वरवर पाहता या गोष्टींचा परस्परांशी काहीही संबंध नाही असे दिसू शकेल. पण गेल्या २-३ वर्षातील घटना पाहता आजची निवडणूक माझ्यासाठी हा नवीन विषय सोडून गेली.
२ वर्षांपूर्वी भारतात झालेल्या लोकसभेच्या निवडणूकांनी याची सुरुवात झाली असे म्हणता येईल.. त्यापूर्वी या गोष्टी नव्हत्या असे नाही पण सामान्यपणे प्रमाण दिसण्याइतके नव्हते.
५ गोष्टी मला समान धाग्यात ओवल्यासारख्या दिसतात.
१. अरब स्प्रिंग, आयसिसचा उदय आणि अरब निर्वासित.
२. भारत-पाकिस्तान ताणलेले संबंध, भारतात आलेले उजव्या विचारसरणीचे सरकार, आणि त्यानिमित्ताने उजव्या विचारांचा सोशल मिडियावर सुरू झालेला धुमाकूळ.
३. चीन ची सुरू झालेली दादागिरी.
४. ब्रेग्झिट, आणि त्यानिमित्ताने युरोपियन दिशांमध्ये दिसणारे उजव्या शक्तींचे प्राबल्य (ज्याला काही कारणे आहेत अर्थात.)
५. भारतीय राजकारणात झालेल्या मोदींच्या उदय आणि ज्याप्रकारे ट्रंप ने कँपेनिंग केले, तसेच सतत चर्चेत राहणे, रॅडिकलाईझ करणारी विधाने (जी मोदींनी टाळली होती, पण त्यांच्या पाठिराख्यांनी केली होती), आणि त्यानिमित्ताने त्यांना मिळालेला पाठिंबा.
सोशल मिडिया या सगळ्यात अर्थातच महत्वाची भूमिका बजावत आहे यात शंका नाही, पण त्याबरोबरच दुसरा प्रश्न असा आहे की जगातून (तथाकथित?) उदारमतवाद हळूहळू हद्दपारच होत अहे की काय? सरकारे कशी वागतील हे माहित नाही, पण लोकांचा कल सरळसरळ प्रांतवाद, धर्मवाद वंशवादाकडे झुकताना मला दिसतो. याचा नेमका परिणाम काय होईल? तसेही तिसरे महायुद्ध ओव्हरड्यू आहे असे म्हणतात. मग अश्याप्रकारे होणारे ध्रुवीकरण जगाला तिसर्या महायुद्धाकडे नेईल की काय?
प्रतिक्रिया
9 Nov 2016 - 12:46 pm | मराठी कथालेखक
चांगला धागा
तिसर्या महायुद्धाबद्दल अजून कुणी फारसं बोलंत नाही. तिसरं महायुद्ध ही कल्पनाच फार भयंकर वाटत असल्याने बहूधा नकोच तो विषय म्हणून टाळला जात असावा.
आता तज्ञ लोक इथे येवून मत मांडतात का ते बघूयात
9 Nov 2016 - 1:49 pm | जानु
तुमच्या मते हे उजवीकडे झुकणे महायुद्ध सुरु करण्याची तयारी आहे का? अरबी भागात जे झाले ते बाहेरून झाले हे एकवेळ मान्य केले तरी भारत आणि अमेरिकन लोकांना मते कोणाला द्यायची हे स्वातंत्र्य होते. त्यात उदारामत्वाचा पराभव झाला असे का वाटावे? त्या बद्दल आपले मत काय? उजवी मंडळी सत्तेवर आली त्यात जनतेच्या मताचे प्रतिबिंब आहे. युरोपियन घुसखोरीतून जे समोर आले ते चित्र सामान्य जनतेसाठी धोकादायक परिणाम दर्शविण्यासाठी पुरेसे आहे. जनमत उजवीकडे झुकण्यास इस्लामी दहशतवाद हे मूळ कारण आहे असे मला वाटते. त्यात तुम्ही उदारामता चा पराभव समजत असाल तर तो तुमचा भाबडे पणा असेल. या अशाच विचारांचा अति माऱ्यामुळे जनता जास्त कडवी राष्ट्रवादी होत जाणार. रोग हेल्याला अन औषध पखालीला हे बंद झालं नाही तर मग महायुद्ध नक्की समजा. फक्त आपल्या डोळ्यासमोर नाही व्हावे एवढीच ईच्छा करू शकतो.
