आज Whatsapp वर आलेला हा संदेश माहितीसाठी आणि चर्चेसाठी येथे टाकत आहे --------------
लेखक माहित नाही ---
------------ संदेश -------------
*राशी भविष्य फल २०१७ व विशेष माहिती सप्रेम भेट*
श्री गणेशाय नमः
राशी भविष्य पाहताना सर्वांनाच प्रश्न पडतो की राशी भविष्य हे जन्मराशीने पाहवे की नावराशीने पाहवे या विषयावर शास्त्रत असा मंत्र आहेत
मंत्र:- "विवाह सर्वमांनल्येयात्रादौ ग्रहगोचरे| जन्मराशेः प्रधानत्वं नाम राशिं न चिंतयेत्॥
अर्थात:- विवाह कार्य, सर्वच मंगलकार्य, मुहूर्त, यात्रा, दिन मान, ग्रहगोचर हे सर्वच जन्मराशी ने पाहवे व नामराशी चा
मंत्र:-"देशग्रामेगृहेयुध्देसेवायां व्यवहारके| नामराशेः प्रधानत्वंजन्मलाशी न चिंतयेत्॥
अर्थात:- देश, ग्रामवास, नगर, घर, युद्ध, सेना, न्यायालय, कोर्ट, रजिस्ट्रीकरण, बॅक व्यवहार, यासाठी नामराशि ने पाहवे
असे शास्त्र सांगते.
हे राशी भविष्य आपल्या जन्मराशीनुसार बघावे. जन्माच्या वेळी जी राशी लग्न राशी, चंद्र राशी अथवा रवी राशी बलवान असेल त्याप्रमाणे तुमचा स्वभाव बनतो आणि त्याप्रमाणे परिस्थिती तुम्हाला फळ देते. ज्योतिषामध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. एक तुम्ही स्वतः आणि तुमचे प्रयत्न. दुसरे म्हणजे तुमच्या आजूबाजूची परिस्थिती आणि तिसरे म्हणजे तुमचे आजूबाजूच्या परिस्थितीशी असलेले नाते. या तिघांच्या समन्वयामधून निर्माण होते तिला वस्तुस्थिती म्हटले जाते. तुमचा या तिघांचा अभ्यास जितका चांगला तेवढे तुम्हाला यश मिळणे सोपे जाते. उद्योग ज्योतिष हे उद्योजकांसाठीच लिहिलेले आहे. व्यवसायात अनेक गोष्टी अशा असतात की, ज्यांच्यावर आपला कोणताही प्रभाव नसतो, परंतु आपण तीन गोष्टी करू शकतो. भविष्याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे तयारी करणे, आल्या परिस्थितीला तोंड देणे किंवा स्वत:ला त्यापासून वाचवणे. आपण पहिल्याला गरुड, दुसर्याला वाघ आणि तिसर्याला कासव म्हणू या. आपण आपापल्या स्वभावानुसार, परिस्थितीनुसार, रुचीनुसार आपला मार्ग शोधायचा प्रयत्न असतो
या वरून समजले असेल अशी आशा करतो जर जन्मराशी माहीती नसेल तर नामराशी ने भविष्य पाहवे.
या नाव अक्षरा खाली वर्षफल व उपाय दिले आहे यातिल राहू/केतु साठीतील(मदीराचा) उपाय हा फक्त पुरूषांनी करवा व स्त्रीयानी कुलदेवताची उपसना करावी
राशीनुसार नावाचे अक्षर
तुमच्या नावाचे पहिले अक्षर कोणत्या राशी अंतर्गत येते आणि इतर राशींचे नाव अक्षर…
मेष- चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ
वृष- ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो
मिथुन- का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह
कर्क- ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो
सिंह- मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे
कन्या- ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो
तूळ- रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते
वृश्चिक- तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू
धनु- ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे
मकर- भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी
कुंभ- गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा
मीन- दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची
मेष :2017
शुभ रंग : लाल, निळा
शुभ दिवस : मंगळवार, शनिवार
शुभ दिशा : पूर्व
शुभ रत्न : पोवळे , दान : मूग
वैशिष्ट्ये : धडाकेबाज, परंतु फारसा विचार न करता उडी
मारण्याची प्रवृत्ती प्रकर्षाने दिसून येते.
एकशब्दी विवरण : धडाकेबाज. उदाहरणार्थ, प्रेरणादायी
वक्ते, मलम विक्रेते, एल.आय.सी. एजंट
उत्तम काळ : नोव्हेंबर, डिसेंबर, जुलै, ऑगस्ट
मेष (Mesh)
मेष राशी भविष्य 2017
आकाशातील ग्रहांची तुमच्यासाठी या वर्षासाठी विशेष योजना आहे. सुरुवातीला तुमच्यातील उर्जा आणि उत्साह प्रचंड प्रमाणात वाढीस लागेल. आश्चर्यकारकपणे तुम्हाला धार्मिक कार्यांमध्ये अधिक रुची असल्याचे जाणवेल. त्याचप्रमाणे तुम्ही काही दीर्घकालीन कामाच्या योजना आखाल. पण तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या कुटुंबीयांचा विचार करता तुमच्या मुलांना आरोग्याच्या समस्या भेडसावतील. या कालावधीत तुमची सगळी अपूर्ण कामे पुन्हा सुरू होतील आणि तुमच्या मित्राच्या मदतीने पूर्ण होतील. २०१७ च्या राशी भविष्यानुसार तुम्ही केलेल्या कष्टाचे फळ मिळू लागेल; आणि जून महिन्यानंतर यश मिळण्याच्या प्रमाणात वाढ होईल. असे असले तरी तुम्ही तुमच्या जवळच्या माणसांशी वादविवाद करणे टाळले पाहिजे. रागावर नियंत्रण ठेवा; नाही तर सर्व धुळीस मिळेल. तुमच्या आर्थिक स्थितीचा विचार करता, मुलांना अचानक पैशाची गरज भासेल. वर्षाच्या अखेरपर्यंत तुमची प्रतिष्ठा उंचावेल आणि तुम्हाला उत्पन्नाचे अधिक स्रोत मिळतील. तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमचा व्यवसाय वाढविण्याच्या संधी तुम्हाला प्राप्त होतील. पण तुम्ही तुमच्या ऐषोआरामाच्या गोष्टींवर खर्च कराल.
तुम्ही तुमच्या कष्टाने पैसा कमवाल असे दिसत आहे. अनेक गोष्टी अधिक चांगल्या करण्यासाठी तुमचे पालक तुम्हाला मदत करतील. कामाच्या नवीन योजना आखल्या जातील, ज्यात तुम्ही यशस्वी व्हाल. त्याचप्रमाणे तुम्ही तीर्थयात्रेला जाण्याचीही शक्यता आहे. तुमच्यातील धाडस वाढल्याने तुमचा आत्मविश्वासही वाढलेला असेल. त्याचप्रमाणे तुमच्या नशीबात सुधारणा घडविण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनात समतोल साधता आला तर उत्तम राहील. तुमच्या प्रियकराला/प्रेयसीला अधिक वेळ द्या आणि शक्य झाल्यास फिरायला जाण्याची योजना आखा. आरोग्याचा विचार करता, तुम्ही सतर्क राहणे आवश्यक आहे.
उपाय :
मेष राशीला गोचर ग्रह भ्रमण व उपाय
गुरू:- 12 सप्टेंबर नंतर 7 वा(शुभ)
शनि:- 26 जानेवारी नंतर 9 वा (शुभ)
केतु:- 8 सप्टेंबर नंतर 4 था (अशुभ)
उपाय-
1}गुरू ग्रहसाठी उपाय श्री पिपंळ वृक्षाला रोज 21 प्रदक्षिणा करा व गुरुवारी फक्त फल आहार करवा
2} या काळात विद्यार्थीजांना अभ्यास आळस असणार त्यामुळे त्यांनी श्री गनपती ची दर्शन करावे
3}केतुसाठी उपाय या राशीला 18 महिने खराब आहेत एकदा तिरूपति श्रीबालाजी दर्शन करणे व या अठरा महिन्यात कोणत्याही मंगळवार पासुन 43 दिवस मदीरा(दारू) घेऊन डोक्यावरून असल्याने उजव्या काना कडून डाव्या काना कडून 7 वेळा ॐ केतु नमः असा मंत्र म्हणून फिरवून जल प्रवाह(समुद्र,नदी,तलाव,विहीर) टाकावे व
विष्णुसहस्त्रनाम हे रोज वाचवे किंवा आयकावे.
2} श्रीविष्णु पुजा करवी
3}घरात फिश टँक ठेवावा व फिशला फुड द्यावे
आपण नव वर्षाच्या आरंभ पासुन नविन
संकल्प करू रोज न चुकता आपल्या देवता स्वरूप आईवडिलांचा पाया डोके ठेवून दर्शन करा या उपायाने आपणास
एकही ग्रहची पिडा होणार नाही ही विनंती...
