भोजनानुभव (१) मुघल्स होटैल-ठाणे

औरंगजेब's picture
औरंगजेब in भटकंती
12 Jan 2017 - 10:05 am

काल सायंकाळी मुघल मध्ये जाणे झाले. त्याचा हा आनुभव

आमचा ग्रुप ६ जणांचा ३ वेज ३नॉनव्हेज.
सुरवात पायासुप ने आणी क्रिम अॉफ टौमॕटौ सुपने.
व्हेज मधे फक्त टोमॕटोचाच पर्याय उपलब्ध होता. मेनुतले बाकीचे व्हेजसुपचे आयटम्स तसेच फ्रेश लाईम सोडा/शितपेयेही आजिबात उपलब्ध नव्हती.

स्टारटर्स मध्ये पनीर टिक्का आणी चिकन टिक्का.!
दोन्ही स्टारटर्स उत्तम.

जेवणाचे वेळी मात्र याची त्यांनी पुरेपुर भरपाई केली.
थंडगार बटर रौटी चामट नान आणी जेवण वाढल्यानंतर २०मिनिटांनी परत परत आठवण कैल्यावर आलेला पायनॕपल रायता. आणी मेथि मटर मलई यांनी व्हैज जेवण तर कुठल्यातरी चिकनचूया डिशने नॉनव्हेज जेवण घशाखाली ऊतरवले.

जिरा राईस-डाल फ्राय चवीला उत्तम
Final review :-

स्टार्टस- ७/१०
जेवण- २.५/१०
सेवेचा दर्जा ३/१०
सहाजणांसाठी झालेले बिल रुपये ३०००/-
---------------------------------------------------------------
सल्ला- nonveg असाल तरच जेवायला जा व्हेजसाठी फार कमी पर्याय उपलब्ध आहेत. आणी हो मेनुमधले सगळे आयटम मिळतील ही अपेक्षा करु नका.
---------------------------------------------------------------

प्रतिक्रिया

अत्रन्गि पाउस's picture

12 Jan 2017 - 11:30 am | अत्रन्गि पाउस

आम्ही गेलेलो तेव्हा हॉटेल सुरु करून जेमतेम १० दिवस झालेलं ...सर्व्हिस बकवास होती पण त्यावेळी संशयाचा फायदा दिला होता...आता सुधारले नसतील तर मात्र अवघड आहे
पदार्थ जर तुम्ही म्हणता तसे असेल तर परिस्थिती ढासळली आहे असेच म्हणावे लागेल...

खरे तर त्यांनी जागा आणि इमारत ह्यात प्रचंड गुंतवणूक केलेली दिसते आहे (काही कोटी तर नुसत्या जमिनीची किंमत होईल) ...त्यामुळे हे जरा झोलिस्टिक वाटते आहे ..

किसन शिंदे's picture

12 Jan 2017 - 1:29 pm | किसन शिंदे

बाहेरून तर अगदी झकपक दिसतेय. बर्‍याच दिवसांपासून जायचा विचार सुरू होता तो आता रद्द करायला हवा.

औरंगजेब's picture

12 Jan 2017 - 2:31 pm | औरंगजेब

अत्यंत रद्दड हॉटेल आहे

गामा पैलवान's picture

12 Jan 2017 - 2:37 pm | गामा पैलवान

हाटील कुटाय? ठान्यात हाये?
-गा.पै.

किसन शिंदे's picture

12 Jan 2017 - 5:23 pm | किसन शिंदे

हरी निवास सर्कलवरून नौपाड्याला जो रोड जातो त्या रोडवर आहे पोलीस स्टेशनच्याआधी.

त्यापेक्षा गोखले बरे, भले उपासाच्या मिसळीत पागोळ्यांचं पाणी का पडत असेना! =))

औरंगजेब's picture

12 Jan 2017 - 6:53 pm | औरंगजेब

पागोळ्यांचे पाणी म्हणजे???

तो एक किस्सा आहे, आम्ही गोखल्यांकडे उपासाची मिसळ खायला गेलो असतानाचा.

औरंगजेब's picture

13 Jan 2017 - 9:05 am | औरंगजेब

अहो किस्सा सांगु सोडा हो .

किसन शिंदे's picture

20 Jan 2017 - 5:09 pm | किसन शिंदे

=)) =))

गामा पैलवान's picture

12 Jan 2017 - 7:13 pm | गामा पैलवान

सापडलं, धन्यवाद! :-)
-गा.पै.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jan 2017 - 9:01 pm | अत्रुप्त आत्मा

सांस्कृतिक , ऐति हासिक नावं दिसली , की समजून चालावं हाटेल टुकार असणार. हल्ली हा नियमच झालेला आहे.

डँबिस००७'s picture

13 Jan 2017 - 3:31 pm | डँबिस००७

औरंगजेबाने स्वतःच्या खानसाम्या क्डुन स्वतःच्या भटारखान्यात बनवलेले ताजे चविष्ठ मोघलाई जेवण करायचे सोडुन दुरदरास ठाण्यातल्या " मोघल " नावाच्या हाटीलात जाण्याच कारण काय ?

कारण औरंगजेबास तर्हेतर्हेचे उत्तम भोजन खाण्याची आवड आहे. आणी 'शाही' पदस्पर्शाने मुघल हॉटैल 'पावन'करायला गेलो होतो.

टवाळ कार्टा's picture

13 Jan 2017 - 8:19 pm | टवाळ कार्टा

उद्या पर्वा कोणी येईल का इथे, पक्षीचव घ्यायला जायचा विचार आहे

सुनील's picture

19 Jan 2017 - 6:59 pm | सुनील

जाऊन आला का?

तीर्थाशिवाय पक्ष्यास सद्गती लाभत नाही म्हणतात!