9 Nov 2016 - 1:58 pm | बोलबोलेरो
योग्य व परिस्थितीची जाण असणारे विचार. उदारमतवादाच्या नावाने गळा काढल्यामुळे लोकांच्या सहनशीलतेचा अंत होण्याची खरी कारणे दाबता येणार नाहीत. कोंबडे झाकल्याने सूर्य उगवायचा थांबत नसतो. अमेरिकन मीडियानेही भारतीय फेक्युलर मीडिया प्रमाणे खोटे निष्कर्ष दाखवून जनमत प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. काय उपयोग झाला?
9 Nov 2016 - 2:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>>>>अमेरिकन मीडियानेही भारतीय फेक्युलर मीडिया प्रमाणे खोटे निष्कर्ष दाखवून जनमत प्रभावित करण्याचा प्रयत्न केला.
आमचं भारतीय मीडिया लैच बदनाम होतय वाटतं..
-दिलीप बिरुटे
9 Nov 2016 - 2:37 pm | आनन्दा
उजवीकडे झुकणे ही महायुद्धाची तयारी आहे असे मला म्हणायचे नाही. माझे मत थोडे वेगळे आहे.
सर्वप्रथम हे स्पष्ट करतो की मी मोदींचा उघड समर्थक आहे. आणि माझ्या मिपावरील ट्रेलमध्ये हे तुम्हाला दिसून येईल.
मी वापरलेला शब्द उदारमतवाद असला तरी त्याहीपेक्षा ध्रुवीकरण हा शब्द मला जास्त अपेक्षित आहे. भांडवलशाहीला उद्योगधंदे नीट चालण्यासाठी शांती आवश्यक असते, तसेच काहीवेळा युद्धपण हवे असते, त्यामुळे भांडवलदार जनमत कसे प्रभावित करतात याबद्दल मला विशेष काही सांगता येणार नाही. पण तरीसुद्धा मिडियाने भारतात काँग्रेसची, अमेरिकेत हिलरीची आणि ब्रिटनमध्ये ब्रेक्झिटविरोधी भूमिका घेतली होती. गंमत म्हणजे या तीनही ठिकाणी माध्यमे (इलिक्ट्रोनिक आणि प्रिंट) तोंडघाशी पडली.
सोशल मिडिया निवडणूकांमध्ये महत्वाची भूमिका बजावतो, हे यावेळी परत एकदा दिसले. परंतु त्याच बरोबर जनमतचाचण्या अश्याप्रकारे सलग फेल गेलेल्या देखील दिसल्या. याचा अर्थ असा आहे का की लोक उघडपणे उदारमतवाद मान्य करतात पण मतदानाची वेळ आली की मात्र यु टर्न घेतात?
अरब स्प्रिंग, इस्लामी दहशतवाद आणि युरोपातील निर्वासित या सार्याच्या मुळाशी आहेत याबद्दल माझ्याही मनात शंका नाही. परंतु यातून मला असेही जाणवत आहे की आज लोकशाही देशांमध्ये जनमत इस्लामविरुद्ध होऊ लागले आहे. एक प्रकारे बघायला गेले तर हे रॅडिकलायझेशनच आहे. ज्या प्रकारे जर्मनीमध्ये ज्यूंविरोधात जनमत तयार होत होते, तसेच एक प्रकारे इस्लाम्विरोधात होत आहे. मी देखील त्याचाच एक भाग आहे, आणि इस्लामबद्दल उदासीन राहणे मला देखील जमलेले नाही. ते योग्य आहे का, किंवा त्याची कारणे काय आहेत याची चर्चा मला आत्ता करायची नाही. तो एक स्वतंत्र विषय आहे.
मला प्रश्न असा आहे की या घटना एका विशिष्ट गतीने जगाची पुन्हा एकदा विभागणी करत आहेत का?
उदा. आज अमेरिकन लोकांना विचारले तुमचे मुख्य शत्रू कोण? तर ते म्हणतील इस्लाम आणि चीन. (ट्रंपची तथाकथित भडकावू विधाने प्रामुख्याने याच दोन विषयांवर होती. आणि तो निवडून आलाय म्हणून असे म्हणायला वाव आहे)
मग भविष्यकाळात जर चीनने या इस्लामी देशांची बाजू घेतली, आणि एखादी ठिणगी पडली, आणि त्यात जर जनमताचा रेटा युद्धाच्या बाजूने असेल (जसा उरी हल्ल्याच्या वेळेस भारतात तयार झाला होता) तर परत सगळे जग नवीन युद्धात लोटले जाऊ शकते का? असा मुख्य प्रश्न आहे.