वृषभ :2017
शुभ रंग : पांढरा, पिवळा
शुभ दिवस : शुक्रवार, रविवार
शुभ दिशा : पूर्व
शुभ रत्न : हिरा, झिकॉन, दान : तांदूळ
वैशिष्ट्य : चांगला आवाज, चांगल्या वस्तूंची आवड आणि कलासक्तता यांच्यात दिसून येते. बैठकीच्या शेवटच्या सत्रात जोरकसपणे आपली बाजू मांडतात.
उदाहरणार्थ : जमीनदार, आचारी, लँडस्केप डिझायनर
उत्तम काळ : डिसेंबर, जानेवारी, जुलै, ऑगस्ट
एकशब्दी विवरण : हट्टी
वृषभ (Vrishabha)
वृषभ राशी भविष्य 2017
ग्रहांची स्थिती पाहता या वर्षी तुम्हाला वरिष्ठांची आणि महिलांची मदत लाभेल. पैशाची आवक नेहमीप्रमाणे सुरू राहील; आणि तुम्ही मनोरंजनावर आणि चैनीच्या गोष्टींवर जास्त खर्च कराल. असे असले तरी तुम्हाला अचानक धनलाभ संभवतो. पण दुसरीकडे तुमचा खर्चही वाढेल. ज्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नसतील, त्या या वर्षाच्या मध्यावर सुरळीत होतील. या सगळ्यासोबत तुमच्यातील धाडसी वृत्ती वाढेल. या वर्षीच्या भविष्यानुसार तुम्हाला उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. गुंतवणूक केलेल्या रकमेतून लाभ मिळेल. शेअर बाजार किंवा योग्य गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा मिळेल. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवले तर तुमची बचत आणि नफा या दोन्हीत वाढ होईल. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या वडिलांकडून आणि मार्गदर्शकांकडून सन्मान आणि सहकार्य मिळेल.
तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्या तुम्हाला मदत करतील. मुले तुम्हाला आनंद देतील. तुमच्या जोडीदाराशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे तुमच्या जोडीदाराच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्या. असे असले तरी हा कठीण कालावधी फार थोडा काळ असेल आणि तुमचा जोडीदार लवकर बरा होईल. तुम्ही एकटे असाल तर तुम्हाला नवा जोडीदार लाभेल. तुमचे एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल तर हे नाते अधिक घट्ट होईल. या वर्षाच्या अखेरपर्यंत आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. गुंतवणूक केलेल्या पैशातून नफा मिळेल. वायफळ खर्च टाळलात तर तुमच्या बचतीमध्ये आणि नफ्यात वाढ होईल. तुमच्या वडिलांकडून आणि मार्गदर्शकांकडून आर्थिक मदत मिळेल. तुम्हाला आरोग्याची फार काळजी करण्याची आवश्यकता नाही. परंतु चुकीच्या राहणीमानामुळे तुम्हाला वात, अपचन इत्यादी त्रास होऊ शकतो. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात गंभीर आजार होऊ शकतो. तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर या वर्षात नियंत्रण ठेवा. ऋतू बदलल्यावर होणाऱ्या परिणामांचा तुम्हाला त्रास होऊ शकेल. असे असले तरी त्याबाबत तुम्ही फार चिंता करायची आवश्यकता नाही.
वृषभ राशीला गोचर ग्रह भ्रमण
गुरू:- 12 सप्टेंबर नंतर 6 वा(मध्यम)
शनि:- 26 जानेवारी नंतर 8 वा (अशुभ)
राहू/केतु:- 8 सप्टेंबर नंतर (शुभ)
राशीला उपाय:-
1}या काळात श्रीक्षेत्र गाणगापुर येथे जाऊन श्रीगुरू नृसिंहसरस्वती महाराजांचे दर्शन घेणे व घरात श्रीगुरूचरित्र पारायण करावे
2}श्री पिपंळ वृक्षाला रोज 21 प्रदक्षिणा करा व गुरूवारी फक्त फल आहार करवा.
3} राहू/केतु या राशीला 18 महिने खराब एका तिरूपति श्रीबालाजी दर्शन करणे व या अठरा महिन्यात कोणत्याही मंगळवार पासुन 43 दिवस मदीरा(दारू) घेऊन डोक्यावरून (कारण राहू ग्रह हा फक्त मुख) असल्याने उजव्या काना कडून डाव्या काना कडून 7 वेळा ॐ राहूवे नमः असा मंत्र म्हणून फिरवून जल प्रवाह(समुद्र,नदी,तलाव,विहीर) टाकावे व
विष्णुसहस्त्रनाम हे रोज वाचवे किंवा आयकावे.
4} 9 जानेवारी नंतर श्रीविष्णु पुजा करवी
5}घरात फिश टँक ठेवावा व फिशला फुड द्यावे
शनि उपाय
1}शनि ग्रहसाठी उपाय श्री पिपंळ वृक्षाला रोज 21 प्रदक्षिणा करा व शनिवार फक्त फल आहार करवा
2} रोज श्री हनुमान चालीसा पाठ करावा
3}रोज संध्याकाळी पिपंळ वृक्ष किवा
शमी वृक्षा खाली दिवा लावावा अथवा या दोन्ही वृक्षाचे पुष्य नक्षत्रावर किंवा श्रवण
नक्षत्रावर हे वृक्ष लावावी
आपण नव वर्षाच्या आरंभ पासुन नविन
संकल्प करू रोज न चुकता आपल्या देवता स्वरूप आईवडिलांचा पाया डोके ठेवून दर्शन करा या उपायाने आपणास
एकही ग्रहची पिडा होणार नाही ही विनंती...
मिथुन :2017
शुभ रंग : हिरवा, लाल
शुभ दिवस : बुधवार, गुरुवार
शुभ दिशा : उत्तर
शुभ रत्न : पाचू , पेरीदोत, दान : गहू
वैशिष्ट्ये : यांना नवनवीन गोष्टी शिकण्याची आणि करून बघण्याची आवड असते.
उदाहरणार्थ : लेखक, पत्रकार, तांत्रिक समर्थक / मदतगार
उत्तम काळ : नोव्हेंबर, डिसेंबर, सप्टेंबर
एकशब्दी विवरण : बडबड्या
मिथुन (Mithun)
मिथुन राशी भविष्य 2017
या वर्षाच्या सुरुवातील तुमचे कौटुंबिक आयुष्य आर्थिक दृष्ट्या सामान्य असेल. काही चढ-उतार संभवतात. असे असले तरी वर्षाच्या सुरुवातीला काही नवीन समस्या उद्भवू शकतील. पण या वर्षाच्या मध्यावर तुम्हाला काही प्रामाणिक व्यक्ती भेटतील. तुम्ही ठरवलेले काम पूर्ण होईल. तुमच्या कामाचा दर्जा पाहून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल आणि तुमचे शत्रूसुद्धा तुमच्या अपरोक्ष तुमची प्रशंसा करतील. असे असले तरी संपत्तीशी संबंधित काही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमची गुपिते तुमच्या सहकार्यांनी न सांगणेच व्यवहार्य आहे. तुमच्या कामाबाबत तुम्ही आनंदी आणि उत्साहित असाल हेच तुमचे भविष्य दर्शवते. व्यावसायिकांबाबत बोलायचे झाल्यास त्यांच्या दु:खाची कारणेच त्यांच्या आशेमध्ये बदलतील. त्यामुळे धाडसाने पुढे चालत राहा. तुमच्याविरुद्ध एखादा खटला असेल तर या वेळी तुम्ही त्यातून सुटाल. भविष्यातील कामाच्या चांगल्या योजना तयार होतील. देव, मार्गदर्शक आणि विद्वानांची तुम्ही भक्ती कराल. त्यामुळे तुमच्या मार्गातील सर्व अडथळे निघून जातील. लॉटरी किंवा जुगारपासून चार हात लांब राहिलेलेच चांगले राहील. त्याचप्रमाणे एखाद्या बाबतीतील तुमचा नफा आणि मालकी हक्क सोडू नका, कारण याच वेळी तुमच्या हाती काहीतरी मोठे घबाड लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमच्यावरून उडालेला विश्वास तुम्ही परत मिळवाल आणि गुंतवणुकीमधून तुम्हाला लाभ होईल.
वर्षाअखेरीस सर्व समस्या सुटतील. तुम्हाला उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. तुम्ही या वर्षी रोखीने काही महागड्या वस्तू विकत घेतल्यात, तर तुम्हाला फायदाच होईल. परंतु या वर्षी तुम्ही विचारपूर्वक गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला नफा होण्याची शक्यता आहे. या वर्षीच्या भविष्यानुसार तुम्ही नवे वाहन अथवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक कराल. पैशाचा ओघ सुरू असल्याने तुम्हाला चणचण भासणार नाही. तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला जरा जास्त मेहेनत करावी लागेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावरील कामाचा भार वाढलेला असेल; त्यामुळे तुमच्यावर दबाव निर्माण होईल. अशा परिस्थितीत तुम्ही संयम राखणे आवश्यक आहे. वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीमध्ये तुमच्या सर्व समस्या कमी होतील. तुमच्या कष्टाबद्दल तुम्हाला सन्मान आणि प्रशंसा मिळेल. तुमच्या वागणुकीत थोडासा बदल केलात तर तुमच्या फायद्यात वाढ होईल
मिथुन राशीला गोचर ग्रह भ्रमण
गुरू:- 12 सप्टेंबर नंतर 5 वा (शुभ)
शनि:- 26 जानेवारी नंतर 7 वा (शुभ)
राहू:- 8 सप्टेंबर नंतर 8 वा (अशुभ)
राशीला उपाय:-
1}12 सप्टेंबर पर्यंत या काळात श्रीक्षेत्र गाणगापुर येथे जाऊन श्रीगुरू
नृसिंहसरस्वती महाराजांचे दर्शन घेणे व घरात श्रीगुरूचरित्र पारायण करावे
2}श्री पिपंळ वृक्षाला रोज 21 प्रदक्षिणा करा व गुरूवारी फक्त फल आहार करवा.
