*/
ही चित्रफीत अनेक कारणांसाठी आम्हाला ह्या उपक्रमात आयोजक म्हणून स्पेशल आहे. एक तर ह्या क्षेत्राबद्दल अधिकाराने लिहिणारे कमीच. त्यामुळे एका वेगळ्या विषयावर चित्रफीत मिळणं आवश्यक होतंच. पण त्यांहूनही महत्त्वाचं म्हणजे कांचनताईंच्या जबड्यावर चालू असलेल्या शस्त्रक्रिया. इतक्या त्रासातही त्यांनी ही चित्रफीत बनवली. विशेष म्हणजे हे त्यांच्या आवाजात क्षणभरही जाणवत नाही.
मिपासाठी असलेलं त्यांचं प्रेम, त्यांच्या या व्हिडीओ मध्ये आहे. मोगरा फुलला या नावाने त्या मिपाच्या सदस्या आहेत, आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो !
अनेक सीडीज, ऑडिओ बुक्स, लघुपट, चित्रपट, जाहिराती ह्यांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी ह्या तिन्ही भाषांमध्ये आपला आवाज देणार्या कांचनताईंची ही चित्रफीत, "गोष्ट..." चा एक महत्त्वपूर्ण पैलू आहे.
-विशेषांक टीम-
प्रतिक्रिया
19 Jan 2017 - 10:00 am | संजय क्षीरसागर
मस्त झालीये क्लीप .
19 Jan 2017 - 10:18 am | यशोधरा
झकास क्लिप!
19 Jan 2017 - 11:55 am | गवि
अत्यंत रोचक माहिती.
उत्कृष्ट आहे हे.
19 Jan 2017 - 11:59 am | पैसा
सवडीने ऐकेन. कांचन म्हणजे सदाबहार, आवडतं व्यक्तिमत्व. उत्कृष्ट कलाकार आणि कामाच्या बाबत अगदी डेडिकेटेड.
19 Jan 2017 - 12:15 pm | सस्नेह
मस्त क्लिप ! अगदी उपयुक्त टिप्स आहेत. धन्यवाद, कांचनताई आणि धागाकर्ते.
19 Jan 2017 - 1:28 pm | मोदक
वाह.. सुंदर माहिती. नवीन क्षेत्राची ओळख झाली.
19 Jan 2017 - 3:04 pm | सामान्य वाचक
या क्षेत्राबद्दल उत्सुकता खूप होती.
पण माहिती आजच झाली
19 Jan 2017 - 3:23 pm | मार्मिक गोडसे
मस्त क्लिप !
19 Jan 2017 - 5:46 pm | रेवती
व्हॉईसओव्हर क्षेत्रात कामाची दिलेली नेटकी माहिती आवडली.
19 Jan 2017 - 7:17 pm | विशाखा राऊत
वाह मस्त :)
19 Jan 2017 - 9:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
माहितीपूर्ण धागा !
या मालिकेनिमित्त कितीतरी गुणी कलाकार मिपाकरांची ओळख होत आहे !
19 Jan 2017 - 10:05 pm | इशा१२३
+१
असेच म्हणते.लेखमालेमुळे गुणी मिपाकरांचि माहिती आणि नविन विषयांवरिल लेख वाचता आले.
20 Jan 2017 - 1:22 am | राघवेंद्र
खूप मस्त क्लिप ! अगदी उपयुक्त टिप्स आहेत. खूप धन्यवाद मोगरा फुलला!!!!
20 Jan 2017 - 6:51 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
अश्या एक आर्टिस्ट मिपाचा एक भाग आहेत ह्याविषयी कौतुक वाटतं. मस्तं.
20 Jan 2017 - 12:15 pm | सूड
घरी जाऊन क्लिप पाह्यली, मला त्या टिप्सची नक्कीच मदत होणार आहे.
20 Jan 2017 - 1:50 pm | स्वीट टॉकर
उत्तम क्लिप! कांचनताई मिपाकर आहेत हे कळल्यावर आणखीनच कौतुक वाटलं.
माझ्या सेकंड इनिंगमधल्या मास्तरकीसाठी खूपच उपयोग होईल.