इंग्रजीत एक म्हण आहे, नोन डेविल इस बेटर दॅन अननोन अँजल. त्याप्रमाणे हिलरी नोन डेव्हिल होती. ट्रंपला पाठिंबा मिळणे याचा अर्थ छुपे का होईना ध्रुवीकरण झाले आहे असाच होतो.
असो, प्रतिसाद फारच विस्कळित झाला.
बाकी
याच्याशी सहमत आहेच.
पण
हे खरेतर उजवी मंडळी सत्तेवर आली त्यात जनतेच्या बदलत्या मताचे प्रतिबिंब आहे. असे मला वाटते. आणि तीच धोक्याची घंटा आहे
9 Nov 2016 - 2:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विवेचन पटतय. प्रतिसाद आवडला.
-दिलीप बिरुटे
9 Nov 2016 - 3:14 pm | अनिरुद्ध.वैद्य
मला सांगा सामान्य अमेरिकनने का फुकाचा विचार करत बसाचालालेत, भारत त्यांचे जॉब घेउन चाललेत अन इस्लामच्या नावाखाली अतिरेकी उघड उघड अमेरिक्सेस धमक्या देत सुटताहेत.
मग काय ऑटसोर्सिन्ग अन उदारमतवादाचे ढोल बडवत आपली वाताहत होतांना बघत रहावे?
9 Nov 2016 - 3:16 pm | अनिरुद्ध.वैद्य
चीन अन भारत आउटसोर्सिंंग्मधुन जॉब घेउन चाललेत असे वाचावे.
9 Nov 2016 - 3:45 pm | बोलबोलेरो
याच उत्तर होय असं आहे. ट्रम्प यांच्या विजयाबद्दल खात्री होती. शंका नव्हती.भारत रशिया व अमेरिका एकत्र येताना दिसतील.
9 Nov 2016 - 4:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
हे खरेतर उजवी मंडळी सत्तेवर आली त्यात जनतेच्या बदलत्या मताचे प्रतिबिंब आहे. असे मला वाटते. आणि तीच धोक्याची घंटा आहे
हे खरे मत असेल तर तो "भाबडेपणा (नेव्हिटी)" आहे, आणि खरे मत नसेल तर (त्यामागचा उद्येश) अत्यंत धोकादायक आहे !
डावे सत्तेवर असले की वार्ताहर, विचारवंत व इतिहासकार संत-संन्यासी प्रवृत्तीचे असतात / बनतात काय !?
डाव्यांचा या बाबतीतला इतिहास अजिबात गुप्त नाही आणि अजिबात अभिमानस्पद नाही... आणि त्याला गुगलबाबासुद्धा प्रमाण आहेत ! =))
राजकारणात सर्व सारखे, त्यामुळे कोळश्याने किटलीला काळे म्हणणे खूप विनोदी दिसते !
समतोल मत असे असावे...
कोणीही सत्तेवर आले तरी "जनतेला खरी माहिती मिळावी व त्यावरून तिला आपले मत बनवता यावे" अशीच माध्यमे असावीत... हे मत जरी आदर्शवादी वाटले तरी कोणत्याही राजवटीवर त्याच दिशेने वाटचाल चालू ठेवण्यासाठी लोकांचा दबाव असला पाहिजे.
9 Nov 2016 - 6:39 pm | आनन्दा
समजलो नाही.. थोडे इस्कटून सांगता का?
10 Nov 2016 - 2:52 am | डॉ सुहास म्हात्रे
भारतातच बघायचे असले तर...
बंगालमधल्या आणि केरळमधल्या डाव्यांच्या सत्ताकाळांतील जनतेच्या आचार-विचारस्वातंत्र्याबद्दल व डाव्या पार्ट्यांच्या अंतर्गत व्यवस्थापनाबद्दलची खरी माहिती (पार्टी प्रोपागांडा नव्हे) वाचा.
गरिबांच्या कळवळ्याच्या डाव्या आयडियालॉजीचे पाठीराखे असलेले अनेक खंदे नेते दशलक्षाधीश का आहेत याबाबत थोडे उत्खनन करून पहा.
डावीकडे झुकाव असलेल्या तथाकथित पक्षांतील वंशपरंपरेचा आणि लांगुलचालनाचा अभ्यास करा. पार्टीतील नेत्यांना दिली जाणारी किंमत कोणत्या गुणांच्या बळावर मिळते त्याचा अभ्यास करा. जनतेचा कळवळा जाहीर करताना लाखो कोटींचा भ्र्ष्टाचार का होऊ शकतो याबद्दल माहिती करून घ्या.
भारतातल्या तथाकथित डाव्या विचारवंतांचे "भारतकी बरबादी / भारतके टुकडे"वाल्यांबरोबरचे साटेलोटे आणि अफजल गुरु/कसाब/याकूब मेनन इत्यादींच्या संबंधात अनेक वर्षांच्या न्यायिक प्रक्रियेतून गेल्यानंतर दिल्या गेलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दलचे मत, इ, इ, इ (यादी फार मोठी आहे) पहा.
बाहेरच्या जगात बघायचे असले तर...
चीन व रशियाचा भूत आणि सद्य इतिहास पहा.
असो, बघायचे असले जगात तर अनेक छटांचे डावे-उजवे आजूबाजूला सर्वत्र असतात आणि एकमेकाला सतत वाईट्ट-दुष्ट्ट ठरवत असतात. पर हमाममे वो सब नंगे है ।
त्यामुळे, कोणालाच कुठला रंग फासलेला आहे बघणे कि कोणाला कुठे झुकलेला ठरवलेले आहे हे बघणे वास्तविक ठरत नाही, कारण रंग आणि झुकाव बहुदा वरवरचे असतात, चष्मा बदलला की बदललेले दिसतात...
...चष्म्याविना पाहिलेला एखादा माणूस/नेता/पक्ष/संस्था स्वतःच्या हितसंबंधाच्या पुढे जाऊन वास्तवात देशाचा फायदा करण्याकडे झुकलेला असला/ली तर तो चागला/ली हा मानदंड जास्त योग्य आहे...
...असे नसेल तरच खर्या धोक्याची घंटा वाजायला हवी.
असो. जरा जास्तच इस्काटलं ;) ;)
10 Nov 2016 - 11:44 am | आनन्दा
ओक्के.. जनतेचा भाबडेपणा.. मला वाटले माझा.
सहमत आहे.
10 Nov 2016 - 1:07 pm | गामा पैलवान
अय्या, कित्ती कित्ती निरागस!
-गा.पै.
10 Nov 2016 - 3:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
यात अजून चीनच्या सांस्कृतीक क्रांतीतले ६ कोटी बळी आणि बायजिंगच्या तिएनआनमान चौकात लोकशाहीचे हक्क मागणार्या २०,००० निशस्त्र आंदोलकांची हत्या, कंबोडियातील पोल पॉटने केलेल्या आपाल्याच देशवासियांतील १/३ ना यमसदनी पाठविले, इत्यादी गोष्टी जोडल्यास तुलनेस अजून बरे पडेल.
9 Nov 2016 - 1:51 pm | जानु
मोबाईल वर टंकल्या मूळे शुद्ध लेखनाच्या चुका माफ करा
9 Nov 2016 - 2:10 pm | नाखु
वाक्य आवडले आणि पटले.
सर्वधर्मसम्भावच्या नावाखाली अत्याचार्/अतिरेकी हल्ले सहन करण्याचा लोकांनाही राग्/उद्वेग आलाच होता.
9 Nov 2016 - 3:43 pm | बोलबोलेरो
आवडलं.
9 Nov 2016 - 2:32 pm | महासंग्राम
शीत युद्धच्या सुरवातीपासून तिसरे महायुद्ध सुरु झालं होतं. फक्त ते थेट न लढता आर्थिक दादागिरी, अवकाश तंत्रज्ञान ई स्वरूपात लढलं जाते आहे. आपण सगळे कळत नकळत या युद्धाचाच एक भाग आहोत. फक्त आता त्याच स्वरूप जास्ती उघडपणे दिसेल आणी वेगळ्या पद्धतीने लढले जाईल. उदा. पाणी, प्रदूषण, इ. इ
9 Nov 2016 - 2:40 pm | आनन्दा
हे तर आहेच. पण यात एक फरक आहे. आतापर्यंत आपण केवळ राज्यकर्त्यांचे मत विचारात घेत होतो. आता सोशलमिडियामुळे जनतेचे मत पण दिसू लागते.
विशेषतः तीन प्रमुख लोकशाही देशांमश्ये जेव्हा सामान्य जनता प्रसारमाध्यमांच्या विरुद्ध भूमिका घेते, आणि माध्यमांना त्याचा पत्ताही लागत नाही (लागत असेलही कदाचित) हे मला जास्त अलार्मिंग वाटते.
9 Nov 2016 - 2:56 pm | जानु
आवडले. जनमत एका दिवसात तयार होत नाही. भारतात हा लंबक मागील १० ते १५ वर्षात बदलला असे दिसते. हिन्दु जनतेला हे स्पष्टपणे जाणवायला लागल्यावर नेमके मोदी एक पर्याय म्हणुन समोर आले. तसेच अमेरिकेत. हे मान्य की भांडवलशाही ला शांतता आणि युद्ध गरजेप्रमाणे आवश्यक असतात. पण या मतपरिवर्तनामागे जनतेला इस्लामी दहशत वादाचा धोका अधिक महत्वाचा वाटतो आहे. हे लक्षात घ्या की जनतेने आता हा दहशतवाद मोडुन काढणे आवश्यक आहे असे मत मनात तयार केले आहे आणि हे मानण्यास हा निकाल पुरेसा आहे. मग यासाठी युद्ध झाले तरी जनता त्यास तयार राहणार. माझ्या मते निवड झालेली आहे. फक्त कधी आणि केव्हा हाच प्रश्न आहे.
9 Nov 2016 - 3:16 pm | आनन्दा
एव्हढ्यावरच भागत नाही. भारतात मोदींच्या उजव्या प्रतिमेवर सगळे झाले. मोदींचा उघड अजेंडा विकासाचाच होता. मग ट्रंपने मोदींच्या पुढे एक पाऊल टाकले असे म्हणायचे का? की केवळ माध्यमांच्या (अव)़कृपेमुळे हे जिंकले असे म्हणायचे? माध्य्मांची उघड भूमिका उदारमतवादाची असते, आणि म्हणून हा माध्य्मांच्या उदारमतवादाचा पराभव मानायचा का?
9 Nov 2016 - 3:17 pm | अनिरुद्ध.वैद्य
सगळीच माध्यमे मोदी, ट्रम्प अन ब्रेग्झिटविरुद्ध अक्षरश: हात धुवुन मागे लागले होते.
9 Nov 2016 - 3:47 pm | बोलबोलेरो
" फक्त कधी आणि केव्हा "
चपखल
10 Nov 2016 - 1:26 pm | वैभव पवार
2020-2025. सुरुवात भारत-पाकिस्थान नक्कीच नाही.
9 Nov 2016 - 3:21 pm | वरुण मोहिते
आधी लेख प्रतिसाद वेगळ्या नावाने मग आता परत वेगळ्या नावाने .
9 Nov 2016 - 3:24 pm | आनन्दा
???
तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे? अनिरुद्ध वैद्य हा माझा डुआयडी आहे?
9 Nov 2016 - 3:24 pm | वरुण मोहिते
प्रतिसाद देण्यात
9 Nov 2016 - 6:52 pm | वेल्लाभट
पॉसिबल. येत्या तीन एक महिन्यात पाक सीमेवर काहीतरी घडू शकतं असं वाटतंय. ट्रम्प, मोदी डेडली ड्युओ ठरणार बहुदा पाकसाठी.
9 Nov 2016 - 7:19 pm | बोका-ए-आझम
मग ते भारतीय असोत की
9 Nov 2016 - 7:25 pm | बोका-ए-आझम
9 Nov 2016 - 9:50 pm | संजय पाटिल
खुळ्यात काढलं राव सलग तीन वेळा...
9 Nov 2016 - 9:50 pm | पैसा
लेख आणि चर्चा आवडली. मात्र ट्रंप जिंकले यात एक ट्रिक आहे. प्रत्यक्षात हिलरीना लोकांची मते जास्त पडली आहेत तरी त्या अध्यक्ष बनू शकत नाहीत असा विचित्र प्रकार. आणि भारतात मोदी जेवढे प्रचंड बहुमताने निवडून आले तेवढा फरक अमेरिकेत पडलेला नाही. भारतात अर्थात फक्त उजवीकडे लोक झुकले एवढाच मुद्दा नव्हता तर अनेक आघाड्यांवर आधीच्या सरकारचे नाकर्तेपण, अनागोंदी, भ्रष्टाचार, महागाई असे अनेक सामान्य जनतेला त्रासदायक मुद्दे होते आणि कदाचित लोकांना मोदींच्या उजवे असण्यापेक्षाही मोदींकडे या सगळ्याला आवर घालण्याची ताकत आहे अशी आशा वाटून ते जास्त आकर्षक वाटले असावेत.
11 Nov 2016 - 3:36 am | हुप्प्या
निवडणुकीत विजयाकरता काय होणे आवश्यक आहे ह्याचे काटेकोर नियम आधीच ठरलेले आहेत. त्यामुळे निकाल लागल्यावर त्याला विचित्र म्हणून नाक मुरडणे ठीक वाटत नाही. धावण्याची शर्यत असेल तर उंच उडीचे नियम लावता येत नाहीत तसेच इलेक्टोरल व्होट वर विजय ठरत असेल तर पॉप्युलर व्होटचा मुद्दा साफ गैरलागू ठरतो.
जर नियम वेगळे असते तर व्यूहरचना वेगळी केली गेली असती आणि निकाल वेगळे लागले असते..
9 Nov 2016 - 10:42 pm | गामा पैलवान
आनन्दा,
लेखातला शेवटचा प्रश्न चर्चेस घेतो.
पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी की केवळ ध्रुवीकरण म्हणजे युद्ध नव्हे. कुठल्याही महायुद्धासाठी ध्रुवीकरण जरी पूर्वावश्यक असलं तरी कुण्या एका पक्षाच्या राज्यकर्त्यांत लढाईची खुमखुमी असेल तरंच युद्धाला तोंड फुटतं.
अमेरिकेत ट्रंप आणि हिलरी यांची तुलना केली तर हिलरी रशियाविरुद्ध उघड युद्धाच्या बाता मारते. याउलट ट्रंप रशियाशी सहकार्य करावं म्हणतोय. भारतात मोदी आणि मनमोहन यांची तुलना करू पाहता मोदींनी जो प्रबळ संदेश पाकिस्तानात पाठवला आहे त्यामुळे पाकिस्तान हल्ले करतांना दहा वेळा विचार करेल. प्रत्यक्ष युद्ध न करता केवळ डोळे वटारून पाकिस्तानला भयभीत करणं फायदेशीर आहे. ट्रंप आणि मोडी दोन्ही ध्रुवीकरणाची प्रतीके असली तरी दोघांनाही युद्धखोर म्हणता येणार नाही.
आ.न.,
-गा.पै.
10 Nov 2016 - 12:07 am | श्रीगुरुजी
हा धागा आताच पाहिला. अमेरिकेच्या निवडणुक निकालाच्या धाग्यात मी आताच खालील प्रतिसाद दिला होता.
______________________________________________________________________________
गेल्या काही वर्षांपासून जगातील महत्त्वाच्या देशांमध्ये जनता उजवीकडे वळताना दिसत आहे. २०१४ मध्ये मोदी निवडून आले, २०१६ मध्ये ब्रिटिश जनतेने ब्रेक्झिटच्या बाजूने कौल दिला आणि आता अमेरिकेत ट्रंप निवडून आला आहे. जेव्हा जेव्हा उदारमतवाद, धर्मनिरपेक्षतावाद, मानवता इ. इ. साठी देशहिताचा बळी देणे सुरू होते तेव्हा तेव्हा जनता उजवीकडे वळते.
युपीएच्या काळात भ्रष्टाचाराने कळस गाठला होता. पण त्याबरोबरीने मुस्लिम दहशतवाद्यांविषयी बोटचेपे धोरण, पाकिस्तानची मुजोरी सहन करणे, धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुस्लिमांचे लांगूलचालन व चुकीच्या गोष्टींचे समर्थन इ. देशहितविरोधी गोष्टीही जोमात सुरू होत्या. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून काँग्रेसचा दारूण पराभव होऊन उजवे समजले जाणारे मोदी निवडून आले.
मागील काही वर्षांपासून ब्रिटनने मध्यपूर्वेतील स्थलांतरीतांना आश्रय देण्याविषयी उदार धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे स्थानिक जनतेच्या रोजगाराच्या संधीवर परीणाम झाला आहेच, परंतु दहशतवादाचा धोका अधिक वाढला आहे. ब्रिटन युरोपिअन युनियनचा सदस्य असल्याने स्थलांतरीतांना आश्रय देणे त्या देशावर बंधनकारक होते, परंतु त्याचा जाच सामान्य जनतेला व्हायला लागला होता. त्यामुळेच ब्रेक्झिटला बळ मिळाले.
