मंदिर या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
2 Feb 2017 - 11:35 am
गाभा: 

Bhandarkar Oriental Research Institute चे मराठीतील गेल्या दहा पंधरा वर्षातील उल्लेख "भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर" असे आंतरजालावर सापडतात,

१) मंदिर हा शब्द Institute या अर्थाने घेता येतो का ?
२) Bhandarkar Oriental Research Institute चे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर हे अधिकृत रुपांतरण आहे का तसे असेल तर ते केव्हा पासून हि माहिती हवी आहे.

३) त्या शिवाय मंदिर हा शब्द मला संस्कृत विकिस्रोतातील शोधात सापडला नाही, मंदिर हा शब्दाचे संस्कृतातील जुने उल्लेख कोणते सापडतात का ?
४) मंदिर या शब्दाची व्युत्पत्ती काय या हिंदी शब्दकोश दुव्यावर पुं० [सं०√मंद्+किरच्] अशी व्युत्पत्ती दिली आहे. मंद या शब्दाचे मराठी आणि हिंदी प्रचलीत अर्थ वेगळे दिसतात इथे वर दिलेला किरच् प्रत्ययाचे दिर हे रुपांतरण कसे होते ?
५) या दुव्यावर मन + दिर अशी व्युत्पत्ती चर्चीली आहे पण दिर म्हणजे नेमके काय याचा काही संदर्भ मिळतो किंवा कसे ?

प्रतिक्रिया

राजेंद्र देवी's picture

2 Feb 2017 - 1:32 pm | राजेंद्र देवी

जी गोष्ट करण्यास मन अधिर होते (येथे देवभक्ती, दर्शन ) ती जागा म्हणजे मंदीर असावे असे वाटते....
हा अंदाज आहे... खात्री नाही....

मंदिर शब्दाचे मन्दिरे हे रुप संस्कृत विकिस्रोतात मुख्यत्वे पुराणांमध्ये बरेच दिसते, रामायणातील अयोध्याकाण्ड आणि युद्धकाण्डातही दिसते आहे. (महाभारताचा सर्च यात आला नाही ?)

प्राचीन स्रोतांत मंदिर ह्या शब्दाचा अर्थ इमारत (राजवाडा, मोठ्या हवेल्या) अशा अर्थी येतो.
मंदिर हा शब्द Institute या अर्थाने घेता यावा.
अर्थात मंदिर ह्या शब्दाची उत्पत्ती माहीत नाही.

माहितगार's picture

2 Feb 2017 - 3:00 pm | माहितगार

रामायणात राजवाडा या अर्थाने आला असावा. खालच्या प्रतिसादात कंजूस (अशी सदस्य नावे संदर्भ देताना कठीण! ) म्हणतातसे व्युत्पत्ती तमीळ मधून येत असेल तर रामायणातील उल्लेख रोचक ठरावेत असे वाटते.

भारतात पुर्वी झाडांत आत्मा/देव/देवता समजून तिथे नवस बोलले जायचे. झाडाला पाणी घालणे ,काही "प्रसाद ठेवणे" त्याभोवती फिरणे हीच पूजा होती. मूर्ती नव्हत्या. भारतातली जुनी भाषा तमिळ. बुद्धानंतर ज्ञान देणारे झाड पोधि ( बोधि) मन् रम ( झाड). बोधिवृक्ष. त्या मनरम् चा तमिळ उच्चार मन्डरम् मन्द्रम् होत असेल. पुढे गंधार प्रांतातून मूर्तीकला ,गुंफा इत्यादी आल्यावर वृक्षातले आत्मे/ देवता कोरलेल्या मूर्ती,गुहेत आणि नंतर बांधलेल्या दगडी इमारतींत "शिफ्ट" झाले. तेच मनरम -मंडरम-मंदिरम-मंदिर. अजुनही बय्राच मंदिरात एखादे झाड आपलं स्थान टिकवून आहे.

माहितगार's picture

2 Feb 2017 - 2:56 pm | माहितगार

माझाही तर्क वृक्ष ते देवालय असाच आहे. मनरम -मंडरम-मंदिरम-मंदिर हि शक्यता आणि तर्क रोचक आहे.

प्रचेतस's picture

2 Feb 2017 - 3:32 pm | प्रचेतस

तसं वाटत नाही मला.
बुद्धासंबंधीचे जे उल्लेख आहेत ते प्राकृतातून आहेत. प्राकृत इंडोआर्यन आहे आणि तमिळ द्रविडियन. संमिलीकरण झाले असेल तर ते साधारण इसवी सनानंतर झाले असावे, त्यापूर्वी हे होणे अवघड वाटते.

मंदिर शब्दाच्या व्युत्त्पत्तीविषयी बॅटमॅन अधिक सांगू शकेल.

माहितगार's picture

2 Feb 2017 - 4:14 pm | माहितगार

मंडरम हा शब्द गूगल केला, तमिळमध्ये मंडळ या अर्थाने येताना दिसतो. rasigar mandram म्हणजे बहुधा फॅन क्लब असे काही.

अवांतर : rasigar म्हणजे 'रसिकांचे' असे दिसते, रस शब्दही तमिळ मधला की शुद्ध तमिळींना संस्कृतचा प्रभाव पूर्ण संपवता आला नाही .

संजय क्षीरसागर's picture

2 Feb 2017 - 3:10 pm | संजय क्षीरसागर

मन + धीर असं आहे.

