झाल्यावर बायकोची लैगिक संबधाबद्दलची भीती, तिची अलिप्तता, तिची समरसून साथ न देणे आणि मी कसं तिला काबूत ठेवलय, स्वतःचा स्टॅमिना-परफॉमन्स वै. स्वतःच पुरुषत्व सिद्द करणाऱ्या गोष्टी सांगितल्या जातात थोडक्यात फुशारी मारली जाते. स्वतःच्या कमीपणा दाखवणाऱ्या गोष्टी चर्चिल्या जात नाहीत. माझी बायको बेडमध्ये वाईल्ड आहे किंव्हा तिची लैगिक भूक जास्त आहे आणि ती मी पुरी करू शकत नाही. असं सांगणारे पुरुष कदाचित हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच निघावेत. माझ्या नवऱ्याला एकदा त्याच्या मित्राने विचारलं होत कि बायको ६ महिन्याची गरोदर आहे, माझी फार इच्छा होते, तिच्या बरोबर मी संबंध ठेवू का? (त्यावेळी आम्हाला एक मुल होत.) नवीन लग्न झालेल्या एका मित्राने विचारलं होत कि 'बीबी मना कर राही थी फीर भी मैने ऐसेही कर लिया अब डर लग रहा है. त्यावेळी त्यावेळी 'त्या' गोळ्यांच्या जाहिराती टीव्हीवर लागत नसत. या दोन उदाहरणांतून असच दिसत कि पुरुषाला कमीपणा येणारी बाब यात नाही.
आणि तुम्ही डॉक्टर असल्यामुळे लोक तुमच्याशी बोलत असतील. मी हा मुद्दा मित्र-मित्र या दृष्टीने मांडला आहे.
आम्ही स्त्रिया त्या मानाने फारच कमी बोलतो याविषयावर. आणि बोलतो ते फक्त मस्करीपुरतं असत. (मी सर्वसामान्य स्त्रियांबद्दल बोलत आहे, पीडित स्त्रियांबद्दल नाही.)

संजय क्षीरसागर's picture

16 Feb 2017 - 6:05 pm | संजय क्षीरसागर

आमच्यासारख्या प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची तुम्ही दिशाभूल करत आहात आणि आमचे खरडण्याचे कष्टही वाया घालवलेत.

दाखवा आता हे डांग्यांना . आणि खरी गंमंत तर पुढेचे ... मूळ समस्या तशीच राहाणारे ! मग काय झाला उपयोग सदस्यांचा वेळ घेऊन ? आणि डांगे कुणाला शिकवतात सुसंस्कृतपणा ?

संदीप डांगे's picture

16 Feb 2017 - 8:04 pm | संदीप डांगे

मी कोणाला नाही हो शिकवत काही... माहितिये इथे कोण किती दिग्गज आहेत सुसंस्कृतपणात ते... _/\_

तुमच्या या धाग्यावरच्या दुसर्‍याच प्रतिसादात तुम्ही म्हणाले की अशी जनरिक चर्चा नीरस होते. तरी तुम्ही ह्या धाग्यावर येऊन आपली मते मांडतच आहात हे खरेतर विसंगत आहे. अर्थात कोणाला प्रतिसाद द्यावासा वाटत असेल तर ते त्याचे स्वातंत्र्य आहे. पण लोकांना हा मकलेंचाच स्वतःचा प्रॉब्लेम आहे हे सिद्ध करण्यात एवढा काय रस आहे हे काही मला उमगत नाही. ज्या कोणाला आपली मते देण्यासाठी ही सिच्युएशन आदर्श वाटत नाही तर मग तरीही प्रतिसाद का द्यावेत? आपला तो प्रामाणिकपणा आणि दुसर्‍याचा तो लबाडपणा हे कोण व का ठरवत आहे ह्या धाग्यावर?

समस्या डिस्कस करण्यापेक्षा ही समस्या मकलेंचीच आहे हे सिद्ध करण्यावर, त्याकडे रोख देण्यावर जास्त भर दिसत आहे काही प्रतिसादांचा. याचे कारण काही वेगळे आहे काय हे शोधायला लागेल.

