गाभा:
नमस्कार मंडळी,
पुढील महिन्याच्या दुसर्या आठवड्यात केरळमध्ये भटकंती करण्यासाठी जात आहे. प्रवासाचे जाण्या-येण्याचे बूकिंग झाले आहे, त्याचबरोबर राहण्यासाठी मुन्नार येथील क्लब महिंद्राच्या हॉटेलचे बूकिंग झाले आहे.
साधारण पाच ते सहा दिवसाच्या भटकंतीमध्ये मुन्नारमध्ये आणि जवळपास फिरण्यासाठी कोणती ठिकाणे आहेत?
तिथल्या अंतर्गत प्रवासासाठी सलग पाच दिवस एखादी गाडी बूक करण्याची सुविधा तिथे उपलब्ध होईल काय?
खरेदीसाठी मुन्नारमध्ये किंवा आसपासच्या भागात मार्केट्स आहेत का?
सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाकाहार आणि मांसाहार या दोहोंसाठी उत्तम ठिकाणे तिथे मिळतील का?
मिपाकरांपैकी तिथे जावून आलेल्यांचा अनुभव कसा होता?
प्रतिक्रिया
4 Jan 2017 - 6:41 pm | मोदक
कोचीनचे बुकिंग आहे की मुन्नार चे..?
अनेक ठिकाणे आहेत. मुन्नार जवळ टी गार्डन्स आणि एक रोज गार्डन आहे. तेथे माटुपट्टी नामक धरण आणि अगदीच नशीब जोरावर असेल तर रस्त्यावरून फिरणारे हत्ती दिसतील. (हत्ती = ट्रॅफिक जाम असेही गणित डोक्यात ठेवावे.)
अॅलेप्पी हे सगळ्यात हिट असे ठिकाण आहे जेथे हाऊसबोट वगैरे आहेत असे सगळे जण सांगतील. पण हाऊसबोटमध्ये कंटाळा येवू शकतो.
मुन्नार मध्ये मसाल्यांची खरेदी करा. आजुबाजूला स्पाईस गार्डन्स असतात तेथे मसाले महाग मिळतात तसेच अनेक केरळी औषधे विकायला ठेवलेली असतात. त्या औषधांची खरेदी सांभाळून करा.
भरपूर आहेत.
4 Jan 2017 - 8:55 pm | किसन शिंदे
मुंबई ते कोचीन अशी बूकिंग आहे. कोचीनवरून मुन्नारला जाण्यासाठी कार हायर करता येते का? किंवा तशी बससेवा तिथे उपलब्ध आहे का? ते अंतर जवळपास १३० किमी आहे.
4 Jan 2017 - 8:33 pm | सिरुसेरि
मुन्नार / पेरियार इथे चांगली चॉकलेटसही वेगवेगळ्या फ्लेवरची मिळतात . चहा , कॉफी ( कानन देवन - KDHP Brand व इतर ) , केळ्याचे वेफर्स , आयुर्वेदिक साबण , मसाले , आयुर्वेदिक तेल , औषधे प्रसिद्ध आहेत . हि खरेदी शक्यतो तेथिल स्थानिक मार्केटमधील दुकानांमधेच करावी . तिथे योग्य दरात या वस्तु विकतात . स्पाईस गार्डन्समध्ये याबाबतीत फसवणुक होउ शकते .
काहि कला संस्थांमध्ये ( उदाहरणार्थ - मुद्रा कला सेंटर) रोज संध्याकाळी एक तासाचे कथकली नॄत्य ( ५ ते ६ ) आणी कलरीपट्टु युद्धकला यांचे ( ६ ते ७ ) शोज असतात . तुमच्या हॉटेलमध्ये त्याची माहिती मिळु शकते . तसेच हॉटेलमध्येच या शोजचे बुकिंगही करता येते . बॅक वॉटर राईड , बोटिंग इथेही जाउ शकता .
कोचीन / एर्नाकुलम हि एकप्रकारे जुळी शहरे आहेत . कोचीन एअरपोर्ट पासुन जवळ कालाडी येथे शंकराचार्यांचे जन्म ठिकाण आहे . तेही बघण्यासारखे आहे . तिथुनच थोडे पुढे एक हत्तींचे संगोपन केंद्र आहे . कोचीन एअरपोर्ट पासुन जवळ वाटेवरच सोलर प्लांट आहे .
एर्नाकुलम येथील जुनी चर्चेस , म्युझीयम प्रेक्षणीय आहे . शॉपींग सेंटर्स आहेत .
