महाराष्ट्रात कुठल्या शहरातल्या लोकांना गावाचा फुकाचा स्वाभिमान असेल तर तो पुण्यातल्या लोकांना आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.पुणे तिथे काय उणे ही म्हण पुणेत्तर लोकांनी निर्माण केली नसून ती कुठल्यातरी असाच फुका स्वाभिमान असणार्या पुणेकराने मारलेली लोणकढी थाप आहे.
तर निमित्त झाले ते ६४ व्या सवाई गंधर्व महोत्सवाला जाण्याचे,तसे पुणे हे मला आवडत नाही ,पण गेलो.संध्याकाळची वेळ ,हडपसरपासुन पुण्याचे दळभद्री ट्रॅफिक लागले.या ट्रॅफिकला ना शिस्त ना काही नियम.कुणी कसाही आडवा तिडवा गाडी चालवत होता.त्यात बीआरटी हा पुणेकरांनी लावलेला शोध आडवा तिडवा येत होता.मधुन बस सुसाट जातयेत व कार कुर्मगतीने धावतेय असा प्रकार चालू होता.स्वारगेट चौकात तर परिसराला अवकळा येईल असा प्रकार होता.गाडी टिळक रोडला घ्यायची होती तर त्याला दहा मिनीटं लागली, इतकं बेशिस्त ट्रॅफीक.सवाईला गेलो तर तिथे आत शिस्तप्रिय पुणेकरांनी जागा अडवून धरल्या होत्या.लक्ष्यमोहन व आयुष मोहन गुप्ता यांची जुगलबंदी चालू होती ,छान वाटत होते ऐकायला.पण एका जागेवर बसतील ते पुणेकर कसले .आजुबाजुचे पुणेकर आपल्या देहाचे पिठुळ गाठोडे उचलुन सतत बाहेर ये जा करत होते.कशासाठी? तर मागे लागलेल्या स्टॉलवर हादडून येत होते,व येताना बराच जामामीना घेऊन बसलेल्यांना तुडवत येत होते .तोंडाचा आवाज करुन खात होते ,मध्येच दिली तर गायनाला दाद देत होते.चांगल्या मैफीलीचा रसभंग कसा करायचा हे शिकावे तर पुणेकारांकडूनच.पाठीमागे जाऊन बघितले तर मैफीलीला न्हवती एव्हढी गर्दी पाठीमागे खादाडीला आली होती.मी फक्त हात जोडायचा बाकी होतो.बर्याच घार्या गोर्या अनुनासिक स्वरात खिचडी ,थालीपीठं हे घरात मिळणारे पदार्थ स्टॉलवर मिळावेत म्हणून चित्कारत होत्या.काय भंकस आहे राव कळले नाहि.
तर या पुण्याचं आणखी एक दुर्गुण म्हणजे या जुन्या पुण्यातल्या चिंचोळ्या आणि अवकळा आलेल्या पेठा.साधी पिएमटी घुसली तर रस्ता जाम होतो ,आणि हे पुणे म्हणे ग्लोबल सिटी होणार आहे.या नारायण ,सदाशिव पेठातले वाडे बघितले तर हडप्पा मोहोंजदारोचे अवशेष जास्त सुंदर असावेत याची खात्री पटते.
तर अश्या ह्या पुण्याचा जो काही विकास झाला आहे तो बाहेरच्या व्यक्तींकडूनच.सुप्रसिद्ध डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापणा टिळक आणि आगरकरांनी केली.टिळक रत्नागिरीचे तर आगरकर आमच्या सातारचे.आजही पुण्यात उभी असलेली विद्यापिठं ,जसे भारती विद्यापीठ ,डि.वाय पाटील ,हे अनुक्रमे सांगली आणि कोल्हापुरच्या व्यक्तींनी स्थापण करुन मोठी केलेली आहेत.महाराष्ट्रातले आद्य समाज सुधारक, ज्यांनी स्त्री शिक्षणाची सुरवात केलि ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे दांपत्य आमच्या सातारा जिल्हातील कटगुणचे .पैकी सावित्रिबाईंचे नाव पुणे विद्यापिठाला दिले गेले कारण तितक्या ताकदीचा कुणी मुळ पुणेकर सापडला नाही. तर स्वतःच्या बुद्धीमत्तेची शेखी मिरवणार्या पुणेकरांसाठी इतकी उदाहरणं पुरी आहेत.
पुण्यात जो काही पैसा आला आहे त्याची सुरवात झाली ती आयटीमुळे .इन्फोसीस पुण्यात स्थापण झाली असली तरी स्थापण करणारा बेंगलोरचा होता.पुढे उपरोक्त विद्यापिठांमधुन तयार होणारे मनुष्यबळाला काम मिळावे यासाठी आयटी पार्क स्थापण केले ते शरद पवार व पतंगराव कदमांनी.दोघेही पुणेकर नाहीत.राज्यावर व केंद्रात छाप पाडेल असा एकही नेता आजवर पुण्याने महाराष्ट्राला दिलेला नाही.
आता पुणेरी पाट्यांकडे वळुयात.बालिशपणे काहीतरी स्वतःच्या गेटवर डकवणार्या या भंकस पाट्या पुणेकरांनीच प्रसिद्ध केल्या आहेत."आमच्याकडे अनारसे ,चकल्या आणि परकर मिळतील " असल्या पाट्या दुकाणात लावणार्या पुणेकरांच्या कल्पनादारीद्य्राची कीवही करावीशी वाटत नाही."आमची कोठेही शाखा नाही " हे मराठी लोकांना खरेतर लाज वाटावी असे बिरुद पुणेकरांनीच महाराष्ट्राच्या माथी मारले आहे. मारामारी करायची धमक नसल्याने " सभ्य भाषेत पुणेरी अपमान' हा प्रकारही या लोकांनी भलताच हाईप केला आहे .प्रत्यक्षात असा अपमान करण्याचे गट्स फार कमी लोकांत आहेत. ज्यांच्यात आहेत ते पुणेकर नाहीत ,बाहेरचे आहेत.
खादाडीच्या बाबतीतही पुणेकर दरिद्रीच आहेत.मिसळ हा कोल्हापुरचा प्र्कार ,बेडेकर मिसळ गोड असते हे माझे निरिक्षण नसुन पुणेकरांचेच आहे.मिसळ खायला हे खास कोल्हापुरी ठिकाणीच जातात.सदाशिव पेठ,कोथरुड ह्या व इतर ठिकाणी प्रसिद्ध ठिकाणं कोणती तर,' कोल्हापुरी रस्सा मंडळ ' ," पुरेपुर कोल्हापुर्". म्हणजे यातही पुण्याचे काही योगदान नाही.