आपण नव वर्षाच्या आरंभ पासुन नविन
संकल्प करू रोज न चुकता आपल्या देवता स्वरूप आईवडिलांचा पाया डोके ठेवून दर्शन करा या उपायाने आपणास
एकही ग्रहची पिडा होणार नाही ही विनंती...
कर्क :2017
शुभ रंग : पांढरा, चंदेरी
शुभ दिवस : सोमवार, शुक्रवार
शुभ दिशा : उत्तर
शुभ रत्न : मोती, दान : चणे
वैशिष्ट्य : अतिशय भावनाशील. यांना मोजकेच, पण अगदी जिवाभावाचे मित्र असतात.
उदाहरणार्थ : सुविधा व्यवस्थापन, बालरोगतज्ज्ञ, मानव संसाधन पुरवठादार.
उत्तम काळ : फेब्रुवारी, मार्च, ऑगस्ट
एकशब्दी विवरण : मायाळू
कर्क (Karka)
कर्क राशी भविष्य 2017
या वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत तुम्हाला काही समस्या भेडसावतील. काम करताना त्यांनी आपल्या कनिष्ठांशी सकारात्मक संबंध राखणे आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला खूप आनंद मिळेल आणि तुमच्या आप्तेष्टांकडून तुम्हाला पुरेसे सहकार्य मिळेल. तुम्ही विचारपूर्वक गुंतवणूक केलीत तर तुम्हाला त्यातून अर्थार्जन करता येऊ सकते. हे वर्ष व्यावसायिकांसाठीसुद्धा चांगले आहे. जोखमीच्या व्यवहारांत गुंतवणूक न करण्याचा सल्ला तुमच्यासाठी आहे. कोणाशीही पैशाची देवाणघेवाण करताना तुम्ही सजग राहणे आवश्यक आहे. उत्साहाच्या भरात घेतलेला कोणताही निर्णय तुम्हाला धोकादायक ठरू शकतो. हे वगळता, तुम्हाला घरातील शुभ कार्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळेल आणि कौटुंबिक समस्या सुटतील.
तुम्ही नव्या कामांच्या योजना आखाल आणि त्यात तुम्हाला यश लाभेल. जुगार, लॉटरी यासारख्या व्यसनांपासून लांबच राहा. तसे न केल्यास तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सप्टेंबर महिन्यानंतर नशीब तुम्हाला प्रत्येक प्रसंगी साथ देईल. तुम्ही राजकारणात असाल तर तुमची कीर्ती सर्वत्र पसरेल. नव्या मैत्रीने तुम्हाला आनद मिळेल. ऑक्टोबर ते नोव्हेंबरदरम्यान जे काही कराल ते विचारपूर्वक करा. नाही तर तुम्ही काही संधी घालवून बसाल. अनेक नवी नाती जोडाल आणि काही चांगल्या घडामोडी तुमच्यावरील ताण कमी कतील. वेदिक ज्योतिषशास्त्र २०१७ च्या भविष्यानुसार उत्पन्नाचे नवे स्रोत तुम्हाला मिळतील आणि नव्या गोष्टींमधील तुमची रुची वाढेल. लांबचे प्रवास टाळा. तुमच्या प्रेमजीवनाबाबत बोलायचे झाल्यास, तुमचे नाते अधिक दृढ होईल आणि तुमचा जोडीदार तुम्हाला खूप सहकार्य करेल. तुमच्या कामात प्रगती होण्याची शक्यता आहे. अडकलेला पैसा परत मिळाल्यामुळे तुमच्यावरील भार हलका होईल. तुमच्या कुटुंबात शांतता आणि एकोपा नांदेल. रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांना यश लाभेल. त्याचप्रमाणे ज्यांना आपली नोकरी बदलायची आहे त्यांना नव्या संधी मिळतील.
कर्क राशीला गोचर ग्रह भ्रमण
गुरू:- 12 सप्टेंबर नंतर 4 था(अशुभ)
शनि:- 6वा (मध्यम)
गुरु ग्रह अशुभ प्रभाव असल्यास खालील उपाय करावे
बर्याच वेळा वेळी अवेळी एखादे ग्रह अशुभ फल देतात, अशात त्यांची शांती करणे गरजेचे असते. गुरु ग्रहाच्या शांतीसाठी काही शास्त्रीय उपाय दिले आहे. यातून एखादा उपायही तुम्ही केला तर तुमच्या अशुभतेत नक्कीच कमी येऊन शुभ फल मिळण्यास सुरुवात होते.
ग्रहांच्या मंत्रांची जप संख्या, द्रव्य दानाची सूची इत्यादी सर्व प्रकाराची माहिती आपणास देत आहे. मंत्र जप स्वतः करावा किंवा एखाद्या ब्राह्मणाकडून करवून घ्यावा. दान द्रव्याच्या यादीत दिले गेलेले पदार्थांना दान करण्याच्या व्यतिरिक्त त्यात लिहिलेले रत्न-उपरत्नांच्या अभावात जडी बूटींना विधिवत स्वतःधारण करावे, याने शांती मिळेल.
1}या काळात श्रीक्षेत्र गाणगापुर येथे जाऊन श्रीगुरू नृसिंहसरस्वती महाराजांचे दर्शन घेणे व घरात श्रीगुरूचरित्र पारायण करावे
2}श्री पिपंळ वृक्षाला रोज 21 प्रदक्षिणा करा व गुरूवारी फक्त फल आहार करवा.
गुरुसाठी वेळ : संध्या समय सर्वात उत्तम.
महादेवाचे पूजन केले पाहिजे. श्रीरुद्राचा पाठ करावा. गुरुच्या बीज मंत्राचा संध्या वेळेस 19,000 जप 40 दिवसात पूर्ण करावे.
मंत्र : 'ॐ ग्रां ग्रीं ग्रौं स: गुरुवे नम:।
स्त्रीयासाठी मंत्र :- श्री बृहस्पति नमः
हा मंत्रचा जप करावा.
दान-द्रव्य : पुष्कराज , सोनं, कांसी, चण्याची डाळ, खांड, तूप, पिवळा कपडा, पिवळे फूल, हळद, पुस्तक, घोडा, पिवळ्या फळांचे दान केले पाहिजे.
गुरुवारी उपास करायला पाहिजे.
1}शनि ग्रहसाठी उपाय श्री पिपंळ वृक्षाला रोज 21 प्रदक्षिणा करा व शनिवार फक्त फल आहार करवा
2}रोज श्री हनुमान चालीसा पाठ करा
3}रोज संध्याकाळी पिपंळ वृक्ष किवा
शमी वृक्षा खाली दिवा लावावा अथवा या दोन्ही वृक्षाचे पुष्य नक्षत्रावर किंवा श्रवण
नक्षत्रावर हे वृक्ष लावावी
आपण नव वर्षाच्या आरंभ पासुन नविन
संकल्प करू रोज न चुकता आपल्या देवता स्वरूप आईवडिलांचा पाया डोके ठेवून दर्शन करा या उपायाने आपणास
एकही ग्रहची पिडा होणार नाही ही विनंती...
सिंह :2017
शुभ रंग : पांढरा, हिरवा
शुभ दिवस : रविवार, शुक्रवार, बुधवार
शुभ दिशा : पूर्व
शुभ रत्न : माणिक, स्पिणेल, दान : उडीद
वैशिष्ट्य : यांना दुसर्यांवर छाप पाडायला फार आवडते आणि जमतेदेखील.
उदाहरणार्थ : गुंतवणूक सल्लागार, जादूगार, फॅशन डिझायनर.
उत्तम काळ : डिसेंबर, फेब्रुवारी, मार्च, सप्टेंबर, ऑक्टोबर.
