पुण्यात यंदाचा सवाई गंधर्व महोत्सव संपन्न होत आहे ...
त्या निमित्ताने : सवाईला अनेक वर्षे गाण्याचा आनंद घेतानाच केलेले एक निरीक्षण
सवाईला दोन प्रकारचे लोक येतात
पहिल्या प्रकारचे लोक ....
हे बरेचदा ऑफिस मधून डायरेक्ट येतात. जमाल तर योग्य करणे देऊन राजाही मिळवतात .
हे लोक स्वतःच्या कपड्यांचा फारसा विचार करत नाहीत. जीन्स , टी शर्ट , स्वेटर असे काहीही चालते. हे लोक एकमेकांची जागा धरतात. यांना पटकन राग ओळखता येईल याचे खात्री नसते. पण ते "हा राग कोणता ? " असे बिनधास्त विचारतात. पण असे असले तरी गाण्याचा मनमुराद आस्वाद घेतात.आणि मागे असलेल्या भेळ, थालीपिठ. खिचडी यांचाही अनमान करत नाहीत. मागे लावलेल्या जुन्या फोटोंचे प्रदर्शनही आवडीने बघतात. थोडक्यात सर्वसामान्य रसिक ...
पण ही जी दुसरी जमात आहे .. ती फारच उच्चं ... अभिरुची वगैरे शब्द वापरणारी ,,, हे ओळखायची लक्षण कोणती ?
१. हे लोक हमखास झब्बा घालतात.. वर एखाद जाकीटही
२. हे लोक गाणं ऐकायला येत नाहीत तर "संगीताचा आस्वाद" घ्यायला येतात
३. भूपात सगळे स्वर शुद्ध असतात इतपत त्यांना संगीताचे ज्ञान असते.. मुळात त्यांनी संगीत "वाचलेले" असते.. पण ऐकलेले नसते
४. ही लोक गाणं सुरु झाले की हा राग कुठला यावरच चर्चा करतात. पण मूळ मुद्दा आपण पूर्वी हा राग कुठे कुठे ऐकला हा असतो.
५. दुसऱ्या दिवशी अशोक रानडे प्रभुतींचे सकाळ मधील लेख वाचून यांना काल काय गायले याचा बोध होतो. मग ते त्याची चर्चा पुढच्या सवाई पर्यन्त करतात
६. सर्वात महत्वाचे म्हणजे यांचा ताल व लयीचा अंदाज अगाध असतो .. त्यामुळे समेवर द्यायची दाद हमखास उशिरा देतात
तेंव्हा बघा यंदाच्या सवाईला ही जमत तुम्हाला ओळखता येते का ?
प्रतिक्रिया
8 Dec 2016 - 3:59 pm | एस
आदूबाळ यांच्या एका लेखाची आठवण झाली.
http://www.misalpav.com/node/23763
8 Dec 2016 - 4:17 pm | अमर विश्वास
अरे वा .. हा लेख वाचला नव्हता ...
मिपा मी नवीन असल्यामुळे असेल .. आत्ता वाचला .. मस्तच...
8 Dec 2016 - 7:12 pm | मारवा
मला खूपदा आवडत्या रागांविषयी लिहावं असा विचार मनात आला.
पण तो याच कारणाने सोडुन दिला.
आपण भले आपला आनंद भला.
बाकी आदुबाळ यांचा लेख हा क्लासिक मध्ये येतो.
8 Dec 2016 - 7:15 pm | मारवा
मात्र जोडीलाच हे फालतु प्रेक्षक ही असतात.
हे फालतु आणि जाणकार दोघांचा एक महासंगम पाहण्याचं उत्तम ठिकाण आहे.
8 Dec 2016 - 7:22 pm | स्रुजा
सवाई कधी आहे यंदाचा?
8 Dec 2016 - 7:23 pm | स्रुजा
ओह, सुरु झालाय :(
8 Dec 2016 - 7:24 pm | अमर विश्वास
एकदम सहमत मारवा जी ,,
आणि याच कारणासाठी तुमच्या आवडत्या रागांविषयी जरूर लिहा ...