तर पुणेकरांनो तुमच्या शहराचा जो काही थोडाफर विकास झाला आहे तो बाहेरुन आलेल्या लोकांनी केलेला आहे हे तुम्हाला आता कळले असेलच .याचे कारण तुम्ही एकतर मठ्ठ आहात किंवा १ ते ४ झोपा काढून दिवसाचे महत्वाचे तास वाया घालवायची तुमची प्रवृत्ती आहे.पुणे तिथे सर्व उणे अशी खरेतर म्हण प्रचलीत असायला हवी. असो.
कधीतरी तुमच्या चिंचोळ्या गल्ल्या आणि कोंदट वाडे ,बेसुमार वाढलेले अस्ताव्यस्त पुणे सोडून( पुण्याचा फुका अभिमानदेखील) जरा बाहेर सातारा कोल्हापुरात या ! कळेल मोकळं ढाकळं आणि प्रशस्त कसं जगता येतं ते.
धन्यवाद.
पुणे शहराचे स्तोम का माजवले जात आहे????
गाभा:
प्रतिक्रिया
12 Dec 2016 - 9:10 pm | अत्रन्गि पाउस
घेऊन बसावं का त्याही पेक्षा अधिक काही ?
12 Dec 2016 - 9:18 pm | आदूबाळ
चला ओल्ड माँक पाचपाच रुपये... पाचपाच रुपये ओल्ड माँक.
12 Dec 2016 - 9:18 pm | पगला गजोधर
टॅरबुजी
तुमच्या मागच्या किती पिढ्या साताऱ्यात गेल्या हो ?
13 Dec 2016 - 9:39 am | पगला गजोधर
तुमच्या माहितीसाठी,
तुमच्या साताऱ्याची व कोल्हापूरची गादी एका आद्य पुणेकरांच्या, कर्तृत्वामुळेच स्थापित झाली.
13 Dec 2016 - 10:53 am | विशुमित
आणि त्या आद्य पुणेकऱ्यानी स्वतः बरोबर स्वराज्याचे पण पानिपत केले. हे पण पुढे चिटकवा..
13 Dec 2016 - 12:23 pm | पैसा
अबब! काय हिंमत ओ तुमची! साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलसं कसं बोलवतं तुम्हाला??? ते आद्य पुणेकर. विसरलात काय??? राख झालेल्या पुनवडीला सोन्याचा फाळ असलेल्या नांगराने नांगरून वसवले होते त्यांनी. तुमच्या जिभेला काही हाड? त्यांचेच वंशज सातारकर आणि कोल्हापूरकर गादीवर आले हे माहीत नाही का शाळेत इतिहास शिकला नाहीत?
संपादक लोक, यांच्याकडे नीट लक्ष ठेवा.
13 Dec 2016 - 12:38 pm | संजय पाटिल
त्यांना कदाचित पेशवे म्हणायचं असावं..
13 Dec 2016 - 1:12 pm | पैसा
तरी त्याना इतिहासात शून्य मार्क. एकतर पेशवे आद्य पुणेकर नव्हेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ हे आद्य पुणेकर, नव्या पुण्याचे निर्माते होते. आणि छत्रपतींच्या दोन गाद्या झाल्या तेव्हा एकटे पेशवे कोणाला राजा बनवतील असे बलवत्तर नव्हते तर खंडेराव दाभाडे आणि धनाजी जाधव हे शाहू छत्रपतींबरोबरचे महत्त्वाचे लोक होते. खरे तर बाळाजी विश्वनाथ यांना त्यानंतरच पेशवेपद मिळाले. पुढच्या पिढ्यांनाही छत्रपतींनी मान्यता दिली नसती तर पेशवे दुसरे कोणीतरी झाले असते, जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात घडत होते.
13 Dec 2016 - 1:56 pm | पगला गजोधर
आद्य पुणेकर = जिजाऊ व शिवाजी महाराज व त्यांची प्रजा व सैन्य
आणि सैन्य म्हणावं तर पुण्यातील मावळातील लढवय्ये लोकं (म्हणजे एक अर्थी पुणेकरच ) म्हणजेच मावळे ज्यांनी (पुणेकरांनी) राजांना त्यांच्या स्वराज्याच्या कामात जीव पणाला लावून सेवा केली.
शिवाजी महाराजांना तीव्र विरोध कोणी केला तर जावळीच्या (साताराच्या) मोरेने, कोल्हापूरजवळच्या सावंतांनी....
म्हणजे शिवाजी महाराजांना त्रास देण्यात व पुणे व पुणेकरांना त्रास देण्यात तत्कालीन टर्बोचार्जेड साताराकर मोरे होते.
13 Dec 2016 - 2:06 pm | पैसा
=))
13 Dec 2016 - 10:01 pm | आनन्दा
धिस इस नॉट फेअर पग.
14 Dec 2016 - 8:39 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
पानिपत काय प्रकरण आहे हे तुम्हाला नीटसं कळलेलं दिसत नाही. असते एकेकाची आकलनक्षमता कमी, त्यामुळे सांगतो समजाउन. काये ना पानिपताचं युद्ध कदाचित पुण्याच्या पेशव्यांना जिंकता आलं असतं शेवटच्या मुसंडीमुळे पण काही लोकांनी ऐन वेळी माती खाल्ली म्हणतात बॉ. त्या विशिष्ट लोकांना आपल्या देशापेक्षा, साम्राज्यापेक्षा नागोबा नजिबाचा दत्तक बाप होण्यामधे जास्तं विंट्रेस होता म्हणे. शिवाय इब्राहिमखान गारदी, समशेरबहाद्दर वगैरे मुद्दे वगैरे गोष्टीही होत्याचं नै का?
बिग्रेडी पोस्टी टाकणं सोप्पं आहे साहेब पण स्वराज्याचं पानिपत किंवा एकुणचं एखाद्या गोष्टीचं पानिपत होणं ही शिवी आहे. पानिपत हा बलिदानाचा इतिहास आहे.
14 Dec 2016 - 11:37 am | संदीप डांगे
कोण हो हे काही विशिष्ट लोक? इतिहास हायेच तो नावं घ्याना बिंदास!