एकशब्दी विवरण : इम्प्रेस्सिएनिस्त ( शैलीदार )
सिंह (Simha)
सिंह राशी भविष्य 2017
तुम्हाला अर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा. वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीमध्ये तुमचे नशीब अधिक चांगले असेल. तुम्ही केलेल्या कष्टाच्या तुलनेत तुम्हाला अधिक उत्पन्न मिळेल. व्यावसायिकांना या वर्षी चांगला नफा मिळेल. प्रॉपर्टीच्या व्यवहारांशी संबंधित लोकांनी या वर्षी त्यांच्या आजूबाजूला काय घडत आहे, याबाबत सजग राहणे आवश्यक आहे. शेअर बाजारात केलेली गुंतवणूक लाभादायक ठरू शकते. तुम्हाला त्यातून अनपेक्षित लाभ मिळू शकतो. पण तुम्हाला या वर्षाच्या मध्यापर्यंत थांबावे लागेल. तुमच्या मुलांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास त्यांना काही आरोग्याच्या तक्रारी भेडसावतील. तुमच्या जोडीदाराशी असलेल्या संबंधांमध्ये समतोल राखणे आवश्यक आहे. तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. विद्यार्थ्यांबाबत बोलायचे झाल्यास, हे वर्ष त्यांच्यासाठी खूप चांगले असणार आहे आणि बँकिंग आणि व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी उत्तम असेल. तुम्ही थोडे जरी कष्ट केले असतील तरी तुम्हाला त्याचा पूर्ण परिणाम दिसून येईल. शिक्षकांशी तुमचे चांगले संबंध राहतील आणि तुम्हाला शैक्षणिक यश मिळेल. नोकरदार व्यक्तींसाठीसुद्धा हे वर्ष चांगले असणार आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल तरी तुम्हाला सहकार्य, प्रशंसा आणि तुम्ही प्रतीक्षा करत असलेल्या बाबींची पूर्तता होईल.
तुम्ही जे काही सुरू कराल, ते योग्य वेळेत पूर्ण होईल. तुम्ही पवित्र कार्य योजल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील. तुमच्या नोकरीव्यतिरिक्त इतर स्रोतांमधून तुम्हाला लाभ मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगल्या ऑफर मिळतील. त्याचबरोबर तुमच्या मार्केटिंगच्या कौशल्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायात खूप नफा कमवाल. तुम्ही योजलेले काम वेळेत पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. सिंह राशीच्या २०१७ च्या राशीभविष्यानुसार कामात प्रगती होणार आहे. अधिक लक्ष देऊन काम केल्यास तुम्हाला अधिक लाभ मिळतील. शत्रूपासून सावध राहा आणि त्यांच्याशी चातुर्याने व्यवहार करा. विश्वासू व्यक्तीकडून विश्वासघात संभवतो. लांबच्या प्रवासातून लाभ होईल. महिलांसाठीही हे वर्ष यशाचे असणार आहे. हा कालावधी चांगला असल्यामुळे त्याचा सदुपयोग करा.
सिंह राशीला गोचर ग्रह भ्रमण
गुरू:- 12 सप्टेंबर नंतर 3 वा(शुभ)
शनि:- 26 जानेवारी नंतर 5 वा (शुभ)
राहू:- 8 सप्टेंबर नंतर 12 (अशुभ)
उपाय:-
1}शनि ग्रहसाठी उपाय श्री पिपंळ वृक्षाला रोज 21 प्रदक्षिणा करा व शनिवार फक्त फल आहार करवा
2} रोज श्री हनुमान चालीसा पाठ करा
3}रोज संध्याकाळी पिपंळ वृक्ष किवा
शमी वृक्षा खाली दिवा लावावा अथवा या दोन्ही वृक्षाचे पुष्य नक्षत्रावर किंवा श्रवण
नक्षत्रावर हे वृक्ष लावावी
2} या काळात विद्यार्थीजांना अभ्यास आळस असणार त्यामुळे त्यांनी श्री गनपती ची दर्शन करावे
1}राहूसाठी उपाय या राशीला 18 महिने खराब आहेत एकदा तिरूपति श्रीबालाजी दर्शन करणे व या अठरा महिन्यात कोणत्याही मंगळवार पासुन 43 दिवस मदीरा(दारू) घेऊन डोक्यावरून (कारण राहू ग्रह हा फक्त मुख) असल्याने उजव्या काना कडून डाव्या काना कडून 7 वेळा ॐ राहूवे नमः असा मंत्र म्हणून फिरवून जल प्रवाह(समुद्र,नदी,तलाव,विहीर) टाकावे व
विष्णुसहस्त्रनाम हे रोज वाचवे किंवा आयकावे.
2} 9 जानेवारी नंतर श्रीविष्णु पुजा करवी
3}घरात फिश टँक ठेवावा व फिशला फुड द्यावे
आपण नव वर्षाच्या आरंभ पासुन नविन
संकल्प करू रोज न चुकता आपल्या देवता स्वरूप आईवडिलांचा पाया डोके ठेवून दर्शन करा या उपायाने आपणास
एकही ग्रहची पिडा होणार नाही ही विनंती...
कन्या :2017
शुभ रंग : हिरवा, चंदेरी, पांढरा
शुभ दिवस : बुधवार, सोमवार
शुभ दिशा : उत्तर
शुभ रत्न : पाचू, tourmalind, दान : उडीद
वैशिष्ट्य : हे सगळ्या जागी व्यवस्थापन बघतात. कुणावरही हे सतरा प्रश्न विचारल्याखेरीज विश्वास ठेवीत नाहीत. यांना सगळे रेडीमेड पाहिजे असते. स्वत:च्या विज्ञाननिष्ठेची टिमकी वाजवणे यांना आवडते.
उदाहरणार्थ : प्रणाली विश्लेषक, व्यवस्थापक, संपादक
उत्तम काळ : सप्टेंबर , ऑक्टोबर
एकशब्दी विवरण : प्रशासक
कन्या (Kanya)
कन्या राशी भविष्य 2017
वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही आर्थिक बाबतीत सतर्क राहणे आवश्यक आहे. व्यावसायिक भागीदारी करण्यापूर्वी पुरेसा वेळ घ्या. तुम्ही एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ त्यासाठी फारसा अनुकूल नाही. वर्षातील दुसऱ्या सहामाहीचा काळ मगल कालावधी असेल. या वेळी गुंतवणुकीबाबात विचार केला जाऊ शकतो. आर्थिक बाबतीत सतर्क राहा. विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक मार्गात काही अडथळे जाणवतील. जे नोकरीच्या शोधात आहे आणि ज्यांना त्यांची कारकीर्द सुरू करायची आहे, त्यांना पुरेशा संधी मिळतील. माध्यमे आणि कलांशी संबंधित व्यक्तींसाठी हा कालावधी अनुकूल आहे. नोकरीच्या ठिकाणी काहीही समस्या नसेल. तुम्ही ज्यांच्या हाताखाली काम करता ते आणि वरिष्ठ यांचे सहकार्य लाभेल. वर्षाच्या अखेरीस बढती मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आघाडीवर थोडासा तणाव सहन करावा लागेल. तुमच्या जोडीदारासाठी थोडा वेळ काढा आणि तुमच्यातील विवादास्पद मुद्द्यांबाबत चर्चा करून एकमेकांना समजून घ्या. नवे नाते जोडलेल्या व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवू नका. तुमच्या सहकार्यामुळे तुमच्या शत्रूला लाभ होईल. मंगल आणि धार्मिक कार्यांमधील तुमची रुची वाढेल. तुमच्या कौशल्यामुळे तुमची समाज, कुटुंब आणि व्यावसायिक क्षेत्रात प्रशंसा होईल.
प्रियकर/प्रेयसीसाठी हा अत्यंत सकारात्मक कालावधी आहे. असे असले तरी जोडीदाराच्या संशयास्पद वागणुकीमुळे आणि एकमेकांसोबत कमी काळ घालविल्यामुळे काही जणांच्या नात्यांमध्ये थोडाफार तणाव निर्माण होईल. ही परिस्थिती नियंत्रणात आणता येऊ शकते. संशयामुळे भांडणाला सुरुवात करण्यापूर्वी गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. या वर्षात अनेक प्रवास संभवतात. या प्रवासांचा तुम्हाला लाभ होणार आहे. व्यावसायिकांना व्यवसायाच्या निमित्ताने परदेशी जाण्याची संधी मिळणार आहे. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजी राहू नका. सात्विक आहार आणि नियमित योगासने यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील. या वर्षाच्या अखेरीस तुमच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागेल आणि तुमची कार्यक्षमतासुद्धा वाढेल.
कन्या राशीला गोचर ग्रह भ्रमण
गुरू:- 12 सप्टेंबर नंतर 2 ला(शुभ)
शनि:- 26 जानेवारी नंतर 4 था (शुभ)
राहू:- 8 सप्टेंबर पर्यंत (अशुभ)
राशीला उपाय:-
1}
1}शनि ग्रहसाठी उपाय श्री पिपंळ वृक्षाला रोज 21 प्रदक्षिणा करा व शनिवार फक्त फल आहार करवा
2}रोज श्री हनुमान चालीसा पाठ करा
3}रोज संध्याकाळी पिपंळ वृक्ष किवा
शमी वृक्षा खाली दिवा लावावा अथवा या दोन्ही वृक्षाचे पुष्य नक्षत्रावर किंवा श्रवण
नक्षत्रावर हे वृक्ष लावावी
3} राहू 12 वा या राशीला 18 महिने खराब एका तिरूपति श्रीबालाजी दर्शन करणे व या अठरा महिन्यात कोणत्याही मंगळवार पासुन 43 दिवस मदीरा(दारू) घेऊन डोक्यावरून (कारण राहू ग्रह हा फक्त मुख) असल्याने उजव्या काना कडून डाव्या काना कडून 7 वेळा ॐ राहूवे नमः असा मंत्र म्हणून फिरवून जल प्रवाह(समुद्र,नदी,तलाव,विहीर) टाकावे व
विष्णुसहस्त्रनाम हे रोज वाचवे किंवा आयकावे.
4} श्रीविष्णु पुजा करवी
5}घरात फिश टँक ठेवावा व फिशला फुड द्यावे
आपण नव वर्षाच्या आरंभ पासुन नविन
संकल्प करू रोज न चुकता आपल्या देवता स्वरूप आईवडिलांचा पाया डोके ठेवून दर्शन करा या उपायाने आपणास
एकही ग्रहची पिडा होणार नाही ही विनंती...
तुला :2017
शुभ रंग : पांढरा, पिवळा
शुभ दिवस : शुक्रवार, रविवार
शुभ दिशा : पश्चिम
शुभ रत्न : स्फटिक,
दान : उडीद
वैशिष्ट्य : कुरळे केस, लाघवी व्यक्तिमत्त्व आणि नाचात, नाटकात सहभाग यामुळे हे ओळखले जातात.
उदाहरणार्थ : सौंदर्यप्रसाधनकारक, सजावटकार, पर्यटन मार्गदर्शक
उत्तम काळ : डिसेंबर, फेब्रुवारी, मार्च, मे, जून
एकशब्दी विवरण : अभिनेता
तूळ (Tula)
तूळ राशी भविष्य 2017
पैशाने सर्व काही विकत घेता येत असले तरी त्याला काही अपवाद आहेतच. या वर्षी तुमची आर्थिक स्थिती उत्तम असल्याने हे वर्ष खूप चांगले जाणार आहे, असे दिसते. त्याचप्रमाणे वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचीही शक्यता आहे. तुम्ही एखाद्या नव्या गोष्टीत गुंतवणूक केलीत, तर ती तुम्हाला फायदेशीर ठरेल. या वर्षाच्या अखेरीस कोणतीही मोठी गुंतवणूक करू नका. तुम्हाला गुंतवणूक करायचीच असेल तर विचारपूर्वक निर्णय घ्या. तसे न केल्यास तुम्हाला अपेक्षित लाभ मिळणार नाही. पैशाच्या देवाणघेवाणीच्या व्यवहारात घाई करू नका. मित्रांकडून अथवा विश्वासू व्यक्तींकडून फसवणूक केली जाण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करताना ज्येष्ठांचा सल्ला घेणे चांगले राहील. राशी भविष्यानुसार तुम्ही वायफळ खर्च आणि कर्ज घेणे व्यवहार्य नाही. कुटुंबीयांच्या आरोग्याच्या कुरबुरीमुळे तुम्ही तणावाखाली असाल. तुमचा द्वेष करणाऱ्या व्यक्तींनी तुम्हाला त्रास देण्यासाठी केलेल्या कृतीमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. पण, तुम्हीच त्यांच्या नाकी नऊ आणाल. व्यवसायात मोठी गुंतवणूक करण्याआधी नीट विचार करा. जुगारात किंवा लॉटरीत खर्च करू नका. वैवाहिक आयुष्यात शांतता आणि एकोपा राखण्याचा प्रयत्न करा. प्रवासातून लाभ संभवतो.
नोकरदारांसाठी हे वर्ष सामान्यच राहील. या कालावधीत तुमचा फार फायदा झाला नाही, तरी फार नुकसानही होणार नाही. तुमच्यासाठी हे वर्ष नक्कीच आनंददायी राहील. साहेब आणि तुमचे सहकारी तुम्हाला सहकार्य करतील. नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना विशेष यश मिळेल. त्याचप्रमाणे या वर्षात बढती मिळण्याची आणि पगारवाढीची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष सामान्यच राहील. तुम्ही केलेल्या कष्टांवरच परीक्षेतील यश अवलंबून असेल. शिक्षक आणि ज्येष्ठांच्या मदतीमुळे तुम्ही उत्साहात असाल. प्रेमप्रकरणांमध्ये यश मिळण्याची चिन्हे कमी आहेत. २०१७ च्या भविष्यानुसार तुमच्या प्रेयसी/प्रियकराशी वागताना रागावर नियंत्रण ठेवा. तुम्ही एकमेकांना समजून घेतले पाहिजे आणि चर्चेतून समस्येवरील समाधान शोधले पाहिजे. अविववाहितांना अधिक प्रतीक्षा करावी लागेल, पण योग्य वेळेत योग्य स्थळे सांगून येतील.
तुळ राशीला गोचर ग्रह भ्रमण
गुरू:- 12 सप्टेंबर पर्यंत 12 वा(अशुभ)
शनि:- 3 वा (शुभ)
राहू/केतु:- (शुभ)
उपाय
गुरु ग्रह अशुभ प्रभाव असल्यास खालील उपाय करावे
बर्याच वेळा वेळी अवेळी एखादे ग्रह अशुभ फल देतात, अशात त्यांची शांती करणे गरजेचे असते. गुरु ग्रहाच्या शांतीसाठी काही शास्त्रीय उपाय दिले आहे. यातून एखादा उपायही तुम्ही केला तर तुमच्या अशुभतेत नक्कीच कमी येऊन शुभ फल मिळण्यास सुरुवात होते.
ग्रहांच्या मंत्रांची जप संख्या, द्रव्य दानाची सूची इत्यादी सर्व प्रकाराची माहिती आपणास देत आहे. मंत्र जप स्वतः करावा किंवा एखाद्या ब्राह्मणाकडून करवून घ्यावा. दान द्रव्याच्या यादीत दिले गेलेले पदार्थांना दान करण्याच्या व्यतिरिक्त त्यात लिहिलेले रत्न-उपरत्नांच्या अभावात जडी बूटींना विधिवत स्वतःधारण करावे, याने शांती मिळेल.
गुरुसाठी वेळ : संध्या समय सर्वात उत्तम.
महादेवाचे पूजन केले पाहिजे. श्रीरुद्राचा पाठ करावा. गुरुच्या बीज मंत्राचा संध्या वेळेस 19,000 जप 40 दिवसात पूर्ण करावे.
मंत्र : 'ॐ ग्रां ग्रीं ग्रौं स: गुरुवे नम:।
स्त्रीयासाठी मंत्र :- श्री बृहस्पति नमः
हा मंत्रचा जप करावा.
दान-द्रव्य : पुष्कराज , सोनं, कांसी, चण्याची डाळ, खांड, तूप, पिवळा कपडा, पिवळे फूल, हळद, पुस्तक, घोडा, पिवळ्या फळांचे दान केले पाहिजे.
गुरुवारी उपास करायला पाहिजे.
काळात श्रीक्षेत्र गाणगापुर येथे जाऊन श्रीगुरू नरसिंहसरस्वती महाराजांचे दर्शन घेणे व घरात श्रीगुरूचरित्र पारायण करावे व
गुरूवारी फक्त फल आहार करवा
2} या काळात विद्यार्थीजांना अभ्यास आळस असणार त्यामुळे त्यांनी श्री गनपती ची दर्शन करावे
3}श्रीदत्तात्रेयाची सेवा करवी
आपण नव वर्षाच्या आरंभ पासुन नविन
संकल्प करू रोज न चुकता आपल्या देवता स्वरूप आईवडिलांचा पाया डोके ठेवून दर्शन करा या उपायाने आपणास
एकही ग्रहची पिडा होणार नाही ही विनंती...
वृश्चिक :2017
शुभ रंग : गडद लाल, जर्द हिरवा
शुभ दिवस : रविवार, शुक्रवार, बुधवार
शुभ दिशा : दक्षिण
शुभ रत्न : माणिक.लाल वस्तूंचे , दान : गहू
वैशिष्ट्य : उत्तम बचाव, परंतु अतिशय बचावात्मक प्रवृत्ती किंवा ‘जुने तेच सोने’ म्हणण्याची यांची प्रवृत्ती असते. मुळापर्यंत जाऊन विशेष माहिती मिळवणे यांना आवडते.
उदाहरणार्थ : शास्त्रज्ञ, अन्वेषक, सर्जन
उत्तम काळ : डिसेंबर, एप्रिल, ऑक्टोबर
एकशब्दी विवरण : गोली (फुटबॉल)
वृश्चिक (Vrishchika)
वृश्चिक राशी भविष्य 2017
या वर्षी तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. या वर्षी तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च कराल. शुभ कार्यांमध्ये तुमची रुची वाढेल. तुम्हाला मित्राकडून आर्थिक मदत मिळेल. या वर्षी तुमची प्रकृती उत्तम असेल आणि तुमच्याती धाडसी वृत्ती वाढीस लागेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात काही समस्या असतील तर त्या सुटतील. भविष्यानुसार तुम्ही घेतलेले निर्णय तुम्हाला लाभदायक ठरतील. तुम्ही समाजिकदृष्ट्या खूप सक्रीय असाल. मुलांच्या यशामुळे तुम्ही आनंदी व्हाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला विशेष यश लाभेल. तुमचे वरिष्ठ तुम्हाला सहकार्य करतील. नवीन अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असेल. त्याचप्रमाणे तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश लाभेल. तुमचे कौटुंबिक जीवन अत्यंत चांगले राहील. तुम्हाला तुमच्या भावंडांचेही सहकार्य मिळेल. तुमच्या आयुष्यात नवीन मित्र जोडले जातील.
व्यावसायिकांनी उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. त्यांना छोट्या व्यवसायातूनही चांगला नफा मिळेल. परदेश प्रवासाची फार शक्यता नाही. पण कामाच्या निमित्ताने तुम्ही छोटे छोटे प्रवास कराल. वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्यात काही समस्या निर्माण झाल्या तर गांगरून जाऊ नका. ग्रह असे दर्शवतात की तुमच्या जोडीदाराच्या बाबतीत काही समस्या उद्भवणार नाहीत, सर्व काही सुरळीत होईल. तुमच्या नात्यात काही गैरसमज निर्माण झाले तर ते लवकरात लवकर दूर केल्यास तुमच्या फायद्याचे राहील. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. तुमच्या आरोग्यासाठी हे महत्त्वाचे आहे. तुमच्या राहणीमानात सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या हृदयाशी आणि पोटाशी संबंधित काही समस्यांमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. असे असले तरी या समस्या फार थोडा काळ सतावतील.
वृश्चिक राशीला गोचर ग्रह भ्रमण
गुरू:- 12 सप्टेंबर नंतर 12 वा(अशुभ)
शनि:- 26 जानेवारी नंतर 2 रा (शुभ)
राहू:- 8 सप्टेंबर पर्यंत (अशुभ)
उपाय:-
1} साडेसाती साठी उपाय श्री पिपंळ वृक्षाला रोज 21 प्रदक्षिणा करा व शनिवार फक्त फल आहार करवा
2} या काळात विद्यार्थीजांना अभ्यास आळस असणार त्यामुळे त्यांनी श्री गनपती ची दर्शन करावे
1}राहूसाठी उपाय या राशीला 9 महिने खराब आहेत एकदा तिरूपति श्रीबालाजी दर्शन करणे व या अठरा महिन्यात कोणत्याही मंगळवार पासुन 43 दिवस मदीरा(दारू) घेऊन डोक्यावरून (कारण राहू ग्रह हा फक्त मुख) असल्याने उजव्या काना कडून डाव्या काना कडून 7 वेळा ॐ राहूवे नमः असा मंत्र म्हणून फिरवून जल प्रवाह(समुद्र,नदी,तलाव,विहीर) टाकावे व
विष्णुसहस्त्रनाम हे रोज वाचवे किंवा आयकावे.
2} 9 जानेवारी नंतर श्रीविष्णु पुजा करवी
3}घरात फिश टँक ठेवावा व फिशला फुड द्यावे
आपण नव वर्षाच्या आरंभ पासुन नविन
संकल्प करू रोज न चुकता आपल्या देवता स्वरूप आईवडिलांचा पाया डोके ठेवून दर्शन करा या उपायाने आपणास
एकही ग्रहची पिडा होणार नाही ही विनंती...
धनू :2017
शुभ रंग : सोनेरी, पिवळा, पांढरा, निळा
शुभ दिवस : गुरुवार, शुक्रवार, शनिवार, मंगळवार
शुभ दिशा : पूर्व
शुभ रत्न : पुष्कराज, टोपाझ, दान : साखर
वैशिष्ट्य : सुंदर वक्तृत्व, चांगले ज्ञान, ही यांची ओळख बनते .
उदाहरणार्थ : प्रमोटर, पशुशिक्षक, प्रशिक्षक
उत्तम काळ : डिसेंबर, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर
एकशब्दी विवरण : आदर्शवादी
धनु (Dhanu)
धनु राशी भविष्य 2017
हे वर्ष व्यावसायिकांसाठी लाभदायक राहील. पण वर्षाअखेरीस गुंतवणूक करताना तुम्ही सतर्क राहणे आवश्यक आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या चांगल्या आणि वाईट परिणामांचा विचार करा. या वर्षातील पहिल्या सहा महिन्यांमध्ये तुम्हाला काही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. पण, वर्षाअखेरपर्यंत सर्व काही सुरळीत होईल. पैशाची देवाणघेवाण करताना सजग राहा. हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगले असेल. कुंडलीनुसार गूढतत्व आणि मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अत्यंत अनुकूल असेल. परीक्षेतही भरघोस यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींसाठीही हे वर्ष अत्यंत चांगले राहील. बढती मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ तुमची प्रशंसा करतील आणि उत्पन्नातही वाढ होईल. तुमच्या चांगल्या कामाचा तुमच्या कारकीर्दीवर निश्चितच सकारात्मक परिणाम झालेला दिसून येईल. तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवलेत तर अधिक चांगल्या गोष्टी घडतील. प्रवासाची योजना आखत असाल तर हे वर्ष खूप अनुकूल आहे. तुम्ही तीर्थयात्रेवर जाण्याचीही शक्यता आहे.
या कालावधीत तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसोबत चांगला काळ घालवाल. तुमच्या पालकांशी तुमचे चांगले संबंध राहतील. सरकारी खात्यांमधून तुम्हाला काही लाभ मिळतील, ज्याने तुमच्याप्रती असलेला आदर वाढीसा लागेल. प्रेम प्रकरणांसाठी हे वर्ष सामान्य राहील. कुंडली असे दर्शवते की, या वर्षी तुमच्या प्रेम प्रकरणांमध्ये फार मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. सर्व काही सुरळीत सुरू राहील. तुमचे नाते घट्ट करण्याचा प्रयत्न करा. ऑगस्टनंतर तुमच्या प्रेम प्रकरणांमधील रोमान्स काहीसा कमी होईल. तुमच्या प्रेमाच्या बाबतीत तुम्ही सतर्क राहीले पाहिजे. फास्ट फूडमुळे काही समस्या उद्भवू शकतात. पोटाशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आहारावर लक्ष ठेवा. असे असले तरी त्याचा तुमच्या कामावर काही परिणाम होणार नाही.
धनु राशीला गोचर ग्रह भ्रमण
गुरू:- 12 सप्टेंबर नंतर 11वा(शुभ)
शनि:- 26 जानेवारी नंतर 1 ला (शुभ)
साडेसातीचे दुसरे पर्व
राहू/केतु:- (शुभ)
उपाय:-
1}शनि ग्रहसाठी उपाय श्री पिपंळ वृक्षाला रोज 21 प्रदक्षिणा करा व शनिवार फक्त फल आहार करवा
2}रोज श्री हनुमान चालीसा पाठ करा
3}रोज संध्याकाळी पिपंळ वृक्ष किवा
शमी वृक्षा खाली दिवा लावावा अथवा या दोन्ही वृक्षाचे पुष्य नक्षत्रावर किंवा श्रवण
नक्षत्रावर हे वृक्ष लावावी
2} या काळात विद्यार्थीजांना अभ्यास आळस असणार त्यामुळे त्यांनी श्री गनपती ची दर्शन करावे
आपण नव वर्षाच्या आरंभ पासुन नविन
संकल्प करू रोज न चुकता आपल्या देवता स्वरूप आईवडिलांचा पाया डोके ठेवून दर्शन करा या उपायाने आपणास
एकही ग्रहची पिडा होणार नाही ही विनंती...
मकर:2017
शुभ रंग : निळा, पिवळा
शुभ दिवस : शनिवार, मंगळवार, गुरुवार
शुभ दिशा : पश्चिम
शुभ रत्न : नीलम, Amethyst,
दान : मूग
वैशिष्ट्य : सतत कष्ट करणारा कार्यकर्ता असे यांचे वर्णन करता येईल.
उदाहरणार्थ : संयोजक, विकासक, संगणक, अभियंता
उत्तम काळ: ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर
एकशब्दी विवरण : कष्टकरी
मकर (Makara)
मकर राशी भविष्य 2017
आर्थिकदृष्ट्या हे वर्ष तुमच्यासाठी सामान्य राहील. तुम्ही तुमच्या अतिरिक्त खर्चावर नियंत्रण ठेवा. आज केलेली बचत उद्या कामी येईल हे लक्षात ठेवा. पैशाच्या देवाणघेवाणीबाबत, मग ती जवळच्या नातेवाईकांसोबत असेल वा मित्रांसोबत, नेहमी सतर्क राहा. व्यावसायिकांसाठी हे वर्ष यश देणारे राहील. वडिलोपार्जित संपत्ती अथवा लॉटरीमधून अचानक धनलाभ संभवतो. मकर राशी भविष्य २०१७ दर्शवते की, हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी खूप चांगले असेल. स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यश लाभेल. नोकरदार व्यक्तींना चांगल्या संधी मिळतील. बढती आणि चांगली नोकरी मिळण्याबरोबरच तुम्हाला सन्मानही लाभेल. जे नव्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल. वर्षाअखेरपर्यंत शिक्षणातील अडथळे दूर होतील आणि नशीब तुम्हाला साथ देईल. उच्चशिक्षणासाठी तुम्ही परदेशी जाऊ शकता. या वर्षी कौटुंबिक स्थिती सामान्य राहील. पालकांशी चांगले संबंध राहतील.
तुम्ही तीर्थयात्रेला जाण्याची शक्यता आहे. तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल तुमचे मित्र कृतज्ञ असतील आणि तुमच्या कामावर तुमचे वरिष्ठ खुश असतील. प्रेमप्रकरणांसाठी हे वर्ष सामान्य राहील. ज्यांना आपला जोडीदार मिळालेला आहे, त्यांच्यासाठी हे वर्ष चांगले राहील. नव्या नाजूक नात्यांसाठी मात्र हे वर्ष फार अनुकूल नाही. तुमचे मन दुसऱ्यासमोर मोकळे करा, पण त्या व्यक्तीवर दबाव टाकू नका. कालांतराने ती व्यक्ती कदाचित तुम्हाला होकार देईल. तुम्ही आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहणे आवश्यक आहे. या वर्षी आरोग्याच्या कुरबुरी सुरू राहतील. चुकीच्या आहारामुळे आणि बदलत्या ऋतूमुळे तुम्हाला थोडा त्रास सहन रावा लागेल. तुम्ही जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मानसिक तणाव टाळला पाहिजे. हिरव्या पालेभाज्या तुमच्यासाठी औषधासारखे काम करतील
मकर राशीला गोचर ग्रह भ्रमण
गुरू:- 12 सप्टेंबर नंतर 10 वा(शुभ)
शनि:- 26 जानेवारी नंतर 12 (अशुभ)
मकर राशीला साडेसाती आरंभ
राहू- 8 सप्टेंबर पर्यंत (अशुभ)
उपाय:-
1}शनि ग्रहसाठी उपाय श्री पिपंळ वृक्षाला रोज 21 प्रदक्षिणा करा व शनिवार फक्त फल आहार करवा
2}रोज श्री हनुमान चालीसा पाठ करा
3}रोज संध्याकाळी पिपंळ वृक्ष किवा
शमी वृक्षा खाली दिवा लावावा अथवा या दोन्ही वृक्षाचे पुष्य नक्षत्रावर किंवा श्रवण
नक्षत्रावर हे वृक्ष लावावी
2} या काळात विद्यार्थीजांना अभ्यास आळस असणार त्यामुळे त्यांनी श्री गनपती ची दर्शन करावे
3} श्रीदत्तात्रेयाची सेवा करवी
4} राहू या राशीला 9 महिने खराब आहेत यासाठी तिरूपति श्रीबालाजी जाऊन दर्शन करणे व या अठरा महिन्यात कोणत्याही मंगळवार पासुन 43 दिवस मदीरा(दारू) घेऊन डोक्यावरून (कारण राहू ग्रह हा फक्त मुख) असल्याने उजव्या काना कडून डाव्या काना कडून 7 वेळा ॐ राहूवे नमः असा मंत्र म्हणून फिरवून जल प्रवाह(समुद्र,नदी,तलाव,विहीर) टाकावे व
विष्णुसहस्त्रनाम हे रोज वाचवे किंवा आयकावे.
4} श्रीविष्णु पुजा करवी
5}घरात फिश टँक ठेवावा व फिशला फुड द्यावे
आपण नव वर्षाच्या आरंभ पासुन नविन
संकल्प करू रोज न चुकता आपल्या देवता स्वरूप आईवडिलांचा पाया डोके ठेवून दर्शन करा या उपायाने आपणास
एकही ग्रहची पिडा होणार नाही ही विनंती...
ज्योतिष आकाश पुराणिक
कुंभ : 2017
शुभ रंग : लाल, निळा, पिवळा
शुभ दिवस : शनिवार, गुरुवार, मंगळवार
शुभ दिशा : पश्चिम
शुभ रत्न : नीलम, नीला स्पिणेल
दान : तांदूळ
वैशिष्ट्य : वादविवाद करण्यास फार आवडते.
उदाहरणार्थ : RTI सल्लागार, वकील, राजनैतिक कार्यकर्ता.
उत्तम काळ : नोव्हेंबर, ऑगस्ट
एकशब्दी विवरण : वाक्पटू
कुंभ (Kumbha)
कुंभ राशी भविष्य 2017
तुमच्या कामाच्या दर्जाबाबत तुम्हीच आश्चर्यचकीत व्हाल. तुमचे स्पर्धक तुमच्याशी समेट करण्याचा प्रयत्न करतील. तुमची आर्थिक स्थिती सामान्य राहील. दुसऱ्यांना मदत करण्याआधी तुमच्या आर्थिक स्थितीची जाणीव ठेवा. उधळपट्टी केल्यामुळे तुम्हाला भविष्याता काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे बचत केलेल्या पैशाचा येत्या काळात तुम्हाला उपयोग होऊ शकेल. संपत्तीशी संबंधित प्रकरणांमधून तुम्हाला लाभ होऊ शकेल. व्यावसायिकांसाठी आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींसाठी हा कालावधी अनुकूल असेल. भागीदारीमध्ये प्रामाणिक राहा; तसे न केल्यास तुम्हाला नुकसान सोसावे लागेल. वर्षातील दुसऱ्या सहामाहीमध्ये व्यवसायामध्ये काही अडचणी निर्माण होतील. पण हा कालावधी फारच कमी असेल. काही गोष्टींचा अपवाद वगळता तुमचे वर्ष सुखाचे असेल. नोकरीशी संबंधित सर्व बाजूंबाबत हे वर्ष चांगले असेल. बढती मिळण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे कष्ट करत राहा आणि निराश होऊ नका. नवी नोकरी शोधणाऱ्या तरुणांना निश्चित यश मिळेल. तुमच्या कारकीर्दीची उत्तम सुरुवात होऊ शकते. कायदा, वैद्यकीय शास्त्र, वाणिज्य इत्यादी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांसाठी हा अनुकूल कालावधी आहे.
विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष संमिश्र असेल. खूप काम करूनही अपेक्षित परिणाम मिळाला नाही तरी निराश होऊ नका. तुमच्या कामाचे चीज नक्की होईल. कौटुंबिक निर्णय विचारपूर्वक घ्या. नात्यांमधील गोडवा टिकवून ठेवण्यासाठी समजूतदारपणा दाखवा. या वर्षी तुमच्या आईशी संबंध चांगले राहतील. दैनंदिन आयुष्यातील व्यस्ततेमुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराला पुरेसा वेळ देऊ शकणार नाही. यामुळे तुमच्या नात्यात कडवटपणा येऊ शकेल. तुमच्या जोडीदारासाठी थोडा वेळ काढा आणि कुठेतरी फिरायला जा.
कुंभ राशीला गोचर ग्रह भ्रमण
गुरू:- 12 सप्टेंबर पर्यंत 8 वा (अशुभ)
शनि:- 11 वा (शुभ)
राहू :-8 सप्टेंबर प. (अशुभ)
उपाय:-
गुरु ग्रह अशुभ प्रभाव असल्यास खालील उपाय करावे
बर्याच वेळा वेळी अवेळी एखादे ग्रह अशुभ फल देतात, अशात त्यांची शांती करणे गरजेचे असते. गुरु ग्रहाच्या शांतीसाठी काही शास्त्रीय उपाय दिले आहे. यातून एखादा उपायही तुम्ही केला तर तुमच्या अशुभतेत नक्कीच कमी येऊन शुभ फल मिळण्यास सुरुवात होते.
ग्रहांच्या मंत्रांची जप संख्या, द्रव्य दानाची सूची इत्यादी सर्व प्रकाराची माहिती आपणास देत आहे. मंत्र जप स्वतः करावा किंवा एखाद्या ब्राह्मणाकडून करवून घ्यावा. दान द्रव्याच्या यादीत दिले गेलेले पदार्थांना दान करण्याच्या व्यतिरिक्त त्यात लिहिलेले रत्न-उपरत्नांच्या अभावात जडी बूटींना विधिवत स्वतःधारण करावे, याने शांती मिळेल.
1}या काळात श्रीक्षेत्र गाणगापुर येथे जाऊन श्रीगुरू नृसिंहसरस्वती महाराजांचे दर्शन घेणे व घरात श्रीगुरूचरित्र पारायण करावे
2}श्री पिपंळ वृक्षाला रोज 21 प्रदक्षिणा करा व गुरूवारी फक्त फल आहार करवा.
गुरुसाठी वेळ : संध्या समय सर्वात उत्तम.
महादेवाचे पूजन केले पाहिजे. श्रीरुद्राचा पाठ करावा. गुरुच्या बीज मंत्राचा संध्या वेळेस 19,000 जप 40 दिवसात पूर्ण करावे.
मंत्र : 'ॐ ग्रां ग्रीं ग्रौं स: गुरुवे नम:।
स्त्रीयासाठी मंत्र :- श्री बृहस्पति नमः
हा मंत्रचा जप करावा.
दान-द्रव्य : पुष्कराज , सोनं, कांसी, चण्याची डाळ, खांड, तूप, पिवळा कपडा, पिवळे फूल, हळद, पुस्तक, घोडा, पिवळ्या फळांचे दान केले पाहिजे.
गुरुवारी उपास करायला पाहिजे.
2} या काळात विद्यार्थीजांना अभ्यास आळस असणार त्यामुळे त्यांनी श्री गनपती ची दर्शन करावे
आपण नव वर्षाच्या आरंभ पासुन नविन
संकल्प करू रोज न चुकता आपल्या देवता स्वरूप आईवडिलांचा पाया डोके ठेवून दर्शन करा या उपायाने आपणास
एकही ग्रहची पिडा होणार नाही ही विनंती...
मीन :2017
शुभ रंग : पिवळा, पांढरा सोनेरी
शुभ दिवस : गुरुवार, सोमवार
शुभ दिशा : पूर्व
शुभ रत्न : पुष्कराज, Citrine, Aqua-Marine
दान : मूग
वैशिष्ट्य : शांत व विचारी असतात. यांना शोकांतिका, वैचारिक नाटके पाहण्यास आवडते.
उदाहरणार्थ : फार्मासिस्ट, छायाचित्रकार, मानसशास्त्रज्ञ
उत्तम काळ : जून, जुलै, ऑगस्ट
एकशब्दी विवरण : सहनशील
मीन (Meena)
मीन राशी भविष्य 2017
मीन राशीतील व्यक्तींनी प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकणे आवश्यक आहे. तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक अपेक्षा असलेले निर्णय घेऊ नका. दूरच्या प्रवासाची योजना काळजीपूर्वक आखा. नव्या माणसावर पटकन विश्वास ठेवू नका. या वर्षाच्या मध्यापासून तुम्हाला उत्पन्नाचे नवे स्रोत मिळण्यास सुरुवात होईल. भविष्यानुसार तुम्ही तुमच्या स्पर्धकांच्या नाकात दम आणाल. खूप विचार करणे टाळा. तुमच्या यशाचे रहस्य तुमच्या सहकाऱ्यांना सांगू नका. तुमचे मित्र आणि नातेवाईकांच्या माध्यमातून तुम्ही नव्या महत्त्वाच्या लोकांना भेटाल. तुम्ही एखाद्या गोष्टीची सुरुवात कष्टाने केलीत तर तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील. तुम्हाला पुरस्कारही मिळू शकेल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास तुम्हाला खूप लाभदायक ठरेल. इतरांवर तुमच्या कामाचा खूप प्रभाव पडेल. तुम्ही एखादे नवे कौशल्य शिकण्याचा प्रयत्न कराल, ज्याचा उपयोग करून तुम्हाला उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. नोकरदारांनी त्यांच्या सहकोऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे गरजेचे आहे. तुम्हाला नवीन नोकरी मिळेपर्यंत जुन्या नोकरीचा राजीनामा देऊ नका. याचा अर्थ असा नाही, की तुम्हाला नवीन नोकरी मिळणार नाही. या वर्षाअखेरपर्यंत तुम्हाला नवी नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
कुटुंबातील सदस्यांना वेळ द्या. २०१७ सालातील राशी भविष्य असे दर्शविते की तुमच्या जोडीदारासाठी थोडा वेळ काढा आणि त्याला कुठेतरी फिरायला घेऊन जा. यामुळे तुमचे नाते घट्ट होईल. प्रेमाच्या नात्यात गैरसमजापासून दूर राहा, नाही तर समस्या उद्भवू शकतील. कुणाबद्दलही पटकन मत तयार करू नका, कारण यामुळे एखाद्याच्या भावना दुखावू शकतात. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा. चुकीचा आहार घेतल्याने पोटाचे आणि रक्ताचे विकार होऊ शकतात. तुम्ही काळजीपूर्वक आहार घेतल्यास या समस्या टाळता येऊ शकतील. तुमच्या राहणीमानात बदल करू शकलात तर तुमच्यासाठी उत्तम राहील.
मीन राशीला गोचर ग्रह भ्रमण
गुरू:- 12 सप्टेंबर पर्यंत 7 वा (शुभ)
शनि:- 26 जानेवारी नंतर 10 वा (शुभ)
राहू :- 8 सप्टेंबर पर्यंत (अशुभ)
उपाय:-
1}राहूया राशीला 9 महिने खराब आहेत एकदा तिरूपति श्रीबालाजी दर्शन करणे व या अठरा महिन्यात कोणत्याही मंगळवार पासुन 43 दिवस मदीरा(दारू) घेऊन डोक्यावरून (कारण राहू ग्रह हा फक्त मुख) असल्याने उजव्या काना कडून डाव्या काना कडून 7 वेळा ॐ राहूवे नमः असा मंत्र म्हणून फिरवून जल प्रवाह(समुद्र,नदी,तलाव,विहीर) टाकावे व
विष्णुसहस्त्रनाम हे रोज वाचवे किंवा आयकावे.
2} श्रीविष्णु पुजा करवी
3}घरात फिश टँक ठेवावा व फिशला फुड द्यावे
आपण नव वर्षाच्या आरंभ पासुन नविन
संकल्प करू रोज न चुकता आपल्या देवता स्वरूप आईवडिलांचा पाया डोके ठेवून दर्शन करा या उपायाने आपणास
एकही ग्रहची पिडा होणार नाही ही विनंती...
माझी आशा आहे की राशी भविष्य 2017 तुमच्यासाठी उपयुक्त सिद्ध होईल, आणि यश आणि सुबत्तेच्या मार्गावर तुम्हाला घेऊन जाईल
*नुतन दिनदर्शिका नववर्षाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा*
प्रतिक्रिया
2 Jan 2017 - 10:44 pm | खेडूत
नव्या वर्षानिमित्य खू...प शुभेच्छा!!
2 Jan 2017 - 10:52 pm | कंजूस
हे कितीजणांना पाठवले की भरभराट होईल?
3 Jan 2017 - 8:11 am | नावातकायआहे
काय? मांजर?? ;-)
3 Jan 2017 - 8:49 am | प्रचेतस
कित्ती कित्ती चान
3 Jan 2017 - 9:44 am | पिलीयन रायडर
इंटरेस्टींग!!
3 Jan 2017 - 9:55 am | खेडूत
घरात फिश टँक ठेवावा व फिशला फुड द्यावे...
हे पुराणिक सर इंग्रजी माध्यमात शिकले असणार!
3 Jan 2017 - 11:31 am | आदूबाळ
12 पैकी 7 राशींनी श्रीविष्णु 'पुजा' करायची आहे आणि फिशला 'फुड' द्यायचं आहे.
पुराणिक सरांचा फिशफूडचा व्यवसाय आहे आणि फावल्या वेळात ते विष्णूपूजा सांगतात.
3 Jan 2017 - 11:54 am | नावातकायआहे
फिश ला 'फुड' द्यायचं आहे फिशफूड द्या असे नाही सांगितलय... :-)
3 Jan 2017 - 1:53 pm | यशोधरा
आजपासूनच सुरुवात करते. धन्यवाद.
3 Jan 2017 - 2:00 pm | जाबाली
आपल्या मीपा वर असा लेख आहे का ज्यात रत्ने, उपरत्ने, राशी यांचा सखोल विचार मांडलेला आहे ? किंवा यातील कोणी तज्ज्ञ असतील का ?
3 Jan 2017 - 2:03 pm | संदीप डांगे
ये तोडा मुस्किल... आईवडिलांचे पाय ४०० किमी लांब हवेत किंवा माझी मान तरी...
3 Jan 2017 - 4:55 pm | कलंत्री
सर्वसाधारणपणे ९९ % समाज कोणत्यातरी अडचणीने त्रस्त असतोच असतो. अश्यावेळीस असे काही सांगुन थोडाफार हुरुप वाढवणारा भेटल्यास लोकांचा विश्वास लगेचच बसतो.
वृक्षपूजा, मुक्याप्राण्यांना अन्नदेणे, गरिबदुबळ्यांची सेवा असे उपास असतील तर काय वाईट आहे?
बाकी मला असे वाटते की, जे काही व्हायचे असते ते होत असते. आपल्यावर विश्वास ठेवणे हेच सर्वात महत्वाचे.
3 Jan 2017 - 5:26 pm | पाटीलभाऊ
अहो काय चाललंय काय ??
मदिरा जलप्रवाहात टाकून...चक्क वाया घालवावी..अहो कुठे फेडाल हे पाप... :(
आणि ९ महिने खराब असताना १८ महिन्यांचा उपाय :D
3 Jan 2017 - 5:37 pm | वेल्लाभट
समजा हो पाटील !
असं खरंच करायचं नसतं काही! भ्विष्य लिहिणार्यानेही तसं केलेलं नाही. ती मदिरा योग्य ठिकाणीच गेलीय. म्हणून ते ९ चे १८ वगैरे गणितं आहेत. एवढं जबर्या भविष्य लिहायचं म्हणजे प्यायचं; आय मीन, खायचं काम नाही !
3 Jan 2017 - 5:52 pm | पाटीलभाऊ
हाहाहा
5 Jan 2017 - 2:31 pm | अनन्त्_यात्री
अशा बनवाबनवीला मिपावर थारा देऊ नये.
5 Jan 2017 - 3:58 pm | स्वधर्म
हा असला धागा काढायचा, हे कसं सुचलं साहेब तुंम्हाला? कशाचा कशाला ताळमेळच नाहीए. जर ज्योतिष्य हे शास्त्र आहे, असे मानणारे काही जीव इथे असतील, त्यांच्या ‘श्रध्दे’त काही प्रकाश पडायला या लेखाची नक्की मदत होईल, ही आशा.