वाचायला आवडेल ... आणि जमल तर लिहायलाही ...
8 Dec 2016 - 7:56 pm | महासंग्राम
गवैयांपासून खवैयांपर्यंत साऱ्यांची पंढरी 'सवाई' !!!
बाकी यंदा थंडी कमी आहे म्हणून 'शाल' अन 'मफलर' कमी दिसतायेत हे आपलं उगाच एक निरीक्षण...
8 Dec 2016 - 8:14 pm | पिलीयन रायडर
ते सोडा... खरंच चेपुवर लाईव्ह आहे का यंदा? ते सांगा.. खुप वर्षांनी हुकतंय सवाई..
14 Dec 2016 - 10:45 am | मराठी_माणूस
एका गाजावाजा नसलेल्या संगीत संमेलनाची माहीती
http://mumbaimirror.indiatimes.com/others/sunday-read/Sacred-round/artic...
त्यात एका ठीकाणी म्हटले आहे की , तिथले रसिक (जे जवळच्या खेड्यापाड्यातुन येतात) हे खरे दर्दी आहेत, त्यांची संगीताची समज अतिशय उच्च दर्जाची आहे.
14 Dec 2016 - 6:30 pm | चौकटराजा
'सवाई गंधर्व ' महोत्सवा सारखे कार्यक्रम बर्याच ठिकाणी होतात. काही गोष्टी माणूस कुणाकडून कशा आणतो याचे नीट उत्तर मिळत नाही. शास्त्रीय संगीताची गोडी ही एखाद्यातच कशी येते ती त्याच्या भावंडात देखील का येत नाही याला उत्तर नाही. पूर्वजन्मावर अजिबात विश्वास नसणारा मी ही 'ही आवड किम्वा कोणतीच आवड हे " पूर्वजन्मीचे पुण्य किंवा पाप आहे असे म्हणून मोकळे होत असतो. बटाटा वडा , सुबक ठेंगणी ई मुळे एकादा आकर्षित जरूर होईल पण तो या कारणासाठी पाच पाच तास बैठक टाकून बसेल असे नाही. राग ओळखता येणे हे फार मोठ्या गुणाचे लक्षण नाही तर गायकानी सादर केलेली
स्वरसंगति , त्याचा लगाव, लयकारी ई अनेक अंगांचा आस्वाद घेता येणे हे महत्वाचे असते. त्यात देखील काही जणच अशा
आस्वादी पातळी पर्यंंत पोहोचतात. तरीही " काही तरी मस्त ऐकले असे वाटते" ही पातळी देखील बर्याच महत्वाची आहे. मी ओ पी नय्यर यांचा चाहता आहे पण ओ पी चे नांव व गीत ऐकल्यावर चेहर्यावरची एकही सुरकुती न हलणारे माझ्याच घरात आहेत, तात्पर्य दुसरे कोणत्या सदरात मोडतात पेक्षा आपण कोणती पातळी अस्वादात गाठली आहे हे महत्वाचे.
14 Dec 2016 - 7:43 pm | बोका-ए-आझम
या पुण्यातल्या सवाईला एकदा जायचं आहे. पण तेवढं शास्त्रीय संगीत कुणाला समजतंय?
15 Dec 2016 - 1:16 am | पिलीयन रायडर
मलाही त्यातलं का ही ही कळत नाही. पण तरीही जाऊन बसा. थोड्यावेळाने खरंच फार मजा यायला लागते.
मी किशोरी आमोणकरांचे गाणे ऐकायला गेले होते. ४५ मिनिटं त्या सुर जुळवत होत्या की काय करत होत्या ते मला अजिबात कळत नव्हतं. कंटाळा यायला लागला.. पण नकळत त्यात ओढल्या गेल्यासारखं झालं. आणि मग त्यांनी फक्त "सहेला रे.." असं म्हणलं आणि अंगावर काटा आला अक्षरशः... उगाच् नाहीये ते..