5 Jan 2017 - 1:05 am | विखि
२ महिन्यापुर्वी केरळ ५ दिवसाची शॉर्ट ट्रिप केली. वैयाक्तिक्क फिरलो( नेहमी प्रमाणे) त्याचा तपशिल या प्रमाणे
पहील्या दिवशी दुपारी ३ वाजता कोचिन ऐरपोर्ट ला पोचल्यामुळ मुन्नार ला न जाता कोचिन लाच मुक्काम करणे पसंत केले ( कारण मुन्नार ला जाताना अंधार पडनारच होता, त्यामुळ रस्त्यातले सीन पाहता नसते आले त्यामुळ ऐन टाईम ला हा प्लॅन आखला, ज्या मुळ पुढ आमची जरा गोची झाली :)
आम्ही ९ जण होतो, बारका कार्यकर्ता धरुन. एक टीटी केली होती. (इथे १२ सिटर टीटी आणी १७ सिटर टीटी, एसी- नॉन एसी, एकाच भावात मिळते, १२ सिटर टीटी नसल्यामुळ आम्हाला १७ सिटर टीटी देन्यात आली, लोळत फिरलो) ५ दिवस आम्ही ति बूक केली होती. संपुर्ण ट्रिप टीटी चे साधारण १६,००० झाले.
कोचिन ला फोर्ट कोची ला मुक्काम केला होता. इथे घरगुती राहण्याची सोय चांगली आहे. घरं, हॉटेल विदेशी बनावटी ची वाटतात. पुण्यातला कोरेगाव पार्क ला आल्याचा अनुभव होतो. सगळी कडे, फॉरेनर पब्लिक. आम्हाला एक ४ रुम च मस्त घर ( छोटा बंगलाच म्हना हव तर) मिळाल राहायला, २००० घेतले त्याने, बिन्धास्त घासाघीस करा :) फोर्ट कोची जवळ तुम्ही मासे विकत घेउ शकता. आणि तिथेच बाजुला छोटेखानी हॉटेल आहेत ते किलो प्रमाणे ते बनवायचे पैसे घेतात. २०० रुपये किलो प्रमाणे. बीच बाजुलाच आहे. बरा आहे.
दुसरा दिवस मुनार ला सुटलो. मुनार रोड बघण्यासारखा आहे. चहाचे मळे, आणि वॉटरफॉल. छान. आणि खास करुन तिथली वाहतुकी ची शिस्त. मी पुण्यातला असल्यामुळ, मला फार नवल वाटलं त्याच, अजाबात हॉर्न नाय, गाड्या वेड्यावाकड्या नाय, अरुंद घाट रस्ता असुन देखील एकमेकाच्या अंगावर गाड्या न घालता स्वताहुन साईड देतात. लेन मध्येच गाड्या, जागा आहे म्हणुन उगं गाडी घालत नाय. इथली लोकं लै विनम्र वाटली.( जे बघायची सवय न्हवती)
मार्केट मधेच एक मोठी रुम मिळाली. मुनार ला फार मोठ मार्केट नाहीय. मसाले भरपुर ठिकाणी मिळतात. इथे मसाले घ्यायला हरकत नाय. व्हेज जेवण- नाश्ता, साठी मेन रोड लाच 'सरवना भवन' आहे. चांगल आहे.
मुनार ला फिरायला भरपुर आहे. टी गार्डन, फोटो पॉईंट, रोझ गार्डन, मट्टूपेट्टी डॅम ( इथे एका छोटेखानी मार्केट मधे जॅकेट, स्वेर्ट शर्ट चांगले मिळाले मला, स्वस्त न मस्त) राजामलाई नॅशनल गार्ड्न ( इथे एक वेगळीच प्रकारची बकरी बघायला मिळत, मोकळ्या फिरत असतात, आमच्या बारक्याने तिला लै त्रास दिला, लोकं बकरी सोडुन त्यालाच बघायला लागली) अजुन ही बरच आहे फिरायला. दोन दिवस मुक्काम टाकला तिथ.
