टिव्ही ला ईडीयट बॉक्स का म्हणतात? खरा तो नुस्ता बॉक्स आहे, आणि इडियट आपण समोर बसुन कुठलेही भंकस कार्यक्रम बघणारे. हिटलरने ब्रेन वॉश करण्यासाठी , एकच गोष्ट वारंवार सांगणे हेच साधन वापरले होते.
टिव्ही मुळे पण नेमकं हेच होतं. बऱ्याच गोष्टी आपल्याला वारंवार दाखवल्या जातात आणि मग आपल्याला त्याच बरोबर आहे असं वाटायला लागतं.
हल्ली एक कार्यक्रम सुरु झाला आहे बालिका बधु नावाचा कलर्स चॅनल वर. आमच्या घरी डायनिंग टेबल मुंबई च्या पध्दती प्रमाणे हॉल मधे आहे आणि नेमकं तेंव्हा माझं जेवण सुरु असतं म्हणुन इच्छा असो वा नसो, ती सिरियल पहावीच लागते.
ह्या सिरियल मधे एका ८ वर्षाच्या मुलीचं लग्न होऊन ती सासरी गेलेली दाखवलं आहे. ही सिरियल पहाताना मला अगदी “सिक” फिलिंग येतं.त्या लहानशा मुलिवरचे तिच्या आजेसासुने केलेले मानसिक अत्याचार .. आणि कधी तरी शारिरिक पण बघुन कसंसच होतं .
ज्या गोष्टी पहातांना मला इरिटेट होतं त्याच गोष्टी स्त्रियांना खुप आवडतात.एखादी गोष्ट वाईट आहे हे समजुन सुध्दा ती गोष्ट सारखी पहाविशी वाटणं ही कुठली सायकॉलोगिकल डीसॉर्डर? एका स्त्रिवर होणारे अत्याचार (नाटकात किंवा सिरियल मधे का होइना) दुसरी स्त्री पाहुन एंजॉय कसे करु शकते?. एखादा सायकॉलॉजिस्टच ह्यावर काही तरी प्रकाश घालु शकेल.
खरं तर हे असले काहितरी सिरियल्स पाहुन इतर पहाणाऱ्या स्त्रियांना संताप येणं अपेक्षित आहे, पण तसं होत नाही, उलट स्त्रियाच त्या बालिका बधु वर प्रेम करु लागतात .
ह्या लहान मुलांच्या म्हणजे ८ वर्षाची मुलगी आणि १२वर्षाच्या मुलाच्या संबंधामधे रोमॅंटिझम शोधणाऱ्या लोकं मानसिक दृष्ट्या विकलांग आहेत असे वाटते. मॅच्युरिटि कमी म्हणुन असे सिरियल्स बघितले जातात ,मनातले विकृत विचारांमुळे- की उगिच वेळ जात नाही म्हणुन? कुठलेही कारणं काही फारशी एन करेजिंग नाहीत..
ह्या सिरियलची ही बालिका बधु मध्यंतरी न्युज चॅनल वर पण यायची. ती लहानशी मुलगी डोक्यावर पदर घेउन आणी लेहेंगा चुनरी घेउन जेंव्हा दाखवतात, तेंव्हा सौ. ला ती गोड दिसते आणि मला पॅथेटीक… अगदी कीव येते तिची. येता जाता ते गाणं छोटिसी ये —- सुरु झालं की मला तर मळमळतं हल्ली.
प्रतिक्रिया
10 Feb 2009 - 6:03 am | भाग्यश्री
खरंतर अशा मालिका पाहणं न पाहणं आपल्या हातात असतं हेच खरं! आपण स्वतः फारफारतर ती मालिका न पाहता पुस्तक वाचत बसू. पण आपल्याच घरातील माणसे मन लावून बघतात मालिका, हे पाहीलं की वैताग येतो!
आमच्या घरात अक्षरश: असा अलिखीत नियम होता, ज्याला टीव्ही पहायचाय त्याने बाहेर हॉल मधे बसावं! बाकीच्यांनी स्वयपाकघरात बसून जेवले तरी चालेल..
अर्थात, रात्रीचे जेवण (तरी) एकत्र वगैरे फंडे काळाच्या पडद्याआड गेले आहेत या मुळे!
(टीव्ही आणि एकंदरीत मालिकांची प्रचंड चीड असलेली) भाग्यश्री.
http://bhagyashreee.blogspot.com/
10 Feb 2009 - 6:10 am | दीपुर्झा
कायच्या काय आहे ती मालिका. अन सगळे टीव्हीचे पुरस्कार त्याच मालिकेला मिळाले !!
ती मुलगी गोड आहे पण असला विषय :( वरुन आव आणतात की आम्ही ह्याच्या विरोधातच आहोत म्हणून . परवा एक भाग सहज टी व्ही चाळताना पाहण्यात आला त्यात 'दहेज' साठी ती आजेसासू एक रूम भरुन सामान आणून ठेवते. त्यात जावयाला द्यायच्या बाइक पासून ते ४२" एलसीडी टीव्हीपर्यंत सगळे सामान !! अशानी तो प्रकार अजून कीती वाढेल, आधीच कमी म्हणून की काय हे असले बघून महिला वर्गाच्या मनावर नक्कीच परिणाम होत असणार ..
अन आता लाडो नावाची असलीच एक मालिका येतीये अजून ... प्रोमो पाहिले परवाच ..
10 Feb 2009 - 6:50 am | सुक्या
ह्या टी व्ही सिरियलसचा नेमका उद्देश काय असतो तेच कळत नाही. ढोल जसा दोन्ही बाजुने वाजतो तसे ह्यांचे आहे. दहेज च्या नावाने आकांड्तांदव करायचे अन् दहेज द्यावा लागेल म्हणुन हे सारे दाखवायचे. असलीच एक सिरियल मागे पाहण्यात आली. 'बेटीया ..". बेटा बेटीत फरक करु नका हे सांगायला १०० एपीसोड खर्च केले अन् आता 'ये मेरा बेटा है मेरा एकलोता वारीस' असले काहीतरी मुक्ताफळे उधळताहेत.
आजकाल मला नागीन / अल्लादीन सारखा सिरियल आवडायला लागल्या आहेत. ताप नाय डोक्याला. जे दिसल ते बगायचं.
(अल्लादीन प्रेमी) सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
10 Feb 2009 - 7:19 am | नीधप
मी जमेल तेव्हा बघते. कारण एकच सुरेखा सिक्रीचा अप्रतिम परफॉर्मन्स. खूप दिवसांनी या अभिनेत्रीला खुलके परफॉर्म करताना पाहतेय. अनूप सोनी हे दुसरं आकर्षण. आणि त्याचाही अभिनय मस्तच. जे सुरेखा सिक्री आणि अनूप सोनी चे सीन्स असतात ते बघायला जाम मजा येते.
बाकी इतर दळणापेक्षा थोडासा फ्रेशनेस आहे यात इतपतच.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
10 Feb 2009 - 7:37 am | अविनाशकुलकर्णी
बालिका वधुला कशाला नावे ठेवायला हवि? मराठी सिरियल्स अचरट पणा करण्यात काय मागे आहेत का? ..वहिनिसाहेब/कुलस्वमिनि/असंभव एका पेक्षा एक आहेत..समोर बसलेला प्रेक्षक मुर्ख आहे असे समजुन अचरट पणाचा हौदोस घालत ह्या सिरियल्स नि नको केले आहे..पण प्रवाह वरिल..राजा शिव छत्रपति, आणि अग्निहोत्र ह्या मालिका मात्र बघाव्याशा वाटतात
10 Feb 2009 - 8:13 am | सातारकर
अहो लोक हे सगळ बघत नसते तर ह्यान्नी दखवले कस असत ? त्या वाहीन्या एकट्या थोडीच जबाबदार आहेत...
याच नियमाने आपण व्रुत्तवाहिन्यांच्या मनोरंजन करणाय्रा बातम्या देखील बघतोच की (माणसाचे सापात रुपांतर, राष्ट्रीय ब्रेकींग न्यूज -जीप पाण्यात पडली). जगातल्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी सांगून संपल्यासारख हे लोक अक्षरशः वाट्टेल ते दाखवीत असतात.
10 Feb 2009 - 8:37 am | नन्या
याच मुळे मी केबल बन्द केली. आता पुर्वी प्रमाणे रात्री एक्त्र जेवातो. ना रहा बाजा, ना बजती बासुरी.
10 Feb 2009 - 2:17 pm | भडकमकर मास्तर
ज्या गोष्टी पहातांना मला इरिटेट होतं त्याच गोष्टी स्त्रियांना खुप आवडतात.एखादी गोष्ट वाईट आहे हे समजुन सुध्दा ती गोष्ट सारखी पहाविशी वाटणं ही कुठली सायकॉलोगिकल डीसॉर्डर? एका स्त्रिवर होणारे अत्याचार (नाटकात किंवा सिरियल मधे का होइना) दुसरी स्त्री पाहुन एंजॉय कसे करु शकते?.
या स्त्रियांवर केलेल्या सर्वसाधारण विधानांवरून मिपावरील महिलावर्गाचा स्फोट होईल, असा अंदाज होता पण अजूनही बरीच शांतता दिसते...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
10 Feb 2009 - 3:20 pm | महेंद्र
अहो, मी माझ्या घरच्या स्त्रियांना म्हणजे माझ्या दोन टिन एजर्स आणि बायको..उद्देशुन लिहिलंय ते..