21 Jan 2017 - 3:36 pm | मदनबाण
या आवाजाशी माझा बराच परिचय आहे, कारण यांच्याशी कधीकाळी भरपुर गप्पा झाल्या आहेत. :) त्यांनी दिलेली माहिती अत्तम आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माशा अल्लाह माशा अल्लाह :- Asmara { اسمرا - ماشالله } { वरिजिनल ;) }
23 Jan 2017 - 11:47 am | KanchanKarai
नमस्कार,
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांसाठी मन:पूर्वक आभार. सात-आठ मिनिटांच्या क्लिपमध्ये जितकं सांगता आलं तेवढं सांगितलं आहे. आणखी उपयुक्त टिप्ससाठी भविष्यात काही व्हिडीओज नक्की बनवेन.
माझे ’मोगरा फुलला’ हे युझरनेम बदलून घेऊन आता KanchanKarai असे करून घेतले आहे.
धन्यवाद.
-
सस्नेह,
कांचन कराई
23 Jan 2017 - 2:37 pm | वेल्लाभट
तुम्ही मिपाकर असणं ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि तुमच्या क्लिपबद्द्ल बोलावं तितकं कमी आहे. अत्यंत उपयुक्त टिप्स आहेत या. या क्षेत्रात करियर करायचं असो वा नसो, आपल्या आवाजाची काळजी घेणं प्रत्येकालाच गरजेचं आहे.
तुमचे मनापासून आभार की तुम्ही या टिप्स आम्हाला दिल्यात.
23 Jan 2017 - 2:25 pm | पद्मावति
उत्तम क्लिप. आवडली.
23 Jan 2017 - 8:36 pm | सुबोध खरे
अतिशय उत्तम अशी हि ध्वनिफीत आहे. जी मुले तोतरी बोलतात किंवा तोंडातल्या तोंडात बोलतात त्यांनी कांचन ताईंनी सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष दिले तर त्यांच्या आवाजात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्या आत्मविश्वासात लक्षणीय सुधारणा होईल. आज अनेक तरुण तरुणी आपल्या मुलाखतीत किंवा नोकरी धंद्यात आवाजाच्या कमतरतेमुळे गमावलेल्या आत्मविश्वासामुळे मागे पडताना दिसून येतात. त्यांना या चित्रफितीचा सुरुवात म्हणून नक्कीच वापर करता येईल .
24 Jan 2017 - 4:21 pm | खटपट्या
खूप छान माहीती.
31 Jan 2017 - 12:16 pm | प्रकाश घाटपांडे
अरे वा सुंदर क्लिप. माहितीपूर्ण! आनी पानी लोनी हे उच्चार अशुद्ध मानले जातात परंतु लहानपणापासून तेच उच्चार कानावर आदळत मोठे झालेल्या लोकांना आपले उच्चार शुद्ध करण्यासाठी व्हाईस कल्चर ट्रेनिंग चा उपयोग होतो का?
31 Jan 2017 - 2:56 pm | उल्का
अतिशय उपयुक्त माहिती...
धन्यवाद!
2 Feb 2017 - 1:28 am | रुपी
खूप उपयुक्त माहिती. धन्यवाद!
स्तोत्रे म्हणण्याबद्दल यापूर्वीही ऐकले होते. आजकाल बर्याच जणांचा दृष्टीकोन "अर्थ कळत नसेल तर उगीच अशी स्तोत्रे का म्हणावीत" असा असतो. पण लहानपणीपासून ही स्तोत्रे म्हणायची सवय लागल्याने जिभेला वेगवेगळे उच्चार सहज करण्याची "सवय" होते असे काहीसे कारण त्यात होते.
2 Feb 2017 - 3:22 am | संदीप डांगे
+१०००००
2 Feb 2017 - 9:15 am | पिलीयन रायडर
कांचन ताईंचा आ व्हिडीओ उपक्रमासाठी फार महत्वाचा आहेच. एक तर हा विषयही तसा वेगळा. त्यात कांचन ताई मिपाकर. त्यामुळे जेव्हा जुन्या मिपाकरांशी बोलणे चालु केले तेव्हा कांचन ताईंना ह्या विषयावर बोलण्याची खास वेगळी विनंती केली. मिपाकर ह्या नात्याने त्यांनी लगेच ती मान्यही केली आणि इतका सुरेख व्हिडीओ करुन दिला.
आपलं बोलणं रेकॉर्ड करुन ऐकलं की त्यातल्या असंख्य त्रुटी लक्षात येतात. अगदी कुणीही सहज आचरणात आणुन त्यावर मात करु शकेल इतकी उपयुक्त माहिती ह्या व्हिडीओत आहे.