अमेरिकेत ट्रंपने मुस्लिम दहशतवाद्यांविरूद्ध उघडउघड भूमिका घेतली. डेमोक्रॅट्स तशी भूमिका घेण्यास कचरत होते. ट्रंपच्या विजयामागे हा एक मुद्दा होताच.
मला वाटते आता पुढील क्रमांक जर्मनीच्या अँजेला मेर्केल यांचा लागेल. देशातील जनतेचा विरोध झुगारून त्या हिरिरीने मध्यपूर्वेतील निर्वासितांना जर्मनीत आश्रय देत आहेत. जर्मनीतील समाजजीवन यामुळे अस्वस्थ झाले असून दहशतवादाचा धोका वाढलेला आहे. शेजारील फ्रान्स, बेल्जियम व टर्की या देशांमध्ये दहशतवादी हल्ले मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकीत अँजेला मेर्केलना जर्मन्स नक्कीच नाकारतील असा माझा अंदाज आहे.
______________________________________________________________________
माझा प्रतिसाद व धाग्यातील विचार मिळतेजुळते आहेत असं दिसतंय.
10 Nov 2016 - 1:40 pm | गामा पैलवान
श्रीगुरुजी,
मर्कळेबाईचं खरं नाही येत्या निवडणुकांत. बलात्कारी डुकरं आयात करून जर्मन बायकांच्या माथी मारली हिने. हिला का म्हणून निवडून द्यायची लोकांनी?
आ.न.,
-गा.पै.
12 Nov 2016 - 11:00 am | प्रदीप
मला वाटते, फ्रान्सचा आहे. तिथे समाजवादी ओलांद सत्तेवर आले, ते अर्थात समाजवादी घोषणांचा आधार घेऊनच. सत्तेत आल्यावर मात्र त्यांना वास्तवाचे चटके बसू लागले. तेव्हा त्यांनी काही लेबर- कायद्यातील सुधारणांचा प्रस्ताव आणला. त्याविरूद्ध महाप्रचंड गोंधळ झाला, पॅरिसमधे रीतसर निदर्शने, जाळपोळी वगैरे झाल्या. ते प्रकरण, मला वाटते, अजूनही तसेच लटकून आहे.
तितक्यात दहशतवादी हल्ले झाले, मग मध्यपूर्वेतील विस्थापितांच्या झुंडी आल्या. ह्या वातावरणात ले पेन ह्यांच्या अति उजव्या समजल्या जाणार्या पक्षाला आता बरीच चालना मिळाली आहे. सार्कोझींच्या उजव्या पक्षासही आता पेन ह्यांचा पक्ष लवकरच होऊ घातलेल्या निवडणूकीत हरवेल की काय अशी भीति वाटते आहे.
10 Nov 2016 - 1:26 am | विकास
भारतीय उजवे आणि(अमेरीकेसहीत) पाश्चात्य देशांमधील उजवे यात सर्वार्थाने फरक आहे.
10 Nov 2016 - 1:15 pm | वैभव पवार
'युद्ध आणि महायुद्ध दोन्हीच्या मध्ये एक छोटं महायुद्ध होणार' हे (बोल्डमध्ये) लिहुन ठेवा.
मी तर सध्या त्या क्षणाची वाट पहातोय जेव्हा ट्राम्प आणि मोदी समोरा समोर असतील, एक शंकराचा त्रिशुल तर दुसरा विष्णुचं सुदर्शन चक्र.
11 Nov 2016 - 2:07 am | बॅटमॅन
अगायायायायाया मेलो मेलो मेलो =)) =)) =))
11 Nov 2016 - 3:55 am | अर्धवटराव
तसं झाल्यास शंकरराव कोण म्हणायचे? विष्णुसाहेबांना नक्की नंदी कोण हेच कोडं पडेल पहिले =))
मिपावर असेही विनोद होतात आजकाल =))
12 Nov 2016 - 3:20 am | डॉ सुहास म्हात्रे
=)) =)) =))
'युद्ध आणि महायुद्ध दोन्हीच्या मध्ये एक छोटं महायुद्ध होणार' हे 'बोल्ड' विधान जागतिक राजकारण्यांना 'क्लिन बोल्ड' करणारे आहे इतकेच सद्या लिहून ठेवतो आहे ;) (हघ्या)