इब्राहिम गार्दी समशेरखान चा काय अँगल?
14 Dec 2016 - 10:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
इब्राहिमखान गारदी पानिपतच्या युद्धाच्या वेळी पेशव्यांच्या सैन्याच्या तोफखान्याचा सर्वेसर्वा होता. त्यावेळी ह्याच्या स्ट्रॅटेजीने काय चालायचे म्हणुन नजिबाच्या दत्तक बापांनी पेशव्यांच्या खांद्याला खांदा लावुन लढायच्या ऐवजी युद्धभुमीवर आमचीचं लढाई करायची पद्धत योग्य कशी वगैरे वगैरे प्रकार करुन अप्रत्यक्षपणे अब्दालीला लढाई जिंकायला मदत होईल अशी परिस्थिती निर्माण केली. (सदर व्यक्तीने इतर ठिकाणची रणांगणे मनगटाच्या जोरावर गाजवली होती तस्मात त्याविषयी आदर आहेचं). बाकी उद्या सत्ता हातात आली तर हे भटबामण आपणास कापडं धुवायच्या कामावरही ठेवायचे नाहीत वगैरे मुक (मूक खरं तर) चर्चाही झडली.
बाकी समशेर खान नाही तर समशेरबहाद्दर. ह्या बहाद्दर योद्ध्याला कायम यवनीचा पोर म्हणुन कमी लेखलं गेलं.
आता आपल्याचं ब्राह्मण, मराठा, बहुजन, गारदी वगैरेंच्या अब्दालीविरुद्धच्या बलिदानाचं पानिपत कुठं आणि जो एखाद्या गोष्टीचं पानिपत झालं हे म्हणणं कुठं? आपल्याचं इतिहासाचा अनमान करायची हि पद्धत कुठली?
15 Dec 2016 - 1:07 am | संदीप डांगे
खुलाशाबद्दल धन्यवाद. (ते मूक चर्चेबद्दल पहिल्यांदाच वाचतोय इथे)
विशुमित यांचा प्रतिसाद कै आपल्याला पटला नाही व आवडलेलाही नाही. एखाद्यावर शरसंधान करायचेच तर थेट करावे. उगाच आडून बोलू नये. अभ्यास कमी पडतो आणि बाण भलतीकडेच लागून आपलेच लोक दुखावले जातात.
12 Dec 2016 - 9:18 pm | निरंजन._.
अहो इतकं अपचन झालं होतं तर पित्ताची गोळी घ्यायची.. इथे येऊन इतकं भडाभडा कशाला??
(क्रु ह घे)
वाहतूक,चिंचोळे रस्ते याबाबत मात्र सहमत. मिसळ मात्र बेडेकरांची ही आवडते, श्री ची ही, का कि ची ही आणि खुद्द कोल्हापूराची ही.
आणि बाहेरच्या मंडळींनी येऊन पुण्याचा विकास केला - या मुद्द्यावर सविस्तर लिहितो घरी जाऊन!
12 Dec 2016 - 9:21 pm | निरंजन._.
'वाहतूक' ऐवजी 'रहदारी' असे वाचावे.
12 Dec 2016 - 9:24 pm | याॅर्कर
लेख जरी काडीसारू असला,तरी बर्याच मुद्यात दम आहे.
12 Dec 2016 - 9:48 pm | प्रसाद गोडबोले
हा हा हा
लय भारी
एकदम लोल
12 Dec 2016 - 9:49 pm | इंद्रवदन१
अहो मग जा तिथे. आम्ही नाहि दिल्या अक्षता
12 Dec 2016 - 9:52 pm | आदूबाळ
इंद्रवदन! दीज टाईप्स ऑफ कमेंट्स आर सो मिडल क्लास!
12 Dec 2016 - 9:57 pm | बोका-ए-आझम
सो मोनिषा यू नो!
12 Dec 2016 - 10:29 pm | इंद्रवदन१
"सो मोनिषा यू नो!"
लोल
13 Dec 2016 - 8:50 am | कैलासवासी सोन्याबापु
भैय्या ५₹ का धनिया तो फ्री मे बनता है
मोनिषा भाभी !
13 Dec 2016 - 11:21 am | सानझरी
'मॉनिषा' हो, मोनिषा नाही!
12 Dec 2016 - 10:06 pm | पिलीयन रायडर
"कॅटेगरीकली" मिडलक्लास!
13 Dec 2016 - 12:16 pm | अत्रन्गि पाउस
मी काश्मीर कि कली सारखा कॅटेगरी कली वाचलं पहिल्यांदा
13 Dec 2016 - 2:43 pm | सूड
इंद्रवदन तुम्हारी मर्द होने की प्रॉब्लम हम बाद मे डिस्कस करेंगे, नाव फॉर हेवन्स सेक प्लीज अटेंड दॅट कॉल!! =))
13 Dec 2016 - 3:04 pm | कैलासवासी सोन्याबापु
"माया मुझे पानी दो"
"खुद ले लो इंद्रवदन"
"मै मर्द हूँ"
"टेल दॅट टू युवर मॉम डिअर"
13 Dec 2016 - 3:05 pm | सूड
हा हा !!
13 Dec 2016 - 3:09 pm | आदूबाळ
साराभाईची ही अमोल रत्नं या धाग्यावर वाया घालवू नका राव!
वेगळा धागा काढू.
15 Dec 2016 - 12:36 am | एस
काढा. काढा.
13 Dec 2016 - 3:15 pm | अद्द्या
थोडं अवांतर आहे. पण तरीही
ओ मोम्मा,ओ मोम्मा,
तुने मुझे जनम दिया ,
ओ मोम्मा,ओ मोम्मा,
सबसे अच्छा करम किया ,
ओ मोम्मा,ओ मोम्मा,.
13 Dec 2016 - 4:09 pm | कैलासवासी सोन्याबापु
रोसेशका नाटक : कुत्ते की आत्मकथा!
13 Dec 2016 - 4:34 pm | आदूबाळ
पोपट काका की आत्मा का पोपट
उड गया उड गया उड गया रे
13 Dec 2016 - 5:12 pm | पगला गजोधर
13 Dec 2016 - 5:10 pm | पगला गजोधर
12 Dec 2016 - 10:05 pm | अमर विश्वास
साताऱ्याचे प्रचंड रुंद रस्ते आणि पोवई नाक्याची शिस्तबद्ध रहदारी ,, वा वा वा
12 Dec 2016 - 10:16 pm | चित्रगुप्त
हुश्य... आला एकदाचा टर्बोपंतांचा नवीन धागा. किती वाट बघायला लावलीत राव. आम्ही चातकासारखे वगैरे....