बाकी राहिला सदस्यांचा वेळ घेण्याचा विषय... तर वेळ हा एक भ्रम आहे असे आमचे एक आदरणीय सर म्हणतात. :-)
ज्यांना वेळ महत्त्वाची वाटते त्यांनी उखळात डोकं घालण्याआधीच विचार केलेला बरा असतो. असा आधीच विचार केलेल्या अनेक आयडींनी आपले साधारण मत देऊन बाजूला होणे पसंत केलेले दिसले. बाकी खरेसाहेब नीट मांडणी करुन उपयोगी प्रतिसाद देत आहेतच.

सर्वात महत्त्वाचे असे की स्वतःची म्हणून समस्या मांडली तरी आयुष्याला एकच एक पैलू नसतो. अनेक ज्ञात-अज्ञात पैलू असतात. मांडणारा मांडेलच असे नसते त्यामुळे अशा प्रश्नांवर फार खोल, परिणामकारक उत्तरे फोरम डिस्कशनने मिळत नसतात. आर्थिक, वैद्यकिय, मानसिक बाबतींमध्ये अतिवैयक्तिक समस्यांवर रामबाण उपाय देणारी चर्चा ऑनलाइन फोरमवर घडू शकते असे मला तरी वाटत नाही, ज्याला वाटत असेल त्याला फसवणूक झाल्यासारखे वाटत असेल तर नवल नाही.

अवांतरः (वैयक्तिकसाठी क्षमस्व) संक्षि, तुम्हाला या विषयावर नेहमीप्रमाणे भरभरुन एक्स्पर्ट गायडन्स करायचे आहे पण धागालेखक एकाच फांदीवर बसत नाहीये म्हणून तगमग होत आहे काय?

संजय क्षीरसागर's picture

16 Feb 2017 - 8:49 pm | संजय क्षीरसागर

संक्षि, तुम्हाला या विषयावर नेहमीप्रमाणे भरभरुन एक्स्पर्ट गायडन्स करायचे आहे पण धागालेखक एकाच फांदीवर बसत नाहीये म्हणून तगमग होत आहे काय?

मला सदस्याची पूर्ण बॅकग्राऊंड माहिती आहे (त्यांच्या इथल्या लेखनावरुन), त्यांचा नक्की प्रॉब्लमही माहितीये आणि नेमकं उत्तरही माहिती आहे. मी उगीच इकडून तिकडून काल्पनिक प्रश्नांना उत्तरं देण्याची फेकाफेका करत नाही आणि एखाद्याला सोडवावं ही माझी प्रामाणिक इच्छा असते (अर्थात याचा तुम्हालाही अनुभव असेलच). अगदी लेटेस्ट सांगायचं तर पिराचे आणि माझे इतके वाद असून सुद्धा तिच्या प्रश्नाला मी दिलेली उत्तरं तीनंही तितक्याच दिलखुलासपणे अ‍ॅप्रिशियेट केलीयेत. सबब मला तुमच्याकडून कोणत्याही उपदेशाची गरज नाही.

संदीप डांगे's picture

17 Feb 2017 - 11:23 am | संदीप डांगे

मला सदस्याची पूर्ण बॅकग्राऊंड माहिती आहे (त्यांच्या इथल्या लेखनावरुन), त्यांचा नक्की प्रॉब्लमही माहितीये आणि नेमकं उत्तरही माहिती आहे. मी उगीच इकडून तिकडून काल्पनिक प्रश्नांना उत्तरं देण्याची फेकाफेका करत नाही आणि एखाद्याला सोडवावं ही माझी प्रामाणिक इच्छा असते
^^^
असं असेल तर मी संबंधित सदस्याशी व्यनीतून चर्चा करने योग्य समजतो. इथे झाइर धाग्यावर हि तुमचीच समस्या आहे हे मान्य करायला दबाव आणणार नाही. मान न मान मै तेरा मेहमान!

बाकी, मी पामर 'तुम्हाला' उपदेश करण्याच्या योग्यतेचा नाही...

माझ्याकडून चर्चेला पूर्णविराम! धन्यवाद!
कटुता नको स्नेह हवा!

संजय क्षीरसागर's picture

17 Feb 2017 - 11:34 am | संजय क्षीरसागर

तुम्ही सुसंस्कृतपणा वगैरेच्या गोष्टी सोडा.