मग थेक्कडी ला गेलो. केरळ ला हागलं मुतलं काय झाल की बंद पाळतात. माझे बरेच मित्र तिथले असल्यामुळ मला माहीत होत. त्यामुळ ते मला म्हणतपण होते. या ५/६ दिवसात तुला एक तरी बंद बघायला मिळलच. आणी तेच झालं. थेक्कडी ला निघालो आणि बंद मध्ये अडकलो. पण काय तो बंद. एकदम बंद म्हणजे बंदच.अजीबात दुकानाच्या शटर खालुन काय घेणं बिणं प्रकार नाय. रस्त्यात प्रत्येक चौकात त्या बंद ला सलामी द्यायची. म्हणजे गपगुमान आपली गाडी साईड ला घेऊन. दोन मिनिट मौन पाळल्यावानी थांबायच. जाताना आम्च्या सोबत एक कार होती, त्यानी एका चौकात त्या लोकांना सांगीतल की त्याच्या एका मेंबरची तब्येत बरी नाहीय. हॉस्पिटल ला जायचय. त्या चौकातुन त्याला सोडल. २ चौक नंतर तीच गाडी आम्हाला दिसली. तर गाडी शिस्तीत साईड ला लावलेली दिसली :)
तो दिवस बेक्कार गेला. लै वांदे झाले. म्हणल थेक्कडी मध्ये गेल्याबर बघु. तर तिथ पण सगळ बंद. संध्याकाळी ६ नंतर मार्केट उघडेल असं कळालं. थेक्कडी ला पेरियार लेक बघण्यासारखा आहे. थेक्कडी ला लेक रोड ला खाण्यासठी बांबु कॅफे चांगल आहे. खास करुन इडली, डोसा खाउन कंटाळा आल्यावर. बनाना चिप्स घ्यायला थेक्कडी चांगल आहे. स्पा आहे, एलीफंट राईड आहे, कथकल्ली, कलारी फाईट चा स्पेशल शो आहे, बनाना चिप्स लै आहे, पेरियार लेक मस्त.
थेक्कडी ला प्रमुख आकर्षण असलेलं जंगल सफारी. त्यासाठी भरपुर प्रकारच्या सफारी जीप आहेत तिथं. हव्या त्या भावात. पण शेठ, या साठी थोडे जास्ती पैसे गेले तरी चालतील पण फक्त आणि फक्त ४ व्हील ड्राईव असलेली जीप घ्या. अहो पैसा वसुल ना.
बाकी नॉर्मल जीप प्लेन रोड पकड्तात. ही बाई कुठ्ल्यापण टेकाडावर चढतीय. आमचा ड्रायवर मला खिजावल्यागत विचारत होता. '' सर, प्लेन रोड से चलना या, हिल से'' म्हणल ''घे टेकाडा वरुन, च्यायला आपण बी काय नुसतं वरणभात खाल्लेला नाय, पुण्यात्ल्या ड्रायवर ला काय विचारतो '' बाबाने खरचं घातली की टेकाडवर गाडी. च्यायला. हवा टाईट ना भाऊ. आमच्या सोबत माझा ५ वर्षाचा बारका ते ६० क्रॉस केलेले मेंबर पण होते. सगळे बेक्कार हलत होत. फुल बॉडी मसाज. एक टेकाड सोडलं नाय भावड्यानं. असं वाटायचं गाडी आता पलटी होईल, आता पलटी होईल पण नाय झाली. टेकाड पाहील्यावर वाटायच, जीप कशी चढल याच्यावर. ४ व्हील ड्राईव जीप लैच भारी पण आरामात चढायची. थोडे पैसे जातात पण वसुल.
तिकडुन आम्ही डायरेक्ट आलेप्पी ला निघालो. आलेप्पी ला हाउसबोट सोडलं तर फार काय नाहीय. आमच्या मेंबर ला त्यात रहाण्याचा फार रस न्हवता मग आम्ही ४ तासाची एक राईड घेतली. एका कॉर्नर ला हाउसबोट लावतात, आणि मग स्टे. आता हे ज्याची त्याची आवड आहे म्हणा. राहायच का नाय त्यात. हाउसबोट मध्ये राहण्याचे पैसे पण काय्च्या काय घेतात. आमच्या मेंबर ला त्या कॉर्नर च्या मचाळ पाण्यात स्टे ला काय ईन्टरेस्ट नाय वाटला. पैसा खर्च करायची तयारी असल्यास हरकत नाय. त्या राईड मध्ये पाण्याच्या कडं ला काही लोक्कांची घरं आणि हॉटेल आहेत तिथ थोडा वेळ चहा पाण्याला बोट थांबवतात. एका ठिकानी तर तिथ एक पाळिव गरूड ठेवलाय. लोकांना आकर्षण म्हणुन. आम्च्या बारक्यानी पण गरुड खांद्यावर बसवला जरा वेळ.
आलेप्पी ला आमचा मुक्काम होता पण प्लॅन चेन्ज करुन आम्ही कोचिन ला गेलो. दुसर्या दिवशी आमची गाडी तिकडुनच होती. रात्री कोचीन ला पोचलो.
सकाळी उठल्यावर मस्त कोचीन फिरलो. मुद्दाम पब्लिक ट्रान्सपोर्ट ने फिरलो. इथ्ल्या बर्यापैकि बसला काचा नाहीयेत. ताडपत्री असतात. कोचिम मार्केट बरचं मोठयं. किरकोळ खरेदीला मेनका मार्केट बरंय.
ओवरऑल केरळ चांगलं वाटलं. लोकं चांगली आहेत, मुनार, थेक्कडी मस्त. खाणं पण चांगलय.
5 Jan 2017 - 10:20 am | किसन शिंदे
विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!
मुन्नार ते थेक्कडी गाडीचे पैसे किती घेतात? तीच गाडी संपूर्ण दिवसभर घेता येते का?
5 Jan 2017 - 9:48 pm | सही रे सई
मस्त प्रतिसाद.. जुन्या दिवसांची आठवण आली आणि केरळ मध्ये फिरलेल्या ठिकाणी परत एकदा फिरून आले तुमच्या मुळे ..
5 Jan 2017 - 10:06 am | अनुप ढेरे
मुन्नारजवळचं ते बकरीचं अभयारण्या भारी आहे. लॉर्ड ऑफ द रिंग्समधल्या शायरमध्ये गेल्यासारखं वाटतं.
5 Jan 2017 - 12:17 pm | अमर विश्वास
केरळमध्ये फिरण्यासाठी KTDC ची गाडी वापरा ....
मी अनेक वेळा वापरली आहे . पाहिजे तितके दिवस बुक करता येते. चार्जेसही रिझनेबल आहेत.
मुख्य म्हणजे त्यांना सर्व रस्ते (व इतर गोष्टी) माहीत असतात. तसेच त्यांना प्रशिक्षणही दिलेले असते.
5 Jan 2017 - 2:25 pm | सुखी
किसन देवा,
क्लब महिंद्रा चे रिसॉर्ट मुन्नार गावापासून अल्मोस्ट 25km दूर आहे... क्लब महिंद्रा शिवाय जेवणाचा पर्याय उपलब्ध नाही...
मुन्नार मध्ये ५ दिवस कंटाळवाणे असू शकतात, पण आवड आपली आपली...
अंतर्गत प्रवासासाठी गाडीची उत्तम सोय होते.. हवा असल्यास नंबर देतो, मी नोव्हेंबर २९ ला ७ दिवस प्रवास करून परत आलोय...
5 Jan 2017 - 4:00 pm | किसन शिंदे
नंबर द्या, फोन करून माहिती घेतो.
8 Jan 2017 - 2:33 pm | सुखी
केला आहे
5 Jan 2017 - 3:32 pm | कबीरा
मुन्नार मध्ये आणि आजूबाजूस भटकणे मिळून ५ दिवस खरंच खूप आहेत. तस बघायला गेलं तर २ दिवस पण खूप झाले मुन्नार मध्ये. spice गार्डन & tea museum बघा. जरूर बघा असे सांगणार नाही कारण फारसे काही अरे वा क्या बात हे अश्यातला प्रकार नाही. मुन्नार मध्ये प्रवेश करायच्या थोडे अलीकडे punarjani traditional village नामक प्रकार आहे तिथे कथकली आणि kalaripayattu चा एक तासाचा शो असतो संध्याकाळी. तिकीट साधारण २०० ते ३०० रुपये माणशी. पारंपरिक साड्या बनवण्याचा कारखाना पण जवळच आहे तिथून तो पण बघता येईल. तिथे साड्या खरेदी पण करतात. साधारण बजेट मधले भाव आहेत. खादाडी करायची हौस असेल तर मुन्नार भ्रमनिरास करू शकेल. ( हे आपले माझे मत).
8 Jan 2017 - 2:36 pm | यशोधरा
बरं, तू फिरुन वगैरे आलास की सगळी माहिती व्यवस्थित पुरव, इथे मिपाकरांनी लिहिलेच आहे, तू भर घाल. मग मी जाईन फिरायला तिथे :P
8 Jan 2017 - 2:52 pm | वरुण मोहिते
पण भारतात कुठेही क्लब महेंद्र ची जागा लांब आहे आणि जेवण महाग आहे हे लक्षात असुद्या .लोणावळ्या पासून उदाहरण आहेत .बाकी लोकेशन छान आहे क्लब च केरळ चा पण त्यामुळे बुकिंग झाल असेल तर जाऊन या . ५ दिवस थोडे जास्त आहेत मुन्नार ला . अवांतर -थेक्कडी चा सरोवर पोर्टिको मस्त आहे .