पुणेकर ज्या बाजीराव पेशव्यांच्या नावाने उसासे सोडत बसतात, त्या बाजीरावावर पिच्चर काढायाचा विडा कोणी उचलला, तर त्या भंसाळ्याने. त्यातही त्याला कुणी बर्वे, आगाशे, मेहेंदळे,पटवर्धन वगैरे पुणेकर मिळाले नाहीतच. मग बाजीराव कोण, तर म्हणे तो रणवीरशिंग का कोण ठोंब्या. नाजुक, गुलजार मस्तानी नायकिणीसाठी कोण, तर ती थोराड, जून, पुरुषी पादुकोण. काशीबाईसाहेब पुन्हा पंजाबी चोपडीण. आणि पुणेकरांच्या नाकावत टिच्चून त्या भंसाळ्यानं काशीबाई आणि मस्तानीला एकत्र नाचायला लावलंन आणि बाजीरावाकडून भांगडा करवला. शिव शिव. केवढे हे महापाप. तेही खुद्द पेशव्यांच्या बाबतीत.
टर्बोपंत, आता पुढला धागा काढायला एवढा वेळ नका लावू. च्यार दिवस खूप झाले. दो आरजू मे, दो इंतजार मे... कसेबसे च्यार दिवस आम्ही कळ सोसू.
12 Dec 2016 - 10:30 pm | खटपट्या
दोन लाडक्या अभिनेत्रींना नावे ठेउन तुम्ही बर्याच लोकांचा रोश (की रोष?) ओढवून घेतला आहे...
12 Dec 2016 - 10:40 pm | चित्रगुप्त
मी कश्याला बुवा अभिनेत्रींना नावे ठेवीन ? पिच्चर बाजीरावावर, तो करणारे सगळे पंजाबी, उत्तर भारतीय ...एवढेच सांगायचेय.
12 Dec 2016 - 10:44 pm | पैसा
अच्चं जालं तर! ते पुणेकर परवडले ओ. तुमचा धागा आला की धडकी भरते. आता कोणी गोर्या घार्या पुणेकरणीने नकार दिला वाट्टं!
12 Dec 2016 - 10:59 pm | भक्त प्रल्हाद
इथे कोणालाही पुण्यात येण्याचे आमंन्त्रण दिलेले नाही. तरी, आपला माज पुण्याच्या बाहेर सोडुन येणे. त्रास होत असेल तर निरा नदीच्या पलीकडे उभे राहुन पुण्याला शिव्या द्याव्यात.
12 Dec 2016 - 11:10 pm | Rahul D
आवरा जरा स्वतःला.
नावाप्रमाणे जरा लिहा.
12 Dec 2016 - 11:11 pm | डॉ सुहास म्हात्रे
13 Dec 2016 - 12:13 am | गामा पैलवान
टफि,
आगोदरंच पुण्याचं तापमान वाढलंय. जळफळाट करून घेऊन आजून का वाढवताहात?
त्याचं काय आहे की तुम्ही कितीही शिव्याशाप घातलेत तरी पुण्याचं महत्व यत्किंचितही उणावणार नाहीये. कारण तिथे भारतीय सैन्याच्या सर्वात मोठ्या विभागाचं (=सदर्न कमांड) मुख्यालय आहे. तुम्हाला पुण्याची औकात काढायची असेल तर प्रथम सदर्न कमांडचं मुख्यालय हलवून दाखवा.
आ.न.,
-गा.पै.
13 Dec 2016 - 12:28 am | संदीप डांगे
सदर्न कमांड पुण्यात आहे आणि ताजमहाल आग्ऱ्यात आहे!
30 Dec 2016 - 1:01 pm | महेश_कुलकर्णी
आजच पाहिले खुद्द सदर्न भाग परिसरात सदर्नच्या ऐवजी सर्दन असे लिहिले आहे....
13 Dec 2016 - 12:27 am | संदीप डांगे
चार वेळा पुण्याला गेलो, सगळीकडे फिरलो, चांगली फोर्व्हीलर सदाशिवपेठेतून फिरवली, शनिवारवाड्याला प्रदक्षिणा घातली, चिंचोळ्या बोळांतून ते प्रशस्त मार्गांवरही, मला तरी कुठेही बेशिस्त, ट्रॅफिक चा त्रास नै झाला!
एक तर माझ्याइतकी बेशिस्त ड्राइविंग पुण्यात होत नसेल किंवा पुण्यातल्या ट्रॅफिकला बेशिस्त म्हणणार्यानी पुण्याबाहेरची ट्रॅफिक पाहिली नसेल,
=)) =))
13 Dec 2016 - 2:24 am | रेवती
या असल्या प्रतिसादानंतर काय करायचं त्या टफिसाहेबांनी?
तुमच्यासारखे लोक्स हे धाग्याला सटासट येणार्या प्रतिसादाच्या पाईपमध्ये बोळा कोंबतात.
का असं केलत?
टफिजी (रफीजी च्या चालीवर), प्लीज अशातलेच वेगळे रंग दाखवणारे धागे येऊ द्या.
13 Dec 2016 - 8:26 am | संदीप डांगे
आयाम सोरी!!! प्रतिसाद मागे घेतो! :) ;)
13 Dec 2016 - 2:37 am | इंद्रवदन१
13 Dec 2016 - 9:04 am | एस
डिझेलमध्ये घासलेट अंमळ जास्त टाकलं वाटतं पेट्रोल पंपवाल्याने. पुणेकर ना, अशीच हातोहात शेंडी लावतात बाहेरच्यांना. जाऊ द्या. तुम्ही जास्त मनावर घेऊ नका. आणि त्या 'आर्य संगीत'वाल्यांची चांगली खरमरीत भाषेत कानउघाडणी केली पाहिजे. गेटवरचे स्वयंसेवक काय झोपले होते का? कुणीही आत घुसतंय म्हणजे काय! असो. बादवे त्या समोरच्या गोऱ्या घाऱ्या यमीचा शिंचा टफी नुसताच सुस्तावलेला असतो. त्याला असले धागे चघळायला दिले पाहिजेत. तेव्हढीच जरा करमणूक. नाही का?
13 Dec 2016 - 9:44 am | मिसळलेला काव्यप्रेमी
बरं मग कधी येताय पुण्यात टफी, चितळ्यांकडच गार गार दुध पिऊया.. काय म्हणता?
13 Dec 2016 - 9:47 am | अनुप ढेरे
म्हणजे नक्की कोण?
13 Dec 2016 - 11:33 am | अजया
टफीनी धागा ज रा आधी काढला असता तर पैशे तरी वाचले असते.शिवाय आमच्या इमारत संकुलात गोर्या घार्या लोकांची नावंच फार आहेत : -/
13 Dec 2016 - 4:38 pm | रेवती
तरी सांगत होते.................
13 Dec 2016 - 11:55 am | माझीही शॅम्पेन
मला वाटत टफी सारखे विचारवंत ह्यांना पुणेकरांनी आपल म्हणाव आणि भरभरून प्रेम द्याव :) म्हणजे त्यांच मत बदलेल , रचाक बराचस बरोबर लिहिल्य म्हणालो तर पुणेकर मिपा मित्र नाराज होतील :)
13 Dec 2016 - 12:03 pm | बबन ताम्बे
सगळी इंडस्ट्रीयल डेव्ह्लपमेंट पुणे आणि आसपासच का? आय टी कंपन्या पुण्याऐवजी साता-यात का येत नाहीत ?
13 Dec 2016 - 12:55 pm | प्रसाद गोडबोले
ओ काका , कशाला काय तरीच बोलताय ?
शुभ बोल बबन्या !
नकोच सातार्यात आय टी कंपन्या अन त्या निमित्ताने येणारी भय्या गर्दी . तुम्हाला औंधाला ओन्ध , बाणेर ला बानेर , सिंव्हगडाला सिंहगड वगैरे वगैरे आणि पुण्याला पूना म्हणलेलं चालत असेल पण सातार्यात कोणी सातार्याला सतारा म्हणलेले आम्ही खपवुन घेणार नाही !
:-\
13 Dec 2016 - 2:02 pm | बबन ताम्बे
बाकी भैया म्हणा, राजस्तानी म्हणा, सगळीकडेच दुकाने थाटून आहेत.
सिंह बरोबर. म्हणून सिंहगड. सिंव्हगड नाही.
13 Dec 2016 - 12:06 pm | गॅरी ट्रुमन
मला वाटते की आफ्रिका खंड सोडून इतर सगळ्या ठिकाणांचे विनाकारण स्तोम माजविले जात आहे. मानव वंशाची सुरवात आफ्रिका खंडात झाली.त्यामुळे इतर कुठेही (भारत,अमेरिका,युरोप इत्यादी) झालेली प्रगती 'बाहेरून' आलेल्यांनीच केलेली आहे.त्यामुळे आफ्रिका सोडून इतर कुठल्याच ठिकाणाचा उदोउदो करणे चुकीचे आहे.
13 Dec 2016 - 12:18 pm | इरसाल कार्टं
पार वाट लावलीत राव, नावाप्रमाणेच टर्बोचार्जड आहात.
पुण्यात जाणं झालं बऱ्याचदा पण फिरणं नाही झालं, अख्ख्या ग्रुप ला घेऊन जाणार होतो पुणं फिरायला पण आता आधी सातारला जाऊन येतो म्हणतो.
13 Dec 2016 - 1:05 pm | पाटीलभाऊ
काय चाललंय काय हे ???
टफीभाऊंना इनो द्या हो कोणीतरी...
कुठे नेऊन ठेवलंय पुणे आमचं...!
13 Dec 2016 - 1:38 pm | यशोधरा
मिपाला टीआरपीची इतकी वानवा आहे?
13 Dec 2016 - 1:47 pm | पैसा
मिपाला नाही. धागालेखकू महाशयाना आहे.
13 Dec 2016 - 1:51 pm | यशोधरा
मग मिपावर असले धागे का राहतात? :(
दिवसेंदिवस दर्जा घसरतच चालला आहे!
13 Dec 2016 - 1:56 pm | पैसा
चांगला प्रश्न आहे. पण मला नै म्हैत. आपण भेंड्या खेळूया का?
13 Dec 2016 - 1:58 pm | यशोधरा
काढ धागा.
13 Dec 2016 - 2:05 pm | पैसा
हाच बराय खरडफळ्यासारखा. लेखकूला काय प्रतिक्रिया आल्याशी कारण! ;)
13 Dec 2016 - 2:42 pm | एस
ण ~ न.
नको देवराया
अंत आता पाहू
प्राण हा सर्वथा
फुटो पाहे!
ह.
13 Dec 2016 - 2:46 pm | सूड
हरी नाम मुखी रंगते, एकतारी करी वाजते
विनविते, मी तुला, भाववेडी मीरा...
गोड नामी तुझ्या रंगते...
त,...
13 Dec 2016 - 3:07 pm | पैसा
तुझ्या गळा, माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा
ळ..
13 Dec 2016 - 3:28 pm | एकनाथ जाधव
तुझ्या कान्ती सम रक्त पताका पुर्वदिशी उगवती
अरुण उगवला प्रभात झाली
ल
13 Dec 2016 - 4:07 pm | सूड
लटपट लटपट तुझं चालणं गं मोठ्या नखर्याचं
बोलणं गं मंजूळ मैनेचं, नारी गंऽऽऽ नारी गंऽऽऽ नारी गं, हो नारी गं हो नारी गं..
ग
13 Dec 2016 - 4:13 pm | बबन ताम्बे
गोरी तेरा गांव बडा प्यारा
मैं तो गया मारा,
आके यहां रे, आके यहां रे.
रंगीबिरन्गे , फुल खिले है, लोग भी फुलों जैसे
आ जाये इक बार यहां तो, जायेगां फीर कैसे ...
स
13 Dec 2016 - 4:53 pm | पाटीलभाऊ
सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय..
य
13 Dec 2016 - 5:23 pm | रुस्तम
ये रे घना ये रे घना
ये रे घना ये रे घना
नाहू घाल माझ्या मना
न
13 Dec 2016 - 6:02 pm | यशोधरा
नाही कसे म्हणू तुला, म्हणते रे गीत
परि सारे हलक्याने, आड येते रीत
त
13 Dec 2016 - 6:48 pm | रेवती
तव नयनांचे दल हलले गं,
पानावरच्या दवबिंदूपरी
त्रिभूवन हे डळमळले गं.
ग
13 Dec 2016 - 6:57 pm | अजया
गगनसदन तेजोमय
तिमिर हरुन करुणाकर
दे प्रकाश देई अभय
य
13 Dec 2016 - 7:02 pm | यशोधरा
यमुनाजळि खेळू खेळ कन्हैया, का लाजता ?
हलती कशा या लाटा, फुलतो शरीरी काटा
का हो दूर रहाता ? प्रेमगंगा ही वहाता
घ्या उडी घ्या, का पाहता ? चला ना !
बहुमोल अशी ही वेळ अरसिका का दवडिता ?
त
13 Dec 2016 - 7:05 pm | पगला गजोधर
ये रातें ये मोसम, नदीका किनारा, ये चंचल हवा ।
कहा दो दिलोंने, के मिलके कभी हम, न होंगे जुदा ।।
द
13 Dec 2016 - 7:16 pm | बबन ताम्बे
"एक धागा सुखाचा, शंभर धागे ..." लिहीता येईल.
13 Dec 2016 - 7:49 pm | समीर वैद्य
एक धागा सुखाचा.. शंभर धागे टफिचे ।।
13 Dec 2016 - 8:00 pm | बबन ताम्बे
पण ते शंभर वर थांबतील की नाही शंका आहे.
13 Dec 2016 - 7:19 pm | रेवती
यशो, मगाशी त येऊन गेलय म्हणून द घेतिये.
दाटून कंठ येतो,
ओठात येई गाणे,
जा आपुल्या घरी तू,
जा लाडके सुखाने.
न
13 Dec 2016 - 7:23 pm | यशोधरा
नका विचारू देव कसा
देव असे हो भाव तसा
सगूण कुणी म्हणती देवाला
कोणी म्हणती निर्गुण त्याला
विश्वरूप त्या परमेशाचा
चराचराचर असे ठसा
स
13 Dec 2016 - 7:24 pm | प्रसाद गोडबोले
ससा तो ससा कि कापुस जसा त्याने कासवाशी पैज लाविली
वेगे वेगे धाऊ नि डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली ||
ल
13 Dec 2016 - 7:30 pm | यशोधरा
लवलव करी पातं
डोळं नाही थार्याला
एकटक पाहूं कसं
लुकलुक तार्याला
ल
13 Dec 2016 - 7:41 pm | संदीप डांगे
लगी लगी है ये दिल की लगी
न समझो इसे दिल्लगी...
मै ने जो चाहा था
मिल गयी वो खुशी
लगी लगी है ये दिल की लगी
न समझो इसे दिल्लगी...
ग
13 Dec 2016 - 7:48 pm | बबन ताम्बे
गम है कोई तो
दम मारो यारो
गम की दवा पे
दम ही खूशी है
चूर नशे में,
ये जिंदगी है...
हरी ओम ..
म
13 Dec 2016 - 7:55 pm | यशोधरा
मधु मागशि माझ्या सख्या, परि
मधुघटचि रिकामे पडति घरी
आजवरी कमळाच्या द्रोणीं
मधू पाजिला तुला भरोनी,
सेवा ही पूर्विची स्मरोनी
करिं न रोष सखया, दया करीं.
र
13 Dec 2016 - 7:42 pm | सूड
लाय लाय लाय लाय लायेकरनी पोरी लायेकरनी
वाकरे शेंड्याच्या गोयेकरनी
वटीनं खुर्दा वरलीकरनी पोरी वरलीकरनी
सफेद परक्या मोंबयकरनी
लाय लाय लाय लाय लायेकरनी पोरी लायेकरनी
वाकरे शेंड्याच्या गोयेकरनी
न
13 Dec 2016 - 7:45 pm | यशोधरा
आता ग घ्यावा का न?
13 Dec 2016 - 7:48 pm | पगला गजोधर
न जाने मेरे, दिल को क्या हो गया ।
अभी तो यही, था मगर खो गया ।।
य
13 Dec 2016 - 7:52 pm | यशोधरा
या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या
जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या
य
13 Dec 2016 - 8:22 pm | Rahul D
ये जो मोहब्बत है, ये उनका हे काम ।
म
13 Dec 2016 - 8:25 pm | सानझरी
मुझे तेरी मोहब्बत का सहारा मिल गया होता,
अगर तूफ़ाँ नहीं आता किनारा मिल गया होता..
त
13 Dec 2016 - 8:25 pm | सूड
मी डोलकरं मी डोलकरं डोलकरं दर्याचा राजा
घर पान्यावरी बंदराला करतो येजाऽऽऽ
मी डोलकरं मी डोलकरं डोलकरं दर्याचा राजा
ज
13 Dec 2016 - 8:30 pm | यशोधरा
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे
निराधार आभाळाचा तोच भार साहे
ह
13 Dec 2016 - 8:33 pm | पगला गजोधर
जा जा .... जा जा .... जा जा .... जा जा ....
कबुतर जा जा जा .... कबुतर जा जा जा ....
पहले प्यार की पहली चिट्ठी .... साजन को दे आ .....
अ
13 Dec 2016 - 8:45 pm | आदूबाळ
आज जाने की जिद ना करो...
यूंही पहलू में बैठे रहो
ह
(एवढा उजवीकडचा प्रतिसाद द्यायचं माझं स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी मो० टफी यांचा आभारी आहे.)
13 Dec 2016 - 8:56 pm | सूड
ह्यो ह्यो ह्यो पावना सखूचा मेव्हना तुज्याकडं बघून हासतोय गं, कायतरी घ्वोटाळा दिसतोय गं...
ग
13 Dec 2016 - 8:57 pm | पगला गजोधर
होठों से छूं लो तुम मेरा गीत अमर कर दो |
बन जाओ मीत मेरे, मेरी प्रीत अमर कर दो ||
ना उम्र की सीमा हो, ना जन्मों का हो बंधन |
जब प्यार करे कोई तो देखे केवल मन |
नयी रीत चलाकर तुम ये रीत अमर कर दो ||
आकाश का सूनापन मेरे तनहा मन में |
पायल झनकाती तुम आ जाओ जीवन में |
साँसे देकर अपनी संगीत अमर कर दो ||
जग ने छिना मुझ से, मुझे जो भी लगा प्यारा |
सब जीता किये मुझ से, मैं हर पल ही हारा |
तुम हार के दिल अपना, मेरी जीत अमर कर दो ||
द
13 Dec 2016 - 9:37 pm | रेवती
दम मारो दम,
मिट जाये गम,
बोलो सुबह शाम,
हरे क्रिश्ण हरे राम.