शांतपणे बसुन ऐकत राहिलं की निव्वळ इंस्ट्रुमेंटल संगीत सुद्धा डोळ्यातुन पाणी काढतं हा माझा अनुभव आहे..
15 Dec 2016 - 1:16 am | पिलीयन रायडर
मलाही त्यातलं का ही ही कळत नाही. पण तरीही जाऊन बसा. थोड्यावेळाने खरंच फार मजा यायला लागते.
मी किशोरी आमोणकरांचे गाणे ऐकायला गेले होते. ४५ मिनिटं त्या सुर जुळवत होत्या की काय करत होत्या ते मला अजिबात कळत नव्हतं. कंटाळा यायला लागला.. पण नकळत त्यात ओढल्या गेल्यासारखं झालं. आणि मग त्यांनी फक्त "सहेला रे.." असं म्हणलं आणि अंगावर काटा आला अक्षरशः... उगाच् नाहीये ते..
शांतपणे बसुन ऐकत राहिलं की निव्वळ इंस्ट्रुमेंटल संगीत सुद्धा डोळ्यातुन पाणी काढतं हा माझा अनुभव आहे..
15 Dec 2016 - 4:00 am | साहना
मला अनेकदा असल्या कार्यक्रमांना जावे लागते. गजल हा प्रकार सोडला तर माझे संगीतातील ज्ञान ० आहे. शास्त्रीय संगीत मधील सुमारे ९०% गोष्टी अजिबात आवडत नाही. शेहनाई आणि तंबोरा सहावत नाही. तबला आणि सरस्वती वीणा विशेष आवडते.
स्वानुभवरून स्वतःला उच्च कोटीचे संगीत प्रेमी शाबीत करण्यासाठी खालील गोष्टी कराव्यात.
१. भारतीय कपडे घालावेत साडी, खाडी वगैरे. रंग भडक ठेवावा. सोन्याचे दागिने वगैरे घालावेत.
२. सर्वांत पुढे बसावे. (शक्य असेल तर. कलटी मारायची असेल तर मागे बसावे )
३. दहा वर्षां मागे (आपल्या वया प्रमाणे) भीमसेन जी ची एक बैठक झाली होती ... २५ वर्षां मागे मोगूबाईंच्या घरी गेले होते. अश्या बाता कराव्यात.
४. अमुक तमुक राग आपला फेव्हरेट आहे असे बाजूच्याला सांगावे.
५. गाणे चालू असताना मध्येच विनाकारण बाजूच्या माणसाकडे पाहून स्मितहास्य द्यावे म्हणजे जणू काही गुह्य आपल्याला समजले आहे.
६. डोके मधून मधून हलवावे. मध्येच विनाकारण "क्या बात है" असे वगैरे उद्गार काढावेत.
७. सामान्य लोक दाद देताना चेहरा मक्ख ठेवावा. "ह्यांना संगीतातील काहीही ज्ञान नाही" असे म्हणावे.
८. प्रोग्रॅम संपल्या नंतर कलाकाराच्या जवळ जाऊन दाद द्यावी. महिलांना कलाकाराला अप्रोच करणे नेहमीच सोपे जाते.
९. शक्य असल्यास कलाकाराच्या गुरुचे नाव शोधून ठेवावे. म्हणजे महेश काळेला जाऊन "अगदी अभिषेकबुवाच गात होते असे वाटले हो" म्हणावे. राहुल देशपांडे असेल तर "माझे आजोबा नेहमी वारंवार वसंतरावा बद्दल बोलत असत. आपले गाणे ऐकले आणि आजोबा इतके का भरून गेले होते हे समजले" अशी दाद द्यावी.
१०. एकादी व्यक्ती जर जास्त भाव खाऊन बोलत असेल तर. "गाणे बरोबर होते पण साऊंड सिस्टम चा काही तरी घोळ होता" असा technikal विषय काढावा. किंवा "तंबोऱ्यावरील extraa नवीन होता असे वाटले" असे बोलावे.