मना धीर धर.... तो तुला इथे भेटेल अशी ती हुलकावणी आहे.

रायायणात राम लंकेतून रावणाचा वध करून आल्यावर त्याने "देवालय बांधले" असा उल्लेख आहे का? त्याने बहुतेक लिंग स्थापन करून क्षमा मागितली शंकराची. त्याचा परम भक्त आणि ब्राम्हणाची हत्त्या झाली म्हणून.

हिमालय आहे ,शिवालय आहे/होते का?

माहितगार's picture

2 Feb 2017 - 5:29 pm | माहितगार

याच उत्तर शरदराव, कोल्हटकर, ब्याटमनराव इत्यादी जाणते देऊ शकतील. अर्थात मी 'शिव'या शब्दावर संस्कृत विकिस्रोतातील रामयणात असा शोध घेतला तर बरेच शोध येतात त्यांचा अनुवाद काय होतो कल्पना नाही

माहितगार's picture

3 Feb 2017 - 8:08 am | माहितगार

या निमित्ताने संस्कृत विकिस्रोतात महाभारतावर जो शोध घेतला त्या शोधात देवालय शब्द आला पण मन्दिरे शब्द आला नाही, महाभारतातला देवालय शब्द कोणत्या अर्थाने येतोय माहित नाही; तर रामायणात एके ठिकाणी शहर/गाव तर एके ठिकाणी बहुधा राहण्याची जागा (राजमहाल) या अर्थाने मन्दिरे येत असावा पण रामायणात देवालय हा शब्द दिसला नाही.

पैसा's picture

3 Feb 2017 - 8:23 am | पैसा

देव हे राजाला वगैरे उद्देशून संबोधन आहे. आताचा अर्थ तेव्हा तसाच नव्हता. देवाचे आलय (घर) ते देवालय.

या दुव्यावरही मन्दिर शब्दाचे आणखी रोचक उपयोग आहेत. गुढी शब्द जसा मंन्दिर अर्थाने तसेच पाल कुटी वगैरे रहाण्याच्या जागांच्या संदर्भाने विकसीत झाला तसेच मंन्दिर शब्दाचेही असावे अन्यथा घोडा बांधण्याची जागा ते राहण्याची जागा ते गाव/ शहर असा या शब्दाचा विकास झाला नसता. खाली मिपाकर कंजूस यांचे लॉजीक बरेचसे पटते आहे.

बाकी आपण दिलेला दुवा क्र. २ उघडता आला नाही. काही तांत्रीक अडचण दिसते.

पैसा's picture

2 Feb 2017 - 10:25 pm | पैसा

.mandira¦ nf. (-raṁ-rā) A house. n. (-raṁ)
1 A town.
2 A temple. m. (-raḥ)
1 The sea.
2 The back of the knee, the ham.
3 One of the Gandharbas. f. (-rā) A stable.
E. madi to sleep, &c. Un'ádi aff. kirac.

माहितगार's picture

3 Feb 2017 - 8:02 am | माहितगार

माडी हा अर्थ उपयोग वेगळा वाटतोय, रोचक धन्यवाद

पैसा's picture

3 Feb 2017 - 8:24 am | पैसा

माडी नाही ते मदि आहे म्हणे (झोपणे)

मंदिर जे आपण आता पाहतो दगड विटांनी बांधलेले ती कल्पना बुद्ध धर्मियांची आहे. जुन्यात जुने( इस चौथे पाचवे शतक) विटांचे मंदिर बोधगयेत आहे. मंदिरावरची नक्षी ही बय्राचदा चैत्य प्रवेशद्वाराची,पिंपळपानाची असायची. दक्षिणेतले महाबलिपुरमचे "शोअर टेंपल" हे तिकडचे सहाव्या शतकातले बांधलेले. तिकडच्या बय्राच हिंदू देवळांवर चैत्य नक्षी दिसते. छप्परही हत्तीच्या पाठीसारखे.
पुराणात यज्ञशाळा,आहुति ,देवता स्तुती ,देव मनुष्यरूपात यज्ञातून प्रकट होणे हे उल्लेख आहेत.
जैनधर्मही जुनाच परंतू हिंदुच्या यज्ञबळी प्रथेला कंटाळलेले. लक्ष्मी कुबेर आणि इन्द्रसत्तेच्या स्तुतिला विटलेले. मूर्ती सहाव्या शतकात गुप्त काळात वाढल्या॥ मग त्यांनी महावीर हा जिनेंद्र त्याची योग्यता इतकी मोठी की महावीर बसेल त्या दालनाच्या ( मंदिराच्या नव्हे) बाहेर इन्द्र,कुबेर ,लक्ष्मी दाखवले. थोडक्यात मंदिर ही कल्पना फार जुनी नव्हे असे वाटते.

थोडक्यात मंदिर ही कल्पना फार जुनी नव्हे असे वाटते.

आपली मते बरीचशी पटतात, छत नसलेली दगडांनाच मुर्ती मानणे, नदीतून वाळू/ दगड आनून त्यांचीच अर्चना करणे, देव/देवी अंगात येणे ह्या प्रकारांची प्राचीनता किती माहित नाही पण या प्रकारांमध्यीही बांधकाम केलेल्या मंदिरांची जरुरी भासत नाही.
मला वाटते हालाच्या गाथा सप्तशतीत सुद्धा मंदिरांचा सुस्पष्ट उल्लेख मिळत नसावा (चुभूदेघे)