म
13 Dec 2016 - 9:39 pm | यशोधरा
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
अकस्मात तोही पुढे जात आहे
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते
त
13 Dec 2016 - 9:43 pm | नीलमोहर
माई नी माई
मुंडेर पे तेरी
बोल रहा है कागा
जोगन हो गई तेरी दुलारी
मन जोगी संग लागा
13 Dec 2016 - 10:52 pm | प्रभू-प्रसाद
मीट जाये गम ..
बोलो सुबह शाम...
हरे कृश्न हरे राम...
14 Dec 2016 - 12:41 am | शिवोऽहम्
माझ्या नवर्यानं सोडलिया दारू
बाई देव पावलाय गं
ग...
14 Dec 2016 - 11:30 am | परिधी
गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने
14 Dec 2016 - 11:52 am | अनन्त अवधुत
सागरा प्राण तळमळला...
31 Dec 2016 - 12:18 am | विजुभाऊ
शेपटीवाल्या प्राण्यांची
पूर्वी भरली सभा
पोपट होता सभापती
मधोमध उभा....
28 Dec 2016 - 8:02 am | प्रान्जल केलकर
दुनिया तुफान मेल
नहीं भैंया, दुनिया वेड्यांचा बाजार !
दुनिया वेड्यांचा बाजार
झांजीबार, झांजीबार, झांजीबार !
एका रात्री इथून पसार
दुसर्या रात्री दर्यापार
हुश्शार, भाईं हुश्शार !
झांजीबार, झांजीबार, झांजीबार !
बुडलो, मेलो, ठार अखेरीस
कुठे सुरैया, निम्मी, मीना, नर्गिस
लाख खर्चले, वसूल हजार
झांजीबार, झांजीबार, झांजीबार !
आली रे आली रसाळ आंबेवाली
आरे हड् !
आली, आली नवी निवडणुक
पेरा पैका, मते आपसूक
मत चिठ्ठ्यांचे गळ्यात हार
झांजीबार, झांजीबार, झांजीबार !
13 Dec 2016 - 2:03 pm | अद्द्या
लोकांचं एकूणच सामान्य ज्ञान , सहनशक्ती आणि अक्कल किती कमी आहे.
हे कळावं म्हणून असे धागे गरजेचे असतात .
असे " लेख" वाचायचे . उगाच हसल्यासारखं करायचं . माउस च्या दोन खर्चिक क्लिक्स आणि २ स्क्रोल वाया घालवले म्हणून स्वतःला शिव्या द्यायच्या . आणि खफ वर दंगा करायला परत जायचं .
शिंपला ए
13 Dec 2016 - 3:19 pm | संजय पाटिल
अहो त्यानी मागेच कबूल केलय, मला अक्कल कमी आहे म्हणून..
13 Dec 2016 - 3:13 pm | एम.जी.
पुण्याला शिव्या घालून प्रसिद्ध पावणार्यांमधे एकाची भर.....
13 Dec 2016 - 4:44 pm | सूड
प्रसिद्ध कशाला करायचं त्यांना? आम्ही वर गाण्याच्या भेंड्या सुरु केल्यात. तुम्ही पण त्यात सहभागी होऊ शकता.
13 Dec 2016 - 4:43 pm | सूड
हे गोरे, घारे आणि सानुसासिक स्वर आपल्याला प्रचंड आवडतात ब्वॉ!!
13 Dec 2016 - 5:21 pm | चौकटराजा
बाहेरचे जे सगळे आले ते पुणे हे मवाल्यांचे , कम्युनिस्टांचे, दहशतवाद्यांचे , उकाड्याचे गाव नाही म्हणून ,प्रत्येकाचा येण्यातील स्वार्थ वेगवेगळा. पेशव्याना कोकणात कर्त्रुत्व गाजवता आले नसते अन डी वाय ना कोल्हापुरात.
13 Dec 2016 - 7:48 pm | मनिमौ
आपण किनई पुणेकरांच घर ऊन्हात बांधू हा.
65 वा सवाई साताऱ्यात झालाच पायजे
अवांतर जे पी ना बोलवा रे
13 Dec 2016 - 7:56 pm | समीर वैद्य
एक धागा सुखाचा.. शंभर धागे टफिचे ।।
13 Dec 2016 - 8:01 pm | सूड
टफिंनी आणखी धागे काढावे, जेणेकरुन गाण्याच्या भेंड्या खेळता येतील. =))
13 Dec 2016 - 8:15 pm | इंद्रवदन१
टफी आणि केजरीवाल कुठे काय बोलतील
13 Dec 2016 - 8:29 pm | संदीप डांगे
टफि को नोंसेन्स पसंद है
टीआरपी का देस पसंद है
बिनडोक का भेस पसंद है
13 Dec 2016 - 9:49 pm | रमेश आठवले
सवाई गन्धर्व सोहळा पुढच्या वर्षी प्रत्यक्ष हजर राहून ऐकाव्याचे असल्यास हे करता येईल.
१. समारंभाच्या स्थानाला चालत जाता येईल एवढ्या अंतरावरील हॉटेल मध्ये आत्तापासून आरक्षण करा.
२. पहिल्या रांगेतील सोफयावरील जागेचे आत्ताच आरक्षण करा.
हे परवडत नसेल तर घरी बसून तू नळीवर २०१७ चे कार्यक्रम उपलब्ध होतील तेंव्हा ऐका.
तुमच्या तोंडसुख घेण्याने पुण्याची रहदारी किंवा सवाईचे श्रोते सुधारतील या भ्रमात राहू नका.
13 Dec 2016 - 11:19 pm | धर्मराजमुटके
आता मुंबईचा नंबर कधी ?
14 Dec 2016 - 1:39 am | खटपट्या
आवरा
14 Dec 2016 - 11:59 am | डिस्कोपोन्या
टर्बोशेठ ...होऊ द्या एखादा मोहोत्सव सातारा कोल्हापुरात , बघा जमतोय का सवाई सारखा , उगीच पुण्यात येण्याचे कष्ट घेऊ नका !
14 Dec 2016 - 2:47 pm | श्रीगुरुजी
सवाई गंधर्व महोत्सव तुमच्यासारख्यांकरता नसतो हो. रसिक, कलाप्रेमी, दर्दी आणि शास्त्रीय व अभिजात संगीतप्रेमी पुणेकरांसाठी ते असतात.