आमच्याकडून स्नेहाला काय कमी नाही, प्रश्न तुम्ही काढला म्हणून उत्तर दिलं.

संदीप डांगे's picture

17 Feb 2017 - 12:20 pm | संदीप डांगे

आँ?!
तुम्हाला कसले उपदेश नकोत तर मग मला तरी का देताय महोदय?
दोन द्यायची इच्छा असेल तर दोन घ्यायची तयारीही हवी की नाही... सार्वजनिक फोरमवर...?

संजय क्षीरसागर's picture

17 Feb 2017 - 12:42 pm | संजय क्षीरसागर

सुसंकृतपणा आणि तहजीब तुम्ही शिकवायला लागलात त्यामुळे विषय वाढला. वरती तुम्हीच मला व्यनितून उत्तर द्या वगैरे शिकवतायं. दोन दिल्या तर चार मिळतील हे कायम लक्षात ठेवा.

अनरँडम's picture

16 Feb 2017 - 9:45 pm | अनरँडम

सामान्यपणे लैंगिक समस्या असलेले लोक सामाजिक-सांस्कृतिक कारणांमुळे त्यांची समस्या मांडू शकत नाही.पौगंडावस्थेतील मुलामुलींपासून वयस्क लोकांपर्यंत लैंगिक संबंधांबद्दल अज्ञानामूळे अनेक मानसिक समस्या उद्भवतात. आपल्याकडे चित्रपटात कामभावनांना उत्तेजित करणारे, स्तन-ढूंगण-बेंब्या यांचे बिभत्स म्हणता यावे असे प्रकार गाण्यातून वगैरे चालतात पण लैंगिक शिक्षण वगैरे गोष्टींकडे लोक दुर्लक्ष करतात. येथे मराठी कथालेखक, सुबोध खरे, रागिणी, पिलियन राइडर इ. सदस्यांनी संवेदनशीलतेने सकारात्मक चर्चा केलेली आहे. सर्वांचे आभार.

एमी's picture

17 Feb 2017 - 10:29 am | एमी

चांगला विषय आहे.
व्यवस्थित मांडलाय.
एखाददुसरा प्रतिसाद सोडल्यास बाकी चर्चादेखील चांगली चालूय.
याचा बर्याचजणांना उपयोग होऊ शकतो.

माबोवर 'तुम्ही लैंगिकदृष्ट्या समाधानी आहात का?' असा एक सर्वे/पोल आहे. त्या धागाकर्त्यानेदेखील अतिशय उत्तमरीत्या विषय/चर्चा हँडल केलेली. अर्थातच 'असमाधानी आहे' पर्यायाला बरीच मतं मिळालेली...

सिंजिं/टफींचा धागा 'तिच्याशी नाते जोडावे का?' त्यातली स्त्री, तिची अवस्था या धाग्यामधील स्त्रिसारखी असू शकेल...

लग्नाळू लोकांना भविष्यात काय वाढून ठेवलंय याचा अंदाज येइल अशा चर्चांमधून. नाहीतर काय आहेच की 'पुरुषाने दालआटा आणून देणे आणि स्त्रिने चकोल्या बनवून खाऊ घालणे म्हणजे लग्न' असला भातुकली टॉक :-P

मराठी कथालेखक's picture

17 Feb 2017 - 2:15 pm | मराठी कथालेखक

डॉक्टर साहेब, डांगे साहेब, पिराजी, रागिणी मॅडम ई सर्वांचे मनःपुर्वक आभार.
फोरमवर चर्चा करुन समस्या सुटेलच असं नसलं तरी चांगल्या चर्चेतून समस्येचे आणि त्या अनुषंगाने एकूणातच त्या विषयाचे विविध पैलू समोर येतात आणि समस्या मांडणारा, समस्या असणारा हेच फक्त नव्हे तर इतरही अनेकांना ह्यातून काही चांगले ज्ञान हाती लागू शकते.
अनरँडम यांनी सर्वांचे आभार मानलेत , अ‍ॅमी यांनी म्हंटलंय की "लग्नाळू लोकांना भविष्यात काय वाढून ठेवलंय याचा अंदाज येइल अशा चर्चांमधून" ..ते याच भावनेतून असावं... वैयक्तिक समस्येतूनही जनरिक असा विषय मांडला आणि चर्चिला गेला.
पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद.