इतिहासातील किस्से

सांरा's picture
सांरा in काथ्याकूट
27 Dec 2016 - 6:37 pm
गाभा: 

मुघलांशी झुंजत असतांना एकदा संभाजीराजे दक्षिणेला पोचले आणि त्यांनी तंजावर येथे मुक्काम केला. तेथे त्यांना आमटी खायची इच्छा झाली. तंजावरच्या आचाऱ्यांना त्यांनी आमटी बनवायला सांगितली. पण आमटीत लागणारी मूग डाळ, कोकम इत्यादी तंजावरचा काय तर अख्या तामिळनाडूत मिळत नसल्याने आचारी काळजीत पडले. शेवटी वेळ मारून नेण्यासाठी त्यांनी
आमटीत कोकमाच्या जागी चिंच आणि मूग डाळीच्या जागी वाटाणा टाकला आणि भीत भीत तो पदार्थ संभाजीराजांना सादर केला. राजांना ती आमटी फारच आवडली आणि त्यांनी त्या आचाऱ्यांना बक्षिसे दिली म्हणतात. त्या दिवसापासून त्या आमटीला संभाजी राजांवरून 'संभार' (मराठीत 'संभाचे') असे म्हणत. त्याचाच अपभ्रंश म्हणजे सध्याचा सांबार. अजूनही तामिळनाडूमध्ये तंजावरचा सांबार उत्कृष्ट समजला जातो.

तानाजी मालुसरे यांनी कडा चढून सिंहगड जिंकला हे सर्वांनाच माहित आहे. हाच फंडा वापरून मराठ्यांविरोधात इंग्रज कर्नल जो मूर याने सिंहगड जिंकायचा ठरवला. मुरच्या नेतृत्वात काही सैनिक कडा चढतील आणि इतर सैनिक दरवाज्यावर हल्ला करतील हा बेत ठरला. पण ऐन वेळी हल्ला सुरु असतांना जेथे मूर लढत होता तेथे आग लागून तो वगळता सर्व मारले गेले. पण सिंहगड इंग्रजांच्या ताब्यात आला आणि मूर 'immortal joe' मानून ओळखल्या जाऊ लागला. mad max: fury road मधला मुख्य खलनायक त्याच्यावरच बेतलेला आहे असे म्हणतात.

जयपूरचा राजा सवाई माधोसिंग हा अतिशय लठ्ठ होता. त्याच्या कपड्यांचा घेरच चार फूट असे. तलावात नौकेत फिरायला जात असतांना सुद्धा त्याला नौका बॅलन्स करण्यासाठी जास्तीची पाच सहा माणसे सोबत घ्यावी लागत. तसेच त्याला ११० बायका आणि अंगवस्त्र होत्या तसेच >२०० मुले होती असे म्हणतात.

जर तुम्हाला अजूनही अनेक किस्से, कहाण्या किंवा तथ्ये माहित असतील तर या धाग्यात ऍडवा आणि हा धागा वाढवा.

--१०० प्रतिसादांच्या प्रतिक्षेतला राक्षस.

प्रतिक्रिया

त्या दिवसापासून त्या आमटीला संभाजी राजांवरून 'संभार' (मराठीत 'संभाचे') असे म्हणत. त्याचाच अपभ्रंश म्हणजे सध्याचा सांबार.

सांबाराच्या उगमाची कहाणी खरी आहे, पण संभाचे म्हणून सांभार हे काहीही लॉजिक आहे.

सांरा's picture

27 Dec 2016 - 7:06 pm | सांरा

तामिळ येत नाही. कोणाला येत असल्यास कृपया प्रकाश टाकावा. मगच हे लॉजिक चेक करता येईल.

श्रीरंग_जोशी's picture

27 Dec 2016 - 11:34 pm | श्रीरंग_जोशी

मी वाचल्याप्रमाणे तो पदार्थ प्रथम संभाजी सारम म्हणुन प्रसिद्ध झाला.

कालौघात त्याचा अपभ्रंश होऊन सांभारम -> सांभर असे नाव प्रचलित झाले.

प्रसाद गोडबोले's picture

28 Dec 2016 - 12:33 am | प्रसाद गोडबोले

सांबाराच्या उगमाची कहाणी खरी आहे

:ऑ , खरेच ? ही स्टोरी खरी आहे ?

तुषार काळभोर's picture

28 Dec 2016 - 12:21 pm | तुषार काळभोर

विकी तरी तेच म्हणतोय

Origins[edit]
One of the stories is that it originated in the kitchen of Thanjavur Marathas ruler Shahuji during the 17th century from the southern Indian state of Tamil Nadu.[1] Shahuji trying to make a dish called amti, experimented with pigeon peas instead of mung bean, and tamarind pulp for kokum and the court named it sambhar after the guest of the day, Sambhaji, second emperor of the Maratha Empire.[2]

Other sources point to origin as Karnataka where sambaru padartha in Kannada means mix of spices and condiments. There is also an alternate explanation that the origin of the name is from the old Tamil word, chaampu, meaning ground or paste, in the context of grinding coconut and spices to be dissolved in tamarind pulp. This word is also the root for the unrelated South East Asian dish sambol.[3]

दि ग्रेट मराठा's picture

27 Dec 2016 - 10:24 pm | दि ग्रेट मराठा

वा छान माहिती आहे सांगकाम्या राक्षस.

पद्मावति's picture

27 Dec 2016 - 10:40 pm | पद्मावति

उत्तम धागा.
स्पेनचा प्रसिद्ध फ्लेमिंको या प्रसिद्ध नृूत्यप्रकाराचा उगम आपल्या कत्थक पासून झालाय अशी मान्यता आहे.
कित्येक शतकापूर्वी भारतातून भटके, दरवेशी जेव्हा मजल दरमजल करीत स्पेन मधे गेले त्यांच्याबरोबर त्यानी अर्थातच त्यांची कला, नृत्य हे ही आणले. त्यानीच कथक या नृत्यप्रकाराची स्पेन ला ओळख करून दिली.

सांरा's picture

28 Dec 2016 - 12:25 am | सांरा

प्रसिद्ध असलेले रोमा जिप्सीच का ?
लिंक

लोकहो,

कराटे इत्यादि युद्धक्रीडाप्रकार चीन, जपान, कोरिया इत्यादि देशांतून इतरत्र पसरले असं समजलं जातं. मात्र या खेळांचं मूळ भारतात आहे. बोधिधर्म नामक भारतीय साधूने चीनमध्ये कुंग फू सुरू केलं म्हणतात. शाओ-लिन येथल्या मंदिरात त्याचा निवास होता.

आ.न.,
-गा.पै.

रमेश आठवले's picture

3 Jan 2017 - 3:09 am | रमेश आठवले

१.महाराष्ट्रात आणि तामिळनाडूत सध्या बहुधा आमटीसाठी तुरीची डाळ वापरतात . त्या ऐवजी सँभाजी राज्यांच्या काळांत दोन्ही कडे मुगाची डाळ वापरत असत असे म्हणायला काही पुरावा आहे का ?
२. चिंचेचा उपयोग भारतात फार पूर्वीपासून होत होता . तरी ती महाराष्ट्रात वापरली जात नव्हती पण तामिळनाडु मध्ये वापरात होती असे म्हणायला काही पुरावा आहे का ?
३. नागपूर कडे कोथिंबिरीला सांभार किंवा सांभारे म्हणतात . हे नाव सुद्धा सँभाजी राजांच्या आवडीवरून प्रचारात आले आहे का ?
एक माहिती पीजन पी म्हणजे तुर

श्रीरंग_जोशी's picture

3 Jan 2017 - 4:35 am | श्रीरंग_जोशी

>>नागपूर कडे कोथिंबिरीला सांभार किंवा सांभारे म्हणतात

नागपूरसह विदर्भात कोथिंबिरीला सांबार म्हणतात. सांभार किंवा सांभारे कधीच ऐकले नाही.

असो यावरुन पुडाची वडी अन सांबारवडी हे पदार्थ आठवलेत... :-) .

रमेश आठवले's picture

3 Jan 2017 - 5:02 am | रमेश आठवले

दुरुस्तीबद्दल धन्यवाद श्रीरंग

sneha1's picture

4 Jan 2017 - 9:23 am | sneha1

दाल माखनी आणि लोण्याचा काही संबंध नाही. ह्याच्यासाठी उडिद डाळ इतकी शिजवतात की ती लोण्यासारखी मऊ होते, म्हणून दाल माखनी. असे पंजाबी मैत्रिणीने सांगितले.

माफ करा, चुकीची पोस्ट टाकली. ही काढायची कशी?