तुमच्यासारख्या सातार्करांनी डोक्यावर पांढर्या पिसांची गुलछबू टोपी घालावी (शांताराम वणकुद्रे, एम जी रामचंद्रन इ. मंडळी कायम अशा टोपीत दिसायची. या टोपीत माणूस छंदीफंदी दिसतो.), तोंडात पानाचा तोबरा भरावा, गळ्यात ३-४ पदरी जाड सोनेरी गोफ घालावे, "शांताबाईचा जलवा"/"करंट ४४०"/"नाद करायचा नाय" असली नावे असलेल्या वगनाट्याला जावे, स्टेजवरच्या छमकड्या नाचत असताना जोरदार शिट्ट्या माराव्या, "बाई वाड्यावर या"/"आवाज वाढव डीजे"/"पोपट"/"आँटी तुझी घंटी" असल्या चावट द्व्यर्थी गाण्यावर खुर्चीवर चढून नाच करावा, खुर्चीखाली जोरदार पानाची पिंक मारावी, ख्रॅssssssssssक असा जोरदार आवाज काढून खाकरा काढावा, गुटख्याची पुडी तोंडात रिकामी करून रिकामी पुडी खाली फेकावी आणि वगनाट्य संपल्यावर बुलेट ताणून एखाद्या रेस्टॉरंट कम बारमध्ये जाऊन पिऊन आणि नंतर नळी फोडून सावकाश मध्यरात्री घरी जावे.
सवाई बिवाई असल्या ठिकाणी जाऊन कशाला डोक्याला ताप करून घेता?
14 Dec 2016 - 4:25 pm | मराठी_माणूस
सातरकडच्याच एका महोत्सवाची माहीती
http://mumbaimirror.indiatimes.com/others/sunday-read/Sacred-ground/arti...?
त्यात एका ठीकाणी काय म्हटले आहे ते पहा
“A large part of the audience, including villagers and farmers, know when a performer is approaching the sam (first beat of a rhythmic cycle) even in (less frequently heard) taals like Jhoomra and Tilwada,” he said. “This is something you don’t see in Mumbai.”
अजुन एक
“Listeners there are hard-core music lovers,” said Samsi. “Despite it being a rural area, they have been exposed to intense, traditional classical music. Many of them even know the Gwalior and Agra gharana khayals being sung. They are not like urban audiences, who keep clapping for everything. You get proper daad (encouragement) and appreciation from the heart.”
14 Dec 2016 - 2:53 pm | सुज्ञ
यानिमित्ताने आम्हीही याच विषयावर पूर्वी अशाच चालू केलेल्या एका धाग्याची जाहिरात. जरूर वाचा :)
http://www.misalpav.com/node/29276
14 Dec 2016 - 8:42 pm | हतोळकरांचा प्रसाद
पुणेकर आणि गायन लेखात एकत्र आल्याने कायप्पावरला एक जोक आठवला -
एका गायकाचं पुण्यात गाणं असतं. पुणेकर सारखं वन्स मोर देतात. गायकाला छान वाटतं. पण वन्स मोर संपत नाही.
मग तो विचारतो, "एवढ्या वेळा वन्स मोर का?"
पुणेकर: नीट म्हणेस्तोवर आम्ही वन्स मोर देतोच....
26 Dec 2016 - 12:29 pm | विश्वेश
हे म्हणजे असे आहे कि आपल्या बनियानला भले भगदाड असो पण दुसऱ्याच्या शर्टावरचा डाग बघून फिदी फिदी हसायचे !
पुण्यात बोलावले कोणी होते ?
तोंड वर करून यायचे आणि वर आल्या गावाला शिव्या घालायच्या बरं जमत बुआ सातारकरांना !
तुमच्या साताऱ्यात का नाही हो त्या मूर्तीने काढली इन्फोसिस ? पुणेकर १-४ मध्ये झोपल्याने धंद्याचे जेवढे नुस्कान (मुद्दाम शुद्धलेखनाच्या चुका करतो आहे तुम्हाला कळावे म्हणून) करून घेतो ना तेव्हढा तुमचा सातारचा वर्षभराचा टर्न ओव्हर तरी आहे का बघा !
30 Dec 2016 - 12:34 am | सुबोध खरे
30 Dec 2016 - 12:37 am | सुबोध खरे
30 Dec 2016 - 12:38 am | सुबोध खरे
मोबाईल वरुन येत नाही.
30 Dec 2016 - 7:47 am | अनिरुद्ध.वैद्य
अत्तास नाय, पार पुण्यपत्तन असल्यापासुन माजवलं जात आहे.
30 Dec 2016 - 9:31 am | सुबोध खरे
30 Dec 2016 - 9:32 am | सुबोध खरे
एका पुणेरी माणसाला तीन
भाषा बोलणारा पोपट दिसतो......
तो त्या पोपटाची परीक्षा घ्यायचे ठरवितो..
आणि काही प्रश्न विचारतो..
माणूस – Who are you.??
पोपट – I am Parrot..
माणूस – तुम कोन हो..?
पोपट – मैं तोता हु ..l
माणूस – तू कोण आहेस..?
पोपट – तु बहिरा हाय का बे...?? बैताडया, तुले २ वेळा सांगितलं तरी समजत नाही का बे..? स्वताले जास्त शायना समजून रायला का बे..? आता का कानाखाली वाजवुन सांगु काबे तुले बहिय्रा.. की मी पोपट आहो ते... दिसत नाही का तुले भोकण्या... **
पुणेरी माणूस:- बाप रे, पोपट नागपुरचा आहे वाटतं?
30 Dec 2016 - 9:33 am | जाबाली
.पैकी सावित्रिबाईंचे नाव पुणे विद्यापिठाला दिले गेले कारण तितक्या ताकदीचा कुणी मुळ पुणेकर सापडला नाही. ----------- आवरा !
31 Dec 2016 - 2:07 am | भक्त प्रल्हाद
तरी नशीब. अजुन शिवाजी महाराज पुण्याचे आहेत हे मान्य आहे.
31 Dec 2016 - 12:22 am | विजुभाऊ
पुण्यात खडीचे मैदान आणि खडी मशीन अशी दोन ठिकाणे आहेत.
पण एक आहे सोमवार पेठेत तर दुसरे....एकदम कोम्ढव्यात....